Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बुलेट ट्रेनचा अट्टाहास का?

ग
गॅरी ट्रुमन
Sun, 12/13/2015 - 18:19
🗣 269 प्रतिसाद
जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्या भारत दौऱ्यात कालच ९८,८०५ कोटी रूपयांच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बांधायच्या करारावर सही झाली. ९८,८०५ कोटी रूपये म्हणजे सध्याच्या भावाने सुमारे १५ बिलिअन डॉलर होतात. अन्य एका बातमीप्रमाणे बुलेट ट्रेनचा खर्च १५ बिलिअन डॉलर आहे. त्यापैकी ८०% म्हणजे १२ बिलिअन डॉलरचे कर्ज जपानची Japan International Co-operation Agency देणार आहे अशी बातमी आहे. हे कर्ज ०.१% व्याजाच्या दराने ५० वर्षे मुदतीचे असेल आणि मुद्दलाची परतफेड १५ वर्षांनंतर सुरू होणार अशी बातमी आहे. भारत सरकारला २०% म्हणजे सुमारे २० हजार कोटी रूपये या प्रकल्पात टाकावे लागतील आणि उरलेले सुमारे ८० हजार कोटी कर्जाऊ असतील. या कर्जाचे व्याज ०.१% आहे. सरकारच्या इक्विटीवरील रेट ऑफ रिटर्न ०.१% इतका कमी नक्कीच नसेल विशेषत: भारत सरकारच्या बॉंडवर ७-८% व्याजाचा दर आहे हे लक्षात घेता. तरीही आकडेमोडीच्या सोयीसाठी इक्विटीवरील रेट ऑफ रिटर्न ०% आहे आणि व्याजाचा दर ०.१% आहे असे समजू. या बातम्या वाचून काही प्रश्न माझ्यापुढे पडले आहेत. १. सुरवातीचे १५ वर्ष ८० हजार कोटींवरील व्याज म्हणजे ८० हजार कोटी गुणिले ०.१% = ८० कोटी रूपये द्यावे लागेल. ती रक्कम विशेष मोठी नाही. त्यानंतर कर्जाची एकूण ३५ वर्षात परतफेड करायची आहे. अशा पायाभूत सोयींसाठीच्या प्रकल्पावरील कर्जाची परतफेड बहुतांश वेळा बलूनिंग (सुरवातीला कमी आणि जशी वर्षे जातात त्याप्रमाणे जास्त) असते. या परतफेडीचे आकडे याक्षणी माझ्याकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आकडेमोडीच्या सोयीसाठी ३५ वार्षिक हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड होईल असे गृहित धरू. वार्षिक हप्ता सुमारे २,३२७ कोटी रूपये इतका येईल. प्रत्यक्ष हप्ता सुरवातीला २,३२७ कोटींपेक्षा कमी आणि नंतर जास्त असेल. म्हणजे बुलेट ट्रेनचे उत्पन्न दिवसाला २,३२७ कोटी भागिले ३६५ बरोबर ६.३८ कोटी रूपये असेल आणि बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य रूपये असेल तरच बुलेट ट्रेन वार्षिक हत्प्याला लागतील तितके पैसे उभे करू शकेल. २. आज मुंबई-अहमदाबाद मार्गावर सुमारे २५ रेल्वेगाड्या दररोज धावतात. यात अहमदाबादपर्यंत जाणाऱ्या आणि अहमदाबादमार्गे सौराष्ट्र आणि कच्छमध्ये जाणाऱ्या गाड्यांचा समावेश होतो. मुंबई-अहमदाबाद रेल्वे प्रवासाला आज ८-९ तास लागतात. तर त्याच प्रवासाला विमान सव्वा तास (आणि चेकीन टाईम इत्यादी धरून २ तास घेते). जर बुलेट ट्रेन दोन तासात अहमदाबादला पोहोचवणार असेल तर त्या ट्रेनचा Target Group सध्या विमानाने प्रवास करणारे प्रवासीच असतील-- सध्या ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी नव्हे. सध्या मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर २१ विनाथांबा विमाने दररोज उडतात. एका विमानात २०० प्रवासी असे धरले तर सगळी विमाने १००% भरली तर ४,२०० प्रवासी दररोज विमानाने मुंबई ते अहमदाबाद प्रवास करतात. अर्थातच दररोज सगळी विमाने १००% भरत नसतात. त्यामुळे आकडेमोडीच्या सोयीसाठी दररोज ४,००० प्रवासी प्रवास करतात असे समजू. इथे समजते की २०११-१२ ते २०१२-१३ या काळात देशातील सर्व विमानतळावर मिळून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सुमारे ४% ने घट झाली होती. AAI च्या संकेतस्थळावर अहमदाबाद विमानतळावरील आकडेही मिळतील. ते करायला याक्षणी वेळ नाही. चर्चेत इतर मुद्दे आले आणि त्यामुळे गरज लागली तर अहमदाबाद विमानतळावरील आकडेही तपासून सांगतो. संपूर्ण देशात त्या एका वर्षात डोमेस्टिक प्रवाशांच्या संख्येत ४% घट झाली असेल तर काही मार्गांवर घट त्यापेक्षा कमी असेल तर काही मार्गांवर घट त्यापेक्षा जास्त असेल. उदाहरणाच्या सोयीसाठी आपण असे समजू की पुढील १५ वर्षात मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांची संख्या दुप्पट होईल-- म्हणजे दर वर्षी सुमारे ४.७३% ने प्रवासी संख्या वाढेल. म्हणजे १५ वर्षांनंतर मुंबई-अहमदाबाद प्रवास करू इच्छिणारे दररोज ८००० प्रवासी असतील. तितकेच प्रवासी उलट दिशेनेही प्रवास करतील असे गृहित धरू. म्हणजे दररोज १६,००० प्रवासी मुंबई-अहमदाबाद मार्गावर विमानाने प्रवास करू इच्छितील असे गृहित धरू. ३. आज प्रवासाच्या एक दिवस आधी विमानाचे तिकिट विकत घेतले तर ते ४,००० रूपयांपासून उपलब्ध आहे. पुढील १५ वर्षे दरवर्षी सुमारे ७.५% ने तिकिटांचे दर वाढतील असे गृहित धरले तर आणखी १५ वर्षांनी ते तिप्पट म्हणजे १२,००० रूपयांपासून तिकिटे उपलब्ध होतील. आणि अर्थातच तिकिटे १०-१५ दिवस आधी विकत घेतल्यास ती आणखी स्वस्तही मिळतीलच. आज १५ दिवस आधी तिकिट विकत घेतल्यास ते २,००० रूपयांना उपलब्ध आहे. म्हणजे १ दिवस आधी तिकिट विकत घेतल्यास जितके पैसे मोजावे लागतील त्याच्या अर्धी रक्कम!! हेच गुणोत्तर १५ वर्षांनीही राहिल असे गृहित धरले तर तिकिटे ६ ते १२ हजार रूपयांमध्ये मिळतील. सरासरी तिकिटाची किंमत १० हजार रूपये समजू. म्हणजेच आणखी १५ वर्षांनंतर मुंबई-अहमदाबाद विमान प्रवासासाठी सर्व प्रवासी दररोज १६ हजार गुणिले १० हजार बरोबर १६ कोटी रूपये खर्च करतील. यातही किती गृहितके आहेत हे वर आपण बघितलेच. बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य रूपये असेल तर वार्षिक हप्त्याला लागतील तितके पैसे उभे करायला दररोज ६.३८ कोटी रूपये इतके उत्पन्न बुलेट ट्रेनला मिळायला हवे. आणि अर्थातच बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य नक्कीच नसणार. बुलेट ट्रेनला अगदी ४०% फायदा होणार (तिकिटांमधून मिळणारे उत्पन्न वजा Operating Costs) असे धरले तरी बुलेट ट्रेनचे दररोजचे उत्पन्न ६.३८ भागिले ४०% बरोबर १५.९५ कोटी रूपये हवे. याचाच अर्थ अन्यथा विमानाने प्रवास केला असता त्या सगळ्या प्रवाशांना बुलेट ट्रेनने आपल्याकडे आकर्षित करायला हवे. विमानापेक्षा जास्त तिकिट बुलेट ट्रेन ठेऊही शकणार नाही. आणि बुलेट ट्रेनला अंडरकट करायला विमानकंपन्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर तिकिट कमी ठेऊन प्रवासी बुलेट ट्रेनकडे वळणार नाहीत याची काळजी घेतीलच. या सगळ्या गणितामागे किती liberal गृहितके घेतली आहेत हे समजून येईलच. एक तर दरवर्षी ४.७३% ने पुढील १५ वर्षे प्रवासीसंख्या वाढेल हे प्रचंड धाडसी गृहितक आहे. तसेच प्रत्येक विमानात ४०००/४२०० = ९५% प्रवासी भरलेले असतात हे गृहित धरलेले आहे. प्रत्यक्षात हा आकडा सरासरी ८०% च्या आसपास असतो. आणि मुख्य म्हणजे Return on Equity ०% धरला आहे. प्रत्यक्षात तो ७-८% असेल. तेव्हा ही बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती तर होणार नाही ही शंका वाटते. अशाप्रकारच्या प्रकल्पात अनेक प्रकारचे इतर फायदे (externalities) असतात. प्रदूषण कदाचित काही प्रमाणात कमी होईल.त्या व्यतिरिक्त आणखी कुठले फायदे बुलेट ट्रेनने होतील यावर बराच विचार केला. पण ते फायदे सापडले नाहीत. मला वाटते की बुलेट ट्रेनवर खर्च करण्यापेक्षा प्राधान्याने हाती घेण्याजोगे इतर अनेक पायाभूत प्रकल्प आहेत. ५०० किलोमीटर अंतरासाठी सुमारे १ लाख कोटी म्हणजे किलोमीटरला २०० कोटी इतका प्रचंड खर्च या प्रकल्पात आहे. त्यामानाने रस्ते दर किलोमीटरमागे ६ ते ६.५ कोटी (आणि डोंगरदऱ्या असतील तर थोडे अधिक-- मुंबई ते अहमदाबाद मार्गावर तोपण प्रश्न नाही) इतका खर्च येतो. प्रवासासाठी वेळेची बचत म्हणाल तर ती पण फार होताना दिसत नाही. कदाचित विमानप्रवासाला लागणारा वेळ आणि बुलेट ट्रेनला लागणारा वेळ यात विशेष फरक असेल असे दिसतही नाही. वर्तमानपत्रातील सर्व बातम्या तरी मुंबई-अहमदाबाद प्रवासाचा वेळ २ तास होईल असेच म्हणत आहेत. विमानालाही (चेकीन टाईम वगैरे धरून) तितकाच वेळ लागतो की. बुलेट ट्रेनचा अट्टाहास का लावला जात आहे हेच अजून मला तरी समजलेले नाही. ज्या बी.के.सी मध्ये बुलेट ट्रेनचे स्टेशन होणार असे म्हटले जात आहे त्या बी.के.सी मध्येच संध्याकाळी वाहतुकीची किती कोंडी होते हे त्या भागात दररोज ऑफिसला जाणारा कोणीही सांगू शकेल. मग या समस्या आधी सोडविल्या जाणे अधिक महत्वाचे नाही का? मुंबईतील बंदरे (मुंबई आणि उरण) येथून मालगाड्यांना प्रवासी रेल्वेगाड्यांमुळे बाजूला टाकले जाते आणि त्यामुळे मुंबई ते दिल्ली या प्रवासासाठी मालगाड्यांना काही दिवस लागतात. त्यामुळे मुंबई ते दिल्ली या मार्गावर केवळ मालगाड्याच जाऊ शकतील असा Dedicated Freight Corridor करणे, Delhi-Mumbai Indistrial Corridor वगैरे कामांना प्राधान्य न देता बुलेट ट्रेनचा मुद्दा ऐरणीवर का आणला जात आहे हे समजण्यापलीकडचे आहे. माझ्या हातून काही मुद्दे निसटत आहेत का? या विषयावर साधकबाधक चर्चा व्हावी-- विशेषत: मोदीभक्त विरूध्द मोदीद्वेष्टे असे स्वरूप या चर्चेला न आले तर फारच उत्तम. मिपावरील जाणकारांचे याविषयी काय मत आहे?
वर्गीकरण
अर्थकारण

प्रतिक्रिया द्या
115078 वाचन

💬 प्रतिसाद (269)
ध
धनावडे गुरुवार, 08/04/2016 - 23:28 नवीन
सामनाचे अग्रलेख वाचताका हो ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Sat, 01/21/2017 - 17:04 नवीन
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/bullet-train-loan-state-not-keen-to-be-guarantor/articleshow/56696200.cms finance department led by BJP leader Sudhir Mungantiwar has raised objections over the state acting as guarantor for the loan of Rs 79,087 crore being secured from the Japan International Cooperation Agency (JICA) at a nominal interest rate of 0.1%. हि ट्रेन आहे गुजरात करता. आणि त्याची कर्जाची धोंड महाराष्ट्र च्या गळ्यात. एकाच दगडात मोदी सरकार बरेच पक्षी मारत आहे. उद्या गुजरात ने हात वर केले कि आपणच हे लोन भरणार. महाराष्ट्र सरकार करवाढ करणार आणि आपण ती भरणार. कोणाकरता ? इथल्या गुज्जू बेपारी लोकांना गुजरात मंडी बिजनेस करता यावा, आणि तो पण मुंबईत मज्जानु लाईफ जगत या करता !! आणि या xxx गिरीला खूप मराठी लोकांचा पाठिंबा. अगदी उच्च शिक्षित पण .. कमाल वाटते. अर्थात मराठी लोकांना आपली मारून घ्यायची आवड आहेच. ( कोणाला संशय असेल तर एक नवीन धागा उघडा याच्यावर. तिकडे बोलतो मी .. आणि इतर पण बोलतीलच. )
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 01/21/2017 - 17:09 नवीन
हा जो प्रतिसाद लिहिला आहे तो एवढाच वापरुन धागा काढा... लिहिणारे लिहितील.... गो अहेड सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Sat, 06/24/2017 - 17:15 नवीन
http://www.loksatta.com/mumbai-news/high-speed-bullet-train-project-costs-increased-1488237/ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत वाढली असून ती आता एक लाख १० हजार कोटी रुपयांवर गेली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या २५ टक्के वाटय़ातही वाढ होणार असून भविष्यातही आणखी किंमतवाढ होण्याची चिन्हे आहेत. काम सुरु होण्या पूर्वीच किंमत वाढतेय .. हा सगळं प्रकार २/३ लाख कोटी पर्यंत आरामात जाईल आणि महाराष्ट्राची पार धुवून निघेल.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 06/24/2017 - 17:58 नवीन
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत वाढली असून ती आता एक लाख १० हजार कोटी रुपयांवर गेली आहे.
अशाप्रकारच्या प्रकल्पांमध्ये 'कॉस्ट ओव्हररन' होणे ही अगदी नेहमीची गोष्ट आहे. असे व्हायची शक्यता आहे याविषयी याच चर्चेतील या प्रतिसादात लिहिले होते. अजून या प्रकल्पाला सुरवातही झालेली नाही तरीही अशाप्रकारचे 'कॉस्ट ओव्हररन' होणार असा अंदाज आहे. प्रत्यक्ष कामाला सुरवात झाल्यावर अजूनही अशाप्रकारे आकडे वाढू शकतील. बँका प्रकल्पांना पैसे कर्जाऊ देतात तेव्हा अशाप्रकारे खर्च वाढला तर वरच्या पैशाची तरतूद संबंधित प्रकल्प बांधणार्‍या कंपनीने करायची असते असे कलम नेहमी असते. अशीच अट त्या जपानी एजन्सीने टाकली तर नवल वाटू नये. म्हणजे वाढलेल्या खर्चाचा बोजा शेवटी सरकारवर म्हणजेच करदात्यांवर येणार आहे. बुलेट ट्रेन कधीतरी यावी असे मलाही वाटते पण त्यापूर्वी सगळ्या देशातील रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण, रूळांचे चौपदीकरण, रूळ १५० पेक्षा जास्त वेगाने गाड्या वाहून नेतील इतके सक्षम बनविणे इत्यादी कामे आधी व्हावीत असे वाटते. पेकिंग ऑर्डरमध्ये त्यापेक्षा अधिक महत्वाचे इतर प्रकल्प आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
ग
गामा पैलवान Sun, 06/25/2017 - 13:24 नवीन
गॅरी ट्रुमन, तुमच्याशी याबाबतीत सहमत आहे. बुट्रे हा भयंकर खर्चिक प्रकार आहे. शिवाय मुंबई ते कर्णावती (सुमारे ५०० किमी) पेक्षा दूर जायचं झाल्यास विमान अधिक सोयीस्कर पडतं. म्हणजे मुंबई-दिल्ली बुट्रे आतबट्ट्याचा व्यवहार ठरू शकतो. जर पुढे कर्णावती ते दिल्ली बुट्रे मार्ग बांधण्याच्या खर्चात मुंबई ते दिल्ली चौपदरी लोहमार्ग व्यवस्थितपणे बांधता येईल ते वेगळंच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
र
राही Sun, 06/25/2017 - 15:44 नवीन
बुलेट ट्रेनचा मार्ग हा एक कुठेही जोडला न गेलेला असा वेगळाच कॉरिडॉर असणार आहे. स्थानके अगदी कमी आणि वेगळी असणार आहेत. सध्याच्या पश्चिम रेल वे च्या स्थानकांपर्यंत प्रवाश्यांना पोचवणारे फीडर रूट्स बुलेट ट्रेनसाठी अर्थातच उपयोगी पडणार नाहीत. दुसर्‍या बाजूने, स्थानकांची संख्या कमी असल्याने रस्त्यांचे जाळे वगैरे बांधावे लागणार नाही. तरीही स्थानके एकमेकांपासून दूर अंतरावर असल्यामुळे ठाण्यापलीकडील लोकांचा स्थानके गाठण्याचा वेळ बराच वाढेल. मुंबईत ठाण्यापासून किंवा बीकेसीपासून अंतर्गत प्रवासासाठी रोड किवा रेल कनेक्टिविटी आवश्यक असेल. सध्या दोन्ही मुख्य महामार्ग ओसंडून वाहात असतात. विशेषतः पश्चिम महामार्ग. या महामार्गाची एक लेन मेट्रो प्रकल्पासाठी वापरली जात आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावरसुद्धा ती मोकळी होईल असे नाही. कुर्ला टर्मिनसला पोचताना अतिशय त्रास होतो. मुंबईत विकासकामासाठी उपलब्ध जागेचा प्रश्न अतिशयच तीव्र आहे. शिवाय या रेल मार्गावर अपेक्षित वापरकर्ते दर अर्ध्या तासाने मिळायलाच हवेत. नाही तर अर्थकारण कोलमडेल. सध्या प्रवाश्यांचा कल पाहाता कामानिमित्त प्रवास करणारे लोक दोन्ही टोकांकडून कामाच्या ठिकाणी सकाळी पोचून रात्री घरी परतणे पसंत करतात. या वेळेत ऑक्यूपन्सी जास्तीत जास्त असते. नवीन प्रकल्प होऊ नयेत असे अजिबातच नाही. फक्त खर्चाच्या प्रमाणात ते जास्तीत जास्त लोकाभिमुख असावेत इतकीच अपेक्षा. जाता जाता : फक्त मुंबईपुरते पाहाता ठाणे -पनवेल रेल मार्ग, हार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत वाढवणे, ईस्टर्न फ्री वे, सान्ता क्रुझ चेंबूर जोड रस्ता, जोगेश्वरी-विखरोळी जोड रस्ता हे प्रकल्प लोकाभिमुख होते/आहेत. ठाणे/दिवा पश्चिम उपनगरांशी थेट जोडणे हाही एक अधिकाधिक लोकोपयोगी प्रकल्प ठरू शकेल.
  • Log in or register to post comments
N
NiluMP Wed, 05/16/2018 - 17:54 नवीन
ठाणे आणि विराराला स्थानके कुठे बननार आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Tue, 09/25/2018 - 13:08 नवीन
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/japan-company-stops-funding-for-bullet-train-project-citing-farmer-issue/articleshow/65948865.cms 'शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा; तरच बुलेट ट्रेनला निधी देऊ' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला मोठा झटका बसला आहे. बुलेट ट्रेनला आर्थिक रसद पुरवणाऱ्या जपानच्या जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जिका)ने बुलेट ट्रेनसाठी निधी पुरवठा करणे थांबवले आहे. भारत सरकारने आधी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात मगच आर्थिक मदत देऊ, असं या कंपनीने मोदी सरकारला ठणकावले आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/jica-has-stopped-funding-to-bullet-train-project-1759126/ आत्तापर्यंत 125 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी जमिनी देताना विरोध करताना गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली तसेच जायकालाही कळवलं की हा प्रकल्प राबवताना सरकारनं सामाजिक तसेच पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य ती काळजी घेतलेली नाही. जोपर्यंत मार्गदर्शक तत्वांची अमलबजावणी होत नाही तोपर्यंत सरकारला या प्रकल्पासाठी निधी देऊ नये अशी विनंती शेतकऱ्यांनी जायकाकडे केली. जायकानं याची दखल घेत निधी थांबवल्यामुळे या प्रकल्पाच्या आड चांगलेच विघ्न उभे राहिल्याचे दिसत आहे. ---------------------------------------------------- १२५ कोटी ? थोडक्यात वाचलो !! हा प्रोजेक्ट काही आता सुरु होत नाही. आणि या इन्व्हेस्टमेंट बँक ना राजकीय समज पण जास्त / काळाच्या पुढची असते. बहुतेक त्यांना पण कळून चुकलंय भविष्य !! चला भारतीय जनता वाच्चली एक कर्ज डोंगरातून. आणि आपण मराठी लोक तर जास्तच. कारण महाराष्ट्राच्या गळ्यात मारला होता हा प्रकल्प. अर्थात भक्त वेडे होतील. आपली का मारली गेली नाहीए म्हणुन . त्यांना रडू द्या !!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 09/25/2018 - 14:37 नवीन
दुर्दैवात देखील आनंद कसा मानायचा हे भरतीयांकडुन शिकावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Tue, 09/25/2018 - 14:56 नवीन
नाव सार्थ ठरवलंत बर का अर्धवटराव !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Tue, 09/25/2018 - 15:33 नवीन
पण कुणी कानाखाली वाजवलं तरी गालावर लाली थोपण्याचा खर्च वाचला म्हणुन आनंद मिरवणार्‍या अभिजनांना कसला अभिमान आहे हे एक कोडे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
ट
ट्रेड मार्क Tue, 09/25/2018 - 16:21 नवीन
मजा आ गया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
श
शलभ Tue, 09/25/2018 - 16:56 नवीन
माणूस त्याच्या वागण्या बोलण्यावरून, इथे लिहिण्यावरून समजतो कसा आहे ते. त्यांचे रिप्लाय खूप mature असतात आणि तुमचे उथळ. तुमचे मेसेज बघून तुम्ही तर मिपाचे राहुल गांधी वाटता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
N
NiluMP Tue, 09/25/2018 - 15:14 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अथांग आकाश Tue, 09/25/2018 - 16:25 नवीन
भारतातील रखडलेले ५ मोठे प्रकल्प! 1) Delhi-Mumbai Industrial Corridor 2) Navi Mumbai International Airport 3) Nariyara coal-based power plant project 4) Polavaram irrigation project 5) Delhi Jaipur Expressway वरील Nariyara coal-based power plant project सोडून सर्व महत्वाकांक्षी आणि लोकाभिमुख प्रकल्प रखडण्याचे प्रमुख कारण भूसंपादन!. आता पूर्ण झालेले पण आधी खूप अडथळे आलेले कित्येक प्रकल्प भारतीयांनी बघितले आहेतच. मेधा पाटकर वगैरे रिकामटेकडी खरेतर कर्मदळीद्री लोकं असतातच असे अडथळे निर्माण करायला! आणि दुर्दैवाने भारतात अशा लोकांना साथ द्यायला ईतर रिकामटेकड्यांची आणि विघ्नसंतोषी लोकांचीही कमतरता नाही! त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला तरी आता त्यात काही विशेष वाटणार नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Wed, 09/26/2018 - 16:41 नवीन
बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला तरी ?? सुरु होणारच नाहीए तर रखडण्याचा प्रश्न येतो कुठे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अथांग आकाश
अ
अथांग आकाश Wed, 09/26/2018 - 18:37 नवीन
सुरु होणारच नाहीए तर रखडण्याचा प्रश्न येतो कुठे ?
तुम्ही ज्यांच्या भजनी लागला आहात त्या थोर नेतेमंडळी आणि सत्य कमी पण अफवा जास्ती पसरवणाऱ्या माध्यमांच्या किती आहारी जायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे! त्यामुळे तुम्हाला काय वाटतं किंवा काय पटतं तेच सत्य असल्याचे रेटून सांगण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे! पण तुमच्या दुर्दैवाने देशातील बहुसंख्य लोकांना ते पटेलच याची मात्र खात्री नाही! तुम्हाला परमोच्च आनंद मिळवून देण्यासाठी खोट्यानाट्या बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या माध्यमांची विश्वासार्हता किती शिल्लक आहे हा महत्वाचा भाग आहे! जरा हा आज तक वरचा आजचा व्हिडिओ बघून घ्या आणि मग चालू द्या तुमचं "भवानी आई रोडगा वाहीन तुला" टाईप भारुड! एक प्रमुख अंग्रेजी अखबार ने दावा किया था कि बुलेट ट्रेन प्रोजेक्ट की फंडिंग करने वाली जापानी कंपनी जीका ने फंडिग को रोक दिया है. तो सवाल उठता है कि क्या है मोदी के ड्रीम प्रोजक्ट बुलेट ट्रेन पर सचमुच लगेगा ब्रेक? सच्चाई जानने आजतक ने बात की बुलेट ट्रेन प्रोजेक्ट के प्रवक्ता से.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Fri, 09/28/2018 - 19:18 नवीन
शीळमार्ग कोंडीमुक्त होणार? https://www.loksatta.com/thane-news/action-on-the-encroachments-on-y-junction-1760281/ शीळ-कल्याण उड्डाणपूल रद्द? https://www.loksatta.com/thane-news/shill-kalyan-flyover-canceled-1761072/ Let them eat cake "Qu'ils mangent de la brioche"
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा