Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी...

स
सुहास झेले
Fri, 11/23/2012 - 12:00
🗣 716 प्रतिसाद
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती. असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची. अ‍ॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी) सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!) आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम. १. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट. २. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते. ३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत. ४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता. ५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता. ६. मराठीत टाईप करण्यासाठी - अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन ब) PaniniKeypad Marathi IME क) AnySoftKeyBoard - Devanagari ड) Lipikaar Hindi Keyboard Free मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले. ७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो. ८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता. ९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर. १०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता. ११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त. १२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता. १३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :) १४. TED - Ideas worth spreading :) :) बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा. - सुझे !!

प्रतिक्रिया द्या
447147 वाचन

💬 प्रतिसाद (716)
न
नांदेडीअन Fri, 01/04/2013 - 08:23 नवीन
माफ करा, त्या App चे नाव Auto Screen On आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/04/2013 - 14:52 नवीन
अ‍ॅटो स्क्रीन ऑन टाकलंय पण अजून कै जमेना. [बटनालाच क्लिक करावं लागतंय. :( ] जरा तपशिलवार त्याच्या सेटींग काय करायच्या सांगितलं तर बरं होईन राव. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
द
दादा कोंडके Fri, 01/04/2013 - 15:15 नवीन
स्क्रीन ऑफ या अ‍ॅप्लीकेशनमुळे स्क्रीन ऑफ झाली पण चालू करायला पुन्हा बटनाला स्पर्ष करावा लागतोय.
मला या तुमच्या हायफाय गोष्टी ओ कि ठो कळत नाहीत. पण हार्डवेअरमध्ये काम करत असल्यामुळे सॉफ्टवेरची लिमीट्स सांगू शकतो. स्टँडबाय मोडमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे कमी पॉवरवर चालणे कारण बहुतेक वेळासाठी फोन या मोडमध्ये असतो. या मोडमध्ये कमितकमी फंक्शन्स (इनवर्ड मेसेज/मेल/कॉल मॉनिटरींग वगैरे) काम करत असतात. यातून अ‍ॅक्टीव्ह मोड मध्ये येण्यासाठी एक हार्डवायर्ड बटन मॉनिटर करणं अतिशय कमी पॉवरमध्ये होणारं काम असतं. इतर इन्पूट डिवायसेसनी हे काम होण्यासाठी म्हणजेच मायक्रोफोन, टच स्क्रीन वगैरे अ‍ॅक्टीव्ह ठेवायला आणि प्रोसेसींग करायला खूप जास्त पॉवर खर्च होते. त्यामुळे असलं अ‍ॅप काढायचं म्हणून काढ्लं असलं तरी त्याने बॅटरी लवकर ड्रेन होईल. -(रेडिओ, टेप, टिवी दुरुस्त करणारा) दादा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मदनबाण Fri, 01/04/2013 - 15:46 नवीन
दादा म्हणतो ते खरं आहे,या अ‍ॅपमुळे बॅटरी ड्रेन होण्याची शक्यता जास्त आहे. हे अ‍ॅप मी वापरुन पाहिले,पण ते काही धड चालले नाही.g-sensor आणि proximity sensor जर तुमच्या फोन मधे असतील तरच हे बर्‍यापैकी काम करु शकेल असे वाटते,अर्थात याचा परिणाम बॅटरी लवकर ड्रेन होण्यात होईल. हे सर्व करण्यापेक्षा बटन दाबलेले जास्त सोयिस्कर वाटते.शिवाय खिशात असताना अशा अ‍ॅपमुळे स्क्रीन अनलॉक होउन नंबर डायल होणे किंवा इंतर फंक्शंन्स सुरु होण्याची मला शक्यता वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/04/2013 - 17:47 नवीन
दादा आणि मदनबाणा प्रतिसादाबद्दल धन्स. नांदेडियनचा याबाबतीत काय अनुभव आहे ? मला सिंबियनच्या काही अ‍ॅप्लिकेशनची सवय झालेली, त्यामुळे अँड्रॉइडवरही तसेच अ‍ॅप्लिकेशन्स मिळाले तर बरे,अशी ही प्राथमिकता असते. आपण म्हणता बॅट्री उतरते तर मग नकोच जे आहे, ते बरे आहे. नांदेडियन काय म्हणतोय बघू या. >>> मला या तुमच्या हायफाय गोष्टी ओ कि ठो कळत नाहीत. वो दादा, मला तरी कुठे कळतात या सर्व गोष्टी. पण, आपण जमेल तेवढं ज्ञान मिळवत राह्यचं हा आपला आवडता उद्योग. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
न
नांदेडीअन Sun, 01/06/2013 - 09:17 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे Proximity Sensor किंवा Light Sensor सतत चालू ठेवल्याने बॅटरीवर ‘फार’ परिणाम होत नाही. Auto Screen On या सॉफ्टवेअरच्या सेटिंग्समध्ये जाऊन Show Notification आणि AutoStart हे ऑप्शन सेलेक्ट केलेले आहेत याची खात्री करून घ्या. मग Choose Sensor या सेटिंगमधून Proximity Sensor हे ऑप्शन निवडा. दॅट्स इट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त
तुषार काळभोर Tue, 01/01/2013 - 03:31 नवीन
माझ्या जिंजरब्रेडवर मराठी दिसत नाही. चौकोन्स दिसतात. मराठी दिसावं व लिहिता यावं यासाठी काही सुचना?
  • Log in or register to post comments
स
समयांत Tue, 01/01/2013 - 03:47 नवीन
लिहिता यावं >> मल्टीलींग किबोर्ड अ‍ॅप डालो करा आणि एमके.मरठी प्लगइन सुध्दा उतरवून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
म
मराठे Fri, 01/04/2013 - 17:49 नवीन
मला माझ्या तोशिबा थाईव या टॅबवर / पाटीवर जेलीबीन टाकायचंय. त्यासाठी सगळे फोरम पालथे घातले पण पाटी पुसण्यासाठी (रूट करण्यासाठी) काय करायचं ते समजलेलं नाही. (जर पाटीवर आईसक्रीम सँडविच नसेल तर रूट करता येतं पण जर हवेवरून (ओव्हर द एअर) आईसक्रीम सँडविच टाकलं असेल तर मात्र रूट करता येत नाही). कोणाला माहिती असेल तर प्लीज कळवा. जाता जाता: अँड्रॉईड्च्या प्रणाल्यांची नावं खालीलप्रमाणे ठेवण्यात आली आहेत - ए - अल्फा (१.०) बी - बीटा (१.१) सी - कपकेक (१.५) डी - डोनट (१.६) इ - इक्लेयर (२.०) एफ - फ्रोयो (२.२) जी - जिंजरब्रेड (२.३) एच - हनीकोंब (३.०) आय - आईसक्रीम सँडविच (४.०) आणी सर्वात नविन म्हणजे जे - जेली-बीन्स (४.२) पुढच्या नावासाठी के वरून सुरू होणारा गोड पदार्थ म्हणून 'काजू कतली' चं नाव देण्यात यावं अशी मागणी काही भारतीय फँनस्नी केली आहे. पण बहुतेक पुढच्या वर्जनचं नाव 'की-लाईम पाय' असेल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/04/2013 - 17:58 नवीन
माझ्या फोनवर अ‍ॅंड्रॉइड ४.०४ व्हर्जन आइसक्रीम सँडविच सध्या आहे. पुढे नॉट अप्रग्रेडेबल. :( पण सालं लकी पॅचर नीट चालत नाहीहे. बीझी बॉक्स नॉट इन्स्टॉल असं सारखा संदेश येतोय च्यायला, सा-या झकमार्‍या करुन झाल्या पण पॅचचा आनंद मिळेना. :( अ‍ॅड्रॉइडचा फोन वापरणा-याला कोणा एक्सपर्टला काय आयड्या ? बाय द वे, पीसीसूट कोणता चांगला [फ्री असला तर दुवा द्या] मोबोइलगो व्हर्जन २.१.५. चांगलं आहे, पण ते विकत घ्याव लागतं. किजेन आणि क्रॅकच्या आयड्यांना वापरुन पाहिल्या कै जमलं नाही. कोणाला कै सुचतं की नै ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
द
दादा कोंडके Fri, 02/15/2013 - 15:02 नवीन
बाकरवडी नाव दिलं नाही म्हणजे मिळवली. नैतर चुकून दुसरं बटन दाबलं गेलं तर अपमान करणार्‍या पाट्या दाखवेल. आम्ही आपले विंडोजवाले. त्यामुळे प्रश्नाला फास. -(म्यांगो) दादा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
म
मदनबाण गुरुवार, 10/24/2013 - 09:05 नवीन
पुढच्या नावासाठी के वरून सुरू होणारा गोड पदार्थ म्हणून 'काजू कतली' चं नाव देण्यात यावं अशी मागणी काही भारतीय फँनस्नी केली आहे. पण बहुतेक पुढच्या वर्जनचं नाव 'की-लाईम पाय' असेल. अ‍ॅन्ड्रॉइड चे पुढील व्हर्जन KitKat लॉन्च झाले आहे. Google to launch new Android KitKat and Nexus Devices पुढच्या व्हर्जनसाठी लड्डु आणि लस्सी यांची नावे जालावर फिरत आहेत. :) लड्डुचा एक लोगो :- Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
म
मयुरMK गुरुवार, 12/24/2015 - 16:29 नवीन
पुढच एंड्राइड लोलीपॉप आहे आणि त्या नंतर मार्शमेलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
म
मदनबाण गुरुवार, 02/14/2013 - 15:28 नवीन
काही नविन अ‍ॅप्स १) ZEDGE :--- वॉलपेपर,लाईव्ह वॉलपेपर,रिंगटोन्स्,नोटिफिकेशन आणि गेम्स चकटफु डाउनलोड मारण्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त आहे. दुवा :- https://play.google.com/store/apps/details?id=net.zedge.android&hl=en २)Auto Call Recorder :--- नाव वाचुनच याचे काम कळते. :) दुवा :- https://play.google.com/store/apps/details?id=com.appstar.callrecorder&feature=search_result#?t=W10. ३)Advanced Mobile Care :--- IObitवाल्यांचे विंडोजसाठी असलेले Advanced SystemCare माझ्या पिसीवर मी वापरतो,यांचेच हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉइडसाठी बनवले आहे.व्ह्यारस्,टास्क,कॅच आणि जंक फाईल क्लीन करणारे हे अ‍ॅप सध्या वापरुन पाहतो आहे.ठीक ठाक वाटले.(तुमच्या अ‍ॅन्ड्रॉइड मधे जर अ‍ॅन्टीव्हारस असेल तरी सुद्धा हे अ‍ॅप तुम्ही वापरु शकता.दोन्ही अ‍ॅप्स क्लॅश होणार नाहीत.) दुवा :- https://play.google.com/store/apps/details?id=com.iobit.mobilecare&feature=search_result#?t=W10. ४)Antivirus & Mobile Security (TrustGo Inc.):---अ‍ॅन्ड्रॉइडसाठी असलेले बरेच अ‍ॅन्टीव्हारस मी वापरुन पाहिले आहेत. ज्यात avast! Mobile Security,Lookout Security & Antivirus,AVG, NQ Mobile Security & Antivirus,Dr.Web Anti-virus Light (free)इं आहेत. पण सध्या TrustGo Inc यांचा हा अ‍ॅन्टीव्हारस वापरुन पाहतो आहे. याचा परफॉर्मन्स उत्तम वाटला आणि बॅटरी सुद्दा जास्त ड्रेन करत नाही. या अ‍ॅन्टीव्हारस बद्धल माझे कुतुहल अधिक वाढले जेव्हा त्यांच्या संकेतस्थळावर मी एक चक्कर टाकली आणि काही रिव्ह्य वाचले.याला West Coast Labs’ चे Checkmark Certification मिळालेले आहे तसेच याची Accuracy Rating 98%-100% आहे. अनेक पेड अ‍ॅन्टीव्हारस मधे असलेले गुण या चकटफु अ‍ॅप मधे आहेत. या अ‍ॅपच्या बद्धल काही वाचनिय दुवे इथे देत आहे. Android: Trust Go Mobile Security App TrustGo Antivirus & Mobile Security review TrustGo Inc यांच्या संकेस्थळावरच्या माहितीचे काही दुवे :- Q4 Moblie Mayhem Report 2012 Compare Trustgo डाउनलोड करण्याचा दुवा :- https://play.google.com/store/apps/details?id=com.trustgo.mobile.security&feature=search_result#?t=W10. जाता जाता :- ज्या वेगाने स्मार्टफोनची संख्या झपाट्याने वाढते आहे,त्याच प्रमाणे येणार्‍या काळात सिक्युरिटी आणि प्राव्हसी सॉफ्टवेअरची गरज आणि महत्व जाणवु लागेल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/15/2013 - 15:56 नवीन
बाणा, झेडग्याचा दुवा दिल्याबद्दल धन्स. बाकी अँड्राइडला अ‍ॅंटीव्हायरस आवश्यक आहे का ? मीतरी कधीच टाकणार नाही. उगाच फोनला ओझं असतं असं माझं मत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Fri, 02/15/2013 - 16:48 नवीन
बाकी अँड्राइडला अ‍ॅंटीव्हायरस आवश्यक आहे का ? हो,नक्कीच आहे.मी TrustGo Inc यांच्या संकेस्थळावरच्या माहितीचे जे दुवे दिले आहेत,त्याच्यातला तो रिपोर्टवाला दुवा उघडुन बघा आणि त्यानंतर ठरवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त
तिमा गुरुवार, 02/14/2013 - 15:48 नवीन
आम्हा म्हातार्‍यांचं बरं आहे. जुना नोकियाचा डबा वापरायचा. कसलाच त्रास नाही. रिंग वाजली की फोन घ्यायचा, बोलून झालं की लाल बटण दाबायचं. कुठे विसरला तरी लोकं आणून देतात परत परत.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 02/14/2013 - 16:03 नवीन
जुना नोकियाचा डबा वापरायचा अरेरे अगदी जुने दिवस आठवले हो मला... माझा पहिला फोन घेतला होता तो दिवस आठवला ! माझ्या सर्व मित्रांकडे त्यावेळी मोबाईल होता,आणि फक्त माझ्याकडेच नव्हता ! मग रोज बाबांना वर्तमानपत्रातल्या मोबाईलच्या जाहिराती दाखवायचो,मोबाईलचे फायदे कसे असतात इं इं आणि बरचं मोबाईल पुराण पठण करायचो पण त्यांच्यावर काही फरक पडायचा नाही. बरं,ठीक्,छान ! या पलिकडे ते काहीच बोलायचे नाहीत शेवटी माझी टेप बंद करण्यासाठी मोबाईल घेण्याची संमती मिळाली ! आणि माझा पहिला फोन घेतला. तो होता नोकिया ३५३० ( तो पर्यंत मित्रांचे ३३१०,३३१५ इं फोन होते.) जाउंदे अजुन सांगत बसत नाही माझ्या फोनच्या कथा ! ;)शेवटी एकदाचा नोकिया ला नो-किया.;) जाता जाता :- हल्ली वडिल विचारता सध्या कुठला चांगला अ‍ॅन्ड्रॉइड फोन आहे ? ;) त्यांना आता स्वतःला घ्यावासा वाटु लागला आहे,मी विचारले हवा आहे का ? लगेच घेउन देतो... मग ते स्वतःच नको म्हणतात ! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
म
मदनबाण Mon, 09/28/2015 - 19:02 नवीन
माझा गॅलॅक्सी वाय बरेच दिवस पडुन होता, तो माझ्या तिर्थरुपांना वापरुन बघावा यासाठी बराच प्रयत्न करावा लागला ! मग हळुहळु त्यांनी तो वापरायला सुरुवात केली. :) हल्लीच ते हा मोबाइल नीट चालत नाही आता मला नविन मोबाइल घेउन दे म्हणुन मागे लागले ! :) कालच त्यांना अ‍ॅमॅझॉन वरुन Moto E 2nd Generation 4G घेउन दिला. फोन मस्त आहे, आणि महत्वाचे म्हणजे स्टॉक अँन्ड्रॉइड लॉलिपॉप ओएस असल्याने अगदी स्मुथ फंक्शनींग आहे.१६ जीबी चे क्लास टेन मेमरी कार्ड इनसर्ट केले व फोन अपडेट करुन आणि सॉफ्टवेअर टाकुन फुल सेट करुन दिला. :) या निमित्त्याने हा धागा परत वाचला गेला. बजेट अ‍ॅन्ड्रॉइड मधे Moto E 2nd Generation 4G हे मॉडेल बेस्ट आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- डगा डगा वई वई वई..... :- KALI TOPI LAL RUMAL (1959)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/14/2013 - 23:10 नवीन
मी नुकताच सॅमसंगचा नोट-२ घेतला आहे. कसा वापरायचा शिकतो आहे. जुन्या नोकियात मेसेजिसचे इन बॉक्स, सेंट वगैरे विभाग होते. ह्या नव्या फोन मध्ये मात्र पाठवलेले, आलेले निरोप आणि त्यातच आलेले कॉल्स, केलेले कॉल्स, मिस्ड कॉल्स वगैरे सर्व मिसळ वेगवेगळ्या चिन्हांमध्ये दाखवलेले असते. त्याने नीट बोध होत नाही. तसेच, पूर्वी नोकियात एकच मेसेज, टेक्स्ट, निरोप इ.इ. अनेक जणांना (अगदी ८०-९० जणांना) एकाच वेळी पाठविता यायचं. पण ह्या नव्या फोनमद्ये कुठल्याही मेसेजला १० च्या वर सदस्य यादी जोडता येत नाही. असं का होतं? ह्यावर काही उपाय आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/15/2013 - 15:51 नवीन
व्वा. एकदम भारी फोन आहे. अभिनंदन. >>>नव्या फोनमद्ये कुठल्याही मेसेजला १० च्या वर सदस्य यादी जोडता येत नाही. असं का होतं? खरं तर असं काही होणार नाही. काँटेक्ट लिष्टमधील सर्वांना म्हणजे माझ्याकडे समजा काँटेक्ट लिष्टमधे सातशे नावं आहेत तर सातशे मेसेज पाठवू शकतोच. थोडं शिकावं लागेल. नोकिया मधून बाहेर आलो आणि मीही अँड्रॉइडवर गोंधळलो होतो. काळजीचं कारण नाही, फोन बेष्ट आहे. [माझ्याकडे आपला दिसतो तो नाही] :( Image removed.Image removed. संदेश लिहितो त्या आयकॉनवर क्लीक केल्यावर आपल्याला संपूर्ण इनबॉक्स दिसतो. नवीन संदेश खाली लिहिल्यावर उजव्या वरच्या बाजूला To आणि एक काँटेक्ट लिष्ट साठीचं चिन्ह आणि प्लस दिसतं त्यावर क्लिक केल्यावर फोनमधे असलेले सर्व काँटेक्ट आपल्यासमोर येतात. आपल्याला ज्यांना ज्यांना मेसेज पाठवायचा त्या समोरच्या चौकोनी बॉक्समधे टीक केले की त्या त्या सर्वांना संदेश जातो. आता अडचण कुठे आहे, ते नेमके सांगा ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
J
jaypal Fri, 02/15/2013 - 18:14 नवीन
बहुतेक या युक्तीचा उपयोग होणार नाही अस वाटतय. पेठकर काका सांगतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रभाकर पेठकर Sat, 02/16/2013 - 12:32 नवीन
आपल्याला ज्यांना ज्यांना मेसेज पाठवायचा त्या समोरच्या चौकोनी बॉक्समधे टीक केले की त्या त्या सर्वांना संदेश जातो. आता अडचण कुठे आहे, ते नेमके सांगा ?
१० चौकोनांमध्ये टिक करता येते. अकराव्या चौकोनात टिक करायला गेल्यावर टिक तर होत नाहीच उलट 10 contacts available only असा उद्धट मेसेज येतो. दहापेक्षा जास्त कॉन्टॅक्ट्स सिलेक्ट होत नाहीत. ग्रुप बनवून मेसेज पाठवायचा प्रयत्न केला तरी दहा पेक्षा जास्त कॉन्टॅक्ट्सना मेसेज पाठवता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/16/2013 - 13:18 नवीन
>>>>अकराव्या चौकोनात टिक करायला गेल्यावर टिक तर होत नाहीच उलट 10 contacts available only असा उद्धट मेसेज येतो. च्यायला, उद्धटच फोन दिसतो. :) या पुढे मला काहीही सांगता येणार नाही. यापुढील मार्ग आहेत पण ती रिस्क असते. फोन रुट केल्यावर अनेक फ्यासिलीटी मिळतात. त्यात असा फायदा घेता येतो की नाही ते विचारुन इथे प्रतिसाद लिहितो. -दिलीप बिरुते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
द
दादा कोंडके Sun, 02/17/2013 - 12:13 नवीन
उलट 10 contacts available only असा उद्धट मेसेज येतो.
त्याचं स्वाफ्टवेअर लिहिणारा पुणेरी असावा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रमोद देर्देकर Mon, 10/07/2013 - 13:26 नवीन
पेठकर साहेब , बरुटे साहेब , सध्या दहा पेक्षा जास्त जणांना संदेश पटवता नाहीत अगदी फ्री sms च्या site वरून सुद्धा कारण दशहशत , दंगल होण्याचा संभाव होतो म्हणून. ते बंद करून जमाना झालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मदनबाण Fri, 02/15/2013 - 18:04 नवीन
काकाश्री,सॅमसंगच्या फोन मधुन बहुधा १० पेक्षा जास्त लोकांना एसएमएस पाठवता येत नाहीत. यासाठी ग्रुप एसएमएस पाठवु शकणारे अ‍ॅप इन्स्टॉल करुन घ्यायला हवे. मला ठीक वाटलेले २ अ‍ॅप्स इथे देतो. Handcent SMS GroupText
  • Log in or register to post comments
म
मराठे Fri, 02/15/2013 - 18:09 नवीन
मला वाटतं अँड्रोईड हे गुगलचंच पिल्लू असल्यामुळे गूगलच्या जीमेल कॉन्टॅक्टस चा वापर करून वेगवेगळे ग्रूप बनवता येतिल आणि मग ग्रूपला मेसेज किंवा मेल पाठवता येत असावा. (मी स्वतः टेक्स्ट फारसा वापरत नाही त्यामुळे करून पाहिलेले नाही). पण ऐनवेळी (अ‍ॅड-हॉक) ग्रूपमेसेज पाठवायचा असेल तर कदाचीत अडचण येऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
न
नासिककर Tue, 02/19/2013 - 07:44 नवीन
PANSI SMS he application install kara. https://play.google.com/store/apps/details?id=com.pansi.msg&feature=search_result#?t=W251bGwsMSwxLDEsImNvbS5wYW5zaS5tc2ciXQ..
  • Log in or register to post comments
न
नासिककर Tue, 02/19/2013 - 08:01 नवीन
कृपया PANSI SMS हे एंप्लीकेशन वापरून बघा निश्चित प्रोब्लेम सुटेल . खालील लिंक ने हे एंप्लीकेशन डाउनलोड करता येईल https://play.google.com/store/apps/details?id=com.pansi.msg&feature=search_result#?t=W251bGwsMSwxLDEsImNvbS5wYW5zaS5tc2ciXQ
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 03/24/2013 - 08:45 नवीन
काही नवी माहिती, काही नवी अप्लीकेशन्स असतील, काही अपडेट्स असेल तर सांगा म्हणून हा धागा वर आणायचा प्रपंच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
न
नानबा Mon, 03/25/2013 - 06:06 नवीन
ठराविक कालावधीनंतर प्रतिसादांमध्ये नवनवीन अ‍ॅप्सची माहिती टाकून हा धागा वरच राहुद्यात... खूप माहितीपूर्ण धागा आहे... :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 03/25/2013 - 06:11 नवीन
हे घ्या नविन अ‍ॅप... :) या अ‍ॅपचे नाव आहे Auto Call Recorder तुमच्या मोबाईलवरुन केला जाणारा आणि येणारा प्रत्येक कॉल रेकॉर्ड करण्यासाठीचा सगळ्यात सोपा उपाय ! ;) दुवा :---https://play.google.com/store/apps/details?id=com.appstar.callrecorder&hl=en
  • Log in or register to post comments
न
नासिककर Mon, 03/25/2013 - 12:32 नवीन
मी वापरत असलेल्या अ‍ॅपस ची लीस्ट आणी डाउनलोड करण्यासाठी दुवा देट आहे. खालील सगळे अ‍ॅपस फुकट आहेत. १. Truecaller - is the free global phone directory with caller id and call blocker that fits in your pocket. Searching for names and numbers globally have never been simpler, more precise and accessible! म्हणजे its like ग्लोबल फोनबुक !!! https://play.google.com/store/apps/details?id=com.truecaller&feature=apps_topselling_free २. MX Player - The best way to enjoy your movies. सर्वोत्तम विडियो प्लेयर + सगळ्या प्रकारचे विडियो फ़ोर्मट्स प्ले करतो. टच इंटरफ़ेस झक्कास आहे !!! https://play.google.com/store/apps/details?id=com.mxtech.videoplayer.ad&feature=apps_topselling_free ३. Cricbuzz Cricket Scores and News.- येनारया आईपीएल साठी https://play.google.com/store/apps/details?id=com.cricbuzz.android&feature=apps_topselling_free ४. nexGTv Mobile TV - २G नेटवर्क सुध्दा लाइव टीवी बघू शकाल. खासकरून आईपीएल समनेपन !!! https://play.google.com/store/apps/details?id=com.digivive.offdeck&feature=apps_topselling_free ५. m-Indicator - मुंबई मधील वाहतुक व्यवेस्थेची इत्यम्भुत माहीती. https://play.google.com/store/apps/details?id=com.mobond.mindicator&feature=apps_topselling_free ६. Smart Lock Free (App/Media) - एप्लीकेशन लॉक करण्यासाठी उदाहरण - लॉकिंग MX विडियो प्लेयर... https://play.google.com/store/apps/details?id=ukzzang.android.app.protectorlite&feature=apps_topselling_free ७. ICICI Mobile Banking - iMobile is ICICI Bank's official mobile banking application. https://play.google.com/store/apps/details?id=com.csam.icici.bank.imobile&feature=apps_topselling_free ८. Bluetooth File Transfer - इनस्टॉल केलेले अ‍ॅपस सुध्दा शेयर करता येतात. it helps when our friend does not have इंटरनेट on हिज मोबाइल https://play.google.com/store/apps/details?id=it.medieval.blueftp&feature=apps_topselling_free
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 03/25/2013 - 14:25 नवीन
चकटफु अप्लीकेशन्सची एक मस्त साईट आपल्याला माहिती असेलच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Sun, 05/12/2013 - 15:47 नवीन
इथे आहे. या लिंकांवरून घेतलेले अ‍ॅप्स उदा. लाँचर्स असतील तर त्यासाठीच्या थीम्स घ्यायला मार्केटात जाऊ नका. लोचा होतो, तुमचे अकाउंटही ब्लॉक होऊ शकते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 05/13/2013 - 12:51 नवीन
अर्रे वा. दुव्याबद्दल धन्स. पाहतो आणि मोबाईलमधे टाकून पाहतो. आणि मग फीडबॅक. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/15/2013 - 05:32 नवीन
>>> उदा. लाँचर्स असतील तर त्यासाठीच्या थीम्स घ्यायला मार्केटात जाऊ नका. लोचा होतो, तुमचे अकाउंटही ब्लॉक होऊ शकते.. अकाउंट ब्लॉक झालं होतं. ब्याकप घेतलेला असल्यामुळे रिकव्हरी मोडमधून परत जैसे थे मोबाईलवर आलो. परंतु अकाउंट ब्लॉक होतो इतकं सोडलं तर अ‍ॅप्लीकेशन्स चांगली, मोफत आणि फूल व्हर्जनवाली आहेत. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
म
मयुरMK गुरुवार, 12/24/2015 - 16:53 नवीन
९ अप्प्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
श्रीरंग_जोशी Mon, 03/25/2013 - 17:06 नवीन
चतुरभ्रमणध्वनीचाहत्यांसाठी असलेला धागा असल्याने इथे टंकतोय. मी नुकताच ब्लॅकबेरी Z१० हा चतुरभ्रमणध्वनी घेतलाय - http://us.blackberry.com/ त्यामध्ये असलेल्या अनेक नव्या वैशिष्ट्यांपैकी मला सर्वाधिक आवडलेली गोष्ट म्हणजे चतुरकळफलक - http://us.blackberry.com/smartphones/blackberry-z10/overview.html?IID=us:bb:desktop:homepage:Mar2013:hero:bb10-discovermore इतरही अनेक चांगल्या गोष्टी त्यात आहेतच जसे मेसेंजरद्वारे स्क्रीन शेअरींग. इतर कुणी ब्लॅकबेरी १० चा धारक / प्रशंसक असेल तर खरडीतून त्याबाबत संवाद साधायला आवडेल. ब्लॅकबेरी १० धारक / प्रशंसक सध्या अल्पसंख्यांक असल्याने अ‍ॅन्ड्रॉइडच्या धाग्यावर लिहितोय. कृपया समजून घ्या.
  • Log in or register to post comments
न
नानबा गुरुवार, 03/28/2013 - 07:55 नवीन
सध्या शामसुंग ग्यालेक्सी वाय प्रो हा फोन वापरतोय.. त्याला रूट करायचंय, पण काही कस्टम रॉम सापडले नाहीत मला आंतरजालावर... कोणाला माहित आहेत का काही? आणि या फोन साठी सायनोजेन मॉड पण नाहीये...
  • Log in or register to post comments
द
दिपक Fri, 03/29/2013 - 07:04 नवीन
१) डॉल्फिन ब्राऊझर - नेट ब्राऊझींग साठी लोकप्रिय आणि उपयुक्त. २) फाईल एक्सपर्ट - मस्त फाईल ब्राऊझर आहे, फाईल कॉपी, मुव्ह करण्यासाठी तसेच वायफाय वेब क्लाईंट, विन्डॊंज फाइल शेअरींग सारखे उपयुक्त फिचर्स आहेत. ३) मॅजीक पियानो - मोबाईलवर पियानो वाजवण्यासाठी मस्त टाईमपास. ४) आयपी वेबकॅम - मोबाईलचा कॅमेरा पीसीवर वेब कॅमेरा किवा सीसीटीव्ही कॅमेरा म्हणुन वापरता येतो. ५) रीअल गिटार - मोबाईलवर गिटार वाजवण्यासाठी. ६) ट्युन वीकी - ह्यात गाणी ऎकताना त्या गाण्याचे लिरिक्स आपोआप डाऊनलोड होतात. गाण्याशी सिंक करुन वाचता येते. ७) आर डी एम प्लस - तुमच्या पिसीचे रीमोट डेस्कटॉप कनेक्शन घेऊन मोबाईलवर पीसी वापरु शकतो. ७) शॅझम - टीव्हीवर किंवा अन्य कुठे गाणे चालु असेल तर मोबाईलवर "टच टु शॅझम" बटन दाबले की त्या गाण्याची सर्व माहिती काही सेकंदात समोर येते.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 03/29/2013 - 22:08 नवीन
solar हे सगळ्यात भारी पोपट अ‍ॅप अँड्रोईडवरचे. यामुळे स्क्रीनवर सोलर पॅनेलसारखी दिसणारी एक इमेज येते आणि एक पॉवर मीटर. Image removed. करमणुकीसाठी या अ‍ॅपला दिलेले लोकांनी प्रतिसाद वाचणे. हॉल ऑफ फेम आणि हॉल ऑफ शेम दोन्ही आहेत. :) आणि नंतर उडवावे कारण याने बॅटरी ड्रेन शिवाय काहीही होत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Mon, 04/01/2013 - 00:03 नवीन
या लेखाचे स्क्रीनशॉट scribd वर पाहिल्यात कोणीतरी दुसर्याने पब्लिश केलेत काय?.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 04/01/2013 - 15:14 नवीन
माझ्याकडे डेल या कंपनीचा XCD 28 हा अतिशय भिकार फोन आहे ..eclair 2.1 प्रणाली असलेला .. त्याला पॅटर्न लॉक झाला आहे .. जीमेल चे नाव व संकेताक्षर टाकून सुद्धा प्रणाली ते स्वीकारत नाही.. फॅक्टरी रीसेट हा एक पर्याय आहे .. मी , पॉवर बटण , व्हॉल्युमचे - , कधी कधी + धरून चालू करून पाहिला .. पांढर्‍या रंगाची स्क्रीन येउन FTM एवढेच दाखवते.. कोणाला हा फोन रीसेट कसा करावा ह्याची माहिती आहे का ? किंवा पॅटर्न लॉक कसे काढावे ?
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Mon, 04/01/2013 - 15:42 नवीन
माझा हा मोबाईल हँग झालाय ,काय करु सॅमसंग वाल्यांनी पण हात वर केलेत.प्लीझ हेल्प मी Image removed.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 04/01/2013 - 15:47 नवीन
आहे का ? कधी घेतलात ?Samsung-Galaxy S4 असेल तर अजून वॉरंटीमधे असेल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
य
योगी९०० Tue, 04/02/2013 - 06:15 नवीन
Samsung-Galaxy S4 ??? Samsung-Galaxy S३ वाटतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Tue, 04/02/2013 - 10:33 नवीन
प्रकाशचित्राचा दुवा चोप्य केला असता http://allthingsd.com/files/2013/03/Samsung-Galaxy-S-4.jpg असा दिसला .. त्यावरून अंदाज बांधला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
स
सुप्रिया गुरुवार, 04/04/2013 - 08:57 नवीन
माझ्याकडे नोकिया सी५ आहे. मला मोबाईलवर मिसळपाव वाचता येण्यासाठी कुठले अ‍ॅप मिळेल का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा