Skip to main content

प्रवास

ट्यूलिप्सच्या गावा...

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 01/05/2009 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
ऍमस्टरडॅमची आणि आमची परत गाठभेठ होईल, असं वाटलं नव्हतं...पण ट्यूलिप्सची शेतं आणि बागा आम्हाला खुणावत होत्या.आमची मागल्या वेळची भेट ओल्या पावसात चिंब भिजलेली होती.क्रिकेट तिरंगी सामन्यांचे निमित्त होते,पण तेव्हा ट्यूलिप्सचा हंगाम नव्हता.ही नाजूक फूलं मार्च एंड ते मे या काळात बहरतात.कॉकेनहॉफ हे ट्यूलिप्सचे नंदनवन! ऍ' डॅम पासून तासदीड तासाच्या अंतरावर...दरवर्षी इथे लाखो ट्यूलिप्सची लागवड होते,आणि इतरही कितीतरी प्रकारची फुले!

मिलपिटास येथील चटपटीत कट्टा - वृत्तांत

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 01/05/2009 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात उत्तर कॅलिफोर्नियामध्ये जाण्याचा योग आला. निघण्याआधी मी "मिसळप्रेमी तितुका मेळवावा" वचनाला अनुसरून चौकशी सुरू केली. आणि सान-होसे बे-एरिया भागातील लोकांनी त्याचवेळी कट्टा आयोजित केला. पहिला खुलासा : सनीव्हेल-सानहोसे म्हणजे अगदी नारायणपेठ-नवसह्याद्री आहे असे म्हणतात, ते खोटे आहे. खडूसपणाची खूणही खरवडून खरवडून सापडली नाही. त्यामुळे लोकहो, सदाशिव पेठेतले घर सोडून इथे येण्याचा विचार खोडा. त्रास होईल. चार पैसे जास्त लागले, तरी आपले कोथरूडच बरे. दुसरा खुलासा : पुढील चित्रांमध्ये "चित" होऊन चेष्टा करणारे सर्व प्रौढ लोक आहेत.

गौडगावचा जाग्रुत मारुती

लेखक सनविवि यांनी रविवार, 26/04/2009 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आई-बाबा दर शनिवारी मारुतीला जातात. मी Agnostic Theist या categoryत मोडत असल्यामुळे मला कधी आग्रह करत नाहीत ते! पण आज म्हटलं, जाऊया आपणपण, तेवढंच सकाळी लवकर उठणं होईल! हे मंदिर अक्कलकोट तालुक्यातल्या गौडगाव (बु.) या गावात आहे. सोलापूरपासून बसने पाऊण तासावर. दर शनिवारी-रविवारी सकाळी ६:२० पासून दर अर्ध्या तासाने बसेस असतात. बरोबर ७ ला पोचलो आम्ही गावात. ४:३० लाच उठावे लागले होते! माझ्या मानाने फ़ार म्हणजे फारच लवकर! पण सकाळच्या ताज्या हवेत बाहेर पडल्यावर सगळा कंटाळा पळून गेला.

फिरेन्झ -कलानगरी

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 19/04/2009 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर 'रोमायण' घडल्यापासून इटलीला जायचा मी धसकाच घेतला होता. दिनेश कामानिमित्त मिलानला ३,४ दा जाऊन आला तरी प्रत्येक वेळी मी आपली कारणं काढून घरीच थांबले होते पण फिरेन्झ, काप्री ,नापोली आणि अशी कितीतरी जणं खुणावत होती, बोलावत होती. ते आकर्षण होतंच दडलेलं.. अशातच विपिनचं डॉर्टमुंडचं बिर्‍हाड फिरेंझला हललं. आता तिथे एक आपलं घर आहे, विपिनने फिरेन्झशी चांगली दोस्ती केली आहे, आता इटलीला जायला हरकत नाही असं मनाला समजावून, बजावून शेवटी इस्टरच्या सुटीत फिरेन्झचे बुकिंग केले.

पुष्पक यानात भानू आणि पार्वती

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 07/04/2009 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्पक यानात भानू आणि पार्वती पुष्पक यानात भानू आणि पार्वती. मूळ हिंदी लेखक: गोरा चक्रबर्ती, अनुवादकः नरेंद्र गोळे पहिले सादरीकरणः श्री.अशोक चिटणीस व सौ.शुभा चिटणीस, १४-१२-२००८ रोजी भवन्स सभागृह अंधेरी येथे. सार्वजनिक सादरीकरणाच्या अनुमतीसाठी 'मिपाच्या पोस्ट हापिसाचा' उपयोग करून मला पत्र लिहा. प्रस्तावनाः भानू आणि पार्वती पुष्पक यानात बसलेले आहेत. गंतव्य स्थळः चंद्र. काही क्षणातच उपग्रह प्रक्षेपण वाहनातून, पुष्पकयान अवकाशात प्रक्षेपित होणार आहे. थुंबा प्रक्षेपण केंद्रात उलटी मोजणी सुरू झालेली आहे. दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, दोन, एक, शून्य ...

दोन राज्यांचे रेल्वे स्टेशन

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 03/04/2009 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
नवापुर - (हो तेच ते बर्ड फ्लू वाले) हे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याच्या हद्दीवर वसलेले तालूक्याचे ठिकाण आहे. येथूनच राष्ट्रीय महामार्ग ६ (नागपूर- सुरत) जातो. ते नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात मोडते. स्वतंत्र महाराष्ट्र होण्यापुर्वी हे गाव गुजरात मध्ये जाणार होते. त्या वेळी तेथील लोकांनी ठराव करून हे गाव महाराष्ट्रात आणले. (गुजरात मधील सुब्बत्ता बघुन त्यांचे आत्मे आता पस्तावत असतील.) या गावात मराठी तसेच गुजराथी लोक गुण्यागोवींदाने राहतात. शहरात नगरपालिका स्वच्छ्तेची विषेश काळजी घेते असे दिसले. हे गाव उकाई धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याच्या (मराठीत आपले 'बॅक वॉटर' हो)जवळ आहे.

अविस्मरणीय वासोटा!!!

लेखक सुवर्णा यांनी शुक्रवार, 27/03/2009 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
मी २ वर्षांपूर्वी वासोट्याचा trek केला होता, त्याचं वर्णन लिहिलं होतं. तेच मिपावर परत टाकतेय. आवडेल अशी आशा.. :) आम्ही officeमधल्या लोकांनी सातार्‍यापासून अवघ्या 35Km वर असणार्‍या वासोटा डोंगराचा trek केला. वासोट्याचा trek म्हणजे माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातील सगळ्यांत जास्त आनंददायी event.. जसा एखाद्या टुकार cricket match मध्ये टुकुटुकु खेळणार्‍या batsmanचा चुकून six बसावा अगदी तसा.. तो एक क्षण, तो आनंद.. तो जल्लोष.. त्याच्यापुढे मग सगळं काही फिकं पडतं.. सगळं जग अचानक सुंदर वाटू लागतं.. सगळ्या काळज्या, चिंता अचानक गळून पडतात आणि मस्त नवीन पालवी फुटते.. उमेदीची.. उत्साहाची.. मस्त!!