Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि
Wed, 01/14/2015 - 22:54
🗣 1423 प्रतिसाद
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 10:56 नवीन
आपल्या अपेक्षा कमी आहेत असं वाटतं का आपल्याला ( का वाटतं ),
हाच का तुम्चा प्रश्न? हा नसेल तर तुम्चा प्रश्न नेमका कोणता यात माझा काहीतरी घोळ झालाय....तुम्चा नेमका प्रश्न समजला तर सविस्तर उत्तर देता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Fri, 10/09/2015 - 11:15 नवीन
समज कमी पडली म्हटलं ते यासाठीच ;) 'मुलींनी विचार वाढवायचे म्हणजे नेमकं काय करायचं, मुलांचे विचार किती वाढलेत तेही सांगावे.' हे माझे प्रश्न होते, यालाच प्रतिसाद म्हणून आपण तो sarcastic प्रश्न विचारलात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 10/09/2015 - 11:17 नवीन
तुम्हाला नेमकं कसं सांगीतलं म्हणजे नीट लक्षात येईल टकाला काय म्हणायचयं ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 11:34 नवीन
स्त्रीयांनी त्यांना काय हवे हे इतक्या सहजपणे सांगितले अस्ते तर मग जगात कस्ले प्रॉब्लेम उर्लेच नस्ते रे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 10/09/2015 - 11:55 नवीन
जगामधे तिसर्‍या महायुद्धाची नांदी आधीचं वाजायला लागलेली आहे आपण त्यामधे कशाला तेल ओतताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 11:30 नवीन
वोक्के माझ्यामते तो प्रश्न जेपीसाठी होता कारण तुम्ही त्याच्या प्रतिक्रियेवर उपप्रतिक्रिया दिलेली त्यामुळे त्या प्रश्नाचे उत्तर त्यालाच देउदे याला मी तुम्चा धांदरटपणा म्हणेन त्याच प्रमाणे तुम्ही मी जेपीला दिलेली प्रतिक्रिया वाचलेली दिसत नाही त्यामुळे मलासुध्धा तुमच्यासारखेच उत्तर जाणून घ्यायचे आहे याला(सुध्धा) मी तुम्चा धांदरटपणा म्हणेन माझी प्रतिक्रिया ही एक उपरोधीक प्रतिक्रिया असूनसुध्धा तुम्ही यात "आपल्या अपेक्षा कमी आहेत असं वाटतं का आपल्याला ( का वाटतं )" असे विचारलेत....ते सुध्धा माझ्या अपेक्षांबद्दल काहीही माहित नस्ताना याला सुध्धा (परत एकदा) मी तुम्चा धांदरटपणा म्हणेन बरं मला प्रश्न समजा नक्की कोणता ते घोळ झाल्याने मी शांतपणे इथे विचारलेले तर त्यावर "समज कमी पडली म्हटलं ते यासाठीच ;)" अशी खवचट प्रतीक्रिया प्रतिक्रीया लिहिलीत अजून कधी मी तुमच्याशी कोणत्याही विषयावर चर्चा केलेली नाहिये पण वरील सर्व बघता...."अनाहितांनो तुम्च्यासाठी आणखी एक मेंबर मिळाला हो" =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 11:35 नवीन
अजून कधी मी तुमच्याशी कोणत्याही विषयावर चर्चा केलेली नाहिये पण वरील सर्व बघता...."अनाहितांनो तुम्च्यासाठी आणखी एक मेंबर मिळाला हो" =))
विषय कुठलाही असला तरी तो बबन जसा 'वेगळा विदर्भ झालाच पाहिजे' म्हणतो त्यातलाच हा प्रकार बे. विशय काहीही असू, विशिष्ट किल्ले लढवलेच पाहिजेत. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 11:38 नवीन
असू दे रे...प्रत्येकाचे स्वतःचे एक हक्काचे कुरण असते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 11:39 नवीन
अगदी अगदी. बाकी या कुरणातली हक्काची टोळधाड इथे येणार असे भविष्य वर्तवतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 10/09/2015 - 11:55 नवीन
ही ही ही ही!! णको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड Fri, 10/09/2015 - 12:01 नवीन
ही & हि प्रतिसाद ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 12:06 नवीन
मधमाश्या रे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नीलमोहर Fri, 10/09/2015 - 11:46 नवीन
आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
नीलमोहर Fri, 10/09/2015 - 12:43 नवीन
विषय काय आणि प्रतिसाद कुठे चालले होते याचाही विचार व्हावा ही नम्र विनंती. काही प्रतिसाद पाहून मलाही प्रश्न पडले म्हणून मी ते मांडले, जेणेकरुन दोन्ही बाजूंचे मुद्दे स्पष्ट झाले असते. त्यावर सरळ उत्तरं न देता इथे निव्वळ मुद्दे भरकटवणं सुरु होतं. अनाहितांना बळेच मध्ये आणायचीही गरज नव्हती, आत्ता इथे मी एकटीच आहे. धाग्यात काही भर न घालता केवळ वाद सुरु ठेवण्याची इच्छा, वेळ, एनर्जी, क्षमता काहीच नसल्यामुळे धाग्याला राम राम !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 13:31 नवीन
ये धागेपे नया लगते हो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ज
जेपी Fri, 10/09/2015 - 12:26 नवीन
एका प्रतिसादावरुन एवढा धुरळा.. अजुन अनुभव तर लिहीलाच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 13:31 नवीन
नाहीच लिहिलास तरी असेच होईल आणि लिहिलास तरीही असेच्च होईल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
स्रुजा Fri, 10/09/2015 - 14:21 नवीन
टका उगाच अनाहितांना मध्ये आणु नकोस. नीलमोहर स्त्री आहे की पुरुष हे त्यांनी अजुन रीव्हील केलेलं नाही, त्यांचा मुद्दा हा मुलगी किंवा सुज्ञ मुलगा मांडु शकत नाही का? मुलांच्या अपेक्षा काहीच्या काही वाढल्यात असं एखादा वधुपिता किंवा वधु चा भाऊ म्हणला तर त्याला विना चौकशी अनाहितामध्ये धाडशील उद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 14:33 नवीन
अहो ते फक्त पोटेन्शिअल आहे असे म्हणताहेत. समजून घ्या की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 10/09/2015 - 16:08 नवीन
अगं मुद्दा नीमो अनाहिता आहे की नाही चा नाहिये. मुद्दा धागा ५००० करण्याचा आहे. अश्या बरोबर शंका काढुन धाग्याचं पोटेन्शिअल कमी करु नकोस =)). अश्यानं ५००० कसे व्हायचे मग :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 16:44 नवीन
आपणांस मुद्दा समजलेला नाही (हे पाहून खरेच आश्चर्य वाट्ले)... हा आणि हा प्रतिसाद म्हणजे जे मला म्हणायचे होते त्याचेच लिखित स्वरुप आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
स
स्रुजा Fri, 10/09/2015 - 16:47 नवीन
त्याच मुद्द्यांवर प्रतिवाद आहे माझा पण जाऊ दे, धागाच वाढवायचाय ना मग तुझ्या मुद्दा समजला नाही ला माझ्या कडून "कर निरर्थक आत्मरंजन" ;) पुढील प्रतिसादात दु दु वगैरे बोल्ण्यात येईल. मुविंच्या पंच हजारी धाग्यात माझा आपला खारीचा वाटा ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 10/10/2015 - 13:28 नवीन
मुवि, पंचहजारी सेलेब्रेशनसाठी मोठ्ठा हॉल बुक करा. ऐनवेळेस बुकिंग मिळणे कठीण जाईल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
ट
टवाळ कार्टा Sat, 10/10/2015 - 13:42 नवीन
हॉल? डायरेक्ट चौपाटीवर करू =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ख
खटपट्या Fri, 10/09/2015 - 09:37 नवीन
कीती ती झैरात ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 09:40 नवीन
सोनं असलं तरी जोपर्यंत झैरात करत नै तोपर्यंत विकलं जात नै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
प
पिलीयन रायडर Fri, 10/09/2015 - 10:20 नवीन
मी बी.ए आहे (ढकलपास). दिसायला यथातथाच आणि जाड आहे. मला काडी इकडची तिकडे करता येत नाही. पाणीसुद्धा हातात लागते. आणि हो, मी घरचे म्हणतील ते ऐकणारी आणि बुगुबुगु मान डोलावणारी पण आहे. तर मला गोरा, (गहु / सावळा / काळा वर्ण क्षमस्व, चष्मावाले त्याहुन क्षमस्व!) हॅण्डसम आणि (अर्थातच) नोकरी करुन रोज घरी स्वयंपाक-पाणी, घरची कामे, माझ्या मातापित्यांची सेवा, मला हातात ताट आणुन देणे वगैरे करणारा मुलगा कुणी देईल काय? गरज पडल्यास घरदार आणि पोर सांभाळायला नोकरी सोडायची तयारी हवी. (एकुलता एक असला तरी माहेर वगैरे विसरुन जावं लागेल हे इच्छुकांनी लक्षात ठेवावे. आमच्यात बायकांना कामं सांगत नाहीत.) (असं दोन्ही बाजु कितीकही लिहु शकतील.. सिस्टीम दोन्ही कडुन चुकतेय. सरसकट एकाच पक्षावर कसं बोलता येईल? आणि हो.. डिपेंडंट व्हिजाबद्दल निरीक्षण चांगलं असलं तरी सरसकट सर्वांनाच ते लागु होत नसतं हे ही नमुद करते. मागेही एकदा स्त्रियांच्या "डिपेंडंट" स्टेटस बद्दल कुजकट शेरे आले होते. अर्थात ते अज्ञानाचेच लक्षण आहे. इतक्या वरवर शेरे मारावेत इतका सोप्पा मुद्दा तो नसतो. पण तो धाग्याचा विषय नसल्याने.. रामराम!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 10:23 नवीन
वेळ आहे का? शे-पाश्शे इथेच होतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 10/09/2015 - 10:26 नवीन
नाय रे.. हात फार फुरफुरत आहेत.. खुप दिवसात "मैदान ए जंग" मध्ये उतरलेले पण नाहीये. पण साला वेळ नाहीये.. (तसंही माझं लग्न झालय.. माझ्या सग्गळ्या असतील नसतील त्या अपेक्षा पुर्ण झाल्या असल्याने मी धन्यवाद झालेय. आता दिवस तुझे हे फुलायचे आणि झोपाळ्या वाचुन झुलायचे बाबा..) (ताईचा सल्ला:- जास्त चर्चा करु नकोस.. उगाच लग्नावरचा विश्वास उडुन जायचा हो शाम..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 10:29 नवीन
खिक्क...आता मैदानेजंग मध्ये नवीन खेळाडू आहेत... =)) बाकी "जास्त चर्चा करु नकोस.. उगाच लग्नावरचा विश्वास उडुन जायचा हो शाम" हा शाम कोण :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 10/09/2015 - 10:31 नवीन
बोलण्याची पद्धत आहे हो ती शाम.. असु दे असु दे.. शिकशीलच तू आता हळु हळु सगळं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 10:45 नवीन
तुम्हारेकू लग्ता अब्बीतक मई कुच नै सिख्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 10:52 नवीन
वो बाकी लोगको मालूम कैसे होना रे टक्कू? बाकी माईंचे हे तसा हा शाम दिसतोय. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 10:53 नवीन
बाकी माईंचे हे तसा हा शाम दिसतोय. =))
मला तर तो लग्नानंतर झालेला शाम वाटतोय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 10:57 नवीन
च्यायला उगाचच "बाई मी विकत घेतला शाम" हे गाणे आठवले =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 11:02 नवीन
किलोला कसा भेटला ते विचारलंत का =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 10/09/2015 - 11:05 नवीन
राम-शाम की जोडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 11:11 नवीन
खी खी खी....कट्ट्याचा हँगोव्हर गेला नै का अजून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 10/09/2015 - 11:13 नवीन
कट्ट्याचा गेला रे पण प्रश्ण असला कहर विचारलेला की आठवण आली की अजुन हसतोय =)) सूड उगवला हो एका वाक्यात ताईंनी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 11:34 नवीन
खि खि खि व्हिडो शूट तरी करायला हवा होता....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सूड Fri, 10/09/2015 - 14:29 नवीन
त्यात काय सूड उगवायचा. आता एखाद्याच्या बाळबुद्धीला असे प्रश्न पडू शकतात. आपण मोठ्या मनाने समजून घ्यायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 16:44 नवीन
आँ...अच्च जालं तल =)) रच्याकने, अभ्या या वाक्याचा भन्नाट मेमे बनव बघू =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 11:09 नवीन
"किलोला कसा" कि "किती किलोचा"...नक्की कै विचारायचे? स्वगत - पिरा हात धुवून मागे लाग्णार माझ्या =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 11:17 नवीन
पिरा हात धुवून मागे लाग्णार माझ्या =))
हा तर मोठाच पिरा ब्लेम झाला की =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
नाखु Fri, 10/09/2015 - 10:59 नवीन
ळू साय्लेंट आहे काय? अगदी निरागस नाखु. ता क बॅट्या दोन वाक्याच्या प्रतीसादात कसा थांबला याचेच अप्रूप वाटतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 11:03 नवीन
खि खि खि सध्ध्या फक्त सुरुवातीची प्रार्थना सुरु आहे ;) तुम्ही येताय का होम सुरु करायला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
मीता Fri, 10/09/2015 - 07:20 नवीन
अनुभव म्हणावा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्यारे१ Fri, 10/09/2015 - 07:26 नवीन
@ टका, तुझ्या 'कर्तव्य'पूर्तीसाठी झटण्याचं कवतुक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 07:39 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
उ
उगा काहितरीच Fri, 10/09/2015 - 05:52 नवीन
मिपाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त प्रतिक्रिया मिळालेला हाच धागा आहे काय ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 20
  • 21
  • 22
  • 23
  • 24
  • 25
  • 26
  • 27
  • 28
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा