Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी...

स
सुहास झेले
Fri, 11/23/2012 - 12:00
🗣 716 प्रतिसाद
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती. असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची. अ‍ॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी) सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!) आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम. १. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट. २. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते. ३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत. ४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता. ५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता. ६. मराठीत टाईप करण्यासाठी - अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन ब) PaniniKeypad Marathi IME क) AnySoftKeyBoard - Devanagari ड) Lipikaar Hindi Keyboard Free मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले. ७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो. ८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता. ९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर. १०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता. ११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त. १२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता. १३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :) १४. TED - Ideas worth spreading :) :) बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा. - सुझे !!

प्रतिक्रिया द्या
447147 वाचन

💬 प्रतिसाद (716)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/03/2014 - 09:20 नवीन
नवीन काही फोन मॉडल्स किंवा काही नवीन अप्लिकेशन्स ? डाटा सोफ्टवेअर केबल नावाचं अप्लिकेशन वापर्तोय एका मोबाइल मधुन वेगाने डाटा सेंड करणारं भन्नाट अप्लिकेशन वाटलं -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 02/03/2014 - 12:29 नवीन
ही आधी दिली आहेत की नाही ते लक्षात नाही...पण ट्राय मारावी अशी आहेत. AppLock:-हवं ते अ‍ॅप लॉक करण्यासाठी असलेल मस्त अ‍ॅप. File Hide Expert:-या अ‍ॅपचे नाव त्याचा उपयोग सांगतोय. :) AndroZip™ File Manager:-अ‍ॅन्ड्रॉइडसाठीचे 1 ZIP application and first Android archiver is with you since beginning of 2009.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज
जोशी 'ले' Tue, 02/04/2014 - 02:53 नवीन
https://play.google.com/store/apps/details?id=com.baloota.dumpster हे अॅप रिसायकल बिन प्रमाणे करते , हे अॅप डाऊनलोड केल्यानंतरचा सगळा डाटा जसे इमेजेस,आॅडियो, विडियो व डाॅक्युमेंट्स डिलिट झाले तर ते रिकव्हर करता येतात , रिकव्हरी साठी नेट कनेक्षन ची गरज नाहि...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/04/2014 - 12:34 नवीन
चांगलं वाटलं अ‍ॅप्लीकेशन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'
स
सुहास झेले Tue, 02/04/2014 - 10:52 नवीन
मराठयांच्या इतिहासासंबंधी काही अ‍ॅप्स... १. दुर्ग सह्याद्री - ह्यात किल्ल्यांचे नकाशे आणि छोटीशी टीपवजा माहिती आहे. अजून पुढील वर्जन येणे बाकी आहेत. तोवर त्या त्रुटी काढल्या जातील अश्या अपेक्षा करूया. २. इतिहास मित्र - हे अ‍ॅप गुगल ड्राईव्हवर अपलोड केलेले आणि आणि सेफ आहे. काळजी करू नका. ह्यात मोडी, ऐतेहासिक नोंदी, कालगणना आणि किल्ल्यांची माहिती आहे. माझ्या मित्राने हे अ‍ॅप डेव्हलप केलंय आणि तूर्तास बेसिक लेव्हलला आहे, पण लवकरच अपडेट होणार आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/04/2014 - 11:00 नवीन
ह्या दोन्ही कल्पना खूप आवडल्या. तुमच्या मित्राला अभिनंदन आणि धन्यवाद पोहोचवावे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 02/04/2014 - 12:07 नवीन
मी ओपन सोर्सवाला असल्याने (आणि खिसा फार गरम नसल्याने) सफरचंद,खिडक्या वगैरेच्या नादाला कधीच लागत नाही. आणि अ‍ॅप्सबद्दल म्हणाल तर गेम्सच जास्त डाउनलोड करतो पोरांना खेळायला. १.अँगी बर्ड २. कट द रोप ३. टेंपल रन सध्या वापरतोय http://swipetelecom.com/store/index.php?route=product/product&product_id=78
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 02/04/2014 - 12:23 नवीन
अवांतर :- गेम्सच जास्त डाउनलोड करतो पोरांना खेळायला. १.अँगी बर्ड सध्या रागावलेला पक्षी एका वेगळ्याच वादात सापडला आहे ! NSA spying revelations मुळे या गेमवर सगळ्यांची नजर वळली आहे,परंतु कंपनीने या बाबत सगळ्या आरोपांचा इन्कार केला आहे. Image removed. {चित्र जालावरुन घेण्यात आलेले आहे.} अधिक इथे :- Angry Birds firm calls for industry to respond to NSA spying revelations
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
स
सुहास झेले Sun, 02/09/2014 - 05:42 नवीन
मेसेंजर अ‍ॅप्सची महाप्रचंड लाट आलीय... त्यात अजून एक भर टेलिग्रामची वापरायला घेतलंय. इंटरफेस वगैरे WA सारखंच...पण डेटा इंक्रीप्शन आणि सिक्युरिटी हा त्यांचा दावा आहे. वापरतोय सध्या https://telegram.org/faq Q: How is Telegram different from WhatsApp? Unlike WhatsApp, Telegram is cloud-based and heavily encrypted. As a result, you can access your messages from several devices (including desktops!) and share an unlimited number of photos, videos and documents (doc, zip, mp3, etc). Thanks to our multi-data center infrastructure and encryption, Telegram is also faster and way more secure. On top of that, Telegram is free and will stay free — no ads, no subscription fees, forever.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 02/09/2014 - 16:52 नवीन
मी ऑलरेडी टेलीग्रामवर स्वीच झालोय, काही जण आधीच स्वीच झाले आहेत तर काही जण यावर विचार करत आहेत.हे व्होट्सअ‍ॅप सारखेच पण सिक्युर असल्याने स्वीच व्हायचे फायदेच आहेत. जे विचार करत आहेत त्यांच्यासाठी खाली काही दुवे देतो आणि ते वाचुन त्यांनी स्वीच व्हावे का ? यावर नक्कीच करावा. https://telegram.org/faq#q-how-secure-is-telegram https://telegram.org/faq#q-get-technical-already https://telegram.org/faq#q-how-are-secret-chats-different टेलिग्रामवाल्यांना आपल्या त्यांच्या एनक्रीप्शन बद्धल एव्हढी खात्री आहे की त्यांनी जो हे एनक्रीप्शन ब्रेक करेल त्याला $200,000. चे बक्षिस जाहीर केले आहे. व्होट्सअ‍ॅप सारखेच पण सिक्युर असल्याने स्वीच व्हायचे फायदेच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
आ
आत्मशून्य Mon, 02/10/2014 - 18:45 नवीन
टेलिग्रामवाल्यांना आपल्या त्यांच्या एनक्रीप्शन बद्धल एव्हढी खात्री आहे की त्यांनी जो हे एनक्रीप्शन ब्रेक करेल त्याला $200,000. चे बक्षिस जाहीर केले आहे.
रोचक. प्रयत्न करुन बघावा म्हणतो. दुवा देता येइल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Mon, 02/10/2014 - 18:52 नवीन
दुवा देता येइल काय ? $200,000 to the hacker who can break Telegram हाच हवा आहे ना ? की दुसरा कुठला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
म
मदनबाण Mon, 02/10/2014 - 18:55 नवीन
अजुन एक हे $200,000 बीटीसी मधे आहेत.{बीटीसी = Bitcoins } ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
आ
आत्मशून्य Mon, 02/10/2014 - 18:57 नवीन
याआधी टेलिग्राम वापरले नाहीये, पण ज्या पध्दतीने रिअलटाइअम ट्राफिक दाखवत आहेत ते डिक्रीप्ट करायला मजा येते आहे. बघुया काय शिकता येते ते. की शिकवायची संधी मिळते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Mon, 02/10/2014 - 20:44 नवीन
२-४ गोष्टी आम्हाला बी सांगा... यातल जास्त काही कळत नाही मला ! पब्लिक की आणि प्राव्हेट की इतकच काय ते माहित. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
अ
अमोल मेंढे Mon, 03/10/2014 - 13:39 नवीन
व्हॉट्सप मध्ये पीडीएफ डॉक्युमेंट पाठवता येत नाही..ते टेलीग्राम मध्ये पाठवता येते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Sat, 03/22/2014 - 05:10 नवीन
अच्छा हे माहित नव्हते ! सही आहे मग. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल मेंढे
म
मदनबाण Mon, 02/10/2014 - 05:42 नवीन
आजचे अ‍ॅप :- NoRoot Firewall :-तुमचा फोन रुट केलेला नसेल तरी सुद्धा तुम्हाला फायरवॉल वापरणे या अ‍ॅपमुळे शक्य आहे. हे वापरण्यास अगदी सोप्पे आहे. तुमचा फोन जेव्हा नेटला कनेक्टेड असतो तेव्हा तुमच्या फोन मधील बरीचशी अ‍ॅप त्यांची { तुमच्या फोन मधली त्यांनी जमवलेली} माहिती बाहेर पाठवतात. तुम्हाला फक्त हव्या त्या अ‍ॅपनाच जर नेट अ‍ॅक्सेस द्यायचा असेल तर फायरवॉलचा उपयोग करता येईल. सध्या मी हे वापरत आणि याचा परफॉर्मन्स एकदम चंगा वाटला ! ;)
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Mon, 02/10/2014 - 15:45 नवीन
सहीच अ‍ॅप.. आवडले मला. धन्स बाणा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
र
रुस्तम Mon, 02/10/2014 - 18:06 नवीन
Prey lets you keep track of your laptop, phone and tablet whenever missing, whether you're in town or abroad. Open source, proven software with hundreds of documented recoveries all around the world. http://preyproject.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 02/10/2014 - 18:36 नवीन
@ निलापी हल्ली जवळपास प्रत्येक अँन्टीव्ह्यारस {अ‍ॅन्ड्रॉइडसाठी बनवलेले} मधे हा ट्रॅक अँड फाइंडचा ऑप्शन दिलेला असतो. मात्र यासाठी सेटिंक मध्ये जाउन Device Administration मधल्या Device administrators या पर्याया जाउन त्या अ‍ॅप्लिकेशनला {अ‍ॅन्टीव्हायरस आणि तस्तम}सिलेक्ट करावे लागते. हे केल्यावर तुम्ही तुमचा फोन हरवल्यास रिमोटली त्याचा डेटा वाईप करु शकता,अलर्ट अर्लाम सुरु शकता, त्याला लोकेट करु शकता,त्याला लॉक करु शकता. विशेष सुचना :- जर अश्या प्रकारचे अ‍ॅप तुम्हाला तुमच्या फोन मधुन अनइनस्टॉल करायचे असेल तर Device administrators जाउन ते अ‍ॅप्लिकेशन अनचेक करावे लागेल {जर चेक केले असेल तर} नाहीतर हे अ‍ॅप अनइनस्टॉल होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम
र
रुस्तम Tue, 02/11/2014 - 11:33 नवीन
नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मनिष Tue, 02/11/2014 - 07:04 नवीन
फोन कुठे विसरला किंवा कुठे आहे हे शोधायचे असल्यास...जीपीएस वरून लोकेशन बरेच अचूक मिळते. तसेच फोन सायलेंट मोड वर ठेवून सापडत नसल्यास हे छोटेसे अ‍ॅप वापरुन रिंग देता येते - https://play.google.com/store/apps/details?id=com.orisyssoft.phonefinder
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/22/2014 - 13:54 नवीन
टेलीग्राम चा काही फीडब्याक ? वाट्सअ‍ॅप आणि टेलीग्राम यांच्यात येत्या काळात स्पर्धा लागून आपल्याला फायदाच होईल असे दिसते. काल काही तरी टेलीग्राम वर काही तरी बग आला होता आणि माझ्या काँटेक्ट लिष्ट मधे नसलेले मित्र मला अ‍ॅड झाले होते अर्थात टेलीग्रामचा त्याबद्दल युजर्सना मेसेज आला होता की आम्ही यावर काम करतोय म्हणून. बाकी वाट्सअ‍ॅप फेसबूकने घेतल्याने नवीन काय सुविधा मिळतील असे वाटते ? अँड्राईडचे काही नवे अ‍ॅप काही फंडे आले असतील तर सांगा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sat, 02/22/2014 - 14:14 नवीन
टेलीग्राम आवडलं मला... बाकी फेसबुकने WA घेतल्यावर काही नवीन बदल अपेक्षित आहेत... आज रिलीज झालेल्या अपडेटमध्ये लास्ट सीन डिसेबल करायची प्रायव्हसी सेटिंग उपलब्ध करून देण्यात आलीय... http://maharashtratimes.indiatimes.com/infotech/mobile/whatsapp/articleshow/30844810.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/22/2014 - 16:02 नवीन
न्यु व्हर्जन वाट्सअ‍ॅपची लास्ट सीन डिसेबलची आयड्या आवडली. आजच ट्राय केले. ऑनलाईन हाईड झालं पाहिजे हो.:) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
म
मदनबाण Sat, 02/22/2014 - 17:15 नवीन
टेलीग्राम चे सातत्याने अपडेट येत आहेत, पूर्वी पेक्षा जरा स्लो झाले आहे असे वाटते, बहुधा युजर डाटाबेस वाढल्याने तसे होत असेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 02/26/2014 - 04:53 नवीन
आजचे अ‍ॅप :- CM Security - Antivirus FREE वापरायला अगदी सोपे,सिस्टीमवर एकदम लाईट आणि फास्ट. यातली vulnerabilities फिक्स करण्याचा फायदा झाला,माझ्या मोबल्यात एसएमएस बद्धल असलेली vulnerabiliti याने फिक्स केली.
  • Log in or register to post comments
ज
जोशी 'ले' Wed, 02/26/2014 - 05:03 नवीन
vulnerability बद्दल जरा विस्कटुन सांगाल काय? धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 02/26/2014 - 05:51 नवीन
यावर CM Security वे उत्तर होते :- The "SMS Phishing Vulnerability" means your android system has a Vulnerability(flaw), which can be used by other application on your phone to insert an incoming SMS to your inbox, the content and sender could be arbitrary, this will be very dangerous, if it's exploited by malware. And fix solution of CM Security is dynamic protection, while malware trying to use this system's flaw and send fake SMS to you, CM Security will help you to block it and remind you it's not a real SMS from the SMS's sender संदर्भ :- CM (Cleanmaster) Security - Free Antivirus APP Developed by Clean Master Team तसेच अधिक इथेही वाचता येइल :- Researcher uncovers Android SMS phishing vulnerability
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'
ज
जोशी 'ले' Wed, 02/26/2014 - 06:14 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 02/26/2014 - 07:26 नवीन
बाणा... मस्त आहे CM Security एप्लीकेशन. धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 02/28/2014 - 05:13 नवीन
भाग २ सुरू करावा. ट्रॅक करणे अवघड झालेय.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 03/05/2014 - 11:15 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
द
देव मासा Mon, 03/03/2014 - 17:57 नवीन
हाच धागा असावा, नवीन एप्लीकेशन साठी मी इथेच येत असतो , इतर लोक पण येत असावे
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Mon, 03/03/2014 - 18:07 नवीन
हो... शेवटच्या पानावर जाऊन तुम्हाला नवीन नवीन एप्लीकेशन्स शोधणे कठीण नाही... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देव मासा
N
nandan Tue, 03/04/2014 - 04:41 नवीन
एवढे महाग फोन चोरीला वा हरवले कि खूप वाईट वाटते । ते हुडकून काढण्यासाठी अथवा डाटा पुसून काढण्यासाठी aaps आहेत क। जेणेकरून डाटा कुणालाही मिळणार नहि.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 04/09/2014 - 00:29 नवीन
मी Where is My Droid हे अ‍ॅप वापरलं आहे. इतरही बरेच play.google.com वर उपलब्ध आहेत, उदाहरणार्थ phone finder हे एक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nandan
अ
अद्द्या Tue, 03/04/2014 - 10:30 नवीन
काल XOLO A500S घेतला . Android 4.2.2 हाये . आत्ता त्यात . True Caller , Flash Light , WhatsApp, Temple Run 2 , App Lock , UC Browser , Misalpav , Clean Master, MX Player, या गोष्टी आहेत . अजून काही apps गरजेच्या असल्या तर सुचवा मंडळी . धागा पूर्ण वाचलाय . CM Security आहे चांगलं ? इतरही apps सुचवा राव
  • Log in or register to post comments
द
देव मासा Tue, 03/04/2014 - 22:07 नवीन
राव साहेब News Hunt , इन्स्टोल करा, मराठीत नेमक्या तेवढ्याच बातम्या फ्लाश करणारे उत्तम aaplication आहे,
  • Log in or register to post comments
ज
जोशी 'ले' Fri, 03/07/2014 - 17:40 नवीन
Take a look at "MoboMarket" - https://play.google.com/store/apps/details?id=com.dragon.android.mobomarketlite नोकिया सारख्या Android काही मोबाइल्स मधे प्ले स्टोर नाहियेत त्यासाठी मोबोमार्केट चांगला पर्याय.. तसेच बरेचसे apps गुगल पाॅलिसी नुसार प्लेस्टोर मधे नाहियेत जसे फ्लॅपिबर्ड , युट्युब डाउनलोडर सारखे apps मोबोमार्केट मधे उपलब्ध आहेत...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 03/08/2014 - 04:44 नवीन
Google Play Newsstand :- Google Current ची जागा या अ‍ॅप ने घेतली आहे. फ्लीपबोर्ड सारखेच आहे. या बद्धल अधिक इथे :- Google Currents app officially replaced by Newsstand
  • Log in or register to post comments
द
देव मासा Mon, 03/10/2014 - 20:14 नवीन
आय फोन साठी जसे स्केच बाय ५३ अपलिकेशन आहे , तसेच एखादे अ‍ॅन्ड्रॉईडसाठी अपलिकेशन आहे का ? अर्थात मोफत *mail1* *WRITE* *MAIL*
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Fri, 03/14/2014 - 06:40 नवीन
Autodesk SketchBook Mobile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देव मासा
भ
भाते Fri, 03/14/2014 - 05:49 नवीन
आत्ताच मटामध्ये हि बातमी वाचली.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Fri, 03/14/2014 - 06:41 नवीन
इंटरेस्टिंग... जितकी जास्त स्पर्धा तितक्या सुविधा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/19/2014 - 15:15 नवीन
फेसबूक मेसेंजर ने फ़ेसबूक टू फ़ेसबूक कनेक्ट असणा-यांना मोबाईलवरुन फ़ूकट कॉल करता येतो हे आपल्याला माहिती असेल तरी माहिती डकवून ठेवतो. बाकी, माझ्या मोबाईल मधे घुसण्याचा समुद्राच्या लाटेला मोह आवरला नाही. मोबाईल जरा अशक्त झाला आहे. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले गुरुवार, 03/20/2014 - 05:16 नवीन
NewsHunt हे अ‍ॅप माहित असेलच, पण ह्यांच्या ई-बुक सेक्शनमध्ये तुम्हाला ऐतेहासिक, जुनी मराठी पुस्तके मात्रशुल्क १ रुपया देऊन डाउनलोड करता येतात. ही पुस्तके तुम्ही ऑफलाईनदेखील वाचू शकता.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Fri, 03/21/2014 - 22:57 नवीन
मी इमोर्टल्स ऑफ़ मेलुहा मराठीत ज्याची क़ीमत 300 आहे फक्त एक रुपायला विकत घेतले. आणि त्यांचा बुक रिडर्चा नाईट मोड़ इतका मस्त आहे. भारीच प्रकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
स
संपत Wed, 03/26/2014 - 07:14 नवीन
मी आता चेक केले. रु. १५० ला अहे. मध्ये काही स्पेशल स्किम होती वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा