Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मेंटलेक्चुअलांचे उसासे आणि उमाळे

श
श्रीगुरुजी
Wed, 10/14/2015 - 20:16
🗣 286 प्रतिसाद
४ जुलै २०१० या दिवशी केरळमधील टी जे जोसेफ या प्राध्यापकावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून त्यांचा उजवा हात मनगटापासून कापून टाकला कारण एका प्रश्नपत्रिकेत त्यांनी इस्लामसंबंधी एक प्रश्न विचारला होता व त्या प्रश्नामुळे इस्लामचा अपमान झाला अशी या गटाची समजूत झाली होती. - तेव्हा हे सर्वजण गप्प राहिले. हा धार्मिक हिंसाचार आहे असे त्यांना वाटले नव्हते. २००६ मध्ये खैरलांजी येथे भोतमांगे या दलित कुटुंबातील चौघांची गावातील जमावाने क्रूर पद्धतीने हत्या केली. - तेव्हा यांच्यापैकी कोणीही आपले पुरस्कार परत केले नव्हते. एप्रिल २०१४ मध्ये नगर जिल्ह्यात नितीन आगे नावाच्या दलित तरूणाची आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या झाली. नंतर नगर जिल्ह्यात अशा २-३ घटना घडल्या. - तेव्हासुद्धा यांनी आपले पुरस्कार परत केले नव्हते. हा जातीय हिंसाचार आहे व त्यासाठी सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून पुरस्कार परत करावे असे त्यांना वाटले नव्हते. केरळमध्ये गेल्या काही वर्षात जातीय/धार्मिक हिंसाचारातून अनेक हत्या झाल्या आहेत. - तेव्हा यांनी मौन पाळले. आणि आता . . . गेल्या काही दिवसात काही जणांनी साहित्य अकादमीने दिलेले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांचे गेल्या २ वर्षात झालेले खून आणि काही दिवसांपूर्वी जातीय हिंसाचारातून उत्तर प्रदेशातील दादरी येथे झालेल्या हत्येचा निषेध म्हणून हे "साहित्यिक विचारवंत" अस्वस्थ झाले आहेत व त्यामुळे सरकारचा निषेध म्हणून ही मंडळी पुरस्कार परत करणार आहेत. यातल्या बहुतेकांची नावे आजतगायत ऐकण्यात आलेली नाहीत यात महाराष्ट्रातील काही साहित्यिक आहेत. त्यात प्रज्ञा पवार या एक साहित्यिका आहेत. खैरलांजी व नगर जिल्ह्यातली दलित हत्यांकांडे घडली तेव्हा त्यांनी पुरस्कार परत केला नव्हता. यात नयना सहगल नावाच्या एक लेखिका आहेत. पंडीत नेहरूंची भाची ही त्यांची ओळख. त्यांना १९८६ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार ज्या सरकारच्या काळात मिळाला त्याच सरकारच्या काळात ३००० शिखांची हत्या झाली होती व त्याच काळात शहाबानो प्रकरण घडले होते. परंतु त्यावेळी निषेध म्हणून पुरस्कार नाकारावासा त्यांना वाटला नाही. १९८६ नंतर आजतगायत अनेकवेळा जातीय हिंसाचार झाला. तेव्हाही त्या गप्प होत्या. आज अचानक त्यांना संपूर्ण देशात जातीय वातावरण निर्माण झाले असून साहित्यिकांची गळचेपी होत आहे असा शोध लागला. मग आता नक्की असे काय घडले की त्यांना अचानक स्वातंत्र्याचे आणि जातीयवादविरोधी विचारांचे उसासे आणि उमाळे येऊ लागले आहेत? यांचे खरे दु:ख या हत्या नसून जे कधीही सत्तेवर येऊ नयेत असे वाटत होते ते मोदी सत्तेवर आले आहेत हे यांचे खरे दु:ख आहे. मोदींच्या प्रत्येक कृतीला हे लोकशाहीविरोधी, संघविचार लादणारी कृती इ. ठरवून मोकळे होतात. अमर्त्य सेनना वयाच्या ७८ व्या वर्षी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरूपद मिळाले आणि ३ वर्षानंतर २०१५ मध्ये मुदत संपल्यावर वयाच्या ८१ व्या वर्षी यांना नव्याने मुदतवाढ न मिळाल्यावर लगेच मोदी विद्यापीठावर हिंदुत्व लादणारे ठरतात. आपले वय किती आणि आपल्याला एक टर्म मिळाल्यावर दुसर्‍या टर्मचा मोह का असे प्रश्न कधी यांच्या मनात येतच नाहीत. एफटीआयआय मध्ये गजेंद्र चौहानची नेमणूक राजकीय नेमणूक असते पण सईद मिर्झा (यांनी वाजपेयींविरूद्ध निवडणुक लढविलेली होती आणि नंतर मोदी पंतप्रधान होऊ नयेत यासाठी सह्यांची मोहीमही चालविली होती), अनंतमूर्ती (मोदी पंतप्रधान झाले तर भारतात रहावेसे वाटणार नाही असे यांनी सांगितले होते) इ. नेमणुका राजकीय आहेत असे कधी यांच्या मनात सुद्धा येत नाही. एकंदरीत या मेंटलेक्चुअलांचा निषेध आणि विरोध सेलेक्टिव्ह असतो. फक्त ठराविक प्रसंगात यांना उसासे आणि उमाळे येतात आणि इतर प्रसंगात हे सोयिस्कर मौन पाळतात. या विषयावर खालील लेख खूपच मार्मिक आहे. http://www.loksatta.com/aghralekh-news/as-compare-to-dadri-more-dangerous-murders-happens-1149432/
वर्गीकरण
राजकारण
साहित्यिक
निषेध

प्रतिक्रिया द्या
54637 वाचन

💬 प्रतिसाद (286)
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 10/15/2015 - 08:59 नवीन
ओ दादा. जरा हे पण बघा--- १. २१ मे १९९१ रोजी राजीव गांधींची हत्या झाली. देशात निवडणुकांची घोषणा आणि नियोजन आधीच झाले होते.मतदानाचा एक टप्पा २० मे रोजी झालाही होता. पण राजीव गांधींची हत्या झाली आणि दुखवटा आला म्हणून उरलेल्या दोन टप्प्यांचे मतदान १२ आणि १५ जून रोजी घेण्यात आले. २. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत बॉम्बस्फोट झाले. १४ मार्चपासून मुंबईतच चॅम्पिअन करंडक हॉकी स्पर्धा होणार होती. त्याची घोषणा आणि नियोजन पूर्वीच झाले होते. इंग्लंडचा संघ मुंबईत दाखलही झाला होता.पण बॉम्बस्फोटांमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. ३. ३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात भूकंप झाला. ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा होणार होत्या.त्या पुढे ढकलण्यात आल्या. ४. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाली.त्यावेळी भारताचा क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौर्‍यावर होता. त्यानंतर (मला वाटते २ किंवा ३ नोव्हेंबरला) एक एकदिवसीय सामना होणार होता. पण तो सामना रद्द करण्यात आला. लगेच आठवली ती ही चार उदाहरणे. आणखी कित्येक उदाहरणे नक्कीच असतील. विशेषतः भोपाळ वायुगळतीसारखी मोठी घटना घडते तेव्हा सर्व सरकारी प्रशासन त्याच कामामागे असते. अशावेळी इतर गोष्टी दुय्यम समजून त्या पुढे ढकलल्या जातात. एका कवीसंमेलनापेक्षा देशात निवडणुका घेणे हे नक्कीच कितीतरी पटींनी मोठे आणि महत्वाचे काम आहे. तरीही राजीव गांधींच्या हत्येमुळे दुखवटा आला आणि त्या निवडणुकाही पुढे ढकलल्या गेल्या. भोपाळ वायुगळतीनंतर देशात दुखवट्याचीच परिस्थिती होती (प्रत्यक्ष दुखवटा जाहिर केला होता की नाही हे मला माहित नाही) . किमान सुखवटा तर नक्कीच नव्हता, बरोबर?
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar गुरुवार, 10/15/2015 - 09:12 नवीन
एका दुर्घटनेनंतर पुढचे कार्यक्रम टाळणे किंवा न टाळणे याचे निर्णय स्थलकालपरिस्थितीवर असतात. निवडणुकीत एखाद्या पक्षाला सहानुभूती मिळू नये म्हणून त्या टाळल्या असणार.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सुबोध खरे गुरुवार, 10/15/2015 - 09:26 नवीन
हा हा हा हि हि हि
↩ प्रतिसाद: dadadarekar
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 10/15/2015 - 09:29 नवीन
प्रश्न बेगडी संवेदनशीलतेचा आहे. भोपाळ वायुगळती हे जगातल्या सर्वात भीषण औद्योगिक अपघातांमध्ये एक समजलं जातं. तेव्हा संपूर्ण देश हादरला होता. गॅरीभाऊंच्या प्रतिसादानुदार अशोक वाजपेयी भोपाळमध्येच नियुक्त होते. त्यांचं राज्य आणि शहर इथे असला प्रकार झाल्यावर कार्यक्रम रद्द करणं, किमान पुढे ढकलणं अपेक्षित होतं. पण तसं केलं नाही आणि आता यांची संवेदनशीलता जागी होते हा नक्कीच Selective Apology चा प्रकार आहे. रच्याकने वाजपेयी अर्जुनसिंग यांच्या जवळचे होते. तेच अर्जुनसिंग ज्यांनी युनियन कार्बाईडचा सीईओ वाॅरन अँडरसनच्या भारतातून पलायनाला मदत केली होती.
↩ प्रतिसाद: dadadarekar
प
प्रदीप गुरुवार, 10/15/2015 - 15:02 नवीन
जुन्या आठवणी, अचूक, व नको त्या वेळी सविस्तर करून देणार्‍या लोकांचे (इथे हे गॅरी ट्रुमन, आणि इतरस्त्र भाउ तोरसेकर) ह्यांनी आम्हाला अतिशय अडचणीत आणावयाचा चंग बांधलेला दिसतो. ह्याणे काय करावे बरे?
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 10/15/2015 - 15:12 नवीन
साष्टांग दंडवत :) :)
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गामा पैलवान गुरुवार, 10/15/2015 - 15:37 नवीन
.
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/15/2015 - 16:02 नवीन
नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण प्रतिसाद ! "मी तुझी पाठ खाजवतो, तू माझी पाठ खाजव" आणि "आपण आपले हितसंबंध वापरून स्वार्थ साधला तरी उल्लू जनतेला ते कधीच कळणार नाही आणि कळलेल्च तर दडपशाही करून लोकांची तोंडे बंद करता येतातच." या दोन तत्वांवर भारतीय राजकारण चालते हे जगजाहीर आहे. शिवाय धडधडीत खोटे बोलून व त्याचा आपल्या पित्त्यांकरवी पाठपुरावा करून तेच केवळ सत्य आहे हे सिद्ध करण्यात भारताचा हात धरणारे दुसरे राष्ट्र क्वचितच दिसेल (अर्थात काही सन्मानिय अपवाद वगळता... ज्यांना या जगात फेल्ड स्टेट्स म्हणतात).
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मूकवाचक गुरुवार, 10/15/2015 - 16:06 नवीन
_/\_
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी गुरुवार, 10/15/2015 - 17:30 नवीन
लेखातील सर्वच मुद्द्यांशी सहमत आहे. असले उसासे आणि उमाळे टाकणार्‍या साहित्यिकांपैकी एक-- अशोक वाजपेयींचा पूर्वेतिहास बघितला तर थक्क व्हायला होईल.
गॅरी ट्रुमन, जबरदस्त माहितीपूर्ण प्रतिसाद! अशोक वाजपेयींबद्दल इतकी माहिती नव्हती. भारत भवन संदर्भात अर्जुनसिंगांचे भ्रष्टाचाराचे एक प्रकरण बाहेर आल्याचे अंधुकसे आठवते, परंतु त्यामागे इतका मोठा इतिहास आहे याची कल्पनाच नव्हती. प्रतिसादाशी संपूर्ण सहमत आहे हे वेगळे सांगायला नकोच.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
वेल्लाभट गुरुवार, 10/15/2015 - 08:06 नवीन
अहो मग पुरस्कारच कशाला? पासपोर्टच सरेंडर करा ना! पुरस्कार परत करून ना तुमचं काही जातंय, ना लोकांना त्याचं काही वाटतंय. उगीच मोठेपणा घेण्यासाठी हे असले विरोध, त्याग बिग करायचे. आणि लोकं सूज्ञ आहेतच की, याचा कर्ता करविता कुणीतरी वेगळाच आहे हे समजायला.
व
विजुभाऊ गुरुवार, 10/15/2015 - 08:33 नवीन
भारताची फाळणे झाली तेंव्हा नव्हते का आठवले कोणाला पुरस्कार परत करायचे?
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 10/15/2015 - 08:51 नवीन
पुराव्यासकट माप पदरात घालण्याच्या कृतीचा निषेध म्हणून मी आज इयत्ता पहिलीत वेशभूषा स्पर्धेत पुरस्कार म्हणून मिळालेला खोडरबर आज परत करत आहे. त्याबरोबर मिळालेल्या ५० रुपयांची भेळ आणि पाणीपुरी खाल्ल्यामुळे ते परत करू शकत नाही. त्याच्यासाठी अजून कुणीतरी अन्याय करा रे! शक्यतो वैचारिक स्वातंत्र्याचं उल्लंघन वगैरे केलंत तर फारच छान.
न
नाखु गुरुवार, 10/15/2015 - 08:53 नवीन
भेळ मला पण खायला दिल्याने मी ही त्यात वाटेकरी आहे आणि त्याकरीता मी दोन तासाचा अखंड उपवास करणार आहे. धन्यवाद
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
य
योगी९०० Fri, 10/16/2015 - 08:03 नवीन
अखंड या शब्दामुळे तुम्ही तो उपवास श्रीखंड चाटून सोडणार असे उगाचच मला वाटून गेले. बाकी काहीही हा श्री..!! (हे़ मी श्रीखंडाला लिहीले आहे).
↩ प्रतिसाद: नाखु
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 10/15/2015 - 09:18 नवीन
धन्यवाद धागा काढल्याबद्दल! अगदी अशाच आशयाचा धागा लिहायला घेतला होता! अगदी सहमत मुद्द्यांसोबत! बाकी कुमार केतकर (पद्मश्री?), कुमार सप्तर्षी वगैरे मंडळी अजून पुरस्कार परत करणाऱ्यांच्या यादीत बाकी आहेत. बाकी वाक्यावाक्याला फटक्यात झोपताना बघायला वाट बघावी लागणार! शेवटी धागा मोदी समर्थक वि. मोदी विरोधक असा संपू नये अशी आशा.
ख
खटपट्या गुरुवार, 10/15/2015 - 09:53 नवीन
त्या शोभा ताईडे यांना काही पुरस्कार मिळालाय का आजपर्यंत ? असेल तर कुरीअर कंपनीचा माणूस पाठवायला तयार आहे मी पुरस्कार गोळा करायला...
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 10/15/2015 - 11:23 नवीन
त्या वडापाव केसवर - "त्यांना रागावू नका" (कि तत्समच काहीतरी) असं मा. कोर्टाने सरकारला सांगितलं असल्याची बातमी काल ऐकण्यात आली.
↩ प्रतिसाद: खटपट्या
क
कानडा गुरुवार, 10/15/2015 - 10:16 नवीन
एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे दादासाहेब अजुन ट्रुमन भाऊंच्या पुराव्यांना "ईंडिया टुडे म्हणजे भाजप चे कारस्थान असणार" असे नाही म्हणाले.
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 10/15/2015 - 10:20 नवीन
नोव्हेंबर १९९७ मध्ये गुजराल सरकारने प्रसारभारती बोर्डवर सहा सदस्यांची नियुक्ती केली होती. त्यापैकी २ सदस्य दर तीन वर्षांनी निवृत्त होणार अशी तरतूद होती. त्याप्रमाणे नोव्हेंबर १९९९ मध्ये वाजपेयी सरकारने रोमिला थापर आणि अन्य एका सदस्याला निवृत्त करून त्यांच्या जागी दोन नवे सदस्य नेमले. डाव्या विचारांच्या सदस्याला वाजपेयी सरकारने जाणूनबुजून निवृत्त केले म्हणून मोठा गदारोळ उडला होता.त्यावेळी अरूण जेटली माहिती आणि प्रसारणमंत्री होते. त्यावेळी त्यांनी एक सूचक वाक्य म्हटले होते---When a communist comes in, nobody sees any politics in that. But when a communist goes out, everybody sees politics in that. असल्या लोकांच्या ब्लॅकमेलिंगकडे मोदी सरकारने अजिबात ढुंकूनही लक्ष देऊ नये इतकेच काय तर अशा संस्थांमध्ये आणि पुरस्कारांमागे जो घाणेरडा चाटुगिरीचा प्रकार चालतो त्याचा खंबीरपणे बिमोड करावा असे फार वाटते.
व
विनोद१८ गुरुवार, 10/15/2015 - 21:39 नवीन
असल्या लोकांच्या ब्लॅकमेलिंगकडे मोदी सरकारने अजिबात ढुंकूनही लक्ष देऊ नये इतकेच काय तर अशा संस्थांमध्ये आणि पुरस्कारांमागे जो घाणेरडा चाटुगिरीचा प्रकार चालतो त्याचा खंबीरपणे बिमोड करावा असे फार वाटते.
अगदी तसेच होइल पण त्यांची ( असल्या लोकांची ) योग्य त्या ठिकाणी व योग्य पातळीवर दखल ही घेतली जाईलच, यात काही शंका नको. चार दिवसांची नाटके आहेत ती, केवळ प्रसिद्धीचा सोस म्हणुनच हे सगळे चाळे चालविले आहेत या पुरोगाम्यांनी. मोदी व हिंदु यांना शिव्या घाला, मिडीयाचा प्रकाश्झोत आपल्यावर ओढा व स्वस्त प्रसिद्धी मिळवा असा सगळा हा खेळ आहे. यांचा हा खेळ एव्हाना आता जनतेच्याही लक्षात आला असेल. तसेच यांचा हा कांगावखोरपणा म्हणजे हल्ली यांच्या फाटक्या झोळीत मोदी सत्तेत आल्यापासुन अगदी चुकूनही कधी काही उष्टे-खरकटेसुद्धा पडत नसावे म्हणुन उपासमारीने होत असलेली काव काव आहे असे खुशाल समजावे. ढोंगी लेकाचे.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
क
कपिलमुनी गुरुवार, 10/15/2015 - 10:53 नवीन
एप्रिल २०१४ मध्ये नगर जिल्ह्यात नितीन आगे नावाच्या दलित तरूणाची आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या झाली. >> त्या तरूणाची प्रेमप्रकरणातून हत्या झाली की तो केवळ दलीत होता म्हणून झाली ? त्याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते , त्याने तिला पत्रे लिहली ज्यावर प्रतिक्रिया म्हणून तिच्या भावाने आणि त्याच्या मित्रांनी त्याला मारहाण केली . ( मारहाणीचे समर्थन करायचे नाही) . झाले ते दुर्दैवी आणि चुकीचे होते याम शंकाच नाही. पण प्रेमप्रकरणातून घडलेल्ल्या हत्येला दलीत हत्याकांडाचा मुलामा का द्यायचा ? त्या जागी दुसरा जातीमधला मुलगा असता तरी मारहाण झालीच असती अणि अशा घटना आजूबाजूला होतात पण इथे त्याला जातीय रंग दिला गेला .
व
विक्रान्त कुलकर्णी गुरुवार, 10/15/2015 - 11:13 नवीन
ज्याला तथाकथीत 'पुरोगामी' नेहमी दलीत हत्या हे सम्बोधन देतात ती मुळात दलीत हत्या असते का ? याचा शोध घेतला जातो का ? कुठेही दलीत हत्येची-अत्याचाराची घटना घडली कि आरोपींवर इतर कलमांबरोबर "ऑट्रासिटी" कायद्याची कलमे लावली जातात. महाराष्ट्रात गेल्या दोन-पाच वर्षांतील दलीत अत्याचार-हत्या प्रकरणांत हेच दिसून येते. बरे प्रकरणाचे पुढे काय होते ते काहिच कळत नाही.मात्र तथाकथित अभ्यासकांच्या व पत्रकारांच्या लेखी "दलित अत्याचारांमध्ये वाढ".
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ए
ए ए वाघमारे गुरुवार, 10/15/2015 - 14:18 नवीन
आजकालची माध्यमे इतकी हायली अनरिलायबल आहेत की सांगणेच नको. माध्यमांनी १० सांगितले की आपण ०१ धरायचा आणि ०१ सांगितला की १० धरायचे असे माझे आजवरचे यशस्वी धोरण आहे.उदा. वरच्या केसमध्ये किती मराठी चॅनेल्सने 'फॉलोअप' स्टोरी चालवल्या ? आजही दादरी केसमध्ये नक्की काय झालं ते कळायला मार्ग नाही.टाईम्स किंवा एनडीटीव्ही अशा बाबतीत अजिबात विश्वासार्ह नाहीत. माध्यमांचे रेप्युटेशन पाहता या प्रकरणात नंतर कधीतरी काही वेगळंच बाहेर येईल अशी शक्यता मला वाटते. आणि असं नंतर काही वेगळं बाहेर आलं की माध्यमे माफीही मागत नाहीत. वर दुसर्‍याला ज्ञान शिकवण्यात मात्र कसूर करत नाहीत. आपल्या बातमी द्यायच्या पद्धतींमुळे हिंसचाराला चिथावणी मिळते हे माध्यमे विशेषत: उत्तरकेंद्रित हिंदी वृत्तवाहिन्या मान्यच करत नाहीत. महाराष्ट्रात त्यामानाने बरी परिस्थिती आहे.उदा. गेल्या रमजानच्या इदच्या आसपास विदर्भाच्या कारंजा शहरात 'दोन समुदायांमध्ये' दंगल झाली.चांगली तीन-चार दिवस संचारबंदी होती आणि ही बातमी ईदेचा सण पाहता पत्रकारितेच्या प्रोटोकॉलला (आणि संभवत: पोलिस/गृहखात्याच्या आदेशांना) अनुसरून मराठी वृत्तपत्रांनी प्लेनली रिपोर्ट केली. मोदी सरकारवर अघोषित आणीबाणीचा आरोप करणारी माध्यमे स्वत:च माहितीचे रेशनिंग करण्यात गुंतलेली आहेत. उदा.कालच्या कारगिल खरेदी घोटाळा व संजीव भट्ट केसबाबत आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या महत्वाच्या निर्णयासंदर्भातील बातम्या 'दाबून'टाकण्यात आल्या. किंवा ज्याच्या जामीनासाठी पुरोगामी पत्रकारांनी उर बडवला,रक्त आटवलं तो तथाकथित नक्षलसमर्थक प्रा.साईबाबा गेल्या आठवड्यात कोर्टात हिअरिंगला अनुपस्थित राहिला याची बातमी कोणीही हायलाईट केली नाही.
↩ प्रतिसाद: विक्रान्त कुलकर्णी
श
शलभ गुरुवार, 10/15/2015 - 13:28 नवीन
कृपया ह्या प्रकरणाची नीट माहिती घ्या आणि मग अश्या कमेंट द्या.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ए
एक सामान्य मानव गुरुवार, 10/15/2015 - 11:01 नवीन
ह्या सुमार सेक्युलर चाटुंचे पितळ उघडे पाडल्याबद्द्ल तुमचे त्रिवार अभिनंदन...
ब
बबन ताम्बे गुरुवार, 10/15/2015 - 11:07 नवीन
सकाळ मधील हा लेखही वाचनीय आहे.
ज
जातवेद गुरुवार, 10/15/2015 - 12:41 नवीन
का कुणास ठाऊक पण मला १८५७ च्या सशत्र उठावाची आठवण झाली. श्रीगुरुजी यांनी वर लिहीलेला संपुर्ण लेख १८५७ च्या भाषेत विडंबन म्हणून परत लिहिता येउ शकतो. "याआधिही भारतीयांवर अन्वनित अत्याचार झाले होते. मग या सालीच(१८५७) ह्यांना काय झालय उठाव करायला? याआधिसुधा अमुक साली इंग्रजांनी असं केलं. त्या तिकडच्या राजाने कि नवाबाने पण तमुक साली तसं केलं. तेव्हा मात्र हे लोक मुग गिळून गप्प का बसले होते? आणि आता कुठं थोड्या काडतुसावर कातडं चढवलं कि भारताच्या कानाकोपर्‍यातून आले लढायला सगळे." वगैरे वगैरे.
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/15/2015 - 13:17 नवीन
हाहाहा! असं थोडक्यात नाही आवरायचं... लिहा आणि टाका बरं! ;)
↩ प्रतिसाद: जातवेद
स
सौंदाळा गुरुवार, 10/15/2015 - 15:03 नवीन
जातवेद : गुरुजींना हाफ वॉली दिली तुम्ही. गुरुजी आता कोणत्या दिशेला षटकार मारतात ते बघण्यास (वाचण्यास) उत्सुक :)
↩ प्रतिसाद: जातवेद
प
प्रदीप गुरुवार, 10/15/2015 - 15:07 नवीन
पण जरा संभाळून. १८५७ सालच्या 'बंडाची' सविस्तर माहिती अगोदर नीट काढून घ्या. अन्यथा पंचाईत होण्याचा संभव आहे.
↩ प्रतिसाद: जातवेद
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 10/15/2015 - 16:45 नवीन
न्हैतर काय ... आधीतर कुणीही हाका गरीब बिच्चारी होती मंडळी
↩ प्रतिसाद: जातवेद
श
श्रीगुरुजी गुरुवार, 10/15/2015 - 19:40 नवीन
का कुणास ठाऊक पण मला १८५७ च्या सशत्र उठावाची आठवण झाली. श्रीगुरुजी यांनी वर लिहीलेला संपुर्ण लेख १८५७ च्या भाषेत विडंबन म्हणून परत लिहिता येउ शकतो. "याआधिही भारतीयांवर अन्वनित अत्याचार झाले होते. मग या सालीच(१८५७) ह्यांना काय झालय उठाव करायला? याआधिसुधा अमुक साली इंग्रजांनी असं केलं. त्या तिकडच्या राजाने कि नवाबाने पण तमुक साली तसं केलं. तेव्हा मात्र हे लोक मुग गिळून गप्प का बसले होते? आणि आता कुठं थोड्या काडतुसावर कातडं चढवलं कि भारताच्या कानाकोपर्‍यातून आले लढायला सगळे." वगैरे वगैरे.
१८५७ पूर्वी भारतीयांवर झालेल्या अत्याचारांचा प्रतिकार अनेकवेळा झालेला होता. तेव्हाही लोक मूग गिळून गप्प बसलेले नव्हते. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे अशा अत्याचाराविरूद्ध लढलेले पहिले युद्ध नव्हते आणि शेवटचे पण नव्हते. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी राणा संग, महाराणा प्रताप, शिखांचे गुरू गोविंद सिंग यांनी तत्कालीन अत्याचारी मुस्लिम राजांविरूद्ध संघर्ष केला होता. टिपू सुलतानविरूद्धही संघर्ष झाला होता. शिवाजी महाराजांनी सिलेक्टिव्ह संघर्ष न करता आदिलशहा, औरंगजेब, पोर्तुगीज, इंग्रज अशा सर्वांविरूद्ध संघर्ष केला. चंद्रराव मोरेसारख्या अत्याचारी स्वकीयाविरूद्धही शिवाजी महाराज लढले होते. १९ व्या शतकाच्या पहिल्या अर्धकात इंग्रजांविरूद्ध काही राजांनी स्थानिक पातळीवर संघर्ष केल्याचा इतिहास आहे. पुण्यातील लहुजी वस्ताद साळवे हे १८५७ पूर्वी इंग्रजांविरूद्ध संघर्ष करणारे आद्य क्रांतिकारक समजले जातात. पुण्यातील मामलेदार कचेरी जेथे आहे तिथे नाईक नावाच्या क्रांतिकारकाला १८५७ पूर्वीच फासावर चढविल्याचा इतिहास आहे. १८५७ पूर्वी लोक मूग गिळून गप्प होते ही चुकीची समजूत आहे.
↩ प्रतिसाद: जातवेद
ब
बोका-ए-आझम Fri, 10/16/2015 - 05:14 नवीन
मी तर असंही वाचलंय (स्पष्टच सांगायचं तर ICSE च्या एका पुस्तकात ) की १८५७ मध्ये उठाव होण्याचं एक कारण म्हणजे लोकांची श्रद्धा की कंपनी सरकारची शंभर वर्षे पूर्ण झाली (१७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून मोजल्यावर) की त्यांची शंभरी भरल्यामुळे हा लढा यशस्वी होईल. यात कितपत तथ्य आहे हे माहीत नाही पण हे असं वाचलेलं आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ज
जातवेद Fri, 10/16/2015 - 08:07 नवीन
तेच तर म्हणतोय. याआधीही असहिष्णू वातावरणाच्या विरोधात लिहलं बोललं जायचं. पण चित्र असं रंगवल जातय कि आताच काय झालय यांना हे सगळं करायला. मी असे म्हणत नाही कि सगळे साहित्यीक प्रामाणिक भावनेतून पुरस्कार परत करत असतिल. यावर चर्चा करण्यापेक्षा, खालिल मुद्दे जास्त महत्वाचे आहेत,
  1. भारतात खरच जास्त असहिष्णू वातावरण तयार होत आहे काय? कट्टर अधिक कट्टर होत आहेत काय?
  2. जर असेल, तर याला खत-पाणी घालणार्‍यांमधे कोणाचा पुढाकार आहे?
  3. एक सरकार म्हणून अशा लोकांच्यावर काय कारवाई करत आहे किंवा याला आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे? हा प्रयत्न ताबडतोब आणि प्रभावी केला जात आहे कि केवळ उपचार म्हणून विलंबाने केला जात आहे?
  4. यामुळी जागतिक स्तरावर भारताची जी प्रतिमा होत आहे त्याचं काय? वाचा India witnessed religiously motivated killings, riots and forced conversion: US report on International Religious Freedom 2014. आता हा रिपोर्ट २०१४ पर्यन्तच्या घटनांचा तयार केला असला तरी त्यानंतर या बाबतीत सुधारणा झाली आहे असे म्हणण्यास वाव नाही. त्यामुळे आजही हा चिंता करण्याचा विषय आहे.
  5. जर असेच चालू राहिले तर सामाजिक द्वेष वाढत जाणार नाही काय? आणि त्याचे फलित काय होईल?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 10/16/2015 - 10:28 नवीन
अगदी हेच म्हणतो. पण सध्या काय झालंय, थोडा जरी वेगळा सूर काढला की शिक्के बसतात. आणि तुम्ही भक्त किंवा द्वेष्टे असणार याबद्दल परस्पर खात्रीच करून घेतात.
↩ प्रतिसाद: जातवेद
ज
जातवेद Fri, 10/16/2015 - 11:37 नवीन
आणि तुमचा इतिहास काढून तुम्ही प्रश्न विचारण्यास लायकच कसे नाही यावर उतारे येतात :)
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 10/16/2015 - 10:27 नवीन
अहो ते विडंबनाचं उदाहरण देताना तसं म्हणले हो की, या आधी कुणी का नाही बोललं. त्यांना स्वतःला तसं म्हणायचं नव्हतं.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मितान गुरुवार, 10/15/2015 - 14:17 नवीन
लेखातील जवळजवळ सर्वच मुद्द्यांशी सहमत.
ज
जेपी गुरुवार, 10/15/2015 - 14:33 नवीन
या सर्व घडमोडींचा णिषेध करुन मी मिपा सत्कार समितीचा राजीनामा देतो.
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/15/2015 - 16:10 नवीन
अर्रार्रा, आसं क्रु ने. मंग ते "आपल्या" लोकांचा सत्कार आणि बक्षिसवाटप कोण कर्णार ???
↩ प्रतिसाद: जेपी
न
नाखु Fri, 10/16/2015 - 08:03 नवीन
झाल्येल्या अक्स्मात समीती बैठकीत कुणाचा तरी निषेध म्हणून हा राजीनामा एक मुखाने फेटाळण्यात आला आहे. आणि सत्कार समीतीची पुढील बैठकीत "विषेश सत्कार समीती" स्थापने बाबत चर्चा करण्याचे ठरविले आहे. आतली बातमी साठी नाखु विथ कॅमेरामन चिमण सह
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अस्वस्थामा Fri, 10/16/2015 - 11:29 नवीन
चिमणाचा कॅमेरा हिरवळीकडे होता नाखूस. बाकी तुमी आलेच नैत त्यात.. ;)
↩ प्रतिसाद: नाखु
इ
इरसाल Fri, 10/16/2015 - 11:31 नवीन
असचं जर असेल तर, तुमच्या कडे जमा असलेले सामान जसे टोप्या, शाली, पटके, साड्या, पुष्पगुच्च, फेटे, बांबु, तरवारी, गुप्त्या, वासे, खलबत्ते व्याजासकट परत करावेत.
↩ प्रतिसाद: जेपी
च
चौथा कोनाडा गुरुवार, 10/15/2015 - 15:12 नवीन
जाहीर निवेदन सध्या भारतात जे काही चालू ते बघून माझे कोमल पुरोगामी हृदय अत्यंत व्यथित झाले असून ह्याचा निषेध म्हणून मी शिशुवर्गात असताना चमचा-लिंबू शर्यतीत मला मिळालेले पारितोषिक परत करत आहे. इतकी वर्षे, इतके धार्मिक दंगे होताना, ८४ मध्ये शिखांचे शिरकाण होताना, गोधरा होताना, मुंबईवर हल्ले होताना, काश्मिरी पंडितांची वाताहत होताना मी कुठे होतो हा प्रश्न मला कृपया विचारू नये. मला आज प्रसिद्धीची २०० टक्के गरज असून माझे नाव आजच्या पिढीला कळावे हा माझा खटाटोप आहे. माझे समाजासाठी काय योगदान व् माझे कार्य काय ते विचारू नये. तसेच मला पुरस्कार कोणाचा नातेवाईक होतो व कोणाची हूजरेगिरि केली म्हणून मिळाला त्याचा शोध करू नये. जर कुणा पत्रकाराला माझी मुलाखत घ्यायची असेल तर कृपया भेटा अथवा लिहा. - असे ढकलपत्र मला कायप्प्पा वअर आएले अहे.
ब
बबन ताम्बे गुरुवार, 10/15/2015 - 15:50 नवीन
नुकतेच मी संदिप वासलेकरांचे "नव्या वाटा शोधताना" हे पुस्तक वाचले. त्यात पाकीस्तान, दहशतवाद आणि त्यांचे भारताबाबतचे धोरण याबद्द्ल सविस्तर लिहीले आहे. मुशरफ, लष्कर, तिथला उच्च वर्ग यांना भारताबरोबर चांगले संबंध नकोच होते. अजून एका गोष्टीचा उल्लेख आहे. मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तान मधे विजय पार्टी साजरी झाली. त्यात काही राजकीय पुढारी, संपादक होते. त्यांनी त्या अतिरेक्यांचे फोनवरून अभिनंदन केले. मग अशी वस्तुस्थिती असताना शिवसेनेने पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्याच्या मुंबईतील पुस्तक प्रकाशनाबाबत प्रखर राष्ट्रवादी भूमिका घेतली तर आपल्याच विचारवंतांना मिरच्या का झोंबाव्या?
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
न
नया है वह गुरुवार, 10/15/2015 - 15:39 नवीन
गॅरी ट्रुमन यांचे प्रतिसाद तर खुपच माहितीपुर्ण !
व
विकास गुरुवार, 10/15/2015 - 16:13 नवीन
आज झी टिव्ही वरील बातमी पाहीली आणि "एक पाऊल पुढे" असे म्हणावेसे वाटले.. दाद्री येथील दुर्दैवी घटनेनंतर १३ दिवसात, त्याच भागात हिंदू - मुस्लीम यांच्यातील सामंजस्य दाखवणारी सुघटना झी टिव्हीने बातम्यांमधे दाखवली. यानुसार तिथल्या दोन मुस्लीम बहीणींच्या लग्नकार्याची जबाबदारी स्थानिक हिंदू समाजाने घेतली. एकीचे मुस्लीम प्रथेत जे काही असेल त्यानुसार कन्यादान देखील केले. सर्व जेवणाची जबाबदारी घेतली आणि पूर्ण शाकाहारी जेवण ठेवले ज्याचे मुस्लीम समुदायाने स्वागतच केले आणि तो भाग सगळ्यात जास्त आवडला म्हणून सांगितले. मुख्य म्हणजे या सर्व प्रकारात त्यांनी तमाम राजकारण्यांना बाजूला ठेवले. तरी देखील स्वतःला सेक्यूलर समजणार्‍या माध्यमांना आणि विचारवंतांना याची दखल घ्यावीशी वाटली नाही, हे दुर्दैवी आहे. असो.
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/15/2015 - 16:28 नवीन
स्वतःला सेक्यूलर समजणार्‍या माध्यमांना आणि विचारवंतांना याची दखल घ्यावीशी वाटली नाही, हे दुर्दैवी आहे. +१०० अश्या गोष्टींमुळे ना टीआरपी मिळतो ना पुरस्कार !
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास गुरुवार, 10/15/2015 - 20:13 नवीन
अश्या गोष्टींमुळे ना टीआरपी मिळतो ना पुरस्कार ! बाकी असे हिंदू-मुस्लीम ऐक्य पाहून ज्यांनी पुरस्कार परत केलेत त्यांना ते खरेच परत करण्याआधी आणि त्याचे पैसे परत करण्याआधी, या ऐक्याचे स्वागत म्हणून पुरस्कार परत घेण्यास हरकत नाही. ते म्हणतात ना काहीतरी, "अगं अगं म्हशी*..." (*म्हैस म्हणले आहे, गाय नाही! उगाच भलता वाद घालायचे काम नाही! ;) )
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा