Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि
Wed, 01/14/2015 - 22:54
🗣 1423 प्रतिसाद
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 10:06 नवीन
भावजी, दाजी हे शब्द आहेत. भावजी हा शब्द अलीकडे डौनमार्केट झालाय. दाजी हा शब्द तुलनेने जास्त ऐकला आहे- ब्राह्मणेतर समाजात याचा वापर बराच आहे असे वाटते. दक्षिण महाराष्ट्रात हा शब्द वापरला जातो. पुणे मुंबै इ. मोठ्या शहरांत मात्र अशा शब्दांचा विटाळ पाळला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
असंका गुरुवार, 01/22/2015 - 10:27 नवीन
सर्वांगीण प्रतिसाद....!! :-)) जिजू म्हणलं की भारी विचित्र वाटतं हे तर खरंच. नागपूरला हिंदी प्रभाव आहे जरा जरा. तिथे लोक हा शब्द वापरताना ऐक्लंय जास्ती करून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 10:36 नवीन
नागपुरी/वैदर्भीय लोकांनी असे बोलावे हे समजण्यासारखे आहे. शेवटी भौगोलिक सान्निध्याचा प्रभाव हा पडायचाच. पण न्यूनगंडात्मक अनुकरण करणार्‍या पश्चिम महाराष्ट्रातल्यांना मात्र क्षमा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
य
यसवायजी Fri, 01/23/2015 - 07:56 नवीन
मी दाजीच म्हणतो. आमच्या जातीत पाव्हण्यांना असलं ऐकायची सवय नाही, त्यामुळे पहिल्यांदा शॉकच बसतो त्यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 01/22/2015 - 12:06 नवीन
भावजी आणि दाजी हे शब्द उच्चारले की जाम अनैतिक माणसं डोळ्यासमोर उभी राहतात... 'या रावजी बसा भावजी' टाईप किंवा '...दाजिबा तुमच वागणच खोटं...' टाईप..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 12:08 नवीन
मग हा दोष त्या शब्दांचा की तसा ग्रह करून घेणार्‍या माणसांचा? ब्राह्मणेतर समाजात कैक वेळेस हा शब्द वापरलेला ऐकला आहे. तेही सगळे अनैतिकच असतील? कमाल आहे राव. चार पिच्चर पाहून लोक कसले कसले पूर्वग्रह करून घेतात. धन्य आहे _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 01/22/2015 - 12:17 नवीन
माझ्या डोळ्यांसमोर उभे राहतात हो..दाजिबा सॉरी झ्युस...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सस्नेह गुरुवार, 01/22/2015 - 12:11 नवीन
दाजीबा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/22/2015 - 10:05 नवीन
जीजू, चाचू... असं कोणी (मला किंवा इतरांनाही) म्हणाले की माझ्या तोंडी सहजपणे "बिहारमध्ये असता काय?" असा प्रश्न येतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 10:07 नवीन
हाहा, अगदी अगदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
असंका गुरुवार, 01/22/2015 - 10:30 नवीन
त्या मानाने भय्या, दीदी हे शब्द इथल्या मातीत चांगल्यापैकी रुजले आहेत...नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 10:32 नवीन
मराठी घरांत जर भय्या, दीदी असे शब्द वापरत असतील तर मराठीच्या अधोगतीला कारं असणारी मराठी माणसे ती हीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 10:35 नवीन
अगदी अगदी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
असंका गुरुवार, 01/22/2015 - 10:50 नवीन
अच्छा .. म्हणजे अधोगतीवर चर्चेची गाडी न्यायची का आता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 10:56 नवीन
उग्गीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
ह
हाडक्या गुरुवार, 01/22/2015 - 13:48 नवीन
टका.. काही कामे नाईत होय रे.. ;) अखिल पृथ्वीवरल्या लोकांना त्यांच्या त्यांच्या सकाळी, दुपारी, संध्याकाळी प्रतिसाद दिसतोय म्हणून विचारतोय. (प्रतिसाद खूप काल व्यापक आहे हो. आधी नीट समजून घेव )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कपिलमुनी गुरुवार, 01/22/2015 - 12:35 नवीन
पुल देशपांडेना भय्या म्हणायचे ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बाळ सप्रे गुरुवार, 01/22/2015 - 12:57 नवीन
भाई म्हणत.. भय्या नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ख
खटपट्या Fri, 01/23/2015 - 06:34 नवीन
अहो बरोबर काम करणार्‍या सौथ ईंडीयन माणसाचे नावच जीजू आहे. आता काय करणार बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/22/2015 - 07:52 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/22/2015 - 18:56 नवीन
मी अगोदरच सांगितलं होतं की मुवि खुर्ची टाकून चाय सुलेमानीचे घुटके घेत प्रतिसादांचा गल्ला मोजत बसले आहेत ! :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अजया गुरुवार, 01/22/2015 - 07:53 नवीन
हा ५९९!
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 01/22/2015 - 07:56 नवीन
सहाशे एकाव्या प्रतिसादात या धाग्यावरचा बेस्ट प्रतिसाद दिल्याबद्दल स्रुजाचा सत्कार करण्यात येत आहे. मुविंचे परत अभिनंदन आणि पुस्प्गुच!
  • Log in or register to post comments
म
मनिमौ गुरुवार, 01/22/2015 - 09:24 नवीन
चलतकू चुलत असल्याने फार हिरीरीने सहभागी नाही. पण अपेक्षा पाहून मला गंमत वाटली. मुलगी पश्चिम महाराष्ट्र मधली नको. कारण माहीतीनाही.फार भाऊ बहीण नको.अजून काही असतील तर माहीत नाही. मला हा प्रकार अजिबात आवडत नाही. पश्चिम महाराष्ट्र पर्मीprmi मनिमौ
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 09:37 नवीन
पश्चिम महाराष्ट्रातली नको की पुण्याची नको असं म्हटलंय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिमौ
म
मृत्युन्जय गुरुवार, 01/22/2015 - 10:36 नवीन
पश्चिम महाराष्ट्र पुण्यात येते? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 10:40 नवीन
माहिती नै. पण पुणे हे पश्चिम महाराष्ट्रातच येते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 01/22/2015 - 11:45 नवीन
काय बोलता? म्हणजे पुणे हा वेगळा खंड नाही? ऐकावे ते नवलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 01/22/2015 - 11:49 नवीन
पुण्याचं नावं काढलतं? आता १७,५०० परंत प्रतिसाद नक्की जाणार. संपादक बेरोजगारीच्या कुर्‍हाडीपासुन वाचणार. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 10:42 नवीन
पुणे नावाचे राष्ट्र करण्याची मागणी होणारै म्हणे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सूड गुरुवार, 01/22/2015 - 10:44 नवीन
पुणे नावाचे राष्ट्र करण्याची मागणी होणारै म्हणे
जी गोष्ट ऑलरेडी स्वतंत्र आहे तिच्यासाठी मागणी वैगरे काय करायची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
विटेकर गुरुवार, 01/22/2015 - 10:55 नवीन
या निमित्ताने " पुणे नावाचे एक स्वतंत्र राष्ट्र " या माझ्या धाग्याची झैरात करतो http://www.misalpav.com/node/29145
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/22/2015 - 09:52 नवीन
१५६१९ वाचने आणि ६११ (ही ६१२ वी) प्रतिक्रिया !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! मुवि, हार्दिक अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 09:54 नवीन
१५६१९ वाचने >> यावर जाउ नका...आपणच पान रिफ्रेश करत राहीलो तरी तो काउंट वाढतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/22/2015 - 09:59 नवीन
वाचायला असो की प्रतिसाद लिहायला असो, पण इतक्या वेळा पानाला भेट दिली गेली हे ही नसे थोडके ! (नुसते रिफ्रेश दुर्लक्ष करण्याइतके कमी असणार).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 10:06 नवीन
मुलगी दिसायला जर्रा ठिकठाक असेल तर ती माज करणारच...आणि बाकीचे सुध्धा ती अशी वागणार यात काहीच चुकीचे नाही असेच वागतात
  • Log in or register to post comments
स
स्नेहल महेश गुरुवार, 01/22/2015 - 10:15 नवीन
या धाग्यावरचा एकमेव वाचनीय प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
क
कोमल गुरुवार, 01/22/2015 - 10:40 नवीन
बाकिचे प्रतिसाद पण वाच्लेत की उगी स्क्रोल बार पळवत पळव्त आणलाय.. नाही डॉक्टर काका, टका, पिडां काकांचे इ. इ. इ. प्रतिसाद पण वाचनीय आहेत म्हणून म्हटलं.. ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्नेहल महेश
स
स्नेहल महेश गुरुवार, 01/22/2015 - 11:02 नवीन
बाकिचे प्रतिसाद पण वाचलेत पण सुज्रा प्रतिसाद मनापासून आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल
ह
हाडक्या गुरुवार, 01/22/2015 - 11:53 नवीन
हो ते अनाहितांचेच फक्त पर्तिसाद वाचित असतील.. किंवा त्यांनाच फक्त पोच देत असतील. नै का ? (ह.घ्या नै तर घेऊच नका.. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्नेहल महेश
स
स्नेहल महेश गुरुवार, 01/22/2015 - 12:00 नवीन
चांगल्याला चांगलं म्हटल कि कित्ती लागत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 12:15 नवीन
self proclaimed??? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्नेहल महेश
ह
हाडक्या गुरुवार, 01/22/2015 - 13:19 नवीन
चांगल्याला चांगलं म्हटल कि कित्ती लागत
कायपन .. इथे प्रतिसादाला वैट कोण म्हणालंय. मागच्या पानावर जावून पहा की बै आमी छान म्हणून आलोय. फक्त काही लोक ठराविक प्रतिसादांना प्रतिसाद देण्यापुरते मेन बोर्डावर (म्हणजे मुख्य व्यासपीठ म्हणायचय इथे..) येतात ते काही पटत नाही इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्नेहल महेश
व
विटेकर गुरुवार, 01/22/2015 - 10:49 नवीन
लग्न ही दोन व्यक्तींच्यापुरतीच मर्यादित असावी अशी खासगी गोष्ट आहे हे माझे मत. व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे आणि सर्वोच्च आहे. लग्न केलं किंवा नाही केलं, नुसतेच एकत्र राहिले, लग्न काही वर्षांतच मोडलं, परत दुसर्‍या जोडीदारांशी जुळलं, अशी दोन-दोन, तीन-तीन लग्ने एकेकाची होऊ लागतील. त्यात काही गैर नाही आणि संस्कृतीचा म्हणा किंवा समाजाचा म्हणा, हा अटळ प्रवास होणार आहे. तस्मात्, लग्न ही कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातली अत्यावश्यक आणि महत्त्वाची घटना आहे हा हट्टाग्रह आपण सोडून दिला तर बरेच प्रश्न सुटतील. ऑब्जेक्शन मि लोर्ड ! लग्न ही वैयक्तिक बाब नाही. मनुष्य हा समाज प्रिय प्राणी आहे आणि विवाह संस्थेमुळे समाजाची धारणा होते. धन्यो ग्रूहस्थाश्रमः| असे म्ह्ट्ले आहे ते उगीच नव्हे. ती वैयक्तिक बाब असती तर इतकी झड़झडून चर्चा इथे झाली असती का ? ती महत्वाचीच घटना आहे आणि राहीलच कारण समाजाचा पायाच तो आहे. आपला जोडीदार सातत्याने बदलणे हे प्रगत मनाचे/ प्रगत समाजाचे लक्षण नव्हे ! त्यामुळे अराजक होईल आणि जंगल राज निर्माण होईल. समाजाच्या रक्षणासाठी काही एक नियम ( त्यालाच धर्म म्हणतात) घालून दिलेले आहेत ते बहुतांश लोकांनी पाललेच पाहीजेत. धर्मो रक्षिती रक्षित: | हे समाजाला देखील लागू आहे. तुम्ही समाजाचे नियम पाळ्ता म्ह्णून समाज तुमचे रक्षण करतो हे धडधडित सत्य न स्वीकारून कसे चालेल? अनिर्बन्ध व्यक्तिस्वातंत्र्य विकृतीला जन्म देते हा आजपर्यन्तचा इतिहास आहे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 10:55 नवीन
लग्न केलं किंवा नाही केलं, नुसतेच एकत्र राहिले, लग्न काही वर्षांतच मोडलं, परत दुसर्‍या जोडीदारांशी जुळलं, अशी दोन-दोन, तीन-तीन लग्ने एकेकाची होऊ लागतील.
असे नेहमीच होते असे नाही...पण मुळात असे होउ नये यासाठीच तर जोडिदार निवडणे व्यवस्थित हवे ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 11:02 नवीन
आपला जोडीदार सातत्याने बदलणे हे प्रगत मनाचे/ प्रगत समाजाचे लक्षण नव्हे ! त्यामुळे अराजक होईल आणि जंगल राज निर्माण होईल.
आदिवासी समाजात असे चालते. त्यामुळे कुठे अराजक माजल्याचे दिसले नाही. झालंच तर स्त्रियांना तिथे नियमबद्ध समाजापेक्षा जास्ती मान असतो. नुस्ता थेरीत नाही, तर प्रॅक्टिकलमध्येही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर गुरुवार, 01/22/2015 - 11:21 नवीन
मग त्यांनाच प्र्गत म्हणायचे ना ? आदिवासी कशासाठी? असे एकाच पार्तनर बरोबर आयुष्य काढणारे अप्रगत अणि मागास मानयला हवेत ! एकपत्नी वाला राम ही मग मागासच म्हणायला हवा ! आणि किती पार्ट्नर बदलले यावर जर स्त्रीयांना मान द्यायचे ठरत असेल तर धन्यच म्हणायला हवे. स्त्रियांचा मान ही बाब मूळातच माणसाच्या रक्तात असायला हवी. आमच्या शशी थारूर नी बदलले पार्टनर .. आणि दिला का मान नव्या पार्तनरला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 11:28 नवीन
उगीच रागवू नका. पार्टनर सारखे बदलणे आणि अराजक यांचा परस्परसंबंध नाही इतकेच सांगायचे आहे. त्यामुळे राम, शशी थरूर, इ.इ. वाईड बॉल सोडून दिल्या गेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर गुरुवार, 01/22/2015 - 11:35 नवीन
दुसर्याच्या बाईलीवर डोळा ठेवला / अभिलाषा धरली तर महायुद्धे होतात , नुसते अराजक नव्हे ! उदा. रामायण अथवा महाभारत ! म्हणून धर्मसंमत बाईलीबरोबर संग केला पाहिजे... पार्टनर बदलणे हे धर्मसंमत नव्हे इतकेच ! आता तुम्ही परस्पर संम्मतीने .. काय हरकत आहे ? तसे होत नाही, कामातुराणाम न भयम न लज्जा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 11:41 नवीन
पहिलं आणि दुसरं महायुद्ध काय बाईवरनं झालं? पुराणातल्या गोष्टी सोडून द्या. बाकी याच धर्माने मस्तानीचा छळ केला तेही धर्मसंमतच असावे. तदुपरि 'कामातुराणां न भयं न लज्जा' म्हणजे नक्कीच कोल्ह्याला द्राक्षे आंबट असलेल्यांनी रचलेला श्लोक असावा. दोन लोक परस्परसंमतीने काही का करेनात. जोवर कुणाला त्रास देत नाहीत तोवर संभोगाला असे हीन लेखायचे कारणच काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
  • «
  • ‹
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा