Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि
Wed, 01/14/2015 - 22:54
🗣 1423 प्रतिसाद
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)
H
hitesh गुरुवार, 01/15/2015 - 21:27 नवीन
चर्चगेटची मुलगी घारापुरीला जाणार का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
क
कानडाऊ योगेशु Fri, 01/16/2015 - 07:36 नवीन
ठाण्यात रहाणारी मुलगी मुलुंडला येणार नाही, कल्याणला रहाणारी मुलगी डोंबिवलीला येणार नाही, विलेपार्ले/जोगेश्वरीची मुलगी ठाणे कल्याणला येणार नाही…
जोपर्यंत अशी विचारसरणी असलेल्या मंडळींच्या अपेक्षा पूर्ण होताहेत तोपर्यंत तरी ती मंडळी आपली विचारसरणी बदलणे अवघड आहे. असाच प्रकार रेसेशन च्या काळात (जॉबच्या बाबतीत) बेंगलोर मध्येही वाचायला मिळाला. कोरमंगला मध्ये राहणारा एक आय.टी हमाल ट्राफिक व दूरचे अंतर ह्या क्रायटेरियावर व्हाईटफिल्ड इथला जॉब घेण्यास तयार नव्हता पण रेसेशन्च्या दणक्यात असा काही बदल त्याच्या एकुण अ‍ॅटीट्युड मध्ये झाला कि तो चक्क नायजेरिया वगैरे देशात ही जायला तयार होता. थोडक्यात काय तर वक्त वक्त कि बात है !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
ट
टवाळ कार्टा Sat, 01/17/2015 - 05:40 नवीन
ओ भौ....रेसेशन गेले की जॉब बदलता येतो पोग्गी बदलता येते का? तुलना चुकीची होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
अ
अमोघ गाडे गुरुवार, 01/15/2015 - 17:27 नवीन
मुवि.. घरात सासु- सासरे नसावेत आणी कोणत्याहि प्रकारे त्यान्चि जवाबदरि आपल्यावर नसावि हि आज कालच्या मुलिन्चि मोठि अपेक्षा असते... स्वानुभवावरुन
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 01/15/2015 - 17:31 नवीन
त्यामुळे भविष्यकाळात आपल्या मुलाचं लग्न व्हावं व टिकावं अशी अपेक्षा करणाऱ्या मिपाकरांनी आपापल्या वृद्धावस्थेची सोय करुन ठेवावी. मुलाकडे राहता आलं तर सोन्याहून पिवळं. नाही जमलं तरी अपेक्षाभंगाचे दुःख नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोघ गाडे
स
सुबोध खरे गुरुवार, 01/15/2015 - 18:10 नवीन
मुलाचं काय आणि मुलीचं. लग्न केल्यावर त्यांना वेगळं घर करायला सांगणे हे उत्तम. दोन बायका एका छताखाली सहज नंदू शकत नाहीत हे त्रिकाळ अबाधित सत्य आहे मग ती आई आणि मुलगी असेल तरीही. सासू आणि सुनेचे नाते हे पटणारे नसतेच ते पटवून घेण्याचे नाते आहे. मी एकदा आमच्या सासूबाई आजकालच्या सुनांवर घसरल्या होत्या तेंव्हा त्यांना शांतपणे सांगितले कि अहो आजकालच्या सुना या तुमच्या पिढीच्या बायकांच्याच मुली आहेत ना ? मग त्यांना शिकवले कुणी तुम्हीच ना ? लग्न करतानाच सासू नसेल तर बरं किमान पक्षी मुलाचे वेगळे घर आहे ना हे पाहुन तुम्ही मुलीचं लग्न करता मग तुमच्या मुली सासूशी पटवून कशा घेणार ? तेन्व्हा शहाण्या माणसाने मुलाला किंवा मुलीला वेगळे घर करून देणे हे उत्तम. भले सुरुवातीला भाड्याचे घर असेल कि मुलगी किंवा सून काटकसरीने कसे राहायचे ते शिकेल. आणि आमची आई म्हणते तसे "पादा पण नांदा"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण गुरुवार, 01/15/2015 - 18:14 नवीन
खरंय. आम्ही भाऊभाऊच घरात असल्याने आईव्यतिरिक्त दुसरी अॅक्टिव मुलगी/स्त्री घरात असणे म्हणजे काय याचा अनुभव नव्हता. आईवडिलांनी पहिली सून घरात आणल्यानंतर आम्हाला या ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
काळा पहाड गुरुवार, 01/15/2015 - 19:45 नवीन
ही सगळी भानगड करण्यापेक्षा माझा मित्र म्हणतो तसं काँट्रॅक्ट बेसीस वर लग्न करावं. दर ११ महिन्यांनी काँट्रॅक्ट रिन्यू करावं, नाही तर मग नवीन काँट्रॅक्ट. हा.का.ना.का.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/16/2015 - 04:29 नवीन
एक बारीक प्रॉब्ळम आहे. मधेच मुलं बिलं झाली तर काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
न
नाखु Fri, 01/16/2015 - 04:57 नवीन
कदाचीत त्यांचा संभाळ पण ११-११ महिन्यांच्या कराराने करण्याची तरतूद असावी मूळ करारनाम्यात. सहवास नव्हे "सहजीवन" अश्या "बुरसटलेल्या" विचारांचा प्रतिगामी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अजया Fri, 01/16/2015 - 06:04 नवीन
सहवास नव्हे "सहजीवन" अश्या "बुरसटलेल्या" विचारांचा प्रतिगामी नाखु
सहमत.बुरसटलेल्या विचारांची प्रतिगामी अजया!
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Fri, 01/16/2015 - 06:14 नवीन
अरे बापरे इतके कॉम्प्लिकेटेड असते का हे? असे काही वाचल्यावर माझ्या हिलरीने मला किती मोलाची साथ दिली हे समजून येते. आमचे लग्न व्हायच्या साडेतीन वर्षे आधीपासून मी आणि हिलरी ऑनलाईन वेबकॅमवर चॅट करत होतो. अनेक वेळी फोनवरही बोललो होतो.त्यावेळी मी होतो अमेरिकेत (इंजिनिअरींगमधला एक बत्थड पी.एच.डी विद्यार्थी म्हणून) आणि हिलरी होती मुंबईत.त्यामुळे आम्ही एकदाही भेटलेलो नव्हतो. इंजिनिअरींगमधील पी.एच.डी माझ्याच्याने झेपणाऱ्यातली नाही आणि मला भारतात परत यावे लागणार हे कळले तेव्हा तो माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक कालखंड होता.त्यातून बाहेर येण्यासाठी काय करायचे याचा मी विचार करून ठेवला होता.पण त्याची अंमलबजावणी एका वर्षानंतरच सुरू करता येणार होती.मधल्या काळात मी नक्की कुठे राहणार, कुठली नोकरी करणार याचा अजिबात पत्ता नव्हता.आमच्या सुदैवाने सर्व काही सुरळीत झाले.आम्ही पहिल्यांदा भेटलो त्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता.त्याच इंटरव्ह्यूमध्ये मला पुण्यातील नोकरीची ऑफर दिली गेली.अर्थातच पगार जेमतेमच होता.त्यानंतर आम्ही भेटलो.यथावकाश लग्नही झाले.मुंबईबाहेर कधी यायची तयारी नसलेली हिलरी माझ्याबरोबर पुण्यात राहायला तयार झाली.त्यानंतर २००९ ते २०११ ही दोन वर्षे आम्ही दोघेही विद्यार्थी होतो.मी अहमदाबादला तर हिलरी मुंबईत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये. लग्न झाल्यानंतर सव्वा वर्ष पूर्ण व्हायच्या आत आणखी दोन वर्षे दुसरीकडे राहणे पण तिने मान्य केले. मला मुंबईला फार येता यायचे नाही.पण शक्य असेल तेव्हा ती अहमदाबादला येत असे. अशावेळी दोन दिवस आम्ही हॉटेलात राहत असू. यासगळ्याविषयीही तिने अगदी एका शब्दाने तक्रार केली नाही.आमच्या दोघांच्याही नोकरीचे नक्की झाले ते पण एकाच दिवशी-- शेवटी १ फेब्रुवारी २०११ रोजी.त्यानंतर एप्रिल २०११ मध्ये आम्ही परत एकत्र राहायला सुरवात केली.त्यानंतर जवळपास दोन वर्षे माझे शिक्षणकर्ज फेडण्यासाठी अधिक उत्पन्न हवे म्हणून आठवडाभर ऑफिसबरोबरच बहुतांश रविवारी मी १० ते ३ असे ५ तास एका क्लासमध्ये शिकवायला जात असे.तरीही त्याविषयी हिलरीने एका शब्दानेही तक्रार केली नाही.पाच-सहा महिन्यापूर्वीच आम्ही आमचे पहिले वन बी.एच.के घर घेतले.आणि अर्थातच ही सुरवात आहे.अजून बरेच पल्ले गाठायचे आहेत.हिलरीने मला या सगळ्यात अगदी १००% साथ दिली. या धाग्यातील सगळे प्रकार वाचून वाटते की पत्रिका बघून, कांदेपोहे खायचा कार्यक्रम असता तर माझे लग्न अजूनपर्यंत होणे जरा कठिणच होते :)
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Fri, 01/16/2015 - 06:30 नवीन
हा नियम फक्त मुलीच्या आई ला नसावा . खरे म्हणजे दोन्हीही (२+२) पलक नि मुलांच्या संसारात फार लक्ष् घालू नये. त्यांनी मागितला तर सल्ला द्यावा . मुलीची आई असो व मुलाची, संसारात त्रास दोगींमुळे हि होऊ शकतो. खरे तर % पाहिलेत तर मला वाटते, १०० संसार जिथे शांतता नाही, त्यातले कमीतकमी ८० तर मुलाच्या आई च्या वागण्या मुळे असतील. किती मुलींच्या आया जावयांना टोमणे मारतात, धुसफूस करतात , आमच्या घराची पद्दत इ इ बोलून वात आणतात, जावयाने ऑफिसातून आल्यावर घराची कामे करावीत असे म्हणतात, मी सांगेन तेच आणि तसेच झाले पाहिजे असे म्हणतात? लक्ष्यात घ्या , हे सग्गळे आणि वरती बरेच काही, मुलांच्या आया करतात. आधी हि मानसिकता बदला , कि मुलगी आमच्या घरी आली आहे, म्हणून तिने आमच्या पध्दतीप्रमाणे वागले पहिजे. मनुष्य स्वभाव आहे कि त्याला प्रेम, appreciation हवे असते ते मुलाच्या आई कडून मिळाले, तर सुना सासरी का रमणार नाहीत?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 01/16/2015 - 06:49 नवीन
आमची आई बहुधा काळाच्या दोन पिढ्या पुढे असावी. लग्न झाल्यावर आमची बायको आईला प्रत्येक बाबतीत विचारत असे पण आमची आई तुम्हाला पटेल तसे करा असे सांगत असे. यात मंगळसूत्र घालायचे का कुंकू लावायचे का पासून जवळच्या नातेवाईकाच्या लग्नात जीन्स घातलेली चालेल का पर्यंत सर्व आले. ही २२ वर्षापुर्वीची गोष्ट आहे.( आमची आई अजूनही साडी व्यतिरिक्त दुसरे वस्त्र नेसत नाही.)आमच्या बायकोला हे जड गेले कारण तिला माहेरी सर्व निर्णय स्वतः घ्यायची अशी सवयच नव्हती शिवाय सासू म्हणेल ते ऐकायचे असे शिकवले गेले होते. आम्ही वेगळे राहायचे ठरवतो आहे असे माझ्या भावाने २० वर्षापूर्वी सांगितले( आणि मी १० वर्षापूर्वी) तेंव्हाही आमच्या घरात कोणतीही रडारडी झाली नाही. सर्व गोष्टी सामंजस्याने झाल्या. मुलांना कसे वाढवायचे यात मतभेद असले तरीही तुमची मुलं आहेत. तुम्हाला जसे पटेल तसे करा. आम्ही सूचना देतो पाळायच्या असतील तर पाळा. तिने दोन्ही सुनांच्या बाबतीत कोणतीही ढवळा ढवळ केली नाही. यामुळे आमच्या कुटुंबात शांतता आणि जिव्हाळा कायम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
प
पिलीयन रायडर Fri, 01/16/2015 - 09:32 नवीन
धन्यवाद! थोडक्यात सासु सुनेला जशी वागवते तशी नक्कीच सासु जावयाला वागवत नाही.. त्यामुळे हा इश्यु असेलही पण जितका दाखवला जातोय तितक्या % मध्ये नाहीये.. सासु-सुनेच्या तुलनेत तर अजिबातच नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
क
कपिलमुनी Fri, 01/16/2015 - 08:29 नवीन
मिपा लव्ह स्टोरीज अशी एक जिलेबी पाडावी म्हणतो .. सारे यशस्वी- अयशस्वी अनुभव वाचता येतील आणि होतकरूंना मार्गदर्शन देखील मिळेल .
  • Log in or register to post comments
स
सुजल Tue, 01/20/2015 - 19:43 नवीन
बरोबर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
विटेकर Fri, 01/16/2015 - 09:34 नवीन
अपेक्षा वधू - वरांच्या नव्हे तर समाजातल्या प्र्तयेक घटकाच्याच वाढल्या आहेत हे ही यानिमित्तने नमूद करतो. आणि जितक्या अपेक्षा जास्त तितका अपेक्षाभंग जास्त आणि दु:ख जास्त आणि म्हणून अनिश्चितता आणि भिती जास्त !! ती भिती कमी व्हावी म्हणून लोक वाट्टेल त्या थराला जातात ... लग्नाच्या बाजारात उभे राहून आपली बोली लावणारे आपल्या भोवती पैशाने विकत घेतलेले कचकड्याचे वलय उभे करून त्या भितीवर तोडगा शोधत राहतात. आणि लग्नानंतरीही त्याच कचकड्याला ठिगळांची जोड लावून अधिक मजबूत करत राहतात. बेकेलाईटी ! बेकेलाईटी !!! प्राथमिक शिक्षक म्ह्णून नोकरी करणार्‍या आमच्या पिताजींनी वयाच्या ५५ वर्षी घर बांधले!! नो ई एम आय ! काय तृप्त आहे त्यांचे वृद्धत्व ! गायीच्या दुधावरच्या सायीसारखे .. जाडसर आणि स्निग्ध !! इतके धावापळ केल्यावर आता मी एकच ध्येय ठेवले आहे... वयाच्या ६५ व्या वर्षी मागे वळून पाहताना एक ही पश्चातापाचा, कृतघनतेचा क्षण असू नये ! अफाट पैसा आणि कचकड्याची सुरक्षितता शोधताना आयुष्य जगायचे राहून जात आहे ! अपेक्षांचे ओझे झुकारून आला क्षण जगण्याचा विवेक जागृत व्हावा हीच एक अपेक्षा !
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 01/16/2015 - 14:54 नवीन
तुमच्या वडिलांचा काळ वेगळा होता. आता ५५व्या वर्षी घर बांधायचे म्हटले तर तोपर्यंत लग्नही होणार नाही अशी परिस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
स
सुजल Tue, 01/20/2015 - 19:44 नवीन
:) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/17/2015 - 04:00 नवीन
लेटेस्ट उदाहरणः पात्रे (लग्नेच्छुक मित्र (बी.ई. मेकॅनिकल आणि एम.बी.ए. ऑपरेशन्स) व तो पहायला गेलेली मुलगी (एम.सी.ए. आणि सद्ध्या काहीतरी टेस्टींगचा कोर्स करतीये), हल्लीच्या पद्धतीप्रमाणे दोघ परस्पर बाहेर भेटली. तो: मी अमुक अमुक कंपनीमधे डिझाइन इंजिनिअर म्हणुन आहे. शिवाय बाहेर डिझाइन सॉफ्टवेअर्स पण शिकवतो एक दिवसाआड जाउन. ती: माझं नुकतचं एम.सी.ए. पुर्ण झालयं. आता सॉफ्टवेअर टेस्टिंग मधे काही कोर्स करतीये. अजुन नोकरीचा विचार केलेला नाही. तो: तुझ्या भावी जोडीदाराकडुन काय अपेक्षा आहेत? ती: शक्यतो आय.टी. कंपनीत हवा (अगं बै मग इथे भेटायला तरी कशाला आलीस!! इति: मित्र). पुण्यात स्वतःचं स्वतंत्र घर हवं. आई वडीलांची जबाबदारी असली तरी हरकत नाही (एक मुद्दा खरचं चांगला मांडला ह्या मुलीनी). एखादी सेदान हवी दारासमोर. तो: मी ऑटोमोबाईल कंपनीमधे नोकरीला आहे हे मी आधीचं सांगीतलयं. भविष्यामधेही आय.टी. मधे जाणार नाहीये (लढं पठ्ठ्या लढं.). पुण्यात आत्ता आई-वडीलांच्या २ बी.एच.के. मधे राहतोय. आणि लवकरचं स्वतःचा एक बी.एच.के. बुक करणार आहे. गाडी सद्ध्या शक्य नाही. जेव्हा मी आणि माझी होणारी बायको नोकरी करु आणि घरं घेतल्यावर घराचे इएमाय जाउन गाडी परवडेल असं वाटेल तेव्हा एखादी गाडी घेणार. ती: (वरच्या एकाही मुद्द्याला आत्ता प्रत्युत्तर नं देता) तुझ्या माझ्याकडुन काय अपेक्षा आहेत. तो: मला तु आवडली आहेस (मुर्ख साला!!! खरेदीचा पहिला नियमः आवडलेल्या वस्तुचं विक्रेत्यासमोर कधीचं कौतुक करायचं नाही. वि स र ला. ) माझ्या अपेक्षा एवढ्याचं की आई-वडीलांबरोबर जुळवुन घेणारी हवी. नोकरी केल्यास उत्तम. शिकायचं असेल तर आमची ना नाही. पण शिकुन नुसत घरी बसणारी नको. त्या शिक्षणाचा उपयोग करुन घेणारी हवी. पगाराचा भाग आपल्या घराचा खर्च भागवुन तुझ्या आईवडीलांना आर्थिक मदत करु शकतेस. तुझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायलाही जाउ शकतेस. ती: (५ मिनिटापुर्वीच्या मुद्द्यावर येत) नाही. मला २ बी.एच.केचं पाहिजे. शिवाय मी नोकरी करीन की नाही अजुन ठरवलेलं नाही. गाडी पण हवीचं. मी टु व्हीलर वर फिरणार नै (इसको क्या पता बाईक पे घुमना कितना रोमँटीक होता है). शिवाय तु मेकॅनिकल वाला मी आयटी वाली आपलं ट्युनिंग कसं जुळणारे? (मग मुर्ख मुली, आधी भेटायलाचं का आलीस? मी काय घरी गाड्या आणणारे का इंजिनं उघडायला किंवा गाडी गाडी खेळायला? का तु घरी ० १ ० १ ० १ खेळतं बसणारेस?) परत तु भविष्यात पण आयटीतं जायचं नाही असं म्हणतोयस. तो: आय.टी. मधे जाणार नाही. पुढे जाउन मला स्वतःची इंजिनिअरिंग कन्स्लटंसी सुरु करायचीये. आणि मला किमान ३ वर्ष अजुन गाडी घ्यायला जमणार नाहीये. तु विचार करुन सांग. ती: आपलं जमणार नाही. आपण इथेचं थांबुयात. गुडबाय. तो: ठिके. धन्यवाद. गुडबाय. (आजच्या कॉफीचे पैसे टी.टी.एम.एम. =)) ) ___________ हॉरीबल परिस्थिती आहे बाहेर राव. ह्या मागण्या अवास्तव नाहीत तर काय? बरं नंतर घेउ म्हणतोय ना. दोघांनी नोकरी केल्याशिवाय एवढं सगळं कसं मॅनेज होणार? थोडतरी कुठे समजुन घेतलं पाहिजे ना. असो गुरुवर्य प्रगो म्हाराज म्हणतात त्याप्रमाणे आता एखादी ए किंवा बी. टायपाची पोरगी प्रेफेरेबली जोशी प्रेमात पडतीये का पहायला पाहिजे <3 =)) (चिंताग्रस्त) कॅप्टन जॅक स्पॅरो
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 01/17/2015 - 04:31 नवीन
शिवाय तु मेकॅनिकल वाला मी आयटी वाली आपलं ट्युनिंग कसं जुळणारे?
ठार मेले! लग्न झाल्यावर नवरा-बायको घरात नेमकं काय करतात अशी तिची कल्पना आहे? तुम्हा सगळ्या लग्नाळू पोरांना एक आत्याबैंचा प्रेमाचा सल्ला. घर गाडी घ्यायच्या भानगडीत न पडता उत्तर प्रदेश, बिहार राजस्तान मधली मुलगी शोधा. साधारण ३ वर्षांपूर्वी माझ्या बँकेतल्या दोन राजस्थानी पोरांची लग्नं झाली. दोघांच्या सासर्‍यांनी फ्लॅट आणि गाड्या घेऊन दिल्या. तिकडे नवर्‍यामुलाच्या नोकरीनुसार काय द्यावं लागतं याची लिस्ट तयार असते म्हणे. डॉक्टर असेल तर हिर्‍याचे दागिने वगैरे बरंच काय काय असतं. बँक ऑफिसरला एक फ्लॅट आणि वॅगन आर किंवा इंडिका व्हिस्टा मिळते म्हणे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/17/2015 - 04:50 नवीन
लग्न झाल्यावर नवरा-बायको घरात नेमकं काय करतात अशी तिची कल्पना आहे?
कै आयड्या नै बा तिच्या गुढग्यात काय कल्पना होत्या त्या!!! बहुतेक तिला ऑफिसचं काम घरी घेऊन येणार्‍या नवर्‍यांविषयी माहिती असावी. =)).... आता हा भौ काय ट्रकचं इंजिन घरी डिझाईन करणारे का? कंपनीत काम नै करत घरी काय करणार =)) ____
तुम्हा सगळ्या लग्नाळू पोरांना एक आत्याबैंचा प्रेमाचा सल्ला.
सकाळमधे आपला जॅक है...पैसात्त्याचा सल्ला कॉलम सुरु कर्ताय का? आम्ही मुक्तपीठीय प्रतिक्रिया देणार नै असं वचन देतो हवं तर.
घर गाडी घ्यायच्या भानगडीत न पडता उत्तर प्रदेश, बिहार राजस्तान मधली मुलगी शोधा.
उत्तर परदेश, बिहारमधली मुलगी हमकु पसंद नाही पडत है!! आपली मराठी मुलगीचं लै भारी असते... राजस्थानी मुलगी लग्नापर्यंत कशी दिसते हे घुंगटमधुन दिसत नै...सबब कटाप...!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सुबोध खरे Sat, 01/17/2015 - 05:01 नवीन
ओ कॅप्टन साहेब गाडी घेणे आजकाल कुठल्याही लुंग्या सुन्ग्याला परवडतं. मी माझी ११ वर्षं जुनी मारुती रुपये २८, ०००/- फक्त ला २००७ साली विकली. पोरीला सेदान पाहिजे तर एक १० वर्षं जुनी सेडान ३०,०००/- ला विकत घ्या आणि पोरीला टेचात सांगा माझी सेडान जुनी झाली आहे आणि आता बदलायची आहे(जसं काही १० वर्षापासूनच माझ्याकडे गाडी आहे) हाकानाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/17/2015 - 05:21 नवीन
नाही हो नाही परवडत. गाडी विकत घ्यायला परवडते. मेंटेन करणं अवघड आहे. आणि तो काय घेतं नाही म्हणाला नव्हता. थोडी कळं काढायची तयारी पाहिजे एवढचं म्हणणं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ल
लॉरी टांगटूंगकर Sat, 01/17/2015 - 05:27 नवीन
(आजच्या कॉफीचे पैसे टी.टी.एम.एम. Lol ) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
पैसा Sat, 01/17/2015 - 05:57 नवीन
पैसात्त्याचा सल्ला कॉलम सुरु कर्ताय का? आम्ही मुक्तपीठीय प्रतिक्रिया देणार नै असं वचन देतो हवं तर.
मग काय उपेग? मुक्तपिठीय प्रतिक्रिया मस्टच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Sat, 01/17/2015 - 05:43 नवीन
कोणी असेल ओळखीत तर सांगा की मला चालेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/17/2015 - 07:56 नवीन
गोयंकर सांगतील की रे तुला....!!! बाकी ठाण्यासारख्या (मध्यवर्तसमान) ठिकाणी तुला एक मुलगी मिळु नये...वैट्टं वाटलं बघं दुष्काळ बघुन. सरकारी पॅकेज मिळतं का बघं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पैसा Sat, 01/17/2015 - 08:08 नवीन
सर्कारी प्याकेज?? देवा माझ्या! सर्कारतर्फे म्हशी वाटतात नैतर शेळ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/17/2015 - 18:41 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा Sat, 01/17/2015 - 19:42 नवीन
नै हो...मला पोग्गीच हवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 01/18/2015 - 02:46 नवीन
टागालॉग भाषेमधे पोग्गीचा अर्थ "हँडसम ड्युड" असा घेतला जातो हे येथे विनम्रपणे लिहावेसे वाटले. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 01/18/2015 - 05:58 नवीन
ते "पोगी" आहे....पोग्गी नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 01/19/2015 - 08:40 नवीन
ठिके पोगी=हँडसम ड्युड पोग्गी= हँड्डस्सम्म ड्युड्ड!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 01/19/2015 - 08:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 01/19/2015 - 08:56 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पैसा Mon, 01/19/2015 - 06:14 नवीन
:ROFL:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
पिवळा डांबिस Mon, 01/19/2015 - 07:03 नवीन
अर्ध्या ग चा फरक, अनर्थ करी!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
प्रणित Fri, 06/17/2016 - 01:20 नवीन
जर जावई स्वः जातीस असला तरच या सर्व वस्तु दिल्या जातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
आ
आजानुकर्ण Sat, 01/17/2015 - 14:02 नवीन
लग्नेच्छुक मित्राला बायको म्हणून एमसीए वगैरे झालेली मुलगी नक्की का बरं हवी आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 01/18/2015 - 02:50 नवीन
त्याला इंजिनिअर मुलगीचं हवीये असं काही नाहीये. इंजिनिअर मिळाली तर उत्तम नाही मिळाली तर काही फरक पडत नाही. त्याची एवढीचं इच्छा आहे की मुलगी शिकलेली असेल तर शिक्षणाचा वापर करावा. घरी बसुन रहाण्यात काही अर्थ नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
अ
अजया Sat, 01/17/2015 - 05:21 नवीन
मुलींना वेगळा फ्लॅट असणारा मुलगा का हवा याची कारणे काही लग्नेच्छुक भाच्यांकडुन मिळवून मी धन्य झाले त्यांची दूरदृष्टी बघून.(#$$आम्हाला नाही सुचलं.बसले हप्ते फेडत ^_~ ) १ सुरुवातीपासुूनच वेगळे राहाता येते. २ मूल झाल्यावर आईकडे ठेवता येते.सासरच्यांची मिजास नको. ३ आईचे घर तीस वर्षापूर्वी घेतलेले पौडात असल्याने,जास्तीत जास्त कोथरुडपर्यंतचाच फ्लॅट हवा! ४ सध्या या भागात फ्लॅट घेऊ शकणार्याला तेवढा पगार असायला तो अाय टी हमाल हवा. ५ आय टी सोडुन दुस्रं प्रोफेशन डाऊनमार्केट अस्तंय.(भिंतीवर डोके आपटा हीचे) ६ सणवाराचं सगळं आईच बघेल.मला काहीच येत नाही.ती जवळ बरी! ७ सध्या यातल्या एकीचे वय ३२ फक्त! ८ त्या जे सांगत आहेत यात काहीही गैर आईबापांना वाटत नाहीये हे विशेष. ९ परत जात पोटजात भानगडी आहेतच. १० तुझ्या वयात माझे लग्न होऊन मी मुंबईतून एका छोट्याश्या गावात आले.माझ्या नवर्याने त्याला आय टी वाल्या आॅफर माझा इथे जम बसणे,मुलाला सांभाळणे यासाठी नाकारुन प्राॅडक्शन बेस्ड कंपनीत नोकरी केली.तिच्या वयाची असताना माझे मूल ८वर्षाचे होते.हे ऐकुन तिला फारच हसू आले आणि असे काय तुम्ही हे मलाच ऐकवले गेले!!
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/17/2015 - 05:31 नवीन
एकुण काय नॉन आयटी वाले जगायला नालायक =)) कठीण कठीण कठीण किती!!!! :( :( :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
पैसा Sat, 01/17/2015 - 05:55 नवीन
माझ्या १८ वर्षाच्या मुलाची आत्तापासूनच काळजी पडलीय! तो तर बापडा सगळ्यात वैट्ट प्रकार शिकतोय. घिसाडी (मेक्यानिकल इंजिनियर) होणारे. आताच वर्गात ३ की ४ मुली आहेत म्हणे. आणि घरी अस्तो तेव्हा फूटबॉल बघत नाहीतर खेळत असतो. तेव्हा प्रेमात बिमात पडण्याची शक्यता काय दिसत नै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
अ
अजया Sat, 01/17/2015 - 06:01 नवीन
माझा दहावीत आहे पैसाक्का!मीच त्याच्यासाठी सातवीपासुनच्या मुलींवर नजर ठेवुन बसायचा विचार करतेय ^_~ आमचंही ध्यान प्रेमात पडेल असं वाटत नाही!वेळेवर बुकिंग झाले म्हणजे बरें!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सुबोध खरे Sat, 01/17/2015 - 06:09 नवीन
पैसा ताई मग आमचे चिरंजीव तर बांधकामावरचे हमाल ( सिव्हील) मध्ये आहेत. पण आश्चर्य म्हणजे त्याच्या वर्गात ४०% मुली आहेत. त्यातून आमचे चिरंजीव मधून मधून कडक कपडे घालून सेंट वगैरे मारून कुठे कुठे जात असतात.म्हणजे मुलगा चांगल्या मार्गावर आहे असे वाटते. नाहीतर घरात असेल तर चेहऱ्यावर भजी तळता येईल इतके तेल असते. बाकी फुटबॉलचे म्हणाल तर आमच्याही घरी तोच कार्यक्रम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 01/17/2015 - 06:22 नवीन
जरा तरी आशा आहे, कोणीतरी मुलगी भेटेल त्याला कॉलेजात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/17/2015 - 07:50 नवीन
घिसाडी मेकॅनिकल इंजिनिअर =)) चांगलयं की आता कळेल तुम्हाला मेकॅनिकल/ प्रोडक्शन आणि सिव्हील वाल्यांचं दु़ख्खः!!! आत्ताचं स्पष्ट कल्पना द्या, बाबा हो मेकॅनिकल इंजिनिअर, पण बायकोची सोय पण आत्ताचं करुन ठेव. ग्रॅजुएट व्हायच्या आत सोय झाली तर काही खरं नाही बाबा. =)) (सबमिशन च्या ओझ्याबरोबर हे ओझं!!! ;) ) वर्गात तीन-चार मुली असतील तर कटथ्रोट स्पर्धा आहे म्हणायची. =))
घिसाडी (मेक्यानिकल इंजिनियर)
इंजिनिअरिंगच्या मदर ब्रँचला घिसाडी म्हणल्याबद्दल अतीतिव्र णिषेध...!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
भ
भावना कल्लोळ Sat, 01/17/2015 - 10:33 नवीन
पै ताई, तुझा मुलगा अजून १८ वर्षाचा आहे आणि माझा आताशी १० वर्षाचा. पण दीर तर माझा चांगला २८ वर्षांचा झाला आहे, पण स्वतः कुठे सुत जुळवेल याची जरा सुद्धा शक्यता नाही आहे, हल्ली मलाच कसलासा आजार झाला आहे कि काय असे वाटते, लोकल मध्ये, ग्रुप मध्ये त्याची एवढी समवयस्क मुलगी दिसली कि तिला जावेच्या रुपात पाहायला सुरवात ते तिची इंत्यभूत माहिती काढेपर्यंत. पण अजून कोणतीही मोहीम सर होईना. आमच्याकडे तर जाऊ बाई जोरात हे प्रकरण लयच गाजतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा