Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

याकुब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने

व
विद्यार्थी
Sat, 07/25/2015 - 16:49
🗣 277 प्रतिसाद
१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेमनचे फाशी वाचवण्याचे सर्व पर्याय संपत आल्यामुळे त्याला लवकरच फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली. फाशी प्रकरणाचा गाजावाजा होणे ही आजकालचीच गोष्ट वाटते कारण भारतात स्वातंत्र्यापासून अनेक लोकांना फाशीची शिक्षा झाली आहे परंतु त्याची एवढ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे आठवत नाही. समाजातील काही उदार मतवादी लोकांना अतिरेकी, नक्षलवादि, अट्टल गुन्हेगार यांच्या मानवाधिकाराच्या चर्चा करून आणि त्यांच्याबद्दल समाजात नाहक सहानुभूती निर्माण करण्याची घाणेरडी सवय लागली आहे. आणि असे करून ते स्वतःची दुकाने चालवत असतात. फाशी झालेल्या गुन्हेगाराची जात, धर्म याबद्दल वक्तव्ये करून राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रकार तर फारच घृणास्पद आहेत. बॉम्बस्फोटामध्ये मारले गेलेले सर्व भारतीय नागरिक होते. त्यांची जात किंवा धर्म पाहून त्यांना मारले नव्हते तर मग फाशी झालेल्या या अतिरेक्याच्या धर्माची चर्चा का? भारतात फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा असावी किंवा नाही यावर वेगळी चर्चा होऊ शकते पण याकुब मेमनने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी केलेली मदत आणि या स्फोटांमध्ये २५७ निष्पाप लोकांचे गेलेले बळी, हे भारतीय कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत. याशिवाय याकुब मेमनला कायद्यानुसार स्वतःला वाचवण्याचे मिळणारे सारे पर्याय मिळाले आणि त्याने ते वापरालेसुद्धा. गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?

प्रतिक्रिया द्या
50188 वाचन

💬 प्रतिसाद (277)
श
श्रीरंग_जोशी Sat, 07/25/2015 - 17:00 नवीन
लेखाच्या आशयाशी सहमत. तुम्ही दिलेल्या यादीत आंतरजालावरून कॉन्स्पिरसी थेअर्‍या* पसरवणारे व दहशतवादाशी संबंधीत खटले विक्रमी* वेळात संपूनही उशिर झाला असे रडगाणे~ गाणारे यांनाही जोडायला हवे. * कसाबला फाशी झाल्यावर अतिउत्साही लोक १० प्रश्न फॉरवर्ड करत होते ज्यापैकी बहुतांश प्रश्नांची उत्तरे कॉमन सेन्सनेही मिळवता येत होती. ~ २६/११ अतिरेकी हल्ल्यांचा आव्हानात्मक व आकारमानाने खूप मोठा असणारा खटला कुठल्याही तडजोडीशिवाय विक्रमी वेळात पूर्ण झाला होता. या गोष्टीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही कौतुक झाले होते. तरी देखील 'किती तो उशिर' असे रडगाणे गाणारे मिपावरही पाहिले आहेत.
D
dadadarekar Sat, 07/25/2015 - 17:33 नवीन
याच गुन्ह्यात एक षिनिमावाला होता ना ? तो किरकोळ सजा भोगतोय. का ? शेंदरी षेनेच्या आश्रयात गेला म्हणून ?
म
माहितगार Sat, 07/25/2015 - 19:31 नवीन
कायदेशीर दृष्ट्या आपले विधान अपूर्ण माहितीवर तर नाही ना ? न्यायालयांचा निर्णय कोणत्याही रंगाने बाधीत होणारा नसतो तर स्वतंत्र असतो आणि स्वतंत्र राहीला आहे. निष्पक्ष न्याययंत्रणेची कदाचित नकळत नाहक बदनामी होत नाही आहे याची खात्री करून घेतलेली बरे असेल असे वाटते.
↩ प्रतिसाद: dadadarekar
व
विनोद१८ Sat, 07/25/2015 - 20:48 नवीन
...... डोक्यावरुन गेला असेल, जरा त्याची फोड करून लिहा म्हणजे कदाचित समजेल त्याला.
↩ प्रतिसाद: माहितगार
न
निनाद मुक्काम … Sun, 07/26/2015 - 21:53 नवीन
साहेबांनी वृत्त पत्रात मुलाखत देऊन स्पष्ट सांगितले होते. कसा सोडवला ते नाहीतर टाडा च्या अन्वये जामीन नाही जन्मभर तुरुंगवास हेच वास्तव असते
↩ प्रतिसाद: विनोद१८
च
चिनार Mon, 07/27/2015 - 06:59 नवीन
पण त्या शिनेमावाल्याचे वडील हाताचा पंजा दाखवायचे बा सतत..त्याविषयी काही माहिती असेल तर सांगा दादा तुम्ही.. माहिती नसेल तर आज राहुलच्या आईच्या साड्या इस्त्री करायला जाल तेंव्हा विचारून घ्या हो ..
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Mon, 07/27/2015 - 08:17 नवीन
तो निर्दोष आहे , त्याला मुक्त करा असा आदेश वाघोबाने दिला होता ना ? तेंव्हा कोर्टाची चौकशीही झाली नव्हती ! आणि आता याकूबची बाजु कुणीतरी घेतली तर ते तेवढे देशद्रोही झाले काय ?
↩ प्रतिसाद: चिनार
ख
खटपट्या Mon, 07/27/2015 - 10:43 नवीन
शिनेमावाला म्हंजे कोन ? तो म्हंजे कोन? वाघोबा म्हंजे कोन? सगळे इस्कटून सांगा..
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Tue, 07/28/2015 - 13:02 नवीन
स्पष्टपणे बोलून मला पुलं देशपांडे व्हायचा नाही. ..
↩ प्रतिसाद: खटपट्या
S
Sanjay Uwach Sat, 07/25/2015 - 19:06 नवीन
काश्मीर मधील श्रीनगर महाविद्यलयात, युरोपिअन फोरमच्या मदतीने ,नासिमबागच्या बाजूस एक सुंदर लायब्ररी बांधण्यात आली होती .त्या वेळी मी इंजीनिरीगच्या पहिल्या वर्षात शिकत होतो. मी व माझा पुण्यातील एक मित्र ( महमद ) त्या लायब्ररीला वारंवार भेट देत होतो .त्याचेही वडील उधमपूर मिलिटरी सेक्टर मध्ये कर्नल होते .ती लायब्ररी इतकी अप्रतिम पाच मजली बांधली होती कि त्याचे द्रुष्य आजूनही डोळ्या समोरून जात नाही .बाहेरुन सुंदर सुंदर परदेशी काचा लावण्यात आल्या होत्या. अद्यावत कपाटे, भरपूर पुस्तके ,थंडी वाजू नये म्हणून ,मध्यवर्ती हिटीग सिस्टीम .थोडक्यात अप्रतिम अशी ती लायब्ररी होती .त्याच वेळी नेमकी पाकिस्तानचे माजी प्रतंप्रधान झेड . भुत्तो यांना फाशी देण्यात आली. वास्तविक या घटनेची भारताचा कांही एक संबध नव्हता. अफवा व व्देषा पोटी निव्वळ भारताच्या पंत प्रधानांनी कांहीच प्रतिक्रिया दिली नाही, म्हणून स्थानिक विध्यार्थ्यांनी ती संपूर्ण लायब्ररी जाळून टाकली व त्या लायब्ररी वर झुल्फ्कार भूत्तो असा फलक लावण्यात आला .ह्या घटनेने माझे मन मात्र खूपच हेलावून गेले होते. शेवटी फाशीची शिक्षा हि पूर्णपणे न्यायालयीन कामकाजाचा भाग असल्याने त्या मध्ये जात पात धर्म ह्या गोष्टी आणणे चुकीचे ठरेल . हि शिक्षा न्याय घटनेला अनुसरून असलेने प्रत्येंक नागरिकाने त्याचा आदर हा केला पाहिजे.
य
यशोधरा Sun, 07/26/2015 - 10:37 नवीन
ती संपूर्ण लायब्ररी जाळून टाकली >> अरेरे! :(
↩ प्रतिसाद: Sanjay Uwach
ज
जुइ Sun, 07/26/2015 - 17:37 नवीन
संपूर्ण लायब्ररी जाळून टाकली>>> खूपच वाईट झाले.
↩ प्रतिसाद: Sanjay Uwach
अ
अत्रन्गि पाउस Sat, 07/25/2015 - 20:07 नवीन
ह्यांनी फाशीच्या शिक्षेवर शिक्का मोर्तब केले कि फाशी देण्यासाठी अजून काय कायदेशीर प्रक्रिया असतात ?? त्यात पुन्हा पुन्हा याचिका कसल्या दाखल करताहेत ? शेवटचे ऐकले त्यात मामला राज्यपालांकडे आहे असे कळले ...हा सगळा नक्की काय प्रकार आहे ??
श
श्रीरंग_जोशी Sun, 07/26/2015 - 06:39 नवीन
ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांची या विषयावरची ताजी ब्लॉगपोस्ट वाचनीय आहे. बेजबाबदार-आणि-बेताल.
प
पुण्याचे वटवाघूळ Sun, 07/26/2015 - 07:34 नवीन
श्रीरंगराव लिंक शेअर करत आहेत म्हणजे त्यात विनाकारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याविषयी गरळ ओकलेली असणार हे गृहित धरलेच होते. तरीही प्रवीण बर्दापूरकर यांची ही पोस्ट अपुर्‍या माहितीवर आधारित आहे. मे २०१५ मध्ये सुप्रीम कोर्टाने म्ह्टले होते की फाशीची शिक्षा सिक्रेटली आणि घाईघाईने (कसाब आणि अफजल गुरू केसप्रमाणे) करू नये. संबंधित गुन्हेगाराला सर्व लीगल रिकोर्स मिळाले पाहिजेत आणि नातेवाईकांना भेटता आले पाहिजे वगरे. http://timesofindia.indiatimes.com/india/Convicts-cant-be-hanged-secretly-and-hurriedly-Supreme-Court/articleshow/47450451.cms त्यामुळे फाशीची तारिख आधी जाह्रिर करणे क्रमप्राप्त होते. अशा प्रसंगी सरकारने गुपचूप सगळे उरकायला पाहिजे होते हे म्हणणे ठिक आहे पण त्यातून कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाले असते त्याचे काय? देवेन्द्र फडणवीसांनीही हेच म्हटले की या संदर्भात कोर्टाच्या सगळ्या गाईडलाईनचे पालन केले जाईल. बाकी फाशी कधी देणार, कशी देणार या गोष्टी पूर्वी धनंजय चॅटर्जीच्या फाशीच्या वेळीही (२००४) चघळल्या जातच होत्या. आता दिले जात आहेत तेच सगळे डिटेल त्यावेळीही दिले होते. विश्वास बसत नसेल तर http://www.rediff.com/news/2004/aug/12spec.htm हे वाचा. विशेष म्हणजे सरकारने आता फाशीची डेट आधी का जाहिर केली हे म्हणणार्‍यांपैकीच बरेच अफजल गुरूच्या केसमध्ये गुपचूप फाशी का दिले असा उलटा सवालही विचारत होतेच. त्यावेळी आणि आता यात नक्की काय फरक झाला आहे? एक फरक म्हणजे कोर्टाच्या गाईडलाईन आल्या आहेत. आणि दुसरा महत्वाचा फरक म्हणजे केंद्रातील आणि राज्यातील सरकारही बदलले आहे. आणि सध्याच्या केंद्र सरकारला काहीही बादरायण संबंध नसताना शिव्या घातल्या की श्रीरंगरावांसारख्यांना अगदी धन्य वाटते आणि इतर कुठलेही प्रश्न न विचारता त्यांच्यासारखे अशा लिंका 'वाचनीय' म्हणून पोस्ट करतात. एक तर बॉम्बस्फोट झाले १९९३ मध्ये.खटला सुरू झाला त्याच वर्षी. खटला पूर्ण झाला २००७ मध्ये. पुढे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात अपील वगरे झाले २०१३-१४ पर्यंत. प्रणव मुखर्जींनी त्याचा दयेचा अर्ज फेटाळला मे २०१४ मध्ये. आता सरकार (आणि ते ही राज्य सरकार-- केंद्राचा संबंध गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपतींना अर्ज फेटाळा हे रिकमेन्ड करण्यापुरता. आणि ते ही युपीए-२ सरकारने केले असायचीच शकयता सगळ्यात जास्त) त्या शिक्षेची पूर्णपणे कायद्याच्या कक्षेतून अंमलबजावणी करत असेल तरी शिव्या घालायच्या केंद्र सरकारला. अर्थातच काहीही झाले तरी केंद्र सरकारला आणि नरेंद्र मोदींना शिव्या घालणार्‍यांकडून वेगळी अपेक्षाही नाही म्हणा. आणि ओवेसी आणि अबू आझमी च्या 'जहरी' टिकेस सरकारला सामोरे जावे लागले असे म्हणायचा शहाजोगपणा बर्दापूरकर बाळगतात.म्हणजे एक तर ओवेसी आणि अबू आझमी हे दोन महात्मे अन्य वेळी एकदम रॅशनल बोलत असतात!! वा वा. या असल्या रद्दड ब्लॉगपोस्टना फाट्यावर मारावे.
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीगुरुजी Sun, 07/26/2015 - 09:14 नवीन
पूर्ण सहमत! बर्दापूरकरांचा लेख अत्यंत पूर्वग्रहदूषित व अज्ञानावर आधारीत आहे.
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
स
सदस्यनाम Sun, 07/26/2015 - 10:13 नवीन
अगदी अगदी. आणि लिहायची स्टैल तर अगदी फिक्स झालीय. सुरुवातीला आम आदमीचा कळवळा आणून थोडे प्रवचन द्यायचे. आपल्या बाब्याला तोंडदेखल्या चार शिव्या देऊन घ्यायच्या अन नंतर मूळ मुद्दा ऊगाळायचा. केंद्र सरकार कसे वाईट, अनुभव कसा नाही, राज्य सरकार कसे अनुनभवी, भगवा अजेंडा कसा राबवलाय, एकूणच काँग्रेस सोडून इतर सर्वजण प्रशासनाला कसे नालायक हे लिहून जाता जाता मिडीयाला दोन शिव्या दिल्या की लेख कसा फुलप्रुफ झाल्यासारखा वाटतो. ह्यांचे टेम्प्लेटस पाठ झालेत आता.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रदीप Sun, 07/26/2015 - 13:48 नवीन
आता तुम्ही ट्रोलींग करता आहात, असा आरोप केला जाईल, त्यासाठी तयार रहावे.
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
श
श्रीगुरुजी Mon, 07/27/2015 - 09:57 नवीन
>>> ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांची या विषयावरची ताजी ब्लॉगपोस्ट वाचनीय आहे. प्रवीण बर्दापूरकरांच्या त्या लेखावर मी कॉमेंट पाठविली होती. लेखात उपस्थित केलेले मुद्दे (याकूबला गुपचुप फाशी देणे, भगवेकरण, काँग्रेसचे कौतुक इ. मुद्दे) चुकीचे आहेत हे आहेत हे मी सोदाहरण लिहिले होते. सदर लेख पूर्वग्रह व कायदेशीर तरतुदींच्या अज्ञानातून जन्माला आला आहे हे मी लिहिले होते. प्रवीण बर्दापूरकरांनी माझी प्रतिक्रिया प्रकाशित केलेली नाही! एकंदरीत त्यांच्यावर लेखाच्या शेवटी उधळलेली स्तुतीपुष्पे - "परखड, चतुरस्त्र, स्वच्छ पत्रकारिता, सेक्युलर, पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा इ. इ." - ही खोटी असून निधर्मांध विचारसरणी, काँग्रेसभक्त, भाजपविरोधक, पूर्वग्रहदूषित आणि कायद्याविषयी अज्ञान असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे असे दिसत आहे.
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
D
drsunilahirrao Sun, 07/26/2015 - 07:02 नवीन
सुप्रीम कोर्टाने याकुब मेमनची फाशीची सजा कायम केल्यानंतर,राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यानंतर याकुबने महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे दयायाचिका दाखल करण्याने त्याचे मरण दोनपाच दिवस पुढे ढकलले जाईल इतकेच. मात्र प्रश्न असा आहे की सर्वोच्च यंत्रणेने एकदा शिक्षा कायम केल्यानंतर त्यासंदर्भात तुलनेने कनिष्टह यंत्रणेकडे दाद मागता येते का?याचे उत्तर आजच्या घडीला कदाचित कोणाकडेही नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल ही याचिका फेटाळतीलच याबद्दल दुमत असू नये. कारण तसे न घडल्यास संपूर्ण यंत्रणेचीच अब्रू वेशीला टांगली जाण्याची शक्यता आहे. एक मात्र निश्चीत की आपल्या व्यवस्थेतील ढिसाळपणा,अनियमितता आणि त्रूटी याकुबच्या याचिकेने अधोरेखीत झाल्या आहेत!
त
तिमा Sun, 07/26/2015 - 07:16 नवीन
आता तर सलमान खानही त्याच्या बाजूने बोलायला लागलाय. २९ जुलैला अबू आ़झमी एक मोर्चा काढणार आहे. तरीही ह्या घटनांकडे धर्मनिरपेक्ष दृष्टीने पहावे काय ?
स
संजय पाटिल Sun, 07/26/2015 - 07:29 नवीन
या सर्वांवर न्यायालयाचा अवमान या कलमाखाली गुन्हे दाखल करता येतात. पण राजकीय ईच्छाशक्ति हवी.
↩ प्रतिसाद: तिमा
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 07/26/2015 - 09:47 नवीन
आता तर सलमान खानही त्याच्या बाजूने बोलायला लागलाय. जो स्वतः मनुष्यवधाचा गुन्हा करून, कारागृहात जाण्याची शिक्षा होऊ नये यासाठी खोटे बोलून, अनेक गैर/कायदेशीर उचापती करत आहे; अश्या माणसाच्या भुक्कड वकिली मताला किती महत्व द्यावे याची जाण नसलेले बरेच जण आहेत, हीच जास्त शरमेची गोष्ट आहे !
↩ प्रतिसाद: तिमा
ट
टवाळ कार्टा Sun, 07/26/2015 - 14:01 नवीन
बज्रंगी भैजान्न हिट्ट झालाय ओ काका...आहात कुठे
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 07/26/2015 - 17:04 नवीन
ते पण लोकांच्या मनात कायद्याबद्दल किती आस्था आहे याचे लक्षण आहेच ! :(
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 07/26/2015 - 18:21 नवीन
कायद्याबद्दल आस्था निर्माण व्हावी असे वातावरण कायद्याच्या मंदिरातच नस्ते भौतेक्,,,,मिपावरचे वकिल टाकतीलच प्रकाश...पण आप्ल्याकडच्या बिंडोक पाखरांना कोण सम्जाव्णार की त्या एका गुन्हेगाराला डोक्यावर घेउन नाच्तात....चायला पाखरे असे कर्तात मग पाख्रांच्या मागावरच्या मुलांन्ना झक मारत फर्स्ट डे ची टिकिटे काढावी लाग्तात
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ज
जडभरत Sun, 07/26/2015 - 18:37 नवीन
हं बरोबरंय टका. आणि आपलंच मूर्ख पब्लिक असल्या भाईंना डोक्यावर चढवतं. साला एक हिंदी चित्रपट बघत नै मी या फाल्तू हीरोंमुळे. अगदी "खाणा"वळच चालू है यांची.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 07/26/2015 - 18:44 नवीन
कायद्याबद्दल आस्था निर्माण व्हावी असे वातावरण कायद्याच्या मंदिरातच नस्ते भौतेक् ही जबाबदारी कायद्याची नसते... फक्त त्याचे पालन केले नाही तर निरपेक्षपणे योग्य ती शिक्षा द्यावी इतकाच कायद्याचा हेतू असतो. कायद्याबद्दल आस्था ठेवून त्याचे पालन करणे ही नागरिकांची जबाबदारी असते... आणि सुजाण नागरिक ती समजून आचरण करतात. पण आप्ल्याकडच्या बिंडोक पाखरांना कोण सम्जाव्णार की त्या एका गुन्हेगाराला डोक्यावर घेउन नाच्तात....चायला पाखरे असे कर्तात मग पाख्रांच्या मागावरच्या मुलांन्ना झक मारत फर्स्ट डे ची टिकिटे काढावी लाग्तात हे वाचून, एखाद्या महत्वाच्या मुद्द्याचे थिल्लरीकरण करू नये ही सुद्धा सुजाण नागरिकांची जबाबदारी असते, हे आठवले. बाकी चालू द्या.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ज
जडभरत Sun, 07/26/2015 - 18:46 नवीन
थिल्लर मुद्दा? डाॅक्टर आपल्याला लव्ह जिहाद माहिती असेलच?
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 07/26/2015 - 19:12 नवीन
मी उद्धृत केलेली वाक्ये परत वाचली तर मी काय आणि का म्हणालो ते कळेल असे वाटते.
↩ प्रतिसाद: जडभरत
ट
टवाळ कार्टा Sun, 07/26/2015 - 19:09 नवीन
+११११ पटेश
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/27/2015 - 10:40 नवीन
मुद्दा ज्या भाषेत मांडला आहे त्या प्रकारची भाषा कोणत्याही मुद्द्याला मारकच ठरेल. तीच त्या मुद्द्याचे थिल्लरीकरण करत आहे, हे ध्यानात आले नाही का ???!!! अवांतर : मुद्दा मांडताना वापरलेली भाषा मुद्दा मांडणार्‍याची त्या मुद्द्याबद्दलची आस्था दर्शविते.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 07/27/2015 - 10:47 नवीन
ते समजले म्हणून तर पटेश असे लिहिले :)
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
उ
उगा काहितरीच Sun, 07/26/2015 - 07:24 नवीन
रच्याकने लेखकाच्या मिपीय वयाच्या मानाने खुपच चांगले लेखन ! कुणाचा असावा बरं डुआयडी ?
न
नगरीनिरंजन Sun, 07/26/2015 - 08:00 नवीन
गुन्हेगारांना शासन झालेच पाहिजे. गुन्हेगार,अतिरेकी व नक्षलवादी यांना एकाच रांगेत बसवणार्‍यांचं काय करावं ते मात्र कळत नाही.
च
चलत मुसाफिर Sun, 07/26/2015 - 13:57 नवीन
कुणाला देहदंडाची शिक्षा होणे यात जल्लोष करण्यासारखे काहीही नाही. कायदेशीर प्राणहरण ही केवळ एक दुर्दैवी अपरिहार्यता असून त्यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना ही गोष्ट सर्वांनीच लक्षात ठेवणे गरजेचे आहे. न्यायमूर्ती प्रमोद कोडे यांनी वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीही अनुचित आहेत. न्यायाधीश निकालपत्राच्या बाहेर कोणत्याही खटल्यावर भाष्य करत नसतो. त्याचबरोबर हेही म्हणावेसे वाटते, की डाव्या/ मुस्लिमधार्जिण्या विचारवंत टोळीने यावर केलेला हलकल्लोळ हा सामान्य नागरिकाला संताप आणणारा आहे. ते म्हणतात त्याप्रमाणे जर समाज, सरकार, न्यायपालिका, पोलीस, प्रसारमाध्यमे या सर्वांत जर मुस्लिमद्वेष भरलेला असता, तर याकूबची फाशी नक्की व्हायला इतकी वर्षे लागली नसती. प्रत्यक्ष बॉंम्ब बनवण्याचा वा ठेवण्याचा गुन्हा सिद्ध होऊनही काही आरोपींना केवळ कारावासाची शिक्षा झाली नसती.
व
वगिश Sun, 07/26/2015 - 16:44 नवीन
अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली.
वरील वाक्यातच महाराष्ट्र सरकारने असे का केले ह्याचे उत्तर आहे. आधीच्या फाशीच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत त्याचे महाराष्ट्र शासन पालन करीत आहे. उलट आपण केलेल्या बेजाबदार विधानामुळे गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. कृपया ते काढून टाकावे हि विनंती.
स
सुबोध खरे Sun, 07/26/2015 - 17:09 नवीन
अबू आझमी किंवा अक्बारुद्दिन ओवैसी सारखी माणसे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकतात. सलमान ची लायकी काय आहे हे सर्वाना माहित आहेच. स्वतः सदोष मनुष्यवधाच्या आरोपात दोषी म्हणून जाहीर झालेला असताना त्याने एखाद्या दहशतवाद्याची पाठराखण करावी हे नैसर्गिकच आहे. पण त्याच्या या बेताल वक्तव्याला अफाट प्रसिद्धी देणारे वार्ताहर आणि वृत्तपत्रे यांची लाज वाटते. एकीकडे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होत असताना सुजाण मुसलमान लोक मुग गिळून गप्प बसतात याबद्दल वाईट वाटते. अबू आझमी सर्केह चार उंदीर कुचकुचले तर फरक पडणार नाही पण जर बहुसंख्य निधर्मी लोक गप्प बसले तर अशा लोकांचा आवाज कारण नसताना मोठा आहे असे वाटु लागते. अशा दुर्दैवी परिस्थितिचा "श्रीराम सेने" सारखे लोक हि फायदा उठवू शकतात. नेपोलियनचे वचन आठवते. "दुर्जन लोकांच्या कोलाहाला पेक्षा सज्जन लोकांचे मौन जास्त घातक असते"
स
सुबोध खरे Sun, 07/26/2015 - 17:10 नवीन
जाता जाता -- अबू आझमी किंवा सलमान खान वर न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला भरता येऊ शकतो असे वाटते.
ख
खटपट्या Sun, 07/26/2015 - 18:24 नवीन
असा खटला ओवेसीवरदेखील भरता येइल. सरकार किंवा पोलीस सुओमोटो पद्धतीने कारवाई करु शकते का? जाणकार प्रकाश टाकतील अशी आशा
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
D
dadadarekar Mon, 07/27/2015 - 08:41 नवीन
यांच्यावरही गुन्हा दाखल करणार काय ?
↩ प्रतिसाद: खटपट्या
म
मृत्युन्जय Mon, 07/27/2015 - 09:15 नवीन
त्यांनी तसे काही विधान अथवा उपद्य्वाप केले असतील तर होय त्यांच्यावरही कारवाई करावी.
↩ प्रतिसाद: dadadarekar
च
चिनार Mon, 07/27/2015 - 09:18 नवीन
सह्मत !
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
D
dadadarekar Mon, 07/27/2015 - 09:21 नवीन
सलमान .... याकूबला फाशी नको. शत्रुघ्न , झेटमलानी ... याकुबला फाशी नको. एकच वाक्य सर्वानी उच्चारले आहे , शत्रुघ्न सिन्हा व झेटमलानीवर हिंदुत्ववादी का तुटुन पडले नाहीत ?
↩ प्रतिसाद: चिनार
म
मृत्युन्जय Mon, 07/27/2015 - 09:34 नवीन
याकूबला फाशी द्यावी की नाही याबद्दल तुमचे मत काय? ते आधी सांगा मग पुढचे बोलु. माझे मत फाशी झालीच पाहिजे. विनाविलंब.
↩ प्रतिसाद: dadadarekar
च
चिनार Mon, 07/27/2015 - 10:15 नवीन
एकच वाक्य सर्वानी उच्चारले आहे , शत्रुघ्न सिन्हा व झेटमलानीवर हिंदुत्ववादी का तुटुन पडले नाहीत ?
सलमानने टीवटीवाट केला आहे. आणि कुठल्याश्या पत्रावर शत्रुघ्न सिन्हा आणि जेठमलानी यांनी सह्या केल्या आहेत अशी बातमी आहे. ते पत्र बघायला आवडेल. शत्रुघ्न सिन्हा म्हणतात त्यांनी सही केली नाही. अर्थात अश्या आशयाचे कोणतेही पत्र पाठवले असेल तर ते निषेधार्ह आहे. कारवाई व्हायलाच हवी. हिंदुत्ववादी जर त्यांच्यावर तुटुन पडत नसतील तर तुमच्या राहुल बाबांना सांगा की संसद बंद पाडायला. तेव्हढाच कारण मिळेल त्यांना ..हो पण त्याआधी जरा विषय समजावून सांगाल त्यांना ..म्हणजे मुंबई कुठे आहे ? १९९३ ची घटना...याकुब,टायगर ,दाउद..वगैरे वगैरे
↩ प्रतिसाद: dadadarekar
स
सुबोध खरे Mon, 07/27/2015 - 16:42 नवीन
हितेस्भाऊ चष्मा काढा कि. जेठमलानी किंवा शत्रुघ्न सिंह यांनी फाशी देऊ नये असे म्हटले आहे. फाशीची शिक्षा मुळात असावी कि नसावी हा विषय वेगळा आहे. त्यांनी याकुब निर्दोष आहे असे म्हटले नाही. सलमानने याकुब निर्दोष आहे असे म्हटले होते. हे ठरवणारा हा बोकड कोण?त्याल कायद्याचे काय ज्ञान आहे? स्वतः गाडी घालून लोकांना मारल्याबद्दल दोषी ठरलेला आहे. किंवा ओवैसी म्हणतात कि तो मुसलमान आहे म्हणून त्याला फाशी दिले जात आहे. याला कोणता आधार आहे? उगाच निष्पक्ष असणार्या न्यायसंस्थेला आपल्या घाणेरड्या राजकारणात ओढणारा हरामखोर माणूस आहे. जातीय दंगे भडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याला टाडा लावायला पाहिजे. उगाच हिंदू आणी मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे.
↩ प्रतिसाद: dadadarekar
व
वॉल्टर व्हाईट Sun, 07/26/2015 - 17:37 नवीन
गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?
तथाकथित उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ येउन गेलीये आणि काळ सोकावलाय असे मत आहे. पण प्रश्नकर्ता अंतर्मुख होण्यास भाग पाडायचे म्हण्जे काय करायचे याबद्दल काहीच बोलत नाहीये, त्यामुळे हे मत इथे अयोग्य ठरू शकते.
व
विद्यार्थी Sun, 07/26/2015 - 18:25 नवीन
राजकारणी लोक आणि तथाकथिक उदारमतवादी हीसुद्धा माणसेच आहेत. समाजातून मिळणाऱ्या पाठीम्ब्यापेक्षा चुकीच्या गोष्टींना न होणारा विरोध हा मुद्दा आहे. समाजात, राजकारणात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून नफा किंवा फायदा कमावण्याची वृत्ती बळावली आहे. एक तर हे लोक स्वतःच्या फायद्यासाठी असे करतात किंवा इतर कोणाच्या सांगण्यावरून फुटकळ आर्थिक मोबदल्यासाठी करतात. हा इंटरनेटचा जमाना आहे. न्यायालयेसुद्धा सक्रिय आहेत. या सगळ्याचा उपयोग करून या लोकांना जे ते करत आहेत ते करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. आपण सगळे मिपाच्या माध्यमातून याविषयी चर्चा करतोय हीसुद्धा चांगली सुरुवातच नव्हे का?
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट
स
सुबोध खरे Sun, 07/26/2015 - 18:28 नवीन
http://www.abplive.in/movies/2015/07/26/article662832.ece/Ujjwal-Nikam-warns-of-action-against-Salman-Khan-father-Salim-says-his-comment-is-insignificant
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा