वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
💬 प्रतिसाद
(1423)
ब
बदामची राणी
Mon, 10/12/2015 - 15:58
नवीन
हो का? कित्ती कित्ती छान! आपल्याला कोणतही तत्व आणायच नाही बुवा. मग काय? आता धरा फाऊल.
ऑन अ सिरिअस नोट, मी नवीन नाही इथे. पण लिहित नाही. फक्त वाचते. आता फारच वेगळी मत दिसल्यानी लिहिल^ ईतकच.
- Log in or register to post comments
ब
बदामची राणी
Mon, 10/12/2015 - 15:58
नवीन
हो का? कित्ती कित्ती छान! आपल्याला कोणतही तत्व आणायच नाही बुवा. मग काय? आता धरा फाऊल.
ऑन अ सिरिअस नोट, मी नवीन नाही इथे. पण लिहित नाही. फक्त वाचते. आता फारच वेगळी मत दिसल्यानी लिहिल^ ईतकच.
- Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी
Mon, 10/12/2015 - 16:00
नवीन
अगं अगं...झालीस पास तू...!!
- Log in or register to post comments
ब
बदामची राणी
Mon, 10/12/2015 - 16:02
नवीन
ते खर तर मलाही समजल. जलतत्व वगैरे ऐकल होत. :)
- Log in or register to post comments
ब
बदामची राणी
Mon, 10/12/2015 - 16:08
नवीन
ते खर तर मलाही नाही समजल. जलतत्व वगैरे ऐकल होत. :)
बघ लिहायची सवय नसल्यानी हे अस तत्व वगैरे आल की चुका होतात.
पास केल्याबद्दल आभारी आहे.कित्ती कित्ती छान! :)
- Log in or register to post comments
इ
इन कम
Mon, 10/12/2015 - 18:22
नवीन
मी आणि माझी मैत्रीण कॅन्टीन मध्ये कॉफी घेत होतो. तिच्याकडे 'बघण्याचे'कार्यक्रम चालू होते.
मी: काय मग? कसा होता कालचा मुलगा?
ती:मुलगा ओके होता पण he is not cool
मी: का? काय झाल? सेटल तर आहे मस्त
ती: हो ग… पण तो स्मोकिंग नाही करत आणि ड्रिंक्स तर अजिबात घेत नहि. सो बोरिंग …
मी आणि कॉफी दोन्ही गार!
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
Mon, 10/12/2015 - 18:28
नवीन
तुमच्या मैत्रिणिचा प्रॉब्लेम सॉल्व झाला असं समजा. वरच्या काही प्रतिक्रियांत बघा, एक जण ड्रिंक्स घेणारा (आणि लग्नाचा पण) आहे :)
- Log in or register to post comments
इ
इन कम
Mon, 10/12/2015 - 18:43
नवीन
लग्न झाल राव तीच आता
- Log in or register to post comments
ज
जातवेद
Mon, 10/12/2015 - 18:56
नवीन
वाचलो बुवा
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 10/12/2015 - 18:33
नवीन
महाग पडत असेल नै 'कोल्ड' कॉफी?
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 10/12/2015 - 19:00
नवीन
मुविंना खरंच काही काम नव्हतं!
'धागा बनानेवाले, क्या तेरे मन में समायी...?'
लग्न आणि लग्नविषयक चर्चा ह्या दोन गोष्टींवर कायदेशीर बंदी आणली गेली पाहिजे. निरर्थक वादविवाद! तोपर्यंत निदान धागा वाचनमात्र व्हायला हवा.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Mon, 10/12/2015 - 19:14
नवीन
जोवर लोक सांसदीय भाषेत एकमेकांशी सामाजिक विषयांवर चर्चा करत आहे तोवर सदर धागे वाचनमात्र करणे म्हणजे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणे होईल.
आपल्या सूचनेवर पुनर्विचार करावा ही विनंती.
बाकी कायदेशीर बंदीबाबत कायदेमंडळांकडे पत्रव्यवहार करू शकताच.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 10/12/2015 - 20:44
नवीन
श्रीरंग गांधी,
तुमच्या सत्याच्या प्रयोगाचे आम्ही फ्यान आहोत. ;)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 10/12/2015 - 20:48
नवीन
सत्याचे प्रयोग नावाचा आयडी 'येथे' आहे.
-प्यारंग जोशी
(ते येथे अपडेट होईल ना नंतर ;) )
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Mon, 10/12/2015 - 20:48
नवीन
फ्यान आहात तर मग वाईच वारा येऊ द्या की ;-) .
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 10/12/2015 - 20:59
नवीन
वाईच वारा
आवलेचा प्यारा.
(समीर हवा का झोंका चालीवर वाचावे. किंवा ह्यापी गो लक्की वाचले तरी चालेल)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 10/12/2015 - 21:26
नवीन
कैच्या कै....
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 10/13/2015 - 08:38
नवीन
विषयाला धरुन चर्चा पुढे चालु ठेवावी. सत्याचे प्रयोग लग्नासारख्या धाग्यांवर नकोत.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 10/13/2015 - 08:40
नवीन
विषयाचा मोह वाईट ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 10/13/2015 - 08:53
नवीन
कश्याचाही मोह वाईटच...मोहाची कशी असते ते मात्र म्हैत नै
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 10/13/2015 - 09:02
नवीन
इथल्या हौशी मंडळींना माहिती असेल ना रे त्याविषयी काढ एखादा काथ्याकुट धागा.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 10/13/2015 - 14:38
नवीन
काथ्याकूट कशाला एकदा घेऊनच बघ ना!! नाही चढली तर तुला कळेल आणि चढली तर सोबतच्यांना!! =))
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 10/13/2015 - 14:37
नवीन
ह्यासाठी तुला एक मस्तानी! =))
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 10/13/2015 - 17:34
नवीन
गांधीजींचं नाव घेऊन मस्तानीसारखं पेय? आपल्याच्यानी हसू आवरलं नाही बुवा.
किमान एखाद्या मिपा कट्ट्याला दोघे मिळून उपास तरी करावा (सद्भावना दिवस साजरा होईल).
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 10/13/2015 - 17:42
नवीन
शेळीच्या दूधाची मस्तानी चालेल?
मला नाहीच चालणार.
उपास करीन पण कट्ट्याच्या पवित्र दिवशी नको. एखादा पवित्र महिना पाहीन न करीन.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 10/13/2015 - 17:49
नवीन
भावना अधिक महत्वाची त्यामुळे दूध कोणते याने फरक पडू नये.
मिपाकट्ट्यापेक्षा अधिक पवित्र दिवस मिपाकरांसाठी कोणता असणार ;-) ?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 10/13/2015 - 17:59
नवीन
गायीचे दूध घ्यायला सांग त्याला
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 10/14/2015 - 11:31
नवीन
दूध म्हटलं की चितळ्यांचं!!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 10/14/2015 - 11:39
नवीन
खिक्क
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/16/2015 - 13:52
नवीन
चितळ्यांचं दुध घेता तुम्ही. बापरे. कुठली वैरण घालता म्हणे भिलवडीची का =))
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 10/16/2015 - 15:47
नवीन
ते चितळे ला विचार ने, आमाला काय विचारते?
(सूडबावा पूनावाला)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 10/13/2015 - 21:46
नवीन
शेळीच्या दुधाची मस्तानी???????????????
उद्या केळाची बिर्यानी बनवशील लेका अभ्या. फुटलो ना वाचून मर्दाऽ =))
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 10/13/2015 - 21:52
नवीन
कच्च्या केळांचे कबाब बनू शकतात. संदर्भ: हिंदी चित्रपट बावर्ची (नायकाच्या भूमिकेत राजेश खन्ना). तर बिर्यानी बनायलाही हरकत नसावी =)) .
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 10/13/2015 - 22:18
नवीन
नियोजित वधु आणि वरांना मस्तानी नको नुसती छान कॉफी बनवता येते का हे पाहायला लागतं म्हणे हल्ली.
बाकी शेळीला मध्ये आणल्याबद्दल अभ्याचा मौन धरून नैष्ठिक निषेध!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 10/14/2015 - 11:41
नवीन
इथे कॉफीवर काही श्लेष अपेक्षित आहे का????
;)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 10/14/2015 - 11:44
नवीन
पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे :)
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 10/12/2015 - 20:33
नवीन
काय चाललंय बा हे...?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 10/13/2015 - 08:34
नवीन
धाग्यात हे लिहिलेले....याबाबत कोणी काही लिहिले होते का या धाग्यावर?
- Log in or register to post comments
स
साधा मुलगा
Tue, 10/13/2015 - 13:56
नवीन
हल्लीच्या मुली एकत्र कुटुंब पद्धतीत राहतील का? पुरेसे मोठे घर असेल तर? मुलगा चांगला असेल ,पुरेसा कमावता असेल तर? घरात dust bin नको, जेष्ठ नागरिक नको असले प्रतिसाद वाचून विचारतो आहे.
- अजून लग्नाला वेळ असलेला पण मुलींच्या अपेक्षांनी धास्तावलेला साधा मुलगा
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 10/13/2015 - 14:04
नवीन
घर पुरेसं मोठं असेल तर राहीलं पाहीजे. तोट्यापेक्षा फायदेच जास्त असतात एकत्र कुटूंब पध्दतीत. कमीत कमी प्रयत्न केला पाहीजे. न जमल्यास चर्चा करून, सामंजस्याने, कटूता टाळून वेगळे व्हावे.
- Log in or register to post comments
म
मीता
Tue, 10/13/2015 - 14:44
नवीन
+१
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 10/13/2015 - 14:37
नवीन
>>>> अजून लग्नाला वेळ असलेला पण मुलींच्या अपेक्षांनी धास्तावलेला साधा मुलगा
जन्मतारीख काय? उंची किती? नोकरी काय करता?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 10/13/2015 - 14:49
नवीन
पैसे किती हे पहिले
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 10/13/2015 - 14:51
नवीन
मी कुणाला पगार विचारत नाही हल्ली . थांबवलंय. ;)
- Log in or register to post comments
P
palambar
Tue, 10/13/2015 - 19:37
नवीन
ह्म्म एकंदरित अवघड प्रकरण आहे सध्या तरि, आपल्या कडे समाजाचा फार प्रभाव आहे सर्व गोश्टित ,
शिक्शण , लग्न , संसार, ईई . लोक मदतिला कमि पण अड्चणित टाकायला लगेच जातिल. समुपदेशक
लोकांचि फार गरज आहे. माझ्या एका मुस्लिम मैत्रिणि च्या मुलिचे लग्न झाले, मुलगा निवड्तांना हुनर आहे ना
एवधेच बघितले. म्हनजे नोकरि करित नाहि पण उद्योग करु शकतो ना एवढेच बघितले.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
गुरुवार, 10/15/2015 - 10:01
नवीन
काय हूनर पाहून लग्न ठरवले मग?
- Log in or register to post comments
P
palambar
गुरुवार, 10/15/2015 - 16:12
नवीन
computer sales&service business असे तिने सांगितले . सांगायचा मुद्दा कि एकत्त्र कुटुंब , पगार वैगेरे साठि
नकार दिला नाहि.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Fri, 10/16/2015 - 15:36
नवीन
ओके, गुजराती लोक व्यवसाय बघून सोयरीक जुळवतात. नोकरी असेल तर नाक मुरडले जाते.
- Log in or register to post comments
ज
जातवेद
गुरुवार, 10/15/2015 - 07:55
नवीन
यशस्वी ५०,००० वाचनांकडे वाटचाल.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 10/15/2015 - 16:53
नवीन
खरेच लग्न ठरवणे इतके अवघड आहे का ?
वधु वरांच्या अपेक्षांचे मेळ घालण एइतके कॉम्प्लिकेटेद असेल असे मला वाटले नव्हते .
वधुवरांच्या अपेक्षा म्यॅच करता यावा अन नीयरेस्ट नेबर ही सजेस्ट करता यावा ह्या साठी फार पुर्वी मी एक अॅल्गोरिथ्म लिहिला होता , तो वापरुन अॅप आणि म्यॅट्रीमोनियल बनवले तर तुफान चालल का ?
( इतर म्यॅट्रीमोनियलस सुध्दा सजेशन्स देतातच पण तुमच्या अपेक्षांच्या सर्वात जवळ कोण येते आणि तुम्ही कोणाच्या अपेक्षांच्या सर्वात जवळ जाता हे सांगणारा अॅल्गोरिथम नाहीये बाजारात बहुतेक )
लग्नाळुंच्या माहीतीपुर्ण मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत !!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- ›
- »