इतिहासाचे पुनर्लेखन
💬 प्रतिसाद
(352)
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/03/2010 - 14:53
नवीन
चूक. पहील्या बाजीरावालाही रावबाजी म्हणायचे. दुसर्यालाही अर्थात त्याच्या नावामुळे रावबाजी म्हणायचे. दुसर्याला बाजीरायी असेही म्हणायचे.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 09/03/2010 - 16:49
नवीन
>>एक छोटी चुक
रावबाजी हे दुसर्या बाजीरावाला म्हणायचे पहील्या नाही.
Dipankar या गोष्टी तुमच्या पेक्षा पेशव्यांनाच जास्त नाही का माहीत असणार...उगीच हुज्जत घालू नका. ;)
- Log in or register to post comments
अ
अर्धवट
Fri, 09/03/2010 - 12:14
नवीन
>>सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ?
आम्हाला काय माहीत, सर्व चित्रकार, छायाचित्रकार ब्राम्हण आहेत असा उपआरोप समजायचा का? हा प्रश्न त्यांनाच विचारलेला बरा नाही का?
>>रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का?
कधिही कुठल्याही असुराशी प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग आला नाही, कृपया पत्ता कळवणे.
>>काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?
मीपावर कुणाचे तरी नाव हलकटशी समानार्थी समजले जाते असं ऐकुन आहे. हा प्रश्नाला ते उत्तर देतील काय?
>>ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ?
राजमहाल वनात असू शकत नाही काय?
>>द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ?
हा न्याय करायला कुठले न्यायाधीश आणायचे. वळसे घालुन कोळसे उगाळणारे का?
>>कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?
कशी झाली ब्वॉ?
उर्वरीत प्रतिसा(वा)द ब्रेक के बाद
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 09/03/2010 - 12:53
नवीन
>>कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?
कशी झाली ब्वॉ?
उगाच वेड पांघरुन पेडगावला जाउ नका. नियोगातुन पुत्रप्राप्ती झाले हे तर सर्वज्ञात आहे. त्या काळी योग्य होते ते. केले तसे तर बिघडले कुठे? फक्त कुंती माद्रीच का, अंबिका अंबालिका यांना सुद्धा पुत्रप्राप्ती तशीच झाली ना? त्यांच्याबाबतीत तर त्यांच्या मनाविरुद्ध झाली. मला या प्रश्नाचा रोखच कळाला नाही.
हा धागा नक्की कशासाठी आहे पराशेठे कळेल का?
ब्राह्मणांबद्दल आहे, कुंती - द्रौपदी बद्दल आहे, की अजुन कशाबद्दल?
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Fri, 09/03/2010 - 12:42
नवीन
लोकांना ब्राह्मणी मैना, ब्राह्मणी स्वैपाक वगैरे गोष्टी माहित असतील. मला या लेखनात ब्राह्मणी कावा दिसतो.
ब्राह्मणी काव्या विषयी आम्ही पुरोगामी वैचारिक मासिक आजचा सुधारक ला लिहिले आहे. वाचा
आता क्षत्रिय राम जानव घातलेला का दाखवतात? आमच्या मते पाठ खाजवण्यासाठी जानव्यासारखे दुसरे उत्तम साधन उपलब्ध नाही
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 09/03/2010 - 12:44
नवीन
आणि किल्ल्या अडकवण्यासाठीही! :)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 09/03/2010 - 12:49
नवीन
वनवासात कसल्या किल्ल्या ? हा बाणाचा भाता वगैरे बांधायला एकवेळ वापरले जात असेल.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 09/03/2010 - 12:51
नवीन
अयोध्येतील महालातील पर्सनल तिजोरीच्या ;)
अयोध्या सोडली तरी सगळ्या किल्ल्या दिल्याचा उल्लेख रामायणात कुठे आहे?
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 09/03/2010 - 13:04
नवीन
अहो सीतेने सगळे अलंकार काढुन दिले. वल्कले नेसली. तर आता किल्ल्या घेउन कुठला खजिना जपणार होती ती. उद्या म्हणाल राज्य सोडले पण सिंहासन राम बरोबर घेउन गेला कारण त्याने सिंहासन परत दिल्याचा कुठलाच उल्लेख नाही म्हणुन. :P
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 09/03/2010 - 13:12
नवीन
बरोबर.. म्हणूनच ती जानवे घालत नसावी ;) :P
- Log in or register to post comments
अ
असुर
Fri, 09/03/2010 - 14:48
नवीन
>>>हा बाणाचा भाता वगैरे बांधायला एकवेळ वापरले जात असेल<<<
जानवे होते की नाही इथपासूनच सुरुवात आहे ना! आधी हे सिद्ध करा की जानवे होते!
राम उजवा होता असा उल्लेख आहे रामायणात सीता-स्वयंवराच्या वेळेस. म्हणजे बाण उजव्या हातानेच काढणार भात्यातून! म्हणजे भात्याची दोरी उजव्या खांद्यावरुन जात असणार! मग ते जानवे सव्य घालायचे सोडून भाता बांधायला सोपे जाईल म्हणून कोणी अपसव्य का करेल का? अपसव्य करायला त्यांचे तात तेव्हा हयात होतेच की!
(मायला, जानव्यावर इतका विचार??? आवरा!)
आणि किल्ल्यांचं म्हणाल तर त्या राजवाड्याच्या असतील हो. आमच्या मते जानव्याचा मुख्य उपयोग कानावर किंवा खुंटीवर (संदर्भ: बावन्नखणी) टांगण्यासाठी होतो! :-)
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Fri, 09/03/2010 - 14:52
नवीन
बरं रामाचं सोडा.. अर्जुनाला सव्यसाचि हे नावं यावरूनच पडलं असावं! सव्यापसव्याचा हा खेळ तो लीलया करत असणार! :)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 09/03/2010 - 15:07
नवीन
हे लय भारी मेव्या! :)
- Log in or register to post comments
अ
असुर
Fri, 09/03/2010 - 15:16
नवीन
अर्जुनाला परवानगी असली पाहिजे, कारण त्यांचे तीर्थरूप सव्यापसव्याचा भार त्याच्या (दोन्ही) खांद्यावर टाकून गेले होते. :-)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 09/03/2010 - 14:56
नवीन
>>>>राम उजवा होता असा उल्लेख आहे रामायणात सीता-स्वयंवराच्या वेळेस.
काय सांगता ? रामायणात आणि चक्क राम सीता स्वयंवरात ? जरा डीट्टेल देता का त्याचे नक्की काय काय झाले तेव्हा !!
- Log in or register to post comments
न
नरेश धाल
Fri, 09/03/2010 - 14:59
नवीन
- Log in or register to post comments
अ
असुर
Fri, 09/03/2010 - 15:11
नवीन
असं गृहित धरुन की आपण एकाच रामाबद्दल बोलतो आहोत, सीता-स्वयंवराच्या वेळी रामाने शिवधनुष्य उचलले ते डाव्या हाताने (जी एखाद्या उजव्या हाताच्या व्यक्तीसाठी नैसर्गिक गोष्ट आहे) आणि उजव्या हाताने प्रत्यंचा जोडायचा प्रयत्न केला असता ते धनुष्य तुटले. वाल्मिकिरामायणात हे वर्णन आहे. माझ्याकडे याचा श्लोक सद्ध्या उपलब्ध नाहिये, त्यामुळे पुरावा नाही असा दावा तुम्ही करु शकता. सद्य परिस्थितीत तो अगदीच गैरवाजवी नाही.
तो श्लोक मिळाला की इथे च्योप्य पस्ते करतो!
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 09/03/2010 - 15:19
नवीन
सीता स्वयंवराच्या वेळी राम होता की सीता स्वयंवर झाल्यावर कुणीही पण न जिंकल्याने अविवाहित राहिलेल्या सीतेच्या त्या स्वयंवराची माहिती मिळाल्यावर ते शिवधनुष्य आहे तरी कसे हे पहायला बर्याच काळाने राम मिथिलेला गेला होता?
- Log in or register to post comments
अ
असुर
Fri, 09/03/2010 - 15:24
नवीन
आमचे मत वर एकदा सांगून झाले असल्याने पुनर्लेखित करीत नाही! आपणास काही वेगळी माहीती असल्यास सांगावी. माझ्या ज्ञानात भर पडेलच, अधिक प्रस्तुत लेखकाचा विषय इतिहासाचे (+/- पुराणांचे देखील) पुनर्लेखन आहे, त्यांनाही एक वेगळा दृष्टीकोन मिळेल! कसे?
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 09/03/2010 - 15:26
नवीन
असे भडकु नका. अज्ञ लोकांना शहाणे करा.. इतिहास असा भडकुन लिहिला जात नाही.
- Log in or register to post comments
अ
असुर
Fri, 09/03/2010 - 15:49
नवीन
असं भपकन (!) भडकायला मी त्या बाबतीत इतका प्रवीण नाही हो!
उलट पुनर्लेखन चालूच आहे तर आपणही आपल्या पोतडीत काही जादुई माहीती असेल तर बाहेर काढा असा घाऊक आग्रह आहे हा! यात चिडाण्याजोगं काही आहे का आता..
असो, तुम्ही माहीती देत होता!
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/04/2010 - 13:40
नवीन
इतिहासाचार्यांचा एकेरी उल्लेख खटकला.
- Log in or register to post comments
अ
असुर
Sat, 09/04/2010 - 13:43
नवीन
ओ ३_१४ तै,
ते राजवाडे वायले ओ! तेनला मदे आनू नका तुमी!
हे राजवाडा बद्दल चाललंय..
काय ना म्हणजे, कोन काय सोचेल काय भरवसा नाय!
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Fri, 09/03/2010 - 13:07
नवीन
कारण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे तीनही वर्ण पूर्वी मुंज करत. तिथून मुंजीचा प्रवास फक्त ब्राह्मण्यापर्यंत कसा झाला ते ठाऊक नाही. बहुधा मध्ययुगाचा महिमा असावा.
नाही याचा अर्थ ते राजमहालात होते असा होतोच असे नाही (नक्की सांगता येत नाही) कदाचित, सुग्रीव किंवा वानरांमुळे सुरक्षित असणार्या किष्किंधा नगरीजवळील वनात त्यांचे वास्तव्य असावे.
बहुधा द्रौपदीची महती मोठी. ;-) किंवा तिला पाच पतिव्रतांमध्ये स्थान मिळाले म्हणूनही असेल. अर्थातच, वरील तिघींना नावे ठेवणारे मूर्ख आहेत असे मला वाटते. असो.
बोलायची मुभा आणि शक्ती मिळाल्यावर अनेक लोक बोललेले आहेत असे वाटते. प्रश्न काळाला अनुसरून वाटला नाही.
५ वा प्रश्न दोनदा आला आहे तो ५ वा आणि ६ वा असावा असे धरते. दोन्ही प्रश्नांत मला दोन्ही बाजूंचा थोडाफार द्वेष दिसतो. इतिहासाचा अभ्यास द्वेषाने करू नये हेच खरे. असो.
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Fri, 09/03/2010 - 13:16
नवीन
>>कारण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीनही जाती पूर्वी मुंज करत. तिथून मुंजीचा प्रवास फक्त ब्राह्मण्यापर्यंत कसा झाला ते ठाऊक नाही.<<
या काळात देखील क्षत्रीय आणि वैश्य लोकांमधे मुंज होते. मी अशा मुंजींना गेलो आहे.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Fri, 09/03/2010 - 13:23
नवीन
अशा गोष्टी अपवादात्मक असतात प्रातिनिधिक नव्हे. बाबा महाराज सातारकरांनी मुलाची मुंज केली होती किंवा तसा घाट घातला होता त्यावर टीका झाली होती.
मुंजीच माहित नाही पण लग्नाअगोदर म्हणे सोडमुंज करतात त्यावेळी कुठली आचमने हल्ली घेतात कुणास ठाउक? ;)
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Fri, 09/03/2010 - 15:52
नवीन
मुंजीच माहित नाही पण लग्नाअगोदर म्हणे सोडमुंज करतात त्यावेळी कुठली आचमने हल्ली घेतात कुणास ठाउक?
ह्या सोडमुंजीला हली ब्याचलर पार्टी असे नाव आहे.
अधिक माहिती साठी आमचा अत्यंत आवडता चित्रपट "द हँगओव्हर" बघावा.
- Log in or register to post comments
अ
असुर
Fri, 09/03/2010 - 18:01
नवीन
हँगओव्हर चित्रपटातील नवरोबाची मुंज झालेली होती याचा पुरावा सादर करावा!
सोडमुंज म्हणजे ब्याचलर प्यार्टी हा मुद्दा (व्यक्तिशः मला मान्य असला तरीही) त्यानंतरच ग्राह्य धरण्यात येईल. ;-)
एकदा हा मुद्दा क्लियर झाला की अशी सोडमुंज ही तीर्थक्षेत्री (पक्षी: लास व्हेगास) करावी की नाही याबाबत मिपाकरांना एक कौल लावता येईल. :-)
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/03/2010 - 13:28
नवीन
सहमत आहे. आमच्या वर लिहीलेल्या प्रतिसादातही तसे लिहीले आहे. सदर धाग्याचा उद्देश आपली संस्कृती कशी वाईट आहे हे दाखवणेच दिसतो आहे.
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Fri, 09/03/2010 - 13:14
नवीन
>>सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहे>>
माझ्या माहितीप्रमाणे पुर्वीपासून मुंज आणि जानवे हे ब्राह्मण, क्षत्रीय आणि वैश्य लोकांमधे आहे. ज्ञानार्जनाची सुरवात करतांनाचा विधी म्हणून मुंजीचे महत्व आहे. जुन्या काळच्या दुर्दैवी समाजकारणाने शूद्र वर्णीयांना शिक्षणापासून वंचीत ठेवले, म्हणून मुंज विधी पण नाकारला. असे इतर तीन वर्णांमधे नाही.
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Fri, 09/03/2010 - 14:56
नवीन
ज्ञानार्जनाची सुरवात करतांनाचा विधी म्हणून मुंजीचे महत्व आहे.
सहमत.
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Fri, 09/03/2010 - 16:06
नवीन
ज्ञानार्जनापेक्षा, मामाच्या मुलीवर पहिला क्लेम करण्यासाठी मुंजीचे महत्त्व आहे.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Sat, 09/04/2010 - 06:07
नवीन
ओ ते मुंजीचे नाही सोडमुंजीचे.
मुंजीत लंगोटी लावून भिक्षावळीला बसायचं अन नंतर ब्रम्हचारी होऊन गुरुगॄही जायचं. सोडमुंजीत मामाची मुलगी वगैरे.
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
Fri, 09/03/2010 - 13:15
नवीन
कूल!
(परा साहेबांचा फॅन)
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 09/03/2010 - 13:15
नवीन
लक्ष ठेवून आहे धाग्यावर. बाकी आपला इतिहासाचा एवढा अभ्यास नाही की ह्यावर काही बोलावे. चालू द्या.
रंगा
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Fri, 09/03/2010 - 21:56
नवीन
धागा छान होता. सविस्तर प्रतिसाद देण्याइतपत माहिती आणि वादविवाद, चर्चेइतपत मुद्दे होते. पण अनावश्यक, अवांतर प्रतिसाद पाहून प्रतिसाद द्याची इच्छाच मरून गेली. त्यामुळे धाग्यावर लक्ष ठेवूनच आहे/असणार आहे.
असो. चालू द्यात.
(सुस्पष्ट)बेसनलाडू
- Log in or register to post comments
भ
भारी समर्थ
Sat, 09/04/2010 - 01:09
नवीन
का उगा नसतं कातडं पांघरताय राव.....
हे म्हंजी रविंद्र जाडेजा टीममधी असल्यामुळं सचिननी क्रिकेट सोडण्यासारखंय....
तुमचं काम तुम्ही करा ना...का उगा दुसर्याच्या पाण्याव डोळा?
भारी समर्थ
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Sat, 09/04/2010 - 01:26
नवीन
हरकत असल्यास सांगावी. दूर करता आल्यास पाहतो.
हरकत नसल्यास, कृपया आपले काम करा.
(आगाऊ)बेसनलाडू
- Log in or register to post comments
व
विंजिनेर
Fri, 09/03/2010 - 13:19
नवीन
साफ चूक. विष्णूचा पहिला अवतार हा ब्राम्हण कुळातला होता (आणि हे कळल्यापासूनच आजकालचे ब्राम्हण 'ते' चापताना आढळतात)अशी धूळफेक तुम्हाला करायची आहे का?
पहिल्याच मुद्द्यावर क्लिन बोल्ड झाल्यामुळे फुडे कण्टिन्यु करण्यात हशील नाही.
अवांतर: सौंफुमध्ये ब्राम्हण जास्त का ब्राम्हणेतर? ;)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 09/03/2010 - 13:22
नवीन
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 09/03/2010 - 13:44
नवीन
सौंफु मधे सौंला महत्त्व बाकीच्या गोष्टी फाट्यावर! ;)
(आगीतला)रंगा
- Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या
Fri, 09/03/2010 - 14:04
नवीन
काही अर्थबोध झाला नाही.असो.
या वरून एक विनोद आठवला. ब्राह्मण (किंवा ब्राह्मणेतर) हा शब्द कसा लिहायचा या वर वाद सुरू होता. म्हणजे ह अर्धा नी म पूर्ण, की म अर्धा आणि ह पूर्ण.?? अगोदर ह की म वगैरे.
- Log in or register to post comments
श
शुचि
Sat, 09/04/2010 - 23:53
नवीन
सौंदर्यफुफाटा !!
म्हणजे काय मलाही नीटसं माहीत नाही.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sun, 09/05/2010 - 00:19
नवीन
सगळीकडे प्रचंड सौंदर्य..म्हणजे सौंदर्य फुफाटा..
- Log in or register to post comments
स
सूड
Sun, 09/05/2010 - 05:56
नवीन
हा असा अर्थ असेल तर 'आगीतून उठून फुफाट्यात' हे बर्या गोष्टीतून उत्तम गोष्टीकडे जाणे असे होईल.
- Log in or register to post comments
ब
बाप्पा
Fri, 09/03/2010 - 13:21
नवीन
अर्धवटराव, नावाप्रमाणेच शंका विचारलीत..
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Fri, 09/03/2010 - 13:27
नवीन
सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?
सर्वप्रथम उपनयन संस्कार हा केवळ ब्राह्मणांसाठीच होता/आहे ही समजुतच मुळात चुकीची आहे. या शब्दाचा अर्थ जाणून घेणे आधी महत्त्वाचे आहे. चातुर्वर्णीय संस्था ही खूप अलिकडची आहे हो त्यामानाने. तरीही चातुर्वर्णीय संस्थेतही ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य तिघांनाही उपनयन संस्कार सांगितलेला आहेच. मुळात गुरुगृही शिक्षण घेण्यास इच्छुक असणार्यांचा उपनयन संस्काराने विद्यारंभ होत असे. यज्ञोपवीत हे त्या काळी शिक्षणाचा पासपोर्टच होता म्हणा ना. ज्याला शिकायची इच्छा असेल त्याने यज्ञोपवीत धारण करणे अनिवार्यच होते. विवाहाप्रमाणेच उपनयनातही मनुष्याला शपथा घ्यायच्या असतात. म्हणजेच यज्ञोपवीत धारण केलेल्याने उपनयनात घेतलेल्या शपथांचे, ब्रह्मचर्याचे पालन केलेले आहे आणि योग्य ते शिक्षण घेतलेले आहे!
पण प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असणारच. आजच्याप्रमाणेच त्याकाळीदेखील विरोधक हे असणारच. ज्यांना उपनयनाच्या शपथा पटल्या नाहीत, त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन केले नाही, मग तेच असुर ठरले असावेत. त्यांनी आपल्या मुलांवरदेखील आपल्याच विचारांचे संस्कार केले असावेत! म्हणून कुणाच असुराच्या अंगात यज्ञोपवीत दाखवले जात नसावे. आणि रावण बिभीषण हे चांगले म्हटलेले ब्राह्मण होते राव. आणि महाराजांचाही उपनयन संस्कार झालेलाच होता.
यावरून तोच जुना श्लोक आठवला - "अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठतः सशरं धनु। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं, शापादपि शरादपि॥
- Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या
Fri, 09/03/2010 - 13:27
नवीन
माननीय श्री. परिकथेतील राजकुमार यांस विनंती. आणखी काड्या घालू नका.
जाती मोडा असे मोठे लोक सांगून गेले आहेत त्यांचा आदर राखा.
हा धागा नसून काडी आहे असे वाटते. ( काडी - दोन अर्थानी - घालणे आणि लावणे) .जातीच्या पूर्वग्रह दुषित विचाराने बरबटलेला धागा वाटतो. उदाहरणच द्यायचे झाले तर धाग्याचा विषय.
हा पहा
धोरण
मांडणी
संस्कृती
वावर
धर्म
विनोद
इतिहास
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
प्रकटन
मत
विचार
संदर्भ
चौकशी
बातमी
सल्ला
प्रश्नोत्तरे
माहिती
प्रतिक्रिया
वाद
प्रतिभा
विरंगुळा
आपल्या इतिहास लेखनास हार्दिक शुभेच्छा !!
आपले लेखन करण्याच्या अधिकाराची पूर्ण जाणीव आणि आदर ठेवून हा माझा प्रतिक्रिया देण्याचा हक्क बजावत आहे.
अवांतर चला आता २२६ चे रेकॉर्ड मोड्ण्याची 'तोड ' झाली.
इतिहासप्रेमी कापूसकोन्ड्या
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/03/2010 - 14:58
नवीन
जाती मोडा असे मोठे लोक सांगून गेले आहेत त्यांचा आदर राखा.
ते कितीही मोठे असले तरी ते चुकले. आणि त्यांनी शक्याशक्यतेचा विचार केला नाही असे म्हणावे लागते आहे.
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 09/03/2010 - 13:33
नवीन
मनात आलेले वाट्टेल ते लिहून टाकणारे लेख(न) थांबवा!
नुकतेच असे रेसीडेंट इव्हील आपलं रेसीडेंट इतिहास तज्ञांनी सांगीतले होते ना.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- ›
- »