Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

याकुब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने

व
विद्यार्थी
Sat, 07/25/2015 - 16:49
🗣 277 प्रतिसाद
१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेमनचे फाशी वाचवण्याचे सर्व पर्याय संपत आल्यामुळे त्याला लवकरच फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली. फाशी प्रकरणाचा गाजावाजा होणे ही आजकालचीच गोष्ट वाटते कारण भारतात स्वातंत्र्यापासून अनेक लोकांना फाशीची शिक्षा झाली आहे परंतु त्याची एवढ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे आठवत नाही. समाजातील काही उदार मतवादी लोकांना अतिरेकी, नक्षलवादि, अट्टल गुन्हेगार यांच्या मानवाधिकाराच्या चर्चा करून आणि त्यांच्याबद्दल समाजात नाहक सहानुभूती निर्माण करण्याची घाणेरडी सवय लागली आहे. आणि असे करून ते स्वतःची दुकाने चालवत असतात. फाशी झालेल्या गुन्हेगाराची जात, धर्म याबद्दल वक्तव्ये करून राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रकार तर फारच घृणास्पद आहेत. बॉम्बस्फोटामध्ये मारले गेलेले सर्व भारतीय नागरिक होते. त्यांची जात किंवा धर्म पाहून त्यांना मारले नव्हते तर मग फाशी झालेल्या या अतिरेक्याच्या धर्माची चर्चा का? भारतात फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा असावी किंवा नाही यावर वेगळी चर्चा होऊ शकते पण याकुब मेमनने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी केलेली मदत आणि या स्फोटांमध्ये २५७ निष्पाप लोकांचे गेलेले बळी, हे भारतीय कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत. याशिवाय याकुब मेमनला कायद्यानुसार स्वतःला वाचवण्याचे मिळणारे सारे पर्याय मिळाले आणि त्याने ते वापरालेसुद्धा. गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?

प्रतिक्रिया द्या
50188 वाचन

💬 प्रतिसाद (277)
व
विकास Fri, 07/31/2015 - 18:25 नवीन
खालील बातमी वाचून या उपचर्चेतील आयडी कुणाचे आहेत असा प्रश्न पडला. ;) ओवेसींच्या 'त्या' मताशी शिवसेना सहमत ( अर्थात ";)" या चिन्हाचा अर्थ ह.घ्या/हलकेच घ्या/take it easy असा आहे. )
↩ प्रतिसाद: जडभरत
ट
टवाळ कार्टा Fri, 07/31/2015 - 07:46 नवीन
=))
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
व
वॉल्टर व्हाईट गुरुवार, 07/30/2015 - 22:14 नवीन
धन्यवाद.
हाच नियम ज्यांच्याकडे चोरी झालेली आहे, ज्यांच्यावर बलात्कार झालेला आहे, ज्यांची फसवणूक झालेली आहे ... अशा इतरांना सुद्धा लावला तर योग्य होईल का?
नाही.
ज्याप्रमाणे खुन्याला फाशी देऊन गेलेली व्यक्ती परत जिवंत होणार नाही त्याचप्रमाणे एखाद्या बलात्कार्‍याला शिक्षा देऊन पिडीतेची अब्रू परत येणार नाही. मग कशाला बलात्कार्‍याला शिक्षा द्यायची?
बलात्कार्‍याला देण्यात येणारी शिक्षा मृत्युदंड नसते त्यामुळे हे उदाहरण इथे गैरलागू आहे. मी शिक्षा ही व्यवस्था अमान्य करतोय असे नाही. बलात्कार्‍याला शिक्षा द्यायची गरज आहेच, कारण पिडीत व्यक्तीला त्याने न्याय मिळणार आहे आणि बलात्कार करणारा जेव्हा सुटेल तेव्हा भोगलेल्या शिक्षेच्या अनुभवाने तो पुन्हा गुन्हा करायला धजावणार नाही. प्रश्न फक्त मृत्युदंडाबाबत आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुबोध खरे Fri, 07/31/2015 - 05:40 नवीन
वॉल्टर व्हाईट साहेब आपल्या विधानांमध्ये वैचारिक गोंधळ दिसतो आहे बलात्कार करणारा जेव्हा सुटेल तेव्हा भोगलेल्या शिक्षेच्या अनुभवाने तो पुन्हा गुन्हा करायला धजावणार नाही. या साठी त्याला जन्मठेपेची काय गरज आहे त्याला लिंग विच्छेदची (CASTRATION) शिक्षा द्या कि म्हणजे तो परत धजावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. न्याय हा नुसता करून उपयोगी नाही तर तो दृश्य सुद्धा असला पाहिजे( justice should not only be done but be seen to be done गुगलून पहा) हे कायद्याचे मौलिक तत्व आहे. याचे कारण त्यातून धडा घेऊन इतर माणसे सुद्धा तो गुन्हा करायला धजावू नयेत हा त्यातील मुद्दा आहे. दहशतवाद्याला फाशी देणे यात हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. अन्यथा बलात्काराला जन्मठेप आणी दोनशे माणसाना उलट्या काळजाने उडवून देणे यालाही जन्मठेप असेल तर त्या गुन्ह्याच्या भयानकतेत फरक कसा करणार? सुडोसेक्युलर लोकांना कोणा मुसलमानाला फाशी दिले कि च कसा कळवळा येतो ते समजत नाही. याकुब फाशी गेला आता सहा महिन्यांनी फाशीची शिक्षा हवी कि नको यावर वादसंवाद करा. यांचे बोलाविते धनी वेगळे आहेत. (गुन्हेगारी पाताळ जगात)
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट
श
श्रीगुरुजी Sat, 08/01/2015 - 09:57 नवीन
>>> बलात्कार्‍याला देण्यात येणारी शिक्षा मृत्युदंड नसते त्यामुळे हे उदाहरण इथे गैरलागू आहे. मी शिक्षा ही व्यवस्था अमान्य करतोय असे नाही. बलात्कार्‍याला शिक्षा द्यायची गरज आहेच, कारण पिडीत व्यक्तीला त्याने न्याय मिळणार आहे आणि बलात्कार करणारा जेव्हा सुटेल तेव्हा भोगलेल्या शिक्षेच्या अनुभवाने तो पुन्हा गुन्हा करायला धजावणार नाही. प्रश्न फक्त मृत्युदंडाबाबत आहे. गुन्ह्याची तीव्रता जितकी मोठी, शिक्षा त्या प्रमाणातच असते. >>> बलात्कार्‍याला शिक्षा द्यायची गरज आहेच, कारण पिडीत व्यक्तीला त्याने न्याय मिळणार आहे बरोबर. तसेच खुन्याला, दहशतवाद्याला सुद्धा शिक्षा द्यायची गरज आहेच, कारण पिडीत व्यक्तीला त्याने न्याय मिळणार आहे. आणि पिडीत व्यक्ती म्हणजे केवळ मृत व्यक्ती नसून त्या व्यक्तीचे नातेवाईक आणि खुनी/दहशतवाद्यामुळे कायमचे जायबंदी/जखमी झालेल्या व्यक्ती सुद्धा असतात. >>> आणि बलात्कार करणारा जेव्हा सुटेल तेव्हा भोगलेल्या शिक्षेच्या अनुभवाने तो पुन्हा गुन्हा करायला धजावणार नाही. असे काही नाही. बलात्काराची शिक्षा भोगून सुटल्यावर पुन्हा बलात्कार केल्याची उदाहरणे आहेत. >>> प्रश्न फक्त मृत्युदंडाबाबत आहे. दहशतवादी/खुन्याला मृत्युदंड दिल्याने तो परत असा गुन्हा करूच शकणार नाही. म्हणूनच मृत्युदंड आवश्यक आहे.
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट
स
सुबोध खरे गुरुवार, 07/30/2015 - 06:52 नवीन
विजय तेंडूलकर हे लेखक म्हणून उच्च दर्ज्याचे आहेत हे वादातीत आहे परंतु या लेखामध्ये नाटकीपणा फार जाणवतो.जसे काही मरणाला समोर जाणारा माणूस पाहणारे ते एकटेच आहेत. जेंव्हापासून त्यांनी विचारवंताचा मुखवटा धरण केला तेंव्हापासून त्यांच्या बद्दलचा आदर दुणावायच्या ऐवजी उणावला. बहुसंख्य डॉक्टरना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते. शेवटची घटका मोजणारा रुग्ण पहायची वेळ कित्येक वेळा येते. आणि हा रुग्ण गुन्हेगार नसून तुमच्या आमच्यातील सामान्य आणि निष्पाप माणूस असतो आणि प्ररीस्थिती समोर अगतिक असतो. डॉक्टर सर्व समजूनही काहीही करू शकत नाहीत आणि ते सुद्धा तितकेच अगतिक असतात. कालच माझ्या वाहिनीची मैत्रीण आली होती. तिच्या वडिलांना बद्धकोष्ठ आणि दम लागत होता म्हणून त्यांची तपासणी केली असता त्यांना मोठ्या आतड्याचा कर्करोग आढळला आणि तो यकृतात आणि फुप्फुसात पसरला आहे, त्यांच्या जवळ फार तर ३-४ महिने आहेत. हा निर्दोष आणि निष्पाप माणूस आहे आणि त्याचे मरण पाहणे हि शिक्षा डोक्तार्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नियतीने दिलेली आहे. याचे कणाकणाने वर्णन एखादा डॉक्टर आणि लेखक करेल तर ते जास्त भावेल( मी लेखक नाही आणि ते मला जमणारे नाही) तेंव्हा एखाद्याने दहशतवादासारख्या मानवतेविरुद्ध केलेल्या गुन्ह्यात असे भावनाविवश लिखाण नंने हि गोष्ट चुकीची आहे. जाता जाता -- एखाद्या गरीब मुसलमान माणसाने आपल्या मुलीवर होणारा बलात्कार टाळण्यासाठी जर दोन खून केले तर त्याला हे विचारवंत एवढी कायद्यातील पळवाटा काढायला मदत करतील का? यात सर्व राजकारण आणि पैसा याची घाण येते आहे. अल्पसंख्यांक म्हणून सलमान खान रस्त्यावरील लोकांना मारून आजही बाहेरच आहे मग अलीस्तीर परेरा अल्पसंख्यांक नव्ह्ता का? कि ख्रिश्चन लोक कमी पातळीचे आहेत. http://www.huffingtonpost.in/2015/05/06/alistair-pereira-sanjeev-nanda_n_7220000.html या सुडोसेक्युलर लोकांच्या दुटप्पीपणाचा संताप येतो. पैसा किंवा राजकीय लाभ असेल तेंव्हा त्यांना मानवतावादाचा कळवळा येतो.
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट
स
सुबोध खरे Wed, 07/29/2015 - 22:05 नवीन
+1
स
स्पार्टाकस गुरुवार, 07/30/2015 - 02:19 नवीन
मेमनचा सुटकेचा शेवटचा मार्ग संपला! चेकमेट!
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 07/30/2015 - 03:53 नवीन
याकुबला मिळालेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर अंमलबजावणी झाली आहे. समाधान वाटतय.
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/30/2015 - 04:22 नवीन
याकुबला फाशी दिल्या गेली समाधान वाटलं. विषय संपला. फाशी देऊ नये, तो मुस्लिम म्हणून फाशी दिल्या गेली असे विधानं करणा-यांवर गुन्हे दाखल करून यांना उठता येणार नाही असे फटके देणा-या पोलिसांच्या ताब्यात देता येईल अशी काही कायद्यात तरतुद हवी असे वाटते. -दिलीप बिरुटे
ख
खटपट्या गुरुवार, 07/30/2015 - 07:12 नवीन
हेच म्हणतो !!
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अर्धवटराव गुरुवार, 07/30/2015 - 04:46 नवीन
खरच ? कि नवीन चाप्टर सुरु होणार ? अजुन किती बळी घेईल हि आग :(
D
dadadarekar गुरुवार, 07/30/2015 - 06:41 नवीन
जातीय दंग्ल , धार्मिक दंगल यासाठी फाशेचीच्शिक्षा योग्य आहे.
स
सुबोध खरे गुरुवार, 07/30/2015 - 07:17 नवीन
जगन्नाथन यांचा उत्कृष्ट आणि वास्तववादी लेख http://www.firstpost.com/politics/yakub-memon-hanged-four-lessons-india-2371040.html
अ
अद्द्या गुरुवार, 07/30/2015 - 07:20 नवीन
फाशी कायम . बाकी कोणी कितीही काहीही म्हणोत . हवं तर आसुरी आनंद म्हणा . पण खूप बरं वाटलं . आता फक्त ते फाशी रद्द करायला सह्या दिलेले लोक आणि टीवी वर येउन ओकलेले लोक . यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून केस चालवा कोणी तरी. माजलेत साले
भ
भिंगरी गुरुवार, 07/30/2015 - 07:22 नवीन
कलाम सरांच्या जाण्याचे दु;ख तर आहेच पण त्यांच्या सारख्या निस्सीम देश भक्ताच्या अंतिम यात्रेच्या दिवशी आम्हाला एका कट्टर देशद्रोह्याच्या मृत्युच्या बातम्याच जास्त पाहाव्या लागल्या याचे दु;ख जास्त झाले. सकाळपासून फक्त 'तो' आणि 'तोच' . एका माजी राष्ट्रपतीपेक्षा 'तो' महत्वाचा होता का? भले त्याच्या विषयीच्या बातम्या देणे गरजेचे असेल पण त्या फिरत्या पट्टीवर दाखवून कलाम साहेबांचे (जसे आता दाखवत आहेत)अंतिम दर्शन दाखवले असते तर 'त्याला' अवास्तव महत्व मिळाले नसते.
स
सुबोध खरे गुरुवार, 07/30/2015 - 07:48 नवीन
भिंगरी ताई दोघेही धर्माने मुसलमानच एकाचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून लष्करी अधिकारी अभिमानाने खांद्यावर घेऊन वायुसेनेच्या विमानाने नेतात दुसर्याचे पार्थिव चोरासारखे काळ्या कापडात गुंडाळून न्यावे लागते. एकाच्या दर्शनासाठी लोकांची रीघ लागते. दुसर्याचे पार्थिव येणार म्हणून हजारो पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा लागतो. एकाच्या मृत्यूमुळे आदराने डोके झुकते दुसर्याच्या फाशीमुळे शरमेने मन खाली जाते. एकाच्या मृत्यूमुळे आपल्या कुटुंबातील एक व्यक्ति( आपलेच आजोबा) गेल्या इतके दुःख होते दुसरा हरामखोर मेल्याने सुटकेचा निः श्वास सोडला जातो. एक आयुष्यभरासाठी हृदयात मखर करून बसेल दुसरा उद्या -कोण? म्हणून विचारावे लागेल कोणते मरण सार्थक आहे?
↩ प्रतिसाद: भिंगरी
ऋ
ऋतुराज चित्रे Fri, 07/31/2015 - 09:07 नवीन
अपवाद फक्त 'टाइम्स नाऊ' चा. काल तेथे नेमके उलटे चित्र होते. फक्त कलामसाहेबांचे दर्शन व बातम्या.
↩ प्रतिसाद: भिंगरी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/30/2015 - 07:22 नवीन
पहाटे चार पर्यन्त कोर्टात युक्तिवाद चालले, भारतात गुन्हेगाराला वाचविण्यासाठी असा प्रकार पहिल्यांदाच झाला असे वाटते, गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी असे रात्रं दिवस कोर्ट चालले असते तर असे विस विस वर्ष गुन्हेगारांना पोसावं लागलं नसत ""भाई ये कैसा मजाक चल रहा अपने देश में। ये कोर्ट है या चौक के बाबा जी की पान की दूकान ? की जब मर्जी अधी रात को शटर खुलवा के 2 गोल्ड फ्लेक ले लिये" -दिलीप बिरुटे
स
सुबोध खरे गुरुवार, 07/30/2015 - 07:28 नवीन
या सुडोसेक्युलर लोकांच्या हट्टापायी सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीश( अगोदर सरन्यायाधीश आणि त्यांच्या आदेशाने तीन न्यायाधीशांचे पूर्णपीठ ) आणि महा अधिवक्ता ( Attorney General) यांनी मध्य रात्री अडीच वाजता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडून न्यायदान केले. अशी सुविधा एखाद्या गरिबासाठी हे बोकड (सुडोसेक्युलर) उपलब्ध करून देतील काय? http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/yakub-memon-execution-time-line-of-last-ditch-efforts-of-1993-mumbai-blasts-convict/articleshow/48275900.cms
V
vikramaditya गुरुवार, 07/30/2015 - 07:33 नवीन
These blood thirsty people will hang him tomorrow. If so called legal pundits say so - what else can you expect from fanatics and opportunists?
D
dadadarekar गुरुवार, 07/30/2015 - 07:57 नवीन
१९९३ चे बॉम्बस्फोट ही दंगलीनंतरची 'रिअॅक्शन' होती. त्यामुळे 'रिअॅक्शन'ला शिक्षा होते मग 'अॅक्शन'ला शिक्षा का नाही?, असा सवाल समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी याकूब मेमनच्या फाशीनंतर केला आहे. दाऊद असोत नाहीतर याकूब मेमन. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून निष्पापांचे प्राण घेणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी मात्र संपूर्ण परिस्थिती लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. मुंबईत १९९३ मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते त्याआधी जातीय दंगल उसळली होती. या दंगलीत २५०० बळी गेले होते. या दंगलीची 'रिअॅक्शन' म्हणून बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. आज याकूबच्या फाशीने बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना शिक्षा दिली गेली आहे. मात्र ज्यांनी दंगल घडवून जातीय तणावाची ठिणगी टाकली त्यांचे काय?, त्यांना अशी शिक्षा का नाही?, असा सवाल आझमी यांनी माध्यमांशी बोलताना केला
ख
खटपट्या गुरुवार, 07/30/2015 - 08:28 नवीन
दादा दरेकर, अबू आझमी आणि ओवेसी सारखे मुर्ख लोक असे बरळत असतात. खेदाची गोष्ट ही आहे की तुमच्या सारखी शिकली सवरलेली माणसे त्यांच्या वक्तव्यांना महत्व देतात. आता जनताही ओवेसी आणि अबू आझमीच्या बडबडीकडे दुर्लक्ष करते. म्हणतात की शिक्षण माणसाला शहाणं बनवते. पण खेदाने म्हणावेसे वाटते की चार्टर्ड अकांउंट सारखे शिक्षण घेतलेला तरूण ज्याने आपल्या कुटूंबाला दीशा द्यायला पाहीजे तो अशा देशविघातक क्रुत्यांमधे गुंतला. कोणाच्या वक्तव्याला किती महत्व द्यायचे ते आपण ठरवुया..
↩ प्रतिसाद: dadadarekar
अ
अनुप ढेरे Fri, 07/31/2015 - 07:11 नवीन
मुंबई बॉम्बस्फोट हे बाबरी पाडल्याची आणि नंतरच्या दंगलीची रिअ‍ॅक्षन होती हे चूक आहे काय?
↩ प्रतिसाद: खटपट्या
प
प्यारे१ Fri, 07/31/2015 - 09:27 नवीन
बाबरी ढाँचा मध्ये मशिदीमध्ये चालतात तशा प्रकारची कुठली सत्कृत्ये होत होती? ती कधीपर्यंत सुरु होती? कधी कोर्ट केस सुरु झाली? ती संपली का? संपली नसल्यास निकालापूर्वी तिथलं कुलुप कोणी उघडलं? का उघडलं? मुंबई दंगल कशी सुरु झाली? राधाबाई चाळ नाव ऐकलंय का? तिला आग कशी लागली? किती लोक मेले? कुठल्या धर्माचे लोक मेले? बाबरी ढांचा पाडताना किती आणि कुठल्या धर्माचे लोक मेले? नंतरच्या दंगलीमध्ये किती आणि कुठल्या धर्माचे लोक मेले ? मुंबई दंगली आधी किती धार्मिक दंगली वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या होत्या? त्यातले आंकड़े काय सांगतात? बाबरी ढांचा पडला तोवर भारतात किती मशिदी पडल्या आणि त्या बरोबर किती देवळं पाडली गेली?
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Fri, 07/31/2015 - 10:11 नवीन
बाबरी पाडणं => मुंबै दंगली => मुंबै बॉम्बस्फोट हा घटनाक्रम आहे. नंतरच्याचा घटनांचा पहिल्याशी संबंध नाही हे धादांत खोटं आहे. खरोखर बदला होता वा बॉम्ब फोडायला कारण मिळालं. पण बाबरी पाडल्याने हे सगळं ट्रिगर झालं हे नक्की.
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Fri, 07/31/2015 - 10:22 नवीन
बाबरी पाडण्यापूर्वी कधी दंगली झाल्या नाहीत? मुळात हिन्दू उत्तर देऊ शकतो हे बाबरी पाडण्यातून सिद्ध झालं. तोवर मार खाणं किंवा मरणं हेच मुख्यत्वे नशिबी होतं. नंतर दंगली केल्या गेल्या तेव्हाही रोखठोक उत्तर मिळालं. या सगळ्या घटनांमुळं सैरभैर झालेल्या लोकांनी चिरडीला येऊन बॉम्ब स्फोट घडवले. 93 साठी बाबरी हे मान्य करु एक वेळ. 2006 ला मुंबई ट्रेन ब्लास्ट साठी काय कारण होतं हो???
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
श
श्रीगुरुजी Fri, 07/31/2015 - 10:43 नवीन
>>> 2006 ला मुंबई ट्रेन ब्लास्ट साठी काय कारण होतं हो??? १९८४ आणि १९६९ मधील मुम्बईतील दंगली; १९६८, १९७४ आणि १९८८ मधील पुण्यातील दंगली इ. दंगली बाबरी प्रकरणापूर्वीच झालेल्या होत्या. दंगल ही पूर्वनियोजित असते. कोणते तरी निमित्त वापरून पुर्वनियोजित दंगल केली जाते. १९९२-९३ मधील दंगल अशीच पूर्वनियोजित होती. बाबरी केवळ निमित्तमात्र. बाबरी प्रकरण झाले नसते तरी दंगल झालीच असती. तसेच बॉम्बस्फोट देखील झाले असते. १९८० च्या दशकात माफियांनी व दंगलखोरांनी पारंपारिक शस्त्रांच्या बरोबरीने बॉम्ब वापरायला सुरूवात केली. त्याचा पुढे अधिकाधिक व सफाईने वापर होत गेला.
↩ प्रतिसाद: प्यारे१
श
श्रीगुरुजी Fri, 07/31/2015 - 10:32 नवीन
>>> पण बाबरी पाडल्याने हे सगळं ट्रिगर झालं हे नक्की. बाबरी मुद्दा चर्चेत सुद्धा नव्हता (म्हणजे १९८६ च्या आधीच) त्याच्या आधीपासून मुम्बई व देशात इतरत्र असंख्य भीषण दंगली झालेल्या होत्या आणि बॉम्बस्फोट देखील झालेले होते. बाबरी पडली नसती तरी दंगली, बॉम्बस्फोट झालेच असते.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Fri, 07/31/2015 - 10:40 नवीन
या स्केलचे कुठले स्फोट आधी झाले होते? आणि बॉम्ब लावणार्‍यांपैकी एकाने हे सांगितलय की बाबरी आणि दंगली याचा बदला घेण्यासाठी बॉम्ब लावले.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 07/31/2015 - 10:47 नवीन
>>> या स्केलचे कुठले स्फोट आधी झाले होते? दिल्लीत १९८४ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या ट्रान्झिस्टर बॉम्बच्या स्फोटात ७० हून अधिक नागरीक मृत्युमुखी पडले होते. >>> आणि बॉम्ब लावणार्‍यांपैकी एकाने हे सांगितलय की बाबरी आणि दंगली याचा बदला घेण्यासाठी बॉम्ब लावले. दंगल करणारे आणि बॉम्बस्फोट करणारे आपल्या कृत्यांच्या समर्थनार्थ वेगवेगळी कारणे शोधत असतातच. त्यांना १९९२ पर्यंत काश्मिरचा मुद्दा हे कारण पुरलं. १९९२ ते २००२ पर्यंत ते बाबरी हे कारण वापरत होते. २००२ पासून गुजरात हे कारण वापरात आहे. भविष्यात वेगळे कारण वापरणे सुरू होईल.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
म
मदनबाण Fri, 07/31/2015 - 10:52 नवीन
गुरुजी, आझाद मैदान हिंसा आणि "अमर जवान" स्मारक तोडण्या मागचे कारण काय हो ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-Chandan Sa Badan... :- Saraswatichandra
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 07/31/2015 - 11:08 नवीन
>>> गुरुजी, आझाद मैदान हिंसा आणि "अमर जवान" स्मारक तोडण्या मागचे कारण काय हो ? देशात इतरत्र झालेल्या दंगली व बॉम्बस्फोट व त्यातून झालेली वित्त व मनुष्य हानी या तुलनेत आझाद मैदान हिंसा/"अमर जवान" हे प्रकरण अगदीच शुल्लक होते. यामागचे कारण म्यानमारच्या सैनिकांनी म्यानमारमध्ये राहणार्‍या निर्वासित बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांची केलेली हत्या हे कारण होते.
↩ प्रतिसाद: मदनबाण
श
श्रीगुरुजी Fri, 07/31/2015 - 09:32 नवीन
>>> मुंबई बॉम्बस्फोट हे बाबरी पाडल्याची आणि नंतरच्या दंगलीची रिअ‍ॅक्षन होती हे चूक आहे काय? होय. हे चूक आहे.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
आ
आनन्दा Mon, 08/03/2015 - 12:57 नवीन
अनुप सर, अभ्यास वाढवा अशी नम्र विनंती. बाँबस्फोटातले आरडीएक्स हे बाबरी ढाचा पाडला जाण्याच्या अगोदर २ महिने अलिबागच्या किनार्‍यावर उतरले गेले होते. आता ते टायगर मेनन वगैरे अंतर्ज्ञानी होते असे म्हणायचे असेल तर भाग वेगळा.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
स
सुबोध खरे गुरुवार, 07/30/2015 - 08:20 नवीन
ओ हितेस राव त्या अबू आझमीचं कसला कौतुक सांगताय? जोड्याने मारण्याच्या पण लायकीचा माणूस नाही. देश के कितनेभी तुकडे हो जाये हम किसीको अपने मजहब से खिल्वाद करणे नाही देंगे म्हणणारा देशद्रोही माणूस हा. तुम्ही त्याच्या तोंडाला तोंड कशाला लावताय?
D
dadadarekar गुरुवार, 07/30/2015 - 08:38 नवीन
पेप्रात आलय आजच्या मटात.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 07/30/2015 - 08:54 नवीन
म टा मध्ये राशिभविष्यात कौटुंबिक कारणासाठी अनावश्यक खर्च होणार आहे आणि वायफळ बोलणे टाळा हे पण लिहिले आहे. खरुज नायटा आणि गजकर्ण वर बी टेक्स मलम वापरा हेही लिहिले आहे. बरं मग?
↩ प्रतिसाद: dadadarekar
प
प्यारे१ गुरुवार, 07/30/2015 - 09:09 नवीन
___/\___
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/30/2015 - 10:06 नवीन
पेपरात लिहीलेलं सगळंच खरं नसतं आणि त्याचा नीरक्षीर विवेक करायला अक्कल लागते ना पण !
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सामान्यनागरिक गुरुवार, 07/30/2015 - 08:29 नवीन
१. पहिली गोष्ट म्हणजे याकुब मेमन विषयी एव्हढी चर्चा कशाला ?समाजातचं ते एक विकृत अंग आहे. उशीरा का होईना व्यवस्थीत कायदे प्रक्रिया राबवुन ते समाजातुन काढुन टाकलं जातंय. त्यात समाधान मानुन शांत रहायला हवे. २. आपण सगळ्ञांनी जर अशीच चर्चा करत राहिलो तर एका विकृतीला महत्व दिल्यासारखे होईल. जेव्ह्ढी चर्चा जास्त तेव्हढेच असेप्रयत्नं चालु रहातील. ३. जे पत्र राष्ट्रपतींना दिले गेले आहे ज्याची एव्हढी चर्चा होतेय, त्यावर फक्त मुस्लीम आमदार, खासदारांच्या सह्या मुस्लीम लोक आपल्या धर्माच्या माणसाला वाचवण्यासांठी हे असं करणारंच.त्यात नवल ते काय ? त्यांना बकी कशाहीपेक्षा धर्म जास्ती प्यारा असते ही गोष्ट सर्वश्रुत आहे. ४. त्याही उपर अश्या लोकांना जाणवु द्यायचे असेल की त्यांचे कृत्य असमर्थनीय आहे तर या लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. त्यांना कुठल्याही सामजिक समारंभांना बोलावु नका. च्यानेलांवर चर्चेस बोलावु नकस, कुठल्याही घडामोडींवर त्यांची प्रतिक्रीया दाखवु नका. थोडक्यात त्यांच्यावर राजकीय, सामाजिक अंधार येईल असे करा. ५. उद्यापासून ही चर्चा थांबवा कारण सकाळी सातनंतर याकुन अस्तित्वात नसेल. उगीचच वाढवण्यात काही अर्थ नाही.
त
तुडतुडी गुरुवार, 07/30/2015 - 09:24 नवीन
@dadadarekar या दंगलीत २५०० बळी गेले होते??? काय टिंग्या सोडताय हो ? कोणी सांगितलं तुम्हाला ? दंगलीत ९०० बळी गेले होते . आणि दंगलीची सुरवात त्या लोकांनी केली होती मशीद पाडल्यानंतर . 'रिअॅक्शन' बद्दलच बोलायचं असेल तर बाबरी मशीद पडणं हि सुधा रिअॅक्शनच होती . इस्लामी धर्मांधतेला , त्या लोकांनी मांडलेल्या उच्छादाला दिलेलं उत्तर होतं ते . आज सुधा अबू आझमी , ओवेसी आणि इतर धर्मांध मुस्लिम ज्या प्रकारे वागतात बोलतात त्यावर हिंदू सुधा रिअॅक्शन देवू शकतात . मग पुन्हा दंगल झाली कि पुन्हा दहशतवादी हल्ला . मग पुन्हा तुम्ही 'रिअॅक्शन' म्हणून गळे काढायला मोकळे . भिंगरी तै चा प्रतिसाद योग्य अहे. आता हि चर्चा बास करावी . त्याच्या फाशीची इतकी publicity करायची गरज नाही असं वाटतंय
D
dadadarekar गुरुवार, 07/30/2015 - 10:15 नवीन
९०० बली गेले असे दिले aàhe. विकि. Dead – 900 (575 Muslims, 275 Hindus, 45 and 5 others). The causes for the deaths are police firing (356), stabbing (347), arson (91), mob action (80), private firing (22) and other causes (4).
↩ प्रतिसाद: तुडतुडी
त
तुडतुडी गुरुवार, 07/30/2015 - 09:50 नवीन
@श्रीगुरुजी नामवंत मुस्लिम ह्यातच सगळं काही आलं . तो काहीही म्हणेल हो . सत्य आपल्यासमोर आहे
ह
होबासराव गुरुवार, 07/30/2015 - 09:55 नवीन
असदुद्दिन औवेसि, मिपा वरील काहि सिरिया रीटर्न माकड आणि ह्यांचेच काहि उतावळे इलेक्ट्रॉनिक मिडियातले जातभाइ (मर्कट ह्या नात्याने) ह्यांच्या मर्कट लिलाना काय उधाण आलय, आता ज्या विमानातुन त्याचे पार्थिव नेले त्याचि सुद्धा शुटींग, त्याच्या नातेवाईंकाचे चेहर्यावर काय हाव्-भाव आहेत ते सुद्ध कॅमेराबध्द. ह्या मीडियावाल्याना म्हणुनच नेपाळ्मधुन पार्श्वभागावर लाथ मारुन हाकलण्यात आले होते.
D
dadadarekar गुरुवार, 07/30/2015 - 10:08 नवीन
The Gujarat government has refused permission to the Supreme Court-appointed SIT to file an appeal in a higher court seeking death penalty for former minister Maya Kodnani in the Naroda Patiya riot case. This was decided on the basis of advocate general Kamal Trivedi's opinion that there was "no direct evidence" against her. Maya Kodnani and Bajrang Dal activist Babu Bajrangi, along with 30 others, were sentenced to life imprisonment in the 2002 post-Godhra Naroda Patiya riot case, in which 96 people were killed. http://m.timesofindia.com/india/Gujarat-govt-asks-SIT-not-to-seek-death-penalty-for-Maya-Kodnani-in-2002-Naroda-Patiya-massacre-case/articleshow/22604162.cms?from=mdr
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/30/2015 - 10:15 नवीन
याकूब मेला, उत्तम झाले. बाकी कोडनानी, बजरंगी वगैरेंना काय माफी द्यावी की काय करावे?
D
dadadarekar गुरुवार, 07/30/2015 - 10:32 नवीन
धार्मिक दंगलीतील प्रत्येक गुन्हेगाराला फाशी व्हावी. मग तो koNatyaàhee धर्माचा असो.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सुबोध खरे गुरुवार, 07/30/2015 - 16:52 नवीन
ओ हितेस बुवा धार्मिक दंगल करणे आणी देशाविरुद्ध (परदेशातून मदत घेऊन) युद्ध पुकारणे(WAGING WAR) हे दोन वेगवेगळे अपराध आहेत आणी ते एकाच तागडीत तोलताय याचा अर्थ साधा सरळ आहे आपल्याला कायदा नीट माहित नाही. पहिल्यांदा अभ्यास वाढवा.
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar गुरुवार, 07/30/2015 - 20:12 नवीन
परदेशाच्या मदतीने देशाविरुद्ध युद्ध याला फाशीच असते. ...द्।धार्मिक दंगल .... यालाही फाशीच हवी.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा