Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि
Wed, 01/14/2015 - 22:54
🗣 1423 प्रतिसाद
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)
स
सुबोध खरे Wed, 01/21/2015 - 14:11 नवीन
वैचारिक पातळी वरून एक किस्सा आठवला. पूर्वी पण केंव्हा तरी टंकला होता. आमचा एक मद्रासी( तामिळ) मित्र आहे. ( आमच्या २ वर्षे मागे आहे आणी आता मोठा कॅन्सर सर्जन आहे ). त्याला एकदा त्याच्या वर्गातील ख्रिश्चन मुलीवरून चिडवत होतो. त्यावर तो आम्हाला( मला आणी माझ्या तेलुगु मित्राला) म्हणाला कि मला अशी सोफिस्तीकेटेड मुलगी नको आहे. मला साधी इडली, वडा, डोसा करणारी मुलगी बायको म्हणून पाहिजे. मी त्याला शांतपणे म्हटले मग तुला एखादी तमिळ मोलकरीण पण चालेल. त्यावर आमचा तेलुगु मित्र म्हणाला अरे तू तिला १००० रुपये दिलेस तर ती बेडरूम मध्ये पण येईल( हि १९९० सालची गोष्ट आहे). तो यावर उसळला. मग त्याला आम्ही समजावले कि वैचारिक पातळी काही गोष्ट असते कि नाही तू एवढा डॉक्टर आहेस. तुझ्या मानसिक पातळीवर असलेलीच मुलगी पाहिजे. काय शिकली आहे ते महत्त्वाचे नाही पण केवळ लग्नाचे वय येईपर्यंत "काहि तरी करायचे" म्हणून कॉलेजात जाणारी मुलगी कशी चालेल?
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Wed, 01/21/2015 - 15:44 नवीन
मी त्याला शांतपणे म्हटले
तुम्ही नेहमी सगळ्या गोष्टी "शांतपणे" कशा हो सांगता ? उच्चुकता लागलीये जाणून घ्यायची :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
टवाळ कार्टा Wed, 01/21/2015 - 15:49 नवीन
बहुतेक अजुन तुम्ही डॉ.ना भेटला नाहीत...ते लशकरात होते त्यांची दंबूक नेहमीच जवळ असणार...मग समोरच्याला शांतपणे सांगितले तरी तो ऐकतो ;) (डॉ.सर...कृ.म.न.घे. = कृपया मनावर न घेणे) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
स
सुबोध खरे Wed, 01/21/2015 - 16:11 नवीन
ट का शेट ते बाकी दोन जण अजूनही लष्करात आहेत मी फक्त खाली झालो. @ हाड्क्या - एखाद्या माणसाला कोणतीही गोष्ट पटवून द्यायची असेल तर ती शान्तपणेच सांगायला लागते नाहीतर लोक तुम्हाला हलके घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ह
हाडक्या Wed, 01/21/2015 - 16:17 नवीन
मग समोरच्याला शांतपणे सांगितले तरी तो ऐकतो
ह्याबद्दल डॉक्टरीण काकूंकडून ऐकायला आवडेल .. ;)
(डॉ.सर...कृ.म.न.घे. = कृपया मनावर न घेणे)
कित्ती कित्ती तो णम्र णम्र हो टका.. (की दंबूकीला बघून आलाय काय म्हैत) :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सुबोध खरे Wed, 01/21/2015 - 16:45 नवीन
मग या कि १५ फेब्रुवारी ला कशेळे येथे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Wed, 01/21/2015 - 16:58 नवीन
डॉक भारतात नै अत्ता म्हणून, नै तर आलोच असतो.. (मी नै भित हो तुमच्या दंबुकीला. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 01/21/2015 - 17:58 नवीन
हाडक्या साहेब आत्ता एवढा वेळ मी शांतपणे एका स्त्रीला समजावत होतो कि तुझ्या कपाळावर कुंकू फार दिवस राहणार नाही. तिच्या यजमानांना यकृताचा कर्करोग आहे आणि त्यासाठी ती माझ्याकडे आलेली होती. तिच्या दुर्दैवाने तो कर्करोग यकृताच्या बाहेर पसरलेला होता आणि ती आपण लिव्हरट ट्रान्सप्लांट करू वगैरे बोलत होती. लोकांनी तिला बरीच खोटी अशा दाखवलेली होती. अशा स्त्रीला वस्तुस्थिती समजावून देण्यासाठी फार शांतपणे बोलावे लागते. एक तर यजमानांची नोकरी सुटलेली वर ती स्वतः नोकरी करत नाही. एक दीर कर्करोगाने गेलेला त्याच्या साठी हिच्या यजमानांनी बराच खर्च केला होता आई ची मूत्रपिंडे खराब झालेली वडिलांना पक्षाघात झाला होता यात त्यांचा पाण्यासारखा पैसा खर्च झालेला होता. अशा परिस्थितीतहि हि स्त्री वेडी आशा मनात ठेवून नवर्याच्या लिव्हर ट्रान्सप्लांट साठी प्राथमिक गोष्टींसाठी १० लाख रुपये खर्च करायला निघाली होती. तिला तुझ्या नवर्याचा लिव्हर ट्रान्सप्लांट होणे शक्य नाही हे समजावून सांगायची पाळी माझ्या वर आली होती. तुझ्या यजमानांकडे( वय ५३ वर्षे) फार तर ६ महिने आहेत हे एखाद्या ४८ वर्षाच्या स्त्रीला समजावून सांगण्यासाठी फार शांतपणेच समजवावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 05:27 नवीन
_/|\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ह
हाडक्या Fri, 01/23/2015 - 16:07 नवीन
काका, आपली गंमत आपण फारच मनावर घेतलीत असं दिसतंय. तुमच्या प्रतिसादात जास्त रिपीट होणारा शब्द उचलून चेष्टा करत होतो, त्याचा आणि तुमच्या प्रतिसादाचा तसा काही एक संबंध नाहीये (मला उगीच गिल्ट लावण्याचा हेतू मात्र दिसतोय उगा) बाकी आपण ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्राचे ह्या गोष्टी भाग आहेत. तसेही आपापल्या क्षेत्रात अशा काहीतरी गोष्टींना तोंड द्यायलाच लागतं .. आता उद्या इथे कोणी पोलिस असेल तर तो मला काय काय बघावं लागतं आणि तुम्ही माझी चेष्टा कर्ताय असे म्हणू लागला तर अवघड?, नाही का ? चेष्टा प्रतिसादक आयडीची होती, डॉक्टरची नव्हे, तेव्हा तुम्ही तुमच्या क्षेत्रात नक्कीच चांगले काम अगदी "शांतपणे" करत असाल पण त्या क्षेत्राचे संदर्भ नको तिथे वापरु नका असे म्हणेन. मी ही इथे एक आयडी म्हणून आहे, बाहेर अगदी मी देवेंद्र फडणवीस असेन (नाहीये! आधीच सांगतो) अथवा कोणी अजून असेन, मला त्या प्रतिमेचा वापर इथे करायचा नाहीये आणि त्याचे भांडवल पण करायचे नाहीये. आपला डॉक्टर म्हणून आदर आहे पण हा मानभावीपणा पटला नाही असे खेदाने नमूद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सूड Fri, 01/23/2015 - 16:28 नवीन
बाहेर अगदी मी देवेंद्र फडणवीस असेन (नाहीये! आधीच सांगतो)
आयला, देवेंद्र फडणवीस मिपावर आले का काय म्हणून लै भारी वाटलं होतं. पण हे कंसातलं वाचून क्ल्प्ड झाला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
आ
आजानुकर्ण Fri, 01/23/2015 - 16:32 नवीन
मी ही इथे एक आयडी म्हणून आहे, बाहेर अगदी मी देवेंद्र फडणवीस असेन (नाहीये! आधीच सांगतो)
मी पण देवेन्द्र फडणवीस नाहीये! टोलविषयी चौकश्या करु नयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Fri, 01/23/2015 - 16:49 नवीन
ह्या ह्या ह्या .. हीच मिपड्यांची खासियत.. मुद्दा अल्लगद बाजूल ठेवायचा आणि उदाहरणावर काथ्या कुटायला सुरुवात करायची.. :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
सुबोध खरे Sat, 01/24/2015 - 04:39 नवीन
हाड्क्यासाहेब मला पण नंतर वाटले कि तो प्रतिसाद टाकायला नको होता. परंतु मिपावर स्व्सम्पादनाचा पर्याय नाही म्हणून मी शांत बसलो. नाहीतरी कोणी त्याकडे लक्ष दिलेले नाही तर खाजवून खरुज का काढा. असो आपल्याला ते लागले असेल तर मनापासून माफी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
स
सौंदाळा Wed, 01/21/2015 - 14:27 नवीन
दोन अफलातुन किस्से (सत्यघटनेवर आधारीत) एक जण (लग्न न झालेला) दुसर्‍या मित्राला सांगत होता, लग्न करताना बायको हडकुळी पाहीजे म्हणजे पहिले बाळंतपण झाले की बायकोची अंगकाठी एकदम सुंदर होते. नाहीतर सामान्यतः बायका जाड होतात बाळंतपणानंतर. या शहाण्यानेपण मित्राचे ऐकुन अशीच पाप्याचे पितर असलेली बायको केली. पहिल्या बाळंतपणानंतर बायकोची अ‍ॅनॅमिक कंडीशन झाली आणि तिला काही महिने अंथरुणावरुन उठणे पण अवघड झाले आणि नंतर तर ती अत्यंत रोगट दिसु लागली. भरपुर जिवन्सत्वे, टोनिक्स दिल्यावर परत लग्नाच्या वेळेसारखी हडकुळी झाली. आता दुसरा किस्सा गावाकडे २१ वर्षाच्या एकाने १४ वर्षाच्या मुलीशी लग्न केले. मुलगी दिसायला सुंदर मात्र दोघांच्या उंचीत ०.५/१ इंचाचाच फरक होता. लग्नानंतर १ वर्षात मुलगी नवर्‍यापेक्षा १ इंचाने उंच झाली.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 01/21/2015 - 18:20 नवीन
आमच्या मावसभावाला एक मुलगी दाखवायला आणली होती ती त्याच्या पेक्षा दुप्पट आडवी होती. तिला वाकून नमस्कार सुद्धा करता येत नव्हता. आणि वडील म्हणाले होइलहो लग्नानंतर "बारीक". अशी उदाहरणे फार कमीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
क
काळा पहाड Wed, 01/21/2015 - 14:33 नवीन
आणि ५००.. टाळ्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
आ
आदूबाळ Wed, 01/21/2015 - 16:01 नवीन
ह्या... हे ५००व्या प्रतिसादाचं ब्रूटफोर्सिंग झालं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ख
खेडूत Wed, 01/21/2015 - 14:34 नवीन
:) काथ्या कुटून कुटून काई निष्कर्ष निघेल तर शपथ! पण मुविन्चे हबीणन्दण.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 01/21/2015 - 15:43 नवीन
हा धागा निष्कर्षासाठी नाहीये...अनुभव शेयर करायला आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
प
प्रसाद गोडबोले Wed, 01/21/2015 - 14:35 नवीन
५००
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 01/21/2015 - 14:39 नवीन
*clapping* सर्व प्रतिसादकांचा पुस्प्गु्च देऊन सत्कार करण्यात येत आहे. ऐतिहासिक धाग्यासाठी मुविंचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 01/21/2015 - 14:54 नवीन
पूस्प्गुच हा शब्द आठवणीने लिहिल्याबद्दल तुमचाही डब्बल सत्कार. वरिजिनल पूस्प्गुच वाल्या बैंची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
प्रमोद देर्देकर Wed, 01/21/2015 - 15:01 नवीन
काथ्या कुटून कुटून एक निष्कर्श निघाला कि थवुन केलेले असो कि प्रेमविविवाह लग्न म्हणजे फक्त

अ‍ॅड्जस्ट्मेंट

अ‍ॅड्जस्ट्मेंट

अ‍ॅन्ड

अ‍ॅड्जस्ट्मेंट

  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Wed, 01/21/2015 - 15:49 नवीन
थवुन केलेले असो कि प्रेमविविवाह लग्न
"थवुन केलेले" :))) .. :))) .. :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
प
पैसा Wed, 01/21/2015 - 16:46 नवीन
मंद्या, आदुबाळ, क्लिंटन कोणतरी विश्लेषण करा रे! आणि मानाचे गणपती कोण ते सांगा जरा! बॅटमॅन, टवाळ कार्टा, हाडक्या, काळापहाड, आजानुकर्ण, डॉ. खरे यातले कोण कोण आहेत ते! एक गोष्ट लक्षात आली का भो? एक पियुषा सोडता लग्नाच्या मुलींनी आपली मतं मांडलेली दिसली नैत फारशी. कन्क्लुजन काय काढावं? ;) :-/
  • Log in or register to post comments
क
कोमल Wed, 01/21/2015 - 16:57 नवीन
तै मला माझ्या तिकडल्या धाग्याची आठवण आली जे तिकडे टाकले आहे तेच् पेस्टू का इकडे पण.. ;) कारण विचार अजुन तरी नैत बदललेले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 01/21/2015 - 17:00 नवीन
टाक की! करू म्हणे ६०० पार!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल
आ
आदूबाळ Wed, 01/21/2015 - 17:01 नवीन
पेस्टा पेस्टा. पुढच्या ५००ची चिंता आत्तापासूनच करायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल
ह
हाडक्या Wed, 01/21/2015 - 17:10 नवीन
पै तै.. बादवे, ही एक खरी गोष्ट की अनाहीता झाल्यामुळे मुलींना विरोधी मतांना तोंड न देता (तिकडे चित्र वेगळेही असेल कदाचित) या बद्दल बोलता येत असेल पण मुलांना मात्र अजूनही इथे उघड्यावरच यावे लागते. ;) जर मुलींनी पण इथे मते मांडली तर इतर लग्नाळू मुलांना कळेल ना ते कुठे चुकतायत किंवा दुसरी बाजू काय विचार करतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 01/21/2015 - 17:17 नवीन
अनाहिताचा काय संबंध नाही! स्पेशल तिथले विषय वेग़ळे असतात. मला वाटते, त्या इथे जो काय धुमशान काथ्या कुटला त्याची मजा बघतायत फांदीवर बसून! वाद घालण्यापेक्षा गप्प बसून माहिती घेणे जास्त हुषारीचे नाही का!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Wed, 01/21/2015 - 17:24 नवीन
वाद घालण्यापेक्षा गप्प बसून माहिती घेणे जास्त हुषारीचे नाही का!!
माहिती घेतायत की मज्जा घेतायत, त्यांनाच म्हैत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
स्रुजा गुरुवार, 01/22/2015 - 00:38 नवीन
अनाहीतान्तर्फे अजून एक हजेरी लावते चला . आम्ही मजा नाही घेतो आहोत . दोन चार गोष्टी सगळ्यांनाच माहिती आणि मान्य आहेत हे आपण धरून चालू : १. अनाहीतांतर्फ़े च आलेल्या काही कीस्स्यांवरून आणि प्रतिसादांवरून आपण हे मान्य करू की काही गोष्टी या सरसकट मंजूर अथवा नामंजूर आहेत : उदा: मुलीच्या (किंवा मुलाच्या ) आईने प्रमाणाबाहेर दोघांच्या संसारात चब ढब करणे . प्रमाणाबाहेर हा मुद्दा प्लीज ध्यानात घ्या. मुलीकडचे जर काही युक्तीच्या चार गोष्टी सांगत असतील अननुभवी वय म्हणून तर केवळ मुलीकडचे म्हणून सल्ले झिडकारू नये. लहान मुलांना वाढवताना आपण सतत त्यांना स्पून फीडिंग करत नाही अन्यथा त्यांची निर्णयक्षमता कधीच प्रगल्भ होणार नाही , त्यांना आत्मविश्वास येणार नाही वगैरे. नवीन लग्नाला सुद्धा हा मुद्दा लागू पडतो असं माझं मत आहे आणि काही प्रमाणात पालक आणि नवरा बायको यांनी तारतम्याने हे अंतर जोपासलं पाहिजे . एकदा मुलं झाली की मग दोघांच्या राज्यात आजी आजोबांना अनन्यसाधारण महत्त्व येतं , तसं ते यावं पण. आणि तो पर्यंत चा प्रवास जर साधारण गोडीने किंवा सुज्ञ पणे झाला असेल तर बाळाच्या अंगी लागतं आणि सुनेच्या पण ! त्यामुळे मुलीची आई आणि तिची चब ढब हा एक अत्यंत व्यक्तीसापेक्ष विषय आहे. पण blanket statement ज्याला म्हणतात ते साधारण सगळ्यांना मान्य व्हायला हरकत नाही. २. मुली पैसा घर वगैरे गोष्टींना जास्त महत्त्व देतात , मुलाच्या कर्तृत्वाकडे नाही बघत वगैरे संदर्भ सुद्धा पुन्हा पुन्हा आले आहेत . धागा सुरूच झाला साधारण त्या मुद्द्यावरून . अनेकींच्या आणि अनेकांच्या प्रतिसादांवरून पण मला वाटतं आत्ता पर्यंत हे पुराव्यानिशी शाबित झालंय की ही गोष्ट सरसकटिकरण करण्याजोगी नाहीये. ३. शिक्षण , वैचारिक पातळी साधारण जुळणे हा सुद्धा मुद्दा सगळ्यांना मान्य आहे त्यामुळे अजून त्यात काय बोलायचं ? मला सगळ्यात जास्त वेधक आणि वाद - क ( :P ) मुद्दे वाटले ते म्हणजे साधारण एक सूर आहे की मुलींच्या आणि त्यांच्या आई बाबांच्या अपेक्षा वाढल्यात आणि दुसरं म्हणजे पुरुष लग्न करताना sex चा विचार करतात , "at least" पुरुष असं कुणी तरी लिहिलंय . ज्या मुली स्वतः कमी शिकलेल्या आहेत पण अपेक्षा निवडणुकीत जेमतेम पास झालेल्या शिवसेनेच्या वरताण आहेत त्यांचा आणि कुठे तरी एक किस्सा वाचला की MSCIT करून मास्टर्स केलंय सांगतात वगैरे त्याचे किस्से आपण सोडून देऊ . कारण ते वागणं मुळात च चुकीचं आहे . प्रतारणा मग ती किती ही छोटी आणि सकृतदर्शनी निरुपद्रवी (खोटे दात वाला किस्सा ) वाटली तरी प्रतारणाच . पूर्वीच्या काळी शेजारणीने केलेले अभ्रे पहिल्या मुली च्या लग्नात तिने केलेत पासून ते सातवीच्या लग्नात पण सातवीने च केलेत सांगणे या मागची मानसिकता आणि वरच्या गोष्टीं मधली मानसिकता यात फार फरक नाही . आज च्या काळात पण अशा गोष्टींवरून न्यूनगंड आणि तो लपवण्यासाठी अशी सारवासारव का असावी , असावी का नसावी हा एक वेगळा विषय होईल . अशाच प्रकारचे मुलांचे किस्से ही आहेत ते पण यावर काडीच टाकायची असेल तर सांगत बसता येईल . पण आपण एक साधारण एकमेकांना जमणारं शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी या सगळ्याचा विचार करून एकमेकांना भेटणारी मुलं मुली विचारात घेऊ . साधारण भारतातली गेल्या २-३ दशकांमधली वाढत्या वेगाने अगोदर च बदललेली म्हणजे सुधारलेली आर्थिक स्थिती किंवा बदलण्याची भरपूर शक्यता असलेली कुटुंबं बघता आर्थिकदृष्ट्या स्थिर असणं हा आज काल आटोक्याबाहेरचा प्रकार राहिलेला नाहीये . ज्या कुटुंबांची आर्थिक स्थिती आत्ता अपवादात्मक चांगली नाहीये , किंवा फार चांगली नाहीये ते सुद्धा मुलींना किंवा मुलांना शिकवतात , गरज पडली तर कर्ज काढतात पण मागच्या पिढी पेक्षा दोन पावलं पुढे जाण्याची क्षमता यावी या करता सगळ्यांचे प्रयत्न असतात च . मुद्दा हा आहे की शिक्षण आई वडिलांनी करून दिलं आहे , आई वडिलांची जबाबदारी नाहीये पण तरी सुद्धा म्हणावं तितकं स्थैर्य नाही . आत्ता जे २८-३५ वर्षांचे आहेत ते सगळे कदाचित हे मान्य करतील की आपल्या आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांचे निम्मे संसार केले गरज पडली तेंव्हा आणि आपला संसार सांभाळला . त्या मानाने आज च्या आमच्या पिढीवर काहीच जबाबदाऱ्या नाहीत . असं असताना आणि आज काल व्यवहार चातुर्य दाखवलं तर गाठीशी थोडा फार पैसा बाळगून असणं हे फारसं कठीण नसताना सुद्धा जर एखादा मुलगा २८-२९ व्या वर्षी पुरेसं स्थैर्य बाळगून नसेल तर तो एक प्रसाद १९७१ म्हणतात तसा "दिसणारा " भाग म्हणून दखलपात्र का असू नये ? आता पुरेसं शब्दाची व्याख्या कुणाची काय आणि कुणाची काय . पण ती व्याख्या असणार च . माझं लग्न झालं तेंव्हा नवऱ्याचा घरात पगार यायचा १८ हजार , माझी नोकरीच नव्हती कारण नुकतंच BE झालं होतं . माझं वय होतं २२ आणि नवर्याचं २४ . आता जर कुणी माझ्याच एखाद्या चुलत , मावस बहिणीला ज्या २८ वर्षांच्या आहेत त्यांना म्हणलं की १८ हजार वाल्या माणसाशी लग्न कर तर कसं चालेल ? त्या बघतात तो मुलगा किमान २९-३० , तो या वयात जर १८हजार कमवत असेल तर अवघड आहे .आता यात त्यांचं आणि माझं सारखं शिक्षण आणि त्या बघत असलेल्या मुलांचं पण तेवढं शिक्षण गृहीत धरलेलं आहे . प्रत्येकाचं वय , प्रत्येकाची लग्नाच्या वेळेची स्थिती या वरून ही व्याख्या ठरते . ते लक्षात घ्यायलाच हवं . माझा प्रेमविवाह आणि त्यांचा अरेंज याचा तसा अर्था अर्थी काही संबंध नाही . मी २८ व्या वर्षी लग्न केलं असतं याच नवऱ्याशी तर पगार अर्थात च १८ हजाराच्या किती तरी पटीने जास्त असणार होता . म्हणजे मी त्याचा पगार तेवढा मोठा होई पर्यंत लग्न केलं नाही असा ही अर्थ एखाद्याने काढला असता . आत्ता पर्यंत आलेल्या सगळ्या मुलींच्या आणि ज्यांचा प्रेमविवाह किंवा दाखवून विवाह , पण सुखी समाधानी लग्न आहे अशा प्रतिसादांमध्ये मला एक च समान सूत्र दिसतंय : आत्ता आर्थिक स्थिती २ लाख घरात आणण्याची नाहीये पण ती क्षमता निर्विवाद आहे , या न त्या निमित्ताने ते विश्वासार्ह पद्धतीने समोर आलेली आहे आणि बायकोने ती जाणते पणाने ओळखून लग्न केलेलं आहे . पगार हा फक्त एक उदाहरणार्थ घेतलेला घटक आहे . यात सगळंच येतं , मधुरा किंवा पिरा म्हणाल्या तसं शिक्षणाची पात्रता येणार आहे अथवा त्यात कमी जास्त असलं तरी अहंकार मध्ये येणार नाही याची शक्यता प्रत्येकीला मनापासून अपील झालेली आहे . आता हे अपील होण्यासाठी मुलांनी आपले अहंकार बाजूला ठेवायला हवेत आणि मुलींनी पण डोळसपणा दाखवायला हवा . असा मुलगा किंवा अशी मुलगी मिळेपर्यंत थांबायची तयारी पण हवी . आपल्या समाजात अनेकदा आपलं वैवाहिक आयुष्य कसं असायला हवं , जोडीदार कसा हवा याबद्दल वैचारिक गोन्धळ दिसतो . म्हणजे इडली डोसा करणारी बायको हवी तर मग स्वैपाकीण ठेव असं म्हणणं पण अयोग्यच आहे कारण एखाद्याला बायकोच्या हाताला चव असावी , मुलांना घरचं प्रेमाने वाढलेलं अन्न मिळावं, सहचारिणी सुगरण असावी असं वाटणं यात काही चूक नाही पण त्या साठी तिने नोकरी न केलेलीच बरी किंवा जास्त शिकलेली नको बाबा मग फार डोकं चालतं असं म्हणलं की आला वैचारिक गोंधळ . न झालेल्या मुलांच्या जेवण खाण्यासाठी आत्ता होणाऱ्या बायकोचे पंख छाटायची थोडीशी पुरुषी (:P) मानसिकता आहे ही . आणि ही बऱ्याचदा घरच्यांच्या दबावातून येते , नको ती उदाहरणं नको त्या दृष्टीकोनातून बघण्याने येते, पर्यायाने स्वतःचे असे स्वतंत्र विचार नसल्याने येते . अशांना एखादी कमी शिकलेली मुलगी सुद्धा नको म्हणत असेल तर मी तिचं समर्थन च करेल . शिक्षणाने बऱ्याच गोष्टी सोप्या होत असल्या तरी माणसाची ओळख बनते त्याच्या कामावरून . कमी शिकलेल्या पण एखादी कला हातात असलेल्या किंवा केवळ स्वैपाकाच्या जोरावर कुटुंबांना कठीण परिस्थितीतून बाहेर काढणाऱ्या स्त्रिया आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतात . कळीचा मुद्दा आहे तो लग्न झालं म्हणून जोडीदारावर किती जोर गाजवता येतो या ज्याच्या त्याच्या मताबद्दल , एखादीने आपली ओळख बनवण्याच्या शक्यतेवर च घाला घालणाऱ्या मानसिकतेबद्दल . sex या विषयाबद्दल पण तेच , नैसर्गिक गरज मुलांची आणि मुलींची वेगळी कशी ? अपेक्षा पण वेगळी कशी असणार ? आता तो अनुभव एकमेकांबरोबर घेतल्याशिवाय आणि अनेकदा घेतल्याशिवाय परस्परपूरक आहेत का हे समजणं अवघड आहे पण मुलाचं टक्कल जर एखादी साठी टर्न ऑफ असेल तर त्यांचा अनुभव सुंदर बनण्याची शक्यता किती तरी पटीने कमी होते . अशा वेळी मुलीने टकलावरून नाकारलं एव्हड्या चांगल्या मुलाला असं म्हणणं एकांगी ठरू शकतं . वैवाहिक जीवनाचा पाया जर शारीरिक नातं असेल तर त्याला कमी का लेखायचं ? मुलींच्या अशा अपेक्षा असतात आणि त्या रेटण्या इतक्या किंवा त्यावरून एखादा मुलगा नाकारण्या इतक्या आता त्या धाडसी झाल्या आहेत हे चांगलंच आहे न? घरच्यांच्या दबावाला किंवा असं कसं नाही म्हणायचं म्हणून एखादीने केलं लग्न आणि नाही ती समरस होऊ शकली तर आयुष्यभर दोघं नाखूष . त्यापेक्षा हे बर नाही का ? मुली आता बोलून दाखवतात आणि त्यांच्या अपेक्षा वाढल्यात असं म्हणण्यापेक्षा जी मुलगी अशा वातावरणात वाढून सुद्धा तुमच्याशी लग्न करायला तयार असेल ती अगदी मनापासून तयार आहे यात दिलासा नाही का वाटत ? किंबहुना तो तसा वाटण्याइतकं प्रगल्भ आता मुलांनी आणि समाजानी पण व्हायला हवं . पैसा, शिक्षण, रूप, मालकीचं घर , परदेशी प्रवास किंवा तिथेच राहणं या सगळ्यांना अत्यंत अनाठायी महत्त्व आलंय कारण अनेकांना त्यांच्या सहजीवनात काय हवंय हेच नक्की माहिती नसतं .निदान आजू बाजूच्या तथाकथित सुखी संसारांमध्ये जे काही आहे ते एकत्रितरीत्या मला मिळावं असा एक सर्वसाधारण भाव दिसतो अनेकदा . हे माहिती नसणं हा आपल्या कौटुंबिक संस्थेचं माझ्या मते अपयश किंवा मर्यादा अथवा दोन्ही आहे . जो पर्यंत हे नीट काळात नाही की जोडीदार कसा हवा आणि तो तसा का हवा आणि तो मिळेपर्यंत थांबण्याची तयारी येत नाही आणि समाज तशी परवानगी देत नाही तो पर्यंत लग्न जमून सुद्धा तो जुगार राहण्याचीच शक्यता जास्त . सगळ्यांनीच काही प्रेमविवाह करण्याची गरज नाही आणि शक्यता पण नाही . खरं सांगायचं तर दाखवून लग्न करतात त्यामुळे एक मानसिक स्थैर्य आपल्याकडे वयाच्या विशीत येतं बऱ्यापैकी. त्यामुळे अरेंज म्यारेज मोडीत काढण्याच्या मताची मी तरी नाही . पण त्या मुला मुलीना मात्र श्वास घ्यायला मिळावा आणि त्यांच्या छोट्या मोठ्या अपेक्षा बोलून दाखवल्या म्हणून त्यांना ओशाळं करू नये , त्या इच्छा आकांक्षांचा मान ठेवावा सगळ्यांनीच असं वाटतं . फार मोठा झाला प्रतिसाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ए
एस गुरुवार, 01/22/2015 - 03:28 नवीन
या पंचशतकी धाग्यावरचा एकमेव वाचनीय प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 07:33 नवीन
अगदी असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
आ
आनन्दिता गुरुवार, 01/22/2015 - 04:15 नवीन
अतिशय सुंदर प्रतिसाद स्रुजा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
न
नाखु गुरुवार, 01/22/2015 - 04:28 नवीन
खरा "हत्ती" तुम्ही शोधला आणि आम्हाला दाखवला.सुरेख विवेचन. बाकी सगळे "सोंड","पाय" "शेपूट" इथेच अडकून पडले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 01/22/2015 - 04:45 नवीन
विचारात पाडणारे विचार मांडले आहेत स्रुजा यांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
पैसा गुरुवार, 01/22/2015 - 04:40 नवीन
स्टँडिंग ओव्हेशन तुला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 01/22/2015 - 04:56 नवीन
+१११११११११ तेच म्हणतो पैसातै. फक्त सुजाताईंचा एकमेव समतोल प्रतिसाद. आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अजया गुरुवार, 01/22/2015 - 04:42 नवीन
सुरेख प्रतिसाद स्रुजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
आ
आरोही गुरुवार, 01/22/2015 - 07:33 नवीन
असेच म्हणते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/22/2015 - 05:36 नवीन
नावाप्रमाणेच "सुजा"ण प्रतिसाद....आवडेश :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
स
सविता००१ गुरुवार, 01/22/2015 - 05:39 नवीन
अतिशय सुंदर, संयत भाषेत लिहिलेला, नेमका प्रतिसाद. अत्यंत आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/22/2015 - 06:05 नवीन
मस्त प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
म
मृत्युन्जय गुरुवार, 01/22/2015 - 06:06 नवीन
सुरेख प्रतिसाद. चला हा धागा १००० कडे नेउयात. नाहितर व्यनिमनि वरुन त्याची सोय झाली असणारच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/22/2015 - 07:40 नवीन
बर्‍याच महत्वाच्या गोष्टींचा समतोल आढावा घेणारा उत्तम प्रतिसाद ! *good*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
इ
इशा१२३ गुरुवार, 01/22/2015 - 08:27 नवीन
स्रुजा मस्त प्रतिसाद.अगदि नेमके लिहिले आहेस.अत्यंत वाचनिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
स
सूड गुरुवार, 01/22/2015 - 10:08 नवीन
>>असं कसं नाही म्हणायचं म्हणून एखादीने केलं लग्न आणि नाही ती समरस होऊ शकली तर आयुष्यभर दोघं नाखूष . त्यापेक्षा हे बर नाही का ?
हे मात्र खरं!! काही वेळा बायका हे असलं मनात साठवून ठेवतात आणि ज्या वेळी बोलून दाखवतात त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. ऐकणार्‍याच्या मनात मात्र कायमचं उरतं ते. संतुलित प्रतिसाद हेवेसांनल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
म
मधुरा देशपांडे गुरुवार, 01/22/2015 - 10:28 नवीन
खूप आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
  • «
  • ‹
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा