Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि
Wed, 01/14/2015 - 22:54
🗣 1423 प्रतिसाद
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)
प
प्यारे१ Fri, 10/09/2015 - 14:07 नवीन
1. अभिषेक बच्चन गृहकृत्यदक्ष आहे 2. सनी लियोनी मनमिळाऊ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 10/09/2015 - 14:09 नवीन
तुम्हाला अल्जिरियात राहुन हे कसं माहिती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Fri, 10/09/2015 - 14:12 नवीन
ही माहिती माली,सोमालिया,गाम्बिया नाहीतर युगांडा मध्ये असतो तरी समजली असती रे! अल्जीरिया फिर भी 'कनेक्टेड' है. नाखूनकाका- बघितलं ना श्याम चं निर्मल मन! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
न
नाखु Sat, 10/10/2015 - 09:29 नवीन
दोस्ताना सिनेमा पाहिल्यापासून असे वागू लागलाय का? दोस्ताना अर्थात दुसरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 16:44 नवीन
खि खि खि...कस्स क्काय जमतं बुआ असे लिहायला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
न
निताकाळे Fri, 10/09/2015 - 14:02 नवीन
hi all maja ghari aai vadil n don bhau ahet. aane amhala lahan panapasun khup chan sambhaly pn kahi karnamule tila karj kadhnyachi vel ali, ani ami lahan aslyamule karj khup khup vadht gel. so maji jababdari mhnun me kahi karj swatacha navar kadhun te ardh karj mitval. pn ata ashi sthithi jhali ahe ki maj vay 25 ahe ani mala mulga shodhtyt tr sarvch jan mala nakart ahet karn maji aat ahe ki me lagnantr pan he maja navavr kadhlel karj pay karnar maja salary tun tr te tya lokana many ch nahi. ani maji tr kahich apeksha nahi mulakadun me kontyahi paristhit adjust karyla tayr ahe,pn sarvch jan mala nakartyt . mala ek kalt nahi jar me mulga aste tr te kartvy mala karavch lagl astna . hech me mulgi ahe mhnun kartey tr kay chukl ka maj? mg he ka nahi samjat lokana... ata hya bdal aapl kay mat ahe te mala kalva ki mulancha nkki apeksha kay ahe.. mulichi nokri n tichi salary aivdi mahtvachi aste ka........
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 10/09/2015 - 14:25 नवीन
तू जे केलंस त्यासाठी तुला भरपूर शाबासकी. अगदी बरोबर केलंस. मुलीवर पण तिच्या आईवडिलांची जबाबदारी असते हे समजून घेऊन केवळ तुझ्याकडे पाहून लग्न करणारा कोणीतरी भेटेल. कर्ज काय ५/७ वर्षात फिटून जाईल. निराश होऊ नको. तोपर्यंत मानवी स्वभाव तुला छान समजेल. मनापासून शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निताकाळे
न
निताकाळे Fri, 10/09/2015 - 14:32 नवीन
thanku so much
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जेपी Fri, 10/09/2015 - 14:32 नवीन
पैसाताय बरोबर सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अजया Fri, 10/09/2015 - 16:06 नवीन
नीता,तुला हे सर्व समजून घेणारा ,त्यात साथ देणारा नक्की भेटेल.तो खरा जोडीदार असेल.खूप खूप शुभेच्छा तुला. बाकी टवाळ लोक्स या धाग्यावर बर्याच दिवसानी दंगाकर्ते झाले! म्हणजे अजून स्टेटस शिंगलच दिस्तंय! अपेक्षा वाढल्या का कमी झाल्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 16:41 नवीन
बाकी सोडा ओ, तूर्तास या धाग्याकडून आमच्या अपेक्षा आहेत बर्‍याच. नक्की किती प्रतिसाद झेलू शकतो ते पहाञचे आहे. एक कमेंट टाकू बे दोन कमेंट टाकू दोन कमेंट टाकू बे तीन कमेंट टाकू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 10/17/2015 - 06:50 नवीन
स्ट्रेस टेस्ट इनिशिएटिंग. लोडिंग एक्प्लोजीव्ज. प्लांटिंग डिटोनेटर. चेकिंग कनेक्शन्स. रिचिंग सेफ डिस्टन्स. ट्रिगर सेट. फायर इन होल!!! काsssSssबुsssSSsम!!! -मुलींच्या अवास्त्व वाढत्या अपेक्षांमुळे हल्ली अविवाहितांचे प्रमाण वाढत चाललं आहे का तसेच तरुणांची "कु"चंबणा होते आहे का?- (मेल्या खातय्स मार आता कॅप्टना. शीडात वारा भर आणि फुट) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Sat, 10/17/2015 - 06:54 नवीन
फक्त तरुणांचीच कुचंबणा होते? तरुणींचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 10/17/2015 - 07:13 नवीन
अरे सोन्या. तुला काडी टाकणेचा वेगळा अर्थ सांगायला हवा का रे? अच्रट बाव्ल्ट मेला. मुलींच्या वाढत्या अपेक्षांनी तरुंणींची होणारी कुचंबणा हा १०००० करतानाचा विषय आहे काय समजलास. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sat, 10/17/2015 - 07:52 नवीन
खि खि खि १४०१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 16:44 नवीन
आम्च्या अपेक्षा है त्याच हैत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
श
श्रीरंग_जोशी Fri, 10/09/2015 - 16:42 नवीन
निता - तुम्ही जे केलय व करताय ते एकदम योग्य आहे. तुम्हाला या कामात पाठिंबा देणारा अनुरुप जोडीदार मिळो ही शुभेच्छा!! आर्थिक अडचणी या तात्पुरत्या असतात. संपूर्ण आयुष्याचा विचार केला असता त्या आर्थिक अडचणींच्या रकमा खूप क्षुल्लक असतात. दुर्दैवाने बर्‍याच लोकांकडे तेवढी दूरदृष्टी नसते अन त्या अडचणींचा परिणाम नातेसंबंधावर होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 16:44 नवीन
ओ नितातै....अस्ल्या मुलांना फाट्यावर मारायचे....मुलाचे असे विचार सुरवातीच्या बोलण्यातूनच समजत अस्तील तर ते चांग्लेच समजा...लग्नानंतर समजले तर कैच्याकै पस्तावाल
ani maji tr kahich apeksha nahi mulakadun me kontyahi paristhit adjust karyla tayr ahe,pn sarvch jan mala nakartyt
"मुलीच्या काहिच अपेक्षा नाहित" असे काही नस्ते हो....जोपर्यंत समोरचा हळू हळू बोलण्यातून अपेक्षा आहेत की नाहीत त्याचा अंदाज घ्यायला लागतो तेव्हा मुलींना त्यांच्या अपेक्षा सापडत जातात (आधीच माहित नसतील तर) आणि तुम्च्या नस्ल्या तरी तुम्च्या घरच्यांच्या अपेक्षा या तुम्च्याच नावावर खपवल्या जाणार....त्या अपेक्षांना नाकारण्याची धमक तुम्च्यात आहे का?....मी म्हणतो असावी...मुख्य प्रॉब्लेम मुलांमध्ये नाही तर "तुम्च्या समोर कोणती मुले यावीत" हे ठरवणार्या सेलेक्शन प्रोसेसचा आहे... पटले तर विचार करा....नैतर सोडून द्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निताकाळे
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 17:01 नवीन
खरे तर हा प्रॉब्लेम असू नये. तुमचे म्हणणे बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निताकाळे
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 17:03 नवीन
चायला आप्ले हे प्रतिसाद अनाहितांना दिसू नये असे काही सेटिंग करून ठेवले आहे कै मिपावर? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
स्रुजा Fri, 10/09/2015 - 17:11 नवीन
सगळीकडे अनाहिता ! मोगल सैन्य झालंय का तुझं? ( :प झाले इथेच २-४ हजार ) हे प्रतिसाद दिसतायेत आणि अर्थात च सहमती आहे पण निता ताईंची समस्या खुप ठळक पणे चूक बरोबर वेगळे करुन दाखवते ( ब्लॅक अँड व्हाईट) . मतमतांतरं तेंव्हा जास्त येतात तेंव्हा ग्रे एरीआ असतो. जसं आता जे पी ने लिहीलंय. खरंच पहिल्या मुद्द्यात काय चूक आहे? मुलं नाही का सांगत "माझी फिरतीची नोकरी आहे", "आज ना उद्या मी अमेरिकेत जाणार च", "मी आताच अमेरिकेत आहे" वगैरे? मुद्दा हा असतो की एक पार्टनर खुप बिझी असेल तर दुसार्‍याला जादा भार उचलावा लागतो ते सगळं जमेल का? दोघांचं करीअर हे सपोर्ट सिस्टीम असल्याशिवाय होत नाही तशी ती मिळेल ना हे समजुन घ्यायला मुलीने सांगितलं की मी महत्वाकांक्षी आहे तर काय बिघडलं? कुणाला नको असेल ती मुलगी तर आवडीचा , रीलेटिविटीचा, सबजेक्टिविटीचा भाग आला. त्यामुळे यात काळं पांढरं काही नाही. म्हणुन मतं भिन्न पडतात आणि ती ज्या पद्धतीने मांडली जातात त्यामुळे बहुतांश वेळा वाद सुरु होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 17:19 नवीन
सगळीकडे अनाहिता !
अनाहिता तो मिपाकी जान है...अनाहितांशिवाय मिपा हे मिपा राहील काय :)
मोगल सैन्य झालंय का तुझं?
खि खि खि....आता दरेकर पण हजेरी लावून जातील =))
मतमतांतरं तेंव्हा जास्त येतात तेंव्हा ग्रे एरीआ असतो. जसं आता जे पी ने लिहीलंय. खरंच पहिल्या मुद्द्यात काय चूक आहे? मुलं नाही का सांगत "माझी फिरतीची नोकरी आहे", "आज ना उद्या मी अमेरिकेत जाणार च", "मी आताच अमेरिकेत आहे" वगैरे? मुद्दा हा असतो की एक पार्टनर खुप बिझी असेल तर दुसार्‍याला जादा भार उचलावा लागतो ते सगळं जमेल का? दोघांचं करीअर हे सपोर्ट सिस्टीम असल्याशिवाय होत नाही तशी ती मिळेल ना हे समजुन घ्यायला मुलीने सांगितलं की मी महत्वाकांक्षी आहे तर काय बिघडलं? कुणाला नको असेल ती मुलगी तर आवडीचा , रीलेटिविटीचा, सबजेक्टिविटीचा भाग आला. त्यामुळे यात काळं पांढरं काही नाही. म्हणुन मतं भिन्न पडतात आणि ती ज्या पद्धतीने मांडली जातात त्यामुळे बहुतांश वेळा वाद सुरु होतात.
एकदम सहमत....चायला या गोष्टी लग्न ठरवताना का नाही डिस्कस करत....घरातल्या बाकीच्यांना नसेल समजत पण ज्यांना लग्न करायचे आहे त्यांना नको समजायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 17:12 नवीन
ते सेटिंग त्यांच्या डोक्यातच असावे बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 17:16 नवीन
यावर एक खंग्री प्रतिसाद द्यायला हात शिवशिवत आहेत....आख्खे आग्यामोहोळ येईल धावून माझ्यावर =)) बहुत काय लिहिणें...तुम्ही शहाणे आहात...समजोनी घेणें ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
स्रुजा Fri, 10/09/2015 - 17:19 नवीन
खिक ! मी मुद्दाम च खोडी काढली होती. सम्जोन घेतलं आहे कल्जी क्रु नये ;) तू हो पुढे, मी आहेच खुसपटं काढायला. पाच हजार करायचे आहेत ना? मग झालं तर .. खंग्री बिंग्री च्या मोहात न पडता एक एक प्रतिसाद देत राहायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 17:28 नवीन
Image removed. बाकी तो प्रतिसाद जर्रा जास्तच खंग्री झाला अस्ता (हिंट - "** अस्ते???") मला लाडोबा म्हणतात ना...मग मी अस्से कस्से वैट ल्हिन :) खि खि खि....विकांत आहे ना....सत्कारणी लागेल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 10/09/2015 - 17:20 नवीन
ते जौ दे. तु आशा परेरा बरोबर ब्लाईंड डेट ला गेलेलास त्याचं काय झालं ते सांग की टक्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 17:30 नवीन
तिची आदल्या रात्रीची उतरली नव्हती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 10/09/2015 - 17:35 नवीन
असं एका वाक्यात नाही कटवायचं. =)) नीट डिट्टेल्वारीने लिहायचं. अगदी मी हापिसातुन निघालो आणि अमुक तमुक रेस्तॉरामधे वाट बघत बसलो इथपासुन ते तु जीव वाचवुन पळेपर्यंतचं सगळ डिटेलात लिही रे. हौ कॅन वी हेल्प इफ वी आर ब्लाईंड टु डिटेल्स?????????!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सूड Fri, 10/09/2015 - 17:45 नवीन
अगदी!! इथे लाल रंगाचा डबा तुझ्या हातात देतायेत लोक आणि तू सदाशिवपेठेत पत्ता विचारायला सांगितल्यासारखा आढेवेढे घेतोयेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 17:49 नवीन
हे बघ रच्याकने तो लाल डब्याच्या गोडावूनचा मालक आजकाल "हि & हि" प्रतिसाद टंकायला येत नै ते? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 10/09/2015 - 17:53 नवीन
ओके, हल्ली मेमे होतायेत तर तुला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 17:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 10/09/2015 - 18:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 17:24 नवीन
खी खी खी, ख्यॅ ख्यॅ ख्यॅ =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ए
एस Fri, 10/09/2015 - 20:52 नवीन
नीताताई, प्रथम तुमचे कौतुक. स्वतःच्या आईवडिलांच्या कष्टांची जाणीव तुम्हांला आहे आणि स्वतःहून तुम्ही त्यात तुमचा वाटा उचलला आहे हे पाहून 'मुलगा म्हणजेच वंशाचा दिवा'छाप लोकांच्या डोळ्यांवरची पट्टी उतरेल असे वाटते. वर इतरांनीही सांगितल्याप्रमाणे तुमच्या दृष्टिकोनाचा आदर करणारा तुम्हांला अनुरूप असा मुलगा तुम्हांला नक्की भेटेल. जगरहाटीत असे नकारात्मक, धक्कादायक अनुभव नेहमीच येतील असे नाही. काही माणसे समजूतदार असतातही. आपण माणसांमधलं सोनं वेचावं. मातीच्या ढिगार्‍यांकडे लक्ष देऊ नये. तुम्ही उत्तमरित्या तुमचं करिअर घडवा. कर्जेतर फेडालच, आर्थिक स्थैर्यही मिळवाल असा विश्वास वाटतो. मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निताकाळे
न
नाखु Sat, 10/10/2015 - 05:46 नवीन
आणि मनःपूर्वक शुभेच्छा! नक्कीच समजावून घेणारा जोडीदार मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
न
नाखु Sat, 10/10/2015 - 09:26 नवीन
या विषयावरचे दळण फार पूर्वी मिपावर दळले आहे धागा बाराचा त्यात ही आजचे काही कलाकार आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ट
टवाळ कार्टा Sat, 10/10/2015 - 10:23 नवीन
दळणारे णवीन आहेत हो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्यारे१ Fri, 10/09/2015 - 14:04 नवीन
गविकाकांच्या सल्ल्याच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 10/09/2015 - 14:28 नवीन
सीख हम बितें युगौंसे, नये युग का करे स्वागत, करे स्वागत, करे स्वागत, करे स्वागतSSSSS... पुंऊऊऊऊऊS..S..S..S
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव Fri, 10/09/2015 - 14:33 नवीन
करे स्वागत, करे स्वागत, जबरदस्त. एकदम काळजाला भिडणारं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Fri, 10/09/2015 - 16:30 नवीन
वधुच्या अपेक्षा- 1) मला करियर करायचे आहे.माझ्या महत्वकांक्षा आहेत. 2)जेष्ठ नागरिक चालणार नाहीत. 3) आपण मित्रांसारखे राहु. --- माझे उत्तर- ताई राखी बांधायला ये पुढच्या वर्षी...
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Fri, 10/09/2015 - 16:34 नवीन
यातल्या पहिल्या आणि तिसर्‍या मुद्द्यात काय प्रॉब्लेम आहे? २ रा मुद्दा समजु शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
प
प्यारे१ Fri, 10/09/2015 - 16:37 नवीन
यातल्या पहिल्या मुद्द्यात काय प्रॉब्लेम आहे? तिसरा मुद्दा समजू शकतो. मित्रांसारखे राहू मधे मित्राचं सगळं वापरणं गृहीत असतं. सकाळची टूथपेस्ट ते रात्रीची मच्छरदाणी काहीही! आणि परतफेड शून्य. पर्वडत नाय! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 16:49 नवीन
बायको आणि मित्रात फरक अस्तो रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Fri, 10/09/2015 - 16:57 नवीन
हे मुलग्यांना कळतं रे पण.... (पुढचं समजून घे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 17:01 नवीन
लग्न नै...लि.इ. पण नै त्यामुळे आप्ला पास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Fri, 10/09/2015 - 17:09 नवीन
अरे जेप्याला पोरगी आपण लग्न 'करुन' मित्रांसारखे राहू म्हणतेय. कसं पर्वडेल ब्रं डील? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 17:11 नवीन
मला अजूनही काय प्रॉब्लेम आहे यात ते समजलेले नै...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
  • «
  • ‹
  • 21
  • 22
  • 23
  • 24
  • 25
  • 26
  • 27
  • 28
  • 29
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा