Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि
Wed, 01/14/2015 - 22:54
🗣 1423 प्रतिसाद
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/15/2015 - 13:30 नवीन
मी नाखुकाकां कडून सदर हकिगत प्रथम ऐकली,तेंव्हा तिथेच मनातून नमस्कार केलेला होता. आज आदरपूर्वक पुन्हा करतो. :) __/\__ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
र
रेवती गुरुवार, 01/15/2015 - 14:20 नवीन
नाखु, तुम्ही ग्रेट आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
य
यशोधरा Sat, 01/17/2015 - 03:08 नवीन
तुमचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक. बहिणीबद्दल वाचून अतिशय वाईट वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
पदम गुरुवार, 01/22/2015 - 13:54 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/15/2015 - 05:20 नवीन
राग मानणार नसाल तर एक बोलु का मुवीकाका ?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
एकदा मुलाला शिक्षण दिल्यानंतर परत पुढे नोकरी मिळवुन देण्यासाठी फ्लॅट मिळवुन देण्यासाठे जर तुम्हालाच प्रयत्न करावे लागत असतील तर तर तो मुलगा नक्कीच लग्नाला लायक नाहीये . बाकी माझ्या बॅचमधील कित्येक जण २८-२९ वय स्वत्चा स्वकर्त्रुत्वावर घेतलेला फ्लॅट तोही पुणे / पिंपरीचिंचवड भागात , आय १० स्विफ्ट वॅगनार सारखी गाडी शिवाय घरची काहीही जबाबदारी नाही , इन्फोसिस टीसीएस महिन्द्रा सारख्या मोठ्ठ्या कंपनीत नोकरी असे सारे असुनही पोरी नकार देतात हा खरा मोठ्ठा प्रॉब्लेम आहे . माझे वैयक्तिक मत असे की मुळातच लग्न संस्था रीडंडंट आहे पण तरीही , लग्न करायचे ठरल्यास लव्हमॅरेजच करावे मस्त स्वत्च्या कर्तुत्वावर पोरगी पटवावी आणि आलात तर तुमच्यासह , नाहीआलात तर तुमच्याशिवाय आणि विरोध कराल तर विरोध मोडुन मी ह्याच पोरीशी लग्न करणार असे पोरीच्या घरचांना सांगावे ठणकावुन अन मग जोरात लग्न करावे ..... माझ्या एका जवळच्या मित्राने काय फुल्ल्टु फिल्मी पोरीला पळवुन लग्न केलेय नुकतेच ... त्याची आठवण झाली =) ( अर्थात हे सारे करण्यासाठी पोरगी २००% आपल्या बाजुला असावी लागते ह्यासाठी ) अवांतर - मुली कशा पटवाव्यात ह्या वर लेख लिहा ना कोनी तरी
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/15/2015 - 06:13 नवीन
प्र.गो. >>> आंम्ही टुमच्याशी,भरपूर शहमत हाय! :D @अवांतर - मुली कशा पटवाव्यात ह्या वर लेख लिहा ना कोनी तरी. >>>सदर क्रीयमाणाचे संचित,आपल्यापाशी(च) आहे. =)) तेंव्हा हे काम आपल्यापेक्षा दुसरा कोन बरे क्रू शकेल.!? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
य
यसवायजी गुरुवार, 01/15/2015 - 08:20 नवीन
गिर्जाकाका, कवापास्न प्रतिकशेत हाय या धाग्याच्या. येउद्या लव-कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/15/2015 - 09:49 नवीन
आता बुवांच्या पुढच्या लेखमालेचा विषय... "गांधर्व विवाहाचा शास्त्रिय विधी आणि चालूरिती... आपलं... चालीरिती". कर्तव्य असणार्‍यांनी तिकडे वाट पहाता पहाता इकडे या लेखाचीही वाट पहावी :) ;) प्रगोसाहेब, होऊन जाउन्द्या. तुम्ही या प्रकल्पाचे प्राईम मुव्हर आहात ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
न
निनाद मुक्काम … Fri, 01/16/2015 - 00:57 नवीन
त्यापेक्षा पुढचा धागा मी काढतो लिविंग रिलेशन शिप नंतर लग्न सगळ्यात सोयीस्कर उपाय स्वानुभवाच्या जोरावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 01/15/2015 - 09:52 नवीन
प्रगो...येउंद्या एक फर्मास लेख....त्यातले उपाय उपयोगी पडले तर तुम्हाला पार्टी जंगी...!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ब
ब़जरबट्टू गुरुवार, 01/15/2015 - 11:43 नवीन
एकदा मुलाला शिक्षण दिल्यानंतर परत पुढे नोकरी मिळवुन देण्यासाठी फ्लॅट मिळवुन देण्यासाठे जर तुम्हालाच प्रयत्न करावे लागत असतील तर तर तो मुलगा नक्कीच लग्नाला लायक नाहीये . यातला नोकरी मुद्दा बरोबर आहे, म्हणजे ती स्वकर्तुत्वावर मिळवावी लागते, पण घर खरच जमेल का ? पुण्याचेच उदाहरण पहा, साधा २ बेडरुमचा फ्ल्याट ५० लाखाच्या पुढे जातोय, पगार ५ लाखापासुन २२ वर्षी सुरु झाला, तरी नुस्ते कर्ज भेटायची लायकी यायला अजून ७ एक वर्ष लागतील, तोपर्यंत तो फ्ल्याट कमीतकमी कोटीच्या वर गेला असेल. कसे गणित सुटणार ? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ज
जेपी गुरुवार, 01/15/2015 - 05:53 नवीन
लईच मोठा आवाका आहे लेखाचा..त्यामुळे आपला पास. (पंरपरे सोबत आधुनीक विचारांचा) जेपी
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 01/15/2015 - 06:06 नवीन
जाणवलेले काही विरोधाभास; काही अतिरेक. १) अतिरेक. एका मुलीने अपेक्षांमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं होतं. महिना एक लाख 'टेक होम' पगार हवा. आपलं शिक्षण? एम कॉम. कुठल्या तोंडाने??? असो. २) अतिरेक. आणखी एक स्पष्ट अट. 'सेडान किंवा एसयूव्ही' गाडी हवी. म्हणजे मग नवरा बोकड असला तरी हरकत नसावी. ३) विरोधाभास. या एक लाख, एसयुव्ही किंवा टेरेस फ्लॅटच्या अटीवाल्या मुलींकडे (कुणाच्या रुपावर बोलू नये याची जाणीव आहे तरीही) रूप-रंग, संपत्ती, शिक्षण (गुण-दोषांची कल्पना येत नाही त्यामुळे तो उल्लेख टाळतो.) यापैकी काहीच नव्हतं. मग ते फक्त वराकडून मुलाकडूनच अपेक्षित कसं असू शकतं? त्यांनी पगाराची फिगर स्पेसिफाय केली, मुलाने त्यांची फिगर स्पेसिफाय केली तर चालेल का? (करत असतील तर माहीत नाही) म्हणजे क्लियरकट, ३६-२४-३६ हवी. ४) विरोधाभास. एकीकडे समानतेचे गोडवे गाणा-या आपल्या समाजाला, त्यातील मुलींना, मुलाचा पगार मुलीपेक्षा जास्त कसा लागतो? म्हणजे पुरुषाची सुपिरिऑरिटी मान्य आहे नाही का? 'मुलगी आयटीत आहे, बारा पंधरा लाखाचं पॅकेज आहे, आता मुलगा जी एम वगैरेच बघावा लागेल' अरे का? सोयीस्कर इक्वॅलिटी चं हे नमुनादाखल उदाहरण. असो. अशाच बाजू वधूपक्षाच्याही असू शकतील. एकंदरित, हे आजकाल 'डील' झालंय डील. आणि 'फील' गेलाय त्यातला. चेकलिस्ट घेऊन जायचं, टिक टिक टिक. चला. जमलं !
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 01/15/2015 - 06:11 नवीन
एक प्रामाणिक प्रश्न... असल्या काहीच्या काही अपेक्षा ठेवणार्‍या मुलींची (किंवा मुलांचीही) लग्न होतात का? म्हणजे त्यांच्या अपेक्षेमध्ये बसणारी मुलं त्यांना का निवडतील? बाकी मुलाचा पगार मुलीपेक्षा जास्तच हवा ही मागणी मलाही भंपक वाटते.. (आणि बायकोचा पगार आपल्यापेक्षा जास्त आहे हे पचवु शकणारे पुरुष (किंवा सगळं सासरच..) कसे असतील ह्याचं कुतुहल...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 01/15/2015 - 09:17 नवीन
दोन्ही बाजूने संसाराची गृहीतक तपासून घेण्याची गरज आहे . आधुनिक काळात वावरताना जुनाट मानसिकता जपण्याच्या अट्टाहास सुटला पाहिजे. जास्त शिकलेली व भरपूर कमावणारी मुलगी लग्नाच्या बाजारात चिंतेचा विषय झाल्याची उदाहरणे देखील पहिली आहेत. आता हिला साजेसा मुलगा आमच्या समाजात कुठून शोधायचा असा प्रश्न पालकांना पडतो. ह्या देशात इंदिरेचे कर्तृत्व असलेल्या महिलेच्या नवर्‍यावर फिरोज व्हायची पाळी न येवो असे मनापासून वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 01/15/2015 - 19:47 नवीन
मी नोकरी करतो आणि बायकोचा व्यवसाय आहे आणि तिची प्राप्ती माझ्यापेक्षा जास्त आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. आणि तिच्या यशात माझं काहीही contribution नाही. तिने स्वतःच्या जोरावर हे केलेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सुबोध खरे Fri, 01/16/2015 - 06:33 नवीन
आयला लई नशीबवान आहात कि. आमची बायको भरपूर पैसे मिळवायला लागली तर मी तर निवृत्त होऊन थंड घरी बसेन. म्हणजे आत्ता "मला" पुरतील तितके पैसे तिला मिळतात पण "तिला" पुरतील एवढे नाहीत. आणि नवरा मिळवतो आहे म्हणून ती जास्त कष्ट करीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
शेखर काळे Sun, 01/18/2015 - 06:52 नवीन
पुरुष पुरेसं कमावतात म्हणून बायका 'थंड' घरी बसतात का ? तुम्ही बायका करतात ती कामे करालंच ही अपेक्षा आहे ... - शेखर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 01/19/2015 - 14:32 नवीन
काळे साहेब मी माझ्या मुलांना अन्न भरवण्यापासून, झोपवणे, त्यांचे पार्श्वभाग धुण्यापर्यंत सर्व कामे केली आहेत. मुलांना जन्म देणे आणि दुध पाजणे हे शक्य नाही त्याला माझा नाईलाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर काळे
ग
गिरकी गुरुवार, 01/15/2015 - 09:30 नवीन
असे अमुक एक रक्कम टेक-होम आणि रेडीमेड सुखसोयी असलेलाच मुलगा पाहिजे असे म्हणणे तितकं बरोबर नाही. पण अजूनही अरेंज म्यारेज पद्धती मध्ये मुलाचे गुण अवगुण, प्रगल्भता आणि मनगटातली ताकद कळायचं बऱ्यापैकी अवघड असतं. मग अशावेळी मुलीने आयुष्य जिथे घालवायचे आहे तिथे किमान आर्थिक स्थैर्य असावे अशी अपेक्षा ठेवली तर काय चूक आहे ? आणि जर ती मुलगी स्वत: कमावती नसेल तर हे स्थैर्य त्या मुलाच्या पगारावरच अवलंबून असतं. अशावेळी शिक्षण आणि सध्याचा पगार याचा अट म्हणून वापर केला जाणे स्वाभाविक आहे. प्रेम विवाह करताना, कुठल्याही अपेक्षा न ठेवता, फक्त त्या मुलाच्या पात्रतेवर विश्वास ठेवून डोळे झाकून लग्न केलेल्या कित्येक जणी मला आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
विटेकर गुरुवार, 01/15/2015 - 06:28 नवीन
अपेक्षा मुलांच्या नाही , त्यांच्या आई- बापांच्या वाढल्या आहेत ! २०- २२ वर्षाच्या मुला- मुलीला जोडीदार कसा असावा हे नीट सांगाता येईल , पुढच्या आयुष्यात नेमक्या काय अडचणी येऊ शकतील याचे विज्युयलायजेशन करता येईल इतकी म्याच्युरिटी खरेच असते का हो ? ( मी बुद्धी म्हणत नाही ) आई- बापच मुलांच्या अपेक्शांना नकळत खत-पाणी घालत असतात .... आपली अपुरी स्वप्ने मुलांनी पुरी करावीत , आपण ज्या खस्ता खाल्ल्या त्या मुलांनी खाऊ नयेत , त्यांना नकळत शक्य तर विना कष्टाचे च मिळावे ही अपेक्षा असते आई- बापाची !! त्यात "मुलीची आई" हा कहर आहे ! ल्ग्नाळू मुलांना माझा एक अनाहूत सल्ला आहे .. पुण्यात रहात असाल तर पुण्यातील मुलगी अजिबात करू नका. तुमची सासूच तुमचे घर चालवेल. रोज ऑफिस ला जाताना पाळणाघर/ तिचे माहेर>>> तिचे ऑफीस >>> तुमचे ऑफिस आणि परत येताना याच क्र्माने उलट यावे लागेल .... रोज ...होय रोज ! मुलीच्या संसारात आईची लूड्बूड हा इंडीयन पिनलकोड प्रमाणे दखलपात्र गुन्हा म्हणून जाहीर करावा अशी माझी जाहीर मागणी आहे , वाट लावतात बायका लेकीच्या संसाराची ! सॉरी, अपवाद असतील असे वाटत नाही ! मला आश्चर्य वाटते, साठी नंतर ही या बायकांची संसाराची हौस संपत नाही. मी ( आणि विटुकाकू सुद्धा ) आत्ताच कंटाळलो आहोत ..अजून १४ वर्षे नोकरीची आहेत (पण आम्ही गमतीने १४ वर्षाचा वनवास असेच म्हणतो !) समर्थांनी म्ह्टले आहे .. संसार मुळीचा नासका .... त्यात सुख शोधणे हा मूर्खपणा आहे !
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 01/15/2015 - 06:38 नवीन
मुलीच्या संसारात आईची लूड्बूड हा इंडीयन पिनलकोड प्रमाणे दखलपात्र गुन्हा म्हणून जाहीर करावा अशी माझी जाहीर मागणी आहे , वाट लावतात बायका लेकीच्या संसाराची ! सॉरी, अपवाद असतील असे वाटत नाही !
काका जोक करताय असं धरुन चालते हं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
आ
आदूबाळ गुरुवार, 01/15/2015 - 08:30 नवीन
काका जोक करत नसावेत. मी यासंबंधी ऐकलेल्या कथा भयावह आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
च
चौकटराजा गुरुवार, 01/15/2015 - 09:40 नवीन
मुलीचे आईवडिल अलीकडे मुलीच्या संसारात जरा जास्तच लक्ष घालतात. माझ्या सासूनेही ते घातले. मलाही राग येत असे. आज तीन दशकानी मला असे मात्र अनुभवास आलेय की आमच्या " आई" खरंच जबरा माया़ळू आहेत. त्यांचा तो स्वभावच आहे. पण इतर उदाहरणात असे होण्याचे कारण कदाचित असेही असेल की मुलगा लग्न झाले की भावाचा भाउ न रहाता कोणाचा तरी मेहुणा कोणाचा तरी साडू पयला होतो. तो सासरी जातो मनाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
पिलीयन रायडर गुरुवार, 01/15/2015 - 09:53 नवीन
अहो पण किती ते जनरलायजेशन?? आजवर सुना सासरी जाउन रहात होत्या, तेव्हा आयुष्या नवर्‍याच्या आई बरोबर घालवावं लागत होतं.. त्या छळाच्या कथाही भयावहच आहेत.. अशाही मुलींच्या आया आहेत ज्या लेक-जावयाच लेकरु दिवसभर सांभाळतात... मला कळत नाही, एकाच शहरात मुलगा आई-वडीलांना सोडून दुसरं घर करुन राहिला तर न्युज होते.. तिथे मुलगी आई-बापाला सोडून रहातेच ना.. अशा वेळी तिच्या माहेरी भेट देणं ही एवढी चर्चेची गोष्ट कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ गुरुवार, 01/15/2015 - 10:48 नवीन
नाही नाही, जनरलायजेशन करण्याचा विचार नव्हता. आपण असल्या कथा ऐकतो तेव्हा त्यात सिलेक्शन बायस असणं स्वाभाविक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 01/16/2015 - 04:41 नवीन
सिलेक्शन बायस बद्दल सहमत.. पण म्हणुनच बोलताना आपण "हेच आणि असंच असतं" असं नाही ना बोलत.. जगात सगळ्याच प्रकारची माणसं आहेत.. एकच एक गोष्ट खरी असु शकत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ब
ब़जरबट्टू गुरुवार, 01/15/2015 - 11:57 नवीन
मुलीच्या संसारात आईची लूड्बूड या वाक्याचा अर्थ " मला हा असा फाटका औरंगजेब मिळाला हो, कध्धी पिक्चर नाही, का भेळ नाही. कधी शिंगणापूर साधी पण विचारले नाही ग तुझ्या बापाने, पण तू नक्की जावैबापूच्या मागे लागुन शिंगापूर तरी करुन घे हो" असा होतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
आ
आदूबाळ गुरुवार, 01/15/2015 - 12:08 नवीन
फाटका औरंगजेब
:)) जबरदस्त वाक्प्रचार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/15/2015 - 12:18 नवीन
अगदी अगदी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ब
बोका-ए-आझम Fri, 01/16/2015 - 19:30 नवीन
फाटका औरंगजेब हा लई म्हणजे लईच भारी प्रकार आहे!रोफललो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
प
पियुशा गुरुवार, 01/15/2015 - 10:59 नवीन
मुलीच्या संसारात आईची लूड्बूड हा इंडीयन पिनलकोड प्रमाणे दखलपात्र गुन्हा म्हणून जाहीर करावा अशी माझी जाहीर मागणी आहे , वाट लावतात बायका लेकीच्या संसाराची ! +१११११११११११११११११११११११११११११११११ खुप जवळुन अनुभव घेतलाय याचा , अजुनही सहन करतोच आहोत अपवादाने का होइना अशा बावळट बायका आहेत जगात ज्याना फक्त मुलगी अन जावई आपल्या ताब्यात कसे राहतील याचीच पडलीये बाकीचे घरचे गेले उडत ! अन मुली पण दिवस्सात ५६ वेळा काय खाल्ल तिथुन तर ते कुणी काय नेसल इतपर्यन्त अपडेट देत राहतात आइला फोनवरुन परत मुलीला सासरचे कुणी काही बोलले तरी ह्यान्च्या धमक्या अमक करु न तमक करु ? अवस्था अशी आहे की कायद्याने मुलीना इतक्या सवलती दिल्यात की हल्ली मुलाना जीव मुठीत धरुन वावराव लागतय :( ( हो मी एक मुलगी असुन हे लिहितेय कारण याचा गैर्वापर मी खुप जवळुन पाहीला आहे आता मुलासाठी कायदे काढावे लागतील असे चित्र आहे असो..... हे फक्त त्या क्याटेगरितल्या म्हैलाकरीता लिहीले आहे अन ते ही स्वानुभवावरुन :( रोष नसावा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/15/2015 - 12:43 नवीन
@
अशा बावळट बायका आहेत जगात ज्याना फक्त मुलगी अन जावई आपल्या ताब्यात कसे राहतील याचीच पडलीये बाकीचे घरचे गेले उडत ! अन मुली पण दिवस्सात ५६ वेळा काय खाल्ल तिथुन तर ते कुणी काय नेसल इतपर्यन्त अपडेट देत राहतात आइला फोनवरुन परत मुलीला सासरचे कुणी काही बोलले तरी ह्यान्च्या धमक्या अमक करु न तमक करु ?
>>> या असल्याच सामाजिक प्रश्नांवर काम करणार्‍या अपर्णातै रामतीर्थंकर आहेत. त्यांच्याकडे अश्या भरपूर केसेस सोडविण्यासाठी येत असतात. ती बाईपण अत्यंत चिकाटीने ह्या केसेस सोडविते. मी त्यांच्या भाषणात हेच मुलिंच्या आयांचे सकाळी उठल्यापासून दर अर्ध्यातासाला चौकश्या करणारे फोन कॉल्सचे संभाषणाचे विवरण ऐकले आहे. ते अगदी वरीलप्रमाणेच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
प
पिलीयन रायडर Fri, 01/16/2015 - 04:45 नवीन
अपर्णातै रामतीर्थंकर
नको नको.. ह्या बाईंच नाव ऐकलं तरी मला गरगरतं.. त्यांचे विचार पटणारे लोक आहेत हे पाहुन तर अजुनच... आईची लुडबुड नको (म्हणजे आता दोन्ही साईडच्या आया नाही बरं का... फक्त मुलीचीच आई... मुलाच्या आईचा हक्क असतो लहानसहान गोष्टीत हस्तक्षेप करण्याचा..) इथवर ठिके.. पण "नवर्‍यासमोर डोकं चालवायचं नाही.. तुम्ही असाल शास्त्रज्ञ, पण घरी आल्यावर पती हाच परमेश्वर.. भाकरी करता येत नसेल तर काय अर्थ तुमच्या जिंदगीला..." असले "महान" विचारही ह्या बाई मांडतात... असो.. पिराबाई... दीर्घ श्वास घ्या...शांत व्हा.. आणि बाईंना विसरुन जा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 01/20/2015 - 19:47 नवीन
पि.रा. बाई... आपण म्हणताय, ते सगळं आहेच! :) मी त्याबाजुनी नव्हे, तर ..वरिल मुद्याची सत्यता अधोरेखित करण्याकरता आणि करण्यापुरताच त्यांच्या त्या मुद्द्याचा आधार घेतला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
भ
भिंगरी गुरुवार, 01/15/2015 - 15:23 नवीन
पियुशा मी सुद्धा पाहिले आहे आईच्या लुडबुडीमुळे त्रस्त झालेले जावई. त्यामुळे तुझ्या मताशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
प
पुष्कर जोशी Sat, 06/11/2016 - 22:09 नवीन
मुलाला त्याच्या आई बाबा पासून तोडणार्या सासू पण आहेत ... मुलगा आणि मुलगी विदेशात राहतात तरी कारस्थाने करून मुलगा आणि आई बाबाचे संबंध तोडणारी सासू पाहिली आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
स
सौंदाळा गुरुवार, 01/15/2015 - 06:36 नवीन
मित्रांमधे गप्पा मारता मारता एकाने (एक मुलगी असलेल्या) मजेत काढलेले उद्गार म्हणजे वास्तव आहे असे वाटते: हल्ली एकच मुल जन्माला घालतात बरीच जोडपी, त्यात पण मुलगा झाला तर कसा शिकेल? चांगला शिकला तरी नोकरी चांगली मिळेल का? काही धंदा केला केला तर त्याला भांडवल उपलब्ध करुन द्यावे लागेल, परदेशी स्थाईक झाला तर म्हातारपणी आपल्याला विचारेल का? ईकडेच राहिला तर लग्नापर्यंत त्याला घर वगैरेसाठी आर्थिक मदत करावीच लागेल, सुन कशी मिळेल? आपल्याला कशी वागवेल? ईत्यादी नाना काळज्या आयुष्याच्या वेगवेगळ्या ट्प्प्यावर पोखरतील. त्यापेक्षा एक मुलगी बरी. फक्त एकच गोष्ट नीट करावी लग्न करताना जावई, सासुरवाडी चांगली बघुन द्यावी आणि आपण दोघे खुष व्हावे. बाकी मी पण लग्नाआधी ३-४ मुली बघितल्या पण अवास्तव अपेक्षा असणर्‍या कोणी वाटल्या नाहीत.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/15/2015 - 06:41 नवीन
आयला म्हणजे पुरुषभ्रूणहत्या सुरू होणार की काय आता? रोचक आहे. पण सध्या मुलगी म्हणजे काळजी मिटली आणि मुलगा म्ह. काळजी असे आहे खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/15/2015 - 08:18 नवीन
अगा बाबौ =)) नको नको _/\_ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
स्पा गुरुवार, 01/15/2015 - 06:38 नवीन
चर्चा वाचतोय
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार गुरुवार, 01/15/2015 - 06:41 नवीन
आता मेल्या तु कशाला वाचतोयस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/15/2015 - 06:43 नवीन
का रे बाबा बिचार्‍या स्पांडूला छळतोयस? - एक बिचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
प
पैसा गुरुवार, 01/15/2015 - 09:43 नवीन
मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही. पण स्पांडूचं कोंबडं अजून मेलं नाही बहुतेक. म्हणून चर्चा वाचतोय तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 01/15/2015 - 09:49 नवीन
ल ग्न बं बा ळ!!!! =)) तु पण ठेव वाचुन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
स
स्पा गुरुवार, 01/15/2015 - 06:46 नवीन
मूवी काकांसाठी एवढे तर करूच शकतो न मी कळकळ पहा त्यांची ;)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 01/15/2015 - 06:58 नवीन
वाचत बसू नका हो, घरी 'ते' वाट पाहत असतील, पळा ! नैतर रेसमध्ये नंबर नाही लागायचा ! *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा गुरुवार, 01/15/2015 - 07:00 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/15/2015 - 07:31 नवीन
@वाचत बसू नका हो, घरी 'ते' वाट पाहत असतील, पळा ! >> =)))))) पां डुब्बा!!! परत वोरिजनल तें.. , लिही ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह गुरुवार, 01/15/2015 - 07:06 नवीन
अपेक्षा मुलींच्या आहेत की त्यांच्या आई-वडिलांच्या हे तुम्ही कन्फर्म केलाय का मुविकाका ? अनुभव असा की या वयात मुलींची मानसिकता खूप लवचिक असते. जोडीदाराच्या बरोबरीनं साथ देण्यातून स्वत: काहीतरी अचिव्ह करण्याची उमेद असते. विशेषत: अलीकडच्या पिढीच्या मुली खूपच प्रगल्भ विचाराच्या आणि कोणत्याही तडजोडीस तयार असतात, असे आढळले आहे. नवऱ्याच्या पगाराबद्दल त्या फारशा आग्रही दिसत नाहीत. मात्र नवऱ्याने आपल्याला जॉब-स्वातंत्र्य द्यावे हा आग्रह जरूर दिसतो. माझा सल्ला, मुलांनो, आई-वडील, मध्यस्थ या सर्वांना फाट्यावर मारून डायरेक्ट मुलीकडून या अपेक्षा जाणून घ्यायचा प्रयत्न करा . नक्की काम होईल ! *smile*
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा