Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि
Wed, 01/14/2015 - 22:54
🗣 1423 प्रतिसाद
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)
ट
टवाळ कार्टा Mon, 01/19/2015 - 10:36 नवीन
मग माणूस ओळखण्यासाठी लिव्ह-इनला पर्याय नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ह
हाडक्या Mon, 01/19/2015 - 11:23 नवीन
यात बदल नाही का करता येणार??? ५ च्या ऐवजी १०-१५ वेळा भेटूदे की
याला +१ आणि
मग माणूस ओळखण्यासाठी लिव्ह-इनला पर्याय नाही
टका.. याला +१०० आमच्या मनातले बोललात.!! खरेतर ५ भेटीत पण कोणी मुखवटा घेवून येणार असेल तर त्यालाच नंतर जास्त त्रास असणार नाही का ? (आयुष्यभर त्याच मुखवट्याच्या दबावाखाली राहण्याचे). म्हणजे असे की दोन्ही बाजूंना दुसरी बाजू नीट जाणून घ्यायची इच्छा असते, त्यामुळे दुसरे ५-५ भेटींसाठी मुखवटेच घेऊन येतील हे काही पटत नाही. (तसेही थोडे HR प्रश्न गाठीशी ठेवावेतच की आपल्याला हवे ते माणूस शोधायला. :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
आ
आजानुकर्ण Mon, 01/19/2015 - 15:09 नवीन
शक्यतो IT मधला नसावा. (ती स्वतः IT मध्ये असली तरी तिला IT मधला नकोय )
तिला आयटीमधला नकोय तरी तुम्ही पाहिलेला पहिला मुलगा आयटी हमालच होता की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीता
ट
टवाळ कार्टा Mon, 01/19/2015 - 15:41 नवीन
ओ...असे जे बोलून तेच करणारी स्त्री बघितली आहे का कुठे? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Mon, 01/19/2015 - 15:46 नवीन
हो ना. शिवाय अपेक्षांच्या यादीत तो नंबर १ चा मुद्दा असल्याने मला सर्वात महत्त्वाचा निकष आहे असे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/19/2015 - 15:53 नवीन
लोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
म
मीता Mon, 01/19/2015 - 17:33 नवीन
"शक्यतो "असे लिहिलेले आहे. सगळ्याच गोष्टी हव्या तशाच मिळतात असही नाही. तडजोड प्रत्येक ठिकाणी आहेच .पण ती किती आणि कुठे करायची ते कळल पाहिजे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
प्रसाद१९७१ Mon, 01/19/2015 - 09:40 नवीन
आजकाल मुलींचे पण खर्च वाढले आहेत आणि तिची इच्छा आहे नोकरी करायची.
माझ्या मते कसलेही explaination द्यायची गरज नाही. "मुलीची इच्छा आहे नोकरी करायची" इतके पुरेसे आहे.
मुलगी : CCD मध्ये भेटू या . मुलगा : नको .मला तिथली कॉफ्फी नाही आवडत .
ह्या पहील्या प्रश्नाच्या उत्तरावरच मुलीनी संभाषण थांबवायला हवे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीता
ट
टवाळ कार्टा Mon, 01/19/2015 - 09:44 नवीन
मुलगा : मला ट्रेकिंग ला जायचं
हे खरे कारण असू शकते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीता
प
प्रसाद१९७१ Mon, 01/19/2015 - 09:50 नवीन
मी म्हणुनच CCD च्या प्रश्ना नंतर थांबायला पाहीजे होते असे लिहीलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/19/2015 - 09:55 नवीन
मुलगा: dominos चा पिझ्झा बेस फारच कडक असतो . मला नाही आवडत .
या वाक्यानंतर मुलालाच विचारायला हवे होते एकदा कि बाबा कुठे भेटायला जमेल...दर वेळी मुलगीच ठिकाण सुचवते आहे असे १ निरिक्षण नोंदवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ब
बॅटमॅन Mon, 01/19/2015 - 09:56 नवीन
मुलगा य-झ आहे असेही एक निरीक्षण नोंदवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
काळा पहाड Mon, 01/19/2015 - 13:39 नवीन
बाय द वे, पुढे काय झालं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मृत्युन्जय Mon, 01/19/2015 - 09:56 नवीन
दुसर्‍या किश्श्यातला मुलगा लहान आहे अजुन. त्याला नक्की कशासाठी भेटायचे आहे हेच कळाले नसावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीता
म
मीता Mon, 01/19/2015 - 10:05 नवीन
दुसऱ्या किस्श्यातला मुलगा लहान नाही . वय वर्ष 29 . तिच्यापेक्षा ६ वर्षांनी मोठा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सूड Mon, 01/19/2015 - 10:12 नवीन
मग त्याला तिला भेटायचं नसेल, सगळेच जण फटकळ नसतात. "बाई गं, मला तुला भेटायचं नाही." असं स्पष्ट सांगणं नाही जमत काही लोकांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीता
न
नाखु Mon, 01/19/2015 - 10:14 नवीन
पोरगा "बघणेबल" असेल "भेटणेबल" नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सूड Mon, 01/19/2015 - 10:11 नवीन
अजून हे दळण चालूच आहे का? हम्म!!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 01/19/2015 - 10:13 नवीन
एव्हरग्रीन\एव्हरलाल विषय आहे. चरचा तर होनारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/19/2015 - 10:15 नवीन
आता आलाच आहात तर लावा हातभार... कमीत कमी एखादी काडी टाकून तरी. :) (मुविंचा चाय सुलेमानीचा कप अजून संपला नाही ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 01/19/2015 - 10:24 नवीन
आता आलाच आहात तर लावा हातभार... कमीत कमी एखादी काडी टाकून तरी
असं म्हणता!! बरं!! धागा आणि प्रतिसाद वाचून एक सहज आपलं मनात आलं बरं का!! एवढे उपद्व्याप, वाढलेल्या अपेक्षा, लग्नाचे खर्च आणि मनासारखं नाही झालं तर परत ते टिकवायची कसरत...येवढं होऊन सुद्धा बाबांनो/बायांनो तुम्हाला वाटेल आणि पटेल तेव्हा लग्न करा असं म्हणणारी एकही व्यक्ती भेटलेली नाही. "अमुक इतकं वय? अजून लग्न नाही?" फार मोठा काहीतरी गुन्हा घडल्याचे भाव आणून अशाच पद्धतीची येणारी आणखी काही वाक्य!! अरे काय चाल्लंय काय!! *dash1*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बॅटमॅन Mon, 01/19/2015 - 10:30 नवीन
येवढं होऊन सुद्धा बाबांनो/बायांनो तुम्हाला वाटेल आणि पटेल तेव्हा लग्न करा असं म्हणणारी एकही व्यक्ती भेटलेली नाही. "अमुक इतकं वय? अजून लग्न नाही?" फार मोठा काहीतरी गुन्हा घडल्याचे भाव आणून अशाच पद्धतीची येणारी आणखी काही वाक्य!! अरे काय चाल्लंय काय!!
जाणिवांचा विकास झालेला नस्तो, मग वक्तव्येही अशीच येणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सस्नेह Mon, 01/19/2015 - 11:20 नवीन
जाणिवांचा विकास झाल्यामुळे वयाचे परिणाम होणे थांबते की काय ? वेळेत लग्न झाले तर मुले, त्यांची आजारपणे, शिक्षण सेटलमेंट इ. जबाबदाऱ्या शरीरात ताकद असेपर्यंत निभावता येतील, हा विचार, वेळेत लग्न करण्यामागे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड Mon, 01/19/2015 - 11:23 नवीन
योग्य मार्गावर चाल्लंय, अजून थोडी फुंकर घातलीत की चारशेची निश्चिंती झाली !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ट
टवाळ कार्टा Mon, 01/19/2015 - 11:28 नवीन
शंकाच आहे संमं ४००+ जायला देतील ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 01/19/2015 - 11:32 नवीन
उचलली जीभ, चाटला कडुलिंब !! *nea*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/19/2015 - 11:35 नवीन
गप्रांव...वशाड मेलो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ज
जेपी Mon, 01/19/2015 - 11:32 नवीन
तस काय नाय आता, लोक आणी संम दोघपण काश्मीर ला कंटाळले आहेत. त्यामुळे धागा 400 काय 700 (सप्तपदी) पर्यंत गेला तरी चालेल. *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/19/2015 - 11:34 नवीन
700 (सप्तपदी) खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ब
बॅटमॅन Mon, 01/19/2015 - 11:30 नवीन
लग्न ही अपरिहार्य गोष्ट आहे असे मानणे हेच जाणिवा विकसित नसल्याचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सूड Mon, 01/19/2015 - 11:33 नवीन
बलीवर्दनेत्रभञ्जक!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Mon, 01/19/2015 - 11:34 नवीन
+१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/19/2015 - 11:49 नवीन
फूsss... फूsss... फूsss... ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सूड Mon, 01/19/2015 - 11:55 नवीन
असं एका लयीत नका म्हणू....लोक आधीच पुर्षांची मंगळागौर म्हणतायेत, असं लयीत म्हणून फुगडी खेळायचा किंवा घागरी फुंकायचा इफेक्ट येतोय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
टवाळ कार्टा Mon, 01/19/2015 - 12:08 नवीन
आयला...काका एकदम जोरात आज :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
टवाळ कार्टा Tue, 01/20/2015 - 08:37 नवीन
फूsss... फूsss... फूsss...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सस्नेह Tue, 01/20/2015 - 08:05 नवीन
आमच्या जाणीवा पुरेशा 'विकसित' नाहीत ! नैतर आम्ही अजून 'पडीक'च राहिलो असतो *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Tue, 01/20/2015 - 09:23 नवीन
अग्गागा...काय तो स्वतःबद्दलचा स्पष्टवक्तेपणा तुम्ही पडीक राहिला असता म्हणजे बाकीचे सुध्धा पडीक रहातील असे कशावरून वाटले =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ब
बॅटमॅन Tue, 01/20/2015 - 09:47 नवीन
अगदी अगदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 01/20/2015 - 09:53 नवीन
१४/१५ च्या सत्यनारायणाला आहेस का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड Tue, 01/20/2015 - 10:18 नवीन
कोणाच्या लग्नाचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 01/20/2015 - 10:19 नवीन
मुविंच्या...तुला नै बोलावले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Tue, 01/20/2015 - 10:23 नवीन
मुविंच्या...
हायला? परत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 01/20/2015 - 10:37 नवीन
मुवि "सत्यनारायण पुजेचे" अ‍ॅडिक्ट आहेत...पण या पुजेत तीर्थ-प्रसाद वेगळा अस्तो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Tue, 01/20/2015 - 13:55 नवीन
टक्कोजीराव, आपणांस प्रश्न समजलेला दिसत नाहीये. अभ्यास वाढवा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 01/20/2015 - 15:36 नवीन
मुविंचे लेख + प्रतिसादांचा अभ्यास कर मग "सत्यनारायण" कळेल काय ते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सस्नेह Tue, 01/20/2015 - 12:45 नवीन
बाकीचे सुध्धा पडीक रहातील असे कशावरून वाटले
'बाकीचे' हा उल्लेख कुठे दिसला तुम्हाला ? चोराच्या मनात .... *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ज
जेपी Tue, 01/20/2015 - 12:59 नवीन
टक्याशी सहमत.. बाकी चोराच्या मनात.. ऐवजी , पोराच्या मनात... हे चपखल ठरेल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ट
टवाळ कार्टा Tue, 01/20/2015 - 15:37 नवीन
आमच्या जाणीवा पुरेशा 'विकसित' नाहीत ! नैतर आम्ही अजून 'पडीक'च राहिलो असतो
याचाच अर्थ तुम्ही आत्ता पडिक नाही पण बाकीचे आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सुखी जीव Mon, 01/19/2015 - 11:53 नवीन
त्या मुळे ज्या गोष्टी दिसतील ( घर्, फ्लॅट, गाडी, उंची, नोकरी, हँडसम दिसणे ) त्या नीट बघुन घ्याव्यात. ज्या मोजता येतीत ( पगार ) त्या मोजुन घ्याव्यात. बाकीच्या गोष्टी नशिबावर सोडाव्यात -------- ह्याच गोष्टी आजकाल वाढल्या आहेत असच काथ्या कुटणे चालू आहे ना
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा