इतिहासाचे पुनर्लेखन
💬 प्रतिसाद
(352)
म
मिसळभोक्ता
Fri, 09/03/2010 - 15:54
नवीन
श्री सहजरावांचा एक धागा पापुलर झाल्याने त्यांना आता इतर पापुलर धागे बघवत नाहीत.
- Log in or register to post comments
भ
भाऊ पाटील
Fri, 09/03/2010 - 14:43
नवीन
युद्ध परा-पुपे करणार | समर्थ-दादोजी मूळ आधार |
ढगफुटी प्रतिसाद येणार |राघा रडणार निश्चित ||
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 09/03/2010 - 14:46
नवीन
:D सह्ही आहे!
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 09/03/2010 - 15:09
नवीन
१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?
महेश हा पुर्वापार द्राविडांचा (राहुला द्रवडांचे पुर्वज नव्हे. हे वेगळे) देव मानला जातो. त्यामुळे शिवाचे सर्व अवतार अब्रह्मण्य आहेत. उदाहरणार्थे - हनुमान. शिवाय शंकराने असे विष्णुसारखे अवतार घेतल्याचे ऐकीवात नाही. तर मग हा शोध कुठुन लावलात की त्याचे अवतार ब्राह्मण म्हणुन दाखवले गेले आहेत. ब्रम्हाने सुद्धा असे अवतार घेतल्याचे ऐकीवात नाही. तुम्ही नक्की कुठल्या अवतारांबद्दल बोलत आहात?
शिवाजीराजांना जान्हवेधारी दाखवले असेल तर त्यात चुक ते काय? त्यांची मुंज आणि सोडमुंज झालीच होती ना? केवळ त्यासाठी त्यांचे एक लग्न देखील करवण्यात आले होते म्हणे.
ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ?
पुप्यांनी म्हणल्याप्रमाणे विष्णुचे बरेच अवतार अब्राह्मण्य होते. त्यात पशु पण आले. आता विष्णुने गाढवाचा अवतार न घेउन गाढवांचा अपमान केला असे म्हणाल उद्या तुम्ही.
२) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ?
ते दोघे सुग्रीवाच्या आश्रयास नव्हते. उलट जेव्हा सुग्रीव बरेच दिवस निरोप धाडेना तेव्हा स्वतः लक्ष्मण जाउन त्याची कानौघडणी करुन आला होता.
३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?
उत्तर आधीच दिले आहे. तसे मग तुम्ही अंबिका , अंबालिकेला देखील नावे ठेवणार काय?
४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही.
एकल्व्याला पुढे कृष्णाने म्हणजे एका क्षत्रियाने मारले. त्याचा अंगठा देखील एका क्षत्रियाच्या जळफळाटामुळे गेला.
५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ?
मग काय समाध्या उकराव्या की काय आता?
शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ?
काय पुरावे पुरावे चालवले आहे. पुरुन टाका एकदाचे दोघांच्याही आठवणींना म्हणजे सगळे सुखेनैव राहायला मोकळे.
काय पुरावा हवा तुम्हाला. पुरावा म्हणजे काय ते आधी स्पष्ट करा.
गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ?
आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।।
आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।।
तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।।
हेच हेच उरले होते आता. व्यासांनी पण महाभारत कोणाकडुन तरी चोरले असे जाहीर करुन टाका ना एकदाचे.
५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ?
यात मस्तानी मुसलमान होती ना. ;) आता कळाले ते दैवी का ते?
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 09/03/2010 - 15:15
नवीन
ते दोघे सुग्रीवाच्या आश्रयास नव्हते. उलट जेव्हा सुग्रीव बरेच दिवस निरोप धाडेना तेव्हा स्वतः लक्ष्मण जाउन त्याची कानौघडणी करुन आला होता.
अगदी अगदी
यावरच आम्ही टणत्कार लेख लिहिला होता, तेव्हा अनेकांच्या मनात धडकी भरली होती असे आमचे गुप्तहेर कळवतात.
- Log in or register to post comments
S
sagarparadkar
Fri, 09/03/2010 - 15:15
नवीन
सौंफु म्हणजे काय याचा अजूनही उलगडा झालेला नाही ... कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवणार्या धाग्यांना मिसळ्पावतर्फे काही बक्षिस मिळते का हो?
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Fri, 09/03/2010 - 15:35
नवीन
ते बराक ओबामा पण जानवे घालते का हो?
नसल घालत तर ते कोण? क्षत्रीय, वैश्य, की क्षृद्र ?
त्याचा पण खुलासा काय तो अत्ताच करा,
पैजारबुवा
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/03/2010 - 15:50
नवीन
सध्या ते मुसुलमान असल्याचे कळते. ख्रिस्चन असल्याचा संशय आहे. पुढे मागे त्यांनी हिदू धर्माचा ऑफिशियली स्विकार केला तर इथेच त्यांना कोणत्या जातीत टाकायचे यावर धागा झालेच तर कौलही काढता येईल. आधी त्यांनी हिंदू होणे गरजेचे आहे.
- Log in or register to post comments
S
sagarparadkar
Fri, 09/03/2010 - 15:54
नवीन
ती बया आता हिंदू धर्माचे पालन करते म्हणे ... मग तिला कोणत्या जातीत टाकणार आहात ...
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/03/2010 - 16:03
नवीन
कौल काढा. तिथे लोकशाही मार्गाने निर्णय करता येईल.
- Log in or register to post comments
स
सुहास..
Mon, 09/06/2010 - 11:25
नवीन
सध्या ते मुसुलमान असल्याचे कळते >>>
हा 'मुसुलमान' नावाचा कोणता धर्म आहे ते कळेल का ??
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 09/06/2010 - 11:27
नवीन
ते "मुसु लमाण" असे असावे काय असा विचार मनात आला.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Mon, 09/06/2010 - 12:20
नवीन
मुसुलमान म्हणजे मुसलमान. हल्ली एका विशिष्ठ धर्माबद्दल काहीही लिहीले तरी उगा टीकेचे धनी व्हावे लागते म्हणूस सदर शब्द एक उकार वाढवून वापरला आहे. म्हणजे झी मराठी वाले काही कॉपीराईट असलेली गाणी कशी चाल बदलून दुसर्या गायकाकडून गाऊन घेतात तसे.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Mon, 09/06/2010 - 15:34
नवीन
पण म्हणजे एक उकार बदलल्याने ह्या धर्माची 'चाल' देखील बदलेल असा भाबडा विश्वास पुपे ह्यांना आहे का ?
- Log in or register to post comments
S
sagarparadkar
Fri, 09/03/2010 - 16:09
नवीन
समाजात दुहीची बीजे पेरण्याचे काही समाज्कंटकांचे उद्योग कायमच का यशस्वी होतात ? मी येथील कोणत्याही सदस्याला समाज्कंटक संबोधत नाहीये याची कॄपया नोंद घ्यावी ...
पण माझ्या लहानपणी कमी होत चाललेले जातीभेद २१ व्या शतकात असे परत उफाळून का यावेत?
- Log in or register to post comments
ज
ज्ञानेश...
Fri, 09/03/2010 - 18:30
नवीन
पण माझ्या लहानपणी कमी होत चाललेले जातीभेद २१ व्या शतकात असे परत उफाळून का यावेत?
तुम्ही (बहुधा श्रामोंचा सल्ला मनावर घेऊन) मोठे झालात हेच त्याचे कारण असावे.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 09/03/2010 - 16:51
नवीन
मिपा वर जाती-धर्माच्या नावावर अतीरेकी विचार-चर्वेणे होताहेत, असा सूर काहि दिवसापूर्वी वाचनात आला. जुने जाणते सदस्य देखील याच द्वेशाने पछाडले जाताहेत, याच सखेद आश्चर्य वाटतं. धाग्यावर आगोदरच अनेक योग्य प्रतीसाद आले आहेत. प.रा साहेबांच्या अनेक शंका एव्हाना मिटल्या असतील असे वाटते... अर्थात, त्यांना खरच शंका असतील तर. झोपेचे सोंग घेणार्याला कोण उठवणार ??
१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?
--- जानवे आणि मुंज याबद्दल योग्य प्रतीसाद अगोदरच आले आहेत. माझ्या एक महार जातितल्या मित्राने थाटात मुंज केली होती. मला सुद्धा मुंज हा केवळ ब्राह्मणी संस्कार वाटायचा. पण मग थोडी माहिती काढली असता हा संस्कार सर्वांना उपलब्ध असल्याचे कळले. तेंव्हा जानवे आणि ब्राह्मणजात यांचा तसा काहि संबंध नाहि.
ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ?
-- असा कुठलाहि इतीहास लिहीलेला नाहि. मुळात विष्णुचे दशावतार आणि काहि शिव अवतार या पलिकडे आपण पुराण साहित्य वाचत नाहि. आणि मुळात हे दैवी अवतार केवळ सामाजीक अंगाने अभ्यासणे हेच चुक आहे. त्यांचा अध्यात्मीक संदर्भ लक्षात न घेता केवळ जातीव्यवस्थेच्या चश्म्याने या गोष्टींकडे बघणे म्हणजे एखाद्या कवीने उपग्रह तंत्रज्ञान बघण्या सारखे आहे. त्याला त्या वैज्ञानिक सामुग्रीचा रंग, आकार दिसेल... बाकि बोंब.
२) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ?
-- असा अर्थ निघण्याचे काहिही कारण दिसत नाहि. काढतोच म्हटल तर कुठल्याही गोष्टीचा काहिही अर्थ निघु शकतो हो... मुळात "राम" हा विषय इतका गहन गुढ आहे कि त्याच्या एखाद्या कृतीच्या अभ्यासाला उभा जन्म पुरायचा. आणि पराशेठ तर तडक निश्कर्षाप्रत पोचलेत. पराशेठ सत्य दडवण्याचे म्हणताहेत... अहो या सत्यपरिक्षणाच्या चरम सिमेवर रामाची सुरुवात होते... खैर, यावर बोलायची आमची लायकी नाहि राव..पण मित्रत्वाचा सल्ला अवश्य देउ. राम हे अमृत तुम्हा-आम्हाला जीवन रस देण्याकरता आहे... त्याचा असा गटारा सारखा उपयोग करु नका. अधीक काय बोलावे...
३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?
-- दौपदीला कोणिही नावे ठेवली नाहित. ती पंचकन्यांमध्ये लिस्टेड आहे. एखाद्या अडाणी माणसाला पडणारे असे प्रश्न परा सारख्यांना का पडतात हाच प्रश्न मला पडलाय.
४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही.
-- एकलव्यावर नक्कीच अन्याय झाला, आणि कर्णावरही. सामाजीक उतरंडीत एका स्तरावरच्या लोकांवर अन्याय का होतो आणि तो टाळायला काय करायला हवे हा प्रश्न नेहमीच समाजकारणाच्या ऐरणीवर राहिला आहे. आज सर्वात जास्त अन्याय सुस्थीतीत आलेल्या बहुजनांकडुन (क्रीमी लेयर) गरीब बहुजनांवर होत आहे.
५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ?
-- दादोजी आणि समर्थांचे राजकीय, शैक्षणीक कार्य हे ज्ञानेश्वरांच्या योगीक समाधीपेक्षा अगदी भिन्न स्वरुपाचे आहे. त्यांची तुलनाच मुर्खपणाची आहे. ज्ञानेश्वरांच्या समाधीची तपासणी करुन काय शोधायचे आहे? ओब्जेक्टीव्ह क्लीअर आहे काय ? मुळात आपण एका योगीक घटनेनची छानबीन करायची मागणी करतोय, तेही स्वतःला त्यातले काहिही कळत नसताना.. हे बिंडोकपणाचे नाहि काय?
आणि शिवप्रभुंच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे करंटे लोकही आहेत हे मला आजच कळले. अश्या लोकांना तुम्ही काहिच पुरावा देउ शकत नाहि. कोणाला सूर्य दिसत नसेल तर तो आंधळा तरी आहे किंव्हा त्याने डोळे तरी झाकले आहेत...
गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ?
आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।।
आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।।
तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।।
---- तुम्हीच सांगा काय दर्शवतो ?? मुळात ज्ञान हे एका अभ्यासकाकडुन दुसर्या अभ्यासकाकडे पाझरत असते. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडुन ज्ञान मिळवले आणि ते सामन्य लोकांन कळेल असे समजावुन सांगितले... मग प्रोब्लेम काय ? ज्ञानदेवांनी कुठे म्हटले कि या ज्ञानावर त्यांचे पेटंट आहे ? अहो ज्यांना अवघा महाराष्ट्र माउली म्हणतो त्यांना तरी आपल्या क्षुद्र जातिद्वेशा पासुन मुक्त ठेवा.
५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ?
-- संभाजीराजे हे इतीहासाने अन्याय केलेल्यांच्या रांगेतले. या छाव्याला अजुनही म्हणावं तितकं महत्व इतीहासाने दिले नाहि. इतीहासापासुन योग्य बोध घेण्याची वृत्ती असती तर आज हिंदुस्थान अश्या दु:स्थीतीत रहाता ना... राहिले बाजीरावाचे... मी तरी त्यांच्या मस्तानी संबधाला कोणि दैवी म्हटलेले ऐकले नाहि. अरे कुठे तो बाजीराव, कुठे तो संभाजी.. आणि त्यांच्या नावावर गळे काढणार्यांची लायकी ति काय. सूर्यापासुन तेज घेणे, प्रकाश घेणे.. आणि आपला मार्ग नीट चालणे. हे सोडुन उगाच या मोठ्या लोकांच्या नावाने कोल्हेकुई का करायची ?? रिकामटेकड्या टोळभैरवांनी असे केले तर त्यात काहि नवल नाहि... पण परा सारख्यांनाही हा मोह व्हावा ??
ह्या आणि अशा अनेक खोट्या संदर्भांचे वस्त्रहरण करणे हाच आमचा ह्या लेखनामागील उद्देश आहे. येथील जाणकार अजुन मुद्दे उपस्थीत करुन इथल्या दांभिक लोकांना घाम फोडतीलच. तुम्हा सर्व जाणकारा अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट उगवणार आहे हे निश्चीत.
---इतीहास सुर्य नेहमीच मार्गदर्शन करायला तत्पर आहे पराशेठ. पण तुम्हाला जो सूर्योदय अपेक्षीत आहे तो ज्ञानाधारीत नाहि तर द्वेशाधारीत आहे... आणि या समाजद्रोहाचा एकच परीणाम... तो म्हणजे आत्मघात.
(इतीहासाचार्य) अर्धवटराव
- Log in or register to post comments
अ
अर्धवट
Fri, 09/03/2010 - 17:20
नवीन
अती उत्तम आणि संयत प्रतिसाद..
अवांतर - एका अर्धवटाशी दुसरा अर्धवट सहमत असल्यामुळे आता ह्याला संपुर्ण ज्ञान मानावे का?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 09/03/2010 - 18:56
नवीन
कमितकमि अर्धवटांच्या राज्यात तरि तसं मानायला हरकत नाहि... ;)
(ज्ञानि) अर्धवटराव
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Sat, 09/04/2010 - 06:09
नवीन
+१ म्हणजे प्रतिसादाला आणि हाफ + हाफला देखील.
- Log in or register to post comments
भ
भारी समर्थ
Fri, 09/03/2010 - 18:52
नवीन
आ जाऊ द्या मनं. कुणी का आसना, चार गोष्टी येकाद्यानं केल्या चांगल्या तर आपणबी तश्श्याच कराव्या. जात-धर्म काय उपेगाचं राव... चांगली श्याळा-कालीजं शिकल्याली माणसं न्हवं तुमी?
आर्दवटरावाची प्रतिक्रिया आवाडली आपल्याला...आन् तुमाला सांगू का, नवं जुनं काय नसतय बगा असल्या जातीच्या भानगडीत. ती टक्कुर्यातच आसती येकेकाच्या. नवं काय आन् जुनं काय, समदी वड्यालाच येतेत राव हगायला.
गण्या, दांडकं आण रं हिकडं. जात-जात बोंबालणार्याच्या ढुंगणावरच हाणुत आज.
भारी समर्थ
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 09/04/2010 - 08:42
नवीन
>>हाणुत >> चर्च करताना हातापायी कशाला? बाकी ही लिहायची इष्टायल ओळखीची वाटते.
- Log in or register to post comments
भ
भारी समर्थ
Sat, 09/04/2010 - 12:58
नवीन
तायडे,
कसंय बरका की आमी पडलू गावात्ली माणसं. त्यामुळं आमाला नाय आसलं मुद्देसूद पाणी शेंदायला जमत. आमी कुणाला मानतो तर, गाडगे बाबाला आन् तुकारामाला. ते काय करून आन् सांगून गेल्यात म्हायताय का?
गाडगे बाबांच्या येकादा पाया पडाय गेल्याव लगीच काटीनं हाणायचे ते.
तुकोबा म्हणतेत, "नाठाळाचे माथी हाणू काठी".
ज्ये चांगलंय तेच्याबदल हिकडची आन् तिकडची मतं आसली तर समजतय बगा. आमच्या बैलजोडीला लय जीव लावतो आमी, पण यकादा कटाळ्या घुसला कनाय वावरात, की त्याला हाकलाय दंडूकंच लागतं हातात.
आसलं जातीवरन कुणी बोलाय लागलं की आमचा गण्या गेलाच म्हणून समजा कोपर्यातलं दांडकं आणाया...
बाकी, हिवाळ्यात कधी आले नगरकडं तर या आमच्या वावरात, हुर्डा खाऊ...आन् आमच्या गावात समदे आस्संच बोलाणारे हायती बरका... जातो आता. लाइट आलीय, पाणी सोडून येतो वावरात.
भारी समर्थ
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Sun, 09/05/2010 - 03:22
नवीन
>> चर्च करताना हातापायी कशाला?
हे हातापायी काय असतं बॉ? आमच्या मराठीत त्याला हाणामारी , मारामारी, धक्काबुक्की असे शब्द आहेत.
- Log in or register to post comments
ब
बबु
Fri, 09/03/2010 - 18:42
नवीन
परिकथेतील राजकुमारा..
पराचा कावळा केलास का करतोस बाबा?
वडाची साल पिंपळाला लावुन इतिहासाचे पुनर्लेखन होत नसते.
- Log in or register to post comments
ज
जिप्सी
Fri, 09/03/2010 - 20:29
नवीन
बाया ठेवल्या जायच्या. महाराजांच्याही ३ उपस्त्रिया होत्या म्हणतात. :- मृत्युंजयराव, अशी विधान ईतक्या बेधडकपणे कशी काय करता तुम्ही? महारांजांचा असा उल्लेख करताना तुम्हाला काहीच कसे वाटलं नाही, आणि बाकीचे लोक पण हे विधान वाचून सोडून देतात? तुमच्या देवांबद्दलच्या चर्चेत मला अजिबात रस नाही पण फक्त प्रतिसाद खेचक धाग्यात तरी महाराजांना आणू नये ही विनंती !
बहुत काय लिहिणे आपण सुज्ञ आहातच !
- Log in or register to post comments
भ
भारी समर्थ
Sat, 09/04/2010 - 01:44
नवीन
कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून त्याने माथी भडकवून घेणार्यापैकी आपण नक्कीच नाही..
त्यातून पेटलाच असेल एखादा महाराजांविषयीच्या शंकांनी, तर त्याला आमचे एकच सांगणे:
"आमचा अश्वमेध उधळला आहेच. सहकुटुंब येणे करावे."
महाराजांचे नाव घेण्याएवढीही पुण्याई नसलेल्या लोकांच्या वक्तव्यांनी व्यथित होण्याचे काहीच कारण नाही.
भारी समर्थ
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Sat, 09/04/2010 - 06:59
नवीन
पहिल्यांदा खव वाचली त्यामुळे खवमधुन उत्तर दिले आहे. परत इथे देत नाही. नसत्या चर्चांना तोंड फुटायचे. त्या चर्चांना भितो असे नाही. पण त्यामुळे जी चर्चा करायची इच्छाच नाही ती चर्चा करायला लागेल. असो. महत्वाच्या मुद्द्याला केवळ उत्तर देतो तरीसुद्धा:
बाया ठेवल्या जायच्या. महाराजांच्याही ३ उपस्त्रिया होत्या म्हणतात
२ वाक्ये मुद्दाम तोडली आहेत.
विधान त्या अर्थीचे नव्हतेच ज्या अर्थीचे ते समजले जाते आहे. तरीदेखील कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा असावी. महाराजांबद्दल प्रचंड आदर बाळगुन आहे.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Fri, 09/03/2010 - 20:49
नवीन
पेटलेत सगळे!!
आता माती फिरवावी की तेल ओतावे की पाणी??
- Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या
Sat, 09/04/2010 - 09:18
नवीन
मुळात प-या सारखे लोक ब्राह्मणांच्या नावाने कंठशोष करत आहेत जसे की मराठा लोक फार धुतल्या तांदळाचे आहेत. मराठा लोकांनीही सवर्ण म्हणवून घेवून बहुजनांवर अन्याय केले आहेत. झालेल्या अन्यायास ते ही तितकेच जबाबदार आहेत.त्यांनी ही स्पृश्यापृश्यता पाळलेली आहे. आता मोठा बहुजन उद्धाराचा आव आणून ब्राह्मणांवर चिखलफेक करुन काय साधत आहेत यांनाच ठाऊक. गरीब मराठा समाजाची परिस्थिती फार वाईट आहे असे फिडींग मराठा तरूणाला केले जाते. त्याला सुद्धा आरक्षणा शिवाय पर्याय नाही असे वाटायला लागते व तो पेटून उठतो. मेटे खेडेकर सारखे लोक उभे करुन रा. कांग्रेस हे घाणेरडे जातीयवादी खेळ खेळत आहे हे सर्वांना ठाऊक आहेच.
संभाजी ब्रिगेड हे संभाजी राजांचे नाव खराब करते असे माझे मत आहे. तिथे प्रसवणा-या ब्राह्मण विरोधी विचारांना वेळीच आळा घातला पाहिजे. एखाद्या जातीचा तिरस्कार करुन तुम्ही मोठे होणार नाही. ही वृत्ती सोडा. दुस-याचे पाय कापण्यापेक्षा स्वतची उंची वाढवून मोठे व्हा.
ब्रिगेडी मटेरिअल मी स्वतः वाचले आहे आणी त्यातल्या वाक्या वाक्यात ब्राह्मण द्वेष आहे. उदाहरणा दाखल. खेडेकराने स्वतःची पत्रिका ब्राह्मणा कडून करुन घेतली. त्यात तो मराठा असल्याने त्याचा राक्षस गण टाकला, ब्राह्मण लोक मुद्दाम असे करतात असे यांचे म्हणणे आहे.
या बेअकली लोकांना हे सुद्धा माहित नाही की राक्षस गण कोणाचाही असू शकतो. जातीवरुन गण ठरवला जात नाही. गुढी पाडवा साजरा करु नका कारण बळीराजाला त्या दिवशी बामनाने फसवले (वामनावतार) म्हणून मराठ्यांनी पाडव्याला गुढ्या उभारू नयेत असे यांचे मत आहे.
दिवाळी हा देखील सण साजरा करु नये असे त्यांचे मत आहे. थोडक्यात द्वेषाधारित व ब्राह्मण द्वेषाने बरबटलेली यांची शिकवण आहे. व तिला कधीच जनमान्यता मिळ्णार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे.
खेडेकर व मेटे सारखे लोक समाज कंटक आहेत. जातींमध्ये द्वेष पसरवणारे आहेत. खेद याचा वाटतो की शिकलेली मंडळी सुद्धा त्यांच्या नादी लागत आहेत. जे काही केले ते ब्राह्मणांनीच व मराठा कसा सामील नव्हता हे थोतांड थांबवा. झालेल्या अन्यायास प्रत्येक सवर्ण समाज तेवढाच जबाबदार आहे.
मराठ्यांना यातून आम्ही नामानिराळे आहोत असे दाखवता येणार नाही.
जनार्द्न वाघमारेंचा महापुरुषांचा पराभव हा लेख फार आठवतो. महापुरुषांना त्यांच्या जातीत बंदिस्त करून त्यांच्या अंध अनुयायांनी त्यांचाच पराभव केला आहे.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Sat, 09/04/2010 - 14:55
नवीन
"खेद याचा वाटतो की शिकलेली मंडळी सुद्धा त्यांच्या नादी लागत आहेत."
~~ ब्रिगेड आणि तत्सम प्रणाली विचारांच्या नादी लागणार्यात मराठा समाजातील 'सर्वच' शिकलेली मंडळी येत नाहीत, इतकेच म्हणतो.
कोल्हापुरात माझा अगदी नजिकचा असा म्हटला जाणारा सुमारे ३० मराठा मित्रांचा एक गट आहे, त्यातील माझ्यासह ९ पदव्युत्तर तर १६ पदवीधारक तर ५ पदविकाधारक आहेत (त्यामुळे 'शिकलेली मंडळी' हे लेबल आम्हाला लागू शकेल)....आपापल्या क्षेत्रात नोकरीधंद्यात अग्रेसर आहेत....आणि या सर्वांनी स्वतंत्रपणे तसेच एकत्रीतपणे संभाजी ब्रिगेड (आणि शिवसेना+मनसे) च्या आत्यंतिकपणाच्या धोरणाचा वेळोवेळी विरोध केला आहे -- लेखी आणि चर्चेतसुद्धा (धमक्या आणि मारही खाल्ला आहे ~ मात्र मार दिलेला नाही, कारण तो आमचा मार्ग नाही.)
सबब प्रतिसादकर्ते श्री.सोम्यागोम्या यांनी सरसकट सर्व मराठ्यांना "त्या" प्रश्नाबाबत एकाच तागडीत बसवू नये ही विनंती.
इन्द्रा
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/04/2010 - 14:59
नवीन
आपल्या शिक्षणाची जाहिरात करण्याचा क्षीण प्रयत्न एवढेच म्हणेन. असो.
- Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या
Sat, 09/04/2010 - 15:24
नवीन
>>आपल्या शिक्षणाची जाहिरात करण्याचा क्षीण प्रयत्न एवढेच म्हणेन. असो.
मला तसे वाटले नाही.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/04/2010 - 15:44
नवीन
माझ्या प्रतिसादाचा विषय आपण वाचलेला दिसत नाही. हरकत नाही ... हाही प्रतिसाद आपण ह. घ्यालच!
- Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या
Sat, 09/04/2010 - 16:00
नवीन
आता वाचला ! माफ करा.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/04/2010 - 16:02
नवीन
हरकत नाही. तेवढाच पर्याचा धागा प्रसिद्ध होतो आहे! ;-)
- Log in or register to post comments
S
sagarparadkar
Sat, 09/04/2010 - 15:44
नवीन
अहो त्यांना त्यांच्या शिक्षणाची जाहिरात करण्याची काहीच गरज नाही. त्यांची शैक्षणिक उंची आणि समज त्यांच्या वेळोवेळच्या प्रतिसादांतून व लेखनातून दिसतेच आहे की.
उलटपक्षी असे हिणवणारे प्रतिसाद हीच मला बाह्मणी वृत्ती (जात नव्हे) वाटते ...
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/04/2010 - 15:45
नवीन
लोक हो, इंद्रराज हे माझे मित्र असून त्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक, मानसिक इ.इ. पात्रतेवर मला अजिबात संशय नाही. कृपया प्रतिसाद देण्यापूर्वी तो नीट वाचा.
आणि हा प्रतिसाद अजिबात ह. घेऊ नका.
- Log in or register to post comments
S
sagarparadkar
Sat, 09/04/2010 - 16:26
नवीन
हलकेच घ्या .... हे लिहायला विसरलो, क्षमस्व ...
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Sat, 09/04/2010 - 18:27
नवीन
लोक हो, अदितीताई या माझ्या येथील मार्गदर्शक असून त्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक, मानसिक इ.इ. पात्रतेवर मला अजिबात संशय नाही. (त्यामुळे त्या श्री.स्पा यांना 'भयकथे'साठी बिल्ला क्रमांक ३०५ च्या खरडवहीकडे जाण्याचा सल्ला देण्याच्या बेतात होतो, पण दरम्यानच्या काळात दुसरीकडे आपल्या लाडक्या सचिन धाग्यामध्ये गुंतून गेलो व ते कामे अधुरे राहिले.)
राहता राहिला शैक्षणिक बाबीचा त्या प्रतिसादात उल्लेख करण्याच्या औचित्याचा मुद्दा....त्याबाबत (जरी अदिती यांनी तो गंमतीचा भाग म्हणून घेतला असला तरी...) माझी भूमिका अशी होती की, 'शिकलेला' समाज ब्रिगेडच्या मागे जात आहे असे काहीसे श्री.सोम्यागोम्या यांच्या प्रकटनातून प्रतीत होत होते, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज त्या मनोवृत्तीचा नाही आणि त्यातही सुशिक्षित म्हटला जाणारा एक वर्ग आहेच आहे....म्हणून ती थोडीशी आकडेवारी (जी प्रातिनिधिक स्वरूपाची मानली तर 'शिकलेला समाज' या व्याख्येची व्याप्ती वाढेल, असे वाटले). ~~ शिवाय शैक्षणिक, नोकरी, व्यवसाय, स्थान, आदीबाबत आपण मिपाच्या 'वैयक्तीक' पानावर माहिती दिलेली असतेच.
असो...माझ्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून अदितीताईंच्यावर कारवाई व्हावी यासाठी स्वतंत्र्यरित्या चोटा दोन यांच्याशी संपर्क साधत आहे.
इन्द्रा
- Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या
Sat, 09/04/2010 - 15:58
नवीन
इंद्रा,
एकाच तागडीत बसवायचे नव्हते मी ब्रिगेडी विचारसरणींच्या मराठ्यांबद्दल बोलत होतो. माझे अनेक मराठा मित्र आहेत. त्यात काही ब्रिगेडी विचारसरणीचे आहेत. शाळेत असताना ते चांगले मित्र होते. आधी जात पात कधी आमच्या बोलण्यात आली नसेल. आता पदोपदी येते. त्यांचा दृष्टी दूषीत झाल्याचे जाणवते. आता त्यातलाच माझा एक मित्र करिअर चा बट्ट्याबोळ करुन गावोगाव व्याख्याने द्यायला जातो.
अशा लोकांना भीक न घालणारे असेही माझे मराठा मित्र आहेत. कुठल्याही विशिष्ट जातीला झोडा असं ते करत नाहीत. ते मवाळ आहेत अशातला भाग नाही. कोणाचे ऐकावे कोणाचे नाही इतपत समज त्यांना आहे. उच्च शिक्षित व कमी शिकलेले असे दोन्ही प्रकारचे मित्र अशा विचरांचे आहेत.
>>(धमक्या आणि मारही खाल्ला आहे)
मार बिर खाल्ला नसला तरी वादावादीत मी जवळच्या मित्रांना दुखावलं आहे.
मूळ लेखासः
वीष पेरल्याने वीषच उगवते.
"अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट" उगवण्यापेक्षा द्वेषरहित व एकमेकांचे चांगले गुण घेणारा आपला समाज कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. राहून राहून ती ग्राफिटी आठवते. जगात विज्ञानात शोध लावले जातात आपल्याकडे इतिहासात.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/04/2010 - 16:01
नवीन
ग्रफिटी आवडली.
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Sat, 09/04/2010 - 15:39
नवीन
पॉपकॉर्नचे पुडे खूप संपले आणि बसून बसून रग लागली.
पुडे येणे बंद झाले आहे आणि फांदी मोडायला आली.
व्दिशककाला ७ च कमी असल्याने आता आगाउ (म्हणजे Advace. गैरसमज नको) अभीनंदन करून रजा घेतो.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Sat, 09/04/2010 - 16:13
नवीन
द्विशतक उलटले. हाही धागा विक्रमाच्या मार्गावर. अभिणंदन.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sat, 09/04/2010 - 16:56
नवीन
सुसंस्कृत, सुविद्य मराठा समाजात संभाजी ब्रिगेड विचारसारणीला फारसे स्थान नाही हे वाचून आनंद झाला. पण संभाजी ब्रिगेड विचारसारणी दिवसेंदिवस प्रबळ होत आहे. अनेक सत्ताधारी त्यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्यांना हवे तसे बदल ते घडवून आणू शकतात. आर्थिक, राजकारणी पाठबळ त्यांच्या बाजूचे आहे. हे रोखायचे असेल तर मवाळ विरोध फार प्रभावी ठरणार नाही. जहाल विरोध व्हायला हवा. आमच्या जातीचे नाव घेत इतका कोतेपणा करणार्याविरुद्ध तसे न मानणार्या मराठा लोकांनी काहीतरी केले पाहिजे. मग ते लिखाण असो, भाषण असो वा अन्य काही मार्ग. राजकीय क्षेत्रातही असे मराठा लोक यायला हवेत. मगच ब्रिगेड वृत्तीला शह मिळेल.
जसे मुस्लिम अतिरेक्यांविरुद्ध सरळमार्गी मुस्लिमांनी नुसते आम्ही विरोध करतो म्हणणे पुरेसे नाही. काहीतरी ठोस केले पाहिजे जसे अशा लोकांविरुद्ध तक्रार करणे, पोलिस वा गुप्तचर संस्थांना खबर देणे वगैरे.
संभाजी ब्रिगेड आणि लष्करे तोयबा वा अल कायदा यात फार फरक नाही. हळूहळू तो फरक कमी कमी होतो आहे.
बाकी हा मुद्दा उपस्थित करणारे एक काडी शिलगावून पेटलेले दारुकाम, रोषणाई बघत बसले आहेत असे वाटते. मीही थोड्या ठिणग्या उडवतो!
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Sat, 09/04/2010 - 20:12
नवीन
"सुसंस्कृत, सुविद्य मराठा समाजात संभाजी ब्रिगेड विचारसारणीला फारसे स्थान नाही"
~~ ही वस्तुस्थिती बहुतांशी जिल्ह्यात अगदी तळागाळापर्यन्त आहे, पण ज्या दोनचार हलग्या वाजतात त्यांच्या कर्णकर्कश आवाजाने सत्ताधारी पक्षाला नाही म्हटले तरी थोडीशी चिंता वाटते कारण साखर कारखान्याच्या राजकारणाशी (आणि त्यातील विस्तारीत जनसंख्येमुळे) असलेली 'मराठा' समाजाची घट्ट वीण त्या आवाजामागोमाग जाईल आणि आज मॅक्रोचे रूप असलेला तो 'वामन' उद्या मेगाचे रूप घेईल, त्यामुळे ब्रिगेड असो वा तत्सम घटक तो 'आपल्या मतदारा'ला कह्यात घेणार नाही याची दक्षता धुरंधर राजकारणी घेतात आणि विरोधाची धार थोडी मवाळ एवढ्यासाठी ठेवतात की, ब्रिगेड्+शिवसेना+मनसे यांना सरकारी कारवाईमुळे इन्स्टंट प्रोटीन्स मिळू नयेत.
ब्रिगेड मनोवृत्तीची वाढ होण्याचे दुसरे कारण "मिडीया" बजावत असलेली खाटक्याची भूमिका. आजच नव्हे तर ७०-८० वर्षापूर्वी खुद्द महात्मा गांधी यांनीच "यंग इंडिया" तील एका लेखात 'वर्तमानपत्र आणि पत्रकार हा एक चालता प्लेग झालेला आहे; जो असत्याचा आणि निंदा पसरविण्याचे काम करीत असतो." असे परखड मत एका प्रसंगी व्यक्त केले होते. ही त्या महात्म्याच्या काळातील स्थिती...तर आज काय आहे? कुठल्याही चॅनेलला गंगेने शांतपणे आपला प्रवाह चालू ठेवावा असे कदापिही वाटत नाही....'ब्रेकिंग न्यूज' ची ढास असो वा श्री.निखिल वागळे यांच्यासारख्यांची 'हल्ला बोल' धर्तीची पत्रकारिता असो, ही कलमे राज्यातील जातीजातीचे राजकारण भडकाविणे आणि पुढारलेल्या म्हणविल्या जाणार्या दोन जातीतील तेढ वाढीला कशी लागेल हेच पाहात असतात.
शिवाय दोन्हीकडील पुढार्यांना "मी जातीसाठी काहीतरी करून दाखवितो.." हे सिध्द करण्याची वारंवार उसळणारी उर्मी आहेच जी द्वेषाचा अग्नी सतत तेवत राहण्याचे कार्य करीत असते. मतासाठी 'रामाय स्वस्ति, रावणाय स्वस्ति' असे म्हणून दोन्ही गटाकडून दक्षिणा उपटण्यात तरबेज झाल्येत ही नेते मंडळी.
त्यामुळे वर श्री.सोम्यागोम्या असोत वा श्री.हुप्प्या (आणि त्यासम विचारप्रणाली राखणारे) म्हणतात त्याप्रमाणे खर्या अर्थाने सुशिक्षित आणि विवेकबुद्धी ठेवणार्यांनी राज्यात भेदाची ही दरी वाढू नये अशारितीनेच खाजगी आणि सार्वजनिक पातळीवर प्रयत्न करणे नीतांत गरजेचे आहे.
इन्द्रा
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sat, 09/04/2010 - 20:50
नवीन
मित्र इंद्रा,
हे जे काहि चाललयं ते कुठल्याहि डोके शाबुत असणार्या माणसाला अस्वस्थ करणारे आहे. तू (आता आपण तुम्ही-आम्ही चि औपचारिकता बाजुला ठेऊया...) या वादाचे सर्व पैलु जवळून बघितलेस असं दिसतय. या विषवृक्षाचं मूळ काय असावं ?? राजकारण, झुंडशाहि, हि फार जनरलाईझड् कारणं झालित. दलित वर्गात सवर्णांविषयी आकस असावा, के मला समजु शकतं. पण मराठा तर राज्यकर्ती जात होती/आहे. सैन्यात त्यांच्या तोडीचा पराक्रम कोणाचा नाहि. महाराष्ट्रात मराठा समाजाच्या हाती बर्यापैकी संपत्ती आहे. सत्ता तर आहेच आहे. आणि सर्वात मुख्य म्हणजे दलितांच्या वाटेला आलेलि उपेक्षा मराठ्यांच्या वाट्याला कधिच आलि नाहि. रणांगण असो वा राजकारण, अर्थकारण असो वा इतर सामाजीक चळवळी, सर्वत्र मराठ्यांचा बोलबाला राहिला आहे. मराठी ब्राम्हणांच्या तुललेत मराठ्यांची संपत्ती, संख्या कितीतरी जास्त आहे. मराठ्यांनी आपले कर्तुत्व वेळोवेळी सिद्ध केलं आहे. तेंव्हा कुठल्याहि न्युनगंडाचा वगैरे प्रश्नच येत नाहि. कुठल्याहि कारणाने मराठा आणि ब्राह्मण एकमेकांच्या वाटा रोखत नाहि, रोखु शकत नाहि. इतीहासाच्या पानांवर मराठ्यांचं नाव ठसठशीत कोरल्या गेलयं (चांगल्या आणि वाईट, दोन्ही अर्थाने... तेच ब्राह्मणांचेहि) बरं कुणा मराठ्याला राजकारणी फायदा उचलायचा असेल तर त्याकरता अनेक मुद्दे/ऑप्शन्स् आहेत जे ब्राम्हणद्वेषापेक्षा कितीतरी जास्त इफेक्टीव्ह असतील....
थोडक्यात काय, तर या द्वेषकारणामागे जि काहि सर्वसाधारण कारणं आहेत ति मला गैरलागु दिसतात. मग असं का ? यावर वेगळा धागा काढुन काथ्याकुट करावं असहि मला वाटलं. पण ते पुढे कधितरी. सद्ध्या मला एक्स्पर्ट कमेंट्स् हवेत...
(शोधक) अर्धवटराव
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sun, 09/05/2010 - 01:49
नवीन
उत्तर सोपे आहे. जात म्हणून जास्त प्रबळ बनायचे असेल तर खरा वा खोटा बागुलबुवा उभा करुन त्याची भीती घालून आपल्या गटाला घट्ट करता येते. ब्राह्मण समाज बहुतांशी सुशिक्षित खाऊन पिऊन सुखी असला तरी राजकीय दृष्ट्या अत्यंत दुबळा आहे. त्यांना शिव्या घातल्या तरी ते काही मोर्चे, दगडफेक करणार नाहीत ही खात्री आहे. असला दुबळा शत्रू एक पंचिंग बॅग म्हणून खूपच चांगला आणि उपयुक्त आहे.
बाकी कुठली जात असल्या शिव्या ऐकून घेणार नाही. त्याचे घातक राजकीय परिणाम होऊ शकतात.
पवार वगैरे स्वार्थी नीच नेते अब्जावधी रुपये खिशात घालून आपली श्रीमंती वाढवत आहेत. लवासासारखे प्रकल्प बनवून हजारो एकर खाजगी जहागीर असल्याप्रमाणे लाटत आहेत. त्यांच्या विरुद्ध रोष होऊ नये म्हणून असला मिथ्या शत्रू खूप सोयीचा असतो.
अर्थात हे बदलायची वेळ आलेली आहे. ब्राह्मणांनी संघटित होणे आवश्यक आहे. त्या जातीतल्या थोर लोकांवर केवळ ब्राह्मण होते म्हणून गलिच्छ चिखलफेक होत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे.
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Fri, 09/10/2010 - 08:38
नवीन
शंभू राजांचा केलेला घात आणि १६८० ते १६८९ च्या काळात अनेक मराठा सरदारांनी स्वराज्याला पाठ दाखवली हि मराठ्यांच्या नाकर्तेपणाची धड धडीत उदाहरणं असताना (याचा पुरावा पाहिजे असल्यास आमच्याच घराण्याचा तत्कालीन जगदाळे कैफियतनामा इ.सं.मं. जावून वाचावा) ब्रिगेड वाले फक्त एकाच जातीला जबाबदार का धरतात कळत नाही.
ब्रिगेड वाले हि गोष्ट जाणतात...आणि इथे मला सांगावसं वाटता कि दिसतात तितकेच लोक या संघटनांच्या मागे नाहीत तर काही अतिशय पावरफुल मराठा नेतेही यांना मदत करतात.जे कुठेही दिसत नाहीत पण अंडर ग्राउंड काम करतात !
- Log in or register to post comments
व
वेताळ
Sun, 09/05/2010 - 06:36
नवीन
नष्ट व्हायला हव्या होत्या पण त्या प्रबळ होताना दिसत आहेत.घटनाकाराना वाटत होते कि जातीव्यवस्था नजीकच्या काळात पुर्णपणे मोडकळीस येतील पण घडले ते उलट घडले आहे.जेव्हढा मोठा धार्मिक संघर्ष आहे त्या कैकपटीने मोठा आपल्या इथे जातीसंघर्ष आहे. त्याला जितके आपले पुढारी कारणीभुत आहेत तितकेच आपण सर्व लोक कारणीभुत आहोत.आपल्या दररोजच्या जीवनात कितीतरी वेळा ह्या जातीभेदाला खतपाणी घालत असतो. इथे कोणी संभाजी ब्रिगेटला शिव्या घालतो तर दुसरा ब्राम्हणाना शिव्या घालतो. हे सतत चालुच राहिल्याने ह्या संघर्षाची धार काही केल्या कमी होत नाही.
मिसळपाववर हे वाद कोण ना कोण सतत उकरुन काढत असतात. आता वरच काहीचा उल्लेख आहे कि ब्राम्हण समाजाला नेतृत्व नसल्यामुळे तो राजकारणात मागे पडला आहे. पण आखिल भारतिय ब्राम्हण मंच का कोणती संघटना आहे(ज्याचे मागिल वर्षी पुण्यात संमेलन झाले होते) तिचे विचार किती सुशिक्षित ब्राम्हणाना पटलेत?तसेच संभाजी ब्रिगेट बद्दल मराठा समाजात आहे.संभाजी ब्रिगेटला पाठिंबा देणारे बहुतांश लोक स्वतंत्र्य विचार करु शकत नाहीत असेच लोक आहेत.ह्या संघटनांचे नेत्रुत्व करणार्या लोकाना कार्यकर्ते कमी फक्त मेंढरे हवी आहेत. मग आपण काय बनणार हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- ›
- »