Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि
Wed, 01/14/2015 - 22:54
🗣 1423 प्रतिसाद
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)
प
पिलीयन रायडर गुरुवार, 01/22/2015 - 10:35 नवीन
स्रुजा हय वो!! एकच लिहील पण नवा धागाच बनवावा लागेल असा प्रतिसाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 10:42 नवीन
म्हणजे सगळ्या अनाहितांमधून फक्त एकच अनाहिता अशी संयत प्रतिसाद लिहू शकते ... तुमच्या प्रतिसादाचा असा अर्थ निघू शकतो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 01/22/2015 - 11:28 नवीन
(स्रुजा) एकच (प्रतिसाद) लिहील, पण (तो) प्रतिसाद नवा धागा म्हणुन वेगळा काढावा लागेल इतका सुंदर लिहील.. समजलं का? उठलं की सुटलं तुम्हाला अनाहिताच का वो आठवतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 11:32 नवीन
उठलं की सुटलं तुम्हाला अनाहिताच का वो आठवतं?
समजा त्यांना आठवतं तर तुम्हांला का ओ दुखतं? कितीही आठवलं तरी तिकडे काय आहे ते बघता येणार नाही हे सर्वांना माहितीच्चे की. मग प्रॉब्लेम काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 01/22/2015 - 12:07 नवीन
वा वा.. कुणी सारखं अनाहिताची आठवण काढत असेल तर अनाहितांना लक्ष घालावं लागणार की नाही?!! आणि बघता येणार नाही हे मान्य आहे.. पण तसा कुणी प्रयत्न तर करत नाही ना ह्यावर चौफेर लक्ष ठेवावं लागतं बाबा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 12:00 नवीन
खिक्क...नेहमी तुम्हाला"च" का लागत येव्हड...का अनाहितांच्या तुम्ही front warrior आहात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 01/22/2015 - 12:08 नवीन
मी अनाहिताची कोण हा प्रश्न वेगळाच आहे.. तुमच्यासाठी "मी अनाहिता आहे" हे कारण पुरेसं आहे.. नाही का?!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 12:10 नवीन
तू अनाहिता??? मग आम्ही सगळे झ्यूस =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 01/22/2015 - 12:12 नवीन
अकिलीज... आणि अकिलीज वरुन मला का कोण जाणे ओडीसीची आठवण होतीये. लिवं की. तिथे १००० मारु. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ह
हाडक्या गुरुवार, 01/22/2015 - 12:24 नवीन
ब्याट्याच्या इडिपसचं जहाज कुठे अडकलंय कई म्हैत. जरा धका द्या की राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 12:14 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पिलीयन रायडर गुरुवार, 01/22/2015 - 12:25 नवीन
तुम्ही स्वतःला काहीही म्हणा ओ.. माझ्या पप्पांच काय जातय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 12:28 नवीन
उगी उगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 01/22/2015 - 12:36 नवीन
नाय पण तुम्हाला अनाहिताची सारखी एवढी आठवण का येते ह्याच उत्तर राहिलच्चे बर का.. ;) नाय म्हन्जे कळात नाहीये आम्हाला असं नाही... पण.. असोच..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 12:30 नवीन
ठीके सूडो-अनाहिता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ह
हाडक्या गुरुवार, 01/22/2015 - 13:02 नवीन
सूडो-अनाहिता
मला का कोण जाणे पण सूडक्याच आठवला.. :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड गुरुवार, 01/22/2015 - 13:04 नवीन
तसंच आहे ते!! सूडश्च अनाहिताश्च असा सामासिक विग्रह आहे त्या शब्दाचा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 13:16 नवीन
ख्याक =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ह
हाडक्या Fri, 01/23/2015 - 14:52 नवीन
अगागा.. त्या इंडो-युरोपिअन भाषीय जननीस आमचा साष्टांग नमस्कार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड Fri, 01/23/2015 - 10:14 नवीन
>>मग आम्ही सगळे झ्यूस
मला झर्क्सिस व्हायला आवडेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 01/23/2015 - 10:36 नवीन
म्हणून म्हणतो पिच्चर न बघता इतिहास वाचत चला ओ. झ्यूस हा तिथला इंद्र. त्याने जितकी मजा केली (बादवे संस्कृतात केलि म्हणजे 'मज्जा' बरं का ;) ) त्याच्या सहस्रांशही या बिचार्‍या झर्क्सिसने केलेली नाही. त्या बिनडोक पिच्चरमध्ये इतिहासाचा इतका विपर्यास केलाय की ज्याचे नाव ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 01/23/2015 - 10:56 नवीन
म्हणून म्हणतो पिच्चर न बघता इतिहास वाचत चला ओ. झ्यूस हा तिथला इंद्र. त्याने जितकी मजा केली (बादवे संस्कृतात केलि म्हणजे 'मज्जा' बरं का ) त्याच्या सहस्रांशही या बिचार्‍या झर्क्सिसने केलेली नाही. त्या बिनडोक पिच्चरमध्ये इतिहासाचा इतका विपर्यास केलाय की ज्याचे नाव ते.
सांगितलंस ते ठीकाय. पण मी लिहीलं त्यात इतिहासाचा फारसा संबंध नव्हता. पिच्चरमध्ये दाखवलेल्या झर्क्सिससारखी आपली physique असावी अशी माझी फारा दिवसांपासूनची इच्छा आहे, म्हणून झर्क्सिस म्हटलं!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 01/23/2015 - 11:06 नवीन
आईंग? झर्क्सिस की लिओआयडस ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 01/23/2015 - 11:09 नवीन
झर्क्सिस की लिओआयडस
झर्क्सिसच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 01/23/2015 - 11:12 नवीन
आयला. असो. पण तरी फिजिक चांगलंच आहे म्हणा त्याचं. बाकी गोष्टी विचित्र वाटत असल्या तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 01/23/2015 - 11:19 नवीन
>>आयला. असो. पण तरी फिजिक चांगलंच आहे म्हणा त्याचं. बाकी गोष्टी विचित्र वाटत असल्या तरी.
बाकीच्या गोष्टी मरोत. तसं फिजिक ठेवणं खायची गोष्ट नाही बाप्पा!! खाणं आणि वर्कआऊट जऽऽरा गंडला की संपलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ह
हाडक्या Fri, 01/23/2015 - 14:53 नवीन
फिजिक आणि पिअर्सिंग पण का मग ?? :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 01/23/2015 - 15:23 नवीन
गहू तेव्हा पोळ्या!! तस्मात् आधी फिजिक, मग पिअर्सिंगचं बघू!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
म
मदनबाण Wed, 02/18/2015 - 10:18 नवीन
पिअर्सिंगचं बघू! हल्लीच एक नविन पिअर्सिंगचा प्रकार कळला आहे ! हे पिअर्सिंग फक्त पाखरंच करुन घेतात ! काय एक एक उध्योग !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Wed, 02/18/2015 - 10:30 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 02/18/2015 - 10:33 नवीन
हॅ.हॅ.हॅ... ;) तू हे वाचणार हे माहित होतच बरं का ! ;) बाकी हे टोचुन घेण्याचा प्रकार पाहुन झाल्यावर पाखरं काहीही म्हणजे काहीही करु शकतात याची खात्री मात्र पटली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सूड Wed, 02/18/2015 - 10:48 नवीन
हे टोचुन घेण्याचा
'हे' म्हणजे नक्की काय टोचून घेतलेलं पाह्यलंत म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 02/18/2015 - 10:58 नवीन
"हे" म्हणजे अगदी छोटीशी मेटल पीन असते जी टोचुन घेण्याचे धाडस ही फडफडणारी पाखरं करतात. हा पिअर्सिंग मधला नविन प्रकार आहे असे कळले !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Wed, 02/18/2015 - 13:20 नवीन
हे म्हणजे ते, तेही आणि तेसुध्धा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ट
टवाळ कार्टा Wed, 02/18/2015 - 13:20 नवीन
'हे' म्हणजे नक्की काय टोचून घेतलेलं पाह्यलंत म्हणे?
हे म्हणजे माईंचे हे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Wed, 02/18/2015 - 13:20 नवीन
मी सगळे वाचतो...पटो अथवा न पटो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ट
टवाळ कार्टा Wed, 02/18/2015 - 13:20 नवीन
हल्लीच एक नविन पिअर्सिंगचा प्रकार कळला आहे ! हे पिअर्सिंग फक्त पाखरंच करुन घेतात ! काय एक एक उध्योग !
अशी पाखरे लय डेरिंगबाज अस्तात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
सूड Wed, 02/18/2015 - 13:27 नवीन
काश्मीर करु नका बे, झर्क्सिस वरुन पाखरांवर काय घसरलात!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Fri, 01/23/2015 - 11:11 नवीन
*लिओनायडस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 12:14 नवीन
तिकडून्सुध्धा फुटवतात??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/22/2015 - 11:14 नवीन
sex या विषयाबद्दल पण तेच , नैसर्गिक गरज मुलांची आणि मुलींची वेगळी कशी ? अपेक्षा पण वेगळी कशी असणार ? आता तो अनुभव एकमेकांबरोबर घेतल्याशिवाय आणि अनेकदा घेतल्याशिवाय परस्परपूरक आहेत का हे समजणं अवघड आहे पण मुलाचं टक्कल जर एखादी साठी टर्न ऑफ असेल तर त्यांचा अनुभव सुंदर बनण्याची शक्यता किती तरी पटीने कमी होते . अशा वेळी मुलीने टकलावरून नाकारलं एव्हड्या चांगल्या मुलाला असं म्हणणं एकांगी ठरू शकतं . वैवाहिक जीवनाचा पाया जर शारीरिक नातं असेल तर त्याला कमी का लेखायचं ? मुलींच्या अशा अपेक्षा असतात आणि त्या रेटण्या इतक्या किंवा त्यावरून एखादा मुलगा नाकारण्या इतक्या आता त्या धाडसी झाल्या आहेत हे चांगलंच आहे न? घरच्यांच्या दबावाला किंवा असं कसं नाही म्हणायचं म्हणून एखादीने केलं लग्न आणि नाही ती समरस होऊ शकली तर आयुष्यभर दोघं नाखूष . त्यापेक्षा हे बर नाही का ? मुली आता बोलून दाखवतात आणि त्यांच्या अपेक्षा वाढल्यात असं म्हणण्यापेक्षा जी मुलगी अशा वातावरणात वाढून सुद्धा तुमच्याशी लग्न करायला तयार असेल ती अगदी मनापासून तयार आहे यात दिलासा नाही का वाटत ? किंबहुना तो तसा वाटण्याइतकं प्रगल्भ आता मुलांनी आणि समाजानी पण व्हायला हवं .
वाहव्वा!!! :Happy: एव्हढं कात्रण हायस्कूल/कॉलेजच्या कामविषयाच्या अभ्यासक्रमाचा विषयभाग बनवावं अश्या तोडीचं आहे. क्लासिक वन! :Happy:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
ह
हाडक्या गुरुवार, 01/22/2015 - 12:26 नवीन
+१ .. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 12:28 नवीन
+१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
स्रुजा गुरुवार, 01/22/2015 - 14:02 नवीन
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद , बाकी कौतुक करताना मिपाकर कधी हातचं राखून करत नाही हे खरं. :) हा धागा वाचनमात्र होईल म्हणून ही घाईने आधी आभार मानून घेते . स्वॅप्स यांचा प्रतिसाद पण आवडला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
आ
आजानुकर्ण गुरुवार, 01/22/2015 - 14:47 नवीन
पण मुलाचं टक्कल जर एखादी साठी टर्न ऑफ असेल तर त्यांचा अनुभव सुंदर बनण्याची शक्यता किती तरी पटीने कमी होते . अशा वेळी मुलीने टकलावरून नाकारलं एव्हड्या चांगल्या मुलाला असं म्हणणं एकांगी ठरू शकतं
लग्नानंतर एकदोन वर्षातच टक्कल पडलं तर लगेच टर्न ऑफ होणार का? आजकाल केस रुजवूनही मिळतात. टकलावरुन नाकारणं एकांगीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सूड गुरुवार, 01/22/2015 - 15:25 नवीन
+१ टक्कल आहे म्हणून नाकारलं ठीकाय, पण लग्नानंतर टक्कल पडलं तर मग काय करावं त्या बिचार्‍यानं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 15:27 नवीन
याच न्यायाने लग्नानंतर जाड झाल्यामुळे घटस्फोट देणेही चालून जावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 01/22/2015 - 15:31 नवीन
आमच्या घरी तर तिशीतच टक्कल पडायची परंपरा आहे. हे सगळ वाचून माझे आधीच कुरळे असलेले केस आणखी कुरळे झाले राव!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 15:34 नवीन
जळ्ळा मेला पुर्षांचा जन्म ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 15:58 नवीन
सूड कधीकधी दोन्ही बाजूंनी बोलतो असे वाटते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा