Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि
Wed, 01/14/2015 - 22:54
🗣 1423 प्रतिसाद
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)
ट
टवाळ कार्टा Sat, 01/24/2015 - 07:39 नवीन
हि स्ट्रेस टेस्टिंग आहे ना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ख
खमक्या Sat, 01/24/2015 - 14:42 नवीन
थंडावला वाटतं धागा... फिल्डींग लावली होती ना राव ८८८,९००,९९९ व१०००व्या प्रतिसादासाठी.... वाया जाणार असे दिसतेय.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 01/24/2015 - 16:02 नवीन
भांडण सुरू करा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खमक्या
ट
टवाळ कार्टा Sat, 01/24/2015 - 16:10 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा Sat, 01/24/2015 - 16:06 नवीन
हे मिपाकरांचेच स्ट्रेस टेस्टींग झाले काय? ८००+ प्रतिसाद हा फक्त मिपाविक्रम आहे की यच्च्ययावत मराठी संस्थळांमधला विक्रम म्हणायचा? रच्याकने एका मराठी माणसाला दुसर्या मराठी माणसाचा धागा इतका पॉपुलर झाला याची जळजळ नसेल ना??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खमक्या
प
पैसा Sat, 01/24/2015 - 16:08 नवीन
मायबोलीवर १००० प्रतिसादवाले धागे कमी नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sat, 01/24/2015 - 16:10 नवीन
काय सांगता...म्हणजे मिपा सोडून गेलेले इतके "अ‍ॅक्टिव्ह" होते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 01/24/2015 - 16:19 नवीन
ये पीएस्पीओ नहीं जान्ता! कार्ट्या, मायबोली हे मराठीतलं आद्य संस्थ़ळ आहे. १९९६ पासून चालतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ह
हाडक्या Sat, 01/24/2015 - 16:23 नवीन
चालायचं हो पैसातै.. नवे पोरं ही.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा Sat, 01/24/2015 - 16:31 नवीन
नया हय मय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ख
खमक्या Sat, 01/24/2015 - 17:11 नवीन
आंतरजातीय विवाहास विरोध करुन स्वजातीय जोडीदार पहायला लावणारा समाज आंतरलिंगीय विवाहास प्रोत्साहन का बरे देतो? का नाही स्वलिंगीय विवाह करत?? स्वगत- १००० साठी काडी पुरेल का ही.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 01/24/2015 - 17:42 नवीन
मी लिहितो आहे ती काडी नाहीये पण वस्तुस्थिती आहे मला सुटेबल वाटणार्या मुली जास्त करून ब्राम्हण जातीतल्याच मिळत होत्या मॅट्रिमोनी सायटींवर...पण त्यापैकी कोणीही जातीबाहेर लग्न करण्यास तयार नव्हते...कारण विचारले तर उत्तर "आई-बाबांना नाही चालणार"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खमक्या
ख
खमक्या Sat, 01/24/2015 - 17:51 नवीन
तोच तर लोचा आहे राव. पहिला फिल्टर मुलीचे गुण हा लावण्याऐवजी जात/धर्म हा लावावा लागतोय. त्यातून ज्या उरतील त्यांच्यामधून निवडावी लागतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sat, 01/24/2015 - 18:37 नवीन
त्यापेक्षा वाईट म्हणजे व्यवस्थित शिकलेल्या मुलींचासुध्धा याला विरोध नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खमक्या
प
पैसा Sat, 01/24/2015 - 17:58 नवीन
जातीबाहेर लग्न करताना लोक अनेक कारणांनी पाय मागे घेतात. खाण्यापिण्यात आणि चालीरीतीमधे बदल, उच्चनीचतेची भावना, नातेवाईक स्वीकारतील का नाही याची शंका, अनेक गोष्टी असतात. त्याच्यापलीकडे विचार करणारे आणि जातीचा विचार न करणारे फार कमी. या लग्ने जुळवणार्‍या साईट्स आणि मंडळांच्या उल्लेखावरून परिस्थिती किती बदलली आहे याची जाणीव झाली. मी लग्न केलं त्या काळात प्रेमविवाह झाला नाही तर ओळखीच्या कोणा काका मामा, आत्या, मावशी तर्फे त्यांच्या नात्यातली किंवा ओळखीची स्थळे सांगून यायची. त्यामुळे स्थळाची थोडीफार तरी माहिती मिळायची. गंमत म्हणजे ज्याचं जिचं लग्न जमत नसेल त्यांच्यासाठीच फक्त मंडळाचा वगैरे विचार व्हायचा. एकप्रकारे नाव नोंदवणे हे कमीपणाचं मानलं जायचं. तेव्हा रोहिणी नावाचं मासिक अशा स्थळांच्या छोट्या जाहिरातींसाठीच स्पेशल होतं असं आठवतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sat, 01/24/2015 - 18:37 नवीन
अरे पण शिकलेल्यांना काय धाड भरलीय...इतक्या मराठी संस्थळांवर लिहिणारे बाकी जगात हे बदलण्यासाठी काहिच करत नाहीत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ह
हाडक्या Sat, 01/24/2015 - 19:20 नवीन
अगदी अगदी.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sat, 01/24/2015 - 18:37 नवीन
८८८ :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 01/24/2015 - 18:39 नवीन
बाकी मी १०००, १००१ या प्रतिसादांच्या शर्यतीत नाहीये...हापिसात असणारै :( माझा नंबर मी ७००, ८५० आणि ८८८ वर लावला आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ह
हाडक्या Sat, 01/24/2015 - 19:14 नवीन
मंडळी, आता ९०० वा तरी आमाला मिळावा.. ८५० कडे डोले लवून बसलो होतो. हापिसातून घरी येस्तोवर ८६० दिसले. :( आता ९०० आमच्यासाठी राखून ठेवा. नाय तर पारावरचा मुंजा १००० शिवाय सोडणार नाय तुमाला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
य
यसवायजी Sat, 01/24/2015 - 19:14 नवीन
पैलच स्थळ. मला एवढ़यात लग्न करायचच नाही म्हणून सांगितलं होतं. पत्रिका जुळली नहीं म्हणून क्यान्सल झालं. आता सांगताहेत की एकुलती १ मुलगी आहे, पुण्यात ५०००० पगार आहे, बाबाचे २ फ्लॅट आहेत कोल्हापुरात. पोरगी नाकी-डोळी निटस. विशेष म्हणजे त्यांना आवडला होता म्हणे मुलगा(फोटोतला). :D च्यायला नशीबच झंडू.. आता म्हणतोय कसली पत्रिका बघताय? हिच्च पोरगी पाहिजे आपल्याला. तर कोण तयार नाही. मी काय करू आता? मिपाकरांनो.. F१ F१
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Sat, 01/24/2015 - 19:18 नवीन
टका की कोणीतरी बोलले होते, पत्रिका फिक्स करून मिळते म्हणून.. बघा ट्राय मारून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
ह
हाडक्या Sat, 01/24/2015 - 19:19 नवीन
आणि हो, ठरलं की आमाला बॅचलर पार्टीला बोलवायला विसरु नका.. (लग्नाला नाय बोलवलं तरी चालेल.. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ट
टवाळ कार्टा Sun, 01/25/2015 - 05:01 नवीन
आमाला बॅचलर पार्टीला बोलवायला विसरु नका.. (लग्नाला नाय बोलवलं तरी चालेल.. ) >>> अग्दी अग्दी...जोर्दार अणुमोदन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ट
टवाळ कार्टा Sun, 01/25/2015 - 05:00 नवीन
खिसा खाली करायची तयारी हवी त्यासाठी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ट
टवाळ कार्टा Sun, 01/25/2015 - 05:02 नवीन
खिक्क...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
ट
टवाळ कार्टा Sun, 01/25/2015 - 05:15 नवीन
पैलच स्थळ. मला एवढ़यात लग्न करायचच नाही म्हणून सांगितलं होतं. पत्रिका जुळली नहीं म्हणून क्यान्सल झालं.
लग्न करायचे नाही सांगितलेले अस्ताना पत्रिका बघितलीच कशाला? यावरून समजते की तुम्च्यात १ आदर्श नव्रा होण्याचे गुण आहेत ;) ब्वॉर बघितल्यावर जर जुळली अस्ती तर काय केले अस्ते? म्हणजे बाकी लिहिलेले डिटेल्स माहीत नस्ताना...
आता सांगताहेत की एकुलती १ मुलगी आहे, पुण्यात ५०००० पगार आहे, बाबाचे २ फ्लॅट आहेत कोल्हापुरात. पोरगी नाकी-डोळी निटस. विशेष म्हणजे त्यांना आवडला होता म्हणे मुलगा(फोटोतला).
आवडीनिवडी जुळतात की नाही ते महत्वाचे नाही??? आणि फोटोत नक्की तुम्हीच होता ना ;)
च्यायला नशीबच झंडू.. आता म्हणतोय कसली पत्रिका बघताय? हिच्च पोरगी पाहिजे आपल्याला. तर कोण तयार नाही. मी काय करू आता? मिपाकरांनो.. F१ F१
असेल हिम्मत तर लावा फोन त्या पार्टीला...थोडे गोड बोलून बघा अंदाज येतोय का...समोरची पार्टी तयार असेल तर घरच्यांसमोर सरळ सांगा "लग्न केले तर हिच्याशीच...हॉलमधे का मंदिरात ते तुम्ही ठरवा" आणि असे नसेल कर्ता येत तर ही गोष्ट मिपावर लिहिल्यावर मिपाकरांचे जे काही प्रतिसाद येतील ते वेंजॉय करा ;) - हा प्रतिसाद म.घे.न. = मनावर घेउ नका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Sun, 01/25/2015 - 21:07 नवीन
@ लग्न करायचे नाही सांगितलेले अस्ताना पत्रिका बघितलीच कशाला >> अरे मी नको म्हणत असताना घरच्यांनी पत्रिका बघितली. आता म्हणे, एकदा पत्रिका बघून नाही म्हटलं की पुन्हा विचार करायचा नाही. पुढे वाईट अनुभव आले तर पत्रिकेमुळे आले असं वाटतं 'म्हणे'. :)) @ आवडीनिवडी जुळतात की नाही ते महत्वाचे नाही? >> एवढा सिरियस काहीच नाही बे मी. कसल्या आवडी निवडी? न भेटताच? बाकी, "विषय" वाचला असतास (थोड़ा हातभार १००० साठी) तर एवढ शिरेस घेतलं नसतंस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 01/25/2015 - 22:09 नवीन
पुढच्या वेळी पत्रिका बघणे लास्टला ठेवा ;) विषय वाचून आधी शिरेस प्रतिसाद द्यायचा...मग त्यात पाणी घालून पातळ करायचा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
स
सूड Sun, 01/25/2015 - 20:57 नवीन
मेल्या तरी दोघं दोघं जण कानी कपाळी ओरडून सांगत होतो!! आता का f1??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Sun, 01/25/2015 - 21:09 नवीन
एक डाव माफ करा. फुडच्या डावाला तुमचा सल्ला डोक्याडोळ्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Sun, 01/25/2015 - 22:10 नवीन
इतकेपण ऐकायचे नस्ते मिपाकरांचे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
ट
टवाळ कार्टा Sun, 01/25/2015 - 22:09 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ह
हाडक्या Sat, 01/24/2015 - 19:21 नवीन
आणि हे ९००.. हुश्श्य..
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 01/24/2015 - 20:09 नवीन
मुळात वधु वरांच्या अपेक्षा वेगळ्याच असतात, मुळ धाग्यात ज्या अपेक्षांवर चर्चेची अपेक्षा आहे त्या, वधु आणि वर या संबोधनाला प्राप्त होण्यासाठी असणा-या अपेक्षा आहेत. लग्न ठरण्याआधी मुलगी दाखवायची अन मुलगा पाहायचा अशीच व्यक्ती असते, एकदा का लग्न कुणाशी करायचं ठरलं की मग ते वधु आणि वर होतात. आता या शिक्षण - करियर - पैसा कमावणे आणि आपला संसार किंवा कुटुंब सुरु करणे या गोंधळात अडकलेल्या मुला मुलीच्या आपल्या भावी आयुष्याच्या बद्दल काही स्वप्नं असतात, काही मतं असतात. यापैकी स्वप्नं मनातुन आलेली असतात तर मतं ब-याचदा लाद्लेली असतात. लग्न ठरवण्यासाठीच्या भेटींमध्ये बोललं जाते ते बहुधा या मतांबद्द्द्लच, फार क्वचितवेळा स्वप्नांचा उच्चार होतो, अगदी प्रेम करणारे दोघं स्वताचं लग्न स्वत ठरवत असले तरी. प्रेम विवाहात, तथाकथित कोर्ट्शिपच्या काळात या स्वप्नांबद्दल कधीतरी विषय निघालेला असतो पण अ‍ॅरेंज्ड पद्धतीत तेवढा वेळ दिला जातोच असं नाही. अशा भेटींमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे साधारणपणे ' तुम्हांला / तुला काय वाटतं ? अशा प्रकारचे असतात. किंवा एक विशलिस्ट असते, आता विशलिस्ट मधला प्रत्येक मुद्दा पुर्ण झालाच पाहिजे असं नसतं, पण उद्या वेळ पडलीच तर वाद घालायला असावेत म्हणुन काही गोष्टी घुसडलेल्या असतात. तसंच या अपेक्षा वाढायला आपण किंवा आपली मागची एक पिढी देखील जबाबदार आहे, ते नाही का उपग्रह सोडणारी रॉकेट दोन- तीन टप्प्याची असतात, पहिला टप्पा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडायला , दुसरा वातावरणाच्या बाहेर पडायला, तिसरा जास्तीचा वेग घ्यायला आणी चवथा त्या उपग्रहाला त्याच्या स्थिर कक्षेत पोहोचवायला. आता एका पिढिनं आपल्या पुढल्या पिढिला जन्माला घालण्यापुर्वी एक दोन टप्पे पार केले होते, पण नंतर जेंव्हा या पुढच्या पिढिला पुढें सरकायची वेळ आली तेंव्हा त्यांनी पुन्हा पहिल्या टप्प्या पासुन सुरुवात करावी ही अपेक्षा चुक आहे ना. ती पिढी ज्या टप्प्यावर आहे तिथुन पुढचाच विचार करणार. घरं तर मुलाच्या बापानी घेउन ठेवली असतील ना, आता आपल्या साठी चारचाकी अन झालीच किंवा होउ दिलीच तर त्या पोरांच्या शिक्षणं / ऐशआरामाची सोय मुलगा करु शकतो का नाही याचीच काळजी मुलगी करणार, ती कशाला विचार करते हा पोरगा भाड्यानं घर घेउन राहु शकतो का / वेळेवर एसटी रेल्वेची रिझर्वेशन करु शकतो का काय याची ? बेंन्टेक्स्च्या बांगड्या न मंगळ्सुत्रं घालुन तिच्या आईनं कित्येक सण समारंभ मिरवुन पार नेलेलं असतात, ज्या मुलीचे ८वे -९वे वाढदिवस १ ग्रॅ. सोन्याचे दागिने नाहीतर मायक्रोकॅरेट च्या हि-याच्या पेडंट्नं होत असतील, किंवा जी पोरं १०-१२व्या वर्षीच सिंगापुर / दुबई फिरुन येत असतील, त्या पिढीतल्या मुला मुलींनी का अपेक्षा वाढवुन ठेवुन नयेत. ही चर्चा झाली भौतिक अपेक्षांबद्दल, पण वर कुणीतरी म्हणल्याप्रमाणे या अपेक्षा पुर्ण करुन / होउन सुरु झालेले संसार परस्परांच्य अवास्तव / अनपेक्षित / विक्षिप्त / अनैसर्गिक शरीरसुखाच्या अपेक्षा एकमेकांना न पेलवल्या गेल्यानं मोडकळीस येतात हे भयावह वास्तव होउ पाहात आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/24/2015 - 21:00 नवीन
छान प्रतिसाद... धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
ट
टवाळ कार्टा Sun, 01/25/2015 - 05:03 नवीन
काही पटले काही नाही पटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
प
पैसा Sun, 01/25/2015 - 15:38 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
ब
बॅटमॅन Sun, 01/25/2015 - 16:53 नवीन
टिपिकल पण्णास प्रतिसाद. ट्रूथ इज़ अ डिष बेष्ट सर्व्ह्ड हार्ड & फास्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
श
श्रीरंग_जोशी Sun, 01/25/2015 - 17:11 नवीन
धाग्याचे शीर्षक 'उपवर मुला मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?' असे हवे होते हे तुम्हीच सर्वप्रथम लक्षात आणून दिले. ही सर्व चर्चा वाचणार्‍या उपवर मुला मुलींपैकी काहींनी आपल्या अपेक्षा वास्तविकतेच्या जवळ नेल्यास ते या महाचर्चेचे यश म्हणता येईल. मला अशी आशा आहे की असे कुणी मिपाकर असल्यास किंवा वाचनमात्र मिपाकर असल्यास सदस्यत्व घेऊन भविष्यात या धाग्यावर परत येऊन त्यांना या चर्चेचा लाभ कसा झाला याबाबत लिहितील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 01/26/2015 - 11:19 नवीन
ही चर्चा झाली भौतिक अपेक्षांबद्दल, पण वर कुणीतरी म्हणल्याप्रमाणे या अपेक्षा पुर्ण करुन / होउन सुरु झालेले संसार परस्परांच्य अवास्तव / अनपेक्षित / विक्षिप्त / अनैसर्गिक शरीरसुखाच्या अपेक्षा एकमेकांना न पेलवल्या गेल्यानं मोडकळीस येतात हे भयावह वास्तव होउ पाहात आहे.
>>> ++++++++++++११११११११११११११११ हेचते- (गेल्या १५ वर्षातल्या..) बहुसंख्य घट्स्फोटांचं बीज! कारण तेच..,मागे उल्लेख केलेलं.. विवाहीत होताना.. जात्/शिक्षण/पैसा/(तथाकथित सामाजिक)प्रतिष्ठा... या निरर्थक गोष्टी(च) पहातात...आणि परस्परांच्या व्यक्तिमत्वांची अनुरूपता व प्रीती ह्या सहजीवनाला अत्यंत आवश्यक पाहाण्याच्या-गोष्टी पहात(च) नाहित. बेसिक मधे(च) खाल्ला मार्,की पुढे सगळ्यालाच लागणार 'खार'! (पत्रिकेच्या निमित्तानी (जातकांच्या..) घट्स्फोटीत केसेस ट्रेस केलेला..) आत्मू ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
ट
टवाळ कार्टा Mon, 01/26/2015 - 11:26 नवीन
पण बुवा....या बाबतीतले स्किल समजणार कसे?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ट
टवाळ कार्टा Sun, 01/25/2015 - 13:54 नवीन
दम्ले का सग्ळे? छ्या पुर्वीचे मिपा राहिले नाही आता ;)
  • Log in or register to post comments
ख
खमक्या Sun, 01/25/2015 - 14:42 नवीन
थोड्यासाठी सहस्रप्रतिसादकी धाग्याचा मान हुकतोय मुविंचा, असे दिसतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
समिर२० Sun, 01/25/2015 - 17:49 नवीन
९१५
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 01/25/2015 - 17:59 नवीन
सर्व काड्या टाकून चोथा करुन झालाय.. नविन काडीपण कोणी टाकत नाहीये..
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 01/25/2015 - 18:19 नवीन
तेन्सहन नको घेउ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ट
टवाळ कार्टा Sun, 01/25/2015 - 18:39 नवीन
"तेन्सहन" हा का ही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ख
खटपट्या Sun, 01/25/2015 - 18:57 नवीन
टेन्शन म्हंजे आता १००० जवळ आलेत आणी सगळे थंड पडलेत. बाकी कोणीतरी म्हणाले की मायबोलीवर हजारी धागे येउन गेलेत म्हणून. बघायला पाहीजे. पण तेथील प्रतीसाद नक्कीच गोग्गोड असणार. इथल्यासारखे वर्मी घाव करणारे नसणार असे वाटतेय. कोणाला माहीत असल्यास माबोवरील हजारी धाग्याची लिन्क देईल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Sun, 01/25/2015 - 19:03 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
  • «
  • ‹
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • 20
  • 21
  • 22
  • 23
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा