Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मेंटलेक्चुअलांचे उसासे आणि उमाळे

श
श्रीगुरुजी
Wed, 10/14/2015 - 20:16
🗣 286 प्रतिसाद
४ जुलै २०१० या दिवशी केरळमधील टी जे जोसेफ या प्राध्यापकावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून त्यांचा उजवा हात मनगटापासून कापून टाकला कारण एका प्रश्नपत्रिकेत त्यांनी इस्लामसंबंधी एक प्रश्न विचारला होता व त्या प्रश्नामुळे इस्लामचा अपमान झाला अशी या गटाची समजूत झाली होती. - तेव्हा हे सर्वजण गप्प राहिले. हा धार्मिक हिंसाचार आहे असे त्यांना वाटले नव्हते. २००६ मध्ये खैरलांजी येथे भोतमांगे या दलित कुटुंबातील चौघांची गावातील जमावाने क्रूर पद्धतीने हत्या केली. - तेव्हा यांच्यापैकी कोणीही आपले पुरस्कार परत केले नव्हते. एप्रिल २०१४ मध्ये नगर जिल्ह्यात नितीन आगे नावाच्या दलित तरूणाची आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या झाली. नंतर नगर जिल्ह्यात अशा २-३ घटना घडल्या. - तेव्हासुद्धा यांनी आपले पुरस्कार परत केले नव्हते. हा जातीय हिंसाचार आहे व त्यासाठी सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून पुरस्कार परत करावे असे त्यांना वाटले नव्हते. केरळमध्ये गेल्या काही वर्षात जातीय/धार्मिक हिंसाचारातून अनेक हत्या झाल्या आहेत. - तेव्हा यांनी मौन पाळले. आणि आता . . . गेल्या काही दिवसात काही जणांनी साहित्य अकादमीने दिलेले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांचे गेल्या २ वर्षात झालेले खून आणि काही दिवसांपूर्वी जातीय हिंसाचारातून उत्तर प्रदेशातील दादरी येथे झालेल्या हत्येचा निषेध म्हणून हे "साहित्यिक विचारवंत" अस्वस्थ झाले आहेत व त्यामुळे सरकारचा निषेध म्हणून ही मंडळी पुरस्कार परत करणार आहेत. यातल्या बहुतेकांची नावे आजतगायत ऐकण्यात आलेली नाहीत यात महाराष्ट्रातील काही साहित्यिक आहेत. त्यात प्रज्ञा पवार या एक साहित्यिका आहेत. खैरलांजी व नगर जिल्ह्यातली दलित हत्यांकांडे घडली तेव्हा त्यांनी पुरस्कार परत केला नव्हता. यात नयना सहगल नावाच्या एक लेखिका आहेत. पंडीत नेहरूंची भाची ही त्यांची ओळख. त्यांना १९८६ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार ज्या सरकारच्या काळात मिळाला त्याच सरकारच्या काळात ३००० शिखांची हत्या झाली होती व त्याच काळात शहाबानो प्रकरण घडले होते. परंतु त्यावेळी निषेध म्हणून पुरस्कार नाकारावासा त्यांना वाटला नाही. १९८६ नंतर आजतगायत अनेकवेळा जातीय हिंसाचार झाला. तेव्हाही त्या गप्प होत्या. आज अचानक त्यांना संपूर्ण देशात जातीय वातावरण निर्माण झाले असून साहित्यिकांची गळचेपी होत आहे असा शोध लागला. मग आता नक्की असे काय घडले की त्यांना अचानक स्वातंत्र्याचे आणि जातीयवादविरोधी विचारांचे उसासे आणि उमाळे येऊ लागले आहेत? यांचे खरे दु:ख या हत्या नसून जे कधीही सत्तेवर येऊ नयेत असे वाटत होते ते मोदी सत्तेवर आले आहेत हे यांचे खरे दु:ख आहे. मोदींच्या प्रत्येक कृतीला हे लोकशाहीविरोधी, संघविचार लादणारी कृती इ. ठरवून मोकळे होतात. अमर्त्य सेनना वयाच्या ७८ व्या वर्षी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरूपद मिळाले आणि ३ वर्षानंतर २०१५ मध्ये मुदत संपल्यावर वयाच्या ८१ व्या वर्षी यांना नव्याने मुदतवाढ न मिळाल्यावर लगेच मोदी विद्यापीठावर हिंदुत्व लादणारे ठरतात. आपले वय किती आणि आपल्याला एक टर्म मिळाल्यावर दुसर्‍या टर्मचा मोह का असे प्रश्न कधी यांच्या मनात येतच नाहीत. एफटीआयआय मध्ये गजेंद्र चौहानची नेमणूक राजकीय नेमणूक असते पण सईद मिर्झा (यांनी वाजपेयींविरूद्ध निवडणुक लढविलेली होती आणि नंतर मोदी पंतप्रधान होऊ नयेत यासाठी सह्यांची मोहीमही चालविली होती), अनंतमूर्ती (मोदी पंतप्रधान झाले तर भारतात रहावेसे वाटणार नाही असे यांनी सांगितले होते) इ. नेमणुका राजकीय आहेत असे कधी यांच्या मनात सुद्धा येत नाही. एकंदरीत या मेंटलेक्चुअलांचा निषेध आणि विरोध सेलेक्टिव्ह असतो. फक्त ठराविक प्रसंगात यांना उसासे आणि उमाळे येतात आणि इतर प्रसंगात हे सोयिस्कर मौन पाळतात. या विषयावर खालील लेख खूपच मार्मिक आहे. http://www.loksatta.com/aghralekh-news/as-compare-to-dadri-more-dangerous-murders-happens-1149432/
वर्गीकरण
राजकारण
साहित्यिक
निषेध

प्रतिक्रिया द्या
54637 वाचन

💬 प्रतिसाद (286)
अ
असंका गुरुवार, 10/15/2015 - 16:39 नवीन
आपण समारोप या शब्दात केला आहेत-
यांचे खरे दु:ख या हत्या नसून जे कधीही सत्तेवर येऊ नयेत असे वाटत होते ते मोदी सत्तेवर आले आहेत हे यांचे खरे दु:ख आहे
लोकसत्तातला समारोप-
या पुरस्कारपरतेच्छुकांचे खरे दु:ख दादरी हत्या हे नाही. तर नरेंद्र मोदी सत्तेवर आले, हे आहे.
समारोपानंतरची आपली ओळ-
या विषयावर खालील लेख खूपच मार्मिक आहे.
असं म्हणून खाली आपण लोकसत्तातील त्या अग्रलेखाची लिंक दिली आहे. म्हणजे "मी जे म्हणतोय त्याच विषयावर लोकसत्तात पण काहीतरी लिहून आलंय, आणि ते खूपच मार्मिक आहे" असं तुम्ही लिहिता? आणि तेही, आपल्या लेखाचं सार आणि अग्रलेखाचं सार असणार्‍या ओळीत कमालीच्या बाहेर साम्य असताना? आपल्या लेखात अमुक एक लेखाचा उल्लेख अशा पद्धतीने करण्यासाठी, तुम्ही तुमचं स्वतःचं त्या लेखापेक्षा वेगळं असं काही लिहायला नको? तसं काहीच दिसत नाही आपल्या लेखात.
श
श्रीगुरुजी गुरुवार, 10/15/2015 - 17:18 नवीन
तुम्ही लोकसत्तातला लेख आणि माझा लेख शेजारी शेजारी ठेवून वाचा आणि बघा किती साम्य आहे ते!
↩ प्रतिसाद: असंका
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/15/2015 - 18:07 नवीन
अर्भिया.... अबतक महौल कुच खास नै... दुई-चार कलाकार मंगवाव.... थोडा बाज-बजाना होने दो... ये का खाली घासलेट का डिब्बा धरके बैठे सब के सब..? आते है.. हम.. पौव्वा चढा के.. तर्राटर्निमेटर
न
नाव आडनाव गुरुवार, 10/15/2015 - 18:22 नवीन
:)
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
व
विकास गुरुवार, 10/15/2015 - 20:17 नवीन
खालील माहिती चेपूवरून साभार. मी शहानीशा केलेली नाही पण तर्काला पटली म्हणून चोप्य पस्ते केली आहे. आजपर्यंत सुमारे 1084 साहित्यिकांनी अकादमी चे पुरस्कार स्वीकारले आहेत. यापैकी केवळ 25 जणांनी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. पण प्रत्यक्षात मात्र 8(आठ) पुरस्कार परत केेले गेले आहेत. त्यापैकी केवळ 3(तीन) जणांनी एक लाख रुपये पुरस्काराची रक्कम परत केली.
    याचा अर्थ समजावून घ्यायला हवा.
सरकारविरोधी निषेध दर्शवायचा, प्रसिद्धी मिळवायची, पण पुरस्कार व रक्कम तिजोरीत सुरक्षित. मुख्य म्हणजे जेमतेम 0.20% लोकांनी पुरस्कार परतीची घोषणा केली होती व 0.03% पुरस्कार पूर्ण स्वरूपात परत केेले गेले. गवगवा मात्र "संपूर्ण साहित्य जगताचा तीव्र विरोध, तीव्र संताप " असा.
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 10/15/2015 - 21:07 नवीन
निर्देश दिला आहे की ३ महिन्यांमध्ये संपूर्ण देशात गो-हत्या बंदी करावी. आता कोण कोण उच्च न्यायालयाचा आणि पर्यायाने भारतीय राज्यघटनेचा निषेध म्हणून गळे काढणार? http://maharashtratimes.indiatimes.com/nation/consider-total-ban-on-beef-in-3-months-hp-hc-tells-centre/articleshow/49378541.cms
व
विकास गुरुवार, 10/15/2015 - 22:12 नवीन
काश्मीर मधील उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला स्पष्ट निर्देश हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाने... तसेच मटा च्या बातमीत म्हणले आहे, "काश्मीर मधील उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला स्पष्ट निर्देश" पण त्यांचेच मातृपत्र असलेल्या टाईम्समधले वाक्य आहे, Himachal Pradesh high court on Wednesday asked the Centre to consider enacting a law prohibiting slaughter of cows, their import/export and sale of beef and its products across the country within three months. to consider म्हणजे निर्देश होत नाही. असो.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/15/2015 - 22:50 नवीन
हा हा हा..... हे म्हणजे अगदी नांदेडीयन यांच्या धाग्यावर आल्यासारखे वाटत आहे. ते लिंक देणार, बाकीचे त्यातली हवा काढणार... भक्त असो की आप्टार्ड... रंग सभी का एक है बाहरसे बस तमाशा देखो. अंदर फेकाफेक है
↩ प्रतिसाद: विकास
ट
ट्रेड मार्क Fri, 10/16/2015 - 02:03 नवीन
विकास काय किंवा मी काय फक्त वर्तमान पत्रातली बातमी देत आहोत. आता अगदी शब्द शब्दावर बोट ठेवायचं म्हणालं तर खरी कोर्ट ऑर्डर बघितली पाहिजे. एकूण कोर्टाच्या सांगण्याचा उद्देश तर कळला! बाकी रंगाबाबत बोलायचं झालं तर सगळीकडे फक्त हिरवाच नको ( जरी तुम्हाला आवडत असला तरी). सगळे रंग एक होवून शेवटी पांढराच रंग होतो. परंतु सद्य परिस्थितीत तो काळाच व्ह्यायची शक्यता जास्त दिसतेय. "भक्त असो की आप्टार्ड" - तुमचा रंग कळला…
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 10/16/2015 - 07:11 नवीन
एक म्हणजे तुम्ही इथे टाकलेली बातमी एक अतिअवांतर आहे. तसे तुम्हाला वाटत नसेल तर खालील शक्यता आहे. "हा धागा पुरस्कार परत करणार्‍यांवर काढला आहे. पुरस्कार परत करणारे दादरी घटनेचा निषेध म्हणून हे कृत्य करत आहेत. दादरी घटनेत एका भारतीयाची दुसर्‍या भारतीय नागरिकांनी गोमांस ठेवल्याच्या कारणावरून हत्या केल्याची बातमी आहे. आता गोहत्याबंदीचे कोर्टानेच समर्थन केल्याने, एका भारतीय नागरिकाची हत्या योग्य ठरत आहे. म्हणजेच दादरी येथिल कथित हिंदूंचे कृत्य न्यायालयीन आदेश्/टिप्पणी याद्वारे आपण योग्य ठरवत आहात." ठिक आहे ना! तुम्हाला कोर्टाच्या आदेशाचा काय आनंद झालाय ते बातम्या इथे टंकतांना झालेल्या घाईतून दिसून आले आहे. तसेच इथे धाग्यात वा प्रतिसादात एकानेही दादरी घटनेवर मत व्यक्त केले नाही. पुरस्कार परत करणारेच कसे फालतू आहेत याबद्दल उकरा-उकरी सुरू आहे. जर तुम्हाला ते एवढेच फालतू वाटतात तर कशाला चर्चा करा..!
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ब
बोका-ए-आझम Fri, 10/16/2015 - 16:19 नवीन
"हा धागा पुरस्कार परत करणार्‍यांवर काढला आहे. पुरस्कार परत करणारे दादरी घटनेचा निषेध म्हणून हे कृत्य करत आहेत. दादरी घटनेत एका भारतीयाची दुसर्‍या भारतीय नागरिकांनी गोमांस ठेवल्याच्या कारणावरून हत्या केल्याची बातमी आहे. आता गोहत्याबंदीचे कोर्टानेच समर्थन केल्याने, एका भारतीय नागरिकाची हत्या योग्य ठरत आहे. म्हणजेच दादरी येथिल कथित हिंदूंचे कृत्य न्यायालयीन आदेश्/टिप्पणी याद्वारे आपण योग्य ठरवत आहात."
असं कोणी आणि कुठे म्हटलंय या धाग्यावर? दाखवून द्या जरा. किंवा तुम्ही असा निष्कर्ष कुणाच्या आणि कुठल्या विधानावरुन काढला? मुळात धागा हा दादरी हत्येवर नाहीच आहे. तो विचारवंत आणि लेखक यांना आलेल्या व्यक्तिस्वातंत्र्य आणि सद्सद्विवेकबुद्धी यांच्या पक्षसापेक्ष उमाळ्यावर आहे. हे कुणी आणि कुठे म्हटलंय आणि नक्की कशावरून तुम्ही हा निष्कर्ष काढलात ते दाखवून द्या.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 10/16/2015 - 20:31 नवीन
माझे विधानः एक म्हणजे तुम्ही इथे टाकलेली बातमी एक अतिअवांतर आहे. तसे तुम्हाला वाटत नसेल तर खालील शक्यता आहे. आपले विधानः मुळात धागा हा दादरी हत्येवर नाहीच आहे. तो विचारवंत आणि लेखक यांना आलेल्या व्यक्तिस्वातंत्र्य आणि सद्सद्विवेकबुद्धी यांच्या पक्षसापेक्ष उमाळ्यावर आहे. वरील दोन्ही विधानांचा एकच अर्थ आहे. गोहत्याबंदीचा पाठपुरावा करावा हा कोर्टाचा निर्णय या धाग्यावर टाकण्याचे प्रयोजन काय? त्या प्रयोजनाची मला भासलेली जुळणी मी मांडली. त्यामागे जो काही सद्हेतू-सद्विचार असेल तो प्रतिसादकर्त्याने टाकावा. माझे मत चुकीचे असेल तर खंडन करावे. मला पटले तर माझे विधान मागे घेईन... व्हाय सो सिरियस..?
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ट
ट्रेड मार्क Fri, 10/16/2015 - 19:55 नवीन
प्रथमतः धन्स बोका-ए-आझम! TJ : अती अवांतर बातमी कशी काय? दादरी हत्या, पुरस्कार परत करणे या सर्वांमागे बीफ बाळगणे/ खाणे हेच कारण आहे. मग त्यासंबंधीची बातमी अती अवांतर कशी काय ठरते? कोर्टाच्या आदेशाचा मला कशाला आनंद होईल? आणि मी तर फक्त लिंक दिलीये, घाई बहुतेक त्या पत्रकाराला झाली असावी. परत हे मी नमूद करू इच्छितो कि मी कोर्टाची मूळ निकालाची प्रत बघितली नाहीये. दूर अंतरामुळे मला प्रत्यक्ष तिथे येवून बघणे पण शक्य नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसे जशी वर्तमान पत्रांवर विसंबून राहतात त्याप्रमाणे मी पण विसंबून आहे. खरं तर काश्मीरचं कोर्ट का हिमाचलचं, निर्देश दिला का जाणीव करून दिली या पेक्षा महत्वाचा मुद्दा हाच आहे कि भारताच्या घटनेत गोमांसा संबंधी काही तरतूद आहे. आणि मला फक्त तेच दाखवायचं होतं. म्हणून कोणीही दादरी घटनेचं समर्थन करत नाहीये. पण त्या घटनेमागे अनेक कारणं असू शकतात. व्यक्तिगत वैमनस्य, पूर्वानुभव, समोरच्या व्यक्तीकडून (किंवा समाजाकडून) झालेला अन्याय ई. ई. परत सांगतो, ही कारणं सांगून मी हत्येचं समर्थन करत नाहीये. पण मुद्दा असा की फक्त हिंदुंमधेच असहिष्णुता वाढली आहे का? आणि आधीच्या तुलनेने वाढली जरी असली तरी त्यामागे काय कारण आहे यावर कोणी विचार केलाय का? मुसलमान किती सहिष्णू आहेत ते तर आपल्या सर्वांनाच चांगलं माहिती आहे. मुस्लिम देश सोडा पण भारतात एखाद्या मुस्लिम बहुल भागात किंवा मुंबईत भेंडीबाजारात किंवा इतर मुस्लिम बहुल भागात पोर्क कापून अथवा शिजवून खावू शकता का? प्रयत्न केला तर काय होईल ते तुम्हाला माहिती आहेच. साधं एक कार्टून छापलं तर एवढ्या हत्या घडवून आणल्या, नुसतं मुस्लिम धर्माविषयी बोललं तरी यांना चालत नाही, पण हिंदू धर्माची चेष्टा पुस्तकातून, पेपर मधून, सिनेमातून करतात आणि त्याला हिंदूंनी काहीच आक्षेप नाही घ्यायचा? परत सांगतो, आक्षेप घेणे म्हणजे मारामारी/ खून करणे नव्हे. मग प्रश्न हा आहे, कि जेवढा विरोध आता होतोय, तेवढा या आधी मुस्लिमांनी केलेल्या अतिरेकाबद्दल का नाही झाला?असं आपण म्हणलं कि आत्ता सगळे जागे झाले तर या नंतर कुठलीही अशी हत्या झाली तर कोण कुठल्या जातीचा आहे हे विसरून हेच तथाकथित विचारवंत त्याचा विरोध एवढाच जोरात किंवा निदान विरोध तरी करतील का? इस्लाम खतरेमे है म्हणलं की झाडून सगळे मुसलमान एकत्र होऊन लढतात. पण हिंदूंना मात्र दुहीचा शाप आहेच. असो. प्रत्येकाची आपापली मतं आणि विचारसरणी. पण उगाच सहिष्णू, पुरोगामी, विचारवंत, सेक्युलर बनण्याच्या नादात हिंदू धर्म संकटात सापडू नये म्हणजे मिळवली.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 10/16/2015 - 20:38 नवीन
सविस्तर प्रतिसाद नंतर देतो. तुर्तासः
पण उगाच सहिष्णू, पुरोगामी, विचारवंत, सेक्युलर बनण्याच्या नादात हिंदू धर्म संकटात सापडू नये म्हणजे मिळवली
. तुमच्या ह्या अतिकाळजीने हिंदू धर्म इस्लामच्याच वाटेवर चाललाय काय याची आमच्यासारख्याने खुल्या विचारांच्या हिंदूंना काळजी पडलीये.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ब
बोका-ए-आझम Fri, 10/16/2015 - 21:13 नवीन
याचा अर्थ इस्लामची असहिष्णुता तुम्हाला मान्य आहे तर! बरं - ३ शंका आहेत. बघा. उत्तरं द्यावीतच असा काही हट्ट नाही. तुम्हाला पूर्ण दुर्लक्ष करायचा आणि मग आम्हाला त्यावरून मत बनवायचा पूर्ण अधिकार आहे. १. सहिष्णुता म्हणजे काय तुमच्या मते? २. खुल्या विचारांचे हिंदू म्हणजे काय? ३. गोहत्याबंदी हा धार्मिक विषय आहे का त्याला आर्थिक आणि कृषिसंबंंधातले पैलूही असू शकतात?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 10/16/2015 - 22:25 नवीन
खालील प्रतिसाद वाचावा ही विनंती, http://misalpav.com/comment/756727#comment-756727 वरील प्रतिसाद पोस्ट झाल्यावर तुमचे प्रश्न बघितले. पण तुमच्या प्रश्नांची बहुतेक सगळी उत्तरे त्यात आपसूकच आली आहेत.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
त
तर्राट जोकर Fri, 10/16/2015 - 22:30 नवीन
हा एक परिच्छेद त्या प्रतिसादातून काढून टाकला होता कारण तिथे सुसंगत वाटत नव्हता. मी लहानपणी गलिच्छ झोपडपट्ट्यांमधे राहिलोय, डंगर्‍या (बैल) खाणारे लोक बघितलेत, रात्री बैलाचं मटन खाऊन सकाळी उठल्यावर गायीला उरलेली भाकर खायला घालून नमस्कार करणारे, तिच गोमुत्र अंगावर शिंपडून घेणारे पाहिलेत. तेव्हा ही 'गोहत्या करणार्‍यास हाणा चार' वाली थेरं हिंदूंमधे कधी बघितली नाहीत. सहिष्णुता काय असते ती पाहिली आहे. कोणाच्या घरात कोण काय खातंय यावरून त्याचा पंचनामा करणारे लोक तर त्या निरक्षर, अडाणी झोपड्यांमध्येही नव्हते. तेव्हाचे लोक मनापासून प्रामाणिकपणे दांभिक होते. आजकाल हिंस्त्रपणे क्रूर व दांभिक होत चालले आहेत. त्याकाळात गोरक्षण सेवा संस्था बिनमालकाच्या, सोडून दिलेल्या भटक्या, भाकड गायींना संरक्षण देऊन, चांगले सुविधा-खानपान देऊन, चांगले संगोपन करत होती. एक निस्वार्थ, निधर्मी भाव होता. खर्‍या अर्थाने ती गोसेवा होती. आजची गोसेवा म्हणजे कुठे कोण गायी कापायला नेतो का, त्याला धरा आणि हाणा. हा फक्त राग आहे. गायीबद्दलचे खरे प्रेम वा ममता नाही. परिस्थिती आपल्या बाजूने आहे असे समजून काही हिंदूंचा मुस्लिमांवरचा दबलेला राग बाहेर येत आहे. ते उतावीळ झाले आहेत प्रतिशोध घ्यायला. त्यांच्यासाठी सोपे कारण आहे गोमाता. भाजप सरकारने आपला निकम्मेपणा झाकायला भक्तांना दिले धंद्याला लावून, की जा बापहो 'गोमाता खतरेंमें है, जाओ बचाओ, देश की चिंता मत करो, हमको सवाल मत करो, तुमको जो सपने दिखाये उसके बारे में मत पूछो, गाय खतरेंमें है, हिंदूं खतरे में है, मुसलमान बढ रहा है, उसको खतम करो'. आयुष्यात गायीच्या दुधाशिवाय व गायीच्या निबंधाशिवाय खर्‍या गायीशी कधीही संबंध न आलेलेच गायीच्या रक्षणासाठी आभाळाला लाथा घालतात तेव्हा मनोरंजन होत नाही, दु:ख होतं. आज ह्या उतावळ्या हिंदूंनी ज्यांनी भाजपाला निवडून आणलंय, खणखणीत प्रश्न विचारायला हवेत विकासाच्या प्रश्नांवर. ते सोडून आपले बसलेत भजण कुटत.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ट
ट्रेड मार्क Fri, 10/16/2015 - 21:59 नवीन
हिंदू धर्मातच मुळात अतिरेकाची आणि हत्येची शिकवण नाही. पण भग्वद गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे काही प्रसंगात तुम्ही प्रतिकार करावा. (इथे परत सांगतो की मी हत्येचं समर्थन नाही करत आहे). यावर पण तुम्ही श्रीकृष्ण हा अस्तीत्वातच नव्हता आणि गीता हि अशीच कोणी सोम्यागोम्यानी रचली आहे असं म्हणणार नाही अशी आशा करतो. तुमच्या विधानातल्या "हिंदू धर्म इस्लामच्याच वाटेवर चाललाय काय" या शब्दांमधेच तुम्ही मान्य करताय कि इस्लाम ची वाट चुकीची आहे. तेव्हा वाट चुकलेल्याला जागेवर आणण्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे का? नुसते ते जे करतात ते सहन करून त्यांच्यात सुधारणा होईल असं वाटतंय का? किती आपण छळलं बिच्चाऱ्या हिंदूंना असं वाटून उपरती होईल, वागणं सुधारून सगळे गुण्यागोविन्दानी राहू अशी कणभर तरी आशा आहे का? जसे तुम्ही भारतात राहता तसेच मोकळेपणानी एखाद्या मुस्लिम देशात राहून दाखवा. बाकीचं तर सोडाच पण तुम्हाला तुमच्या एका देवाची मूर्ती तुमच्या घरात ठेवता येते का ते बघा. प्रत्येक देशाचे त्या देशानी ठरवलेले कायदे असतात आणि ते तिथे राहणाऱ्या सगळ्या लोकांनी पाळायचे असतात एवढं साधं तत्व आहे. दादरी घटनेत त्या व्यक्तीला कायदा मोडल्याबद्दल कायद्यानी शिक्षा होणं अपेक्षित आहे/ होतं. परंतु काही लोकांनी कायदा हातात घेतला. त्याबद्दल त्या लोकांना पण कायद्यानी जी काय असेल ती शिक्षा होईलच. बोकोबांनी विचारल्या प्रमाणे खुले विचार म्हणजे काय ते पण स्पष्ट करण्याची कृपा करावी. खूप प्रश्नं विचारले आहेत… उत्तरांची प्रतीक्षा आहे.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 10/16/2015 - 23:31 नवीन
हिंदू धर्मातच मुळात अतिरेकाची आणि हत्येची शिकवण नाही. पण भग्वद गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे काही प्रसंगात तुम्ही प्रतिकार करावा. (इथे परत सांगतो की मी हत्येचं समर्थन नाही करत आहे). यावर पण तुम्ही श्रीकृष्ण हा अस्तीत्वातच नव्हता आणि गीता हि अशीच कोणी सोम्यागोम्यानी रचली आहे असं म्हणणार नाही अशी आशा करतो.
आपला जीव, आपल्याशी संबंधीत लोकांचा जीव, आपली संपत्ती, आपला देश धोक्यात येत असेल तर कसलेही लाड न करता प्रतिकारच करावा. त्यासाठी सीमेवर सैन्य, राज्यात पोलिस व न्यायव्यवस्था तैनात आहे. याउप्पर व्यक्तिगत धोका असल्यास विशेष पोलिस, कमांडो संरक्षण तर आहेच परत परवानाप्राप्त हत्यारे बाळगण्याचीही मुभा आहे. यात न कळण्यासारखे वा कॉमन सेन्सचे उत्तर देण्यासाठी गीतेसारख्या महान ग्रंथाला संदर्भ म्हणून वापरण्यासारखे वा हिंदू धर्माच्या शिकवणुकीचा संबंध लावण्यासारखे काय आहे? जर वरील परिस्थिती नाही तर तुम्ही नक्कीच चुकीच्या देशात आहात.
तुमच्या विधानातल्या "हिंदू धर्म इस्लामच्याच वाटेवर चाललाय काय" या शब्दांमधेच तुम्ही मान्य करताय कि इस्लाम ची वाट चुकीची आहे. तेव्हा वाट चुकलेल्याला जागेवर आणण्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे का?
"इतर धर्मियांस त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्यास प्रतिबंध करणारा तो इस्लाम धर्म" अशी काहीशी एक व्याख्या सांप्रत प्रचलित आहे. ज्यांनी ही प्रचलित केली आहे - ते जे की कट्टर मुस्लिम (थोडक्यात इसिस) किंवा ते जे मुस्लिमांना शत्रू मानतात - त्यांच्या व्याख्येप्रमाणे 'इतर धर्मियांस स्वातंत्र्य न देणारा' तो इस्लाम मग त्याच चालीवर 'इतर धर्मियांस स्वातंत्र्य न देणारा" जो कोणता धर्म असेल तो इस्लामच्याच वाटेवर जात आहे असे म्हटले तर काय चुकले? समजले नसेल तर सांगा, परत समजावून देइल.
नुसते ते जे करतात ते सहन करून त्यांच्यात सुधारणा होईल असं वाटतंय का? किती आपण छळलं बिच्चाऱ्या हिंदूंना असं वाटून उपरती होईल, वागणं सुधारून सगळे गुण्यागोविन्दानी राहू अशी कणभर तरी आशा आहे का?
ते जे करतात - यात बीफ खाणे हे अंतर्भूत आहे, अजून काय असेल तर स्पेसिफाय करा - ते कोणास सहन करावे लागत आहे? हिंदूंना छळलं ह्याची त्यांना उपरती व्हावी अशी तुमची इच्छा का आहे? वागणं सुधारून म्हणजे नेमकं काय? भारतात हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने राहात नाही असा तुमचा भ्रम का झाला बरे?
जसे तुम्ही भारतात राहता तसेच मोकळेपणानी एखाद्या मुस्लिम देशात राहून दाखवा. बाकीचं तर सोडाच पण तुम्हाला तुमच्या एका देवाची मूर्ती तुमच्या घरात ठेवता येते का ते बघा.
जर मी भारतात आहे, भारताचा नागरिक आहे. त्या भारताचा मला प्रचंड अभिमान आहे जिथे सर्वांना आपआपले सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मनमुराद उपभोगण्याची पूर्ण मुभा आहे. त्या भारताची एखाद्या (नेमक्या कोणत्या?) मुस्कटदाबी-तालिबानी मुस्लिम देशाशी तुलनाच का करावी? मला त्या देशात देवाची मूर्ती ठेवता येत नाही तर त्याचा माझ्या भारतातल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुबलकपणाशी काय संबंध? त्या तालिबानी-अतिरेकी देशांपेक्षा माझा देश कैक पटीने चांगला आहे याचे मी आनंद मानावे की दु:ख? हिंदूंना त्या मुस्लिम देशांसारखे अतिरेकी वागायचे आहे का? तो बेंचमार्क आहे का? "इथे एवढी सूट मिळते तर माजू नका", हा जो अभिनिवेश दिसतो ह्या प्रश्नांतून, तो किती सेल्फ-कॉन्ट्रॅडीक्टरी आहे हे आपल्यालाच कळेल अशी अपेक्षा आहे. या देशाची मुस्लिम जनसंख्या ही इथे हिंदूंची आश्रीत आहे, त्यांच्या तालावर, त्यांनी दिलेल्या सुविधेवर लाचारासारखी जगावी अशी हिंदूंची इच्छा दिसत आहे. ती खरी आहे का? असे असेल तर खरंच हिंदूराष्ट्र आणि इस्लामी राष्ट्रांमधे फरक काय?
प्रत्येक देशाचे त्या देशानी ठरवलेले कायदे असतात आणि ते तिथे राहणाऱ्या सगळ्या लोकांनी पाळायचे असतात एवढं साधं तत्व आहे. दादरी घटनेत त्या व्यक्तीला कायदा मोडल्याबद्दल कायद्यानी शिक्षा होणं अपेक्षित आहे/ होतं. परंतु काही लोकांनी कायदा हातात घेतला. त्याबद्दल त्या लोकांना पण कायद्यानी जी काय असेल ती शिक्षा होईलच.
सगळ्या लोकांनी पाळायचे असतात : इथे "सगळ्या" ह्या शब्दाच्या ठिकाणी "मुसलमानांनीही" हा अंतर्प्रवाही शब्द आहे हे गृहित धरतो. (तसे नसेल तर सांगा. उत्तर बदलून मिळेल.) तर "मुसलमानांनीही पाळायचे असतात" म्हणजे 'मुस्लिम कायदे पाळत नाहीत' असा सरळ सरळ आरोप आहे. याचा अर्थ त्यांना मोकळीक असून हिंदूंवरच कायदा पाळण्याची सक्ती केली जाते. बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतात हिंदूंवर कोण बरे सक्ती करत आहे? काँग्रेस? ओके नेहमीचा रडीचा डाव. सगळे मुद्दे काँग्रेसपर्यंत येऊन संपतात. काँग्रेसमधे जास्तीत जास्त सगळे हिंदू, त्यांना निवडून देणारे हिंदू, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत पण त्यांना शष्प माहित नाहीत असे बहुसंख्यांक हिंदू. त्यांच्यावर कायदापालनाची सक्ती करून मात्र मुस्लिमांस मोकळे रान दिले जात आहे असे पाहत असलेले हिंदू, बरेच हिंदू आहेत की भारतात..? आता दादरी: उत्तरप्रदेश मधे गोमांसबंदी कायदा आहे? माझ्या माहितीनुसार नाही. बरं कायदा मोडल्याबद्दल एका नागरिकांस शिक्षा करण्याचा हक्क इतर नागरिकांस कुणी दिला आहे? हे सर्व अतिजागरुक नागरिक, देशात जेव्हा रोज लाखोंच्या संख्येने करोडो घटनांमधून कायदे मोडल्या जात असतात. भेसळ-भ्रष्टाचार पासून खून-बलात्कार पर्यंत. तेव्हा कुठे कुठे खून पाडत फिरत असतात? तुम्ही 'त्यांनी केलेल्या कृत्याचे समर्थन नाही' असे तोंडदेखले म्हणून परत ती हत्या समर्थनियच आहे असा छुपा भाव दाखवत आहात हे लक्षात आले का? त्याने कायदा (नसलेला) पाळला नाही म्हणून चिडून जावून रागाच्या भरात गर्दिने हत्या केली ही चिउ-काऊची गोष्ट कितपत योग्य आहे? याच ठिकाणी उलट घडले असते तर..?
बोकोबांनी विचारल्या प्रमाणे खुले विचार म्हणजे काय ते पण स्पष्ट करण्याची कृपा करावी. खूप प्रश्नं विचारले आहेत… उत्तरांची प्रतीक्षा आहे.
क्षमा असावी, उत्तरे देण्याऐवजी मीच प्रश्नांची जंत्री मांडली. त्यातून उत्तरे मिळत असली तर घ्या शोधून. खरे तर खूप कंटाळा आला आहे. लोकांच्या घुमवून फिरवून बोलण्याचा. सरळ सरळ बोलायला जीगर लागते. तेवढी सुद्धा हिंदूधर्माभिमानी दाखवू शकत नाहीत. कारण ते परत सेल्फ-कॉन्ट्रडिकटरी होइल... त्यामुळे असोच. यापुढे थेट प्रश्नांनाच थेट उत्तर दिली जातील. आडून-आडून, शब्दांच्या भुलभुलैयात टाइमपास करायला अपुनके पास टेम नै..... आमची उतरायला लागते मग. खर्च वाढतो हो. पंद्रा लाकाची वाट बगतुया, तवर पुरवून पुरवून चाललंय सगळं. म्हागाई किती वाळ्लिये बगतायसा...? इतं खायला मिळंना अशी बोंब, च्यामारी कोण काय काय खातंय याची सर्कारला, रिकाम्याटेकड्या लोकांस भारी काळजी लागून र्हायली....
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ब
बोका-ए-आझम Sat, 10/17/2015 - 04:44 नवीन
http://indianexpress.com/article/explained/explained-no-beef-nation/ ही लिंक पाहा. म्हणजे कळेल.
सगळ्या लोकांनी पाळायचे असतात : इथे "सगळ्या" ह्या शब्दाच्या ठिकाणी "मुसलमानांनीही" हा अंतर्प्रवाही शब्द आहे हे गृहित धरतो. (तसे नसेल तर सांगा. उत्तर बदलून मिळेल.) तर "मुसलमानांनीही पाळायचे असतात" म्हणजे 'मुस्लिम कायदे पाळत नाहीत' असा सरळ सरळ आरोप आहे.
हा तुम्ही लावलेला अर्थ आहे. असा सोयीस्कर अर्थ लावणारे जेव्हा स्वतःला खुल्या विचारांचे हिंदू म्हणवून घेतात तेव्हा मजा वाटते.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ट
ट्रेड मार्क Sun, 10/18/2015 - 16:36 नवीन
नुसताच अविर्भाव आहे की उत्तरं दिलेली आहेत. सर्व गोष्टींचा आपल्या सोयीचा मतलब काढला जातोय. सरळ सरळ बोलून सुद्धा कळत नसेल तर अजून काय करणार? वर आमच्यावरच आरोप. मी एकही शब्द भूलभुलैया सारखा वापरलेला नाहीये, उलट तुम्हीच घोळ घालताय. जाउदे. जरा जास्तच चर्चा झाली. आणि ती करूनही काही फरक पडेल असं वाटत नाही. जर मुद्द्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच वेगळा आहे तर किती का समजवा काही फरक पडणार नाही. त्यामुळे…तुमचा खर्च वाचवायला तुम्ही या गोष्टीवर जास्त विचार नाही केलात तरी चालेल. बाकी हा मुद्दा मात्र मान्य कि भारतात रिकामटेकड्या लोकांची संख्या जास्त आहे. सरकारनी पण कोण काय खाताय याची चिंता सोडून द्यायला पाहिजे. लोकांनी खाउदे नाही तर नको, बरोबर ना!
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 10/18/2015 - 20:17 नवीन
भारतात रिकामटेकड्या लोकांची संख्या जास्त आहे. सरकारनी पण कोण काय खाताय याची चिंता सोडून द्यायला पाहिजे. लोकांनी खाउदे नाही तर नको, बरोबर ना!
अगदी हेच. कारण वरच्या तुमच्या वा माझ्या कुठल्याच प्रश्नांना तितके महत्त्व नाही जेवढे एखाद्या उपाशीपोटी माणसास भूक भागण्याचे आहे. तस्मात् जो जे वांछील तो ते खावो!
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ब
बाप्पू Mon, 10/19/2015 - 12:48 नवीन
तस्मात् जो जे वांछील तो ते खावो!
ठीक आहे. उद्यापासून आम्ही सर्व प्रत्येक मुस्लिमबाहूल भागात पोर्क शिजवायला सुरवात करतो.. चालेल का हे तुम्हाला? तुमचे हे अती- सहिश्णु जातभाई मला काय वागणूक देतात ते देखील बघुयात. तुम्ही जर पुण्यात असाल तर आत्ता मी कोंढ्वा भागात डुककर घेऊन येतो. तिथेच मारू आणि शिजवू. काय म्हणता?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 10/19/2015 - 13:29 नवीन
चालेल की. बिन्दास्त करा. त्या आधी फक्त एक सिद्ध करा की प्रत्येक मुस्लिम हा हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठीच गायी मारून खातो. नंतर जे हिंदू गोमांस भक्षण करतात त्यांचेही काय करायचे तेही ठरवा. जे हिंदू गोमांसाचे कत्तलखाने चालवतात त्यांचे तुम्ही काय करणार तेही आधी क्लिअर करा. मग तुम्हाला जे काही करायचे आहे ते करण्यास आपण स्वतंत्र भारतात मोकळे आहात. मुस्लिम आपल्याला विरोधच करतील ही भावना घेऊन जाल तर तुम्हाला तेच मिळेल. म्हणून म्हटले ज्ञानेश्वरांनी 'जो जे वांछिल तो ते लाहो'. चुकणार नाहीत ते. तुमचा तरी अभिनिवेश इथल्या पोस्टपुरता न राहो अशी भगवंताचरणी प्रार्थना. कारण आजवर फक्त गप्पा ऐकल्या आहेत.
↩ प्रतिसाद: बाप्पू
ब
बाप्पू Mon, 10/19/2015 - 14:28 नवीन
माझ्या म्हणण्याचा उद्देश असा बिलकुल नाहीये कि मुस्लिम मुद्दामहून हिंदूंच्या भावना दुखवण्यासाठी गोमांस खातो. परंतु मुस्लिम हे विसरत आहते कि आपण भारतात राहतो आणि येथे आपले बहुसंख्य हिंदू भाऊ देखील आहेत ज्यांच्यासाठी गाय पवित्र आहे किमान त्यांच्या भावना जपण्यासाठी तरी आपण काही गोष्टी टाळू शकतो.. त्याही उपर कायद्यामध्ये तरतूद असताना देखील आपण गोमांस खात आहोत गायींची कत्तल करत आहोत तर मग मात्र हिंदूंना हे मुद्दाम केले जात आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. माझ्या शेजारी बहुसंख्य मुस्लिम राहतात आणि तरीदेखील मी राजरोसपणे पोर्क शिजवत असेल तर मुस्लिमांना राग येईल कि नाही.. त्यांना मी हे मुद्दाम करतोय असे वाटेल कि नाही ? गोमस्, गायी कत्तल करणे या सर्व गोष्टींना होणारा विरोध हा खूप दिवसांपासून आहे. ही काय आज घडलेली गोष्ट नाहीए. याधीही कितीतरी लोकांना मारहाण, ट्रक जाळने, रस्ता रोको करणे असे प्रकार झालेले आहेत, आणि प्रत्येक वेळी असे वागणार्यांना त्यांची जात धर्म पाहता त्याला हिंदूंनी विरोध केला आहे. बातम्या वाचत चला. आपला तो बाब्या आणि दुसर्याचे ते कार्ट असे आजपर्यंत झालेले नाहीये. तुम्ही असे बोलताय की जणू काय या गोष्टी आजच पहिल्यांदा घडत आहेत. ददरी येथे जे काही घडले ते दुर्दैवी च आहे. परंतु हे साहित्यिक लोक जे काही करत आहेत ते सर्व पाहता त्यांच्या प्रामाणिकते बद्दल आम्हाला शंका आहे. हिंदूंची गळचेपी करून मुस्लिम लोकांच्या दाढ्या कुरवाळणे म्हणजे सेकुलर, पुरोगामी असा जो काही यांचा पवित्रा आहे त्या ला माझा विरोध आहे. याआधी याहीपेक्षा भयानक आणि असहिष्णू घटना घडल्या आहेत तेव्हा ते मुग गिळून गप्प का होते ? आजच यांना पुरस्कार परत करावेसे वाटतात त्यामुळे मनात शंका येते. त्याबद्दलच हा धागा आहे. पण चर्चा पूर्णपणे भरकटत चालली आहे. असो .
मुस्लिम आपल्याला विरोधच करतील ही भावना घेऊन जाल तर तुम्हाला तेच मिळेल. म्हणून म्हटले ज्ञानेश्वरांनी 'जो जे वांछिल तो ते लाहो'. चुकणार नाहीत ते.
तुमचे हे विधान हास्यास्पद आहे. म्हणजे मी पोर्क शिजवताना जर मुस्लिमांनी मला मारले तर तो माझाच दोष? मी मनामध्ये चांगले विचार ठेवून जर पोर्क शिजवले तर मुस्लिम मला काहीही करणार नाहीयेत ? आणि जर केले तर तो मुस्लिमांचा दोष नसून माझ्या मनाचा आणि भावनेचा दोष आहे असे म्हणणार असाल तर धन्य आहात तुम्ही.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
अ
अंतरा आनंद Mon, 10/19/2015 - 13:09 नवीन
+१
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 10/16/2015 - 10:35 नवीन
बाकी रंगाबाबत बोलायचं झालं तर सगळीकडे फक्त हिरवाच नको ( जरी तुम्हाला आवडत असला तरी).
मी उल्लेख केलेल्या शिक्केमारू प्रवृत्तीचे उदाहरण इतके लगेच बघायला मिळेल असे वाटले नव्हते. ट्रेड मार्क हे तर्राट जोकर यांना गेली किमान ५-१० वर्षे तरी अतिशय जवळून ओळखत असावेत, गेलाबाजार त्यांच्यात उत्तम संवाद असावा. त्याशिवाय, जोकर यांना हिरवा रंग आवडतो असे अनुमान काढणे शक्यच नाही. आणि असे काही नसेल, तर ही शिक्केमारूगिरीच झाली.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Fri, 10/16/2015 - 02:09 नवीन
आपण दोघेही दोन वेगवेगळ्या पत्रकारानी टाकलेली बातमी सांगतोय, ते त्यांच्या आकलनाप्रमाणेच सांगणार. ते किती विश्वासार्ह काय माहित. एवढं प्रत्येक शब्दाचा कीस काढायचा असेल तर मूळ कोर्ट ऑर्डर बघायला पाहिजे. माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच होता कि काश्मीर/ हिमाचल, जे मुस्लिम बहुल आहे तेथील कोर्ट पण गोमांस बंदी करावी असं म्हणतय. मग ते निर्देश असो वा टिप्पणी… रोख तर कळला!
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 10/16/2015 - 04:49 नवीन
माझा लिहीण्याचा उद्देश जे वर्तमानपत्रात मराठी भाषांतर केले आहे ते कसे चुकीचे आहे ते दाखवण्याचा होता. तुमच्याबद्दल नव्हता. हिमाचल ऐवजी काश्मीर चुकून झाले असेल असे गृहीत धरले. पण जेंव्हा व्यावसायीक पत्रकारीतेत पण इंग्रजीचे चुकीचे भाषांतर दिले जाते तेंव्हा खेद वाटतो. माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच होता कि काश्मीर/ हिमाचल, जे मुस्लिम बहुल आहे तेथील कोर्ट पण गोमांस बंदी करावी असं म्हणतय. मग ते निर्देश असो वा टिप्पणी… रोख तर कळला! हा अजून एक भाग तथाकथीत सेक्यूलर माध्यमांमुळे जनतेची दिशाभूल करणारा आहे. विकीवरील माहिती मुद्दामून जशीच्या तशी चिकटवत आहे...

Himachal Pradesh

The Punjab Prohibition of Cow Slaughter Act, 1955 applies to Haryana, Himachal Pradesh and Punjab. Therefore, the law governing the slaughter of cattle in Himachal Pradesh is the same as that in Punjab and Haryana. However, Himachal and Punjab have lighter penalties for violating the law than Haryana. Slaughter of cow (includes bull, bullock, ox, heifer or calf), and its progeny, is totally prohibited. The export of cattle for slaughter and the sale of beef are both prohibited. Anyone violating the law can be punished with imprisonment up to a maximum of 2 years or fine up to ₹1,000 or both. The law places the burden of proof on the accused. The crime is treated as a cognizable and non-bailable offence.[85]

Jammu and Kashmir

The Ranbir Penal Code, 1932 governs the slaughter of cattle in Jammu and Kashmir. Voluntary slaughter of any bovine animal such as ox, bull, cow or calf shall be punished with imprisonment of either description which may extend to 10 years and shall also be liable to fine. The fine may extend to 5 times the price of the animals slaughtered as determined by the court. Possession of the flesh of slaughtered animals is also an offence punishable with imprisonment up to 1 year and fine up to ₹500.[85] असेच इतरत्रही कायदे आहेतच. महाराष्ट्रात पण गोहत्याबंदी ७६ सालापासून आहे. आता ती गोवंशहत्या बंदी केली आहे असे वाचल्याचे आठवते. थोडक्यात कायदा वाढवला असला तरी नवीन नाही. तरी देखील एकीकडे स्युडोसेक्यूलर्स लोकं जणू काही नवीनच बीफबंदी झाली अशी आवई उठवत आहेत आणि दुसरीकडे नुसतेच धर्माने हिंदू हिंदू करणारे गोमाता म्हणत ती बंदी कशी बरोबर आहे यावर वाद घालत आहेत. मी काही बीफ खात नाही पण त्याचे कारण धार्मिक नसून आरोग्यासंदर्भात आहे. केवळ बीफच नाही तर कुठलेच रेडमीट खायची गरज नाही कारण अपाय होण्याची शक्यताच अधिक असे वाटते. तरी देखील माझा बंदी प्रकरणाला एकंदरीत विरोध आहे. केवळ बीफच नाही तर कुठच्याही बंदीस... त्याऐवजी बीफ उद्योग बंद करण्यासाठी आणि लोकांच्या बीफ खायच्या सवयी घालवण्यासाठी चर्चा आणि शिक्षण गरजेचे आहे असे मात्र मला मनापासून वाटते. असो.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
अ
अस्वस्थामा Fri, 10/16/2015 - 12:08 नवीन
बाकी प्रतिसाद नेहमीप्रमाणेच उत्तम पण,
मी काही बीफ खात नाही पण त्याचे कारण धार्मिक नसून आरोग्यासंदर्भात आहे. केवळ बीफच नाही तर कुठलेच रेडमीट खायची गरज नाही कारण अपाय होण्याची शक्यताच अधिक असे वाटते. तरी देखील माझा बंदी प्रकरणाला एकंदरीत विरोध आहे. केवळ बीफच नाही तर कुठच्याही बंदीस... त्याऐवजी बीफ उद्योग बंद करण्यासाठी आणि लोकांच्या बीफ खायच्या सवयी घालवण्यासाठी चर्चा आणि शिक्षण गरजेचे आहे असे मात्र मला मनापासून वाटते. असो.
:)))) (इथे लोल साठीच्या ३-४ स्मायल्या कल्पाव्या ) अहो, पहिली गोष्ट म्हणजे हेच सगळे मांसाहाराबद्दलदेखील लोक बोलतात आणि त्यात पूर्वग्रहदुषितता जास्त आहे असे स्प्ष्ट मत आहे. त्याऐवजी बीफ उद्योग बंद करण्यासाठी आणि लोकांच्या बीफ खायच्या सवयी घालवण्यासाठी चर्चा आणि शिक्षण गरजेचे आहे असे मात्र मला मनापासून वाटते. असो. बीफ उद्योगाबद्दल तिळमात्रही सहानुभुती नसतानाही तुमचे लोकांनी खाऊ नये म्हणून लोक-शिक्षण (brain washing?) द्यायचे मनसुबे छुपे मत सांगतायत की. रेडमीट अगदी तुम्ही धूम्रपान आणि तत्सम व्यसनांच्या पंगतीत बसवण्याचे प्रयत्न कशासाठी ? फक्त तुम्हाला मान्य नाही म्हणून. ? (हे झाले की मग काय चिकन आणि अंडी बंदीसाठी लोक-शिक्षण ? मग काय जैन पद्धतीच योग्य म्हणून कांदा-लसूण बंदीसाठी लोक-शिक्षण? थोडक्यात हे खाणार्‍यांना कमीपणा, अपराधीपणा आणा, अघोषित बहिष्कार टाका असे काहीतरी तुम्हाला मान्य आहे असे आहे काय ? ) त्यापेक्षा, फळे व धान्यांवर वापरली जाणारी घातक फवारणी, चिकन आणि अंडी उत्पादनातला अँटी-बायोटीक्सचा वारेमाप वापर, दूध, धान्य व भाज्यांच्यामध्ये केली जाणारी घातक भेसळ हे जास्त लोक-शिक्षणासाठी आणि कठोर नियमनासाठी महत्त्वाचे विषय आहेत. विकासराव तुमच्याकडून अशा मताची अपेक्षा नव्हती म्हणून हा प्रतिसाद प्रपंच.. ((इतर लोकांना त्रास न देता) कोणी काय खावे याबद्दल कोणतेही prejudice अमान्य असलेला..)
↩ प्रतिसाद: विकास
त
तर्राट जोकर Fri, 10/16/2015 - 12:21 नवीन
शब्दा शब्दास सहमती.... बाकी बीफ उद्योगावर (प्रत्यक्षात मुस्लिमांवर) शरसंधान करण्यासाठी पर्यावरणाचा खांदा निवडणार्‍या निर्बुद्ध लोकांचे फार कौतुक वाटते बुवा... आपल्याच पार्श्वभागाखाली होणारा नेहमीचा पर्यावरण र्‍हास थांबवण्याची शष्प धमक पार्श्वभागात नसतांना बीफ उद्योगच बंद करायच्या अज्ञानी तितक्याच राणा भीमदेवी छाप घोषणा ऐकून छान मनोरंजन होते.
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
व
विकास Fri, 10/16/2015 - 16:58 नवीन
बीफ उद्योगाबद्दल तिळमात्रही सहानुभुती नसतानाही तुमचे लोकांनी खाऊ नये म्हणून लोक-शिक्षण (brain washing?) द्यायचे मनसुबे छुपे मत सांगतायत की. आपला गैरसमज आहे. सहानभूतीचा प्रश्न नाही पण भारतीय आहारात जर बीफ प्रामुख्याने नसेल तर ते अधिक आणण्याचा संबंध येत नाही असे माझे म्हणणे आहे. त्याची कारणे प्रामुख्याने स्वास्थ्याशी निगडीत आहेत आणि तसेच सध्याच्या काळात पर्यावरणाशी देखील निगडीत आहेत. मला गंमत वाटते की जे डावे आणि छुपे डावे इतर वेळेस पर्यावरणाच्या गप्पा मारतात ते या संदर्भात कसे काही बोलत नाहीत? रेडमीट अगदी तुम्ही धूम्रपान आणि तत्सम व्यसनांच्या पंगतीत बसवण्याचे प्रयत्न कशासाठी ? फक्त तुम्हाला मान्य नाही म्हणून. ? मान्य नाही असे कुठे म्हणले? कधीकाळी सिगरेटला पण प्रतिष्ठा होती, आता कुठल्याही चित्रपटाच्या आधी "धुम्रपान स्वाथ्य के लिये...." वगैरे वगैरे दाखवायला लागले आहेत. ते का? का ते पण ब्रेन वॉशिंग आहे असे म्हणायचे आहे? कारण त्याचे गंभीर परीणाम समजलेत. त्याच बरोबर ते तात्काळ बंद करता येणार नाही हे देखील माहीत असल्याने लोकशिक्षण दिले जाते. तेच रेड मीट च्या बाबतीत आहे. आज (खर्‍या) बिल क्लिंटनसारखा माणूस पण vegan होतो आणि रेडमीट पूर्णपणे दूर करतो कारण त्याचे आरोग्यासंदर्भातले महत्व त्याला कळले आहे म्हणून. म्हणून ब्रेनवॉशिंग म्हणून नाही, पण जनतेला informed decision घेण्यासाठी त्यातील माहिती द्यायला हवी असे माझे मत आहे. म्हणूनच मी आधी म्हणल्याप्रमाणे सरसकट बॅन करण्याच्या विरोधात आहे. कुठल्याही बॅनच्या कुणिही घातलेल्या बॅनच्या विरोधात आहे. मग तो इंदीरा गांधींनी घातलेला जगातला पहीला रश्दी विरोधातील बॅन असो, आधीच्या कुठल्यातरी काँग्रेससरकारने घातलेला गोडसेंच्या पुस्तकावरील बॅन अथवा हुसेनच्या चित्रांवरचा बॅन असोत अथवा वरकरणी आत्ताचा वाटणारा बीफ बॅन असोत. वर करणी म्हणायचे कारण इतकेच की भारतीय राज्य घटनेच्या १९४९ साली लिहीलेल्या ४८ व्या कलमात खालील वाक्य/अपेक्षा आहे:
Article 48 in The Constitution Of India 1949 48. Organisation of agriculture and animal husbandry The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, in particular, take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter, of cows and calves and other milch and draught cattle.
चर्चा करायचीच असेल तर ही घटना दुरुस्ती करा म्हणून या मोदीविरोधकांनी करावी आणि घटना दुरुस्ती घडवून आणावी. गेली साठ वर्षे त्यासाठी होती. भारतीय गणराज्याचे आणिबाणीत सगळे अधिकार एकवटलेले असताना सेक्यूलर राष्ट्र म्हणून अधिकृतपणे करण्यात आले. अनेक घटना दुरुस्त्या करण्यात आल्या. तेंव्हा का नाही केली घटना दुरुस्ती या लोकांनी आणि आत्ता बीफच्या नावाने गळे काढत आहेत ते? हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. सहानभूती नसलीच तर असल्या कांगावखोर विचारवंतांच्या बाबतीत नाही असे माझे म्हणणे आहे. असो.
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
त
तर्राट जोकर Fri, 10/16/2015 - 21:45 नवीन
हे आर्टीकल ४८ जे लोक तोंडावर सतत फेकत आहेत. त्यांनी फक्त prohibiting the slaughter, of cows एवढाच शब्दसमुच्चय मतलबापुरता उचलेला दिसतोय. त्याआधी, नंतर काय याची कुणास काय पडलीये. हे मार्गदर्शक तत्वांमधे अंतर्भूत आहे. घटनेचा भाग असला तरी त्याला कायद्याचे मोल विशिष्ट परिस्थितींमधेच प्राप्त होते. The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, in particular, take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter, of cows and calves and other milch and draught cattle. शब्दशः भाषांतर्/अनुवाद: (संघ)राज्याने आधुनिक व वैज्ञानिक पद्धतींनुसार कृषी व पशुपालनाचे आयोजन करण्याचे प्रयत्न करावे, आणि (पशुंच्या) प्रजातींच्या सुरक्षा व सुधारणा करण्यासाठी व गाय, वासरे अणि इतर दूध देणार्‍या आणि शेतीस कामात येणार्‍या जनावरांच्या कत्तलीस प्रतिबंध करण्यासाठी (योग्य) पावले उचलावीत. सोप्या भाषेतः सरकारने शेतीसंबंधी पशुपालनाचे आधुनिक, शास्त्रिय, वैज्ञानिक पद्धतीने नियमन करावे. त्यासाठी पशुंच्या जातींचे संवर्धन व संगोपन करावे. अशा संवर्धनाच्या व संगोपनाच्या कार्यासाठी आवश्यक भासत असेल तर गायी, वासरे व इतर शेतीस उपयोगी पशुंच्या कत्तलीस प्रतिबंध करावा जेणेकरुन (देशी) प्रजाती नष्ट होण्याचा धोका नाहिसा व्हावा.
तेंव्हा का नाही केली घटना दुरुस्ती या लोकांनी आणि आत्ता बीफच्या नावाने गळे काढत आहेत ते? हा माझ्या पुढचा प्रश्न आहे.
कत्तलीस बंदी हे शब्द ज्या परिस्थितीतून आलेत ती काय परिस्थिती होती? दुष्काळात पशुधनाची आबाळ होऊ नये म्हणून व चार पैसे गाठीशी असावेत म्हणून कसायाला पशु विकण्याची प्रथा होती, अजूनही आहे. आजकाल शेतीशी, तिच्याशी संबंधीत कुठल्याही गोष्टीशी कसलाही संपर्क येत नसलेले वरील आर्टीकलबद्दल जेव्हा जोमाने बोलत असतात तेव्हा एक मोठा कालखंडभर आपल्या देशाची एक मोठी लोकसंख्या शेतीनिगडीत व्यवसायांवर जगत होती व त्यांच्या स्वत:च्या अशा समस्या असतात हे लक्षात घेण्याच्या बौद्धिक कक्षेत नसतात. दुष्काळसमयी योग्य व उचित वाटतील अशी पावले उचलून पशुधन वाचवणे हे सरकारचे प्रमुख कर्तव्य असते. त्यासाठी चाराछावण्या सरकारतर्फे दिल्या जातात. व कत्तलीस बंदी केली जाते. भारतीय राज्यघटनेत गोहत्याबंदी ही कुठेही धार्मिक अर्थाने मुळीच आलेली नाही, त्यास व्यावहारिक संदर्भ आहे. हिंदूंनी गाईला पूजनिय मानण्याचा आणि राज्यघटनेतील गोहत्याबंदीचा तिळमात्र संबंध नसतांना "गोहत्याबंदी हा शब्द घटनेतच आहे, आम्ही आमचे मनचे काही लावत नाही, आता तुम्ही घटनाच पाळत नाही म्हटल्यास बघा बुवा" असा पवित्रा घेणारे इतर समयी घटनेची पदोपदी पायमल्ली होत असतांना का मूग गिळून बसलेले असतात हेही विचारावे म्हणतो. तेही त्याच थाटात ज्या थाटात धागाकर्त्याने पुरस्कारपरतकर्त्यांना विचारले आहे. तेव्हा कुठे जातो तुमचा धर्म? तेव्हा कुठे जाते तुमची राज्यघटना? केवळ मुस्लिम बीफ खातात म्हणूनच हा कांगावा सुरु आहे. बाकी काही नाही. गोहत्येस विरोध करणारे स्वत:च्या धार्मिक कारणामुळे कमी पण मुस्लिम खातात म्हणून त्यांची अडचण करण्याच्या हेतूने अतिशय नीच पातळीचा थिल्लरपणा दाखवत आहेत. इतर धाग्यावर मी हाच मुद्दा मासे खाणार्‍यांबद्दल मांडला तिथे ही कोणी उत्तर देऊ शकलेलं नाहीये. इथेही मिळणार नाहीच. पण परत हे आर्टीकल ४८ समोर धरून नाचवण्याआधी पुरेसा अभ्यास सोबत असू द्यावा ही नम्र विनंती. काय की म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो. तर जेव्हा जेव्हा आर्टीकल ४८ कुणी पुढे करेल तिथे मी हाच प्रतिसाद कॉपी-पेस्ट मारत जाईल.
↩ प्रतिसाद: विकास
म
मृत्युन्जय Sat, 10/17/2015 - 09:54 नवीन
तजो तुम्ही लावलेला कलम ४८ चा अर्थ पुर्णपणे चुकीचा आहे, मुळात तुम्ही एकीकडे इतरांवर सोयिस्कर अर्थ लावण्याचा आरोप करत असताना तुम्ही स्वतः तेच करत आहात. एक तर तुम्ही लावलेला कायदेशीर आणि सोप्या भाषेतला असे दोन्ही अर्थ चुकीचे आहेत. दुसरे म्हणजे "in particular," या शब्दांचे भाषांतर तुम्ही सोयिस्कर रीत्या टाळले. तिसरे म्हणजे "Directive Principle of State policy" हे देशाच्या घटनेने दिलेले स्पष्ट मार्गदर्शन आहे. "Directive Principle" जरी कायद्याने बंधनकारक नसले तरी कायदा बनवताना ती "Directive Principle" वापरुन कायदा बनविणे सरकारसाठी बंधनकारक आहे. चौथी गोष्ट म्हणजे कलम ४८ चे तुम्ही दोने भाग केले आहे तः ( हे करताना "in particular," हे शब्द सोयिस्कर रीत्या टाळले आहेत ते वेगळे) १. The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, २. take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter, of cows and calves and other milch and draught cattle. यापैकी तुम्ही सोयिस्कर रीत्या अस अर्थ काढला जो कायदेशीर भाषेत कुठेही प्रतिबिंबित होत नाही की दुसरा भाग हा पहिल्या भागातील उद्दिष्टांच्या पुर्तीला हातभार लावण्यासाठी आहे. वस्तुतः हे कलम "agriculture and animal husbandry" य शीर्षकाखाली विविध गोष्टींवर मार्गदर्शन करते. त्यातील तुम्ही वेगळ्या काढलेल्या २ गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि दुसरी पहिलीच्या पुर्ततेसाठी हातभार लावण्यासाठी नसून स्वतःचे वेगळे अस्तित्व दर्शवते. खासकरुन ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पहिली गोष्ट करण्याच्या सरकारने प्रयत्न करावा असे लिहिले आहे (The State shall endeavour to) तर दुसरी गोष्ट खासकरुन करावीच असे आग्रहाचे प्रतिपादन केले आहे (in particular, take steps for ....... prohibiting the slaughter, of cows and calves .......) तुमचा प्रतिसाद मी दुर्लक्षित सुद्धा केला असता कारण या कलमाचे योग्य ते विवेचन मी आधीच दिले आहे. पण तुम्हाला प्रतिसाद दिला नसता तर तुम्ही जितं मियाँ च्या थाटात लोकांनी प्रतिसाद दिलाच नाही म्हणुन मिशीला तूप लावत फिरत बसाल म्हणुन ह प्रतिसादप्रपंच. इतर वेळेस हाच प्रतिसद कॉपी पेस्ट केला आहे असे समजा. अवांतरः माझा गोहत्याबंदीला काही पाठिंबा आहे अशातली बाब नाही. विरोध आहे असेही नाही. पण घटनेच्या कलमांची कृपा करुन मोडतोड करु नका. आणि सोयिस्कर अर्थ तर अजिबात लावु नका ही विनंती. कायद्याचे कलमांचे अर्थ लावताना कुठलाही शब्द "अकारण" नसतो हे देखील ध्यानात ठेवा.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 10/17/2015 - 10:20 नवीन
डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ़ स्टेट पॉलिसी वर उत्तम विवेचन आपण केले आहेत मृत्युंजय जी, माझ्या काही जेन्युइन शंका आहेत त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? १. डीपीएसपी ला एसेंस ऑफ़ कॉन्स्टिट्यूशन म्हणले जाते (बहुतेक ग्रेनविल ऑस्टिन पहिल्यांदा म्हणाले होते) ह्याच्यामुळे तुम्ही अधोरेखित केलेले त्यांचे महत्व कमी लेखाले जावु शकत नाही हे ओघाने आलेच तरीही २.फंडामेंटल राइट्स किंवा एफआर हे "मैग्नाकार्टा" ऑफ़ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणवले जातात (घटना ड्राफ्टिंग समिती अध्यक्ष ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी बहुदा ह्या भागाची महती विदित करायला हा शब्दप्रयोग केला आहे) अन त्याच कनेक्शन ने हे राइट्स नॉन ओवरराइडिंग नेचर चे आहेत, आता फंडामेंटल राइट्स हे डायनामिक आहेत (२१ए चे एडिशन हे तात्कालिक उदाहरण) अन ते जस्टिसियेबल तर आहेतच शिवाय त्यांची एनफोर्समेंट ही कोर्ट ऑफ़ लॉ च्या निर्देशाने दिली जावु शकते, त्यांचे हनन झाल्याचे माननीय कोर्ट ला वाटल्यास "रिट्स" सुद्धा इशू होतात (हेबियस कार्पस, मेंडेमस, को वारंटो इतकेच आठवले तुर्तास तस्मात् क्षमस्व) प्रश्न असा की वरील दोन्ही मुद्दे ग्राह्य धरल्यास एक लीगल एक्सपर्ट म्हणुन लीगल sanctity अन प्रॅक्टिकलिटी हा निकष धरून आपण डीपीएसपी आधारीत कायदा निर्मिती ला पाठिंबा द्याल का फंडामेंटल राइट्स अबाधित राखून डीपीएसपी इम्प्लीमेंटेशन ला वाव देऊन कायदा निर्मिती ला सपोर्ट कराल? In both cases assumed separately including the case criterion u favour vs the criteria u oppose बीफ बॅन कुठल्या पर्सपेक्टिव मधे ठेवाल अन इम्प्लीमेंट कराल?
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 10/17/2015 - 10:28 नवीन
डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ़ स्टेट पॉलिसी वर उत्तम विवेचन आपण केले आहेत मृत्युंजय जी, माझ्या काही जेन्युइन शंका आहेत त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? १. डीपीएसपी ला एसेंस ऑफ़ कॉन्स्टिट्यूशन म्हणले जाते (बहुतेक ग्रेनविल ऑस्टिन पहिल्यांदा म्हणाले होते) ह्याच्यामुळे तुम्ही अधोरेखित केलेले त्यांचे महत्व कमी लेखाले जावु शकत नाही हे ओघाने आलेच तरीही २.फंडामेंटल राइट्स किंवा एफआर हे "मैग्नाकार्टा" ऑफ़ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणवले जातात (घटना ड्राफ्टिंग समिती अध्यक्ष ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी बहुदा ह्या भागाची महती विदित करायला हा शब्दप्रयोग केला आहे) अन त्याच कनेक्शन ने हे राइट्स नॉन ओवरराइडिंग नेचर चे आहेत, आता फंडामेंटल राइट्स हे डायनामिक आहेत (२१ए चे एडिशन हे तात्कालिक उदाहरण) अन ते जस्टिसियेबल तर आहेतच शिवाय त्यांची एनफोर्समेंट ही कोर्ट ऑफ़ लॉ च्या निर्देशाने दिली जावु शकते, त्यांचे हनन झाल्याचे माननीय कोर्ट ला वाटल्यास "रिट्स" सुद्धा इशू होतात (हेबियस कार्पस, मेंडेमस, को वारंटो इतकेच आठवले तुर्तास तस्मात् क्षमस्व) प्रश्न असा की वरील दोन्ही मुद्दे ग्राह्य धरल्यास एक लीगल एक्सपर्ट म्हणुन लीगल sanctity अन प्रॅक्टिकलिटी हा निकष धरून आपण डीपीएसपी आधारीत कायदा निर्मिती ला पाठिंबा द्याल का फंडामेंटल राइट्स अबाधित राखून डीपीएसपी इम्प्लीमेंटेशन ला वाव देऊन कायदा निर्मिती ला सपोर्ट कराल? In both cases assumed separately including the case criterion u favour vs the criteria u oppose बीफ बॅन कुठल्या पर्सपेक्टिव मधे ठेवाल अन इम्प्लीमेंट कराल?
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ब
बोका-ए-आझम Sat, 10/17/2015 - 10:50 नवीन
व्यावसायिक वकील आणि कंपनी सेक्रेटरी असल्यामुळे ते याची practical बाजू व्यवस्थित सांगू शकतील पण मी theoretical perspective देऊ शकतो. DPSP या guidelines आहेत अाणि FR हे नागरिकांचे हक्क आहेत.एक उदाहरण द्यायचं तर DPSP म्हणजे वाहतुकीचे नियम आहेत आणि FR म्हणजे आपण चालवत असलेली वाहनं आहेत. संसद एखादा मूलभूत हक्क काढून घेऊ शकते किंवा नवीन हक्क यादीत समाविष्ट करु शकते. उदाहरणार्थ खाजगी मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कांच्या यादीतून काढून टाकलेला आहे. म्हणजे कायदा जर मूलभूत हक्कांवर बंधनं आणत असेल पण DPSP ला पूर्णपणे सुसंगत असेल, तर तो pass होऊ शकतो. DPSP is a framework of the Constitution and under no circumstances, it can be violated.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 10/17/2015 - 11:27 नवीन
पण असे म्हणता "श्रीमती चंपाकम वि स्टेट ऑफ़ मद्रास" केस मधे सुप्रीमकोर्ट न क्लियर केले आहे की फंडामेंटल राइट्स हे कायम सुप्रीम राहतील ... The court opined that the fundamental rights are sacroscant and could not be curtailed by the directive principles. The directive principles although important in themselves have to adhere to the fundamental rights and that in a case of conflict part III would prevail over part IV
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
मृत्युन्जय Sat, 10/17/2015 - 13:06 नवीन
फंडामेंटल राइट्स सर्वात महत्वाचे. त्यातही राइट टु एक्वेलिटी हा सर्वात महत्वाचा राइट आहे. राइट टु फ्रीडम देखील तितकाच महत्वाचा. मला जर विचाराल तर एखद्याचे स्वातंत्र्य हिरावुन घेण्याचा अधिकार दुसर्‍या कुणला देण्याचा कायदा असेल तर मी त्याला प्राणपणाने विरोध करेन. समानतेचा आणि स्वातंत्र्याचा हे दोन्ही अधिकार काही अपवादांसकट येतात. कायद्याच्या सद्य चौकटीत आपल्याला ते तसेच स्वीकारावे लागतील. जर एखादी डायरेक्टिव मूलभूत अधिकारांवर गदा आणत असतील तर ते नक्कीच स्वीकारार्ह नसतील. "बीफ खाण्याच अधिकार" यापैकी कुठल्याही अधिकारात बसू शकत नाहित. त्यामुळे मूलभूत अधिकारांची चर्चा करताना "बीफ बॅन" डिसकस करणे चुकीचे ठरेल. राहत राहिला प्रश्न बीफ बॅनला सपोर्ट करण्याचा तर त्याबद्दल मी आधीच लिहिलेले आहे. माझा या कायद्याला पाठिंबाही नाही आणि विरोधही नाही. कुणाला काय खायचे आहे हे सर्वस्वी त्या व्यक्तीवर अवलंबुन असावे असे माझे आपले मत आहे. कलम ४८ चा मुद्दा धसास लावण्याची ४ कारणे: १. ऊठसुट भाजपा सरकारवर विनाकारण टीका करणार्‍या लोकांना तोंडघशी पाडून त्यांची तोंडे बंद पाडणे. २. बीफ बॅनचा (सरकारी निर्णय) संबंध हिंदुत्वाशी जोडुन उगाच भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार्‍य लोकांना कलम ४८ ची पार्श्वभूमी आणि इतिहास समजावुन सांगुन "आमच्या काळात असे नव्हते" म्हणुन तोंड वेंगाडणार्‍या त्या लोकांचे दात त्यांच्या घश्यात घालणे ३. बीफ बॅनचा संबंध मोदी आणि फडणविस यांच्याशी जोडणार्‍या लोकांना या गोष्टीचा संबंध चचा नेहरु आणि आंबेडकरांशी कसा आहे ते समजावुन सांगणे. ४. बीफ बॅन कशी मुस्लिमविरोधी हिंदुत्ववादी संघटनांची खेळी आहे हे जीवाच्या आकांताने ओरडुन सांगणार्‍या लोकांना हे समजावुन सांगणे की ते लोक हे आरोप खरे म्हणजे आंबेडकर आणि नेहरुं वरच लावत आहेत. त्यापैकी आंबेडकरांची इस्लामबद्दलची भूमिका बर्‍याच जणांना माहिती नसेलच याची खात्री आहे. तरीही. अवांतरः १. लोक बीफ बॅनच्या सरकरच्य निर्णयाचा आणि दादरी घटनेचा संबंध का जोडत आहेत हेच कळत नाही. लोकांना असे तर नाही ना म्हणायचे की मोदींनी लोकांच्या कानात जाउन दादरी मध्ये हत्याकांड करायला सांगितले. लोक मुर्ख असतील तर त्याला मोदी काय करणार? २. दादरी घटना कृर, दुर्दैवी, अमानुष आणि किळसवाणी आहे. मान्य. त्या सगळ्या लोकांना पकडा आणि फाशी द्या. पण धार्मिक तेढीतुन खून झालेले हे भारतातले पहिलेच प्रकरण आहे की काय? त्याचा संबंध सरकारशी का जोडल जात आहे?
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 10/17/2015 - 13:22 नवीन
फेयर एनफ फॉर मी!!! :)
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 10/17/2015 - 14:40 नवीन
दादरी घटना कृर, दुर्दैवी, अमानुष आणि किळसवाणी आहे. मान्य. त्या सगळ्या लोकांना पकडा आणि फाशी द्या. पण धार्मिक तेढीतुन खून झालेले हे भारतातले पहिलेच प्रकरण आहे की काय? त्याचा संबंध सरकारशी का जोडल जात आहे? कोणाही गटाच्या नसलेल्यांनाच नव्हे तर अगदी काँग्रेसला वाहिलेल्या लोकांना हा प्रश्न विचारला की त्यांच्या तोंडावर काहीसे शरमलेले व काहीसे कुत्सित हसू येताना पाहत आहे. हल्ली कांगावाखोरपणा हेच भारतिय राजकारणातचे मूलभूत तत्व झाले आहे. येन केन प्रकारेन संबंधीत/असंबंधीत गोष्ट पकडून राजकिय विरोधकावर राळ उडवा, मग "तो किती नीच आहे बघा" असा ओरडा करत रहा, जमले तर परदेशी संस्था/देशांमध्ये देशाची नाचक्की होईल असे जबाब द्या आणि प्रत्येक, अगदी देशाला फायदेशीर असलेल्या कामातही खोडा घालत रहा; ही प्रणाली जोर पकडून आहे. भारतिय जनता हे सगळे समजून घेण्याइतकी प्रगल्भ नाही, जो गदारोळ जास्त मोठा त्याचेच खरे आहे असे ती समजेल, असा राजकारण्यांचा होरा आहे (आणि तो काही प्रमाणात खराही आहे म्हणा). सर्वात वाईट गोष्ट ही की या सगळ्यात देशाचे नुकसान होत आहे याचे कोणालाच सोयर सुतक असल्याचे फारसे दिसत नाही. :(
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सच्चिदानंद Sat, 10/17/2015 - 17:03 नवीन
अगदी सहमत ..:/
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
त
तर्राट जोकर Sun, 10/18/2015 - 21:11 नवीन
कायद्याचा अर्थ समजावून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद! मी काही कायदेपंडीत नाही त्यामुळे अर्थ लावण्यास चुकलो असेन. पण दोन प्रश्न आहेत की भारतीय राज्यघटनेत हे कलम येण्यामागची कारणमीमांसा मी सांगीतली ती खरी आहे, की काही वेगळी आहे? व हे गोहत्याबंदी कलम धर्माशी संबंधीत आहे की पशुसंवर्धनाशी? या दोन प्रश्नांची उत्तरे धसास लावलीत तर ती जी चार कारणे आहेत त्याची गरज पडणार नाही बहुतेक. कारण 'आर्टीकल ४८' हे गोहत्याविरोधकच चर्चेत आणतात.
१. लोक बीफ बॅनच्या सरकरच्य निर्णयाचा आणि दादरी घटनेचा संबंध का जोडत आहेत हेच कळत नाही. लोकांना असे तर नाही ना म्हणायचे की मोदींनी लोकांच्या कानात जाउन दादरी मध्ये हत्याकांड करायला सांगितले. लोक मुर्ख असतील तर त्याला मोदी काय करणार?
सरकार बदलून "गुजरातेत मुसलमानांचं शिरकाण करणारे व त्यांना त्यांची जागा दाखवणारे अशी प्रतिमा असलेले नरेंद्र मोदी" सत्तेवर आलेत हे पाहून हिंदूधर्माभिमान्यांना (मुस्लिम-हेटर्स) झालेला आसुरी आनंद व काही दिव्य लोकांचे दिव्य वचनांद्वारे केली जाणारी जनजागृती हे बघता तुम्ही असले प्रश्न विचारणे चमत्कारिक वाटते. शंका असल्यास झलक बघण्यासाठी काही कट्टर हिंदू फेसबुक गृप्सवर जाऊन यावे. हिंदूंसाठी काम करणार्‍या काही आक्रमक संघटनांची भाषा व देहबोली बदलल्याचेही आपणांस दिसून आले नसेल तर आपले कौतुक आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवणे हे आमच्यासारख्या रिकामटेकड्या लोकांची कामे आहेत. त्यामुळे मोदींनी कोणाच्या कानात जाऊन काय सांगितले हे आम्हास बरोब्बर कळते. उदा. वर्गात क्लास मॉनिटर असतो. खोड्या करणार्‍या, बडबड करणार्‍या मुलांची नावे लिहून वर्गशिक्षकाला देणे त्याचे काम असते. आता जे टारगट मुले असतात त्यांच्याच ग्रुपमधला कुणी मॉनिटर झाला की त्यांच्या कारवायांना जसा कुणी न सांगता उत येइल तसा आता हिंदूधर्माभिमान्यांना आला आहे. त्यातून हा मॉनिटर आपली नावे खरंच सांगणार नाही हेही कन्फर्म आहे. त्यामुळे वर्गात काय स्थिती असेल ती मॉनिटरनेच ठरवलेली आहे, त्याच्या आदेशानेच झालेली आहे असे म्हणता येत नाही पण ....इट्स अ बटरफ्लाय इफेक्ट.
२. दादरी घटना कृर, दुर्दैवी, अमानुष आणि किळसवाणी आहे. मान्य. त्या सगळ्या लोकांना पकडा आणि फाशी द्या. पण धार्मिक तेढीतुन खून झालेले हे भारतातले पहिलेच प्रकरण आहे की काय? त्याचा संबंध सरकारशी का जोडल जात आहे?
धार्मिक तेढीतून खून झालेले हे पहिलेच प्रकरण नाही. पण गाय मारून खाल्ली म्हणून याआधी किती खून झालेत तेही सांगा. याआधी हिंदूस्थानात मुस्लिमांनी कधीच गाय खाल्ली नव्हती? मग आत्ताच त्याबद्दल इतका क्रोध कसा काय उत्पन्न झाला की आपल्याच गावातल्या एकाची हत्या करण्यापर्यंत मजल जावी... ह्याची मीमांसा करण्याची खरंच गरज वाटत नाही? त्यात पाञ्चजन्य सारखे मुखपत्र सरळ गोहत्या करणार्‍याच्या हत्येला वेदमान्यता देऊन मोकळे झाले. म्हणजे संघ ह्या हत्येला समर्थन देत आहे. आता भाजप ही संघाचीच राजकिय शाखा आहे -असे इथेच कुठे वाचलेले, बहुतेक गा.पै. यांनी म्हटलेले - त्यांचेच सरकारही आहे. तर सरकार ह्या हत्येला समर्थन देत आहे असे होत नाही का? भाजपप्रेमी, संघप्रेमी, हिंदूप्रेमी इत्यादी लोकांना असले प्रश्न विचारले की तिळपापड होतो. ते गरज असेल तेव्हा संघाशी, हिंदुत्वाशी भाजपचा संबंध सांगतात, गोत्यात येत असले की नाकारतात. तर्काशी अजिबात संबंध नसलेले काहीतरी मग तोंडावर फेकून गप करायला बघतात. बघा बुवा...
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Mon, 10/19/2015 - 07:41 नवीन
कायद्याचा अर्थ समजावून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद! मी काही कायदेपंडीत नाही त्यामुळे अर्थ लावण्यास चुकलो असेन. हरकत नाही. कधीकधी अनावधानाने आपण गैरसमज करुन घेतो. तो गैरसमज दूर झाला असेल अशी अपेक्षा. पण दोन प्रश्न आहेत की भारतीय राज्यघटनेत हे कलम येण्यामागची कारणमीमांसा मी सांगीतली ती खरी आहे, की काही वेगळी आहे? व हे गोहत्याबंदी कलम धर्माशी संबंधीत आहे की पशुसंवर्धनाशी? या दोन प्रश्नांची उत्तरे धसास लावलीत तर ती जी चार कारणे आहेत त्याची गरज पडणार नाही बहुतेक. कारण 'आर्टीकल ४८' हे गोहत्याविरोधकच चर्चेत आणतात. कायद्याचे अर्थ लावताना काही प्राथमिक निकष लावतो. Interpretation of Statutes involve external and internal aids of interpretation. One of the aids of interpretation is “Headings” किंवा शीर्षक. तर कलम ४८ चे शीर्षक आहे "Organisation of agriculture and animal husbandry". इतर कुठे या कलमाबद्दल अजुन काही पार्श्वभूमी असेल तर मला महिती नाही पण तशी काही पार्श्वभूमी कुठे नमूद केलेली नाही असे गृहीत धरल्यास या कलमाचा अन्वयार्थ लावताना त्याचे शीर्षक महत्वाचे ठरले. ते बघता या कलमाचा संबंध "धर्माशी" नाही हे अगदी उघड आहे आणी तसा तो कोणी लावत असेल तर ते चुकीचे आहे. सरकार बदलून "गुजरातेत मुसलमानांचं शिरकाण करणारे व त्यांना त्यांची जागा दाखवणारे अशी प्रतिमा असलेले नरेंद्र मोदी" चष्मा काय लावाल तसा असतो. माझ्या मनात तर मोदींची प्रतिमा "विकासाचा रस्ता दाखवणारा नेता" अशीच आहे. मोदींनी संपुर्ण प्रचार विकासाच्य मुद्द्यावर केंद्रित केला होता. तो प्रचार धर्माधिष्ठित नव्हताच. गुजरातेत जे झाले ते दुर्दैवी होते. त्यात हिंदु आणी मुसलमान दोन्ही मेले. गोध्रा प्रकरण देखील दुर्दैवीच होते (अर्थात तेही गुजरातच म्हणा). हे दंगे रोखण्यासाठी शक्य ते सर्व उपाय मोदींनी केले. लोकांनी / जनतेने क्रौर्याचा जो नंगानाच खेळला त्यासाठी मोदी जबाबद्दार होत नाहित. धर्माधिष्ठित दंगे काही भारतात पहिल्यांदा होत नाही आहेत. १९४८ साली ब्राह्मणांवर, १९८४ साली शिखांवर या दंग्यांची कुर्‍हाड कोसळली आहेच आणि अगणित वेळा हिंदु - मुस्लिम दंगे झालेत ज्यात दोन्हीकडचे लोक मेले आहेत. ८० च्या द्शकात पद्धतशीरपणे लाखो पंडितांना काश्मीर सोडावा लागलाच आहे. मग एका घटनेवरुन हा नसता दंगा कशाला? सत्तेवर आलेत हे पाहून हिंदूधर्माभिमान्यांना (मुस्लिम-हेटर्स) झालेला आसुरी आनंद व काही दिव्य लोकांचे दिव्य वचनांद्वारे केली जाणारी जनजागृती हे बघता तुम्ही असले प्रश्न विचारणे चमत्कारिक वाटते. शंका असल्यास झलक बघण्यासाठी काही कट्टर हिंदू फेसबुक गृप्सवर जाऊन यावे. हिंदूंसाठी काम करणार्‍या काही आक्रमक संघटनांची भाषा व देहबोली बदलल्याचेही आपणांस दिसून आले नसेल तर आपले कौतुक आहे. माझे कौतुक करण्यासाठी तुम्हाला बरीच अजुन कारणे मिळतील. त्यासाठी ते कौतुक राखुन ठेवा. सध्य हिंदु संघटना आक्रमक झाल्या असतील तर त्या मुर्ख आहेत. त्यातुन हाती काहिच लागणार नाही. मात्र याचाच दुसरा अर्थ ६० वर्षे देशात मुस्लिम धार्जिणे सरकार होते असा घ्यावा का? माझ्य मते तरी सध्या देशात धर्मनिरपेक्ष सरकार आहे. हे सरकार शिखांचे सिरकाण करणारे किंवा मुस्लिमा।चे लांगुलचालन करणारे नाही म्हणुन हिंदु अतिरेकी सरकार होत नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवणे हे आमच्यासारख्या रिकामटेकड्या लोकांची कामे आहेत. त्यामुळे मोदींनी कोणाच्या कानात जाऊन काय सांगितले हे आम्हास बरोब्बर कळते. अच्चं झाल होय. उदा. वर्गात क्लास मॉनिटर असतो. खोड्या करणार्‍या, बडबड करणार्‍या मुलांची नावे लिहून वर्गशिक्षकाला देणे त्याचे काम असते. आता जे टारगट मुले असतात त्यांच्याच ग्रुपमधला कुणी मॉनिटर झाला की त्यांच्या कारवायांना जसा कुणी न सांगता उत येइल तसा आता हिंदूधर्माभिमान्यांना आला आहे. त्यातून हा मॉनिटर आपली नावे खरंच सांगणार नाही हेही कन्फर्म आहे. त्यामुळे वर्गात काय स्थिती असेल ती मॉनिटरनेच ठरवलेली आहे, त्याच्या आदेशानेच झालेली आहे असे म्हणता येत नाही पण ....इट्स अ बटरफ्लाय इफेक्ट. तसे असणे आणि एखाद्याला तसे वाटणे यात फरक आहे. भाजपा आणि इतरांमधला फरक पानसरे घटनेवरुनच स्पष्ट होतो. दाभोळकरांचे खूनी अजुन मोकाट आहेत, कलबुर्गींचे खूनी अजुन मोकाट आहेत. हे दोन्ही खून बीजेपी शासित प्रदेशांच्या बाहेरचे. मात्र पानसरेंच्या खून प्रकरणात बरीच प्रगती आहे. इथेच फरक स्पष्ट होतो. धार्मिक तेढीतून खून झालेले हे पहिलेच प्रकरण नाही. पण गाय मारून खाल्ली म्हणून याआधी किती खून झालेत तेही सांगा. गाय हे निमित्त आहे. कधी मंदिरावर गोमांस फेकले म्हणुन खून झालेत कधी मशिदीसमोरुन मिरवणुकी काढल्या म्हणुन. कधी इतर धार्मिक कारणांमुळे. कारणे काय धर्मांधाना वेगवेगळी मिळत असतात. याआधी हिंदूस्थानात मुस्लिमांनी कधीच गाय खाल्ली नव्हती? मग आत्ताच त्याबद्दल इतका क्रोध कसा काय उत्पन्न झाला की आपल्याच गावातल्या एकाची हत्या करण्यापर्यंत मजल जावी... ह्याची मीमांसा करण्याची खरंच गरज वाटत नाही? परत तेच म्हणतो. वेगेवेगळी कारणांनी खून झलेत. त्या अधीही ती कारणे अस्तित्वात होतीच. लोकांमध्ये तेढ आहे. हिंदु मुस्लिम सलोख नाही हेच खरे आणि त्याचे मूळच शोधायचे झाले तर क्रुर आणि धर्मांध मुस्लिम शासकांमध्येच आहे हे सांगायला इतिहासतज्ञाचीसुद्धा गरज नाही. बाकी तुम्हीच बघा आता
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 10/19/2015 - 08:02 नवीन
मृत्यूंजय साहेब, माझ्या प्रतिसादातले काही उल्लेख माझी वैयक्तिक मते नाहीत, निरिक्षणे आहेत. 'मुस्लिम-द्वेषी-मोदी' हा चष्मा मी लावलेला नाही तर काही मूर्ख हिंदूधर्माभिमान्यांचा शब्द आहे. जसे शिवाजी मुस्लिम-विरोधक असतात तसे मोदींनाही मुस्लिम-किलर अशी प्रतिमा काही हिंदूंनीच चिकटवली आहे. इथेच, काळापहाड यांचे काही प्रतिसाद त्याचे समर्पक उदाहरण आहे. इथे चर्चा करतांना मी फक्त 'तुम्ही-आणि-मी' इतक्या संकुचित वर्तुळाचा विचार करत नाही. तुम्ही एक सुशिक्षित, संतुलित, सुजाण नागरिक आहात. पण याचा अर्थ प्रत्येक भाजपसमर्थक हा तुमचा क्लोन आहे असे नाही. इथे दिले गेलेले प्रतिसाद एकूण सर्व माध्यमांतून समोर येणार्‍या परिस्थितीवर भाष्य आहे. तुमच्या वैयक्तिक विचारसरणीवर नाही. हिंदु मुस्लिम सलोख नाही हेच खरे आणि त्याचे मूळच शोधायचे झाले तर क्रुर आणि धर्मांध मुस्लिम शासकांमध्येच आहे हे सांगायला इतिहासतज्ञाचीसुद्धा गरज नाही. याबद्दल आपले ज्ञान खरंच तोकडे आहे. इथे माहितीपेक्षा आकस जास्त आहे असे दिसते. हे विधान ज्या अभिनिवेशाने लिहिले आहे त्यावरून सलोख्याची अपेक्षाच नाही असेही जाणवते. या वरून सिंहाची व कोकराची गोष्ट आठवली. एक सिंह ओढ्यावर पाणी पित असतो. प्रवाहाच्या दिशेने पुढे एक कोकरू पाणी पित असते. सिंह त्या कोकराला म्हणतो, 'अरे माझे पाणी का उष्टे करतो आहे, जीव घेईल मी तुझा..', त्यावर कोकरू म्हणतं, 'महाराज, तुमच्याकडून पाणी माझेकडे येतंय, मी कसे उष्टे करेन?', त्यावर सिंह चिडतो आणि म्हणतो, 'अरे, आज तू नसशिल करत, पण भूतकाळात तुझ्या पूर्वजांनी तर नक्कीच केले असेल, तुला सोडणार नाय' असे म्हणत कोकराची नरडी धरतो. बाकीच्या प्रतिसादाशी सहमत व उत्तराबद्दल धन्यवाद!
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
अ
असंका Mon, 10/19/2015 - 13:54 नवीन
अप्रतिम तर्कशुद्ध प्रतिसाद!!! धन्यवाद!!
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
द
दत्ता जोशी Mon, 10/19/2015 - 09:35 नवीन
"मुळात तुम्ही एकीकडे इतरांवर सोयिस्कर अर्थ लावण्याचा आरोप करत असताना तुम्ही स्वतः तेच करत आहात" चालायचंच. विचारवंत आणि सेक्युलर लोकांची खासियतच आहे ती.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
र
रमेश आठवले Fri, 10/16/2015 - 00:55 नवीन
हिंदु या वर्तमान पत्रात १२ ऑक्टोबर ला "More writers return Akademi awards" या मथळ्यावर एक लेख प्रसिद्ध झाला होत. त्या वर मी केलेले कॉमेंट लेखाखाली प्रसिद्ध झाले आहे . ते येथे उद्धृत करत आहे. The common refrain in statements by the spate of awardees returning their awards is their resentment towards the "current" intolerance. This sudden realization indicates their resentment towards the present government at center. It is therefore, worthwhile reminding them that out of the three cases, murder of Dabholkar took place when congress was ruling at center and in Maharastra state and that of Kalburgi in congress ruled state of Karnataka.Only the murder of Pansare took place during BJP rule at center and state. Is this single case sufficient to make so much noise against the present democratically elected government ? Their bias and ideological grudge now stands exposed.
क
कपिलमुनी Fri, 10/16/2015 - 10:28 नवीन
लोकशाही मध्ये ज्याला हवा तेव्हा , लोकशाही मार्गाने एखद्या गोष्टीचा विरोध करायची मान्यता आहे. आता त्या समग्र साहित्यिकांना वाटला , आपला पुरस्कार परत करावा आणि त्या मार्गे आपला वैचारिक विरोध नोंदवावा. आणि त्यांनी तसे केले तर त्यात काय चुकले ?? तुम्ही तेव्हा का केला नाही ? आताच का करताय ? केरळमध्ये अशा घटना झाला तेव्हा का केला नाही ? त्यांना ज्यावेळी सरकारवर रोष व्यक्त करावा वाटला त्या वेळी त्यांनी लोकशाही मार्गाने व्यक्त केला (भलेही ते बायस्ड असोत). आणि पूर्वी का केला नाही ? हा विचार हास्यास्पद आहे . हे म्हणजे गांधीजींनी १९४२ ऐवजी १९३६ साली का चले जाव आंदोलन केले नाही ? वाजपेयींनी स्वच्छ भारत अभियान का राबविले नाही अशा टाईपचे रडीचे प्रश्न आहेत. त्यांना विरोध करायचा पूर्ण हक्क आहे . आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायचे की फाट्यावर मारयचे हे सरकार ठरवेल. त्यांचा विरोध चुकीच्या कारणांना असला तरी त्यांच्या विरोध करायच्या 'हक्काला' पाठिंबा असेल.
न
नाखु Fri, 10/16/2015 - 10:46 नवीन
बाबतच सहमत. बाकी ठरावीक हेतू समोर ठेऊन केलेला विरोध नक्कीच निषेधार्ह आहे आणि राहिलही !!!!!!!
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा