Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि
Wed, 01/14/2015 - 22:54
🗣 1423 प्रतिसाद
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)
प
प्यारे१ Fri, 10/09/2015 - 07:16 नवीन
हाच तो हाच तो! उगाच का मुवि 'तळपत' आहेत मिपाच्या प्रांगणात? (कोण रे तो रेसिस्ट म्हणतोय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
ख
खटपट्या Fri, 10/09/2015 - 07:24 नवीन
पुढची कीमान ५ वर्षे तरी हा विक्रम आबाधीत राहील असे दिस्तेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
सौंदाळा Fri, 10/09/2015 - 07:27 नवीन
यानिमित्ताने मिपावरील विवाहेच्छु तरुण-तरुणींनी आपल्या भावी जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा लिहाव्यात. विवाहीत लोकांनी त्यांच्या काय अपेक्षा होत्या आणि त्यातील किती पुर्ण झाल्या :) हे पण लिहावे. ईतके बोलुन मी या धाग्यावरुन तात्पुरती (१५ मिनिटाची) रजा घेतो
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 10/09/2015 - 07:36 नवीन
नवी बॅच आली काय???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
स
सौंदाळा Fri, 10/09/2015 - 07:44 नवीन
नविन बॅच आली की आता त्यातील उपवर किती विवाहित किती हे माहित नाही ब्वा ताज्या दमाचे खेळाडू मांत्रिक, जव्हेरगंज, मारवा, बोका-ए-आझम, सुरंगी, दमामि, अर्थहीन, उगा काहीतरीच, कन्फ्युज्ड अकौटंट, तुडतुडी, दादा दरेकर आणि इतर यांनी या धाग्याला पायधुळ लावुन पुण्य कमवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Fri, 10/09/2015 - 07:57 नवीन
मांत्रिक: त्याला आता चिरंतनाची ओढ़ लागली होती. लग्नासारख्या संसारी गोष्टीत मन रमायला त्याला आता जमतच नव्हतं. जव्हेरगंज: लग्न म्हणजे एक अर्धविराम. एका ठिपक्याला जोडलेला दुसरा शेपूटवाला ठिपका. मारवा: त्याला आता तिचा विसर पडला होता. ह्याला बघितल्यापासून. बोका ए आज़म: अव्यावसायिक तरुणांच्या वैवाहिक आयुष्याच्या कथेच्या अनुवादासाठी तरुणींकडून परवानगी सुरंगी: 1980 साली मी मंत्रालयात असताना अर्थहीन: (अभ्यास वाढवायला हवा) दादा/ तुडतुडी: त्यांच्या धर्मात सगळी घाण आहे. आमच्या धर्मातले जोड़ीदार निवडा. कंफ्यूज्ड: हो की नाही बोला. बाकी पुन्हा कधीतरी.... सध्या घाईत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
अ
अस्वस्थामा Fri, 10/09/2015 - 11:03 नवीन
प्यारे भौ.. ठ्ठो.!! :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
असंका Fri, 10/09/2015 - 11:04 नवीन
है!!! माझं नाव आलं!!! हो की नाही बोला? असं मी म्हणतोय? म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
म
मांत्रिक Sat, 10/10/2015 - 15:27 नवीन
हायला! माझं पण नाव आलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Fri, 10/09/2015 - 07:39 नवीन
नवी बॅच आली काय??? याचीच सुधारित आवृत्ति म्हणून.... आधीच्या विवाहेच्छु तरुणांचं (राजकीय पक्षाचे युवा आघाडी अध्यक्ष 47 48 चे असतात. मन तरुण असतं) कुठवर आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 07:40 नवीन
अर्रे अस्साच प्रतिसाद याच्च धाग्यावर आधी कोणीतरी लिहिलेला असे वाटतेय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
प
पैसा Fri, 10/09/2015 - 08:34 नवीन
मला आता शोधावे लागणारे मी काय लिहिले होते ते! कोणाला मुलगी मिळवून देण्याची आश्वासने दिली नव्हती ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 10/09/2015 - 09:48 नवीन
ओ तुमची ती गोयंकार छोकरी काय म्हणते हो टकावाली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 10/09/2015 - 10:40 नवीन
ती शशकमधेच राहू दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
पिशी अबोली Sat, 10/10/2015 - 13:16 नवीन
आगे पैतै, तें आशा पेरेर मेळिल्ले. काजार आहा म्हण सांगताले. हांवें विचारले, आगो बाय, त्या टकालें किदें जालें? तर सांगपाक लागले, 'एसीन बसून दिसभर लॅपटॉप बडोवपी कार्टो नाका खंय'...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 10/10/2015 - 15:52 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
स
सूड Fri, 10/09/2015 - 10:51 नवीन
आमगेली आशा परेर? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 12:06 नवीन
तु गपं रव रे....कट्ट्याला कसा गप्प बस्लास? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 10/09/2015 - 12:33 नवीन
कुठल्या कट्ट्याला गप्प बसलो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 13:31 नवीन
असूदे असूदे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ह
हरकाम्या Fri, 10/09/2015 - 11:09 नवीन
कशाला राव आमचा " अश्वत्थामा " करताय ? जरा कुठे निवान्त वाटत होत तर खपली काढलीतच.
  • Log in or register to post comments
ज
जूलिया Fri, 10/09/2015 - 11:10 नवीन
मी युरोपात नोकरी करते,आणि पूण्यात घर पण आहे. डिपेंडंट व्हिजावर येणारा एतखाउ मूलगा मी तरी केला नसता. पण घर दोघाच असत आणि घरात दोघानीही काम करायच असत अस समजून घरात काम करणारा हवा नोकरी करुन.......घरकाम करण हे उपकार किवा मदत नाही. Its a daily routine.........
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 11:34 नवीन
म्हणजे तुम्च्या मते डिपेंडंट व्हिजावर येणारा मुलगा ऐतखाउ....मग डिपेंडंट व्हिजावर येणारी मुलगी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जूलिया
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 11:38 नवीन
मुली किंवा स्त्रिया बाय डिफॉल्ट कष्टाळू तर पुरुष सगळे कष्ट टाळू असे दिमागात एकदा हार्डकोड केले की झाले रे. पुढे इन्पुट काही आला तरी औटपुट तोच येणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 11:40 नवीन
घर दोघाच असत आणि घरात दोघानीही काम करायच असत अस समजून घरात काम करणारा हवा नोकरी करुन.......घरकाम करण हे उपकार किवा मदत नाही. Its a daily routine.........
हेच्च वाक्य असेच्च जर कोणा पुरुषाने लिहिले अस्ते इथे तर मिपावरच्या मधमाश्यांनी डंख मारून मारून अर्धमेला केला अस्ता त्याला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 11:45 नवीन
हेच्च वाक्य असेच्च जर कोणा पुरुषाने लिहिले अस्ते इथे तर मिपावरच्या मधमाश्यांनी डंख मारून मारून अर्धमेला केला अस्ता त्याला
ट्रोलहितांना हे कळेल तर शपथ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अस्वस्थामा Fri, 10/09/2015 - 11:58 नवीन
अर्रे बास की.. कित्ती हवा घालाल ? तरी भट्टी कै पेटत नै आणि हानाहितांचा संयम कै ढळत नै.. जौ दे आता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 12:06 नवीन
तुम्हांला हानाहितांच्या संयमाची पडलीये? इथे ज्वलंत इश्श्यूज़ आहेत ते कोण चर्चिणार मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
ख
खटपट्या Fri, 10/09/2015 - 11:42 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जूलिया
ज
जूलिया Fri, 10/09/2015 - 12:06 नवीन
डिपेंडंट व्हिजावर येणारी मुलगी नको अशी अट/म त देता येते....... अडवल नाहीये कोणी; फक्त स्वताच्या घरी/मेनली आईला पटवायला लागेल. मग भरपूर मूली मिळतील. कित्येक बाहेर रहाण्यारया मूलांना/आयाना डिपेंडंट व्हिजावर येणारी मुलगी हवी असते; माझ्य्या बाळाचे खायचे कित्ती हाल होतात.......मूलगी नोकरी करणारी न को(देशाबाहेर) ......मूलांना घरी याबद्दल वाद घालताना पण बघितलय आणि ३२व्या वेर्शी २३वेर्श्या च्यामूलीशी लग्न करताना पण....घरी दबाव.......
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 12:45 नवीन
डिपेंडंट व्हिसावरचा मुलगा ऐतखाऊ म्हणून तारे आपणच तोडलेत जूलियाताई. त्याला अनुसरूनच "जर डिपेंडंट व्हिसावरचा मुलगा ऐतखाऊ तर मुलगी कोण" असा साधा सरळ त्रैराशिकात्मक प्रश्न विचारला तर त्याला त्सफाईने बगल दिलीत. आवडलं, मान गये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जूलिया
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 13:31 नवीन
डिपेंडंट व्हिजावर येणारी मुलगी नको अशी अट/म त देता येते
डिपेंडंट व्हिजा न घेता मुलगी इथेच राहील आई-वडिलांबरोबर असे लग्नाअगोदर सांगितले तर मुलीच नकार देतात
अडवल नाहीये कोणी; फक्त स्वताच्या घरी/मेनली आईला पटवायला लागेल. मग भरपूर मूली मिळतील.
हे वाक्य ममाज बॉय (थोडक्यात "शाम") टैप मुलांसाठी ठिक आहे...सगळेच तशी मुले नस्तात
कित्येक बाहेर रहाण्यारया मूलांना/आयाना डिपेंडंट व्हिजावर येणारी मुलगी हवी असते; माझ्य्या बाळाचे खायचे कित्ती हाल होतात.......मूलगी नोकरी करणारी न को(देशाबाहेर) ......मूलांना घरी याबद्दल वाद घालताना पण बघितलय
या गोष्टी लग्नाअगोदर का नाही ठरवल्या जात? मुलाने एक्वेळ नसेल डिस्कस केले तर मग मुलीला तोंड नाही उघडता येत?
३२व्या वेर्शी २३वेर्श्या च्यामूलीशी लग्न करताना पण....घरी दबाव
घरी दबाव असेल तर डायरेक्ट मुलाला नाही सांगता येत? आणि जर त्या दोघांना नसेल काही आक्षेप तर बाकीच्यांना का असावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जूलिया
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 12:08 नवीन
प्रतिसाद नं.१२०० आणि १२०१ माझे :)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 10/09/2015 - 12:22 नवीन
मुलांचा अभ्यास आणि पालक याबाबत एक वीडियो बघितला होता. त्यात एक छोटा एक्सरसाइज दिला होता. दोघांची टीम बनवायची आणि एकमेकांचे हात धरून उभं राहायचं. नंतर जी टीम पहिल्यांदा हात सोडवून घेईल ती जिंकली असं सांगण्यात आलं. एकमेकांचे हात सोडवण्यासाठी काय काय युक्त्या वापरल्या जातील????? गल्ली चुकलेली नाही.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 10/09/2015 - 13:03 नवीन
वधू आणि वरांच्या अपेक्षाच नाही तर वय, शिक्षण, अनुभव, वजन सगळच वाढलं आहे. तेव्हा लग्नाळूंसाठी माझ्या अंत:करणापासून शुभेच्छा. "आमच्यावेळी नव्हती हो असली थेरं !" हा डॉयलॉग मारायचा हाच तो धागा.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 13:31 नवीन
खि खि खि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ज
जूलिया Fri, 10/09/2015 - 13:18 नवीन
@ बॅटमॅन; डिपेंडंट व्हिसावरची मुलगीही ऐतखाऊ हे माझ मत आहेच......पण देशाबाहेर नोकरी करणारी मूलगी नको......अशी अपेक्शा असते
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Fri, 10/09/2015 - 13:23 नवीन
सध्या युरोपात आहात, व पुण्यात घर पण आहे... बोलणी सुरु करायची का ?? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जूलिया
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 13:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
ज
जूलिया Fri, 10/09/2015 - 13:23 नवीन
डिपेंडंट व्हिसावरचा मुलगा ऐतखाऊ म्हणून तारे आपणच तोडलेत जूलियाताई. तारे कशाला; डिपेंडंट व्हिसावरची मूलींब द्दल हे जगजाहीर मत आहे.....ऐतखाऊ, नवरयाच्या जीवावर मज्जा करणारी म्हणून; माहीत नाही का?
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 13:25 नवीन
जूलिया ताई: मिपावरची मते सोडा, किमान तुमचे मत कन्सिस्टंट आहे हे पाहून आनंद वाटला.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 10/09/2015 - 13:27 नवीन
+आशेच् म्हंतो. (ताई सोडून.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ज
जूलिया Fri, 10/09/2015 - 13:25 नवीन
माझा मी शोधलाय.......काळजी नसावी..............
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Fri, 10/09/2015 - 13:40 नवीन
म्हणून मूवी म्हणतात, अपेक्षा वाढल्या म्हणून.. काळजी नाही हि, तेव्हढेच आपले लाडवांची संधी हुकली म्हणून .. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जूलिया
स
सौंदाळा Fri, 10/09/2015 - 13:35 नवीन
च्यामारी दागिने पॉलिश करुन लुटले अशा बातम्या मागच्या किमान २०-२५ वर्षापासुन वाचतोय तरी अशा चोर्‍या अजुन होतातच. तसेच मिपावर काही चोथा झालेले ठराविक विषय आले की अजुनही नव-नविन मासे गळाला लागताच. आजच्या पहिल्याच जाळ्यात धाग्याने १०० गाठले. मित्रहो पुढचे जाळे फेका आता.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 10/09/2015 - 13:37 नवीन
कधीकधी पुढच्या चौकात चेकिंग सुरु आहे सांगनाराच् चोर असतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 13:41 नवीन
खि खि खि...आणि अश्या चोरांनीच मधे मधे खबरी/मदतनीस पेरलेले अस्तात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
सौंदाळा Fri, 10/09/2015 - 13:44 नवीन
ज्यांची मुले / नातवंडे लग्नाची आहेत अशा वयस्कर मिपाकरांची मते वाचण्यास उत्सुक
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 13:46 नवीन
अशी लोकं परत लग्न करायच्या भानगडीत पडत नैत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
स
सौंदाळा Fri, 10/09/2015 - 14:04 नवीन
खी खी खी लईच टवाळ बाबा. आजचा अभ्यास : खालील शब्दांचा या धाग्याशी संबंध येणार नाही अशा प्रकारे वाक्यात उपयोग करुन दाखवा. १. गृहकृत्यदक्ष २. मनमिळाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • «
  • ‹
  • 21
  • 22
  • 23
  • 24
  • 25
  • 26
  • 27
  • 28
  • 29
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा