तुमच्या अॅन्ड्रॉईडसाठी...
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती.
असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची.
अॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी)
सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!)
आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम.
१. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट.
२. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते.
३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत.
४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता.
५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता.
६. मराठीत टाईप करण्यासाठी -
अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन
ब) PaniniKeypad Marathi IME
क) AnySoftKeyBoard - Devanagari
ड) Lipikaar Hindi Keyboard Free
मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले.
७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो.
८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता.
९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर.
१०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता.
११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त.
१२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता.
१३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :)
१४. TED - Ideas worth spreading :) :)
बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा.
- सुझे !!
💬 प्रतिसाद
(716)
ज
जोशी 'ले'
Fri, 10/11/2013 - 13:04
नवीन
काढुन टाका ते whatsaap+
ते offical App नाहिये...कदाचित धोकादायक असु शकते हे app
- Log in or register to post comments
द
दिपक
Sat, 10/12/2013 - 04:51
नवीन
official whats app हेच सुरक्षित नाहिये. त्याचे conversation आरामात decrypt करता येते.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/11/2013 - 16:22
नवीन
पण हल्ली चालत नाही राव. तरी एक ट्राय मारुन पाहतो.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/11/2013 - 16:58
नवीन
अहं येरर येतोय. An unexpected error occured forcing C-whatsapp + to stop. please help me. fix this.... इ.इ.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सुधीर
Fri, 10/11/2013 - 11:55
नवीन
कालच लिन्होव्हो टॅब घेतला. किंग्ज सॉफ्टच एम. एस. ऑफिस वापरतोय, आणि अॅक्रोबॅटचं पिडीएफ रिडर चांगली वाटतायत. खास करून अॅक्रोबॅटच्या पिडीएफ रिडर मध्ये वाचलेलं डॉक्युमेंट मध्ये हायलाईट करण्याची सोय आहे. बाकी एव्हरनोट्स वापरायला शिकतोय.
डिजिटी जिटीडी हे जीटीडी वरचं अॅप्स पण चांगलं वाटलं.
- Log in or register to post comments
ज
जोशी 'ले'
Fri, 10/11/2013 - 13:16
नवीन
Check out "Software Data Cable" - https://play.google.com/store/apps/details?id=com.lyy.softdatacable
मोबाईल टु मोबाईल, पिसी टु मोबाईल फाईल्स ट्रांन्सफर करान्यासाठी जबरदस्त app , जितका वेळ ब्ल्यु ट्रुथ ने 3 mb पाठवायला लागतो तितक्या वेळात हे app 300 mb पाठवतो :-) या द्वारे तुम्हि apps सुद्धा शेअर करु शकतात
अट एकच दोन्हि मोबाईल मधे हे app पाहिजे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/11/2013 - 16:41
नवीन
वापरुन पाहतो. पण मला पहिल्याच फटक्यात ते तितकसं युजर फ्रेंडली नाही वाटलं. बहुतेक AirDroid सोपं वाटतं.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 10/11/2013 - 17:44
नवीन
मी माझ्या जुन्या गॅलॅक्सी वाय वरुन आता झोलो क्यु-८०० {Xolo Q800} वर उडी मारली आहे.
आजचे नविन अॅप्स :-
Clean Master (Cleaner) - FREE
नावावरुनच या अॅपचे काम कळते,पण काम देखील एकदी चोख आणि मस्त करते. {Over 20 million user}
================================
Toucher Pro
तुमच्या अॅन्ड्रॉइड फोनसाठी वनटच Assistive touch, सगळी पेजेस चाळत बसण्यापेक्षा जी अॅप सातत्याने वापरली जातात ती यात अॅड केले की झाले. शिवाय बाकीचे सेटिंग्स पण यात अॅड करता येतात.वन टच फोन सुद्धा लॉक करता येतो तो ही साईडबार की न दाबता. याचे साधे व्हर्जन सुद्धा आहे,पण मी प्रो व्हर्जनच वापरत आहे. {हो,चकटफु आहे.}
*फोन बुट /रिस्टार्ट झाल्यावर दरवेळी मॅन्युअली हे अॅप चालु करावे लागते,हीच काय ती यातली त्रुटी जाणवली. बाकी एकदम चोक्कस ! :)
मला ही दोन्ही अॅप्स आवडली,दोन्ही फार कामाची वाटली.
- Log in or register to post comments
स
सुधीर
Sat, 10/12/2013 - 06:25
नवीन
ओटीजी कॉर्ड वापरून युएसबी ड्राइव्ह वरला डेटा अॅक्सेस कुणी केला असेल तर त्याची लिंक मला द्याल का? तसं करता आलं तर एस.डी. कार्डचा खर्च वाचू शकेल.
- Log in or register to post comments
स
सुहास झेले
Sat, 10/12/2013 - 10:06
नवीन
डोंबिवलीच्या श्रीपाद भोसले यांनी दुर्गसह्य़ाद्री या मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ७० किल्ल्यांचे नकाशे उपलब्ध केले आहेत. म्हणावी तितकी माहिती ह्यामध्ये अजूनतरी नाही... बघू पुढे काही बदल होतील अशी अपेक्षा आहे.
दुर्ग सह्याद्री - Durga Sahyadri
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 10/24/2013 - 08:31
नवीन
Kingsoft Office 5.8 (Free)
तुम्हाला जर तुमच्या मोबल्यावर एमएस वर्ड आणि इतर फाईल्स उघडायच्या असतील तर हे झकास आहे. :)
Titanium Backup ★ root
तुम्हाला तुमच्या अॅप्सचा बॅकअप घ्यायचा आहे ? फोनचा बॅकअप घ्यायचा आहे तर हे बेस्ट हाय. :)
*हे अॅप वापरण्यासाठी फोन रुट केलेला हवा.
Drippler - Android Tips & Apps
अॅन्ड्रॉइड मधे नविन काय चालले आहे ? नविन उपयोगी अॅप्स कोणती इ. गोष्टींची माहिती देणारे उपयोगी अॅप. :)
Google Keep
तुम्हाला चेकलिस्ट बनवायची आहे ?व्हॉइस नोट बनावायची आहे मग गुगलबाबाचे हे अॅप तयारच आहे. :)
बीबीएम (BBM)
हो,तेच ब्लॅकबेरीचे मेसेंजर आता अॅन्ड्रॉइडवर दाखल झाले आहे. सध्या रजिस्ट्रेशन जोरात असुन तुमच्या मेलवर कन्फर्मेशन आल्या शिवाय हे सुरु करता येणार नाही. हे मेल यायला सध्या बराच वेळ लागत आहे.
*महत्वाची सुचना :- तुमचा बीबीएम पीन विसरु नका, तो योग्य ठिकाणी नोंदवुन ठेवा.
इस्पेश्यल अॅप :-
बर्याच अॅन्ड्रॉइड धारकांना फोन रुट करायचा असतो.पण त्यासाठी लागणारी पद्धत किंवा एपीके जालावर शोधताना घोळ होउ शकतो. पण या अॅपमुळे फोन वन क्लीक रुट करता येतो. माझा झोलो क्यु ८०० काही सेकंदाच रुट झाला. :)
*** रुट करताना फोनचा डब्बा होउ शकतो,ज्यांची रिस्क घेण्याची तयारी आहे त्यांनीच या एपीकेचा उपयोग करावा.
Framaroot
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sat, 10/26/2013 - 06:54
नवीन
(१)जावा सपॉट आहे/नाही म्हणजे काय ?असल्यास फायदा काय ? (२)GPS /AGPS यापैकी कोणते सिमकाड नसतानाही चालेल ? खास GPS चे गैजेट ट्रेकिंगसाठी वापरतात तसा अॅंडरॉईड फोन उपयोगात आणायचा असल्यास .या गैजेटमध्ये चालू ठेवून रानात भटकतांना पडद्यावर रूटची एक रेष उमटत राहाते .त्याचा उपयोग करून वाट चुकल्यास मूळ जागी तरी येता येते .कोणत्या हैँडसेटमध्ये हे करता येते /येत नाही ते कोणी सांगेल का ?जागेची उंची अल्टिट्युडपण कळते .ग्रेव्हिटि सेंसर हे काम करेल का?
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 10/28/2013 - 06:13
नवीन
जावा सपॉट आहे/नाही म्हणजे काय ?असल्यास फायदा काय ?
Comparison of Java and Android API
GPS /AGPS यापैकी कोणते सिमकाड नसतानाही चालेल ? खास GPS चे गैजेट ट्रेकिंगसाठी वापरतात तसा अॅंडरॉईड फोन उपयोगात आणायचा असल्यास .या गैजेटमध्ये चालू ठेवून रानात भटकतांना पडद्यावर रूटची एक रेष उमटत राहाते .त्याचा उपयोग करून वाट चुकल्यास मूळ जागी तरी येता येते .कोणत्या हैँडसेटमध्ये हे करता येते /येत नाही ते कोणी सांगेल का ?जागेची उंची अल्टिट्युडपण कळते .ग्रेव्हिटि सेंसर हे काम करेल का?
या बद्धल जास्त माहिती नाही, पण सिमकार्ड नसल्यास GPS चालणार नाही असे वाटते.
बाकी GPS Navigation साठी एक चांगले अॅप :- Sygic: GPS Navigation & Maps मी स्वतः हे अॅप अजुन वापरुन पाहिले नाही.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 10/28/2013 - 11:58
नवीन
#मदनबाण ,नोकिआ लुमिआ ६२० हा फोन(विंडोज) वर सेव केलेल्या मैप च्या डिरेकशन रेंज नसतांनाही फक्त जिपिएस देतो असे नोकिआने म्हटले आहे तसे अॅनडरॉईड देईल का ?
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 10/28/2013 - 12:13
नवीन
मदनबाण ,नोकिआ लुमिआ ६२० हा फोन(विंडोज) वर सेव केलेल्या मैप च्या डिरेकशन रेंज नसतांनाही फक्त जिपिएस देतो असे नोकिआने म्हटले आहे तसे अॅनडरॉईड देईल का ?
या माहितीची लिंक द्याल का प्लीज ? नक्की काय पद्धतीने तुमचे लोकेशन फोनला समजते ते माहित करुन घ्यायला आवडेल.नेटवर्क नसताना जीपीएसला अॅक्सेस मिळु शकतो का ? आणि मिळत असेल तर कोणत्या टेक्नोलॉजीमुळे ?
Sygic India: GPS Navigation
यात तुम्ही ऑफलाईन मॅप्स पाहु शकता,पण ते नेव्हीगेटपण करता येतात की नाही या बद्धल साशंक आहे. { हे Works with GPS only, internet is not needed असे त्यांनी म्हंटलेले आहे.}जीपीएस बद्धल अजुन एकही अॅप मी वापरले नसल्याने त्या बद्धल अधीक माहिती नाही. वेळ मिळताच वरील अॅप वापरुन मात्र नक्की पाहिन.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/28/2013 - 12:13
नवीन
फ़ोन फ़ूल रुट करायचे सॊफ्टवेअरचा पत्ता लागला तर सांगा. मला लागलाय पण फ़ोन संपूर्ण रुट होत नै वाटतं. :(
कोणताही अँड्राईड फोन रुट होतो.
दुवा थोड्यावेळाने अपड्वतो.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 10/28/2013 - 12:22
नवीन
सर अहो वरती एका प्रतिसादात दिला हाय की म्या !
परत एकदा देतो :-
Framaroot
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/28/2013 - 12:32
नवीन
माझा लावा इरिस ५०६ क्यु त्या यादीत दिसत नाही.
व्हर्जन ४.२.१ आहे. जमेल का ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 10/28/2013 - 13:26
नवीन
जमण्यास हरकत नसावी.माझ्या फोन चे नाव पण त्या लिस्ट मधे नव्हते बहुधा,पण रुट झाला.
त्या पानावरची लेटेस्ट झीप फाइल डाउनलोड करा आणि त्यातली एपीके रन करा.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 10/29/2013 - 04:43
नवीन
पूर्ण रुट होत नाही. प्रयोग करुन पाहिला आहे. अँड्रॉइड फोनचे फाँट बदलायचा असल्यास कोणते अॅप वापरावे ?
पूर्वी मी माझा फोन रुट असल्यावर फाँट इन्स्टॉलर वापरायचो आता ते चालत नाहीहे. फोन रुट करुनही.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 10/29/2013 - 05:16
नवीन
प्रथम Root Checker वापरुन फोन खरचं रुट झाला आहे का ? ते तपासुन घ्या. फॉन्ट इन्स्टॉलरचा पण प्रॉब्लेम असु शकतो, तेव्हा खालील फॉन्ट इन्स्टॉलर वापरुन पहा:-
iFont(Fonts For Android)
MyFont(Fonts For Android)
अवांतर :- Sygic India: GPS Navigation इनस्टॉल केले,आणि ते आवडले देखील. महाराष्ट्राचा मॅप डाउनलोड मारुन ठेवला आहे,तुमच्या गरजेप्रमाणे देशातल्या कुठल्याही भागाचा / राज्याचा मॅप डाउनलोड करुन ठेवता येतो. नेटवर्क नसताना तसेच जीपीएस नसताना तुम्ही मॅप पाहु शकता.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 10/29/2013 - 05:30
नवीन
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 10/29/2013 - 07:40
नवीन
#मदनबाण .६२०च्या रिव्युची लिँक
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 10/29/2013 - 07:47
नवीन
लिँक http://techradar.com/reviews/phones/mobile-phones/nokia-lumia-620-1117351/review
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 10/29/2013 - 08:09
नवीन
कंजूस महोदय तुम्ही विचारलेल्या जीपीएस वैशिष्ठा बद्धल या रिव्हु लिंक मधे काहीच दिसले नाही.
या बद्धल अधिक इथे मिळेल :-
हेच सर्व तुम्हाला - Sygic India: GPS Navigation करता येईल असे दिसते... मी वरती सांगितल्या प्रमाणे हव्या त्या ठिकाणचा / राज्याचा मॅप डाउनलोड मारावा लागतो जसा मी महाराष्ट्राचा मॅप डाउनलोड मारुन ठेवला आहे.
*** विशेष सुचना :- मॅपची साईझ मोठी असल्या कारणाने तो वायफाय नेटवर्क किंवा ३जी च्या सहाय्यानेच डाउनलोड मारावा.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 10/30/2013 - 00:19
नवीन
#मदनबाण ,मला यामध्ये HERE MAPS बद्दल दिसते आहे की मैप ऑफलाईन डाऊनलोड करता येतात .नंतर त्याठिकाणी गेल्यावर NOKIA DRIVE हे GPS FREE अॅप वापरून ड्रायविँग डिरेक्शन मिळतात .दुसऱ्या एका ठिकाणी (?)हेच वाचले होतं ३जी न वापरता ऑफलाईन मैप सोबत GPS काम करते .
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 10/30/2013 - 04:18
नवीन
#मदनबाण ,मला यामध्ये HERE MAPS बद्दल दिसते आहे की मैप ऑफलाईन डाऊनलोड करता येतात
कुठलेही अॅप / मॅप डाउनलोड करण्यासाठी ऑनलाईन जावेच लागते. एकदाका मॅप डाउनलोड झाला की मग डेटा नेटवर्कची गऱ नाही लागत कारण तो तुमच्या फोनमधे किंवा एसडी कार्ड मधे सेव्ह झालेला असतो.
दुसऱ्या एका ठिकाणी (?)हेच वाचले होतं ३जी न वापरता ऑफलाईन मैप सोबत GPS काम करते .
परत तेच ! मॅक डाउनलोड करण्यासाठी किंवा त्या अॅपचा अपडेट घेण्यासाठीच फक्त नेटवर्क लागते ! इतरवेळी त्याची गरज नाही. मी जे अॅन्ड्रॉइड अॅप दिले आहे ते नोकिया अॅप प्रमाणेच चालते असे दिसते.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 10/30/2013 - 11:11
नवीन
Ndtv gadets च्या http://gadgets.ndtv.com/mobiles/reviews/nokia-lumia-620-review-343837 रिव्युमध्ये "HERE DRIVE application offers offline turn by turn diretions" असे म्हटले आहे ,
- Log in or register to post comments
स
सुधीर
Fri, 11/01/2013 - 11:42
नवीन
Framaroot लिनोव्हो आयडीया ए१००० वर तरी नाही चाललं. :(
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 11/01/2013 - 23:28
नवीन
गुगलची ओएस चांगली असली तरी फोन बनवणाऱ्या कंपन्या त्यामध्ये बरीच काटछाट करून आपला माल भरतात .ब्रैंडेड टैबलेट (आइडिआ ,रिलाअन्स वगैरे )यात ऑपरेटर कंपन्याही आणखी कापतात .वस्तु वापरायला घेतली कि कळते किती कापले आहे .
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/27/2013 - 04:47
नवीन
अॅन्ड्रॉईडसाठी काही नवीन भन्नाट अॅप्लीकेशन्स वगैरे काही आलंय का ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ख
खबो जाप
Wed, 11/27/2013 - 07:44
नवीन
https://play.google.com/store/apps/details?id=com.eterno
हे वापरून बघितलं का ?
भन्नाट नाही पण भारतातील सगळ्या भाषेतली वर्तमानपत्रे उपलब्ध आहेत.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/21/2013 - 09:51
नवीन
How to Disable SMS to MMS Conversion एसेमेस करतांना मोठा एसेमेस असला तर अॅड्राइडवर तो आपोआप एमएमस होतो ? याच्यावर काही उपाय आहे का ?
8sms (Stock Messaging, KitKat) हा उपाय आहे पण एकाच हँडसेट मधे दोन वेळेस मेसेज पाहतांना बोर होतं. काही उपाय आहे का कोणाकडे ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ज
जोशी 'ले'
Sat, 12/21/2013 - 12:15
नवीन
सेटींग > मॅनेज अॅप > आॅल > मेसेजिंग मधे जाऊन शो नोटिफीकेशन वर अनचेक करा ...डिफाॅल्ट मेसेजींग चे नोटिफिकेशन आॅफ होईल :-)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/21/2013 - 15:30
नवीन
दोन मेसेजेस दिसत होते ते मात्र बंद झाले. आभार.......!!! :)
बाकी, मुख्य बग कसा सोडवावा बॉ त्यावर काही मदत करता आली तर करा राव.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ज
जोशी 'ले'
Sat, 12/21/2013 - 16:10
नवीन
मुळात हा बग नाहिचये :-) हे रिस्ट्रिक्शन सर्विस प्रोव्हायडर चे आहे, cdma मधे 70 कॅरेक्टर चे लिमिट आहे, कदाचित रुटिंग करुन 'बग' टाकुन एक्सपर्टस हा प्राॅब्लम करु शकतील :-)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/22/2013 - 07:06
नवीन
>>> हे रिस्ट्रिक्शन सर्विस प्रोव्हायडर चे आहे, cdma मधे 70 कॅरेक्टर चे लिमिट आहे
हे बरोबर आहे. पण, तीन मेसेज झाले म्हणजे ते अॅटोमॅटीक MMS होते. खरं तर रुट एक्सप्लोररने css फाईल कोणत्या तरी ठिकाणी true चे false करायचे आहे. पण, मला ते तपशिलवार नै म्हैती. मी केलं असतं पण माझ्या फोनला वरच्या वर काड्या केल्यामुळे फोन मेला की चाललो की सर्वीस सेंटरला. सर्वीस सेंटरवाला आता म्हणतो सर आपकेही फोन को कैसा प्रॉब्लेम आता समज मे नही आता. त्यामुळे मी जरा गप्प बसायचे ठरविले आहे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सत्याचे प्रयोग
Sat, 12/21/2013 - 11:28
नवीन
सध्याचे नवं वर्जन तर कीटकॅट आहे ना , काजुकतली नाही बायदवे
अड्राईड वडापाव वर्जन कसे वाटेल
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Sat, 12/21/2013 - 15:29
नवीन
गोडाचा वडापाव काढा तुम्ही, मग W वर व्हर्जन आली, की विचार करू.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sun, 12/22/2013 - 05:11
नवीन
सध्या Sophos Antivirus and Security वापरतोय... याचा वापर करुन फोन एनक्रीप्ट केला.त्याच बरोवर Sophos Mobile Encryption वापरुन गुगल ड्राइव्ह कनेकट करुन सिक्युअर केला.
जाता जाता :- सध्या लेटेस्ट काय म्हणाल तर...
hike messenger ची हवा तयार केली जात आहे असे म्हणीन.
- Log in or register to post comments
स
सॅगी
Sun, 12/22/2013 - 10:37
नवीन
ब्लॅकबेरी मेसेंजर (BBM for android) वापरता का कुणी?
बॅटरी आणि मेमरी दोन्ही खुप खातो म्हणतात....तुम्हा सर्वांचा अनुभव काय आहे?
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 12/23/2013 - 07:20
नवीन
ब्लॅकबेरी मेसेंजर (BBM for android) वापरता का कुणी?
ट्राय मारले होते,एकदमच डब्बा वाटल्याने लगेचच काढुन टाकले.
बॅटरी आणि मेमरी दोन्ही खुप खातो म्हणतात....तुम्हा सर्वांचा अनुभव काय आहे?
माझ्या व्यक्तिगत अनुभवानुसार मेमरी खातो... बॅटरीचा सांगता येत नाही, मला वाटत तितका वेळ सुद्धा बीबीएमला माझ्या मोबल्यात मी दिला नाही.
- Log in or register to post comments
म
मिनेश
Mon, 12/23/2013 - 09:03
नवीन
WECHAT & LINE हे दोन अॅप्स सध्या भरपुर कार्यक्रमांना sponcer करत असतात. या अॅप्स चा INCOME SOURCE काय असेल की एवढे पैसे मार्केट मध्ये ओतणे यांना परवडत असेल??
- Log in or register to post comments
आ
आवडाबाई
Tue, 12/24/2013 - 08:06
नवीन
मी माझ्या काही कोन्टॅक्ट्सना रिंग टोन सेट केला होता जो डिफॉल्ट रिंगटोन पेक्षा वेगळा होता. आता मला असे सर्व कॉन्टॅक्ट्सना एकच - डिफॉल्ट रिंगटोन - द्यायचा आहे, हे कसे करता येइल? नक्की कुणाकुणाचे वेगळे आहेत हे कसे शोधावे ?
i have "Me" as a contact in my address book, i tried to set ringtone there but that did not change all these ring tones that i had tampered with previously
फोन - मायक्रोमाक्स canvas A110 jellybean
- Log in or register to post comments
स
सॅगी
Tue, 12/24/2013 - 17:40
नवीन
NSE MOBILE - राष्ट्रीय शेअर बाजाराचे अधिकृत अॅप. समभागांच्या किमती लाईव्ह
स्ट्रीम होतात. २जी वर ही उत्तम काम करते.
Moneycontrol.com - moneycontrol.com चे अधिकृत अॅप.
तुमचा पोर्टफोलिओ moneycontrol.com वर असल्यास कुठुनही पाहता येतो. अर्थविषयक बातम्या पाहता येतात. CNBC TV18 आणि CNBC आवाज या चॅनेल्स चे लाईव्ह स्ट्रिमींगही पाहता येते (३जी किंवा वाय-फाय आवश्यक).
- Log in or register to post comments
ज
जोशी 'ले'
Fri, 01/03/2014 - 13:15
नवीन
इंजिनीयर लोकांसाठी... dwg / dxf files viewer
फक्त 830 Kb चे हे साॅफ्टवेअर भलतच कामाचं, यात तुम्हि Autocad च्या फाईल्स offline सुद्घा बघु शकतात ज्या तुमच्या मेमरी कार्ड मधे स्टोर्स असतील... जी सुविधा offical autodesk च्या Autocad 360 मधे नाहि
"SchemataCAD viewer DWG/DXF"
https://play.google.com/store/apps/details?id=com.elmer.SchemataCAD_viewer
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 01/04/2014 - 03:35
नवीन
अरे कोणी क्रुड स्केचिंग साठी एखादी अॅप सांगा ना , म्हणजे अगदी आपलं फिंगर पेंटींग असते तसे स्केचिंग (स्ट्रेस बस्टर) म्हणुन ! बघा काही मदत आपण करु शकत असल्यास :)
- Log in or register to post comments
स
सुहास झेले
Sat, 02/22/2014 - 14:16
नवीन
हे वापरून बघ...
Autodesk SketchBook Mobile
- Log in or register to post comments
द
देव मासा
Tue, 01/07/2014 - 22:08
नवीन
यंदा कालनिर्णय ने त्यांचे ऍप्लिकेशन मोफत देउ केले आहे, सईजला जरा जास्त आहे १५ एमबी , मराठी कालनिर्णयला तेवढी जागा दिली तर काय हरकत आहे , वापरायला अगदी स्मुथ आहे ,अगदी भिंती वरच्या कालनिर्णय सारखा आहे, पंचांग सकट , Reminderchi सोय आहे
height="200" alt="1" />
https://play.google.com/store/apps/details?id=com.kalnirnay.kalnirnay
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 01/08/2014 - 10:53
नवीन
धन्यवाद गॉड फिश... डाउनलोडवले आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »