Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी...

स
सुहास झेले
Fri, 11/23/2012 - 12:00
🗣 716 प्रतिसाद
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती. असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची. अ‍ॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी) सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!) आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम. १. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट. २. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते. ३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत. ४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता. ५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता. ६. मराठीत टाईप करण्यासाठी - अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन ब) PaniniKeypad Marathi IME क) AnySoftKeyBoard - Devanagari ड) Lipikaar Hindi Keyboard Free मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले. ७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो. ८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता. ९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर. १०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता. ११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त. १२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता. १३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :) १४. TED - Ideas worth spreading :) :) बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा. - सुझे !!

प्रतिक्रिया द्या
447147 वाचन

💬 प्रतिसाद (716)
स
सुमो गुरुवार, 10/22/2020 - 02:27 नवीन
मिपावर फोटो कसा चढवायचा हा सध्या कळीचा मुद्दा झालेला आहे. त्यासाठी हे ॲप. https://play.google.com/store/apps/details?id=com.superyao.tuchuang इमेजर (www.imgur.com) हे फोटो होस्टिंग साठीचं खूप जुनं आणि प्रसिद्ध संस्थळ आहे हे सर्वांना माहिती आहे. या संस्थळावर आपला फोटो चढवून तो मिपावर अगदी सहज प्रकाशित करणारं आजचं ॲप क्विकइमेजर. ३.२ mb इतकं छोटं असलेलं हे ॲप जास्तीच्या कोणत्याही परमिशन्स मागत नाही. www.imgur.com वर आपण खातं उघडणं गरजेचं आहे. म्हणजे आपले फोटो कायमकरता साठवले जातात. खाते न उघडता सुद्धा या ॲपवरून फोटो imgur वर चढवू शकतो पण असा फोटो काही दिवसांनी काढून टाकल्या जातो आणि मग मिपावर दिसायचा बंद होतो. ॲप इन्स्टॉल केल्यावर उजवीकडे वरच्या कोपर्‍यात तीन उभ्या रेषेतील बिंदूंवर स्पर्श करून copy format हा मेनू उघडा. Image removed. त्यात खालून तिसरा असलेला img src हा फॉरमॅट निवडा. म्हणजे तुम्ही अपलोड केलेल्या फोटोची मिपावर सरळ पेस्टवता येईल अशी लिंक कॉपी होईल. Upload वर टिचकी मारली की तीन पर्याय उघडतील. योग्य तो पर्याय निवडून फोटो अपलोड करा. Image removed. अपलोड झालेल्या फोटोच्या थंबनेलच्या पुढे असलेल्या लिंकवर टिचकी मारली की लिंक कॉपी होईल. Image removed. मिपावर ही लिंक फक्त पेस्टवायची की बस्स. तुमचा फोटो मिपावर दिसायला लागेल. Image removed. पहा वापरून.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 10/22/2020 - 07:05 नवीन
मोबाईल वरून इमेज पोस्ट करताना उपयोगी पडेल. विशेषतः खफ वर. दोन दिवसांनी इमेज गायब झाली तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो
क
कंजूस गुरुवार, 10/22/2020 - 13:34 नवीन
वापरून पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/24/2020 - 08:24 नवीन
मस्त, उपयोगी अ‍ॅप दिसते. इन्स्टॉल केले. उपयोग करुन पाहतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/24/2020 - 08:52 नवीन
कॉपी फॉर्मेट हा ऑप्शन मात्र मला येत नै ये.. त्यामुळे गडबड होत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
कंजूस Sat, 10/24/2020 - 09:54 नवीन
त्यावर क्लिक केल्यावर नवीन लिंक जेनरेट होते. मग कॉपी होते क्लिपबोर्डाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सुमो Sat, 10/24/2020 - 10:10 नवीन
इथे हळुवारपणे स्पर्श करा . Image removed. . म्हणजे हे गवाक्ष उघडेल. . Image removed. . इथेच तुम्हाला हवाहवासा पर्याय दिसेल !!! . Image removed. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
कंजूस Sat, 10/24/2020 - 09:51 नवीन
मेन साइटवरच मिळतेय. १) फोटो अपलोड केला, २) public viewing - ok केलं, पोस्ट केला. ३) पब्लिश झालेल्या फोटोला क्लिक करून मोठा केला. याच फोटोवर 'open in new tab' पुन्हा केल्यावर त्यामधली address bar मधली लिंक कॉपी केली. ( याच लिंका आता नवीन लेखात - परवल की मिठाईवर वापरल्या. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो
क
कंजूस गुरुवार, 10/22/2020 - 04:47 नवीन
हे वापरल्यास गूगल फोटोज सोपं आहे. शिवाय आणखी एक शुअर उपाय ब्लॉगचा आहेच. ( पण ओळख लपवायची असेल तर post images. अर्थात गूगलला पर्याय नाहीच कारण इतर चांगल्या साइट्स कधीही paid होतात आणि फोटो दिसायचे बंद होतात. उदाहरणार्थ tinypic.com ही साइट photo bucket ने विकत घातली. आणि तीही paid झाली.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 10/22/2020 - 15:07 नवीन
Imgur trial Image removed.

जमलं. -----------------
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 02/19/2022 - 09:28 नवीन
बरेच दिवस माझी DNSCrypt वर डोकेफोड चालु होती, मग अचानक हे अगदी सोप्या पद्धतीने कसे वापरायचे ते समजले. यावर [ Encrypt DNS traffic ] / इतर जालावर वाचन करताना आणि इकडे-तिकडे माहिती शोधताना माझ्या वाचनात GitHub वरील एका पान आले होते जिथे मला या झकास अ‍ॅपचा संदर्भ दिसला. personalDNSfilter :- हे अ‍ॅप वापरण्यासाठी फोन रुट केलेला असणे गरजेचे नाही. यातील फिल्टर लिस्ट वापरुन जाहिरती आणि ट्रॅक्सर्स पासुन मोठ्या प्रमाणात मुक्ती मिळते. तुम्हाला हवे ते डीएनस कॉनफिगरेशन DoH [ DNS over HTTPS ] किंवा DoT [ DNS over TLS ] देखील वापरता येते. जे मला सगळ्यात महत्वाचे आणि उपयुक्त वाटले. हे अ‍ॅप एकदम स्लिक, फास्ट आणि उत्तम चालणारे आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zoo Zoo Zoobie Zooby... :- Dance Dance
  • Log in or register to post comments
N
nandan Fri, 02/17/2023 - 18:58 नवीन
https://t.me/pump_upp - best crypto pumps on telegram Make 1000% and more within 1 day, join channel @pump_upp !
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 02/18/2023 - 07:40 नवीन
फीचर फोन पेक्षा बरा, रेग्यूलर स्मार्टफोनपेक्षा स्वस्त असा नवा स्मार्टफोन Motorola moto कडून बाजारात आला. रु सात हजार. Android 13 Go version प्रोसेसर unisoc t606 (175000 antutu score) HD screen. 13mp,5mp cameras. Androi 13 Goबद्दल https://blog.google/products/android/android-13-go-edition/ इथे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 02/18/2023 - 17:18 नवीन
जवळपास स्टॉक अँड्रॉइड प्रणाली देणारे, चांगली बॅटरी असणारे फोन होते. ब्लोटवेर नसल्याने परफॉर्मन्स दोन वर्षांनीही चांगला असायचा. पण मागच्या वर्षी आलेल्या G82 and G52 या मॉडेल्सनी निराशा केली आहे. फेसबुक, कँडी क्रश, Netflix, अमेझॉन असे ढीगभर थर्ड पार्टी ॲप्स आहेत. (किमान काढता तरी येतात! बाकी उत्पादकांच्या मोबाइलमधील अतिरिक्त ॲप्स काढताही येत नाहीत!) अँड्रॉइड गो मध्ये असे ॲप्स असतील तर आधीच बेसिक असलेल्या प्रोसेसर आणि मेमरीवर अतिरिक्त ताण येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ध
धर्मराजमुटके Sat, 02/18/2023 - 17:32 नवीन
म्हणूनच मी नोकिया प्रेमी आहे. अजूनही स्टॉक अँड्राईड देतात. (एखाद दुसरे अ‍ॅप असते पण ते काढता येते). मात्र हार्डवेअर किंमतीच्या मानाने जुने असते. माझ्याकडे घरात नोकिया आणि मोटो दोन्ही आहेत पण मोटो आताशा जास्त गरम होतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
क
कंजूस Sun, 02/19/2023 - 01:56 नवीन
त्यात भारंभार apps नसतील. 4+64 memory चांगली वाटते. अवेलेबल मेमरीही बरीच असेल. माझ्या इ५+ मध्ये २जिबीRAM (/3),२६जीबीROM(/32) Available आहे. Gyroscope,compass नसतो. पण ते फिटनेस appसाठी लागतात. _____________
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
  • «
  • ‹
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा