Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि
Wed, 01/14/2015 - 22:54
🗣 1423 प्रतिसाद
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)
अ
अत्रन्गि पाउस Sun, 01/25/2015 - 20:02 नवीन
म्हणजे शेवटी वधूवरांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत ... परंतु सॉक्रेटीसच्या आकृतीबंधात्मक आशयानुसंचारीत्वाचा नियम बघता पुढील २५ वर्षात गुणात्मक वाढ कशी आणि कुठे होईल ?? आणि वधुवधू आणि वरवर ह्या विवाहांच्या अपेक्षांचा विचार पुरेसा किंवा अजिबात झाला नाही ह्या चा निषेध ह्या ह्या ह्या
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 01/26/2015 - 11:00 नवीन
सॉक्रेटीसच्या आकृतीबंधात्मक आशयानुसंचारीत्वाचा नियम
एकदम समीक्षकी कोट चढवलात की ओ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/26/2015 - 11:03 नवीन
लग्नात वधुवरांचे आईवडिल आणि नातेवाईक आपली हौसमौज पुरवून घेतात असे ऐकले होते.... लग्नासंबंधीच्या धाग्यावर प्रतिसादक आपली हौसमौज पुरवून घेत आहेत हे पहात आहे +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अजया Mon, 01/26/2015 - 03:23 नवीन
इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत ती पत्रिका बघतात का? जातीला प्राधान्य देतात का? स्वतंत्र राहाण्याबाबत काय विचार करतात? नोकरी करणार्या मुलीने घरी येऊन सगळी कामं,घरच्याना खूश ठेवायला सगळे सणवार सुट्ट्या घेऊन करावे का? किती मुलाना स्वयंपाक करता येतो? घरातल्या सणवाराला काय काय करतात हे माहित असते आणि मदत करायला जमते? काय म्हणता?
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 01/26/2015 - 05:04 नवीन
इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत ती पत्रिका बघतात का? -हो. जातीला प्राधान्य देतात का? -हो. (कारण शिक्षणानंतर ही एक अशी गोष्ट असते जी भांडणं झाल्यावर लोक हिणवायला वापरतात! आधी कितीही जातीयवादी नसल्याचे गोडवे गायले तरी.) स्वतंत्र राहाण्याबाबत काय विचार करतात? -नंतर वितुष्ट येण्यापेक्षा आधी शिस्तीत बाजूला व्हावं!! नोकरी करणार्या मुलीने घरी येऊन सगळी कामं,घरच्याना खूश ठेवायला सगळे सणवार सुट्ट्या घेऊन करावे का? -केलं तर उत्तम!! बडेजाव म्हणून नाही पण शिक्षणनोकरी सांभाळून आम्ही दोघांनी (मी आणि भाऊ) सगळे सणवार अगदी रीतभातीसकट व्यवस्थित पार पाडले आहेत. मग ते पक्ष असो की नवरात्र!! अर्थात त्यात कोणाला खूश करायचा हेतू नव्हता. किती मुलाना स्वयंपाक करता येतो? -हल्ली बर्‍याच मुलांना करता येतो. मुलींना चहा ठेवता आला तरी फार झालं. घरातल्या सणवाराला काय काय करतात हे माहित असते आणि मदत करायला जमते? काय म्हणता? -सगळं माहित आहे. (निदान मला तरी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
५
५० फक्त Mon, 01/26/2015 - 05:48 नवीन
हे सगळे प्रश्न, लग्न न झालेले पण लग्न करु इच्छिणारे आणि लग्न न करु इच्छिणारे अशा गटात विभागला गेला तर बरं होईल.. अकारण आणि उपद्रवी वाढलेल्या सोशल आणि नॉक सोशिक मिडियाचा हा अजुन एक दुष्परिणाम आहे, नवरा बायको किंवा बायकोचा मुर्खपणा, बायकोचा आक्रस्ताळीपणा, हटवादीपणा, पैशाची हाव आणि याला उत्तर / उतारा म्हणुन नव-याचा बाहेरख्यालीपणा, दारुडेपणा, खोटारडेपणा असा बेस असलेले, अर्थात याला काहीसा वास्तवाचा आधार असलेले विनोद चेपु / वाअ वा इतर मिडियावर पसरतात, आणि मग या आभासी जगाला सत्य मानुन चालणा-या या पिढिला आपल्या लग्नोपरांत वैयक्तिक सुरक्षेसाठी जास्ती काळजीपुर्वक राहावे असे वाटले तर त्यात गैर काय ? मुलांसाठी, ज्यांचं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पाय-यांपेकी पहिल्या दोन पाय-या स्वप्रमाणित करुन यशस्वीरीत्या चढुन झालेल्या आहेत, त्यांच्या तिस-या पायरीबद्दलच्या अपेक्षा वाढलेल्या असतात, ही पायरी सगळ्यात उंच आणि लांबीला देखील सगळ्यात जास्त आहे, इथं या छोट्या आयुष्याचा फार मोठा काळ घालवावा लागतो. हा दोन शरीरांच्या मिलनाचा खेळ आहे, असं जे समजलं जातं तसं नव्हतं, नाही आणि नसणार, अगदी एकरात्रसंबंधांचे पुरस्कर्ते देखिल या संबंधांच्या नंतर तयार होणा-या भावनिक / आर्थिक गुंतागुंतीतुन सुटु शकत नाहीत. ह्या तिस-या पायरीवरच पुढचं आयुष्य, पुढची पिढी, भावी समाज आणि मग देश वगैरे उभे राहतात, पाहता पाहता ही पायरी दोन शरीरांमधली वैयक्तिक बाब न राहता खुलेपणानं मान्य करुन किंवा दबक्या आवाजातल्या अमान्यतेसह एक कुटुंब, एक जात, एक धर्म उभा करत असते, आणि हे मान्य न करण्याचा फसवेपणा किंवा दुटप्पीपणाच बाकीच्या अवास्तव अपेक्षांना जन्म देतो. मुलींच्या बाबतीत पहिल्या थोडंसं वेगळं असतं, त्यांच्या करिता धर्माच्या दोन व्याख्या होतात एक लग्नपुर्व आणि एक लग्नपश्चात, अर्थ हा भाग पण दोन प्रकारे येतो, एक पैसा कमावणे किंवा त्यासाठी मदत करणे, आणि मिळणा-या पैशात घर चालवणे, मग येणारी मोठी तिसरी पायरी, जी या ना त्या कारणाने पहिल्या दोन पाय-यांचा भाग बनते आणि हे ओव्हरलॅपिंग असं होतं की पहिलीचा कोणता भाग तिसरी पायरी आहे आणि तिसरीचा किती भाग दुसरीला सावरतो आहे हे कधीच स्पष्ट होत नाही, आणि मग आठवते एक असंच सोशल मिडियानं प्रसिद्ध केलेलं वचन 'when in doubt, then fire all' आणि हे फायर ऑलच मग अपेक्षा वाढवायला कारणीभुत होतं, जसं महान पतिव्रता सावित्रीनं केलं होतंं, नुसता नवरा कशाला मागा जिवंत करुन त्यापेक्षा नवरा, पोरं, आजारी न पडणारे सासु सासरे, पैसा संपत्ती, सत्ता सगळं एकत्रच, आणि हल्ली तर सावित्रीच्या लेकी हा एक नविन शब्दप्रयोग रुढ केला गेला आहे, अर्थात याला संदर्भ मा. सावित्रीबाई फुलेंचा आहे आणि त्यांच्या बद्दल संपुर्ण आदर आहे याची दखल घ्यावी. ह्या तिस-या पायरीवरच पुढचं आयुष्य, पुढची पिढी, भावी समाज आणि मग देश वगैरे उभे राहतात, पाहता पाहता ही पायरी दोन शरीरांमधली वैयक्तिक बाब न राहता खुलेपणानं मान्य करुन किंवा दबक्या आवाजातल्या अमान्यतेसह एक कुटुंब, एक जात, एक धर्म उभा करत असते, आणि हे मान्य न करण्याचा फसवेपणा किंवा दुटप्पीपणाच बाकीच्या अवास्तव अपेक्षांना जन्म देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 05:53 नवीन
मुलींना चहा ठेवता आला तरी फार झालं. अर्रे चहा पिणे is so downmarket u know....आजकाल बरिस्ता / स्टारबक्स यांची चलती आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
पैसा Mon, 01/26/2015 - 06:00 नवीन
सकाळ संध्याकाळ बरिस्ता/शीशीडी/स्टारबक्स??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 06:17 नवीन
हे मी स्वतः बघितले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सूड Mon, 01/26/2015 - 06:35 नवीन
सकाळ संध्याकाळ बरिस्ता/शीशीडी/स्टारबक्स??
शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 01/26/2015 - 09:43 नवीन
रोज नुसत्या कॉफीला २००/३०० घालायचे असतील तर ५०००० पगार कसा पुरेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 10:30 नवीन
हाच प्रश्न जर मुलाने मुलीला विचारला तर उत्तर येते की स्वतः कमवून घेतोय ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सूड Tue, 01/27/2015 - 11:00 नवीन
रोज नुसत्या कॉफीला २००/३०० घालायचे असतील तर ५०००० पगार कसा पुरेल?
हा विचार झाला असता तर कशाला हवं होतं!! आमच्या आधीच्या किंवा त्याही आधीच्या पीढीतल्या बायका अमुक एक पदार्थ बाहेर खाल्ला मग, बाहेर पैसे घालवण्यापेक्षा तो पदार्थ घरी कसा बनवता येईल असा विचार करायच्या. आता मान्य आहे तुम्ही बिझी असता पण वरणभात पण घरी बनवायला त्रासिक वाटत असेल तर काय म्हणावं!! सणावाराचा तर विचारच सोडून द्या!! निम्म्या जणींना अमुक एक पदार्थ कसा बनवायचा हे माहीत नसतं आणि ज्यांना माहीत असतं त्यांना 'कोण एवढा घाट घालणार' असा प्रश्न पडतो. 'आपल्या' माणसांसाठी 'आपण' काहीतरी बनवण्यात एक आनंद असतो तो फार थोड्या जणींना समजतो. उरलेल्या बाजारातून विकतची पाकिटं आणण्यावर समाधान मानतात!! मग अर्थातच अशा पोरींना अगदी कुबेर जरी शोधून दिला तरी त्याला शंख घेऊन दारोदार फिरायला लावतील. आता प्रश्न येईल मग मुलांनी शिकावं, हरकत काहीच नाही शिकायला स्वयंपाक!! ज्यांच्या नवर्‍यांना येतो स्वयंपाक त्यातल्या काही जणी नवर्‍याला घाण्याला जुंपून गाव कोळपत फिरायला कमी करणार नाहीत याचा काय भरवसा? अशा वेळी दोघांनी सांभाळयचं, दोघांचा संसार हे फक्त स्वत:ला कव्हर करायला वापरलं जातं. आणि आता मुलाला जर स्वयंपाक येतच असेल तर मग त्याने असली धोंड पदरात (पक्षी, सदर्‍यात) पाडून घेताना दोनदा विचार केला तर काहीच हरकत नाही!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 05:51 नवीन
इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत ती पत्रिका बघतात का? जातीला प्राधान्य देतात का? स्वतंत्र राहाण्याबाबत काय विचार करतात? नोकरी करणार्या मुलीने घरी येऊन सगळी कामं,घरच्याना खूश ठेवायला सगळे सणवार सुट्ट्या घेऊन करावे का? किती मुलाना स्वयंपाक करता येतो? घरातल्या सणवाराला काय काय करतात हे माहित असते आणि मदत करायला जमते? काय म्हणता?
यासाठी माझ्यापुरती उत्तर्रे... इथे जी लग्नाळु मुलं मुली आहेत ती पत्रिका बघतात का? मी बघत नाही आणि घरच्यांनासुध्धा बघू देत नाही...मुलीकडच्यांना बघायची असेल तर खुशाल बघूदेत जातीला प्राधान्य देतात का? मला शष्प फरक पडत नाही...आणि घरच्यांचे जे काही थोडेफार नखरे असतील ते कमी करण्याची कपॅसिटी आहे स्वतंत्र राहाण्याबाबत काय विचार करतात? गरज असेल तरच रहावे...शक्यतो एकाच बिल्डिंगमध्ये २ घरे असतील तर तो सुवर्णमध्य असेल नोकरी करणार्या मुलीने घरी येऊन सगळी कामं,घरच्याना खूश ठेवायला सगळे सणवार सुट्ट्या घेऊन करावे का? ऑफिसची कामे करून घरची कामे स्वतःच करावी हे मला पटत नाही...सरळ धु जमत असेल तर घरकाम/धुणीभांडी करायला बाई असावी...स्वयंपाक आला पाहीजे (अग्दी सुगरण नसेल तरी खाण्यालायक बनवण्याइतके) पण रोज केलाच पाहीजे असी अपेक्षा नाही सणवार करायला सुट्टी टाकायची आवश्यकता जवळजवळ नसतेच...पण जर सुट्टी नसेल तर घ्यावीशी वाटली तर घ्यावी...नाही घ्यावीशी वाटली/नसेल मिळत तरी हरकत नाही...आजच्या जॉब मार्केट्मध्ये सणवार करायला सुट्टी मिळेल की नाही ते बॉस/क्लाएंट नावाचा प्राणी ठरवतो किती मुलाना स्वयंपाक करता येतो? अगदी सग्ळा नाही तरी बॅचलर असताना जितके लागते ते बनवता येते :) घरातल्या सणवाराला काय काय करतात हे माहित असते आणि मदत करायला जमते? मलाच डाऊट आहे मला सग्ळे माहीत आहे का...मुलीला माहीत नसेल तर हा तिचा दोष नाही....तिच्या आईवडलांचा दोष आहे (माझ्याघरी सगळे व्यवस्थित करतात पण मला काही गोष्टी अंधश्रध्धा या प्रकारातल्या वाटतात त्यामुळे मी करत नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ख
खमक्या Mon, 01/26/2015 - 03:38 नवीन
अजयाताई, अहं लग्नाळू अस्ति. घरचे पत्रिका बघून जुळत असेल तरच मुलगी पहायला आस्मादिकांना घेऊन जातात. मी विज्ञानाचा प्राध्यापक असूनही काही करू शकत नाही याचा खेद वाटतो. जातीला प्राधान्य देतात का? मी एक मस्त प्रस्ताव आणला होता. पण मुलगी परजातीतील असल्यामुळे प्रस्ताव धुडकावून लावण्यात आला आहे. स्वतंत्र राहाण्याबाबत काय विचार करतात? पिताश्री नोकरीतून निवृत्त होऊन शेती करताहेत. माझे नोकरीचे ठिकाण जवळ नसल्यामुळे स्वतंत्रच रहावे लागणार आहे. नोकरी करणार्या मुलीने घरी येऊन सगळी कामं,घरच्याना खूश ठेवायला सगळे सणवार सुट्ट्या घेऊन करावे का? नाही. किती मुलाना स्वयंपाक करता येतो? मला तरी नाही येत.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 05:54 नवीन
मी एक मस्त प्रस्ताव आणला होता. पण मुलगी परजातीतील असल्यामुळे प्रस्ताव धुडकावून लावण्यात आला आहे.
मला व्यनी कर्ता का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खमक्या
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 01/26/2015 - 09:23 नवीन
तुला प्रस्ताव हवाय का मुलीचा पत्ता? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 10:31 नवीन
मुलीचे नाव आणि मुलगी स्वकमाइकरता काय करते इतके सुरवातीला समजले तरी चालेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
अ
अजया Mon, 01/26/2015 - 03:57 नवीन
नविन प्रश्न तयार झाले आता!! तुमच्या होणार्या जोडीदाराच्या निवडीत तुमचा रोल नक्की काय? एखाद्या अावडलेल्या प्रपोजलला फक्त जातीचा निकष लावणे किती योग्य?आई वडलांचा या सर्व प्रोसिजरमध्ये कितपत इंडल्जन्स हवा?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 05:59 नवीन
तुमच्या होणार्या जोडीदाराच्या निवडीत तुमचा रोल नक्की काय?
सग्ळ्यात महत्वाचा...veto power
एखाद्या अावडलेल्या प्रपोजलला फक्त जातीचा निकष लावणे किती योग्य?
जातीमुळे शष्प फरक पडतो पण ही वस्तुस्थितीसुध्धा बघा
आई वडलांचा या सर्व प्रोसिजरमध्ये कितपत इंडल्जन्स हवा?
असायलाच हवा पण आधी स्वतःची पसंती मग आई-बाबांची पसंती बाकी गेले तेल लावत या क्रमाने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Mon, 01/26/2015 - 06:40 नवीन
प्रामाणिक उत्तरं सूड,टका ,खमक्या *HAPPY* खरं तर यावर लग्न झालेल्यानी पण लिहायला हरकत नसावी,अापल्या तेव्हा काय अपेक्षा होत्या,त्यांचं पुढे काय झालं!!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 06:46 नवीन
ओ तै...प्रामाणिक उत्तरं आज्काल कोणी अ‍ॅसेट मानत नाही...मुविंनी धाग्यात लिहिल्याप्रमाणे कमीत कमी ७५००० महिना पगार + स्वताचे घर + लग्नानंतर वेगळे रहायला सुट + गाडी असे असेल तर उत्तरे प्रामाणिक नस्ली तरी चाल्तात हे मी स्वानुभवावरुन सांग्तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ख
खमक्या Mon, 01/26/2015 - 09:58 नवीन
प्रामाणिकपणा हा ॲसेट तर नाहीच, उलट प्रामाणिकपणा म्हणजे भोळसटपणाचे लक्षण मानले जाऊ लागलेय. अजयाताई, माझे लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत माझा रोल अगदीच शुन्य नाही हं. घरातल्यांनी शॉर्टलिस्ट केलेल्या मुलींमधून वधू निवडण्याचे अधिकार दिलेत ना मला. आणि या अधिकाराचे वर्णन 'आम्ही अंतिम अधिकार तुला दिलाय' अशा शब्दांत केले जातेय. एखादी शॉर्टलिस्ट केलेली मुलगी नाकारण्याचा अधिकार आहे मला. पण बाकीच्यांनी शॉर्टलिस्ट न केलेली मुलगी शॉर्टलिस्ट करण्याचे अधिकार नाहीत मला. अजूनही आपल्या समाजात जात, भावकी इ. गोष्टी फार खोलवर रुजलेल्या आहेत. खुप पालकांना मुलाच्या प्रेमविवाहाला मान्यता द्यायची इच्छा असूनही समाज, भावकी यांच्या भीतीने ती देता येत नाही. याचा अनुभव घेतोय मी सध्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 10:33 नवीन
प्रामाणिकपणा म्हणजे भोळसटपणाचे लक्षण मानले जाऊ लागलेय.
आणि तेसुध्धा मुलींकडून...त्यांच्या पालकांकडून नाही
माझे लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत माझा रोल अगदीच शुन्य नाही हं. घरातल्यांनी शॉर्टलिस्ट केलेल्या मुलींमधून वधू निवडण्याचे अधिकार दिलेत ना मला. आणि या अधिकाराचे वर्णन 'आम्ही अंतिम अधिकार तुला दिलाय' अशा शब्दांत केले जातेय. एखादी शॉर्टलिस्ट केलेली मुलगी नाकारण्याचा अधिकार आहे मला. पण बाकीच्यांनी शॉर्टलिस्ट न केलेली मुलगी शॉर्टलिस्ट करण्याचे अधिकार नाहीत मला
=)) घरात मेणबत्ती मोर्चा न्या एकट्याचा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खमक्या
अ
अजया Mon, 01/26/2015 - 10:41 नवीन
या आयुष्यातल्या इतक्या महत्वाच्या गोष्टीत तुम्ही तुमचा से नाही वापरणार तर कधी वापरणार?शेवटी निवड करायला चुकलो तर माझी चूक मी जवाबदारी घेईन असा अॅटिट्युड का नसावा,मुलाचा किंवा मुलीचा देखिल? आई वडिलांचा अादर राखणं आणि लग्नाच्या बाबतीत त्यांच्या अर्ध्या आज्ञेत राहुन स्वतःच्या मनाशी तडजोड करणं ,मग हळहळणं या दोन गोष्टी वेगळ्या करता नाही येणार का? का हा तुमचा डिफेन्स असतो होऊ दे त्यांच्या मनासारखं असा काही किंवा कटकटीपासुन पळून जाणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खमक्या
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 10:55 नवीन
प्रचंड सहमत...नाहीतर लग्नानंतर गपगुमान नंदीबैल / ताटाखालचे मांजर बनतात समस्त नव्रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Mon, 01/26/2015 - 07:05 नवीन
जमाना बदल गया है और वो भी! अाम्ही दोघांनी शुन्यापासून सुरुवात केली आणि सतरा वर्षात तावुन सुलाखुन निघत बरीच प्रगती केली जी करता करता एकमेकांचे बेस्ट फ्रेन्ड्स होऊन गेलो.आधीच सर्व रेडिमेड मिळालेल्या नात्यात हे दोघांनी काडी काडी जमवुन घरटं उभं करण्याची मजा,तिचा सार्थ अभिमान कसं येणार!
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 01/26/2015 - 09:36 नवीन
आताच्या पिढीकडे वेळ नाहीये. आता लग्नाचं वयसुद्धा साधारण २५ च्या पुढे, मुलींसाठी तीस हेच खरं. आपण २२/२३ च्या वयात लग्न करून मोकळे होत होतो. त्यामुळे तेव्हा आपल्याजवळ काही नसायचं यात विशेष वाटत नव्हतं. मी लहान असताना तर घरात टीव्ही, फ्रीज, फोन काहीच नव्हतं. मोबाईल, लॅपटॉप गाड्या तर सोडूनच दे. त्यामुळे लग्न करून आयुष्याची सुरुवात करताना हातात काही नसलं तरी फिकीर वाटत नव्हती. आईवडिलांनी जसं काडी काडी करून घर उभं केलं तसंच आपल्याला करायचं आहे ही जाणीव होती. आता ५० फक्त म्हणाला तसं टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, गाडी इ. घरात असणं आवश्यक आहे त्याच्यापुढचं काय ते आपण मिळवायचं ही या पिढीची भावना असणार. त्यामुळे घरात "चमचे वाट्या" गोळा करत बसायला त्यांच्याकडे वेळ नसणारच. शिवाय ३० च्या पुढे संसार सुरू करायचा तर सगळं गोळा करायचं, मुलं वाढवायची यासाठी वेळ कमी उरतो. एकूणच दिवसाचे १२/१२ तास काम करणारं पब्लिक आजूबाजूला बघून मला थक्क व्हायला होतं. घर, बायको, मुलं यांच्यासाठी हे कुठून कसा वेळ काढणार कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Mon, 01/26/2015 - 10:10 नवीन
अगदी अगदी ताई.वेळ नाही,घाई मात्र आहे.दुसर्यांशी स्पर्धा आहे.तडजोडीची तयारी नाही.आणि दोघांचीही वयाची तिशी येताना बर्याच बाबतीत मतं ठाम झाली आहेत. बावीसाव्या वर्षी लग्न केलं तेव्हा अपेक्षाच कमी होत्या.दोघांचाही आपापल्या डिग्रीवर विश्वास होता.दोघं मिळुन काहीतरी छान करु अशी उर्मी .हे मिळून एक एक माईलस्टोन गाठत जाणं, अजूनही हे मला आवडतं.तेच दोघांना एक करत जातं असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 10:34 नवीन
हे होण्यासाठी तुमच्या पिढीचा काहिच हातभर नाही???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
बॅटमॅन Mon, 01/26/2015 - 11:01 नवीन
अगदी असेच म्हणतो. पन्नासरावांचा प्रतिसाद नेमका आहे. स्वतःच्याच पिढीच्या शिकवणीचा परिणाम दिसला की ऑड वाटतं, त्यातला स्वतःचा रोल मात्र दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:06 नवीन
यावर "आले मोठे आम्हाला शिकवणारे" असा प्रतिसाद येतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 01/26/2015 - 11:10 नवीन
सत्य पचत नसेल तर असेच प्रतिसाद येतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
य
यसवायजी Mon, 01/26/2015 - 11:12 नवीन
सगळ्यांनाच कसं डक-आप्पम पचणार? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:15 नवीन
डक-आप्पम म्हणजे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Mon, 01/26/2015 - 11:21 नवीन
ब्याट्याला विचार & countdown starts.. 10..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:22 नवीन
व्यनी करा की & countdown starts.. ९
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
स
सूड Tue, 01/27/2015 - 10:25 नवीन
डक-आप्पम
लिखाण डक असलं तरी उच्चारी 'डाक' आहे असे निरीक्षणाअंती नमूद करतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
ब
बॅटमॅन Tue, 01/27/2015 - 10:36 नवीन
हा हा हा, 'आ'गदी 'आ'गदी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अजया Mon, 01/26/2015 - 11:23 नवीन
काय म्हणताय जरा विस्कटा बरं! आमच्या पिढीमुळे पुढची पिढी असा विचार करते असं का? मला खरंच नाही समजलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:26 नवीन
थांबा जरा...१००० होउदे आता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
पैसा Mon, 01/26/2015 - 12:27 नवीन
आधीच्या पिढीने खूप मोठे बदल पाहिले आणि पचवले. आपल्याकडे जे नव्हतं ते मुलांना द्यावं या कल्पनेने त्यांनी नको इतके रेडीमेड आयुष्य मुलांना द्यायला सुरुवात केली. साहजिकच प्रत्येक गोष्टीत मुलं आईबापावर जास्तच अवलंबून रहायला लागली. आताही "आताच्या परिस्थितीला आधीची पिढी कारण आहे" म्हणत कळत नकळत तुम्ही आधीच्या पिढीकडे बघता आहात. शिवाय आधीची पिढीही मुले फक्त शारीरिक दृष्टीने मोठी झाली तरी मनाने आणि भावनिक दृष्ट्या आपली "बाळे" आहेत असे समजून वागतात. मुलांनाही ते सोयीचं असतं. मुलगी निवडताना आईवडिलांचा निर्णय स्वीकारला की आयुष्य सोपं होतंच. पण उद्या समजा नाही जमलं तर खापर फोडायलाही एक हक्काचा दगड असतो. मुलींची संख्या कमी झाल्यामुळे जर मुलींना जास्त मागणी आली असेल तर त्याला कारणही ही आधीची पिढी आहे, कारण त्यांच्याच काळात मुलींचे गर्भ नाहीसे करायची फ्याशन रूजली आणि फोफावली. माहितीचा विस्फोट आणि आर्थिक सुबत्ता यांच्याच काळात आली. आपल्याकडे अमेरिकन लाईफस्टाईल चांगलेच मूळ धरते आहे, पण त्यांच्याकडे असलेली श्रमप्रतिष्ठा आणि मुलांनी १६/१७ व्या वर्षी स्वतंत्र होऊन आपले आयुष्य सुरू करायची पद्धत मात्र स्वीकारली जात नाही. कारण ते न स्वीकारणं दोघांच्याही फायद्याचं आहे. याला आईबाप आणि मुले दोघेही कारण आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 12:33 नवीन
अग्दी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ए
एस Mon, 01/26/2015 - 16:57 नवीन
शेवटच्या परिच्छेदाशी सहमत. बादवे, खूपजण असे विचार मांडतात. प्रत्यक्ष कितीजण आचरणात आणतात हे गंमतीशीर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 01/26/2015 - 18:06 नवीन
प्रामाणिकपणे सांगायचं तर मी पण आचरणात आणत नाही. कारण हेच की ते आमच्या घरात एकूणच अमेरिकन स्टायली फारशा प्रचलित नाहीत, कारण अमेरिकन लाईफस्टाईल माझी आवडती नाही. अर्थात इतर सगळी मुलं प्रोटेक्टेड वातावरणात असताना माझ्याच मुलांना "उघड्यावर टाकणे" त्यांच्यावर अन्याय असेल. कारण आताच त्यांना स्वतंत्रपणे जगायला लावले तर ती इतर मुलांबरोबर स्पर्धेत मागे पडतील. भारतातल्या पद्धतीप्रमाणे त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुलं ही आमची जबाबदारी आहे. मात्र मुलांना स्वतंत्रपणे चांगलं वाईट ठरवता आलं पाहिजे आणि ती इमोशनली आपल्यावर अवलंबून नसतील याचीही काळजी मी घेते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सुबोध खरे Mon, 01/26/2015 - 18:44 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ए
एस Tue, 01/27/2015 - 03:38 नवीन
आपल्या दृष्टिकोनाशी मी असहमत आहे, पण विषय लग्नासंबंधी असताना पॅरेंटिंगकडे गाडी जाईन, त्यामुळे थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
विवेक्पूजा Tue, 01/27/2015 - 12:18 नवीन
अजयाताई, +११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
न
नेत्रेश Mon, 01/26/2015 - 09:03 नवीन
मुवि,अभिनंदन !
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Mon, 01/26/2015 - 09:04 नवीन
९४४
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
  • «
  • ‹
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • 20
  • 21
  • 22
  • 23
  • 24
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा