Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि
Wed, 01/14/2015 - 22:54
🗣 1423 प्रतिसाद
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 10/15/2015 - 16:56 नवीन
पार्टनरशिप मध्ये कंपनी चालवुया का??? मी अ‍ॅप बन्वतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 10/15/2015 - 17:07 नवीन
तुला खरेच अ‍ॅप बनवता येते का ? व्यनि कर .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 10/15/2015 - 17:10 नवीन
बेसिक येते...पुढचे शिकू शकतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
क
कानडा Wed, 06/15/2016 - 11:42 नवीन
अ‍ॅप चे काही झाले का पुढे? --- कानडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्यारे१ गुरुवार, 10/15/2015 - 16:59 नवीन
लग्नाळु मधलं लग्न बाजूला आणि शिल्लक फक्त अळू.... खाल्ला की खवखव! क्याय च्याल्लंय क्याय????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
भ
भीमराव Fri, 10/16/2015 - 13:23 नवीन
कामातनं वेळ काढुकाढुन तिन दिवस लागले राव कुटलेला काथ्या बघायला, आमच्या पुढे घरात दोन जन नंबराला असल्याने सद्ध्या तरी आमी घरच्यांच्या दृष्टीनं दुर्लक्षीतच आहे. आमच्यात एक नमुना असाही आहे, ज्याची १२ एकर बागायती शेती, स्वत:चा अजुन एक उद्योग, गावात मोठ घर, घरी आई व्यतीरीक्त कोणाची जबाबदारी नाही, ब्यांकब्यालंस रग्गड तरी लग्न जमत नाही, कारण काय तर पोरगा शेती करतो. आमची मुलगी शेतात काम करनार नाही. बर एखाद्याला शेती नाही पन नोकरी किंवा उद्योगात चांगला जम आसला तरी पोरी देत नाहीत कारण काय त शेती नाही. आता प्रश्न असा पडतो, शेतात काम नाही करनार त मुलाकडे शेती हवी ही अट कशाला! विक्रमी धाग्यावर पयलाच प्रतीसाद न आमचाबी सहभाग
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 10/16/2015 - 13:57 नवीन
एकदम सहमत नात्यातल्या मुलाचे (बी.कॉम एलएलबी) शेती करतो म्हणुन लग्न जमत नव्हते. शेवटी ३६व्या वर्षी लग्न झाले. किती राहिले रे अजुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव
ब
बॅटमॅन Fri, 10/16/2015 - 16:31 नवीन
आयला, म्हणजे लगीन झाल्याझाल्या कुदळफावडे अन पाटी घेऊन श्यातावं पाटवनार वाटलं का काय त्यास्नी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव
प
प्यारे१ Fri, 10/16/2015 - 16:39 नवीन
आमच्या बॉस नं सांगितलेला किस्सा- कुठेतरी चांदोली धरण परिसरात काम सुरु असताना एका मजूराच्या बायकोचं आणि मजूराचं भांडण ऐकू आलं. चौकशी केली तर म्हणे बायको म्हणे मला नवऱ्यानं फसवलंय. काय झालं? तर बायको म्हणे नवरा माझ्या बा ला म्हणाला होता की मी ऑपरेटर आहे आणि इथे बघितलं तर हां बिगारी आहे. कुदळ फावडं वाला. नवरा म्हणे मी आहेच की ऑपरेटर..... फावडा ऑपरेटर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
भ
भीमराव Fri, 10/16/2015 - 17:54 नवीन
तेच म्हन्तो ना मी, पन लय यडी रताळी मान्स राव, १० वी नापास पोरगी पन नोकरीवाला नवरा मागती, आमाला वाटल्यालं चांगल्या पगाराच्या नोकरदारांच बरं आसल पन हितं काय तिथं काय सेमच कि ओ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
भ
भीमराव Fri, 10/16/2015 - 14:20 नवीन
बाकी शिपाई गड्यानंतर पोरगी न मिळण्यात शेतकरीच आघाडीवर हैत आमी कुटलं मांजार मारलय कुनास्ठाव. तरी बरं आमी बागायत पट्ट्यातलेय.
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 10/16/2015 - 16:49 नवीन
बाकी शिपाई गड्यानंतर पोरगी न मिळण्यात शेतकरीच आघाडीवर हैत याच्यावर काही कविता / गझल वगैरे रचल्या गेल्या नाहीत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव
भ
भीमराव Fri, 10/16/2015 - 17:56 नवीन
मोडक राव तुम्ही ल्ह्या की आमी वाचतो,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 10/17/2015 - 07:27 नवीन
प्रतिसाद क्रमांक १४००. मुविंना पुस्प्गुच्चं. मला मिसळ.
  • Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे Wed, 10/21/2015 - 08:45 नवीन
मला एक तांत्रिक प्रश्न पडला आहे . सध्या अनेक मुली सिगरेट फुंकताना दिसतात .तसेच चांगल्या हॉटेल मध्ये , पब आणि पार्टीत बर्याच जनी आता दारू पण पितात . लाईट बीर आणि बकार्डी ब्रीझ्रर ला तर अनेक मुली दारू मनात पण नाहीत . आणि आपल्या मुली यात नाहीत हो असे म्हणू नका. यात बर्याच मराठी मुली आहेत. तर या मुली लग्नाच्या प्रोफाईल मध्ये काय लिहितात ? खरे लिहितात काय ? तसेच खरे सांगतात काय ? नव्या पिढीतील मुलांना काय वाटते ? अशी कोणती मुलगी कोण्या निर्व्यसनी मुलाला भेटली होती का? मग काय झाले ? ( मला ऎक निर्व्यसनी मुलगी भेटली होती जी मला भलत्याच "तयारीची" वाटली ... काय झाले ते मी इकडे लिहिले आहे ... ( http://www.misalpav.com/node/३०७४१ तिन्ही भाग पहा)) तसेच कोणी धुम्रालन न करणाऱ्या मुलाने रीतसर बघून फुकड्या मुलीबरोबर लग्न केले काय ? हा कसा अनुभव असतो.. तसेच पिणाऱ्या मुली नवर्याला लग्नानंतर पिऊ देतात काय ?
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Wed, 10/21/2015 - 09:59 नवीन
काय तंत्र आहे !! प्रश्न कुठलाही असो, तो दारू पर्यंत नेउन भिडवणे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे
ट
टवाळ कार्टा Wed, 10/21/2015 - 11:02 नवीन
यात "तांत्रिक" प्रश्न कोणता??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे
ब
बिन्नी Wed, 10/21/2015 - 09:52 नवीन
खूपच कन्फ्यूजिंग आहे हा धागा :( काहीक्प्रतिसाद तर समजतच नाहीत..
  • Log in or register to post comments
प
पुष्कर जोशी Sat, 06/11/2016 - 21:39 नवीन
हहपूवा
  • Log in or register to post comments
ह
हरकाम्या Sun, 06/12/2016 - 06:20 नवीन
जुन्या जखमेवरच्या " खपल्या " काढुन काय समाधान मिळते राव.?
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 06/15/2016 - 11:24 नवीन
काय निष्कर्ष निघाला मग?
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Fri, 06/17/2016 - 13:54 नवीन
इतक्या सार्‍या प्रतिसादांत जेमतेम एक पान भरेल इतकेही रिलेव्हंट वा वाचनीय प्रतिसाद नाहीत.
  • Log in or register to post comments
स
सुयोग पुणे Sat, 06/18/2016 - 05:14 नवीन
मी लग्नाळू होतो तेव्हाची गोष्ट..एका विख्यात विवाह संस्थेतून आलेले स्थळ..मुलगी चाळीसगाव ची.. पहिला चहापोहे कार्यक्रम आमच्या घरी झाला..मुलीचे पालक येऊ शकत नसल्याने तिचा धाकटा भाऊ सोबत आला होता..तेव्हा जुजबी बोलणे झालं..नंतर आम्ही दोघानी बाहेर भेटायचे असं तिच म्हणाली..त्याप्रमाणे आम्ही भेटलो..सीसीडी मध्ये..मला २-३ प्रश्न विचारले तिने.. अगदी सुरूवातीलाच.. ती - तू ड्रीन्कस घेतोस का मी - नाही.. ती- कधीच नाही घेतलीस मी- नाही ती - स्मोकीन्ग करतोस का मी - नाही.. ती - कधी अफेअर होतं का मी - नाही.. ती - खरंच का मी - खरंच सांगतोय.. ती - आजकालच्या जगात असं कोणी नसतं मी - पण मी असाच आहे.. ती - तू स्मोक करत नाहीस.. दारू पित नाहीस .. तुझं अफेअर पण नाहीये.. मग तुझ्या आयुष्यात चार्मच काय राहिला.. मी - प्रत्येकाच्या चार्म च्या व्याख्या वेगळ्या असतात.. खरंतर मी चाट पडलो होतो.. काय बोलावं कळत नव्हतं.. चाळीसगाव सारख्या लहान शहरात राहीलेल्या मुलीची अशी मतं असतील तर मोठ्या ठिकाणी राहीलेल्या मुली काय विचारतील अशा विचाराने मी हैराण झालो ..यथावकाश एका पुण्यातल्या मुलीची आणि माझी चार्म ची व्याख्या जुळली..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 21
  • 22
  • 23
  • 24
  • 25
  • 26
  • 27
  • 28
  • 29
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा