तुमच्या अॅन्ड्रॉईडसाठी...
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती.
असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची.
अॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी)
सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!)
आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम.
१. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट.
२. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते.
३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत.
४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता.
५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता.
६. मराठीत टाईप करण्यासाठी -
अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन
ब) PaniniKeypad Marathi IME
क) AnySoftKeyBoard - Devanagari
ड) Lipikaar Hindi Keyboard Free
मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले.
७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो.
८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता.
९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर.
१०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता.
११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त.
१२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता.
१३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :)
१४. TED - Ideas worth spreading :) :)
बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा.
- सुझे !!
💬 प्रतिसाद
(716)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/05/2015 - 09:15
नवीन
विंडोज सात ला चालत नै असं वाटतंय. कारण मॅक असेल तरच सपोर्ट करतं असं एका प्रश्नाच्या उत्तरात गुगलवर कळलं.
तुमच्याकडे संगणकावर कोणती ओएस आहे ? मी वाय फायवरुन ट्राय करतो पण त्यालाही लै वेळ घेतंय.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
गुरुवार, 03/05/2015 - 10:04
नवीन
मीसुद्धा विंडोज ७ च वापरतो.
मी सांगितलेले करून पाहिले का तुम्ही ?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/05/2015 - 10:29
नवीन
माझ्याकडे असलेलं जुनं व्हर्जन वापरत होतो त्यामुळे हा रोग आला होता. आता नवं व्हर्जन डाऊनलोडून टाकलं. लै फ्यासिलिट्या आहेत आत्ताच्या व्हर्जनमधे. हे व्हर्जन तितकं स्मुथ नाही पण आता जमलंय. थ्यांक्स. :)
अजून काही नवी खटपट.
-दिलीप्ल बिरुटे
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
गुरुवार, 03/05/2015 - 06:21
नवीन
मोटो जी वर अॅन्ड्रॉइड लॉलिपॉप ५.०.२ OTA अपग्रेड घेतल्यापासून माझा पण फोन स्लो झाला आहे . बर्याच वेळा hang पण होतो आहे . kitkat अॅन्ड्रॉइडच बर होत अस वाटून राहिलंय राव
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
गुरुवार, 03/05/2015 - 07:44
नवीन
developer options मधून Background Process Limit २ किंवा ३ सेट करून बघा.
असे केल्यानंतर काही प्रॉब्लेम येत असतील, उदा. काही ऍप अचानक क्लोज होणे, तर Background Process Limit परत Standard वर सेट करा.
गरज नसेल तर Animations सुद्धा बंद करून टाका सगळे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 03/05/2015 - 07:56
नवीन
काही अॅप उदाहरणार्थ रेल्वे ,बातम्या यांचेमधील माहिती त्यासंबधी असलेल्या अधिकृत वेबसाइटवरूनच आणत असतील तर ती वेबपेजिज बुकमार्क करून ठेवली तर काम सोपे नाही का होणार?आपल्याला अमुक एक पेपरच्याच बातम्या अमुकेक विषयासाठी हव्या असतात त्यात खिचडी कशाला?ते पेजच बुकमार्क करून उघडायचे.
- Log in or register to post comments
स
सुकामेवा
गुरुवार, 03/05/2015 - 09:10
नवीन
http://allaboutmotog.com/how-to-clear-cache-partition-on-moto-g-and-moto-x-after-android-lollipop-update/
- Log in or register to post comments
द
देव मासा
Fri, 03/06/2015 - 01:58
नवीन
चिन्ह येत न्हवते
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 03/06/2015 - 10:12
नवीन
अॅप नाहीये पण सोनीचा बजेट फोन MWC मध्ये जाहीर झाला ४जी रेडी परंतू मिडिआटेक quadcoreप्रसेसर आणि फक्त QHD 960X540pix
सोनी XPERIA e4G फोन स्पेसि
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Tue, 03/31/2015 - 18:07
नवीन
WhatsApp voice calling feature is now available to all users of the app's Android version. The app had begun rolling out this month to some users and they could pass it on to others by making a WhatsApp call during time-limited invite windows. However, the feature has been activated on Tuesday for several users who didn't receive invites.
To get this feature on your Android smartphone, all you need to do is download the latest version of WhatsApp from its website. The feature has appeared on WhatsApp version 2.12.5 in some smartphones, but most people will need the latest 2.12.19 version to get WhatsApp calling. The update has already started being pushed to Google Play as well, so just sit tight until it rolls out in your region or download the apk from the company site.
When the feature is activated on your smartphone, you will notice a new three-tab layout featuring Calls, Chats and Contacts. You can head to the Calls tab, tap the phone icon, and pick a contact to make your first WhatsApp call.
While the feature is available to Android users now, those on other platforms continue to wait. WhatsApp confirmed that the feature would be rolled out to iPhone users soon. There's no word yet about the feature when the feature will be available on other platforms. Until then, Android users with WhatsApp calls enabled won't be able to call WhatsApp users on other platforms. These people won't appear in the list of contacts that Android users can call. The long-awaited feature is finally available on one platform, and there's no more waiting for invite windows to open again.
NEWSWhatsApp Voice Calling Now Available to All Android Users, No Activation Required
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 04/01/2015 - 14:55
नवीन
अनुवाद करा की जरा. वाट्सप कॉलींगला जरा आवाज घुमल्यासारखा वाटतो.
आणि त्यावर बोलण्याचा अजून येईना बघा. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 04/01/2015 - 14:56
नवीन
अजून प्रश्न विचारल्यास व्यनि करायचा सल्ला देतील की नाही बघा.
-टेक्नोहित.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 04/01/2015 - 15:01
नवीन
बघु काय म्हणता ते. :) बाकी आता त्या वाट्सपच्या नवनव्या फिचर्सचा आता कंटाळा आला.
सदस्यांनी आत्तापर्यंत ग्रुप मधे किती मेसेजेस टाकले त्याची संख्या आता दिसते, काय उपयोग त्याचा.
वाट्सप धड बंद करता येईना आणि चालुही ठेवता येईना. वाजलं की पाहावंच लागतं. :(
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सुहास झेले
Wed, 04/01/2015 - 18:12
नवीन
वायफाय किंवा ३जी नेटवर्क असेल तर ही कॉलिंगची सुविधा उत्तम आहे.... :) :)
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
गुरुवार, 05/07/2015 - 00:01
नवीन
वाजत नाही.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 04/06/2015 - 05:14
नवीन
@ -टेक्नोहित. >> =)))))
- Log in or register to post comments
र
रुस्तम
Fri, 04/10/2015 - 11:26
नवीन
=))
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Mon, 04/06/2015 - 09:29
नवीन
इंटर्नल स्टोरेज ५०३ एमबी, ४१ एमबी फ्री
फोन स्टोरेज २ जीबी ३०७ एमबी अॅव्हेलेबल
फोनमध्ये एसडी कार्ड नाही.
तरीही कोणतेच अॅप्लीकेशन डाउनलोड करता येत नाहीए. व्हाॅट्स अप अपग्रेड करता न अाल्यावर जुने व्हर्जन काढून टाकले, तरी स्पेस शिल्लक नाही अशी एरर येत अाहे. दुकानदाराने व्हायरस शिरला असेल असे सांगितले अाहे. हा व्हायरस मुळे अालेला प्राॅब्लेम असू शकेल काय? तसेच जर अॅंटी व्हायरस घ्यायचा झाला तर कोणता घ्यावा? एखादे अाॅनलाइन स्कॅनिंग करणारी साइट वगैरे अाहे काय?
धन्यवाद.
- स्वधर्म
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/06/2015 - 10:48
नवीन
मला वाटतं फोनची मेमरी (इंटरनल स्टो) कमी आहे त्यामुळे तुमच्या हातात फार काही शिल्लक नाही.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Mon, 04/06/2015 - 11:09
नवीन
धन्यवाद, पण फाॅर्मॅट मारणे, हा माझा लास्ट अाॅप्शन असेल. सगळे काॅंटॅक्ट्स, अकाउंट्स वगैेेरे जाणार ना? सिंक केले नाहीत बर्याच दिवसात, बराचसा डेटा फोनमध्येच अाहे.
- स्वधर्म
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Mon, 04/06/2015 - 11:09
नवीन
व्हायरसमुळे हा प्रॉब्लेम आला असण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण माझ्या माहितीप्रमाणे ऍन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिममध्ये सेल्फ रेप्लिकेट करून जागा खाणारे व्हायरस अजून आले नाहीत.
तुमच्या फोनची इंटर्नल मेमरीच मुळात खूप कमी आहे.
हे ऍप डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.diskusage
या ऍपद्वारे तुम्हाला कळेल नेमकी जागा कशाकशाने व्यापली आहे.
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Mon, 04/06/2015 - 12:48
नवीन
कॅशे क्लिअर केल्यावर, तुंम्ही सांगितलेले अॅप डाउनलोड करू शकलो. लागलीच डिस्क युसेज व व्हाॅटस अॅपही डाउनलोड केले. डिस्क युसेज अाता उपलब्ध मेमरी फक्त ४१ एमबी दाखवत अाहे. तुंम्ही म्हणता तसे माझ्या फोनचे इंटर्नल स्टोरेज कमी अाहे, पण फोन स्टोरेजमध्ये भरपूर जागा दाखवत अाहे - एकूण २ जीबी व उपलब्ध ३०० एमबी. मी ‘डिफाॅल्ट राइट डिस्क’ = फोन स्टोरेज असे सेट करूनही व्हाॅटस अॅप इंटर्नल स्टोरेजमध्येच डाउनलोड झाले अाहे. त्या सेटींगमध्ये ‘मूव्ह टू इंटर्नल स्टोरेज’ हा अाॅप्शन डिसेबल्ड दिसतो. समजा मी एसडी कार्ड घालून मेमरी वाढवली, तर ही अॅप्स तिकडे हलवता येतील काय?
अतिशय उपयुक्त माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
क
के.पी.
Mon, 04/06/2015 - 11:37
नवीन
@स्वधर्म, फॉरमेट करण्याआधी एक काम कराल का?
manage app मधे जाऊन जास्तीत जास्त apps च clear cache आणि clear data करणे , ते झाल्यावर मोबाइल रीस्टार्ट करुन मग एखादं app डाउनलोड होतय का ते बघा.
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Mon, 04/06/2015 - 12:28
नवीन
जमलं. माझी फ्री स्पेस ४१ एमबी वरून ७५ एमबी झाली. मग मी वरी ल डिस्क युसेज चे अॅप व व्हाॅटस अॅप ही डाउनलोड करू शकलो अाहे. जवळजवळ पंधरा दिवस अडकलो होतो राव. मोठीच मदत झाली. खासच धन्यवाद.
- Log in or register to post comments
क
के.पी.
Mon, 04/06/2015 - 17:07
नवीन
अरे व्वा!! :) मस्तच झाल तर.. आणखी एक लक्षात ठेवा कदाचित पुन्हा तुम्हाला असा प्रॉब्लम आलाच आणि हे वरची पद्धत लागू नाही पडली तर अश्यावेळी गूगल प्ले स्टोर चे अपडेट्स uninstall केले तरी चालतं.
बादवे मी सर नाही.... मला ताई म्हटल तरी चालेल ;)
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Fri, 04/10/2015 - 11:11
नवीन
लक्षात राहील. तुंम्ही दिलेल्या टीप्सबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/07/2015 - 17:14
नवीन
प्ले स्टोअरवरुन बाकी अॅप्लीकेशन अपडेट झाल्यावर पुन्हा म्हणु नका की इनसफिशियंट स्पेसचा मेसेज येतोय म्हणुन. :)
हा तात्पुरता विलाज झाला.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर
Mon, 04/06/2015 - 12:26
नवीन
मिपाचे फ्रंट पेज ओपन करताना 200 kb खर्च होत आहेत.डेटा यूज कमी व्हावा यासाठी कोणती सेटिंग बदलावीत?
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Wed, 04/08/2015 - 13:17
नवीन
माझा झोलो (XOLO A500s)फोन रूट करायचा आहे .
गुगल वर शोधून बर्याच लोकांनी "फ्रामारूट" इंस्टाल .
लिंक मध्ये सांगितल्या प्रमाणे सगळं केलं . पण घंटा फरक पडला नाय .
कोणी मदत करेल का
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/09/2015 - 05:05
नवीन
किंग युजर किंवा व्ही रुट हे संगणकावर टाकले जाणारे अॅप्लीकेशन टाका.
डबींग मोड मोबाईल ऑन करुन ठेवा. बाकी प्रोसेस होऊन तो अॅटो रुट होतो.
व्ही रुटचा वर धाग्यात दुवा दिला आहे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
गुरुवार, 04/09/2015 - 08:40
नवीन
फोन चा USB पोर्ट गंडलाय माझा . फक्त चार्ज करतो तो .
फोन वरच इंस्टाल करून रूट करण्यासाठी एखाद APP नाहीये का ?
- Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर
गुरुवार, 04/09/2015 - 11:43
नवीन
मला माझ्या फोनसाठी Lolipop upgrade मीळत आहे.3G नेटवर्क वापरावे कि वाय् फाय् ने अपग्रेड करावे.?सर्विस सेंटरला वॉरंटी पिरीयडमध्ये फ्री अपग्रेड करुन देतात का?
- Log in or register to post comments
स
सुहास झेले
गुरुवार, 04/09/2015 - 21:42
नवीन
वायफाय असेल तर चांगले ... सर्विस सेंटरवाले करून देणार नाही मोस्टली
- Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर
Fri, 04/10/2015 - 11:13
नवीन
थॅन्क्स
- Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर
गुरुवार, 04/09/2015 - 11:43
नवीन
मला माझ्या फोनसाठी Lolipop upgrade मीळत आहे.3G नेटवर्क वापरावे कि वाय् फाय् ने अपग्रेड करावे.?सर्विस सेंटरला वॉरंटी पिरीयडमध्ये फ्री अपग्रेड करुन देतात का?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/19/2015 - 13:52
नवीन
थीम बदलणे, लुक बदलणे असं काही नवीन.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Sun, 04/19/2015 - 16:14
नवीन
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/20/2015 - 14:15
नवीन
इनबिल्ट नै करता येणार का ??? लोंचर पेक्षा इनबिल्ट काही प्रयोग करता आले तर बर असं वाटलं होतं ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Wed, 04/22/2015 - 17:06
नवीन
मग कस्टम रॉम लिहावी लागेल गुरुजी. एके काळी वेळ भरपूर होता, तेव्हा लिहिलीही असती. आजकाल तितका वेळ नाही मिळत..
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/23/2015 - 17:44
नवीन
नोकियाचे फ़र्म्वेअर लै बद्लायचो सिम्बियनला बद्लायचो मजा यायची. एंड्राइडच्या रोमला काहीच खटपट करता येत नै ये...
किंवा आहे ते रोम काढून पिसिवर सेव करून काही बदल करून इंस्टाल तरी करता आलं पाहिजे होतं. एम्केटुल्स मधे मला काहीच समजत नै आणि काही प्रयोगही करता येईना ??
सर फुरसत में मुझे जरुर बताना....तुम्ही तयार केलेली थीम आवडली आणि असा खटपटया माणूस मला आवडतो. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ट
टीपीके
Fri, 04/24/2015 - 14:14
नवीन
तुम्ही डॉक्टर कि इंजिनियर? ह घ्या.
हे कसे करतात?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 04/24/2015 - 16:29
नवीन
गोपाळराव
मी हाच प्रश्न विचारणार होतो आणि थीम पाठवा असे सांगण्याचा मोह सुद्धा झाला पण त्यात काही वापरता आलं नाही आणि फोन बंद झाला तर लफडं होईल म्हणून विचार बदलला. पण थीम लैच भारी आहे.
- Log in or register to post comments
श
श्री
Mon, 04/20/2015 - 17:43
नवीन
ही मराठी थिम कशी काय करतात हो?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 04/20/2015 - 20:38
नवीन
+++१११
लिंक द्या की तिची! दू...दू...दू.. :-/
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Wed, 04/22/2015 - 17:11
नवीन
आत्माराव, ही माझ्यासाठी मीच तयार केलेली कस्टम लाँचर थीम आहे. जालावर उपलब्ध केलेली नाही. त्यामुळे लिंक नाही.
- Log in or register to post comments
श
श्री
Wed, 04/22/2015 - 17:47
नवीन
मग प्लिझ ह्याची झीप फाईल देऊ शकाल का? थीम खुप आवडलीये
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
गुरुवार, 04/23/2015 - 17:34
नवीन
मस्त आहे थिम, जमल्यास मलाही पाठवा झिप फाईल.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 04/24/2015 - 15:55
नवीन
आं............. मग मलाहि पायजेल! :-/
- Log in or register to post comments
श
श्री
Fri, 04/24/2015 - 16:22
नवीन
पण मी पयला हय..
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/23/2015 - 17:46
नवीन
झिप फ़ाइल मलाही द्या. बदल्यात एक सुला वाईन देईन. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- ›
- »