याकुब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने
१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेमनचे फाशी वाचवण्याचे सर्व पर्याय संपत आल्यामुळे त्याला लवकरच फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली.
फाशी प्रकरणाचा गाजावाजा होणे ही आजकालचीच गोष्ट वाटते कारण भारतात स्वातंत्र्यापासून अनेक लोकांना फाशीची शिक्षा झाली आहे परंतु त्याची एवढ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे आठवत नाही.
समाजातील काही उदार मतवादी लोकांना अतिरेकी, नक्षलवादि, अट्टल गुन्हेगार यांच्या मानवाधिकाराच्या चर्चा करून आणि त्यांच्याबद्दल समाजात नाहक सहानुभूती निर्माण करण्याची घाणेरडी सवय लागली आहे. आणि असे करून ते स्वतःची दुकाने चालवत असतात.
फाशी झालेल्या गुन्हेगाराची जात, धर्म याबद्दल वक्तव्ये करून राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रकार तर फारच घृणास्पद आहेत. बॉम्बस्फोटामध्ये मारले गेलेले सर्व भारतीय नागरिक होते. त्यांची जात किंवा धर्म पाहून त्यांना मारले नव्हते तर मग फाशी झालेल्या या अतिरेक्याच्या धर्माची चर्चा का?
भारतात फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा असावी किंवा नाही यावर वेगळी चर्चा होऊ शकते पण याकुब मेमनने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी केलेली मदत आणि या स्फोटांमध्ये २५७ निष्पाप लोकांचे गेलेले बळी, हे भारतीय कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत. याशिवाय याकुब मेमनला कायद्यानुसार स्वतःला वाचवण्याचे मिळणारे सारे पर्याय मिळाले आणि त्याने ते वापरालेसुद्धा.
गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?
💬 प्रतिसाद
(277)
स
सुबोध खरे
Sun, 07/26/2015 - 18:29
नवीन
http://www.abplive.in/incoming/2015/07/26/article662609.ece/Salman-Khan-retracts-his-tweets-on-Yakub-Memon-apologises
श
श्रीगुरुजी
Sun, 07/26/2015 - 19:22
नवीन
भारतातील ४० निधर्मांधांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून याकूब मेमनची फाशी रद्द करावी अशी विनंती केली आहे. या पत्रावर खालील मंडळींच्या सह्या आहेत.
- शत्रुघ्न सिन्हा, महेश भट्ट, नसरूद्दीन शाह, सीताराम येचुरी, कराट दांपत्य, जॉन दयाल, तुषार गांधी, मणी शंकर अय्यर, राम जेठमलानी, डी. राजा, अनेक निवृत्त न्यायाधीश, इरफान हबीब, अरूणा रॉय, . . . इ.
शत्रुघ्न सिन्हाने या पत्रावर आपली स्वाक्षरी नसल्याचे सांगितले आहे.
या यादीत महेश भट्ट, नसरूद्दीन शाह, कम्युनिस्ट नेते, मण्या अय्यर इ. नेहमीचेच यशस्वी कलाकार आहेत. यांना पाकिस्तानविषयी वाटणारा कळवळा आणि अतिरेक्यांविषयी वाटणारे प्रेम जगजाहीर आहे. या यादीत अरूंधती रॉय व डॉगविजयचे नाव कसे नाही याविषयी आश्चर्य वाटत आहे.
तर दुसरीकडे "सर्वोच्च न्यायालयाने बनावट पुरावे आणि पोलिसांनी छळ करून मिळविलेला कबुलीजबाब यावर विसंबून याकूबला शिक्षा दिली" असे तारे आचरट शिरोमणी काटजू यांनी उधळले आहेत.
एकंदरीत याकूबच्या फाशीमुळे निधर्मांधांना सुगीचे दिवस आले आहेत.
ज
जडभरत
Sun, 07/26/2015 - 19:25
नवीन
हं नाहीतर या फ्लाॅप लोकांना कोण विचारतो?
श
श्रीगुरुजी
Sun, 07/26/2015 - 19:29
नवीन
>>> भारतातील ४० निधर्मांधांनी
हा आकडा चुकला आहे. प्रत्यक्षात २००+ निधर्मांधांनी सह्या केल्या आहेत.
ज
जडभरत
Sun, 07/26/2015 - 19:33
नवीन
शब्द मस्त वापरलात गुरुजी!!! निधर्मी अंध!!!
प
प्यारे१
Sun, 07/26/2015 - 19:48
नवीन
कोण सलमान खान आणि कोण हे तथाकथित निर्धर्मांध?
A wednesday चित्रपट बघून नासिर आवडला होता. फाशी देऊ नये म्हणून सह्या काय करतात हे येड*वे
न
निनाद मुक्काम …
Sun, 07/26/2015 - 22:21
नवीन
कोंग्रेज ने दहशतवादाची समझोता नाही अशी आता भूमिका घेतली आहे चेपू वर त्यांच्या पोस्ट ला मी चक्क लाईकले .
राजीव च्या मारेकऱ्यांना माफी देण्याचा अर्ज देतांना कुठे गेली होती अक्कल असे प्रश्न नाही विचारायचे
मात्र रॉ च्या माजी प्रमुख कै रमण ह्यांनी याकुब ला भारतात आणले होते त्याच्या फाशीच्या निर्णयाच्या विरुद्ध याचिका दाखल केली होती ह्या बदल्यात याकुब ने बरीच माहिती दिली होती, असे कळते
याकुब चे चुकले कुठे की भारतात येण्याआधी त्याने भारतीय सरकार कडून लिखित स्वरुपात आपल्याला फाशी देणार नाही असे लिहून घ्यायचे होते किंवा तसा गोपनीय करार करायचा होता.
अबू सालेम ला युरोपियन देशातून हस्तांतर केले तेव्हा त्यांच्या कायद्यानुसार भारताला सालेम ला फाशी देणार नाही असे लिखित स्वरुपात द्यावे लागले.
दाउद ने जेठमलानी तर्फे अटी घातल्या होत्या
माझ्या मते अजित दोवेल ह्यांनी आधी छोटा राजन च्या मदतीने दाउद चा काटा काढण्याचा प्रयत्न केला होता आता तर त्यांच्या हातात ताकद आहे तेव्हा दाउद ला संपवणे हा मोदी सरकार चा अजेंडा होताच तेव्हा छोटा राजन अधिक प्रमाणात सक्रिय करण्यात आला असावा
माझ्या वाचण्यात छोटा राजन व्हिएतनाम मध्ये चीन च्या विरोधात स्थानिक माफियांच्या सोबत कारवाया करत आहे तेव्हा त्याला संपविण्यासाठी कांगारूच्या देशात डी कंपनीने नुकताच प्रयत्न केला.
त्याला उत्तर म्हणून याकुब ला फासावर चढवण्याचा निर्णय घेतला गेला ,
फाशीची शिक्षा मिळालेले अनेक जण प्रतिक्षायादीत आहेत .
आहेत ,कोणाला कधी फाशी द्यायची ह्यांचे सरकारचे स्वतःचे निकष असतात. अफजल ते कसाब ह्यांना फासावर देतांना
सुद्धा मतांचे राजकारण होते
ह्या सगळ्यावर एकच उपाय म्हणजे आपल्या घटनेत बदल
दहशतवादी कार्याबाबत फाशी झालेल्या व्यक्तीस सर्वोच्च न्यायालयाने फाशी वर शिक्कामोर्तब केले की महिन्याचा आता फाशी द्यावे त्यांना दयेचा अर्ज वगैरे सुविधा असू नये
च
चिरोटा
Mon, 07/27/2015 - 08:39
नवीन
खरे आहे.
रॉ व आय.बी.ने(आय.एस.आय व ईतर पाकिस्तानी यंत्रणांशी) वाटाघाटी करूनच याकुबला भारतात आणले असावे.अन्यथा टायगर मेमेन व ईतर दुबई/पाकमध्ये राहिले तसाच तो ही राहिला असता. काठमांडूला याकुब कोणत्यातरी समारंभासाठी आला होता व नंतर दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसला...व नंतर त्याला अटक झाली.. अशी बातमी होती तेव्हा.
http://www.rediff.com/news/column/exclusive-b-ramans-unpublished-2007-article-why-yakub-memon-must-not-be-hanged/20150723.htm
त
तुडतुडी
Mon, 07/27/2015 - 09:16
नवीन
तरी म्हनल ह्या विषयावर अजून कसा धागा आला नाही
म्हणून स्थानिक विध्यार्थ्यांनी ती संपूर्ण लायब्ररी जाळून टाकली>>>
ह्यात नवीन काय आहे ? त्या लोकांची वृत्तीच आहे ती स्वतःला काही उदात्त निर्माण करता येत नाही म्हणून दुसर्यांविषयी इर्षा वाटून त्यांच्या अश्या उदात्त वास्तू , पुस्तके , उपकरणं नष्ट करायची . नालंदा, तक्षशीला विद्यापीठ , सुंदर सुंदर मंदिरं , अश्याच अनेक वास्तू त्यात समाविष्ट आहेत .
फाशी गुपचूप द्यावी ह्यावर आक्षेप घेण्याचं कारण काय ?
संबंधित गुन्हेगाराला सर्व लीगल रिकोर्स मिळाले पाहिजेत आणि नातेवाईकांना भेटता आले पाहिजे वगरे.>> हे गुन्हेगार बॉम्ब स्फोट करतात तेव्हा तेव्हा हीच प्रोसिजर follow करतात का ?मग त्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी पाळायची काही गरज नाही . आणि त्या कागदावर सह्या करणार्यांना म्हणावं ठीक आहे याकुब ची फाशी रद्द केली जाईल. जे लोक मेलेत त्यांना जिवंत करून द्या. ह्याच्या घरातलं कोणी मेलं नसेल म्हणून हि थेरं सुच्तायेत
या यादीत महेश भट्ट, नसरूद्दीन शाह, कम्युनिस्ट नेते, मण्या अय्यर इ. नेहमीचेच यशस्वी कलाकार आहेत. >> आयुष्यभर चंदेरी आभासी दुनियेत राहायचं . ह्यांची कला म्हणजे काय तर खोटी खोटी डायलॉगबाजी कारण , ढुंगण हलवत नाचणं , खोटं खोटं हसणं आणि खोटं खोटं रडणं . त्यांची अक्कल ती काय ? कलाकार आहेत म्हणजे सगळ्या क्षेत्रातले तज्ञ झाले का हे ?
अ
अप्पा जोगळेकर
Mon, 07/27/2015 - 09:58
नवीन
त्या यादीत दादा दरेकर हे नावदेखील आहे का ?
D
dadadarekar
Mon, 07/27/2015 - 16:40
नवीन
म्हणुन सही नाय केली.
सही करुनही शत्रुघ्न नाही म्हणतोय की खरोखरच त्याने सही केलेली नाही ?
ह
होबासराव
Mon, 07/27/2015 - 10:19
नवीन
नसेल... तिथे ह्या लखोबा ने वेगळ्या नावाने सहि केलि असेल.
म
मृत्युन्जय
Mon, 07/27/2015 - 10:21
नवीन
माझे तर मत आहे मोदी आनंदाने करमणूक बघत असतील आता. या फालतु लोकांचे देशद्रोही चेहरे समोर यायला लागलेत. मोदींना कधी बोलावे आणि कधी शांत बसावे बरोबर कळते. ते बोलतात तेव्हा सुद्धा असल्या लोकांची ठासली जाते (आणि मग प्रेस्टिट्युट्स मोदींनी कसा संयम बाळगला पाहिजे वगैरे केकाटतात) आणि ते शांत बसतात तेव्हा ही थर्डक्लास लोकच स्वतः किती रद्दी आहेत हे लोकांना दाखवुन देतात. अजुन घोष बाई नाही रेकल्या?
च
चैदजा
Wed, 07/29/2015 - 19:25
नवीन
व्यापमं च्या निमित्ताने जे चालले आहे, हे देखिल त्यांच्या करमणूकीचे साधन आहे काय ?
(अवांतर होत आहे, पण राहवल नाही हा भाबडा प्रतिसाद बघुन.)
म
मृत्युन्जय
Wed, 07/29/2015 - 19:27
नवीन
खरे सांगायचे तर हो. उगाच का हे प्रकरण एवढ्या चव्हाट्यावर आलय? शिवराज चौहान एकेकाळी मोदींचे प्रतिस्पर्धी होते हे विसरलात?
प
प्यारे१
Wed, 07/29/2015 - 19:35
नवीन
एवढ्या खालच्या पातळीवर 'पक्षान्तर्गत' राजकारण गेलं नसावं. मध्यप्रदेशात भाजपाचं नुकसान म्हणजे मोक्याच्या 30 जागा तरी नुकसान. मोदी नाहीत करायचे असं असा अंदाज. बाकी विरोधी नेत्यांना धोबीपछाड़ देण्यात मोदींचा हातखंडा आहे. मुलासकट उखडून टाकतात (ळ नव्हे ल च)
ट
ट्रेड मार्क
Wed, 07/29/2015 - 22:20
नवीन
व्यापमं विषयी जर अजून माहिती गोळा करा….बादरायण संबंध यालाच म्हणतात.
व
विकास
Wed, 07/29/2015 - 19:28
नवीन
हे घ्या!
प
पुण्याचे वटवाघूळ
Mon, 07/27/2015 - 10:43
नवीन
आजच पंजाबात दहशतवादी हल्ला झाला आहे आणि इथे आपण एका दहशतवाद्याला दया दाखवावी का म्हणून चर्चा करत आहोत. डिजगस्टींग. सोडा अजून दहशतवाद्यांना. बोलवा दहशतवाद्यांना हल्ले करायला. आजच्या हल्ल्यातील एक दहशतवादी स्त्री आहे म्हणे. समजा ती मेली नाही आणि पकडली तर परत आपले मानवाधिकार वाले स्त्री ला फाशी कशी देणार म्हणून आकांडतांडव करणार. कसाबही अंडरएज आहे म्हणून त्याला सोडा असे त्याला दिलेला महामूर्ख वकिल बरळला होता.म्हणजे काय-- तर त्यांनी अंडरएज मुले पाठवावीत, स्त्रिया पाठवाव्यात, इथल्या लोकांना मारावे आणि तरीही आपला कायदा काहीही करणार नाही. या असल्या मानवाधिकार वाल्यांना आपणच पोसतो. जिथे दिसतील तिथे आपण त्यांना थोबडावत नाही, त्यांच्या अंगावर थुंकत नाही. मग काय होत राहणार दहशतवादी हल्ले. त्याविषयीही तक्रार का करा? साला आपली लायकीच ती.
ज
जडभरत
Mon, 07/27/2015 - 11:34
नवीन
ते सर्व लाईव्ह बघणे खूप क्लेशकारक आहे. खरे तर आपणातच आस्तिन के साप दडलेत. जितका म्हणून राक्षसी आरोपी दहशतवादी असेल त्याचा यांना जास्त पुळका.
अ
अस्वस्थामा
Mon, 07/27/2015 - 16:14
नवीन
याकुब मेमनला त्याच्या सर्व समर्थकांसोबत या पंजाबातल्या दिनानगर गावात नेऊन घटनास्थळाची "सफर" घडवावी आणि मग त्या समर्थकांना विचारावे, आता काय ? :|
वेन्सडेचा नासिरुद्दीन शहा सही करताना "२६/११ फक्र है" हे किमान आठवत असेल का असा प्रश्न पडला..
न
निनाद मुक्काम …
Mon, 07/27/2015 - 22:07
नवीन
याकुब च्या निमित्ताने काही गोष्टी मला अजून
उमजल्या नाहीत
तो भारतात काय म्हणून परत आला
किंवा त्याला आय एस आय शी बार्गेनिंग करून रमण ह्यांनी आणले असे म्हणणे योग्य ठरणार नाही
कारण रमण ह्यांना बार्गेन करायचे तर टायगर साठी करतील
किंवा दाउद साठी गेला बाजारभाव दौउद चा भाऊ व छोटा शकील ह्यांच्यात विस्तव जात नाही तेव्हा त्यांच्या पैकी एकाला आणतील
माझ्यामते याकुब ला पाकिस्तानात राहणे पसंद नव्हते
भारतात येण्यासाठी दाउद ने जसा जेठमलानी ह्यांना संपर्क साधला तसा याकुब सुद्धा प्रयत्नात असावा
तेव्हा रमण ह्यांनी धूर्तपणे त्यास भारतात बोलवून त्यांचा कडून माहिती काढण त्या बदल्यात तुरुंगवास व पुढे कदाचित जामिनावर सुटका असे वचन दिले असावे म्हणून त्यांनी न्यायालयात याचिका सादर केली असेल ह्यात त्यांच्या देश प्रेमावर मला अजिबात शंका येत नाही
पण त्यांचे निधन झाले व आजच्या राजकारणात याकुब ची फाशी ह्या घटनेला अनेक अर्थानी महत्व प्राप्त झाले
मुंबई हल्ल्यातील कसाब फासावर लटकला पण त्याहून आधी १९९२ च्य हल्यातील कोणालाही फासावर लटकता आले नाही
नाही म्हणा त्यातील काही आरोपी जामिनावर सुटले तेव्हा देशभक्ती सिद्ध करण्यासाठी असे वृत्त पत्र म्हणतात छोटा राजन ने त्यांचा गेम केला , का आय बी ने करवला
जे झाले उत्तम झाले ,
तात्पर्य असे की मुळात रमण ह्यांनी जर खरच याकुब ला असे काही वचन दिले असेल तर सर्वोच्च न्यायालयात त्याला शिक्षा
होण्याच्या आधी काहीतरी जुगाड आपल्या सरकार तर्फे करायचा होता त्याला मासा करायचा होता म्हणजे फाशी जन्म ठेपेवर आली असती कदाचित पण एकदा न्यायालयाने शिक्षा दिल्यावर ती बदलावी असा दुराग्रह करणे हा न्यायालयाचा अवमान करणे आहे
त्यामुळे फाशी ही अटल आहे उद्या पर्यत ती नक्की करावी असे मला वाटते
अवांतर
दाउद ने आपल्या मुंबई मधील कारभारावर लक्ष राहावे म्हणून आपल्या छोट्या भावाला भारतात पाठवला
त्याला काहीकाळ तुरुंगवास होऊन आज तो जामिनावर मुंबईत
मुक्तपणे फिरत आहे नाही म्हणायला त्याने नानाचा सिनेमातील नव्हे नव्हे गेम करायचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर खुनी हल्ला सुद्धा झाला
पण असाच काहीच बेत टायगर ने याकुब विषयी योजला असेल
अवांतर
टायगर मेनन ची भूमिका पवन मल्होत्राने झोकात केली होती
च
चिरोटा
Tue, 07/28/2015 - 10:09
नवीन
त्याने दिलेल्या मुलाखतीनुसार ही सर्व गुन्हेगार मेमन मंडळी कराचीत डिफेन्स कॉलनीत एका मोठ्या बंगल्यात राहत होती.जेव्हा त्याला नेपाळमध्ये पकडला तेव्हा त्याच्याकडे काही पासपोर्ट्स्,काही व्हिडियोज सापडले.कोणताही गुन्हेगार असला माल घेऊन दुसर्या देशात,तेही भारताच्या मित्र देशात असा जाणार नाही.आय.एस.आय. किंवा दाउदच्या परवानगीशिवाय तो असा बाहेर जाण्याची शक्यता खूप कमी आहे.कारण येथे पोचल्यावर तो सर्व माहिती सी.बी.आय.ला देणार हे उघड होते.अपेक्षेप्रमाणे त्याने बरीच माहिती दिली,ज्यावरून पोलिसांना अनेकांना पकडणे शक्य झाले.भारता पोचल्यावर त्याने पत्नीला व काही भावांनाही येथे बोलवून घेतले.
श
श्रीगुरुजी
Tue, 07/28/2015 - 09:29
नवीन
काय विरोधाभास आहे!
भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिले तेव्हा काही तत्कालीन विचारवंतांनी व प्रभावी नेत्यांनी त्यांच्या फाशीला विरोध केला नाही व त्यांना फाशी देऊ नये अशी ब्रिटिशांना विनंती केली नाही.
पण आता याकूब मेमनला फाशी देण्याच जाहीर झाल्यावर त्याला फाशी देऊ नये अशी विनंती करणार्यांची मोठी फौज उभी आहे.
कालाय तस्मै नमः!
ख
खटपट्या
Tue, 07/28/2015 - 10:55
नवीन
आजच्या टाईम्स ओफ इंडीया मधे आलेला याकुबच्या वकीलांचा युक्तीवाद असा की, याकूब १९९६ पासून स्किझोफ्रेनिया चा रूग्ण आहे. त्यात तो गेली २० वर्षे तुरुंगात आहे जी जन्मठेपेपेक्षा जास्त शिक्षा होते. आणि एका गुन्ह्यासाठी जन्मठेप आणि फाशी देउ नये..
(स्किझोफ्रेनिया झाल्यावर याकूबला कन्या रत्नाचा लाभदेखील झाला)
त
तुडतुडी
Tue, 07/28/2015 - 11:38
नवीन
तो भारतात काय म्हणून परत आला>>
तो भारतात परत आला नाही . नेपाळ मध्ये असताना त्याला काठमांडू पोलिसांनी सापळा रचून अटक केली होती . तिथून त्याला दिल्लीला आणण्यात आलं आणि नेपाळ आपला दोस्त असल्यामुळे त्यांनी त्याला आपल्या हवाली केलं.
याकुब आधी दुबईला , मग पाकिस्तान , मग bankok आणि तिथून नेपाळ ला गेला .
तेव्हा रमण ह्यांनी धूर्तपणे त्यास भारतात बोलवून त्यांचा कडून माहिती काढण त्या बदल्यात तुरुंगवास व पुढे कदाचित जामिनावर सुटका असे वचन दिले असावे >>> याकुब काय कुक्कुलं बाळ आहे का हो ? शेंबड्या पोराला सुधा हा धूर्तपणा लक्षात येवू शकेल
याकुब च्या फाशीला मिडिया ने नको तेवढं महत्व दिलंय . आणि हा असा गोंधळ होणार असेल तर ह्यापुढे फाशी गुपचूप दिली जावी . त्या मानवाधिकारवाल्यांकडे एवढं लक्ष द्यायची गरज नाही
न
निनाद मुक्काम …
Tue, 07/28/2015 - 12:15
नवीन
सगळे मेनन पाकिस्तानात लपले होते तेव्हा हा नेपाळ मध्ये पर्यटनाला गेला होता का . आय एस आय ने त्याला असे मुक्त बागडायला परवानगी दिली
आणि रॉ च्या प्रमुख रामान हे देशद्रोही मानायचे का त्यांनी त्याच्या फाशिविरोधात याचिका केली
लक्षात घ्या महेश भट्ट व रमण ह्यांनी फाशी न होण्या मागे घेतलेल्या घेतल्याला भूमिकेत जमीन अस्मानाचा फरक आहे.
कुक्कल बाळ...
दाउद चा भाऊ भारतात परत आला त्याला अटक केली , खटला भरला व मग रीतसर जमीन मिळवून सध्या मस्त जीवन जगत आहे , दाउद चा कारभार सांभाळत आहे ,
भारतात शिक्षा झालेले जयललिता लालू सलमान असा लांबलचक इतिहास पहिला तर याकुब चा त्यावेळचा निर्णय अगदीच बाळबोध नव्हता.
च
चिरोटा
Tue, 07/28/2015 - 12:42
नवीन
२५७ माणसे ठार झाली आहेत अशा केसमध्ये 'आपण कधीतरी सुटू शकतो' अशी कल्पना कोणी करीत असेल तर तो मूर्ख म्हंटला पाहिजे.कदाचित फाशी नाही पण आपण आयुष्याच्या अखेरपर्यंत तुरुंगातच असणार आहोत ह्याची कल्पना याकुबला भारतात परतताना नसेल ?
त
तुडतुडी
Tue, 07/28/2015 - 13:42
नवीन
सगळे मेनन पाकिस्तानात लपले होते तेव्हा हा नेपाळ मध्ये पर्यटनाला गेला होता का>>
त्याचं त्यालाच माहित .
याकुब भारतात परतला नवता हो . त्याला नेपाळमध्ये अटक करण्यात आली म्हणलं ना .
त
तुडतुडी
Tue, 07/28/2015 - 13:48
नवीन
दाउद चा भाऊ भारतात परत आला त्याला अटक केली , खटला भरला व मग रीतसर जमीन मिळवून सध्या मस्त जीवन जगत आहे , दाउद चा कारभार सांभाळत आहे>>>
कोणता भाऊ ? आणि असं असेल तर त्याचा त्या गुन्ह्यात तेवढा हात नसेल . न्यायालयाने काय त्याला असाच सोडून दिला असं म्हणायचय का तुम्हाला ?
मेनन चा मात्र ह्या गुन्ह्यात सिंहाचा (असा शब्दप्रचार आहे ) वाटा होता.
न्यायालयाचा अवमान करता ऑ …
हे लोक जिहाद (धर्मयुद्ध ?) लढत असतात तर असे लपून छापून का हल्ले करतात ? हे आमचं धर्मयुद्ध आहे असं म्हणून शूरासारखं समोर येवून का लढत नाहीत ? आणि धर्मकार्य म्हणून फासावर का जात नाहीत ? आता का जीवाची भिक मागत दयेची याचना करतात ?
D
dadadarekar
Tue, 07/28/2015 - 21:49
नवीन
धर्माच्या नावानं मरणं ही पुरातन धर्माची ओळख आहे.
धर्माच्या नावानं मारून मरणं ही नूतन धर्माची ओळख आहे.
....
नूतन आयडीवाला दादूमियाँ
व
विद्यार्थी
Tue, 07/28/2015 - 22:02
नवीन
एकदम बरोबर दादा!!!
अ
अर्धवटराव
Tue, 07/28/2015 - 23:44
नवीन
कित्ती छान सगळं मरण, मरण, मरण. बरोबर आहे. जीवनावर प्रेम, मुल्य वगैरे फालतु भानगडीत पडायचच कशाला.
D
dadadarekar
Wed, 07/29/2015 - 02:48
नवीन
जे निमूटपणे मरतात ते इहलोकापेक्षा परलोकातील सुखावर प्रेम करतात .
जर प्रेम , सुख वगैरे गोष्टींचं नव्या धर्माला वावडं आहे तर बिर्यानी , शेरोशायरी , ताजमहाल, अनारकली , तानसेन ...... हे सगळे काय ?
....
मनसोक्त शहेनशाह दादूखान
अ
अर्धवटराव
Wed, 07/29/2015 - 14:32
नवीन
आधि आपण सर्व उपभोग घ्यायचे. आणि इतरांना 'वरची' वाट दाखवुन आपली परलोकीच्या उपभोगांची बेगमी करायची. कित्ती उदात्त.
D
dadadarekar
Wed, 07/29/2015 - 14:54
नवीन
हे जग म्हणजे मोहमाया आहे... ते उरपाटे असे झाडाचे प्रतिबिंब आहे... खरे झाड ' वर ' आहे म्हणे ! असले तत्वद्नान असणार्यानी कशाला ' खाली ' रहायचे ?
स
संदीप डांगे
Wed, 07/29/2015 - 15:17
नवीन
तरीच जन्नतची वाट बघत जमिनीत दडून राहता व्हय... ?
ज
जडभरत
Wed, 07/29/2015 - 15:57
नवीन
आणि तिथे म्हणे बारबालक मदिरेचे चषक हातात घिऊन वाटतात म्हणे सगळ्या पुण्यवंतांना!!!
आणि पृथ्वीवर कुठ्ठेच नसतील अशा सुंदरी म्हणे सेवेचे ठाई तत्पर असतात!!!
कसली श्येवा तेवडं इचरू नका.
ज
जडभरत
Wed, 07/29/2015 - 15:59
नवीन
तिथे म्हणजे जन्नत मध्ये. पाकसाफ लोकांच्या...
D
dadadarekar
Wed, 07/29/2015 - 16:45
नवीन
त्या आता शेपाचशे वर्शात आल्या हो.
पण सोमरस पाजणार्या अप्सरा त्याच्याही आधीपासुन आहेत ना ?
प
प्यारे१
Wed, 07/29/2015 - 17:51
नवीन
शी बाबा!
मग काय '...' फायदा बदलून ?????
शेवटी (अॅट द एन्ड ऑफ द डे) सगळंच पॅकेज शेम टु शेम आहे काय?
बाकी या वयात 'कापाकापी' केलेली झेपणारे का दादा तुम्हाला? ;)
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 07/29/2015 - 19:23
नवीन
प्यारे ह्या एका प्रतिसादासाठी _/\_. ठ्ठो!!! बरचं ठणकणारे हे =))
ब
बॅटमॅन
गुरुवार, 07/30/2015 - 10:14
नवीन
ठ्ठो =)) =)) =))
अग्गा बाब्बौ =))
स
संदीप डांगे
गुरुवार, 07/30/2015 - 12:27
नवीन
अहो इकडल्या पॅकेजमधे इंस्टंट फायदा आहे. तिकडे जमीनीत किती युगं पुरून राहायला लागेल ते त्या 'खोदा'ला माहित. त्यानंतर कधीतरी निवाडा होऊन 'ह्यांना' बहात्तर सुंदर्या मिळतात की बहात्तर शौकिन नवाबांना 'हे' मिळतील हे कळेल.
ज
जडभरत
Wed, 07/29/2015 - 18:03
नवीन
अप्सरा वाटताहेत ते एक ठीक हो. या पाकसाफ लोकांना जन्नत मध्ये मदिरा वाटायला पोरगे का पाहिजेत???
अ
अर्धवटराव
Wed, 07/29/2015 - 15:53
नवीन
आणि कोणि खाली राहातो म्हटलं तरी आपण त्यांना बरं खाली राहु देऊ. पवित्र कार्य हाती घेतलय ना.
ट
ट्रेड मार्क
Wed, 07/29/2015 - 15:01
नवीन
पण निरपराधांना मारून मारणाऱ्यांना परलोकात ७२ सुंदर्यांचा लाभ होतो म्हणतात ना? मग ते परलोकातल सुख नाही का?
मला तर वाटत होतं कि याकूब पण ७२ सुंदर्यांसाठी आतुर असेल. कशाला उगाच माफीनामा वगैरे देत बसलाय? त्या सुंदर्या म्हाताऱ्या होत चालल्यात.
ज
जडभरत
Wed, 07/29/2015 - 15:09
नवीन
हाण तेजामारी!!! सुंदर प्रतिवाद!!! शाब्बास!!!
आ
आनन्दा
Mon, 08/03/2015 - 12:28
नवीन
ता काय मेल्यावर लगेच मिलात नाय.. आधी आंगठे धरून बाकीचे मरेपर्यंत वाट बघावी लागते म्हणतात. तो म्हणला असेल त्या हजारो वर्षांपैकी १५-२० इथेच काढू. बचेंगे तो और भी लढेंगे.
ट
ट्रेड मार्क
Mon, 08/03/2015 - 14:47
नवीन
चांदणी काढून खाली बारीक अक्षरात लिहिलेले असते कि काय? या अटी व शर्ती या लोकांना सांगत नाहीत बहुतेक. उगाच आशेला लावून ठेवतात.
तसं पण यांना प्रार्थनेच्या वेळेला बसून पायाचे अंगठे धरायची सवय असते की…पुढ्च्याचे ;)
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »