Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इतिहासाचे पुनर्लेखन

प
परिकथेतील राजकुमार
Fri, 09/03/2010 - 11:56
🗣 352 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
97027 वाचन

💬 प्रतिसाद (352)
अ
अर्धवट Sun, 09/05/2010 - 06:50 नवीन
>>आखिल भारतिय ब्राम्हण मंच का कोणती संघटना आहे(ज्याचे मागिल वर्षी पुण्यात संमेलन झाले होते) तिचे विचार किती सुशिक्षित ब्राम्हणाना पटलेत? खुप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. अत्यंत पोरकटपणाचं नेतृत्व आणि त्याहुनही पोरकट ठराव आले होते त्या कार्यक्रमात. आधी तेथे मोठ्या अपेक्षेने गेलेले कित्येक लोक हा करंटेपणा बघुन उलट पावली आलेले पाहिलेत मी. तिथेही पुन्हा मेढरांचंच राजकारण.. एक विचार म्हणुन बोंबच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
प
प्रकाश घाटपांडे Sun, 09/05/2010 - 08:38 नवीन
ब्राह्मण म्हणजे काय? ब्राह्मण कोणास म्हणावे? ब्राह्मण्य म्हणजे काय? ते कसे ओळखावे? असे प्रश्न आम्ही 'आचमन' घेताना विचारीत असु
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 09/05/2010 - 08:42 नवीन
चला एकंदर इतिहास पुनर्लेखनाचे काम जोरात चालु आहे जवळ पास सर्वच मुद्दे पराने घेतले आहेत. फक्त एक महत्वाचा मुद्दा राहिला आहे. आर्य अनार्य मुद्दा यावर परा आणि इतर जाणकारांचे मत वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 09/05/2010 - 10:44 नवीन
आर्य अनार्य हा धातांत खोटारडेपणा आहे. गोर्‍या साहेबाने नेटिवांची बुध्दी भ्रष्ट करण्यासाठी केलेले वरिष्ट (worst) कारस्थान. साला सगळे लोक आर्यच आहेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 09/06/2010 - 04:44 नवीन
काय पुरावा आहे याला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 09/06/2010 - 05:55 नवीन
अनेक पुरावे आहेत. शोधलेत तर सापडतील. चेन्नईच्या मद्रास अर्काईव्ह मधले ब्रिटीश अधिकार्‍यांनी पाठवलेले रिपोर्ट, लंडन अर्काईव्ह मधले रीपोर्ट, जर्मनीतील बर्लिन अर्काईव्हमधील अनेक पोथ्या व त्यांच्याबाबतची टिपणे आणि या सर्वांचा आधार घेऊन जेष्ठ गांधीवादी कार्यकर्ते प्रा. धर्मपाल यांनी लिहीलेले Despoliation and Defaming of India . त्यांच्याबद्दल माहीती इथे वाचता येईल. थोडेसे मागे जाऊन महाराष्ट्र सारस्वतात वि ल भाव्यांची मतं वाचलीत तर जातीव्यवस्थेबद्दल अजून डिट्टेलवार मतं त्यांनी मांडलेली वाचता येतील. धर्मपाल यांच्याबद्दल इथे अजून वाचता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 09/06/2010 - 08:43 नवीन
दुव्याबद्दल आभारी. पण लो. टिळकांना ब्रिटिश प्रणित आर्य मुद्दा मान्य असल्याचे काही विचारवंत म्हणतात त्याचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 09/06/2010 - 08:49 नवीन
न. चिं केळकर या त्यांच्या निकटच्या सहकारी असलेल्या गृहस्थांनी टिळकांच्या लिहीलेल्या चरित्रात तो मुद्दा मान्य करणे हि एक चूक होती व तावर याच्या (गीतारहस्य) नंतर काम करायचे आहे असे त्यांच्याशी खाजगीत बोलताना म्हटल्याचे नमूद केले आहे. आणि केली असेल समजा टिळकांनी चूक एखाद्या गोष्टीत तर ती आपण सुधारु नये असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Tue, 09/07/2010 - 08:27 नवीन
अगदी बरोबर. पण त्याचाच आधार घेऊन काही विचारवंत टिळकांच्या देशप्रेमाबद्दल शंका घेतात.. म्हणतात ते तर ब्रिटिशांचीच तळी उचलत होते.. इतिहास काय सांगतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
परिकथेतील राजकुमार Tue, 09/07/2010 - 08:33 नवीन
पण त्याचाच आधार घेऊन काही विचारवंत टिळकांच्या देशप्रेमाबद्दल शंका घेतात.. म्हणतात ते तर ब्रिटिशांचीच तळी उचलत होते.. इतिहास काय सांगतो?
आम्ही तर सावरकरांनी देखील सुटकेसाठी याचना करणारे पत्र ब्रिटीश सरकारले पाठवले होते असे ऐकुन आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
द
देव जय Sun, 09/05/2010 - 11:29 नवीन
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Sun, 09/05/2010 - 13:10 नवीन
वरील प्रतिसादांत सर्वश्री अर्धवटराव, हुप्प्या, वेताळ, अर्धवट प्रभृतीनी अभ्यासपूर्ण आणि समाजस्वास्थ्यासाठी जे काही आवश्यक मुद्दे (संयत भाषेत) प्रकट केले आहेत त्याच्या अनुषंगाने असे म्हणता येईल की; राज्याचा (सध्यातरी आपल्या कबुतरांचे पंख महाराष्ट्रापुरतेच ठेऊ या...) गाडा चालला आहे तो राजकारण्यांच्या होडी वल्हविण्याचा कसबावरच, ही हतबलतीची नसली तरी विद्यमान क्रियाशीलता आहे. एक जेआरडी टाटा किंवा अंबानी बंधू करू शकणार नाही ते कार्य राज्य सरकारच जनतेच्या कल्याणासाठी करू शकते (इथे 'कल्याण' ला वक्रोक्ती अलंकार देऊ नये...कारण तो मग वेगळा विषय होईल.) मुकेश वा अनिल याना नकाशावरील दोन जिल्ह्ये सोडले तर या राज्यात गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर वा गोंदिया या नावाची काही स्थळे आहेत हे जसे माहित नसते तद्वतच लताआशा, माधुरी दिक्षित आणि सचिन तेंडुलकर यांच्याखेरीत या राज्यात अजुन कुणीतरी "नाव" घेण्याजोग्या व्यक्ती आहेत का याचा शोध घेण्याचे काम अगर कारणही नसते. थोडक्यात "मनी फॉर मेकिंग मोर मनी..." ही जीवनशैली या उद्योगपतींची (आणि त्यांच्या पत्नींचीही) असल्याने 'जनता' ही फक्त राजकारणाशीच जवळीक (परत एकदा 'कल्याणार्थ') साधू शकते, ही अटळता आहेच आहे. राजकारण म्हटले की त्यात दगडवीटा, मातीमसण आलेच...मग एका जातीला गोंजारायचे, दुसरीला खिशात घालायचे तर तिसरीशी फटकून वागायचे...परत तो शापग्रस्त असलेला उच्चनीचतेचा पारा वरखाली होत असतोच. या पार्‍याच्या ताकदीवरच तर धोरणी आणि मतलबी राजकारणी आपापली सत्तेची स्वामिनी कुरवाळीत बसलेले असतात. एक लक्षात घ्या...मंत्रालयात बसल्यानंतर मत प्रदर्शन करणे आणि शिवाजी पार्कवरून घोषणा देणे यातील कार्यकारणभाव टोकाचा असतो. 'सत्तेवर आल्याआल्या एका दिवसात एन्रॉन अरबी समुद्रात भिरकावून देतो..." असे राणा भीमदेव थाटात शनिवारवाड्यासमोर घोषणा करणार्‍या महाजन्/मुंडेना सत्तेचे खारीकखोबरे खाताना कळाले की, तिथे एकदा बसल्यावर आपल्याला शासनाचा साधा चहाचा कपही "कंडम" करता येत नाही....मग हीच भाषा आता "हो, आम्ही पाहत आहोत...त्यात काय काय भ्रष्टाचार झाला आहे, एनरॉन लवकरच आम्ही गुंडाळू..." इ. इ. मध्ये लिलया बदलून जाते.... लोक तरी काय, एकदोन दिवस सरड्याचे रंग पाहतात, सळसळ ऐकतात अन् परत आपले गॅस सिलेन्डर नोंदणी केल्याकेल्या मिळत नाही म्हणून नव्या सरकारला नव्या लोणच्याच्या शिव्या देत राहतात. त्यामुळे जातीभेदाचे (प्रगत असो वा मागासलेल्या) विष समूळ नष्ट करणे कालत्रयीही शक्य नसले तरी, वर म्हटल्याप्रमाणे 'सुशिक्षित' समजल्या गेलेल्यांनी तरी किमानपक्षी काही संहिता मानल्या तर ती दरी कमी जरी झाली नाही तरी रुंदावणार नाही इतपततरी दक्षता घेतली तरी पुष्कळ मिळविले असे म्हणता येईल. वर श्री.हुप्प्या प्रतिसादात म्हणतात "ब्राह्मणांनी संघटित होणे आवश्यक आहे. त्या जातीतल्या थोर लोकांवर केवळ ब्राह्मण होते म्हणून गलिच्छ चिखलफेक होत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे." जरूर संघटीत होणे (त्यानीच का पण इतर वर्गानेही) गरजेचे आहे...पण 'ब्राह्मण' संकल्पनेची व्याप्ती ही खुद्द ब्राह्मणातच संकुचीत झालेली आपणास तशा त्या ज्ञातीनिहाय संमेलनात दिसून येतेच ना? किती कोकणस्थ खुलेपणाने देशस्थातील वा कर्‍हाडे मुलगी आपल्या मुलासाठी निवडतील? (इथे प्रेमविवाहाची उदाहरणे अपेक्षित नाहीत त्यामुळे प्रश्नास प्रत्युत्तर म्हणून ती कृपया कुणी देऊ नयेत ही विनंती..). किती ब्राह्मण घरात प्रभु-सारस्वताकडील जेवणाचे स्वागत होत असते? दैवज्ञांना आपल्या ज्ञातीन न घेण्याचे कोणते कारण उच्चवर्गीय ब्राह्मण करतो...'खरकटे ब्राह्मण' म्हणून एका विशिष्ट वर्गाची थट्टा करणारा हा मराठा नसून ब्राह्मणच आहे ना? धर्म संकल्पनेच्या मूळ तत्वात वा भावनेत काहीही असो, जातीतील या उपप्रकारानीच आपणच आपल्यातील नैतीकतेची धार कमी केली आहे असे वाटते. यात आमचा मराठा समाज कुठे तीळभर मागे आहे असे समजू नये. सरदार घराणी, ९६ कुळी आणि कुणबी यांच्या राड्यात इतके आम्ही (आजही) गुरफटलो आहोत की, 'समाजशास्त्रा'त पीएच.डी. प्राप्त केलेल्या एक तरूणाने एका सुंदर, तितक्याच पातळीपर्यन्त शिक्षण घेतलेल्या मुलीला "नाही रे इन्द्रा, तुला माहित आहेच की, आम्ही ९६ कुळीचे आहोत...त्यामुळे...इ.इ." कारणास्तव नकार दिला, त्यावेळी मला समजून चुकले की फणस झाडावर लटकला पण अजूनही पिकलेला नाहीच. दुर्दैवाने आज २१ व्या शतकातदेखील मुख्य नव्हे तर हे उपपदर प्रखरतेने दोन्ही समाजात आढळत असल्याने व नेमके तेच राजकारण्यांच्या नजरेत आवश्यक असल्याने त्याची फळे (कटू असली तरी) आपण चाखतच आहोत. असो... फार प्रदीर्घ चर्चेचा हा विषय आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 09/06/2010 - 06:26 नवीन
फणस झाडावर लटकला पण अजूनही पिकलेला नाहीच. हे आवडले आपल्याला. ब्रिगेडी जमिनीत पेरलेले पण न उगवलेले भुइमुग आहेत असे म्हणेन मी. :) हुप्प्या म्हणतो त्यातही थोडा दम आहेच खरे. फक्त बामणांबद्दल लिहिले म्हणूनच त्याला कोणि विरोध करत नाही. लिहुन दाखवा असे शाहु महाराजांबद्दल. दंगल होइल. जाळपोळ होइल. अर्धी बामण जमात नष्ट होइल. कोणि एक बरोबर आहे आणि दुसरा फक्त चुक आहे असे मी म्हणत नाही. पण आजची राजकारणी नावची एक आई*व जमात आहे ती जातीचे राजकारण बरोबर खेळत आहे आणि त्या जातीच्या राजकारणात आता बामणांना काही स्थान उरलेले नाही हे नक्क्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
ब
बॅटमॅन Fri, 04/27/2012 - 14:45 नवीन
याला म्हणतात संयत प्रतिसाद. जियो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
ह
हुप्प्या Sun, 09/05/2010 - 21:00 नवीन
जोवर ब्रिगेड आणि तत्सम लोक ब्राह्मणांना एकाच मापाने तोलत आहेत आणि देशस्थ रामदासांना जितक्या गलिच्छ शिव्या घालत आहेत तितक्याच गलिच्छ शिव्या कोकणस्थ पेशव्यांना मिळत आहेत तोवर ब्राह्मण हे ब्राह्मण म्हणून एकत्र येण्याची शक्यता आहे. जर ब्रिगेड वृत्तीने कोकणस्थाना विशेष स्थान द्यायचे ठरवले आणि जास्तीच्या शिव्या द्यायच्या ठरवल्या तर त्यांच्यात फूट पडेल. १. संभाजी ब्रिगेड आणि ब्राह्मण संघ ह्यांना एकाच तागडीत तोलणे चुकीचे आहे. खालील फरक बघा ब्राह्मणांनी कुठला धर्म स्थापन केलेला नाही जिथे अमक्या जातीला प्रवेश नाही हे त्या धर्माचे मूलभूत तत्त्व आहे. ब्रिगेडच्या पिलावळीने शिवधर्म नामक धर्म स्थापला आहे. ज्याच्या मूलतत्त्वात ब्राह्मणांना प्रवेश नाही असे म्हटले आहे. २. ब्राह्मणांनी ठरवून कुठल्या जातीला बदनाम करण्याकरता आधुनिक शैलीचा इतिहास लिहायला घेतला नाही. ब्रिगेड वृत्तीच्या लोकांची अनेक पुस्तक प्रकाशने आहेत ज्यांचे ध्येय एकच आहे. ब्राह्मण जातीविरुद्ध गरळ ओकणे. अनेक उदाहरणे आहेत. रामदासांना अगदी उघडपणे रंडीबाज म्हणणे, तमाम पेशव्यांना बदफैली म्हणणे, पेशव्यांच्या स्त्रियांचे मराठ्यांशी शरीरसंबंध होते असे म्हणणे (कुठलाही पुरावा नसताना), आणि अशाच गलिच्छ विचारसारणीतले अनेक लेख. जर असे लेख कुठल्या मराठा जातीतल्या व्यक्तीविषयी लिहिले गेले असते तर जाळपोळ, तोडफोड झाली असती. पण ब्राह्मणांविरुद्ध लिहिले जातात आणि जातील. त्या पुस्तकांवर बंदी नाही किंवा त्याविरुद्ध आंदोलने नाहीत. याविषयी कुणाला शंका असल्यास मी हवे तितके पुरावे देऊ शकेन. ३. ह. मो. मराठे आणि अन्य ब्राह्मण जातीतल्या व्यक्तींनी हा ब्राह्मणद्वेष हाताबाहेर जातो आहे असे मानून काही पुस्तके छापली आहेत. त्यात कुठे असली गलिच्छ शिवीगाळ नाही. ह्या द्वेषाकडे निव्वळ काही वेडपट लोक म्हणून दुर्लक्ष करू नका असे सांगितले आहे. ४. जाळपोळ, विध्वंस, पुतळ्यंची विटंबना, तोंडाला काळे फासणे असे कार्यक्रम ब्रिगेड हाती घेत असते. ब्राह्मण सभेने असे काही केल्याचे ऐकिवात नाही. ५. आर आर पाटलांसारखे मातब्बर नेते ब्रिगेडचे खंदे समर्थक आहेत. पवारांसारखे छुपे समर्थक तर अनेक आहेत. ब्राह्मणांना समर्थन देणारे कुणी मंत्री मला माहीत नाहीत.
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Sun, 09/05/2010 - 22:42 नवीन
चांगला धागा.. पुढील वाटचालीसाठी शुभकामना.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 09/06/2010 - 06:29 नवीन
बाय द वे. आता २३३ झाले. धागा गोठवणार का आता?
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/06/2010 - 06:34 नवीन
गोठवून घ्यायचा असेल अजून थोडेसेच 'हट'के प्रतिसाद द्या. काम होऊन जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Mon, 09/06/2010 - 08:15 नवीन
गोठवून घ्यायचा असेल आम्हाला काहीच करायचे नाही आहे. केवळ एक शंका आली म्हणुन विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 09/06/2010 - 06:40 नवीन
इथे चाललेली चर्चा इतिहासाबद्दल , इतिहासाच्या पुर्नर्लेखनाबद्दल आहे त्यात ब्राम्हण मराठा वाद का आणल्या गेला हे कळले नाही. त्यासाठी वेगळा धागा उघडता येईल. या धाग्यावर फक्त पुनर्लेखनाची चर्चा करावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 09/06/2010 - 07:37 नवीन
सहमत आहे. अच्छा ! बौद्ध धर्म भारतातुन ह्द्दपार कसा झाला यावर काय प्रकाश टाकणार आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 09/06/2010 - 08:08 नवीन
सदर पुनर्लेखनाचा प्रस्ताव परा राजवाडे यांचा असल्याने सदरहू प्रश्न त्यांस विचारला जावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सहज Mon, 09/06/2010 - 08:17 नवीन
बौद्ध धर्म भारतातुन ह्द्दपार नाही तर सर्व बौद्धधर्मीयांना परदेशात एम्प्लॉयमेंट अपोर्ट्युनिटीज मिळाल्यामुळे ते बाहेरच्या देशात वगैरे गेले ना, बर्मा, थायलंड, कंबोडीया, चीन, जपान वगैरे वगैरे सांगा बॉ कोणीतरी. पराला हवे अजुन बारा (प्रतिसाद)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
अ
अवलिया Mon, 09/06/2010 - 08:41 नवीन
अच्छा ! मग अमेरिका, आफ्रिका, युरोपात गेलेले कोणत्या धर्माचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज Mon, 09/06/2010 - 08:47 नवीन
कृपया प्रकाश टाका नानाचार्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 09/06/2010 - 08:49 नवीन
मला माहित नाही म्हणुन विचारणा केली सहजानंद स्वामी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सुहास.. Mon, 09/06/2010 - 09:18 नवीन
छे !! छे !! त्यांना आधीच कळाले होते की त्यांच्याच ह्याच देशात 'ला देन ' वगैरै पोसल्या जाणार आहेत म्हणुन 'शांतताप्रिय' बौध्द निघुन गेले असावे .....आता त्यांना भविष्य कळत होते की नाही हा भाग वेगळा, पुरावा मिळणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 09/06/2010 - 09:20 नवीन
पुरावा असता तरी मिळालच असता असे नाही. कोणीतरी आधीच पुरुन टाकलेला असता तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
स
सुहास.. Mon, 09/06/2010 - 09:26 नवीन
कोणीतरी आधीच पुरुन टाकलेला असता तर? >>> हे आपण पुराव्यानिशी कसे शाबित करणार , आणी जर पुरुन टाकलेल्या पुराव्याशी आपला पुरावा जोडुन त्या पुराव्याशी आपण दिलेल्या उपरोक्क्त वाक्याचा पुरावा कसा गृहीत धरणार आहात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
अ
अवलिया Mon, 09/06/2010 - 09:38 नवीन
तो आमचा प्रश्न आहे आपण वृथा डोके शिणवु नये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
अ
अवलिया Mon, 09/06/2010 - 09:25 नवीन
पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार (अर्थातच हे विचारवंतांनी पुरवलेल्या माहितीवर आधारीत आहे) बौद्धांना आपल्या शुन्यवादी आणि जगत क्षणिक आहे या तत्वज्ञानाचा तथाकथित फोलपणा लक्षात आल्याने "त्याने" सर्व मनुष्यांच्या उपभोगा करताच निर्माण केले आहे असे प्रतिपादन करणार्‍या धर्माचा मनापासुन स्विकार केला. याबाबत आपले इतिहासाचार्य काय सांगतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
स
सुहास.. Mon, 09/06/2010 - 09:31 नवीन
अर्थातच हे विचारवंतांनी पुरवलेल्या माहितीवर आधारीत आहे >>> या वर आम्हाला पुरावा अपेक्षित आहे शिवाय माहीती पुरवणारे विचारवंतच आहेत याला पुरावा काय ? बौद्धांना आपल्या शुन्यवादी आणि जगत क्षणिक आहे या तत्वज्ञानाचा तथाकथित फोलपणा लक्षात >>> तथाकथित फोलपणा ह्या शब्दाला तीव्र आक्षेप नोंदवित आहे .याच तत्वादानाच्या आधारावर मानवी जीवनातला रस निघुन न जाता प्रत्येक क्षण जगण्यावर भर दिला जातो असे बाबा ओशो सांगतात ...पुरावा मिळेल(आश्रमात अ‍ॅडमिशन घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 09/06/2010 - 09:35 नवीन
>>>या वर आम्हाला पुरावा अपेक्षित आहे शिवाय माहीती पुरवणारे विचारवंतच आहेत याला पुरावा काय ? पुरावा योग्य वेळी विचारवंत सादर करणार आहेत. माहिती पुरवणारे फार गाजलेले पुरातत्व विशारद आहेत त्यामुळे ते विचारवंत आहेत कारण त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. >>>तथाकथित फोलपणा ह्या शब्दाला तीव्र आक्षेप नोंदवित आहे .याच तत्वादानाच्या आधारावर मानवी जीवनातला रस निघुन न जाता प्रत्येक क्षण जगण्यावर भर दिला जातो असे बाबा ओशो सांगतात ...पुरावा मिळेल(आश्रमात अ‍ॅडमिशन घ्या) इतिहास लेखनाचे काम सोडुन आश्रमात नाक पकडुन बसायला वेळ नाही. आमच्या वाटचे तुम्ही जाउन या, जी काही फी असेल ती देउन टाकु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
स
सुहास.. Mon, 09/06/2010 - 09:46 नवीन
आमच्या वाटचे तुम्ही जाउन या, जी काही फी असेल ती देउन टाकु >> आमचे आधीच जाऊन झाले आहे , बाकी फी आपल्याला परवडेल की नाही अशी शंका आहे .. बाकी -हासा बद्दल शंकराचार्य -नंगे गोसावी - केरळातील परिसर ह्याविषयी आपणास माहीत आहे आपण पुपेच्या कानात असताना पर्‍याने पाहिले असल्याचे कळते ..मशाल घेऊन प्रकाश टाकावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 09/06/2010 - 10:34 नवीन
>>>आमचे आधीच जाऊन झाले आहे , बाकी फी आपल्याला परवडेल की नाही अशी शंका आहे .. +१ जरी आम्हाला परवडली नाही तरी आपल्यासारखे सुहृद आम्हास मदत करतीलच. शेवटी इतिहास पुनर्लेखनाचा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
अ
अवलिया Mon, 09/06/2010 - 09:35 नवीन
>>>या वर आम्हाला पुरावा अपेक्षित आहे शिवाय माहीती पुरवणारे विचारवंतच आहेत याला पुरावा काय ? पुरावा योग्य वेळी विचारवंत सादर करणार आहेत. माहिती पुरवणारे फार गाजलेले पुरातत्व विशारद आहेत त्यामुळे ते विचारवंत आहेत कारण त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. >>>तथाकथित फोलपणा ह्या शब्दाला तीव्र आक्षेप नोंदवित आहे .याच तत्वादानाच्या आधारावर मानवी जीवनातला रस निघुन न जाता प्रत्येक क्षण जगण्यावर भर दिला जातो असे बाबा ओशो सांगतात ...पुरावा मिळेल(आश्रमात अ‍ॅडमिशन घ्या) इतिहास लेखनाचे काम सोडुन आश्रमात नाक पकडुन बसायला वेळ नाही. आमच्या वाटचे तुम्ही जाउन या, जी काही फी असेल ती देउन टाकु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 09/06/2010 - 09:34 नवीन
बौद्धधर्म संपला तो त्याचा जनाधार संपल्याने. थोडेफार तसेच महानुभाव पंथाबाबतही झाले होते. बौद्ध तत्वज्ञान कितीही चांगले असले तरी नंतर बौध्दांचा जनाधार अनेक कारणांमुळे गेला. हे कारण आम्हाला सर्वात जास्त पटते. -वरवर मुलुंडकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 09/06/2010 - 09:37 नवीन
ती अनेक कारणे आपण सांगावीत अशी विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 09/06/2010 - 09:39 नवीन
जे कारण आम्हाला पटले ते आम्ही सांगितले. बाकी अनेक कारणांसाठी नवीन उपलब्ध झालेली ऐतिहासिक साधने वापरावीत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 09/06/2010 - 09:41 नवीन
तुम्हाला पटलेले बरोबर असेलच असे नाही. ऐतिहासिक साधने असेही सांगतात हिंदू राजांनी बौद्ध मठ आणि स्तुप लुटले. त्याचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
सहज Mon, 09/06/2010 - 09:21 नवीन
>अमेरिका, आफ्रिका, युरोपात गेलेले सुरवातीला गेले ते सगळे विद्यार्थी अथवा गुलाम. स्वातंत्र्यपुर्वकालातील विद्यार्थी जहाल व मवाळ दोघे स्वातंत्र्यसैनिक झाले. स्वातंत्र्योत्तर काळात गेले विद्यार्थी पुढे गुलामच झाले. बरोबर? आणि हो, ना स्वातंत्र्यसैनिक ना गुलाम दोघांचाही धर्म नसतोच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 09/06/2010 - 09:27 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद. इतिहास पुनर्लेखनात योग्य बाब स्पष्ट होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
परिकथेतील राजकुमार Mon, 09/06/2010 - 09:31 नवीन
सहजकाकांनी ह्यावर अजुन माहितीपुर्ण लिखाण करावे अशी विनंती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
मस्त कलंदर Mon, 09/06/2010 - 09:32 नवीन
झाले एकदाचे २५०!!! हा २५१वा प्रतिसाद..
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 09/06/2010 - 09:37 नवीन
१०० हून अधिक प्रतिसाद आधीच झालेले असेल्याने कॄपया अवांतर प्रतिसाद देऊ नयेत. संपादक हा प्रतिसाद पुसतील का? कृपया पुनर्लेखनाबाबत आपले काय मत आहे ते कळवणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मस्त कलंदर Mon, 09/06/2010 - 09:46 नवीन
पुनर्लेखन तर आपण करत आहात, अथवा करायला साहाय्य करत आहात. त्यामुळे तो भार आम्ही आमच्या नाजूक बोटांवर टाकत नाही. तुमचे झाले की जे काही निष्कर्ष निघतील ते कळवण्याची तसदी मात्र तुम्ही घ्याच. असो... वरील प्रतिसाद अवांतर नाही. तो 'धागा आणि प्रतिसादसंख्या' इतिहासाच्या पुर्नलेखनातील एक मैलाचा दगड आहे. बाकी, आंतरजालावर प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कळावीच असा आमचा आग्रह नाही म्हणून तुम्हांस सोडून दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/06/2010 - 09:50 नवीन
असो... वरील प्रतिसाद अवांतर नाही. तो 'धागा आणि प्रतिसादसंख्या' इतिहासाच्या पुर्नलेखनातील एक मैलाचा दगड आहे. बाकी, आंतरजालावर प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कळावीच असा आमचा आग्रह नाही म्हणून तुम्हांस सोडून दिले.
+१
पुनर्लेखन तर आपण करत आहात, अथवा करायला साहाय्य करत आहात.
नव्हे, पेशवे फक्त जागेच्या उपलब्धतेचा डंका पिटत स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत. हा पूर्वीप्रमाणेच एक अब्रह्मण्यम कावा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
प
परिकथेतील राजकुमार Mon, 09/06/2010 - 10:48 नवीन
नव्हे, पेशवे फक्त जागेच्या उपलब्धतेचा डंका पिटत स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत. हा पूर्वीप्रमाणेच एक अब्रह्मण्यम कावा आहे.
शत्रुचा शत्रु तो मित्र ! ह्या न्यायाने वरिल प्रतिसादाला +१ देत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/06/2010 - 11:02 नवीन
तुमच्या या छपरी राजकारणापासून मला लांब ठेवलंत तर उत्तम! (उद्दाम) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सुहास.. Mon, 09/06/2010 - 09:35 नवीन
झाले एकदाचे २५०!!! हा २५१वा प्रतिसाद.. >> प्रश्न प्रतिसादांचा नसुन ' पुर्नलेखनाचा' आहे. असो .२५१ची पावती फाडल्याबद्दल मंडळ आभारी आहे, आपल्याला पुढील रविवारी आरतीचा मान देत आहोत
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा