Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि
Wed, 01/14/2015 - 22:54
🗣 1423 प्रतिसाद
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)
स
सविता००१ गुरुवार, 01/22/2015 - 07:33 नवीन
पैसाताई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 01/22/2015 - 09:22 नवीन
संसारात अशा अनेक गोष्टी असतात की जिथे आपल्या अकॅडेमिक शिक्षणाचा काहीही संबंध नसतो.
अनेक काय हो जवळजवळ सगळ्याच गोष्टींमधे अकॅडेमिक शिक्षणाचा काहीही संबंध नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पिवळा डांबिस गुरुवार, 01/22/2015 - 18:56 नवीन
माझ्या प्रतिसादातला मुद्दा हा "शिक्षणातली परस्पर अनुरूपता" हा आहे. सहजीवनात त्याचं महत्व आहे असं माझं प्रतिपादन आहे. माणूस अल्पशिक्षीत असलं म्हणजे संसार होत नाहीत असं मी म्हंटलेलं नाही. दोघेही जर अल्पशिक्षीत असतील तरी त्यांच्या स्वता:च्या समजुतीप्रमाणे ते संसार करणारच की! आणि अल्पशिक्षणात जर एकमेकाला अनुरूप असतील तर ते एक त्या प्रकारचं सहजीवनही होईल. प्रश्न हा जर शिक्षणात अनुरूपता नसेल (कारण माझा मूळ प्रतिसाद उच्चशिक्षीत मुलांना अल्पशिक्षीत मुलींशी लग्न करायला काय अडचण आहे? यावर होता)तर सहजीवन कसं होईल हा आहे.
संसारात अशा अनेक गोष्टी असतात की जिथे आपल्या अकॅडेमिक शिक्षणाचा काहीही संबंध नसतो.
करेक्ट! पण संसारात अशाही अनेक गोष्टी असतात की जिथे आपल्याला आपल्या शिक्षणापासून मिळालेल्या विचारशक्तीचा खूप उपयोग असतो.
माझ्या आईवडिलांचं लग्न झालं तेव्हा वडील इंटर आर्ट्स आणि आई म्याट्रिक डी एड होऊन नोकरी करत होते. आताच्या दृष्टीने पाहता ते अल्पशिक्षितच.
त्या वेळी (त्यांच्या लग्नाच्या वेळी) ते जरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे अल्पशिक्षीत असले (तुमच्या म्हणण्याप्रमाणे कारण त्या काळी हे शिक्षण अल्प समजलं जात नसे. एका काळाच्या फूटपट्ट्या दुसर्‍या काळाला लावायच्या नसतात.) तरी शिक्षणाने एकमेकांना अनुरूप होते. एक जण एमे आहे आणि दुसरं शाळा नापास अशी परिस्थीती तर नव्हती ना! लग्नानंतर पुढे खूप शिकून त्यांनी नांव कमावलं हा त्यांच्या महत्वाकांक्षेचा भाग झाला आणि त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे! संसारात सो कॉल्ड प्रॉव्हर्बियल बांगडे फ्राय करणं तर अनाव्हॉयडेबल असतंच पण त्यापुढेही काही असतं हे त्यांनी जाणलं आणि परिश्रम करून ते मिळवलं यासाठी त्यांचं जास्त कौतुक आहे. तुम्ही त्यांना विचारून पहा, मी सांगतो त्यापेक्षा वेगळं काही ते सांगतील असं मला वाटत नाही..... एनिवे, मला काय वाटतं ते मला वाटतं मी पुरेसं स्पष्ट मांडलेलं आहे. कुणाला पटेल, कुणाला नाही पटणार. जर अजूनपावेतो मी कुणाला माझी बाजू समजावून देऊ शकलो नसलो तर आणखी माझ्याकडे काही नाही. आणि आता मला या विषयावर टंकायचा टंकाळा (बघितलंत, माझा कळफलकही टंकाळला!!) आलाय तेंव्हा माझ्यातर्फे लेखनसीमा! मात्र पुढे कधी गोव्याला आलो की तुमच्याकडे बांगडे खायला येण्याचं निमंत्रण समजून ते राखून ठेवत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 01/22/2015 - 19:28 नवीन
तरी नाय पटलं! पुन्हा माझ्या घरातलं, माझे एल एल बी झालेले आजोबा आणि शाळेत न गेलेली आजी यांचं उदाहरण दिलं असतं. पण सगळंच आत्मचरित्र नको म्हणून गप बसते आता. मात्र *शिक्षण आणि विचारशक्ती, सामाजिक भान यांचा काही संबंध नसतो *यशस्वी संसार, सहजीवनासाठी दोघांचं एकसारखं/अनुरूप शिक्षण अजिबात आवश्यक नसतं यावर मी ठाम आहे. बांगडे रशेद करून देण्याचं आमंत्रण अर्थातच कायम आहे. कधी येताय? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/22/2015 - 19:59 नवीन
"शिक्षण आणि विचारशक्ती, सामाजिक भान यांचा काही संबंध नसतो.यशस्वी संसार, सहजीवनासाठी दोघांचं एकसारखं/अनुरूप शिक्षण अजिबात आवश्यक नसतं." सहमत (डॉ.आजोबा आणि ४बुके शिकलेल्या आज्जीच्या सर्वोत्तम सहजीवनाचा साक्षीदार) मुवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पुष्कर जोशी Sun, 06/12/2016 - 00:11 नवीन
chemistry मध्ये catalyst असतो.. तो main reaction मधे मध्ये कधीच भाग घेत नाही पण reaction ला मदत करत असतो !! शिक्षणाचे आयुष्यातील स्थान हेच आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
य
यशोधरा गुरुवार, 01/22/2015 - 03:59 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सूड Wed, 01/21/2015 - 10:20 नवीन
आपण शाळा कालेजात जे शिकतो त्याचा घरात, किंवा नाती जोडताना आणि टिकवताना किती उपयोग अस्तो?
मान्य आहे की सगळंच नसतं उपयोगाचं!! पण सहज गप्पांमध्ये अमक्या तमक्या वेळी वाचल्या गोष्टीचा रेफरन्स देऊन काही बोललं तर ते तिला/त्याला समजायला नको? कोणत्याही नात्यात संभाषण महत्त्वाचं असतं हो, बेसिक मध्येच लोच्या असेल तर गाडी पुढे जायची कशी? समजून घ्यायची तयारी असेल तर ठीक आहे, पण हे समजून घ्यायची तयारी सगळ्यांचीच असेल असं नाही ना!! आधीच एकमेकांची शैक्षणिक पार्श्वभूमी माहित असताना भांडणात केवळ एकमेकांचा उद्धार करायला ती वापरणं चूक आहे हे मान्य!! पण शिक्षण अगदी निरर्थक ठरवणं काही पटत नाही ब्वॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सामान्य वाचक Wed, 01/21/2015 - 10:23 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
पिलीयन रायडर Wed, 01/21/2015 - 10:27 नवीन
+१ शिक्षणाला महत्व नसेल तर चौथी पास मुलगी आणि पी.एच.डी मुलगा सुखाने नांदतील.. पण तसं होत नाही.. विचारांची लेव्हल तर शिक्षणाने नक्कीच बदलते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अजया Wed, 01/21/2015 - 03:31 नवीन
आणि हे झाले४००!!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Wed, 01/21/2015 - 03:48 नवीन
४०० पार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
पैसा Wed, 01/21/2015 - 04:57 नवीन
जेपीभौ अदृश्य असल्याने आम्ही डॉ. खरे, टवाळ कार्टा आणि आजानुकर्णाचा अक्षता देऊन सत्कार करत आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 01/21/2015 - 05:00 नवीन
वाटाण्याच्या!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा Wed, 01/21/2015 - 06:01 नवीन
"पुस्प्गुच" नस्ल्याने माझा णिशेध ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ह
हाडक्या Wed, 01/21/2015 - 12:25 नवीन
पै तै .. आनी आमी ?? *unknw* आमच्या खारीच्या वाट्याची नोंद न घेतल्याबद्दल णिशेढ .. !! (ता.क. आम्हास अक्षता नको.. टकाला द्या..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा Wed, 01/21/2015 - 12:47 नवीन
अक्षता कितवी शिकलीय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 01/22/2015 - 06:36 नवीन
तुझ्याहुन दोन यत्ता जास्त, ते पण एकदा पण केटी नं लागता =)) (ह.घे. रे) गर्ल्फ्रेंड नसण्यापे़क्षा केटी लागणं लै जास्त सेन्सिटिव्ह टॉपिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 06:59 नवीन
मी आजपर्यंत डिस्टिंक्शन कधी सोडले नै ते पण मुंबै वर्शीटीतुन :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सुबोध खरे गुरुवार, 01/22/2015 - 07:21 नवीन
के टी आणि डीस्तीन्क्षन काय घेऊन बसलायत? एक लक्षात ठेवा काही जण "खूप" शिकतात. काही जण "खुपदा" शिकतात. शेवटी शिकल्याशी मतलब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 09:21 नवीन
खिक्क :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 01/22/2015 - 11:34 नवीन
नशिबवान आहेस. =)) पोरगी आणि डिस्टिंक्शन मिळायला नशिब लागतं. मेरेकु थ्रु-आउट डिस्टिंक्शन (बी.ई. ला रँक) विथ वाय डी आहे पुणे युनिव्हर्सिटीच्या कुरुपेनं. एम ३ च्या आवशिचा घोवं!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सूड गुरुवार, 01/22/2015 - 11:37 नवीन
लोकं झायरात करायचा एक चान्स सोडत नैत राव!! *mosking*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कपिलमुनी गुरुवार, 01/22/2015 - 11:41 नवीन
उपवर मुलांचा प्रश्न गंभीर आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 01/22/2015 - 11:48 नवीन
आपल्याकडे एक म्ह्ण आहे की ओ बोलणार्‍याची माती विकली जाते, आणि नं बोलणार्‍याचं सोनही पडुन राहतं अश्या अर्थाची. झैरात आणि मार्केटींग केल्याशिवाय कै होत नै ओ मार्केटात. तुमची करायचीये का झैरात? मी आणि टक्या झैरात एजन्सी चालु कर्तोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 11:56 नवीन
+१११११ "चर्चा तर होणारच" झैरात एजन्सी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 01/22/2015 - 12:04 नवीन
नाव भारीये रे. चल तुझा प्रॉफिटमधे १% वाढवला. आता तु "दो टक्के का पार्टनर" =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 12:12 नवीन
नक्को...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ज
जेपी Wed, 01/21/2015 - 05:31 नवीन
लोक परंपरा-नातीगोती विसरुन आधुनीक झाली आणी असले प्रकार चालु झाले. पुर्वी एखादी नवी नवरी लग्न होऊन सासरी आली की नणंद दारात अडवुन विचारायची" सोडते आत तुला,काय देणार मला?" याचर खमकी वहिनी पण" होतील मला पोरी,तेंव्हा देईन तुमच्या घरी..!!" असे उत्तर द्यायची. मामाची मुलगी पटवणे याच प्रकारात मोडते. आता काळ थोडा बदलला आहे,त्यामुळे मामाची मुलगी न पहाता आत्याला मुली आहेत का ? याचा शोध घ्यावा. आत्याला नसतील तर तिच्या नंणदेला आहेत का हे पहावे. तात्पर्य आधी नात्यात शोध घ्यावा नंतर इतरत्र मुली शोधत फिरावे. एकदा मुलगी सापडली कि तिला कसे पटवायचे हे आप आपल्या कुवतीवर ठरवावे. बस,ट्रेन ओर लडकी या सारखे छपरी डॉयलॉग रील लाईफ चांगले वाटतात रीयल लाईफ मधे नाही. . .. . हा प्रतिसाद आपल्या आपल्या कुवतीवर वापरावा.जबाबदारी माझी नाही. प्रेमात पडल की शिक्षण सारखे मुद्दे आपोआप बाद होतात.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 01/21/2015 - 06:03 नवीन
लोक परंपरा-नातीगोती विसरुन आधुनीक झाली
याच्यामुळेच मुलींची परिस्थिती चांगली झालीय...त्याचे साईड इफेक्ट म्हणजे त्या आता डोक्यावर बसतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 01/21/2015 - 06:12 नवीन
अनुभवाचे बोल असं म्हणणार होतो. पण मी तुझं नावं वाचलं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 01/21/2015 - 06:47 नवीन
हे आण्भवाचे"च" बोल आहेत...पण माझ्या नाही दुसर्यांच्या...मी फक्त मेसेंजर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ह
हाडक्या Wed, 01/21/2015 - 12:27 नवीन
मेसेंजर ऑफ द्वाड .. *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ज
जेपी Wed, 01/21/2015 - 06:08 नवीन
याच्यामुळेच मुलींची परिस्थिती चांगली झालीय...त्याचे साईड इफेक्ट म्हणजे त्या आता डोक्यावर बसतात अरे बाकीचा प्रतिसाद पकड..
  • Log in or register to post comments
व
विटेकर Wed, 01/21/2015 - 10:11 नवीन
१२:४९ नंतर १४:४० म्हणजे जवळजवळ २ तास एकही प्रतिसाद नाही ... एक मिपाकर म्हणून शरम...........
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 01/21/2015 - 10:25 नवीन
ते जौदे...मुविंचा शेवटचा प्रतिसाद केव्हा होता??? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
क
कपिलमुनी Wed, 01/21/2015 - 11:11 नवीन
पत्रिका बघण्याचा फॅड , आधी जाती , पोटजाती, मग नाड , गोत्र , राशी ( यात षडाष्टक आणि उपाध्ये ) आणि मग गुण जुळायला लागतात. काही जातींमध्ये पदर जुळावा लागतो म्हणे म्हणजे काय तर कुठुन तरी नाते असावे किंवा खानदानच्या प्युअरपणा लागतो .. आता एवढ्या सगळ्या गाळण्यामधून ज्या काय पोरी राहतील ..तिथून पुढे रंग , उंची, बांधा , रूप , हे झाला की शिक्षण , आर्थिक परिस्थिती यांचे मॅचिंग होते .. य्यानंतर मग शेवटी वर- वधू भेटतात आणि स्वभाव जमतो कि नाही ते बघायचा ! शिंगरू आधीच्या फिल्टर मध्येच दमलेला असतय ! बादवे , एवढे असूनसुद्धा सर्व मंगल कार्यलये ६ महिने अगोदरच फुल्ल असतात . म्हणजे या दिव्यांतून पार पडून सर्वांची लग्ने होतात असे दिसते :)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 01/21/2015 - 11:14 नवीन
बादवे , एवढे असूनसुद्धा सर्व मंगल कार्यलये ६ महिने अगोदरच फुल्ल असतात . म्हणजे या दिव्यांतून पार पडून सर्वांची लग्ने होतात असे दिसते
लोकसंख्या १२० कोटी असलेल्या देशात कितीही नखरे केले तरी लोकांची कमतरता तितकीशी जाणवत नसावी बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ट
टवाळ कार्टा Wed, 01/21/2015 - 11:23 नवीन
हे फिल्टर क्रायटेरीया उलट्या क्रमाने नाही वाटत???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रसाद गोडबोले Wed, 01/21/2015 - 11:23 नवीन
मी ५०० वा प्रतिसाद टंकण्यासाठी टपुन बसलो आहे बरं का :D
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 01/21/2015 - 11:32 नवीन
ब्यानरसकट लिवा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
आ
आदूबाळ Wed, 01/21/2015 - 13:24 नवीन
ब्यानरवर ब्रायन लालाचं चित्र असूद्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 01/21/2015 - 15:31 नवीन
अग्दी अग्दी...पण ब्यानर कुटांय :( अवांतर - मुविंना त्यांच्या धाग्याने इतिहास घडवलाय त्याचा पत्ता आहे का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
क
काळा पहाड Wed, 01/21/2015 - 14:46 नवीन
माजा ५०० वा होता.. तुमचा ५०२ वाला झाला.. खिक..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद१९७१ Wed, 01/21/2015 - 11:42 नवीन
परंतु संसार चांगला होण्यासाठी दोघात सामन्जस्य असणे जास्त आवश्यक आहे. बाकी रूप पैसा कुटुंब इ सर्व गोष्टी दुय्यम आहेत.
संसार चांगला होण्यासाठी शरीरसंबंध बाबतीतील कंपॅटीबिलीटी, आवडनिवड हा मुद्दा कोणीच मांडला नाही हे बघुन आश्चर्य आणि खेद वाटला. लग्न करण्यामागे ( at least पुरुषांच्या मनात ) sex partner मिळवणे हा सर्वात महत्वाचा हेतू असतो ( असे माझे मत आहे ). जर हे खरे असेल तर रुप, वजन ह्या गोष्टी महत्वाच्या ठरत नाहीत हे खरे आहे का? फक्त स्वभाव फार छान आहे म्हणुन ८०-९० किलोची मुलगी कोणी पसंत करेल का?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 01/21/2015 - 11:48 नवीन
शिव शिव शिव असे लिहिताच कसे तुम्ही...लग्नासाठी मुलगी बघताना मुलीचा physical appearance याबद्दल मुलाने अपेक्षा ओपनली दाखवू नये...नाहीतर त्याच्यावर materialistic असा शिक्का बसतो मुलीकडून...मग भले मुलीच्या अपेक्षेत २ बिएचके फ्लॅट असून्दे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ब
बॅटमॅन Wed, 01/21/2015 - 12:48 नवीन
अगदी अगदी..........वर असं बोलल्यावर 'इतकी वर्षे पोरांनी माज केला, पोरींनी आता जरा माज इन रिटर्न दाखवला तर बिघडलं कुठं' इ.इ. अर्ग्युमेंट्स आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कपिलमुनी Wed, 01/21/2015 - 12:55 नवीन
मुलाचा टक्कल , सुटलेले पोट या गोष्टी मुली बघतातच .. मुलांनी physical appearance वर टिप्पणी केली तर लगेच materialistic !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ह
हाडक्या Wed, 01/21/2015 - 13:02 नवीन
टका आणि प्रसाद, या बाबतीत अंशतः असहमत. कारण की,
संसार चांगला होण्यासाठी शरीरसंबंध बाबतीतील कंपॅटीबिलीटी, आवडनिवड हा मुद्दा कोणीच मांडला नाही हे बघुन आश्चर्य आणि खेद वाटला.
हे मान्य. म्हणूनच टकाने लिव-इन बद्दल मांडले तेव्हा त्याला समर्थन दिले होते. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि शक्य झाल्यास जाणून घेणे ही गरजेचे आहे हे ही मान्य. पण म्हणून,
लग्न करण्यामागे ( at least पुरुषांच्या मनात ) sex partner मिळवणे हा सर्वात महत्वाचा हेतू असतो ( असे माझे मत आहे ). जर हे खरे असेल तर रुप, वजन ह्या गोष्टी महत्वाच्या ठरत नाहीत हे खरे आहे का? फक्त स्वभाव फार छान आहे म्हणुन ८०-९० किलोची मुलगी कोणी पसंत करेल का?
हे कसे मत तयार केलेत ? सेक्स ही दोन्ही बाजूंची गरज आहे हे प्रथम स्वीकारले पाहिजे (म्हणजे मुलींनी देखील हा आपल्याला "अनुरुप"आहे का हे पाहणे चूक समजू नये ) पण आणि फक्त पुरुषांसाठी हा "सर्वात महत्वाचा हेतू" असतो असे म्हणणेच अगदीच गैर आहे. दुसरा मुद्दा असा की फक्त सुंदर मुलगी/मुलगा असेल तर सेक्स साठी अनुरुप होतो हे कसे ठरवलेत हो ? ह्यात भावनिक अनुरुपता हा खूप मोठा मुद्दा आहे. जर स्त्रीची(अथवा पुरुषाची) इच्छा नसेल तर प्रणयाराधन अतिशय यांत्रिक आणि नीरस असणार (थोडे अतिशयोक्ती करून सांगतो, जणु सेक्स डॉलच मग). इथे तीच व्यक्ती तुमची प्रिय असेल, तुम्हाला हवा तसा प्रतिसाद देत असेल, तुम्हाला आनंद देत असेल तर "८०-९० किलोची मुलगी" अप्सरेस लाजवेल. तो समागम असेल. टका "materialistic" अपेक्षांबद्दलचा दृष्टीकोन समजू शकतो पण म्हणून फ्लॅटची तुलना मुलीच्या "physical appearance"ची कशी होईल राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Wed, 01/21/2015 - 13:04 नवीन
टका "materialistic" अपेक्षांबद्दलचा दृष्टीकोन समजू शकतो पण म्हणून फ्लॅटची तुलना मुलीच्या "physical appearance"ची कशी होईल राव.
का नाही होणार? अनादि काळापासून स्त्रीचे सौंदर्य आणि पुरुषाचे सामर्थ्य यांचीच जोडी लागत आलेली आहे. काळानुरूप शारीरिक सामर्थ्याचे रूपांतरण फ्लॅट, इ. मध्ये झाले इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
  • «
  • ‹
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा