Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी...

स
सुहास झेले
Fri, 11/23/2012 - 12:00
🗣 716 प्रतिसाद
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती. असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची. अ‍ॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी) सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!) आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम. १. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट. २. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते. ३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत. ४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता. ५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता. ६. मराठीत टाईप करण्यासाठी - अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन ब) PaniniKeypad Marathi IME क) AnySoftKeyBoard - Devanagari ड) Lipikaar Hindi Keyboard Free मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले. ७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो. ८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता. ९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर. १०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता. ११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त. १२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता. १३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :) १४. TED - Ideas worth spreading :) :) बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा. - सुझे !!

प्रतिक्रिया द्या
447147 वाचन

💬 प्रतिसाद (716)
क
कपिलमुनी Tue, 09/29/2015 - 12:35 नवीन
मोबाईलवर youtube चे व्हिडीओ कसे download करायचे ? कोणते टूल वापरतात ?
  • Log in or register to post comments
न
नया है वह Tue, 09/29/2015 - 15:28 नवीन
१. Browser वरुन youtubeचे व्हिडीओ सुरु करा. २.लगेच एक व्हिडीओ icon Browserच्या तळाला येइल. ३. त्यावर क्लिक्/टच करा ४. पोप अप येइल Play/watch offline ५. सीलेक्ट watch offline ६. download सुरु होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
स्वप्क००७ Tue, 09/29/2015 - 15:19 नवीन
tubemate app डाउनलोड करा फ़रर्फ़ोक्ष अथवा क्रोम वरून. ह्या app द्वारे विदेओ डाउनलोड करू शकता
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/19/2015 - 07:09 नवीन
काय नवं आलं का ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 11/19/2015 - 07:52 नवीन
अ‍ॅंड्रॉइडवर ऑफलाइन मॅप्स आणि नॅविगेशन साठी चांगलं अ‍ॅप कोणचं?
  • Log in or register to post comments
न
नया है वह गुरुवार, 11/19/2015 - 15:35 नवीन
गूगल मॅप्स आता ऑफलाइन सुद्धा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
त
तुषार काळभोर गुरुवार, 11/19/2015 - 16:11 नवीन
Image removed. Offline Maps
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
म
मदनबाण गुरुवार, 11/19/2015 - 09:06 नवीन
Exclamation mark on cellular network icon :- हे सध्या पाहतो आहे, हा लॉलिपॉपचा बग आहे की फिचर ? इथे जाउन आलो :- https://code.google.com/p/android/issues/detail?id=79546 Marshmallow मधे फिक्स करण्यात आले आहे म्हणे ! कोणाला यावर अधिक माहिती आहे का ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Tail wags the dog
  • Log in or register to post comments
क
कानडा गुरुवार, 11/19/2015 - 10:25 नवीन
माझ्या cyanogen 12 (over lollipop) मधे ते दिसते जेव्हा डेटा बंद असतो. कुठल्याही प्रकारचा डेटा (२जी, ३जी, वाय-फाय) सुरु असेल तर ते exclaimation mark जाते. --- कानडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण गुरुवार, 11/19/2015 - 10:33 नवीन
त्याचा संबंध डेटा शी आहे हो, ते माहित आहे, पण हे फिचर आहे ? का बग ते जाणुन घ्यायचे होते. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Tail wags the dog
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा
प
पैसा Sun, 11/22/2015 - 17:34 नवीन
माझा अँड्रॉईड वन कार्बन आता ६.० वर आहे. ५.१ आणि ५.२ असतानाही असे काही येत नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Tue, 11/24/2015 - 04:52 नवीन
हा बहुधा ५.१.१ ला दिसणारा प्रकार आहे. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 11/19/2015 - 16:44 नवीन
काही दिवसांपूर्वीच ब्लॅकबेरी प्रिव्ह हा अ‍ॅन्ड्रॉइडवर चालणारा फोन लॉन्च झाला आहे. Image removed. ब्लॅकबेरी कंपनीने प्रथमच इतर कुणाची ऑपरेटिंग सिस्टिम वापरून फोन काढला आहे. एज स्क्रीन व स्लायडींग क्वेर्टी किबोर्ड अशी वैशिष्ट्ये असणारा हा एकमेव उपलब्ध फोन आहे. त्याखेरीज याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता. या फोनचे एक परिक्षण जालावरून साभार. ब्लॅकबेरी १० ओएसच्या चाहत्यांसाठी ही सकारात्मक घडामोड नसली तरी यामुळे ब्लॅकबेरी कंपनी टिकून राहण्यास मदत होणार असेल तर ते स्वागतार्हच आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 11/19/2015 - 23:42 नवीन
#bb-android-phone. android सुरक्षित? bb messages सुरक्षित असतील.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 11/19/2015 - 23:51 नवीन
ब्लॅकबेरीने थेट गुगलबरोबर काम करून सिक्युरिटी फिचर्स बनवले आहेत.
  • Hardware-embedded cryptographic keys. Translation:The phone has security in the chipset itself that verifies and validates that the hardware is running an untampered operating system.
  • A hardened Linux kernel. Translation: BlackBerry patched up the underlying Androidcore software to secure the operating system from vulnerabilities.
स्रोत: BlackBerry Priv Review: BlackBerry May Win You Back With Android
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Fri, 11/20/2015 - 03:47 नवीन
encryptionमुळे bbचे पॅकेज महाग ठेवले होते.आताचं माहित नाही.हा फोन value -for-money शोधणाय्रा गिह्राइकास पसंत पडणे कठीण आहे.बाकी स्लाइडर फोन त्रास देतात असा समज आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 11/20/2015 - 05:46 नवीन
माझ्या सध्याच्या फोनपूर्वी मी ब्लॅकबेरी टॉर्च ९८१० वापरत होतो ज्याला स्लाइडर किबोर्ड होता. त्यामुळे कधी त्रास झाल्याचे आठवत नाही. प्रिव्हच्या स्लाइडर किबोर्डचा आणखी एक महत्वाचा उपयोग म्हणजे त्याला आपण ट्रॅकपॅडसारखे वापरू शकतो. म्हणजे ब्राउझिंग करताना वर खाली स्क्रोल करताना ते किबोर्डद्वारेच करता येतं, स्क्रीनवरून बोटं फिरवायची गरज नाही. तसेच फोनची उंची वाढल्यामुळे मान फार खाली न वाकवता स्क्रीनवरचे वाचता येईल. याखेरीज किबोर्ड शॉर्टकट्स वापरण्याची सुविधाही आहेच. अमेरिकेत एटीअ‍ॅन्डटी दोन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर अडीचशे डॉलर्सला मिळणार आहे. काही महिने थांबल्यास ही किंमत यापेक्षा कमी होइलच. मला वेळ भेटला की मी एटीअ‍ॅन्डटीच्या दालनात जाऊन डेमो घेईनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
त
तुषार काळभोर Fri, 11/20/2015 - 18:17 नवीन
नोकिया एन९०० चा अतिशय सुंदर अनुभव आहे.
स्लाइडर किबोर्डचा आणखी एक महत्वाचा उपयोग म्हणजे त्याला आपण ट्रॅकपॅडसारखे वापरू शकतो. म्हणजे ब्राउझिंग करताना वर खाली स्क्रोल करताना ते किबोर्डद्वारेच करता येतं, स्क्रीनवरून बोटं फिरवायची गरज नाही. तसेच फोनची उंची वाढल्यामुळे मान फार खाली न वाकवता स्क्रीनवरचे वाचता येईल. याखेरीज किबोर्ड शॉर्टकट्स वापरण्याची सुविधाही आहेच.
हे सर्व असेच्या असे एन९०० साठीसुद्धा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Fri, 11/20/2015 - 18:21 नवीन
इ तो हमे पुराने जमाने का फोनवा लग रहा है... तुम्ही अजुनही वापरताय का? मी ११०८च्या पलिकडे कधी पोचलोच नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
त
तुषार काळभोर Fri, 11/20/2015 - 18:51 नवीन
मार्च २०१० मध्ये घेतला होता. साडेतीन वर्षे वापरला. एकदा टेरेसवरून पडल्याने स्क्रीन फुटली आणि गेला तो :( ३२जीबी इंटर्नल स्टोरेज (त्यात मी १६जीबीचं मेमरीकार्ड्पण टाकलं होतं), २५६ एम्बी रॅम, ३जी (मी बेसेनेलचं ३जी वापरायचो, एकदम झकास!), ५ मेपिचा उत्कृष्ट दर्जाचा क्यामेरा. द्याट फोन वॉज वे अहेड ऑफ इट्स टाईम. बिच्चारा अँड्रॉईडच्या झंझावातात टिकला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Fri, 11/20/2015 - 22:33 नवीन
आजच्या काळात साडेतीन वर्षे एकच फोन. त्या फोनचा अपघाती मृत्यू झाल्याने अधिक वापरला गेला नाही. माझाही सध्याचा फोन (झेड १०) अडीच वर्षांपासून वापरात आहे. एकदम सुदृढ आहे. वार्धक्याच्या खुणा अजिबात दिसत नाहीयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
य
योगी९०० Sun, 11/22/2015 - 12:00 नवीन
मिपावर माझ्यासारखा एन ९०० वाला भेटला... मी २०१० ला घेतला होता. अजुनही चालतोय. सध्या तो फोन मिडीया सर्वर म्हणून वापरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
त
तुषार काळभोर Sun, 11/22/2015 - 17:12 नवीन
लई म्हणजे लई आवडायचा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
म
मदनबाण Sun, 11/22/2015 - 16:10 नवीन
आजचे अ‍ॅप :- आपण आत्ता पर्यंत बॅटरी सेव्हींग आणि टास्क किलर अ‍ॅप्स पाहिली आहेत, यात एक नवी भर... APUS Booster+|Speed Up Phone डीप मेमरी क्लिअर करण्यार्‍या बर्‍याचश्या अ‍ॅप्सना रुट अ‍ॅक्सेस लागतो, पण रुट अ‍ॅक्सेस शिवाय सुद्धा डीप मेमरी फ्रीअप करण्या मधे हे अ‍ॅप चँप आहे,वन टच मधे मेमरी रिलीज होते आणि पर्फोमन्स बुस्ट होतो. तुम्हाला आवश्यक असणारी अ‍ॅप्स तुम्ही किल होण्या पासुन वगळु शकता.अ‍ॅप्सना ऑटो स्टार्ट होण्या पासुन रोखण्याचे काम हे अ‍ॅप करते त्यामुळे बॅटरी ड्रेन कमी होउन एकंदर फोनचा परफॉर्मन्स स्मुथ राहतो. { मी हे सध्या वापरतोय आणि अनुभव एकदम मख्खन आहे. :) } एक वेगळे अ‍ॅप :- Carat तुमच्या फोनची बॅटरी नक्की कोणत्या अ‍ॅप्समुळे जास्त ड्रेन होते ? हे समजुन घेण्यासाठी तुमच्या वापरा नुसार पर्सनलाइज रिपोर्ट जनरेट करुन देण्याचे काम हे अ‍ॅप करते.आठवड्याभरात जमेल तसे हे अ‍ॅप दिवसातुन एकदा तरी रन करावयास हवे{ डेटा / वायफाय अ‍ॅक्सेस गोळा केलेला डेटा सेंड करण्यासाठी आवश्यक आहे} ! रिपोर्ट जनरेट झाल्या नंतर बॅटरी कंझ्युम करणार्‍या अ‍ॅप्सचा नक्की अंदाज तुम्हाला येइल. हे अ‍ॅप बनवणारे कोण आहेत ? त्यांच्या बद्धल थोडेसे :- Carat started at the AMP Lab, UC Berkeley, in collaboration with University of Helsinki. It is under active development by a team of researchers in the NODES group, Department of Computer Science, University of Helsinki. We are constantly making improvements, adding features, and giving you more knowledge about how your device is using energy. Remember, knowledge is power! { मी वापरण्यास आणि समजुन घेण्यास आताशी सुरुवात केली आहे, नक्की काय आणि कसा रिपोर्ट जनरेट होतो आणि नक्की कशी आणि काय माहिती मिळते त्या बद्धल उत्सुक आहे. }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Is the bubble bursting for India's online start-ups?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 11/24/2015 - 05:04 नवीन
आजचे अ‍ॅप :- वर दिलेल्या अ‍ॅप्स प्रमाणेच हे टास्क किलर आणि एक प्रकारे बॅटरी सेव्हर अ‍ॅप्स आहेत. १ } Greenify :- या अ‍ॅप चे वैशिष्ठ म्हणजे तुम्ही अ‍ॅप्स सिलेक्ट करुन ती hibernation करुन टाकु शकता. त्यामुळे जो पर्यंत तुम्ही स्वतःहुन ती अ‍ॅप्स सिलेक्ट करुन चालु /ओपन करत नाहीत तो पर्यंत ती बॅकग्राउंडला रन होणार नाहीत.ऑटो hibernation करणार्‍या बर्‍याचश्या अ‍ॅप्सना रुट अ‍ॅक्सेस लागतो, पण Greenify मधे हे विदआउट रुट साध्य करता आले आहे, पण यासाठी तुम्हाला पॅटर्न लॉक किंवा पिन लॉक डिसेबल ठेवावे लागेल. माझे मॅन्युअल hibernation करुन काम भागते आहे. २} ES Task Manager (Task Killer ) :- तुम्हाला इस फाईल एक्सप्लोरर तर ठावूक असेलच... त्याच अ‍ॅप बनवणार्‍यांचे हे अगदी लाईट { जवळपास ७०० केबी फक्त ! } टास्क किलींग अ‍ॅप आहे. हे एक मस्ट हॅव अ‍ॅप आहे. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
पंतश्री Wed, 12/23/2015 - 14:54 नवीन
मदनबाण साहेब इतकी चागली माहिती साथि दुसरा धागा उघडलात तर वचायला सोप जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/22/2015 - 14:26 नवीन
या सायटीवरुन आपल्याला काही पेड अ‍ॅप्लीकेशन्स फुकट मिळतील. आपण आपल्या जवाबदारीवर टाकावेत. फोन हँग झाला. काळा पडला. तर मी जवाबदार नाही. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 12/23/2015 - 16:29 नवीन
टास्क किलिंग म्हणजे काय ,ते का करावे लागते? बॅकग्राउंला अॅप का चालू ठेवावी लागतात?कोणती?नाही चालू ठेवली तर काय होईल?
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले गुरुवार, 12/24/2015 - 07:45 नवीन
काही अॅप्स बंद केल्यानंतरही त्यांचे काही प्रोसेस सुरूच असतात...त्यासाठी टास्क किलिंग वापरले जाते. त्यामुळे रॅम फ्री होतो आणि मोबाईलची बॅटरी ही वाचते थोड्याप्रमाणात... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
म
मदनबाण गुरुवार, 12/24/2015 - 08:03 नवीन
@पंतश्री धन्यवाद. आपली सुचना चांगली आहे,परंतु सर्व नविन अपडेट्स हे नेहमी धाग्याच्या शेवटी दिले जातात त्यामुळे ते शोधण्यात अडचण येत नाही. तसेच संपुर्ण धाग्यात हवी ती माहिती चाळण्यास एकाच धाग्याचा उपयोग होतो व शक्यतो आधी दिलेली माहिती परत देण्याचे टाळता येते. मान्य आहे धाग्याची पाने वाढल्या नंतर धागा उघडण्यास वेळ लागतो,तरी सुद्धा सर्व माहिती एकत्रपणे एकाच धाग्यावर पटकन शोधता आणि वाचता येते.बाकी झेले अण्णांनी यावर विचार करावा कारण हा धागा त्यांचा आहे आणि मी फक्त प्रतिसाद देणारा आहे. :) @ कंजूस मामा टास्क किलिंग म्हणजे काय ,ते का करावे लागते? आपण ओपन केलेल्या अ‍ॅप्समुळे { तसेच बाय डिफॉल्ट रन होणार्‍या } रन होणार्‍या प्रोसेसेस /सर्व्हिसेस आपल्या निवडी नुसार बंद करणे म्हणजे टास्क किलींग. समजा आपण विंडोज मधे टास्क बार वर राईट क्लीक केलेत आणि मग स्टार्ट टास्क मॅनेजरवर क्लीक केलेत तर विंडोज टास्क मॅनेजर उघडते. त्यात प्रोसेसेस या टॅबवर गेल्यावर रन होण्यार्‍या प्रोसेसेस दिसतात. समजा माझे फायरफॉक्स काही कारणाने हँग झाले आहे आणि मला ते डेस्कटॉप वरुन बंद करता येत नाही, अश्यावेळी ती टास्क एंड प्रोसेस किंवा एंड प्रोसेस ट्री हा पर्याय निवडुन { प्रोसेस सिलेक्ट करुन राईट क्लीक केल्यावर} ती प्रोसेस किल करता येते, ज्यामुळे फायरफॉक्स बंद करता येइल. यामुळे रॅम आणि प्रोसेसर लोड रिलीज करता येते. हेच काम तुम्ही अ‍ॅनड्रॉइडवर करता. बॅकग्राउंला अॅप का चालू ठेवावी लागतात?कोणती?नाही चालू ठेवली तर काय होईल? बरीचशी अ‍ॅप्स बॅग्राउंडला चालु राहतात कारण त्यांची ती गरज असते, उदा. व्हॉट्सअ‍ॅप जसे तुम्ही नेटला कनेक्ट होतात तसे तुम्हाला अपडेट्स मिळतात आणि नोटिफिकेशन मेसेज आणि टोन ऐकायला मिळते,कारण ते बॅग्राउंटला अ‍ॅक्टीव्ह आहे. पण जर मी ही प्रोसेस किल केली तर मला अपडेट्स मिळणार नाही,परंतु माझी रॅम आणि प्रोसेसर फ्रीअप होइल ज्याचा परिणाम अर्थातच बॅटरीवर होतो. Android 6.0 Marshmallow मधे Doze मोड दिला आहे, ज्यामुळे बॅटरी परफॉर्मन्स इंप्रुव्ह होतो. अधिक इकडे :- Inside Marshmallow: What is Doze, how do I use it and what does it do? How to turn off doze mode for specific apps in Android Marshmallow Doze app brings Android 6.0 Marshmallow’s best feature to older phones मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- श्री गुरु दत्ता,जय भगवंता... :- Ajit Kadkade
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस गुरुवार, 12/24/2015 - 11:52 नवीन
हायला हे मोठेमोठे टास्क-किलींग वगैरे नावं वाचून किती घाबरलो होतो! हे तर विंडोजच्या सेटिंग्जमध्ये जाऊन अगोदरच केलं आहे.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 12/27/2015 - 09:11 नवीन
मोटो ई रूट करण्यासाठी कुणी मदत करेल काय ? नेटवर वाचून भरपूर प्रयत्न केले पण जमलं नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/05/2016 - 16:42 नवीन
थोडी तांत्रिक मदत हवी आहे. Using Java, how to send a string/text from a laptop to an Android phone over wireless connection such as BlueTooth?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/22/2016 - 14:37 नवीन
माझी प्रोग्रॅमिंग बॅकग्राउंड नाही, तरी सुद्धा खालील दुव्यानी मदत होते का ते पहा :- Connecting to Bluetooth devices with Java Android Bluetooth Example

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peas
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मदनबाण Fri, 01/22/2016 - 02:57 नवीन
@उगा काहितरीच मोटो रुट करणे अवघड आहे,असे जालावरुन कळले आहे. अजुन यावर अधिक वाचायला हवे. काही कंपन्यांचा रुट करण्याला विरोध नसतो, तर काही कंपन्यांना फोट रुट होउ नये असे वाटते आणि तसा त्यांचा प्रयत्न देखील असतो. आजचे अ‍ॅप :- Standby Touch Advanced :- वन टच स्क्रीन लॉक करण्यासाठीचे अ‍ॅप.सॉल अ‍ॅप साईझ :- 140k आणि नो बॅटरी कंझप्शन. तुमचा अ‍ॅन्ड्रॉईड फोन तुम्हाला नेव्हिगेशन मधे अधिक जलद करता येउ शकतो... आता हे कसे करायचे ? खालच्या स्टेप्स फॉलो करा... सेटिंग्स => अबाउट फोन => बिल्ड नंबर => टॅप ७ टाईम्स ऑन बिल्ड नंबर => थीस विल एनेबल डेव्हलपर ऑप्शन इन सेटिंग्स. आता सेटंग्स मधे डेव्हलपर ऑप्शन दिसायला लागेल. सेटिंग्स => डेव्हलपर ऑप्शन => इथे तुम्हाल पुढील ३ पर्याय दिसतील. १} Window animation scale २}Transition animation scale ३}Animator duration scale वरील तिन्ही स्केलची डिफॉल्ड व्हॉल्यू १x आहे, जी बदलुन 0 करावी. { सर्व ऑप्शन्सची } फोन २दा रिबूट करावा... फरक लक्षात येइल... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peas
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ Fri, 01/22/2016 - 06:19 नवीन
माझ्याकडे ASUS Zenphone 5 आहे. काहीही केलं तरी ह्या लेकाला माझा पीसी ओळखतच नाही. अंतरजाला वरील सर्व उपलब्ध उपाय करुन पाहीले पण काही उपयोग नाही. मझ्या पीसीचे युसबी पोर्ट चांगले आहे फोन म्ध्ये काही बिघाड असेल तर माहीत नाही. माझा पीसी जुना आहे (पी४) , त्याला वायफाय नाही त्यामुळे गाणी, व्हिडो वगैरे हिकड तिकड करण फारच कटकटीच आहे. यावर कुणाला काही उपाय माहित आहे का ? किंवा एखादे अॅप कि जे वायफाय शिवाय फोन आणि पीसी ला जोडु शकेल ?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/22/2016 - 14:13 नवीन
तुमचा फोन दुसर्‍या कुठल्या पीसीला जोडुन पाहिला आहेत का ? तसेच फोनसाठीचे ड्रायव्हर्स पीसी मधे इन्स्टॉल आहेत का ? कारण जर तसे नसेल तर पीसी फोनला डिटेक्ट करण्यास असमर्थ होउ शकेल... अधिक मदत इथे मिळते का ते पहा :- ASUS PC Link Asus Zenfone 5 not detected by computer Zenfone 5 and 4 not detecting in PC with USB cable

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peas
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ
स
संदीप डांगे Fri, 01/22/2016 - 14:38 नवीन
माझा सॅमसंग नोट अचानक ३० तारखेला रात्री बंद पडला. मेकॅनिककडे घेऊन गेलो तर त्याने सांगितले सेम केस तीन-चार नोट्ससोबत झाली आणि त्याच्याकडे त्याच एक-दोन दिवसात आलेत दुरुस्तीला. अजून एकानेही त्याचा सॅमसंग असाच बिनाबातका बंद पडला सांगितले. आज वीस दिवस होउनही मेकॅनिक (जो खरंच मास्टर आहे) त्यालाही तो सुरु करता आलेला नाही. सॅमसंगने जुने फोन इन्टर्नेट द्वारे बंद करून ग्राहकांना नविन फोन घेण्याचे आरंभले आहे काय?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/22/2016 - 15:09 नवीन
सॅमसंगने जुने फोन इन्टर्नेट द्वारे बंद करून ग्राहकांना नविन फोन घेण्याचे आरंभले आहे काय? हा.हा.हा... ह्याची शक्यता नाही,फोन अपडेट झाल्यावरही असे प्रॉब्लेम्स येउ शकतात. बाकी या बाबतीत नो आयडीया.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peas
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 03/07/2016 - 11:51 नवीन
काही नवीन अप्लिकेशन्स आलीत काय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 03/07/2016 - 15:51 नवीन
नवी आणी जुनी पण फारशी माहित नसलेली अशी आहेत भरपूर आहेत स्वतंत्र धागा काढू की यातच लिहू असा प्रश्न पडला आहे.इथे मोबाईल रूट करण्याविषयीच जास्त माहिती मिळतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 03/07/2016 - 15:58 नवीन
एंड्राइड म्हटलं की सुहास झेले यांचा धागाच सर्वांना आठवतो. तुम्ही इथे सर्व अप्लिकेशन्स जी हटके आहेत आणि फ्री आहेत क्र्याकही अप्लिकेशनही चालतील तेव्हा याच धाग्यात लिहावे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
उ
उपयोजक Mon, 03/07/2016 - 16:31 नवीन
एका अॅप बद्दल मदत हवी आहे.मायक्रोसॉफ्ट वर्ड च्या अॅपमधे मराठी पेस्ट केले की चौकोन चौकोन दिसतात यावर उपाय काय
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 03/07/2016 - 17:13 नवीन
ऑफ़ीस सूट मधील व्हर्जन ८.५.४६५७ वापरतो त्यात कॉपी पेष्ट केलं तरी चौकोन दिसत नाही. एक तर ऑफीस सूटचं व्हर्जन अपडेटून घ्या किंवा हा सिष्टिम फॉण्टचा तर इशु नाही ना ते एकदा तपासून पाहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
म
मदनबाण Sun, 04/03/2016 - 20:23 नवीन
आजची अ‍ॅप्स :- १} Clean Master Lite Clean Master बहुतेक आधी इथे देउन झाले आहे, याचेच लाईट व्हर्जन उपलब्ध आहे, जे मी सध्या वापरुन पाहतो आहे. २} AVL तुम्ही आत्ता पर्यंत बरेच वेगवेगळे अँन्टीव्हायरस वापरुन पाहिले असतील, हे करत असताना तुमच्या एक लक्षात आले असतील की त्या अँन्टीव्हायरस मध्ये इतर अधिकचे फिचर्स सुद्धा दिलेले असतात, ज्याचा तुम्ही वापर करालच असे नाही. मग तुम्हाला फक्त अँन्टीव्हायरसच हवा असेल तर ? याचे उत्तर अर्थातच AVL आहे, ज्याचे मुख्य लक्ष अँन्टीव्हायरस इंजिन हेच आहे. आत्ता पर्यंतचा अनुभव उत्तम आहे. ३} All India Radio Live आकाशवाणीचे ऑफिशिअल अ‍ॅप, जे एका दुसर्‍या धाग्यात दिले होते, तेच इथे परत देत आहे. ४} iNVH मध्यंतरी आमच्या इथे रहदारीचा आवाज कमालीचा वाढला होता, त्यामुळे माझे टाळके १-२ जाम सटकले होते ! नक्की किती DB आवाज आहे हे मोजण्यासाठी हे अ‍ॅप मी वापरुन गोंगाट मोजण्याचा प्रयत्न केला होता. बॉश { Bosch } या कंपनीचे हे ऑफिशिअल अ‍ॅप आहे. ५} Adobe Photoshop Lightroom फोनवरच काढलेले फोटो आणि इतर इमेजेस एडिट करण्याचे अ‍ॅप. अजुन जास्त वापरुन पाहिलेले नाहीये. जरासे वेगळे अ‍ॅप्स :- मध्यंतरी मी मेडिटेशन रिलेटेड अ‍ॅप्स शोधत होतो आणि शोध घेत असतानाच मला खालील २ अ‍ॅप्स मिळाली जी मी सध्या वापरुन पाहतो आहे. १ } Water & Gong ~ Relaxing sounds मनाला शांत करण्यासाठी मनुष्य प्राणी बरेच उपाय करतो, त्यात मी सुद्धा आलो ! ;) वाहत्या पाण्याचा आवाज किंवा नुसत्या पाण्याचा आवाज मनाला शांतता प्रदान करतो, त्यामुळेच मी हे अ‍ॅप निवडले. यात वॉटरफॉल / समुद्राचा / बांबु फाउंटनचा /वाहत्या पाण्याचा / पावसाचा अश्या प्रकारे आवाज तुम्हाला ऐकावयास मिळतील शिवाय जोडीला गाँग साउंड सुद्ध्या आहे. हे सगळे साउंड्स तुम्ही तुमच्या गरजे नुसार कस्टमाईज करु शकता. मला हे अ‍ॅप फार आवडले. :) २} Brain Waves - Binaural Beats Brain Waves आणि Binaural Beats वर मी बर्‍याच काळा पासुन वाचन करत आहे, आणि याचा मेडिटेश मध्ये कसा वापर करता येइल ? या शोधात असताना मला हे अ‍ॅप मिळाले. स्वतःला हवी ती Binaural Beats फ्रिक्वेन्सी तुम्हाला या अ‍ॅप मधे सेट करता येते आणि सेव्ह सुद्धा करता येते. बाय डिफॉल्ट काही फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत. सध्या थिटा फ्रिक्वेसीवर मेंदू खपवणे चालु आहे. जालावर Theta waves and meditation असा शोध घेतल्यास अनेक प्रकारची रोचक माहिती आपणास मिळु शकेल. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- आज कुणीतरी यावे... :- मुंबईचा जावई
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/06/2016 - 15:08 नवीन
कोणी शामशुंग मोबाईलला CyanogenMod टाकलं आहे का ? अनुभव कसा आहे ?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/25/2016 - 05:36 नवीन
मित्राने सहा महिन्यांपूर्वी मायक्रोमॅक्सचा सायनोजनवर चालणारा मोबाइल घेतलेला होता.android सारखी ओएस असणे आणि android os असणे यात फरक आहे सर.गुगल प्रॅाडक्टस - ब्लॅागर,डॅाक,प्लस फुल असेलच असं नाही अथवा काही लोचा असू शकतो.त्याच्या मोबल्यात गुगल स्टोर उघडले की पन्नास एमबी डेटा उडतो.हे मायक्रोमॅक्सने टाकलेल्या अॅडसमुळे पण असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आ
आनंदी गोपाळ Sat, 06/25/2016 - 15:26 नवीन
मी स्वतः युरेका प्लस वापरतो आहे. उत्तम फोन आहे. सायनोजेनमुळे ५० एम्बी डेटा उडत नाही. डेटा नक्की कोणतं अ‍ॅप वापरतंय ते सेटिंग्जमधे पहा. प्ले स्टोअर चालू केल्यावर भरपूर डेटा उडत असेल, तर नक्कीच प्लेस्टोअरमधे ऑटो अपडेट सुरु असणार. ते सेटिंग आधी बदला. सायनोजेन फोनला रूट केल्यावर वॉरंटी व्हॉईड होत नाही. आधी रूट करून ब्लोटवेअर, नको तो कचरा उडवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Sat, 06/25/2016 - 18:23 नवीन
होय त्यांचा युरेका प्लस आहे.मित्राला सांगतो अॅप्स चुक करायला.थँक्स.स्क्रिन रेझ 800x400 आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Sun, 06/26/2016 - 14:16 नवीन
1080 x 1920 pixels
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
  • «
  • ‹
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा