Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी...

स
सुहास झेले
Fri, 11/23/2012 - 12:00
🗣 716 प्रतिसाद
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती. असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची. अ‍ॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी) सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!) आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम. १. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट. २. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते. ३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत. ४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता. ५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता. ६. मराठीत टाईप करण्यासाठी - अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन ब) PaniniKeypad Marathi IME क) AnySoftKeyBoard - Devanagari ड) Lipikaar Hindi Keyboard Free मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले. ७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो. ८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता. ९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर. १०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता. ११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त. १२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता. १३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :) १४. TED - Ideas worth spreading :) :) बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा. - सुझे !!

प्रतिक्रिया द्या
447147 वाचन

💬 प्रतिसाद (716)
म
मालोजीराव Tue, 03/26/2013 - 14:51 नवीन
आपल्याला जर या कस्टम रॉम बद्धल ठावुक असेल तर या धाग्यावर जरुर लिहा
मालक प्रत्येक मोबाईल च्या रॉम वेगळ्या असतात तुमचा मोबाईल चा ब्रान्ड आणि मॉडेल कंचा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 03/26/2013 - 15:23 नवीन
कष्टम रोमला मी इच्छूक. पहिलं माझं नाव घ्या. माझा फोन मॉडेल LAVA N400 Android version 4.0.4 Based version - MAUI.11AMD.W11.50.SP.V13.P2 KERNEL VERSION 3.0.13 स्टेबल असलेली रॉम सुचवावी. वर काही माहितीही द्यावी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
म
मदनबाण Tue, 03/26/2013 - 15:40 नवीन
सॅमसंग गॅलेक्सी वाय GT-S5360 Android Version:- 2.3.6
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मालोजीराव गुरुवार, 03/28/2013 - 14:15 नवीन
तुमच्यासाठी remix-v2 हि एक झक्कास रॉम आहे, बिरुटे सर तुमच्या लावा मोबाईल साठी अद्याप रॉम उपलब्ध झाली नाही :( 'लावा' च जुळ भावंड भेटला तर त्याची रॉम चालू शकेल जशी मी कॅनव्हास ला Mobistel Cynus T2 या जर्मन जुळ्या भावंडाची रॉम वापरली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/28/2013 - 14:46 नवीन
>>>तुमच्यासाठी remix-v2 हि एक झक्कास रॉम आहे, धन्स. लग्गेच लागतो कामाला. >>>तुमच्या लावा मोबाईल साठी अद्याप रॉम उपलब्ध झाली नाही :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/28/2013 - 15:35 नवीन
सिग्नेचर व्हेरीफाय फेल्ड येतंय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
म
मालोजीराव गुरुवार, 03/28/2013 - 16:10 नवीन
सर remix-v2 मदनबाण साठी आहे ! तुमच्या लावा च जुळ भावंड शोधाव लागेल जे लय फ़ेमस आहे… म्हणजे त्याची रॉम तुम्हाला चालवता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/28/2013 - 16:32 नवीन
ok तरी मला वाटत होतं चित्र जी दिसत होती ती लहान होती. माझ्या मोबिसाठी सेम चालणारी रोम मिळाली तर लिहायला विसरु नका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
न
नानबा गुरुवार, 03/28/2013 - 08:12 नवीन
मी पण कस्ट्म रॉमसाठी प्रचंड इच्छुक. मला बी थोडं सांगा.. सॅमसंग गॅलेक्सी वाय प्रो Model number : GT-B5512 Android Version : 2.3.6 Baseband Version : B5512DDLG1 Kernel Version : 2.6.35.7 dpi@DELL154 #1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
म
मदनबाण गुरुवार, 03/28/2013 - 18:24 नवीन
तुमच्यासाठी remix-v2 हि एक झक्कास रॉम आहे ठांकु. पण एक समस्या आहे cwm च्या रिकव्हरी सेटअप मधे माझ्या मॉडेलचे नाव दिसत नाही,मग मी cwm फ्लॅश कसे मारणार ? जर cwm माझ्या मोबल्यात फ्लॅश झाला तरच कस्टम रॉम फ्लॅश मारण्याचा विचार करेन. यावर काय उपाय आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा
म
मदनबाण Sun, 03/31/2013 - 15:54 नवीन
XDA फोरम वरुन CWM चा जुगाड केला,CWM फ्लॅश मारले,फोनचा बॅकपण घेतला.remix-v2 डाउनलोड मारले,त्याचा अपडेट पण डाउमलोड केला. इतक सर्व केल्या नंतर लक्षात आले की XDA फोरमवर जिथे CWM डाउनलोड ला दिले होतते तिथे असेही लिहले होते की समजा फ्लॅश मारताना काही झोल झाला तर बॅकअपचा पर्याय निवडु नका,कारण त्या नंतर फोन सॉफ्टब्रीक स्टेटस मधे जाईल कारण फोरमवरचे CWM तितकेसे स्टेबल नाही.:( त्यामुळे सध्या कस्टम रॉमचा नाद सोडुन दिला आहे. नविन फॉट जालावरुन डाउनलोड केले आहेत,त्यातल्या त्यात काही तरी फोनवर बदल्याचे समाधान ! ;) http://www.galaxyyarchive.info/2012/06/7-new-fonts.html (गॅलेक्सी वाय साठी फॉन्ट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अँग्री बर्ड Sat, 11/24/2012 - 05:39 नवीन
Advanced Task Killer : चालू असलेली अ‍ॅप किल करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो, काहीवेळा अ‍ॅप आपल्याला गंडीवते आणि मोबाईल हॅंगतो तेव्हा सरळ होम वर क्लिक करून डेस्कस्टोप ला यायचे आणि ह्याचा आयकॉन तिथे ठेऊन द्यायचा, एक क्लिक झाला कि काम तमाम. File Manager : एक अतिशय उपयुक्त फाईल मॅनेजर : ह्यात फाईल मॅनिप्युलेशन एकदम व्यवस्थित होतेच, रार फाईल्स अनरार करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो, शिवाय ह्यातून drop-box, Google drive, SkyDrive, LAN connection साठी पूल बनवता येतो. App2SD : ह्याचा उपयोग काय तर वर किसन भाऊंनी म्हटल्याप्रमाणे " हे अ‍ॅप डाऊनलोड होताना बायडिफॉल्ट फोन मेमरीमध्ये जातात आणि त्याने फोनची इंटरनल मेमरी कमी होते व त्याचा ऑपरेटींग सिस्टमवर परिणाम होतो." तर अश्यावेळी हे अ‍ॅप कामाला येते, ह्यातून इंटर्नल मेमरीमधली बहुंतांशी अ‍ॅप्स मेमरी कार्डमध्ये हलवता येतात. MX player : जबरी व्हीडीओ प्लेयर. सहा महिन्यांची विश्वसनीय परंपरा : almost सगळ्या फाईल फॉर्म्याट सपोर्ट करतो. अरे बघताय काय डाऊनलोड करा. Paytm : आजघडीचे मोबाईल रिचार्जसाठीचे विश्वसनीय आणि किचकट नसलेले दर्जेदार अ‍ॅप. Current Caller ID : ह्याच्या कॉलर आयडी वर अजिबात विश्वास ठेवता उपयोगाचा नाही, काहीच्याकाही लोकेशन दाखवतो. पण त्यात एक चांगली गोष्ट आहे म्हणजे एखाद्याचा फोन आला आणि त्याने ह्यापूर्वी फोन केलेला असेल तर तिथे स्टेटस दाखवतो, कि 15 minutes ago, 1 hour ago वगैरे वगैरे, मग तेव्हा अंदाज बांधता येतो कि फोन उचलायचा कि नाही, त्याशिवाय तो फोन मधून कॉल किती गेले, किती आले, कोणाला केले, कोणाचे आले, मेसेज इत्यादींचा छान पाय चार्ट काढून दाखवतो. गेम बद्दल म्हणत असाल तर मला आवडणारे गेम्स : Airport XP free, Stickman base, stick cricket, mouse, Air control Lite, Glow Hockey, Rope'n'FLy 3, Bridge Architect, Stick Tennis. बाकी माझ्याकडे Sony Xperia Mini Pro SK17i हा मोबाईल आहे. :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 11/24/2012 - 05:52 नवीन
धन्स रे सुझे, माहितीपूर्ण लेख. मी वापरत असलेली काही अ‍ॅप्स १) आयएमओ मेसेंजरः या एकाच अ‍ॅपवरून एकाच वेळी बहुतेक सर्व मेसेंजर अ‍ॅप्लिकेशन्स वापरता येतात. २) कन्वर्ट पॅड: बहुतेक सर्व एकके यात कन्वर्ट करता येतात ३) एव्हरनोट: सिंक्रोनाईझ्ड नोट्ससाठी उत्कृष्ट अ‍ॅप ४) विकीपेडिया: विकीपेडीयाच्या वेगवान अ‍ॅक्सेससाठी उपयुक्त ५) एमएक्स प्लेयर अ‍ॅन्ड्रॉइडवराचा सर्वोत्तम व्हिडियो प्लेयर ६) पीएनआर स्टॅटस अ‍ॅन्ड ट्रेन: पीएनआर स्टॅटस तपासण्यासाठी उपयुक्त ७) स्विस आर्मी नाईफः अनेक उपयुक्त अ‍ॅप्सचा एकत्रित संच याशिवाय गेम्स मध्ये अँग्री बर्डसचे सर्व व्हर्जन्स लेटॅस्ट अँग्री बर्डस-स्टारवॉर्स सहित, स्टिकमन गोल्फ, स्टिक क्रिकेट, स्टिक टेनिस, पूल मेनिया, बीएमएक्स बॉय, स्केटर बॉय हे गेम्स लै भारी. मोशन सेन्सर गेमिंगसाठी बाईक रेस हा गेम मस्त आहे. ब्राउझर मध्ये डॉल्फिन एचडी आणि युसी फास्ट आहेत तर ए-बुक वाचण्यासाठी किंडल अ‍ॅप मस्त आहे. मी सॅमसंगचा गॅलेक्सी एस प्लस वापरतो.
  • Log in or register to post comments
प
पप्पु अंकल Sat, 11/24/2012 - 07:20 नवीन
अतिशय महितीपुर्ण लेख आणि प्रतिसाद देखिल महितीपुर्ण. धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्रशांत हेबारे Sat, 11/24/2012 - 07:29 नवीन
ऍपल फोन बद्दल पण माहिती सांगा. अताच नवीन घेतलाय.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sat, 11/24/2012 - 07:41 नवीन
फिनॅनसिस्टो हे माझे सर्वात आवडते अ‍ॅप आहे. पण ते अ‍ॅप एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. - (फिनॅन्स सॅव्ही)सोकाजी
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 11/24/2012 - 07:49 नवीन
स्मार्ट मेझर अ‍ॅपल शुट चेस वन टच ड्रॉइंग स्मार्ट कंपास ट्रॅक माय ट्रेन
  • Log in or register to post comments
च
चिर्कुट Sat, 11/24/2012 - 07:59 नवीन
मोबाईल ही आता गरज राहिलेली नसून ते एक व्यसन झालय... :) एवढी अ‍ॅप्स का काय वापरणे आम्च्या बालबुद्धीला झेपणारे नसल्याने आम्ही MicroMax X256 हा फोने वापर्तो (फकस्त फोन/समस करणे-घेणेसाठी आणि गाणी वाजवण्यासाठी) :P - चिर्कुट
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Sat, 11/24/2012 - 08:12 नवीन
cam scanner-काढलेले फोटो पी डी एफ मध्ये सहजपणे convert करते आणि कॉन्ट्रास वगैरे गोष्टी text साठी सुटेबल बनवते,१०-१५ पाने स्केन करण्यापेक्षा फोटो काढायचे ,पी डी एफ बनवणे सोपे पडते, addi-and addi plot mobile matlab ग्राफ पण प्लॉट होतात,मोठ्या गणितांना वेळ घेते पण चांगलाय, एम फाईल्स डायरेक्ट रन होतात.मला आवडल,भरपूर इंगीनिअरिंग ऍपस् पण आहेत आवडी नुसार शोधावी. TFTPad या ऍप वर कटिया,सॉलिड वर्क्स वगैरे वर केलेली ३ डी drawings बघता येतात GPS speedometer speedview-जी पी एस वापरून आपला वेग सांगते,प्रवासात चांगला टाईम पास आहे , photowrap , face changer -फोटोवर मस्त प्रोसेसिंग करता येते,याच टाईपचे फोटोला भुताळी बनवणारे पण एक ऍप आहे , चिडके पक्षिगण अर्थात angry birds बोलायलाच नको ,प्रचंड लोकप्रिय खेळ आहे unicorn dash,talking cat,NFS most wanted मध्ये असे ऐकले होते की MAP डाउनलोड करायचा ,जी पी एस वर पोझिशन इंटरनेटशिवाय दिसते,सध्या जे गुगल माप्स वापरतो ते नेट शिवाय चालत नाहीत, कोणी तसे केलंय का???
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 01/01/2013 - 03:25 नवीन
नोकिया एन ९०० वर एक अ‍ॅप: मोबाईल मॅप्स-९ वापरतोय. मॅप्स एकदमच डाउनलोडवलेत. आता इंटरनेट शिवाय पण जीपीएस चालतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर
प
पैसा Sat, 11/24/2012 - 11:31 नवीन
मस्त धागा! मी बरेच अ‍ॅप्प्स चालवून बघते आणि मग काढून टाकते. कायम ठेवलेली म्हणजे मिसळपाव, फेसबुक आणि गुगलची सगळीच. सुझेला गुगलचं ब्लॉगर पण उपयोगी आहे!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 11/25/2012 - 10:47 नवीन
माहितीपूर्ण लेख, वाचनखूण साठवते, स्वाती
  • Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 11/26/2012 - 04:56 नवीन
सध्या झक मारुन सॅमसंग जीटी -एस ५५७० ह्या जुन्या गाढवावर जिंजरब्रेडच ओझं टाकलयं.. पण सारखं सारखं मरतयं. आता एकतर ओएस डाऊनग्रेड करीन किंवा नविन फोन घेईन.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 11/26/2012 - 13:08 नवीन
हे नसते धंदे तुला कोणी करायला सांगितले होते!! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
प
पिंगू Tue, 11/27/2012 - 05:01 नवीन
मी जरा जास्तच प्रयोगशील आहे.. :D - पिंगू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सुहास झेले Tue, 11/27/2012 - 07:03 नवीन
मेहनती गाढव... :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
५
५० फक्त Mon, 11/26/2012 - 08:24 नवीन
अँड्रॉइडच्या दोन व्हर्जनमध्ये नक्की काय फरक जाणवतो हे कुणी समजावु सांगेल काय ?
  • Log in or register to post comments
अ
अँग्री बर्ड Mon, 11/26/2012 - 09:02 नवीन
applications, widgets, support, application integrity, stability, features, support, enhancement and improvement into default apps, including widget, camera, calendar etc.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
अ
अँग्री बर्ड Mon, 11/26/2012 - 09:40 नवीन
२०१० च्या शेवटच्या महिन्यात Gingerbread २.३ आले, त्यानंतर २१ सप्टेंबर २०११ ला त्यांनी Gingerbread फ्यामिलीमधले २.३.७ हे शेवटचे व्हर्जन काढले. Gingerbread व्हर्जन पासून android मधे video call support सुरु झाला. Video Support बरोबरच copy paste functionality, VoIP support मधे improvement आणली। त्यानंतर सगळ्याच मोबाईल मध्ये Android तेवढ्याच smoothly चालले नाही, Samsung च्या काही मोबाइलमधे compatibility issue आले होते, तेहि दोष पुढच्या सुधारित आवृत्तीत काढून टाकण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी 2011 मध्ये आलेल्या Honeycomb 3.0 मध्ये WiFi,android market , display mode मध्ये सुधारणा केली। माझ्या मते Honeycomb पासून dock support चांगला मिळू लागला . ह्यापुढे Ice Cream Sandwich 4.0 मध्ये widget style, hardware acceleration, camera functionality, social streaming, Facebook enhancement आणि भरपूर गोष्टींची भर घातली गेली।
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 11/26/2012 - 11:13 नवीन
माझा सोनी एरिक्सन एक्स्पीरिया मिनी प्रो हा फोन हळूहळू मधेच ब्लँक व्हायला सुरुवात झाली होती. मग हे प्रमाण वाढलं. ब्लँक झाला की पॉवर बटणानेही रीसेट होत नाही. वेगळाल्या साईटसवर दिलेल्या उपायानुसार व्हॉल्युम अप बटण आणि पॉवर बटण एकत्र दाबून ठेवलं. तरी नुसता व्हायब्रेट होतो पण स्क्रीन ढिम्म. थेट बॅटरी डिसकनेक्ट करुन परत जोडणे हा उपायच करावा लागायचा तेव्हा पुन्हा स्टार्ट व्हायचा. आता तेही होत नाहीये. कालपासून अजिबातच स्टार्ट होत नाहीये. बॅटरी व्यवस्थित चार्ज झालेली होती. डेटाकार्डमधे प्रॉब्लेम असेल म्हणून तेही काढून ठेवलं आहे. काय करावं हे कोणी सांगेल का? सोनीचं सर्व्हिस सेंटर शोधून तिथे जाणं हे तर झालंच पण काही घरगुती उपाय नाही का? :(
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Mon, 11/26/2012 - 11:22 नवीन
उपाय१: बॅटरी काढून साधारण १० मिनिटानी परत घालून बघावी. ढेकणा मूळे टांगला गेला असेल तर तात्पूरता दुरुस्त होईल. उपाय२: बॅटरी काढून हँडसेटच्या धातूच्या पट्ट्या (न वापरेली इयर बड आयसोप्रोपाइल अल्कोहोल, पेट्रोल, रॉकेल किंवा तत्सम सुलोचना मध्ये बुडवून) स्वच्छ करा. -(टेप-टीवी दुरुस्त करणारा) दादा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Mon, 11/26/2012 - 13:35 नवीन
उपाय एक करुन पाहिला. दहा मिनिटांऐवजी अर्धा तास दिला. फोन नुसता गरम होतो आहे. उपाय क्र> दोन करुन पाहीन. बहुधा पोपट मेला आहे हे स्पष्ट मान्य करायला लागेल.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके
द
दादा कोंडके Mon, 11/26/2012 - 14:31 नवीन
उपाय एक करुन पाहिला. दहा मिनिटांऐवजी अर्धा तास दिला. फोन नुसता गरम होतो आहे.
मग दुसरा उपाय करायची गरज नाही. बॅटरीशी धूळीमुळे-ऑक्साइड्स वगैरे मुळे कनेक्शन नीट होत नाही. पण फोन गरम होतो म्हणजे कनेक्शन ओके आहे. पोपट कदाचीत मेला नसेल पण हल्ली पोपटावर उपचार करण्यापेक्षा नविनन पोपट (हा लागलला मिठू-मिठू बोलायला) घेतलेला बरा पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
अ
अँग्री बर्ड Mon, 11/26/2012 - 11:36 नवीन
पहिल्यांदा होम स्क्रीन मग व्होल्युम बटन आणि लगेच पॉवर बटन अश्या क्रमाने दाबुन धरा . रिलीज़ करू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Mon, 11/26/2012 - 13:33 नवीन
हा उपाय केला. पण फोनने एक गूढ मंद स्मितासारखा जांभळट प्रकाश स्क्रीनमधून दाखवला आणि दोनतीन क्षणात तेही हास्य लोपलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अँग्री बर्ड
५
५० फक्त Mon, 11/26/2012 - 14:05 नवीन
गूढ मंद स्मिता - नविन टं*निका काय हो गविसो.?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
संपत Mon, 11/26/2012 - 11:44 नवीन
ह्यात दिलेल्या टिप्स वापरुन बघा.. http://timesofindia.indiatimes.com/tech/itslideshow/17349273.cms
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 11/26/2012 - 12:27 नवीन
करुन झाले की काही दिवसांनी नवा फोन घ्या . ;)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 11/26/2012 - 12:41 नवीन
आणि ते काही दिवस जुन्या साथीदारांबरोबर काढा, सिंबियन, वाडा, विंडो वगैरे. बायको पोरं माहेरी गेल्यावर जुने मित्र आठवतात ना तसं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
स
सन्कु Tue, 11/27/2012 - 07:32 नवीन
माझे ही काही आवडते apps Book my Show nexGTv - फ्री Mobile TV, Live TV. Kharmure Online Marathi Blog
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/26/2012 - 11:49 नवीन
सिंबियन प्रणालीकडून अ‍ॅन्ड्रॉईडकडे जातांना दु:ख होतंय. अ‍ॅन्ड्रॉईड आइसक्रिम सँडविच ऑसि. असलेला एक ट्रायल बेसवर लाव्हाचा एन४०० फोन घेतला आहे. चांगला परवडला असे वाटते. एकेक अ‍ॅप्लीकेशन्स टाकून पाहात आहे. लिपिकार मराठी लिहिण्यासाठी चांगले अ‍ॅप्लिकेशन्स दिसत आहे. धाग्याचं महत्त्व आत्ता आणखी जाणवत आहे. धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अशोक पतिल Wed, 12/26/2012 - 13:11 नवीन
सिंबियन प्रणाली हि टच मोबाइलची माता, परंतू कानामागून येवून तिखट झाल्या अ‍ॅन्ड्रॉईड व आय ओ यस. विन्डोज ७.५ / ८ हि नविन प्रणालीही चागंली वाटते आहे . तरीही एक सागांवेशे वाटते कि नोकिया, samsung, LG, HTC इत्यादी ब्रांडस हार्डवेअरच्या ( थोडे महाग असलेतरी ..) बाबतीत चांगले आहेत. स्वस्त ब्रांडसचे फोनवर काही अ‍ॅप्लीकेशन्स रन होत नाहित.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 12/26/2012 - 13:29 नवीन
धागा वर आलेला पाहुन यात अजुन भर टाकण्याचा विचार आला,म्हणुन हे टंकन कष्ट घेतो. मी टाकलेले नविन अ‍ॅप्स इथे देत आहे. १) Avira USSD Exploit Blocker :-- अधिक माहिती इथे मिळेल. २)Google Authenticator:--- मध्यंतरी मला माझे जी-मेल हॅक झाल्याचा संशय आला होता. मग यावर कोणता उपाय करावा यासाठी जालावर वाचन केले...त्यातुन Google Authenticator बद्धल कळले. मग लगेच ही सुरक्षा पद्धत अमलात आणली. :)(यावर एक लेख लिहण्याचा विचार मनात डोकावला होता...पण सध्या तेव्हढा वेळ नाही.) वाचकांसाठी काही दुवे:--- http://support.google.com/accounts/bin/answer.py?hl=en&answer=180744 http://www.mattcutts.com/blog/google-two-step-authentication/ http://www.zdnet.com/how-to-use-google-two-factor-authentication-7000002345/ हा पर्याय चालु केल्यावर जी-टॉकवर तुमचा जी-मेल पासवर्ड चालणार नाही,त्यासाठी अ‍ॅप्लिकेशन स्पेसिफिक पासवर्ड द्यावा लागेल. तुम्ही जर जी-मेल वापरत असाल आणि तुम्हाला त्याची सुरक्षा अजुन वाढवायची असेल शिवाय तुमच्याकडे अ‍ॅन्ड्रॉइड प्रणालीवाला फोन असेल तर नक्की हा पर्याय ट्राय मारुन पहा. ३)Compass :--- नावा वरुनच या अ‍ॅपचा उद्देश कळला असेल्,दिशा ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो.पण हे अ‍ॅप नक्की कसे चालते ते मला कळले नाही. ४)Sirens and Horns :--- हे आपले असेच उगाच इन्स्टॉल केले आहे.वेगवेगळे सायरन आणि हॉर्न यांचे आवाज यात आहेत. दुवा:--- https://play.google.com/store/apps/details?id=com.rayg.sirens&feature=search_result#?t=W10. ५)Swami Vivekananda Quotes :--- मागच्या वेळी हे अ‍ॅप सांगायचे विसरलो होतो. स्वामीजींचे Quotes वाचण्यासाठी एक सुंदर अ‍ॅप. दुवा :--- https://play.google.com/store/apps/details?id=com.arkay.swamivivekananada&feature=search_result#?t=W10. जाता जाता :--- स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 January 1863 या दिवशी झाला. पुढचे वर्ष (२०१३) हे स्वामींच्या १५० जयंतीचे वर्ष आहे. वाचकांसाठी एक दुवा :--- http://www.vivekananda150jayanti.org/
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Sun, 01/06/2013 - 08:09 नवीन
कंपास, मेटल डिटेक्टर इ. अ‍ॅप्स आहेत, व ती रन होण्यासाठी एक मॅग्नेटिक सेन्सर नामक हार्डवेअर तुमच्या फोन मधे असणे गरजेचे आहे. वर कुणितरी म्हटले आहे की स्वस्त फोन वर सगळी अ‍ॅप्स रन होत नाहीत. त्याचे कारण हेच. उदा. मायक्रोमॅक्स ए११० फोन मधे फक्त ग्रॅविटी सेन्सर आहे. इतर नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
न
नांदेडीअन गुरुवार, 12/27/2012 - 08:29 नवीन
सगळ्यात अगोदर AndroidLost इन्स्टॉल करा. लय जब्राट ऍप हाय बगा. https://play.google.com/store/apps/details?id=com.androidlost&hl=en YouTube वर व्हिडिओ बघा या ऍपचे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/30/2012 - 06:14 नवीन
मोबाईलच्या स्वीचला (बटनाला) क्लीक न करता स्क्रीन लॉक आणि अनलॉकचं अ‍ॅप्लीकेशन आहे का एखादं कोणाच्या पाहण्यात ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 10/07/2013 - 12:44 नवीन
मोबाईलच्या स्वीचला (बटनाला) क्लीक न करता स्क्रीन लॉक आणि अनलॉकचं अ‍ॅप्लीकेशन आहे का एखादं कोणाच्या पाहण्यात ? आहे . मी सध्या Micromax H. D. A११६ Android ४. १. २ हा फोन वापरत आहे. त्या मध्ये फोन lock ला ओपन (unclock) करण्यासाठी तुम्ही तुमचा चेहरा दिसला कि मग ओपेन होतो (unlock) असा एक प्रकार आहे. आता बिरुटे साहेब मला तुम्ही मदत करा मला काही हा फोने झेपत नाही म्हणजे application download करताना कि surfing करताना कोणास ठाऊक पण com. android .**** अशी बरीच application दिसतात. त्याचे काय करयचे. जर शक्य झाले तर तुम्हास फोन करून त्रास देवू शकतो काय?. मला कहि गोष्टी ज्याचा तुम्ही सगळ्यांनी वरती उल्लेख केला आहे त्याची माहिती करून घ्यायची आहे म्हणुन म्हनतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
नांदेडीअन Mon, 12/31/2012 - 18:15 नवीन
Screen Off by hi launcher dev.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/01/2013 - 18:08 नवीन
स्क्रीन ऑफ या अ‍ॅप्लीकेशनमुळे स्क्रीन ऑफ झाली पण चालू करायला पुन्हा बटनाला स्पर्ष करावा लागतोय. डिस्पलेवरुन बोट फिरवलं की मोबाईल चालू होण्याकरिता स्क्रीन झळकली पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
त
तुषार काळभोर Wed, 01/02/2013 - 04:24 नवीन
स्क्रीनला खिशातल्या खिशात किंवा हातात बाळगतानाही स्पर्श होत राहतो, आणि स्क्रीन अनलॉक होत राहील. म्हणून ही डीफॉल्ट खबरदारी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा