याकुब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने
१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेमनचे फाशी वाचवण्याचे सर्व पर्याय संपत आल्यामुळे त्याला लवकरच फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली.
फाशी प्रकरणाचा गाजावाजा होणे ही आजकालचीच गोष्ट वाटते कारण भारतात स्वातंत्र्यापासून अनेक लोकांना फाशीची शिक्षा झाली आहे परंतु त्याची एवढ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे आठवत नाही.
समाजातील काही उदार मतवादी लोकांना अतिरेकी, नक्षलवादि, अट्टल गुन्हेगार यांच्या मानवाधिकाराच्या चर्चा करून आणि त्यांच्याबद्दल समाजात नाहक सहानुभूती निर्माण करण्याची घाणेरडी सवय लागली आहे. आणि असे करून ते स्वतःची दुकाने चालवत असतात.
फाशी झालेल्या गुन्हेगाराची जात, धर्म याबद्दल वक्तव्ये करून राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रकार तर फारच घृणास्पद आहेत. बॉम्बस्फोटामध्ये मारले गेलेले सर्व भारतीय नागरिक होते. त्यांची जात किंवा धर्म पाहून त्यांना मारले नव्हते तर मग फाशी झालेल्या या अतिरेक्याच्या धर्माची चर्चा का?
भारतात फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा असावी किंवा नाही यावर वेगळी चर्चा होऊ शकते पण याकुब मेमनने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी केलेली मदत आणि या स्फोटांमध्ये २५७ निष्पाप लोकांचे गेलेले बळी, हे भारतीय कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत. याशिवाय याकुब मेमनला कायद्यानुसार स्वतःला वाचवण्याचे मिळणारे सारे पर्याय मिळाले आणि त्याने ते वापरालेसुद्धा.
गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks inमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks inमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in