Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि
Wed, 01/14/2015 - 22:54
🗣 1423 प्रतिसाद
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)
ज
जेपी Mon, 01/26/2015 - 09:35 नवीन
माझ्यासाठी लग्न आणी संसार म्हणजे 'एक घरट बांधायच ,दोन अंडी घालुन त्यांना उबवत बसायच 'एवढा टिपीकल विचार करत नाही. एकच आयुष्य आहे आणी बरच काही करायचय. (ठाम )जेपी
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 01/26/2015 - 09:55 नवीन
मग काय विचार आहेत ते मांड बघू जेपी.आम्हाला पण कळू दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Mon, 01/26/2015 - 10:07 नवीन
थोडे महिने थांबा . फक्त विचार मांडुन नाही करुन पण दाखवेन. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 10:35 नवीन
तु आता डायरेक्ट पाळणा हलवल्यावरच मिपावर लेख टाक =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
अ
अजया Mon, 01/26/2015 - 11:00 नवीन
असंच वाटतंय खरं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
इ
इरसाल Wed, 01/28/2015 - 07:16 नवीन
ज्याच्या हाती पाळण्याची दोरी तो मिपाला उद्धारी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कपिलमुनी Mon, 01/26/2015 - 10:32 नवीन
किती लग्ने करणारे हा जेपी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Mon, 01/26/2015 - 10:42 नवीन
=)) कपिलमुनी, एकासाठीच किती काथ्थाकुटला जातोय ते पहा. एकच झेपेल मला. *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 10:56 नवीन
=)) धर्म बदल रे त्या आधी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ज
जेपी Mon, 01/26/2015 - 10:59 नवीन
माताय आता धर्म कुठुन आला इथे. (धर्म=यम)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:26 नवीन
अभ्यास वाढव ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
सिरुसेरि Mon, 01/26/2015 - 09:48 नवीन
बरयाचशा प्रतिसादांचा सूर हा एकतर्फी , एकांगी असा वाटतो आहे . आजच्या काळातील उपवर मुलांची एकुण अवस्था ही दयनीय आहे असाच मतप्रवाह दिसतो आहे . काल परवा पर्यंत मुले राज्यकर्ती होती . तर आता लग्नाच्या बाजारात / प्रक्रियेत मुलींचे पारडे जड आहे . आतापर्यंत स्त्रीवर्गाने / मुलींनी बालविवाह , अकाली मात्रुत्व , बालविधवा , अकाली वैधव्य , केशवपन , सती , हुंडाबळी , मारहाण ,लग्न मोडणे ,मानापमान हे त्रास , अन्याय सहन केले. कदाचित याच स्त्रिया / मुली पुनर्जन्म घेऊन रुबाबात 2 wheeler , 4 wheeler , flights , rockets मधून मिरवत आहेत .पुरुष वर्गाला धडा शिकवत आहेत. गतकाळातील राहून गेलेले जगणे जगत आहेत . याच संदर्भात जुना प्रतिसाद परत जोडतो आहे . पुनर्जन्म वगैरे कल्पना सोडल्या तरिही इतर मुद्द्यांवर गंभीरपणे विचार करता येइल . ---------------------------------------------------- लेख व प्रतिसाद हे जरी "वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?" या विषयावर असले तरी एकूण सूर हा "हल्लीच्या मूलींच्या / वधू पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत" असाच वाटत आहे . अविवाहीत मुलींचे कमी संख्या प्रमाण हे एक त्यामागचे मुख्य कारण असेल तर हि एकंदर परिस्थिती मुलांनी / वर पक्षाच्या लोकांनीही वेळीच ओळखली पाहिजे . व त्याप्रमाणे आपल्या अपेक्षा जर कालबाह्य , अवास्तव असतील तर त्यांत आधीच बदल केले पाहिजेत ( उदाहरणार्थ- पत्रिका ,ठराविक जात , पोटजात यांचा आग्रह ). तसेच आपल्या समाजात चूकीच्या लग्नाच्या बळी ठरलेल्या व फसवणूक झालेल्या घट्स्फोटीत मुलींचेह प्रमाण जास्त आहे . तसेच दुर्दैवाने अकालीच वैधव्य आलेल्या मुलींचेही बरेच प्रमाण आहे .या मुलींचाही लग्नासाठी मुलांनी व वर पक्षाच्या लोकांनीही मनापासून व गंभिरपणे सविस्तर विचार केला पाहिजे . या गोष्टी मनापासून व खरया प्रेमानेच घडाव्यात. त्यामागे कोणताही उपकाराचा किंवा समाज सुधारणेचा हेतू नसावा .
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 10:35 नवीन
धाग्याचा उद्देश वाढलेल्या अवास्तव अपेक्षा असा आहे नं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
ह
हाडक्या Mon, 01/26/2015 - 11:26 नवीन
सिरुसेरि, प्रथम कल्पना म्हणून तरी एका पिढीच्या अन्यायाचा बदला पुढच्या पिढीकडून वसूल करण्याची कल्पनाच मला अतिशय अन्यायकारक वाटते. तसेही, स्त्रीच्या अन्यायासाठी स्त्रीयाच (सासू, इतर नातेवाईक जणी, शेजारणी) जास्त जबाबदार होत्या, आहेत आणि राहतील असे वाटते. उदाहरण म्हणून विधवा विवाहाचे घ्या.
तसेच आपल्या समाजात चूकीच्या लग्नाच्या बळी ठरलेल्या व फसवणूक झालेल्या घट्स्फोटीत मुलींचेह प्रमाण जास्त आहे . तसेच दुर्दैवाने अकालीच वैधव्य आलेल्या मुलींचेही बरेच प्रमाण आहे .या मुलींचाही लग्नासाठी मुलांनी व वर पक्षाच्या लोकांनीही मनापासून व गंभिरपणे सविस्तर विचार केला पाहिजे .
यात मुलांच्या घरातील महिला किती पुढाकार घेतील हो ? अगदी शिकल्या-सवरलेल्या आजच्या काळातल्या मुलीपण आपल्या भावासाठी अशा प्रस्तावांचा किती विचार करतील ? एक प्रसंग, एक चांगली उच्चशिक्षित मुलगी की जिने या सगळ्या अपेक्षा (काय ते पगार, फ्लॅट, गाडी वगैरे) मांडून लग्न केले, स्वतःही जॉब करते, तिच्या बाळाच्या कार्यक्रमास तिने तिच्या सख्ख्या काकूस बोलावणे टाळले कारण काय तर तिला मूल नाही. याला तिचा नवरादेखील काही करु शकला नाही कारण घरातल्या सगळ्याच बायकांचे यावर एकमत होते (हा धक्काच होता त्याला!). जर स्त्री-पुरुष हा किमान भेद गृहित धरला तरी स्त्री दुसर्‍या स्त्रीला कशी वागणूक देते ते सगळ्यात आधी महत्त्वाचे आहे. त्यात सुधारणा जास्त महत्त्वाची आहे. बाकी सगळे बोलायला ठीकच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
स
सिरुसेरि Mon, 01/26/2015 - 16:39 नवीन
"प्रथम कल्पना म्हणून तरी एका पिढीच्या अन्यायाचा बदला पुढच्या पिढीकडून वसूल करण्याची कल्पनाच मला अतिशय अन्यायकारक वाटते" हि सूडजन्य परिस्थिती स्त्रिवर्गाने मुद्दामहून निर्माण केलेली नाही . तर , कालचक्राने निर्माण केलेली आहे . हा तर काळाचा महिमा आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Mon, 01/26/2015 - 17:33 नवीन
हि सूडजन्य परिस्थिती स्त्रिवर्गाने मुद्दामहून निर्माण केलेली नाही . तर , कालचक्राने निर्माण केलेली आहे . हा तर काळाचा महिमा आहे .
स्त्रीवर्गाने निर्माण केली की नाही (जणु त्यांच्या स्त्री भृणहत्येत अजिबातच हात नव्हता कधी) हा प्रश्न इथे नाही. तसाही ही सूडजन्य परिस्थिती आहे हेही मान्य नाही तरीही असे मानू की अशी परिस्थिती आहे. मग कालचक्राचा महिमा म्हणून अशा वेळी "एका पिढीच्या अन्यायाचा बदला पुढच्या पिढीकडून वसूल करणे" हे कसे बरोबर? काळाचा महिमा ही तर पळवाट झाली आणि ती घातकही आहे, कारण,उद्या परिस्थिती उलट झाल्यावर मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न की मग. अजून असे की मग हा "काळाचा महिमा" वाला नियम, आरक्षणे आणि तत्सम गोष्टींना ही लावणार काय? म्हणजे, आधीच "पुरुष" आणि त्यात so called "उच्चवर्णीय" म्हणून भारतात जन्माला आलास, आता भोग तुझ्या सगळ्याच पूर्वजांची फळे !! असा तुमचा निष्कर्ष दिसतो, जो की पूर्णपणे चुकीचा आणि अन्याय्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
ब
बॅटमॅन Mon, 01/26/2015 - 19:53 नवीन
म्हणजे, आधीच "पुरुष" आणि त्यात so called "उच्चवर्णीय" म्हणून भारतात जन्माला आलास, आता भोग तुझ्या सगळ्याच पूर्वजांची फळे !! असा तुमचा निष्कर्ष दिसतो, जो की पूर्णपणे चुकीचा आणि अन्याय्य आहे.
नायतर काय मायला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 01/27/2015 - 05:42 नवीन
हाडुकरावांशी सहमत!! वड्याचं तेलं वांग्यावर काढायचा प्रकार आहे हा. आणि एक पुरुष स्त्रीचा जितका छळ करत नसेल ना तितका स्त्रीचं स्त्रीचा करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
स
सूड Tue, 01/27/2015 - 10:23 नवीन
हैयोहैयेयो तुमचा किंवा तुम्ही त्यांचे डूआयडी आहात का हो? कालचक्र काय, काळाचा महिमा काय!! नाडीबद्दल लिहायला लागू नका आता म्हणजे मिळवली!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/26/2015 - 10:51 नवीन
हा धागा इंचाइंचाने मिपावरचा प्रथम हजार-प्रतिसादी धागा बनतो आहे... याकरिता मुवि, मिपा आणि अनेक प्रतिसादकर्त्यांचे हार्दीक अभिनंदन !!! (मुवि आपले हात पहिले तोंडावर ठेऊन, मग कानावर ठेऊन, शेवटी आकाशाकडे उंचावून "हा बहुमान मला मिळेल कधी वाटले नव्हते. धन्यवाद मिपा, धन्यवाद प्रतिसादक, इ, इ" म्हणत आहेत अशी स्मायली आणि एखाद्या वार्षीक बक्षिससमारंभाचे पार्श्वसंगीत वाजत आहे असे कल्पावे. :) ;) )
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 10:54 नवीन
अभ्याकडून याचा पण फ्लेक्ष तयार करुन घेउया का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ज
जेपी Mon, 01/26/2015 - 10:57 नवीन
या धाग्याबद्दल मुविंना कशेळी कर्जत संमेलनात सन्मानीत करण्यात यावे असा ठराव मांडत आहे. *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:05 नवीन
जोर्दार अणुमोदन...फक्त शाल व श्रीफळाऐवजी .... एल.पी. आणि पक्षी देउ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ह
हाडक्या Mon, 01/26/2015 - 11:09 नवीन
एल.पी. आणि पक्षी देउ
अरे, हे एल.पी. ठाऊक आहे पण हे पक्षी काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
य
यसवायजी Mon, 01/26/2015 - 11:11 नवीन
कात्रजला दरीपुलाजवळ एक हाटेल आहे "पंछी-क्रंची" नावाचं. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:11 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/26/2015 - 11:14 नवीन
काय हे ? पक्षीतिर्थातले तिर्थ माहीत आहे आणि मग पक्ष्यांवर हा अन्याय करणे बरे दिसते का ? समग्र-पक्षीतिर्थ-भाविंक-मंडळातर्फे हाडक्या यांच्या घरावर भव्य मोर्चा काढण्यात यावा ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:15 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हाडक्या Mon, 01/26/2015 - 11:29 नवीन
अनुमोदन. मोर्चा काढून या. आणि येताना पक्षी (प्राणी पण चालतील तसे) आणि भरपूर तीर्थ पण घेऊन या.. (आमच्या शेतात मट्टण पार्टी करण्याची इच्छा असलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
समिर२० Mon, 01/26/2015 - 11:10 नवीन
अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
मुक्त विहारि Mon, 01/26/2015 - 20:05 नवीन
कुणीही आक्रस्ताळे-पणे आपलीच बाजू योग्य, असे म्ह्णत नाही. हजार प्रतिसादापेक्षा, सुसंवाद करणारे मिपाकर मला तरी जास्त आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
स्वामी संकेतानंद Mon, 01/26/2015 - 11:10 नवीन
इंच इंच कमेंटत सहस्रकमेन्टदर्शनाकडे धाग्याची वाटचाल सुरु आहे. लगे रहो. लग्नाळू मित्रहो, पोरी बघून कंटाळलात की आमच्या कुशासनाशेजारी आपले दर्भासन टाका. आमच्या आश्रमात भरपूर जागा आहे. आपण मुलींची मानसिकता बदलावी ह्यासाठी तपश्चर्या करू... ;)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:13 नवीन
नक्को....आम्ची प्रायवेट तपश्चर्या अस्ते ;) आणि
लग्नाळू मित्रहो, पोरी बघून कंटाळलात की आमच्या कुशासनाशेजारी आपले दर्भासन टाका. आमच्या आश्रमात भरपूर जागा आहे.
यावरुन तुम्ही वेगळ्याच गुरुकुलातील दिस्ता =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
स्वामी संकेतानंद Mon, 01/26/2015 - 11:16 नवीन
नाही नाही. आपले गुरुकुल एकच.. पण पोरींच्या अपेक्षा विनासायास पूर्ण करायला स्वामी बनणे हाच एक खात्रीचा उपाय दिसला. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:16 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
ह
हाडक्या Mon, 01/26/2015 - 11:33 नवीन
विनासायास
स्वामी असलात तरी पण "सायास" तुम्हालाच करायला लागणार हो ? (समजले नाही तर पोगो नैतर आस्था चॅनल बघत बसा हो स्वामी.. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:49 नवीन
ये सायास सायास नही होते बच्चा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Tue, 01/27/2015 - 10:50 नवीन
;) .. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
य
यसवायजी Mon, 01/26/2015 - 11:16 नवीन
लग्नाळू मित्रहो, पोरी बघून कंटाळलात की पोरी बघण्यात कंटाळा कसला? ते काम तर आम्ही आजन्म करत राहू. (हो.लग्न झाल्यावरही) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:17 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:26 नवीन
पोरी बघण्यात कंटाळा कसला? ते काम तर आम्ही आजन्म करत राहू. (हो.लग्न झाल्यावरही)
सग्ळ्या अनाहिता लाटणे मोर्चा काढतील तुमच्या घरावर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Mon, 01/26/2015 - 11:39 नवीन
@टका - आता यात अनाहितांचा काय संबंध? येऊदेत आल्यातर. बघून घीन. तू काड्या टाक अजून. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:50 नवीन
अनाहितांना कधी कस्ल्या लॉजिकल कारणांची गरज पड्ते का =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
द
दादा पेंगट Mon, 01/26/2015 - 11:55 नवीन
जेन्डर बायस्ड कमेन्ट...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
य
यसवायजी Mon, 01/26/2015 - 12:15 नवीन
अवांतर:- यावरून एक ज्योक आठवला. Q.- what is the difference between a wife's arguments & a knife? . . Ans- the knife has a point.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सस्नेह Tue, 01/27/2015 - 11:41 नवीन
पीजे. मतलब Pointless joke !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 01/26/2015 - 13:27 नवीन
मी चुकुन दर्भासनाऐवजी गर्धभासन वाचलं!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:23 नवीन
हे प्रतिसादाचे १२ वे पान
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:26 नवीन
९९९ \m/
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:26 नवीन
१००० \m/
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 17
  • 18
  • 19
  • 20
  • 21
  • 22
  • 23
  • 24
  • 25
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा