Skip to main content

प्रवास

म्यां नवल पाहिले---पुलाउ ओरांग उतान

लेखक वैशाली हसमनीस यांनी गुरुवार, 19/02/2009 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
मलेशियादेशावर निसर्गाचा वरदहस्त असल्यामुळे निसर्गातील अनेक चमत्कार येथे बघायला मिळतात परंतु मानव आणि वन्यजीव यांची सांगड घालणारे एक नवलही मला येथे ''पुलाउ ओरांग उतान'' येथे पहायला मिळले. पुलाउ म्हणजे बेट या बेटावर ओरांग उतान ह्या मानवसदृश वानरांचे संवर्धन , पुनर्वसन, संशोधन , निगराणी इ. कार्य केले जाते. सिंगापूर ते थायलंड ह्या महामार्गावर कोलालंपूरपासून साधारण २ ते २.३० तासांवर 'बुकिट मेराह' नावाचे प्रेक्षणीय स्थळ आहे. तिथून 'मरिना'या गावापासून जेटीने बेटावर पोहोचता येते.

च्याव ज्झ

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 15/02/2009 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
चीनला जायचे तर सिंगापुरला लेकराला भेटुनच जावे असा विचार करुन आस्थापनेच्या पर्यटन संस्थेला सिंगापुर मार्गे प्रवासाची व्यवस्था करायला सांगितली तर त्यांनी नकारघंटा वाजवली. म्हणे सिंगापुर एअरलाईन्सने पर्यटन संस्थांना अडत देणे बंद केल्याने सर्व पर्यटन व्यावसायिक संस्थांचा सिंगापुर एअरलाईन्सवर सध्या बहिष्कार आहे. त्यांनी शिताफीने हॉंग कॉंग, कुआला लुंपुर, बॅंकॉक अशा तीन रुपरेषा आखुन दिल्या. पण जाणार तर पोराला भेटुनच जाऊ यावर मी ठाम होतो. मग मी सिंगापुर एअरलाईन्सच्या संस्थळावर गेलो आणि चार दोन वेळा मागे पुढे होता करता अखेर हव्या त्या तारखांची तिकिटे जमवली.

एका रानवेड्याची शोधयात्रा

लेखक जयवी यांनी गुरुवार, 29/01/2009 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णमेघ कुंटे या एका रानवेड्याची जंगलातली मुशाफ़िरी.....! ख-याखु-या जंगलपुत्रासारखं राहून.... जे अनुभवलं ते सहजसुंदर शैलीत लेखकानं रेखाटलंय. "काही पुस्तकं वाचायची नसतात, तर अनुभवायची असतात" असं म्हणतात ते अगदी खरंय. मिलिंदनं हे पुस्तक जरुर वाच असं सुचवलं तेव्हा ह्या पुस्तकात काहीतरी जबरी असणार ह्याची खात्री होती.... आणि झालंही तसंच ह्या पुस्तकासोबत आपण अक्षरश: जंगलात वावरतो. जंगल, निसर्ग ह्यावर मनापासून प्रेम करणा-या ह्या "कृ्ष्णमेघा"ची लेखन शैली इतकी ओघवती आहे ना...की आपण कधी त्याच्या सोबत जंगलात निघतो ते कळतंच नाही. अतिशय मधुर आणि अलंकारिक भाषा !

राऊरकेला

लेखक SwanandSolanke यांनी बुधवार, 21/01/2009 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
दिड वर्षांपूर्वी मला स्वप्नात देखिल वाटले नव्हते की, मी एम् टेक करण्यासाठी ओडिसा राज्यात जाईल. ज्या राज्याचा उल्लेख फक्त महानादीच्या पुरापूरता आणि रथ यात्रेपूरता येतो, त्याच राज्यात एक भारत सरकारच्या कायद्यानुसार राष्ट्रीय महत्वाचे इंजीनियरिंग महाविद्यालय आहे, राष्ट्रीय तंत्रद्न्यान संस्था, राऊरकेला , हे त्याचे नाव. असो, मी मिसल पावचा नुकताच सदस्य झालो, भटकंती हा माझ्या अनेक छंदान्पैकी एक, म्हणुन सुरुवात करतांना या राज्याचे सौंदर्य मी आपल्या समोर ठेवत आहे. ओडिसा राज्य जितके निसर्गसुन्दर तितकेच कमालीचे विरोधाभासी आहे.

महाराष्ट्रातिल गड किल्ले ! इत्यन्म्भुत माहिति

लेखक मानव यांनी बुधवार, 21/01/2009 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातिल गड किल्ले ! इथे बर्याच किल्ल्यान विषयि इत्यन्म्भुत माहिति देन्याचा प्रयत्न केला आहे ! आपल्या प्रतिक्रिया कळवा ,आणखिन अपडॅट लवकरच करनार आहे http://tush9890.blogspot.com/

दिल्ली ते दिल्ली !

लेखक दशानन यांनी बुधवार, 21/01/2009 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
१२ डिसेंबरला घरी जाणार जाणार म्हणून तयारी करत करत मी २२ला जाण्यासाठी मोकळा झालो, पण अचानक टिकीटे तथा काहीच बाकीचे प्लान तयार नव्हते तरी म्हणालो निघायचं आहे तर निघू .. बघू काय होईल ते ! मित्राबरोबर सरळ न्यु दिल्ली रेल्वेस्टेशनला पोहचलो व टिकीटासाठी दोन तास अटापिटा करुन शेवटी मुंबई राजधानीचे टिकीट घेतले व सरळ ४.१५ च्या गाडी बसलो. योग्य वेळ योग्य काम करणे हा माझा धर्मच नाही त्यामूळे गाडीत बसल्यावर विसरलेल्या गोष्टि आठवू लागल्या.. चार्जर घेऊन आला नाहीस.. पैसे सुट्टेच खिश्यात आहेत... नशीब एटीम तथा क्रिडीट कार्ड घेऊन आला आहेस नाही तर मुंबई मध्ये बस भीक मागत..

पांडवकडा अन्‌ आम्ही..

लेखक दिपक यांनी सोमवार, 12/01/2009 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मिपावरचे पहिलेच लिखाण आहे. चुका सांगाव्यात सुधारणा सुचवाव्यात. पहिलावाहिला प्रयत्न आहे सांभाळुन घ्या :) कालच लोकसत्तेत "नायगरा फॉल्समधुन सुटका" ही लघुकथा वाचली आणि पांडवकड्यावर आलेल्या भयानक प्रसंगाची आठवण झाली. चार वर्षापुर्वीची गोष्ट आहे. पावसाळ्यात कुठेतरी भटकंतीला जायचं हा आमचा मित्रमंडळीचा ठरलेला कार्यक्रम. माथेरान, लोणावळा अशी ठिकाण करुन कटांळा आला होता. वॉटरफॉलला जायचं हे नक्की ठरलेलं. त्यामुळे लोणावळ्याच्या किंवा खडवलीच्या कुठल्यातरी वॉटरफॉलला जाऊ असा वाद चालला असता एकाने खारघरच्या पांडवकड्याचे नाव सुचवले. आमच्यापैकी तिथे कुणी गेलं नव्हतं.