Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी...

स
सुहास झेले
Fri, 11/23/2012 - 12:00
🗣 716 प्रतिसाद
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती. असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची. अ‍ॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी) सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!) आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम. १. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट. २. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते. ३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत. ४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता. ५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता. ६. मराठीत टाईप करण्यासाठी - अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन ब) PaniniKeypad Marathi IME क) AnySoftKeyBoard - Devanagari ड) Lipikaar Hindi Keyboard Free मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले. ७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो. ८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता. ९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर. १०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता. ११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त. १२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता. १३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :) १४. TED - Ideas worth spreading :) :) बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा. - सुझे !!

प्रतिक्रिया द्या
447147 वाचन

💬 प्रतिसाद (716)
आ
आनंदी गोपाळ Sat, 04/25/2015 - 18:31 नवीन
२ दिवस जमलं नाही इथे यायला. उद्या रवीवार आहे. थोडा वेळ हाती मिळेल असे वाटते. ही थींम कशी तयार करायची व वापरायची त्याचा धागा/प्रतिसाद देतो इथेच. वर दिलाय तो जुना एस्सेस होता. आता सध्या थोडी नवे बदल केले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
श्री Sat, 04/25/2015 - 18:55 नवीन
नक्की द्या, वाट पाहतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
म
मदनबाण Tue, 04/28/2015 - 12:12 नवीन
थीम खरेच खूप सुंदर आहे ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots erupt
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/28/2015 - 09:07 नवीन
माझा फ़ोन रुट आहे. मी रुट एक्सप्लोलर मधुन अनेकदा इनबिल्ट रिंग टोन बदलल्या आहेत. चोप्य पस्ते करुन. पण आता ते कै होत नै ये. या पेक्षा काही सुपाय उपाय आहे का ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
घ
घन निल गुरुवार, 04/30/2015 - 08:39 नवीन
फोन रूट केल्यावर पुन्हा कस्टम रोम टाकणे गरजेचे असते का ?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/01/2015 - 13:54 नवीन
नाही. पुन्हा कशाला टाकायची कष्टम रोम. फोन रुट करणे आणि कष्टम रोम टाकणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कष्टम रोम टाकण्यासाठी फोन रुट आवश्यक असतो इतकेच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घन निल
घ
घन निल Wed, 06/10/2015 - 12:18 नवीन
ट्राय करून बघतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घ
घन निल Wed, 06/17/2015 - 14:56 नवीन
एच टी सी ने स्वतः काही तरी टूलकीट बनवले आहे असे कळले.. बघतो हे पण वापरून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घन निल
A
arun jaykar Mon, 05/04/2015 - 10:16 नवीन
सप्रेम नमस्कार, माझ्याकडे micromax canvas HD A116 मोबाईल आहे.त्याची ओ एस Android ४.२.१ अपडेट केलेली आहे.ram १ जीबी आहे. त्याची फोन मेमोरी १ जीबी आहे. internal sd card memory २ GB व external memory expandable upto ३२ GB आहे. मी त्यामधे १६ जीबी चे मेमोरी कार्ड टाकलेले आहे. Default write disc ही external sd card सिलेक्ट केलेली आहे. इंटरनल sd card मेमोरी पूर्ण रिकामी अाहे. मी प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केलेले apps प्रथम फोन मेमोरीमधेच इन्स्टॉल होतात व नंतर मुव्हेबल apps हे external sd कार्डमधे मूव्ह करता येतात. आता फोन मेमोरी फक्त १०० mb शिल्लक आहे. प्रॉब्लेम इथून पुढे सुरु होतो. मला आता आणखी apps डाऊनलोड करता येत नाहीत. उदाहर्णार्थ Facebook डाऊनलोड करताना "Error while downloading "Facebook" There is insufficient space on the device " असा मेसेज येतो. माझया मोबाईलमधे २ जीबी इंटरनल sd card मेमोरी रिकामी आहे. तिचा वापर मी app इन्स्टॉल करण्यासाठी कसा करु शकतो ? तिचा वापर करुन फोन मेमोरी वाढवता येईल काय ? कसा ? Internal sd कार्डची २ जीबी मेमोरी वापरून फोन मेमोरी वाढवता येईल काय ? जेणेकरुन मला आणखी apps install करता येतील. कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती. आपला नवीन सदस्य, अरुण जायकर.
  • Log in or register to post comments
अ
अमोल मेंढे Sat, 07/04/2015 - 13:17 नवीन
सेटींग मध्ये जा अ‍ॅप्स मध्ये ऑल टॅब सिलेक्ट करा गुगल प्ले स्टोर सिलेक्ट करा अनइन्स्टाल अप्डेट्स करा सेम गुगल प्ले सर्विसेस सोबत करा नविन अ‍ॅप डाऊन्लोड होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arun jaykar
र
रॉजरमूर Sat, 05/09/2015 - 20:37 नवीन
radio off परवापासून फोन वर outgoing call चे बटण दाबल्यावर किंवा इनकमिंग call आल्यावर recive केल्यावर "Radio off " असा संदेश येतोय त्यामुळे फोन कुठे लागत ही नाही आणि recive पण होत नाहीये . android version ४.२. २ jelly bean फोन Aeroplane Mode वर नाहीये . काही setting चा घोळ असेल का ? अर्थात factory reset चा पर्याय आहेच पण setting मध्ये काही गडबड झाली असेल तर थोडक्यात काम होईल म्हणून हा प्रश्न . कुणाला आलाय का हा प्रॉब्लेम कधी ?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/17/2015 - 07:43 नवीन
असा कै प्रॉब्लेम आलेला नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/17/2015 - 07:42 नवीन
किटक्याटसाठी ४.२.२ साठी स्थिर कष्टम रोम आहे का ? सर्वांच्या ह्यांडसेटसाठी चालेल अशी ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
A
arun jaykar Sun, 05/17/2015 - 12:51 नवीन
पीसीचा वापर न करता अंड्रॉइड मोबाईलद्वारेच मोबाईलच्या एस डी कार्डवरील डिलीट झालेल्या फाईल परत रिकव्हर करता येतील का ? कशा ?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/17/2015 - 12:57 नवीन
प्ले स्टोअरवरुन मोबाईल फोन डाटा रिकव्हरी नावाचं अ‍ॅप्लीकेशन घ्या. डिलिट झालेल्या फायली रिकव्हर होतील. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arun jaykar
A
arun jaykar Sun, 05/17/2015 - 15:12 नवीन
बिरुटेसाहेब त्वरित दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तुम्ही सांगितलेली सर्व अप्लीकेशन प्ले स्टोअरवरुन इन्स्टॉल करुन पाहिली परंतु सर्वांनाच मदतीसाठी कॉम्प्युटरची मदत लागते.पीसीच्या मदतीशिवाय डायरेक्ट मोबाईलद्वारे रिकव्हरी करणारे एखादे एअँप नाही का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/12/2015 - 04:32 नवीन
पीसीच्या मदतीशिवाय मोबाइलवरच होतं Diskdigger हे अपलीकेशन टाका. फोन रुट आवश्यक आहे माझ्या फोनवर हेच आहे आणि ते उत्तम काम करतं. दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arun jaykar
प
पाटील हो गुरुवार, 05/21/2015 - 11:01 नवीन
सिंगल सीम मोबाईल वर दोन whatsapp अकौंट . http://thepsycraft.com/wmapp वेवास्तीत चालतात , मी अजून वपरतोय ( सर्विस expiration २ मे २०१६ ) OGWhatsapp चा आलटर्नेतीव म्हणून वापरता येतो .
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/12/2015 - 04:33 नवीन
एक सिम कार्ड्स नंबर दोन मोबाईलवर वाट्सअप चालले पाहिजेत असं शोधा ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटील हो
अ
अमोल मेंढे Tue, 06/02/2015 - 12:21 नवीन
आमचेकडे सर्व प्रकारचे अ‍ॅन्ड्रॉइड अप्लीकेशन्स प्रो मिळतील. तसेच मोबाइल बद्दल काही अडचण असल्यास संपर्क करावा. फुकटात मदत करण्यात येईल.
  • Log in or register to post comments
A
arun jaykar गुरुवार, 06/11/2015 - 07:26 नवीन
How to control use of internet by verious apps on mobile ? And how to grant Internet access to a perticuler app only ? I want to stop access like Whatsapp and other apps to increse the internet speed while browsing and downloading.
  • Log in or register to post comments
स
सुनिल साळी गुरुवार, 06/11/2015 - 11:18 नवीन
जी पी एस नेव्हिगेशन साठी एक जबराट अप्लीकेशन -> ओ एस एम अँड इंटरनेटची गरज नाही. ऑफलाईन अप्लीकेशन आहे. मला किल्ले भटकंती करताना ह्याची खूप मदत होते. मात्र जी पी एस ची रेन्ज असणे आवश्यक आहे. आपण जी पी एस ट्रेल आधी ट्रेस करुन घेतल्यास रस्ता चुकन्याची सुतराम शक्यता नाही. एकदा वापरुन पहा.
  • Log in or register to post comments
र
रॉजरमूर Tue, 06/30/2015 - 20:36 नवीन
म्हणजे GPS साठी internet आवश्यक नाहीये का ? मग खालील परिस्थितीत या साठी उपयोग होईल का ? उदा . १. आपण रेल्वेत प्रवासात आहोत. मोबाईल ला रेंज नाही म्हणून इंटरनेट ही बंद आणि रात्री वरच्या बर्थ वर झोपलेलो आहोत अशा वेळी गाडी नेमकी कोणत्या स्टेशनावर आहे किंवा कुठल्या गावापाशी आहे याची नेमकी माहिती मिळत नाही . आणि बाहेर अंधारात ते दिसत ही नाही. जुन्या नोकिया च्या साध्या फोन मध्ये ही छान व्यवस्था होती मोबाईल मनोऱ्याच्या लोकेशन नुसार मोबाईल च्या होम स्क्रीन वरच आपण नेमक्या कोणत्या गावात अथवा गावाजवळ किंवा शहरातल्या कुठल्या भागात आहोत . हे अचूक कळायचे अर्थात तेव्हा फोनला इंटरनेट नव्हतेच त्यासाठी फक्त setting मध्ये जाऊन cell info display ON ठेवायला लागायचे . आताही android साठी याच नावाने किंवा तत्सम भरपूर app आहेत पण त्याला इंटर नेट आवश्यक आहे . २. मोबाईल ला जरी रेंज असली तरी मधल्या बऱ्याच गावात ३ G नसते त्यामुळे गुगल map व इतर app काम करत नाही . ३. आपण नेट pack टाकला नसेल किंवा संपला असेल तर ? अशा वेळेस अजून कोणती app आहेत जी स्थान दर्शक (location finder) म्हणून offline काम करू शकतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनिल साळी
क
कंजूस Wed, 07/01/2015 - 03:18 नवीन
ही अॅपस( फ्री ,विंडोज) फक्त GPS वर offline चालतात.तुमच्या android वर आहेत का पाहा. एक दोन MB ची आहेत. [app name] [developer name] 1 A route tracker...pure 22 2 GPS Sattelite ......KarhuKoti 3 Maps+...................Live Tiles 4 GPS Tracker.........Maiya 5 Track Finder GPS Free.....Apps Destination हे अॅप वाहनाचा वेग दाखवते Driving Forces..........5ST मॅपस ( google maps ,Nokia maps वगैरे) import करून वापरणारी बरीच अॅपस आहेत परंतू ती इंटरनेट वरच चालतात म्हणून देत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
आ
आनंदी गोपाळ Wed, 07/01/2015 - 05:16 नवीन
जीपीएससाठी इंटरनेट आवश्यक नाही. मात्र सॅटेलाईट फिक्स मिळणे आवश्यक असते. यासाठी प्रवास सुरू करण्याआधी जीपीएस सुरू करून ठेवावे लागते, हलत्या गाडीतून चट्कन फिक्स मिळत नाही. त्याचप्रमाणे हँडसेटच्या दर्जानुसार किती लवकर मिळेल ते ठरते. तात्पर्य, मोबाईलची बॅटरी बोंबलत राहते. ऑफलाईन नॅव्हिगेशन मॅप्सची अनेक अ‍ॅप उपलब्ध आहेत. मी सिजिक वापरतो. मात्र हे फुकट नाही. तसेच (एस्डी कार्डवर) जागाही भरपूर खाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
क
कंजूस Wed, 07/01/2015 - 06:51 नवीन
आताचे नवीन क्वाड कॅार प्रसेसर(क्वालकॅाम उत्तम) झटकन सटेलाइट लॅाक करतात.मी। दिलेली अॅप फक्त gps वरही मॅप (2G)टाकतात.Android बॅटरी किलर आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
क
कंजूस Wed, 07/01/2015 - 06:54 नवीन
आपण ट्रेन मधुन जातो तेव्हा केवळ उत्सुकता म्हणून मॅप पाहतो, driving guidance नको असतो.अर्थात फार डिटेल मॅप नसला तरी चालतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
र
रॉजरमूर Fri, 07/03/2015 - 18:23 नवीन
नाही हो . पूर्ण map बद्दल नाहीच म्हणत आहे . माझा प्रश्न लक्षात आला नाही बहुतेक . पूर्वी नोकीया त जसे आपण कुठल्या गावात आहे हे साध्या handset च्या होम स्क्रीन वर दिसत असे . ते मोबाईल टावर location दर्शवायचे अर्थात . पण त्यावरून कळायचे . तसे दर्शवणारे एखादे app आहे का ? इंटरनेट शिवाय चालणारं ? फ़क़्त गाव समजलं तरी पुरे . अनेकदा रेल्वे ने प्रवास करताना खास करून रात्री ही समस्या येते म्हणून विचारले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
आ
आनंदी गोपाळ Fri, 07/03/2015 - 19:39 नवीन
एक जुना नोकिया घेऊन टाका की लोकेशन पहाण्यापुरता? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
क
कंजूस Sun, 07/05/2015 - 02:45 नवीन
%%पूर्ण map बद्दल नाहीच म्हणत आहे . माझा प्रश्न लक्षात आला नाही बहुतेक .%% या अॅपमध्ये टुलबारमध्ये एक वर्तुळ असते ते दाबले की तुमचे लोकेशन च्या जागी मॅपवर मध्यवर्ती दिसत राहते. समजा मॅप नाही आला तर दोन तीन मिनिटे डेटा इंटरनेट ओन करा की सर्व मुख्य नावे येतात आणि वीस एक किमी चा मॅप मिळून जातो.५०kbफक्त जातात.एक दोनवेळा ट्राइअल करा कोणते अॅप चांगले आहे ते कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
आ
आनंदी गोपाळ Fri, 07/03/2015 - 19:41 नवीन
१. प्रत्येकाजवळ तो लेटेस्ट प्रोसेसर नसतो. २. उत्सुकता म्हणून बोगी अटेंडंटला विचारले तरी स्टेशन कोणते आले ते समजेलच की ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
A
arun jaykar गुरुवार, 06/11/2015 - 17:01 नवीन
मी मोबाईलवर २ जी इंटरनेट वापरतो. पण ब्राउजिंग करताना किंवा डाऊनलोडिंग करताना मोबाईल मधील व्हॉटस् अँपसारखी इतर अँपही इंटरनेट वापरतात.त्यामुळे मला मिळणारी स्पीड कमी होते. इंटरनेटचा इतर अँपकडून होणारा वापर बंद करुन हव्या असणार्या अँपपुरता वापर चालू ठेवणारे असे एखादे अँप प्ले स्टोअर वर किंवा इंटरनेटवर आहे का ? असल्यास कृपया माहिती द्यावी.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/12/2015 - 04:57 नवीन
मोबाइलच्या सेटिंग डाटा यूजेस मधे गेलो की ओव्हर व्ह्यू आणि आपण जी सिमकार्डवरील नेट वापरतो ते दिसतं त्यातील एक सलेक्ट केलं की त्या खाली मोबाइलवर चालणारी अप्लिकेशन ची नावं दिसतात उदा. वाट्सप त्यावर क्लिक केलं की त्या खाली एक पर्याय Restrict background data त्या समोरील चौकानात टिक केलं की तुमचं वाट्सअप बंद होऊन ब्राउजिंगला तुम्ही मोकळे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arun jaykar
क
कंजूस Fri, 06/12/2015 - 04:51 नवीन
ट्रेकींग चा रूट ट्रेस करण्यासाठी विंडोज वर एक A route tracker आहे इकडे Android वर आहे का पाहा.दोन अडिच तास वापरूनही बॅटरी पाच टक्केच उतरते.रूट सेव होतोच.ओफलाइन चालते.

Updated

  • Log in or register to post comments
स
सुनिल साळी Sat, 06/13/2015 - 13:04 नवीन
A route tracker Android वर आहे. पण यात आधीचे सेव्ह केलेले रुट इम्पोर्ट करता येत नाही. ओ एस एम अँड मध्ये अशी व्यवस्था आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
A
arun jaykar Fri, 06/12/2015 - 13:59 नवीन
बिरुटेसाहेब धन्यवाद. नवीन माहितीबद्दल आभार. पण यासाठी प्रत्येक वेळी बराच वेळ लागत आहे. एक सोडून इतर सर्वांचे इंटरनेट अँक्सेस बंद करणारे असे एखादे वन टच अँप आहे का ?
  • Log in or register to post comments
ज
जादू गुरुवार, 06/18/2015 - 14:21 नवीन
असे अँप आहे का? आपणास हवे त्यानाच फक्त कळेल की आपण वाट्सअप वर आहोत. म्हणजे आपला नंबर जरी कोणाकडे सेव्ह असेल तरी त्यास कळणार नाही कि हया व्यक्तीकदे (नंबरवर) वाट्सअप चालू आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 06/28/2015 - 13:35 नवीन
धाग्याला माहितीची विट लावत जा हो ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 06/30/2015 - 09:45 नवीन
OTG support हा हार्डवेअर बेस्ड आहे की सॉफ्टवेअर बेस्ड ? नवीन ओएस टाकून OTG वापरता येते का?
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Wed, 07/01/2015 - 06:51 नवीन
हे हार्डवेअर बेस्ड फिचर आहे... ओएस अपग्रेड करून काही फायदा नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कंजूस Sun, 07/05/2015 - 02:55 नवीन
हे OTG supported फोन असला तर -- १)फोनच्या मेमरीमधून पेन् ड्राइववर केबल जोडून डेटा पाठवता येतो का? अथवा/आणि २)पेन ड्राइवचा डेटा थेट फोन मेमरीत घेता येतो का? ३)समजा असं करता येत असेल तर फोन मेमरी करप्ट होण्याचा धोका वाढतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
स
सुहास झेले Sun, 07/05/2015 - 12:57 नवीन
हो दोन्ही प्रकारे डेटा ट्रान्स्फर करता येतो.... पेन ड्राईव्ह वायरस स्कॅन केलेला असेल तर काही प्रॉब्लेम होणार नाही... फोनमध्ये ही वायरस असू शकतो त्याचीही काळजी घेतलेली बरी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
श
श्रीरंग_जोशी Tue, 06/30/2015 - 20:58 नवीन
मिपावर सर्वाधिक प्रतिसाद संख्येचे पहिले तीन धागे:
  • वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का? - १,११३ प्रतिसाद
  • तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी... - ४७७ प्रतिसाद
  • इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत? - ४७४ प्रतिसाद
काल पर्यंत क्र. २ वर हा व काश्मीरचा धागा होता. आज काश्मीरच्या धाग्याला मागे टाकले. अर्थात काश्मीरच्या धाग्याला सक्तीची निवॄत्ती दिली गेली नसती तर चित्र वेगळे असते. या विक्रमाबद्दल धागाकर्ते सुहास झेले, सर्व प्रतिसादकर्ते व मिपावरील सर्व अ‍ॅन्ड्रॉइडप्रेमींचे हार्दिक अभिनंदन अन पंचशतकासाठी शुभेच्छा. बाकी मिपावर ब्लॅकबेरी १० वापरकर्ते एवढे वाढावेत की त्यासाठी स्वतंत्र धागा निघावा अशी इश्वरचरणी प्रार्थना :-) .
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Wed, 07/01/2015 - 06:53 नवीन
सर्वांना धन्यवाद... :) :) अवांतर : लवकरच ब्लॅकबेरी अ‍ॅन्ड्रॉईड फोन लौंच करत आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/28/2015 - 15:18 नवीन
अभिनंदन सुहाससेठ हा धागा मी खुपच इंजॉय केला. मला अँड्राईड काय आहे हे मला माहितीच नव्हतं तेव्हा याच धाग्यावर अँड्रॉइडची ओळख झाली. नोकीया हे पहिलं प्रेम होतं. त्यातही सीस फायली खटपट करुन कष्टम रोम टाकायचो. पण अँड्राईडने मला खुप समृद्ध केलं. चोथा केला अ‍ॅप्लीकेशन्सचा, मोबाईल अनेकदा हँग झाला. रात्र रात्र जागावं लागलं, फोन कंपनीची सर्वीस चांगली होती म्हणुन कधी कधी फोन सॉफ्टवेअर सर्वीस स्टेशनला टाकून मिळाले. काही हँडसेट म्हणजे किमान तीन कंपनीलाही झेपले नाही इतके कोमात गेले. काही रिप्लेस करुन दिले. एकुणच खुप मजा आली. देहभान हरवुन तांत्रिक युगात वावरायला मजा आली. थॅक्स..सुहाससेठ. >>>>> लवकरच ब्लॅकबेरी अ‍ॅन्ड्रॉईड फोन लौंच करत आहेत :) नही, नही, नही.....! असेच असेल तर आम्हीही या धाग्यावरुन रजा घेतो. :( कर चले हम फिदा... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
त
तुषार काळभोर Sat, 07/04/2015 - 11:14 नवीन
१) लुमिया विंडोज मोबाईलः बिल्ट-इन जे मॅप्स अ‍ॅप्लिकेशन दिले आहे, त्यात प्रीलोडेड मॅप्स येतात. जरी जुन्या वर्जन मध्ये नसले तरी, महाराष्ट्र+गोवा मॅप्स ~२५० एम्बी मध्ये डाऊनलोड होतात. प्रत्येक राज्यासाठी वेगळे पॅकेज आहे. काही राज्यांचे तर <५० एम्बी आहे. २) अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलः याच्यावर जे अ‍ॅप आहे ते मला लई आवडलंय. "Sygic" सर्व देशांसाठी वेगवेगळे मॅप्स घ्यावे लागतात. आधी सर्वच देशांचे मॅप्स विकत मिळायचे. पण भारतातून (कदाचित) शून्य प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी भारताचे मॅप्स फुकट उपलब्ध करून दिलेत. प्रॉब्लेम एकच आहे. ते राज्यांचे स्वतंत्र मॅप्स देत नाहीत. पूर्ण भारताचा नकाशा डाऊनलोड करावा लागतो. त्यामुळे साईझ जवळ जवळ ८०० एम्बी आहे. सिजिकचे मॅप्स, युजर इंटरफेस, नॅविगेशन इ सर्व उच्च दर्जाचे आहे. लुमियाचे बरेच बेसिक आहे. पण वरील दोन्ही सुद्धा ऑफलाईन चालतात. (मोबाईलची २जी/३जी रेंज जाऊद्या, सिम कार्ड नसलं तरी चालतात. डायरेक्ट आभाळाखाली असल्यास २-३ सेकंदात जीपीएस लॉक होऊन आपण नकाशावर दिसतो. चालत्या कारमध्ये १ मिनिटापर्यंत वेळ लागू शकतो.
  • Log in or register to post comments
र
रॉजरमूर Sat, 07/04/2015 - 17:57 नवीन
छान उपयुक्त माहीती Sygic बद्दल धन्यवाद .........!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
स
सुहास झेले Sat, 07/11/2015 - 18:38 नवीन
“इतिहासमित्र” हे इतिहासाचा अभ्यास करणार्‍या तरुणांकरीता बनवलेले अ‍ॅप असून, यामध्ये निरनिराळ्या हिंदू आणि मुसलमानी कालगणना, मोडी लिपीचा इतिहास, इतिहासाचा अभ्यास कसा करावा, शिवचरित्राची कालसूची, छत्रपती आणि पेशव्यांच्या मुद्रा, १२ महाल आणि १८ कारखाने, ऐतिहासिक आकडेमोड आणि त्याशिवाय कठीण शब्दांचे अर्थ दिले आहेत. हे अ‍ॅप माझे मित्र कौस्तुभ कस्तुरे ह्यांनी बनवले आहे. ज्यांचा उल्लेख राजवाडेंच्या लेखात केला होता. डाउनलोड लिंक - Itihaas Mitra
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 07/12/2015 - 03:06 नवीन
अॅपसंबंधी प्रश्न ( फक्त android app बद्दल नाही) न्युज पेपरची त्यांनीच बनवलेली अॅप एवढी चांगली का नसतात?उदाहरणार्थ: TOI ,The Hindu वगैरे .बातम्या लवकर आणि सर्व नाही येत. परंतू यांचे bookmark करून refresh करणे सोयीचे पडते!! दोष अॅपच्या कोडमध्ये असेल अथवा पेपरवालेच अॅप ला माहिती feed करत नाहीत?
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sun, 07/12/2015 - 08:31 नवीन
TOI, ndtv बद्दल तरी काही प्रॉब्लेम जाणवला नाही..एकदा अॅपडेटा डिलीट करून बघा सेटिंग्जमधून किंवा फ्रेश इंस्टॉलेशन करून बघा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
  • «
  • ‹
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा