Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डेविड हेडलीची साक्ष,JNU, आणि ढोंगी फेक्युलर

च
चेक आणि मेट
गुरुवार, 02/11/2016 - 06:31
🗣 331 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, (पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.) तर मुद्दा असा कि, डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती. तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!! दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे?? आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे. तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो. तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का?? (सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)
वर्गीकरण
राष्ट्रीय राजकारण

प्रतिक्रिया द्या
59550 वाचन

💬 प्रतिसाद (331)
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/11/2016 - 17:49 नवीन
मोदी साहेब तर म्हणतात की पवार साहेब त्यांचे चांगले मित्र आहेत, ते अधुन मधुन त्यांचा सल्ला घेत असतात. यालाच राजकारण म्हणतात काय ?
आपण एखाद्याच्या घरी गेलो किंवा एखाद्याच्या सत्कारसमारंभाला उपस्थित असलो किंवा आपण एखाद्याबरोबर एकाच व्यासपीठावर असलो तर त्या व्यक्तीबद्दल चार शब्द बरे बोलणे हा शिष्टाचार आहे. त्यापेक्षा त्यात काहीही जास्त नसतं. त्यामुळे मोदी किंवा जेटली किंवा अलिकडे सोनिया गांधींसकट अनेकांनी पवारांवर जी स्तुतीसुमने उधळली त्यात शिष्टाचार यापलिकडे फारसे काही नाही. आता सल्ल्याचं म्हणाल तर, मोदी असा कोणाचा सल्ला घेत असतील आणि तेसुद्धा पक्षाबाहेरील एखाद्या व्यक्तीचा सल्ला घेत असतील अशी शक्यता कितपत आहे? पवारांकडे असे कोणते गुण आहेत जे मोदींकडे नाहीत व त्यासाठी ते पवारांचा सल्ला घेतात? पवारांना राष्ट्रीय राजकारणात शुल्लक महत्त्व आहे. महाराष्ट्रात त्यांना आपल्या पक्षाला कधीही सत्तेवर आणता आले नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या पलिकडे त्यांचा पक्ष वाढला नाही. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला कधीही एक चतुर्थांश जागा सुद्धा मिळालेल्या नाहीत. केंद्रात त्यांच्या पक्षाच्या खासदारांची संख्या कायम एक आकडीच राहिली. त्यामुळे अशा व्यक्तीचा मोदी कशासाठी सल्ला घेतील? मी त्यांचा सल्ला घेतो असे म्हणणे हा केवळ शिष्टाचार होता. त्यापलिकडे त्यात काहीही गम्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
न
निनाद मुक्काम … Sat, 02/20/2016 - 03:26 नवीन
लोकसत्तेची जाहिरात व त्यांचा जोक्स सध्या जालावर फिरत आहे त्यात सुळे ताई म्हणतात की माझ्या बाबांना विचारा , त्यांना सगळे माहिती आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पिलीयन रायडर गुरुवार, 02/11/2016 - 07:55 नवीन
डिस्क्लेमरः- ह्या विषयांवर जास्त माहिती अथवा वाचन नाही. भारतात जर कुणी भारतविरोधी भाषणे अथवा नारे देत असेल तर त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करता येते का?
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट गुरुवार, 02/11/2016 - 08:01 नवीन
हो,अटक करता येते, पण ढोंगी फेक्युलर आंदोलन करून अटक होऊ देत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 08:02 नवीन
ताई राजकीय इच्छाशक्ति असल्यास अन सत्ताधारी पार्टीला प्रॅक्टिकली शक्य असल्यास तर मागील उदाहरण लाहता व्यंग्यचित्रकार असलेल्या असीम त्रिवेदी वर सुद्धा देशद्रोह केल्याचे कलम लावले गेले होते! तेव्हा
"केल्याने होतची आहे रे आधी केलेची पाहिजे"
हे सत्य वाटते,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 08:07 नवीन
अटक कशाला? थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर! भारतविरोधी नारे कु ठ ल्या ही परिस्थितीत स्विकारार्ह नाही. मग ते काश्मिरी नालायक कार्टी असो वा फेसबुकचा हरामखोर अ‍ॅण्डरसन. चुकीला माफी नाही हेच धोरण असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/11/2016 - 08:21 नवीन
थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर नक्की का? नक्की ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 08:45 नवीन
मृत्युन्जय सर, तुम्ही मला कदाचित अजूनही खरोखर ओळखलं नाही म्हणून असा प्रतिसाद दिलात. भारतविरोधी घोषणा, कारवाया, विचार, प्रचार, कृती हे अजिबात सहन न करणे व तसं मत व्यक्त करणे ह्यात 'नक्की का' विचारण्यासारखे काय आहे? आपले राजकिय विचार, तात्त्विक मतभिन्नता आपल्या ठिकाणी. एक भारतीय म्हणून मी असले चाळे सहन करु शकत नाही, ह्यात प्रश्न करण्यासारखे नक्की काय आढळले तुम्हाला? तुम्हाला नक्कीच 'मोदीविरोधकफोबिया' झाला आहे असे जाणवतंय. इतकी की कोणी (तुमच्यामते मोदीविरोधक) अस्सलपणे देशप्रेम व्यक्त करतोय तिथेही तुम्ही त्यावर शंका घेताय. तुमचे असे वागणे अपमानजनक आहे असे माझे मत आहे. भारत = भारतीय सरकार = नरेंद्र मोदी हे समिकरण तुम्ही बनवून टाकलंय. तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण कुणाही भारतीयाच्या देशप्रेमाबद्दल शंका घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही हे कधी सगळे चष्मे काढून, 'शुद्ध विवेक' ठेवून विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/11/2016 - 09:52 नवीन
तुम्ही नब्नन वाचता आणी विचार न करता प्रतिसाद कसे देता याचे उत्तम उदाहरण आहे हे. प्रत्येक प्रतिसादात तुम्हाल मोदी दिसतात,, काहिही करुन मोदींना मध्ये आणुन राळ कशी उडवायची याच्यासाठीच तुमचे प्रयत्न चालु असतात की काय असे वाटायला लागले आहे. मी मोदी, भारत सरकार, तुमचा मोदी विरोध याबद्दल काहिही बोललेलो नसताना तुम्ही या सगळ्या गोष्टी मध्ये आणला याचा अर्थ तुम्हाला तरी किमान "मोदी फोबिया" झाला आहे हे नक्की. तुम्ही मला कदाचित अजूनही खरोखर ओळखलं नाही म्हणून असा प्रतिसाद दिलात. तुम्हाला ओळखायला मी तुम्हाला ना कधी भेटलो ना मिपा व्यतिरिक्त कधी चर्चा केली. पण तुम्हाला ओळखण्याचा आणि या धाग्याचा कहिही संबंध नसताना तुम्ही असे प्रतिसाद देत आहात हे बघुन थोडा थोडा ओळखायला लागलो आहे. भारतविरोधी घोषणा, कारवाया, विचार, प्रचार, कृती हे अजिबात सहन न करणे व तसं मत व्यक्त करणे ह्यात 'नक्की का' विचारण्यासारखे काय आहे? तुम्ही अर्धवट वाचता आणि उत्तर देता याचा हा अजुन एक जिवंत पुरावा मिळाला. तुमच्या प्रतिसादातच्या "थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर" या वाक्याला बोल्ड करुन मी तो प्रशन विचारला होता. "भारतविरोधी नारे कु ठ ल्या ही परिस्थितीत स्विकारार्ह नाही.". या वाक्यावर मी कुठलाही प्रश्न विचारला नव्हता. तुम्ही उतावीळपणे प्रतिसाद करताना बरोब्बर ज्या वाक्यावर प्रश्न विचारला नाही त्याच वाक्याचा संदर्भ घेता आहात आणि ज्या वाक्यावर प्रश्न विचारला त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहात. सिलेक्टिव्ह रिडींग आणि दुटप्पीपणाचे उत्तम उदाहरण आहे हे. किती तो आक्रस्ताळेपणा. आपले राजकिय विचार, तात्त्विक मतभिन्नता आपल्या ठिकाणी. एक भारतीय म्हणून मी असले चाळे सहन करु शकत नाही, ह्यात प्रश्न करण्यासारखे नक्की काय आढळले तुम्हाला? तुम्ही चाळे सहन करण्याबद्दल मी काहिच लिहिलेले नाही प्रशन कशावर केला आहे ते बघा तर जरा. आणि एकीकडे तुम्ही "राजकिय विचार, तात्त्विक मतभिन्नता आपल्या ठिकाणी" वगैरे भारी भारी वाक्ये लिहिता आणी गरज नसताना मोदी वगैरेना मध्ये आणता यातच् तुमचा वैचारिक गोंधळ दिसुन येतो. तुम्हाला नक्कीच 'मोदीविरोधकफोबिया' झाला आहे असे जाणवतंय. इतकी की कोणी (तुमच्यामते मोदीविरोधक) अस्सलपणे देशप्रेम व्यक्त करतोय तिथेही तुम्ही त्यावर शंका घेताय. मला कुठला फोबिया आहे की नाही ते माहिती नाही पण तुम्हाला नक्कीच मोदीफोबिया झाला आहे. इतका की एखादा माणूस कवठे महांकाळ मधल्या सांडपाण्याची समस्या आणि उंदराचा सुळ सुळाट या विषयावर बोलु लागला तरी तुमचा मोदी विरोध जागृत होतो. मी मोदी, मोदी विरोध याबाबत काहितरी बो ललो होतो का? मोदी विरोधक म्हणजे देशद्रोही असे कही बोललो का? मोदी विरोधी तर सोन्याबापू पण आहेत. परवाच धाग्यता जाहीरपणे मी त्यांच आद्दर करतो म्हणुन लिहुन आलो. इथे मोदी वि रोधाचा आणि देशप्रेमाचा संबंध काय? तुम्ही च उगाच पराचा कावळा करत आहात. इथे तर परा पण नही. तुमचे असे वागणे अपमानजनक आहे असे माझे मत आहे. माझे कसे वागणे आणी कोन्णला अपमानजनक आहे तेच कळाले नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अपमान वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न आह. त्याला मी करु शकतो? भारत = भारतीय सरकार = नरेंद्र मोदी हे समिकरण तुम्ही बनवून टाकलंय. असे मत तुम्ही का बनवले देव जाणे. मी असे विधान कधीही केलेले नाही. कावीळ झालेल्या माणसाला सगळे जग पिवळे दिसते तसे तुमचे झालेले आहे. तुम्हाला सगळीकडे मोदी द्वेष दिसतो. उद्य एखाद माणूस मोदीं जॅकेट चांगले अहे असे म्हणाले तर तो मा णूस तुमच्या मते मोदी भक्त होइल आणि टीकेस पात्र होइल. जरा विवेकी सरासर विचार करुन मत प्रदर्शन करा की. धागा का य तुम्ही बोलता का? धगाक्कर्त्याने म्हटल्याप्रमाणे विषयावर बोलायचे सोडुन तुम्ही मोदींना मध्ये आणले आणि चर्चा भरकटवली. मूळ मुद्दा राहिला बाजूलच. अश्याने धागाकर्त्याचे तुमच्याबद्दलचे मत (की उलट्या वि षयांवर धागा असला असता तर तुम्ही कंठशोष करुन गिगाबायटी विरोधी प्रतिसाद दिले असते) अजुन पक्केच होइल. तुम्हाला कळकळीची विनंती की तुम्ही धाग्याला अनुषंगुन चर्चा करा, आपले चुकीचे म्हणणे रेटु नका , एकतर्फी वाद घालु नका, नसलेले वाद उकरुन काढु नका, नीट वाचुन प्रतिसाद द्या, दुसर्‍यावर विनकारण अरोप लावु नका. पण कुणाही भारतीयाच्या देशप्रेमाबद्दल शंका घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मी तुमच्या देशप्रेमाबद्दल कुठलीही शंका घेतलेली नसताना तुम्ही असली विधाने करणे दुर्दैवी आहे. तुम्ही तुमची वाक्ये माझ्या तोंडात कोंबत आहे हे नक्कीच खेदजनक आहे. एक मिपाकर म्हणुन आज मला शरम वाटली. अर्रे कुठे नेउन ठेवलाय मिपा माझा. हे कधी सगळे चष्मे काढून, 'शुद्ध विवेक' ठेवून विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल. चष्मे काढण्याची गरज तुम्हाल असताना, सिलेक्टिव्ह रिडींग तुम्ही करत असताना, चुकीचे अर्थ तुम्ही काढत असतामी, मी जे लिहिलेच नाही ते लिहिले आहे असे तुम्ही भासवत असताना, अर्थाचा अनर्थ तुम्ही काढत असताना, अर्थ न समजता तुम्ही लिहित असताना, पराचा कावळ तुम्ही करत असतना, आक्रस्ताळेपणा तुम्ही करत असतान, एकतर्फी आरो प तुम्ही करत असताना तुम्ही मला चष्मे बदलायल सांगणे आणि विवेकाने विचार करयाला सांगणे म्हणजे हिटलरने गांधीजींना अहिंसेचा उपदेश देण्यासारखे आहे. धन्यवाद. अर्रे आणी हो तुम्हाला न समजलेल्या किंव तुम्ही समजुन न समजल्यासारखे केलेल्या वक्याबद्दल : तुम्ही म्हणत होता "थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर " . मागे तुम्हीच म्हणाला होता ना की हातपाय कापणे वगैरे अघोरी मध्ययुगीन प्रथा आहेत म्हणुन? मग रणगाडे फिरवणे काय आहे? लोकशाहीभिमुख भारतीय न्यायव्यस्थेला, भारतीय नागरि,, मग ते कितीही चुकीचे वागले तरी युद्धस्थिती नसताना त्यांच्यावर रणगाडे फिरवणे मान्य नाही. तुम्ही आधी तुम्हीच घेतलेल्या भूमिकेला छेद देणारे वक्तव्य केले म्हणुन मी गंमतीने तुम्हाला एक प्रशन विचारला तर तुम्ही इतका कांगावा केलात ? कदाचित तुमची स्वतःचीचे वक्तव्ये तुम्हाला आठवत नसावीत किंवा तुमच्या दोने वक्तव्यातली विसंगती तुम्हाला नेहमीप्रमाणे दिसतच नसावी किंवा तुमची मते बदलली असावीत. काहिह्ही असु शकेल पण मग त्याला संयतपणे प्रतिसाद द्या ना? नसत्या गोष्टी कशाला मध्ये घुसडता आणि उगाच आक्रस्ताळेपणा कशाला करता ? त्रिवार धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 11:03 नवीन
तुम्ही नब्नन वाचता आणी विचार न करता प्रतिसाद कसे देता याचे उत्तम उदाहरण आहे हे. हा हा. दोन शब्दात खोचकपणे मारलेल्या टोमण्यात नक्की काय वाचायचं आणि किती विचार करायचा ह्याची तुमच्याकडे शिकवणी लावावी म्हणतो. :-) प्रत्येक प्रतिसादात तुम्हाल मोदी दिसतात,, काहिही करुन मोदींना मध्ये आणुन राळ कशी उडवायची याच्यासाठीच तुमचे प्रयत्न चालु असतात की काय असे वाटायला लागले आहे. मी मोदी, भारत सरकार, तुमचा मोदी विरोध याबद्दल काहिही बोललेलो नसताना तुम्ही या सगळ्या गोष्टी मध्ये आणला याचा अर्थ तुम्हाला तरी किमान "मोदी फोबिया" झाला आहे हे नक्की. सदर विषयावर आपल्या नेहमीच झालेल्या चर्चेवरुन प्रस्तुत वर्णन तर मला तुमचेच आहे की काय असे वाटते. कारण जिथे नको तिथेही मोदी तुम्हीच उकरुन काढले होते असे स्मरते. बाकी, राळ उडवायचीच असेल तर त्यासाठी मला मोदींची तरी गरज नाही. बाकीच्या प्रतिसादाबद्द्लः नेहमीच्या पद्धतीने कोलांट्यामारू प्रतिसाद. एवढा मेगाबायटी लिहिण्यापेक्षा आधीच तुम्हाला अपेक्षित दोन ओळी लिहिल्या असत्या तर तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे हे लक्षात आले असते. तुम्ही माझी कोणकोणती विधाने लक्षात ठेवताय आणि कुत्सितपणे टोमणे मारतांना तुमच्या डोक्यात काय चाललंय हे मला समजायला तुमचा मेंदु काय बीएसई सेन्सेक्स आहे असे तुम्हाला वाटलं का मृत्यूंजय सर? यानंतर आपल्याला काय अपेक्षित आहे तेवढंच नीट प्रतिसादात लिहायचे कष्ट घ्याल तर बरे होइल असे वाटते. अन्यथा गरज नाही हो असल्या टुकार टोमण्यांची. तुमच्याकडेच ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/11/2016 - 11:34 नवीन
हा हा. दोन शब्दात खोचकपणे मारलेल्या टोमण्यात नक्की काय वाचायचं आणि किती विचार करायचा ह्याची तुमच्याकडे शिकवणी लावावी म्हणतो. :-) लावाच. पण त्याहुन जास्त शब्दांचे अर्थ समजुन घेण्याची शिकवणी लावायची तुम्हाला गरज आहे. सदर विषयावर आपल्या नेहमीच झालेल्या चर्चेवरुन प्रस्तुत वर्णन तर मला तुमचेच आहे की काय असे वाटते. मी सदर विषयावर चर्चा करतो तेव्हा सदर विषयावरच चर्चा करतो. नॉर्मंडीच्या लढाईचा विषय चालु असताना गुजरातच्या दंगलीमधल्या मोदींच्या भूमिकेवर चर्चा करण्याचा नतद्रष्टपणा मला जमत नाही. या धाग्यावर तुम्हीच मोदी उकरुन काढलेत. मी तर त्या प्रश्नात मोदींचा म देखील लिहिला नव्हता. "न" चा "मो" करण्याच्या तुमच्या वृत्तीला आणि तद्नंतरच्या कांगावखोरपणाला आम्ही काय बोलणार? आणी वर तुम्ही मलाच मोदी उकरुन काढले म्हणताय होय? कारण जिथे नको तिथेही मोदी तुम्हीच उकरुन काढले होते असे स्मरते. तुम्ही माझ्या कुठल्या प्रतिसादांना अनुसरुन असली भडकाऊ विधाने करत आहात आणि तुम्ही माझी कोणकोणती विधाने लक्षात ठेवताय आणि असे विचित्र बडबडताय आणि तुमच्या डोक्यात काय चाललंय हे मला समजायला तुमचा मेंदु काय बीएसई सेन्सेक्स आहे असे तुम्हाला वाटलं का ? हा प्रश्न आता तुम्हाला विचारु का डांगे काका? तुम्ही काहिही स्मरुन प्रतिसाद द्याल हो. तो माझ्या विचारसरणीला अनुसरुन असेल तर गोष्ट वेगळी. पण इथे तर तुम्ही कश्यात काय आण्बि फाटक्यात पाय अशी अवस्था करुन घेतली. मुळात मी जिथे तिथे मोदी आणत नाही. असे असताना तुम्ही असले इनोदी प्रतिसाद देताय. हसुही येत नाही. जरा सारासार विचार करुन लिहा की. बरे या प्रतिसादाचा आणि मोदींचा लांबलांब संबंध नाही. तुम्हाला झेपले नसेल तर विचारावे. तुम्हाला डायरेक्ट मोदी आठवले म्हणजे एक तर तुम्हाला मोदींच्या नावची कावीळ झाली असावी किंवा विनाकारण वाद उकरुन काढण्याची तुम्हाला हौस असावी किंवा मुळातच तुम्ही कुठल्याही गोष्टीचा उलटा अर्थ लावत असावात. यापैकी काय ते मला माहिती नाही पण उगा काड्यासारु प्रतिसाद द्यायचे म्हणजे हद्द झाली. ४ शब्दांच्या निरागस प्रतिसादा वर तुम्ही किती आक्रस्ताळेपणा केलात तो. किती तो कांगावा. मूळ मुद्दा पडला बाजूल्लाच आणि मोदी मध्ये आणलेत. हद्द झाली राव. तुम्ही माझी कोणकोणती विधाने लक्षात ठेवताय आणि कुत्सितपणे टोमणे मारतांना तुमच्या डोक्यात काय चाललंय हे मला समजायला तुमचा मेंदु काय बीएसई सेन्सेक्स आहे असे तुम्हाला वाटलं का मृत्यूंजय सर? मी विधाने नाही तर विचार लक्षात ठेवतो. उपयोगी पडतात. विधाने अनुषंगाने येतातच मग. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या प्रतिसादात तुम्हाला टोमणा कुठे दिसला ? बर दिसला तर दिसला, असतो एकेकाचा स्वभाव म्हणुन सोडुनही दिले असते पण माझ्या मागच्याच प्रतिसादात तुम्हाला कळाले नाही किंवा जाणुन घ्यायची इच्छा नाही म्हणुन तुम्हाला मी योग्य मुद्द्यावर आणायचा प्रयत्नही केला पण तुम्ही आंगणच वाकडे म्हणुन धरुन बसला आहात त्याला मी काय करावे? तुम्हाला सगळीकडे टोमणे का दिसतात? बाकी, राळ उडवायचीच असेल तर त्यासाठी मला मोदींची तरी गरज नाही. ते कळाले आहेच आत्तापाबेतो. तुम्ही कुठल्याही गोष्टीवरुन राळ उडवु शकता. पण त्यामुळे नक्की काय साध्य होते हो? कंटाळा येत नाही का रोज रोज असले काही करुन? बाकीच्या प्रतिसादाबद्द्लः नेहमीच्या पद्धतीने कोलांट्यामारू प्रतिसाद. कसल्या कोलांट्या मारल्या ब्वॉ? तुम्हाल कळत नाही त्याचे खापर माझ्यावर का फोडता ? तुम्ही सिलेक्टिव्ह रिडींग तुम्ही करत असताना, चुकीचे अर्थ तुम्ही काढत असतामी, मी जे लिहिलेच नाही ते लिहिले आहे असे तुम्ही भासवत असताना, अर्थाचा अनर्थ तुम्ही काढत असताना, अर्थ न समजता तुम्ही लिहित असताना, पराचा कावळ तुम्ही करत असतना, आक्रस्ताळेपणा तुम्ही करत असतान, एकतर्फी आरो प तुम्ही करत असताना तुम्ही मला कोलांट्या उड्या मारतो असे म्हणणे म्हणजे रिकी पाँटिंगने राहुल द्रविडला वाचाळ म्हणण्यासारखे आहे. एवढा मेगाबायटी लिहिण्यापेक्षा आधीच तुम्हाला अपेक्षित दोन ओळी लिहिल्या असत्या तर तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे हे लक्षात आले असते. मी चार शब्दच लिहिले होते. मेगाबायटी प्रतिसाद तुम्ही दिला. आणि वर मलाच विचारताय होय? चोर त चोर वर शिरजोर. यानंतर आपल्याला काय अपेक्षित आहे तेवढंच नीट प्रतिसादात लिहायचे कष्ट घ्याल तर बरे होइल असे वाटते. मी तेच करतो. यापुढे प्रतिसाद देताना सिलेक्टिव्ह रिडींग न करता , चुकीचे अर्थ न काढता, वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न न करता, दुसर्‍याचे म्हणणे नीट वाचुन, अर्थाचा अनर्थ न करता, अर्थ न समजता प्रतिसाद न देता, राईचा पर्वत न करता, आक्रस्ताळेपणा बाजुला ठेउन, कांगावखोर पणा न करता, प्रत्येक ठिकाणी मोदींना मध्ये न आणता, समंजसपणे प्रतिसाद दिलात तर खुप उपकार होतील (स्वतःवरच) अन्यथा गरज नाही हो असल्या टुकार टोमण्यांची. तुमच्याकडेच ठेवा. मला तर तुमच्या इथल्या अस्तित्वाचीच गरज नाही हो . मी तुमच्या आरत्या ओवाळाल्या तरी तुम्हाला तो टोमणेच वाटतील (अर्थात तुमच्या आरत्या ओवाळण्याचा नत द्र ष्टपणा मी करणार नाही ही गोष्ट वेगळी) असे वाटते. तुम्हाला काय टोमणे मा रायचे आणि? काहिही हा डांगेश्री.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 11:49 नवीन
तुम्ही लिहिलेल्या प्रतिसादात किती व्यक्तिगत झाला आहात ते तुम्हीच नीट एकदा वाचुन आणि जमत असेल तर समजून घ्या. (तुम्हाला आठवत नसेल, ट्रुमन यांच्या जोकवर मी केलेला विनोद मोदींसंबंधी नव्हता तरी त्या एका साध्या वाक्यावरुन तुम्ही मोदी आणून राळ उडवली होती, तिथे तुम्हाला "प्रतिसाद देताना सिलेक्टिव्ह रिडींग न करता , चुकीचे अर्थ न काढता, वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न न करता, दुसर्‍याचे म्हणणे नीट वाचुन, अर्थाचा अनर्थ न करता, अर्थ न समजता प्रतिसाद न देता, राईचा पर्वत न करता, आक्रस्ताळेपणा बाजुला ठेउन, कांगावखोर पणा न करता, प्रत्येक ठिकाणी मोदींना मध्ये न आणता, समंजसपणे प्रतिसाद " हे आठवले नव्हते.) बाकी शुभेच्छा. अशा फालतू चर्चांमधे मला काडीमात्र स्वारस्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/11/2016 - 13:19 नवीन
व्यक्तिगत प्रतिसादाला तुम्हीच पहिल्यांदा सुरुवात केली डांगे अण्णा. मी नाही. तुम्ही कुठली गोष्ट कुठे नेली. कुठल्याही माणसाला संताप येण्या सारखीच गोष्ट आहे ती. पण तरीही संयम राखुन प्रतिसाद दिले आहेत. तिथेही (ट्रुमन चा धागा)आणि इथे तर नक्कीच तुम्ही सगळ्या गोष्टींचे नक्कीच चुकीच्चे अर्थ काढले आहेत आणि वर कांगावखोरपणे प्रतिसाद दिलेत. तरीही तिथे मी वाद संपवला होता. तेव्हाही मीच वाद संपवला होता हे कदाचित तुम्हाला आठन्सेसेल. ४ शब्दांमागे तुम्हाला पुर्ण ब्रह्मांडांचे अर्थ दिसायला लागले तर तो माझा दोष नाही. आणि तरीही वादही तुम्हीच वाढवत आहात तो दोष देखील माझा नाही. बाकी शुभेच्छा. अशा फालतू चर्चांमधे मला काडीमात्र स्वारस्य नाही. मला तर कधीच नव्हता, तुम्ही फालतू आरोप करुन काड्या सारल्या नसत्या तर उगा कळफलक बडवायला लागलाच नसता. असल्या चर्चा करायला मला स्वारस्यही नाही आणि वेळ तर नाहिच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 02/12/2016 - 02:26 नवीन
Image removed. एवढी गिगाबायटी प्रतिसादस्पर्धा वाचायचे ७० रुपये पडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बॅटमॅन Fri, 02/12/2016 - 08:19 नवीन
असेच म्हणतो. संदीप डांगे सरांच्या लिखाणाला अप्पर ऐवजी लोवर लिमिट असावी बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/11/2016 - 08:18 नवीन
अजुन २ महिन्यांनी हेडली जेव्हा "मी दबावाखाली असे (खोटे) विधान केले होते आणि असे (खोटे) विधान करण्यासाठी माझ्यावर भारतीय सरकारकडुन दबाव आला होता (डायरेक्टली अँड / ऑर इनडायरेक्टली)" असे म्हणेल तेव्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया कश्या असतील?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 02/11/2016 - 08:38 नवीन
तू रॉ मधे असावास असा संशय येतोय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/11/2016 - 08:43 नवीन
तुम्हाला आयएसआय म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 08:47 नवीन
काही दिवसांनी पाक , आयएसआय सुद्धा रॉ एजेंट असल्याचे बोंबलत फिरेल ह्याची गारंटी आहेच! तस्मात् ही शक्यता विचारात घ्यायला हरकत नसावी असे सुचवतो :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
न
नाखु गुरुवार, 02/11/2016 - 09:41 नवीन
कोण रॉ आणि कोण पोचलेला तेच कळेना !!!!!!! गप गुमान वाचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
व
विवेकपटाईत Sat, 02/13/2016 - 17:25 नवीन
रिलेटीव अंड वाईफ असोसिएशन असे म्हणतात ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 02/11/2016 - 14:58 नवीन
ते सदगृहस्थ सध्या RA&W च्या हॉटेलात असल्यासारखेच बोललात आपण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
उ
उगा काहितरीच गुरुवार, 02/11/2016 - 10:33 नवीन
लेखापेक्षा प्रतिक्रिया जड !
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 02/11/2016 - 10:56 नवीन
Because they want to - या विधानावर विश्वास होताच. आता तो दृढ व्हायला लागलेला आहे. मृत्युंजयभौ आणि डांगेअण्णा - मला ज्यांच्याबद्दल आदर वाटतो असे तुम्ही दोघे आहात. कृपया असे भांडू नका, कारण त्याने फक्त कटुता वाढते. या संस्थळावर मोदींच्या बाजूने किंवा विरोधी मत दिल्याने मोदींना किंवा त्यांच्या राजकीय विरोधकांना काही फरक पडत असेल असं वाटत नाही. तस्मात व्यक्तिगत वाद प्लीज घालू नका.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 02/11/2016 - 11:02 नवीन
अहो त्ये वैचारीक देवाणघेवाण करत आहेत , करू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
भ
भंकस बाबा गुरुवार, 02/11/2016 - 13:40 नवीन
वैचारिक देवानघेवान होती काय, मला वाटले???? काय पण, रंणगाडे चालवायला पाहिजे! ते इसिस मधले कुत्रे पकडले आहेत ते बिरयानी खात आहेत मजेत ते काय देशसेवा करायला गेले होते. किती शिक्षा होईल त्यांना? आपले अतिरेक्याविरुद्ध हेच धोरण राहिले तर सन्देश के जाईल माहीत आहे. पकड़े गए तो मुफ़्त का खाना, दसपंधरा साल तो सुकून, ओर मारे गए तो जन्नत में ७२ हूर है ही। रच्याकने ते बाई आंतकवादी मरतँ ते तिला काय मिलतं वो? कोणी जाणकार खुलासा करेल काय? एक हाय आपल्याकडे, पण फारच इनोदि बाबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 11:07 नवीन
ओके बोकाभाऊ, आपली बिनशर्त माघार. पण सरकारी धोरणांवर एक नागरिक म्हणून टिका करणारच. ती टिका मोदींबद्दल होते आहे असे वाटून घेणार्‍यांबद्दल नाइलाज आहे. गॉड ब्लेस देम टिल इटर्निटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
मोदक गुरुवार, 02/11/2016 - 11:12 नवीन
अहो पण त्यांनी कुठे मोदींना मध्ये आणले आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 11:22 नवीन
डिस्क्लेमर समजा मोदकभौ, ब्लँकेट स्टेटमेंट. मी जेव्हा सरकारवर टीका करतो तेव्हा ती मोदींबद्दल आहे असं समजणार्‍यांबद्दल आहे ते. कुणाही आयडी-विशेषला उद्देशून नाही. लपून छपून टोमणे मारणे माझ्या स्वभावात नाही. जे आहे ते थेट बोलतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 02/11/2016 - 11:35 नवीन
एक मिनीट. मी जेव्हा सरकारवर टीका करतो तेव्हा ती मोदींबद्दल आहे असं समजणार्‍यांबद्दल आहे ते. मुळात तुम्ही सरकारवर टीका कुठे केली आहे? तुम्ही देशद्रोही लोकांवर टीका केली आहे. तेच ते रणगाडे वगैरे.. लपून छपून टोमणे मारणे माझ्या स्वभावात नाही. जे आहे ते थेट बोलतो. बोला हो.. बिन्धास्त बोला. आपलेच मिपा आहे. फक्त विषयाला धरून आणि सुसंगत बोला इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 11:53 नवीन
मी इथल्या वादाबद्दल नै हो बोलत. ते माझं जनरल स्टेटमेंट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 02/12/2016 - 02:36 नवीन
मृत्युंजयांचे प्रतिसाद वाचले पण त्यांनी मोदींचं नावचं घेतलेलं नाही डांगे अण्णा. काहितरी गैरसमज होतोय तुमचा. मागे एका धाग्यावर तुम्हीचं हातपाय कापणे वगैरे अघोरी मध्ययुगीन प्रथा आहेत म्हणुन काहीतर साडेबारा एम.बी. (बी कॅपीटल) दिलेलात ना त्यामुळे हा वैचारिक बदल कशामुळे झाला असावा अश्या अचंब्यात ते, मी आणि इतर बहुसंख्य मिपाकर पडलेत. म्हणजे ह्या एका वाक्याने आजपर्यंतचे ह्या विषयावरचे सगळे प्रतिसाद वाया गेले की तुमचे. असो. रणगाडे फिरवले पाहिजेत ह्या तुमच्या एका वाक्याशी सहमत. थाळीची चाळणी करणार्‍यांना क्षमा केली नाही पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुबोध खरे गुरुवार, 02/11/2016 - 11:21 नवीन
डांगे भाऊ मृत्युंजय यांच्या थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर नक्की का? नक्की ना? या प्रतिसादात "मोदीविरोधकफोबिया" कुठे आला ते समजले नाही. आणि त्यावर तुम्ही एकदम तुम्हाला नक्कीच 'मोदीविरोधकफोबिया' झाला आहे असे जाणवतंय. इतकी की कोणी (तुमच्यामते मोदीविरोधक) अस्सलपणे देशप्रेम व्यक्त करतोय तिथेही तुम्ही त्यावर शंका घेताय. तुमचे असे वागणे अपमानजनक आहे असे माझे मत आहे. भारत = भारतीय सरकार = नरेंद्र मोदी हे समिकरण तुम्ही बनवून टाकलंय. तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण कुणाही भारतीयाच्या देशप्रेमाबद्दल शंका घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही हे कधी सगळे चष्मे काढून, 'शुद्ध विवेक' ठेवून विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल. असा प्रतिसाद देण्याचे कारण समजले नाही. त्यावर त्यानी तुम्ही म्हणत होता "थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर " . मागे तुम्हीच म्हणाला होता ना की हातपाय कापणे वगैरे अघोरी मध्ययुगीन प्रथा आहेत म्हणुन? मग रणगाडे फिरवणे काय आहे? लोकशाहीभिमुख भारतीय न्यायव्यस्थेला, भारतीय नागरि,, मग ते कितीही चुकीचे वागले तरी युद्धस्थिती नसताना त्यांच्यावर रणगाडे फिरवणे मान्य नाही. तुम्ही आधी तुम्हीच घेतलेल्या भूमिकेला छेद देणारे वक्तव्य केले म्हणुन मी गंमतीने तुम्हाला एक प्रशन विचारला तर तुम्ही इतका कांगावा केलात ? असे स्पष्टीकरण दिलेले असताना त्याच्या खालील टोकदार भाषा असलेला प्रतिसाद कसा काय दिलात हे पाहून आश्चर्य वाटते असो
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 11:24 नवीन
डॉक्टरसाहेब, मलाही असेच आश्चर्यदग्ध करणारे काही प्रश्न पडतात, पण असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कपिलमुनी गुरुवार, 02/11/2016 - 11:35 नवीन
सेक्युलर =not connected with religious or spiritual matters. कोणत्याही जातीधर्माशी संबंध नसलेला / ना पाळणारा / त्यावर आधारीत भेदभाव ना करणारा असा अर्थ होतो . हिंदुत्ववाद म्हणजेच राष्ट्रवाद ! आता लेखाकडे वळू या लेखकाने सेक्युलर म्हणजे देशद्रोही असे ठरवून लेख लिहिलेला दिसत आहे. सेक्युलर हा कडवा देशाभिमानी असू शकतो हेच आजकाल मान्य दिसत नाही.
"मी सेक्युलर आहे .सर्वधर्मसमभाव पाळतो . प्रत्येक धर्माचा आदर करतो आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे त्याविरूद्ध एकही शब्द एकही कारवाईला मी समर्थन देणार नाही"
अशी भुमिका असू शकते . पण आजकाल प्रत्येक गोष्टीचा ध्रुवीकरण झाले आहे . वास्तविक पाहता या लेखात मोदींचा नाव यायचे काहीच कारण नव्हते. JNU आणी इशरत जहान च्या विरोधात बोललात तर काहीजण तुम्हाला देश प्रेमी म्हणतील ! मोदीभक्त का बरे म्हणतील? लेखकाच्या लिहिण्याचा सूर मोदीवादी, भाजपेयी किंवा हिंदुत्ववादी फक्त देशभक्त किंवा जो जो देशाच्या बाजूने बोलतो तो मोदीभक्त असा आहे.
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 02/11/2016 - 11:37 नवीन
असहमत. लेखकाच्या लिहिण्याचा सूर मोदीवादी, भाजपेयी किंवा हिंदुत्ववादी फक्त देशभक्त किंवा जो जो देशाच्या बाजूने बोलतो तो मोदीभक्त असा आहे. हे कशावरून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी गुरुवार, 02/11/2016 - 12:01 नवीन
त्यांनी दोन मुद्दे उपस्थित केले आहेत १. दहशत्वाद आणि दुसरा जेऐनयू मधे पाकीस्तान च्या बाजून घोषणा ! कोणत्याही देशप्रेमी माणसाचा या दोन्ही गोष्टींना विरोध असेलच पण लेखकाचे म्हणणे असे आहे की या गोष्टी पटलावर मांडल्यावर त्याला मोदीभक्त म्हणतील ? का बॉ ? या गोष्टीला फक्त मोदीभक्तच विरोध करतात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 02/11/2016 - 12:18 नवीन
मोदीवादी, भाजपेयी किंवा हिंदुत्ववादी फक्त देशभक्त तुमच्या मते या चार उपमा एकाच अर्थाच्या आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी गुरुवार, 02/11/2016 - 12:21 नवीन
हे सुद्धा देशभक्त असू शकतात पण फक्त हेच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 02/11/2016 - 12:42 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी गुरुवार, 02/11/2016 - 12:55 नवीन
इतक्या लौकर सहमत असशील तर आमी नाय खेळणार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 02/11/2016 - 13:01 नवीन
थांब रे.. म्येन म्याच संपूदे. (बादवे - माझा प्रतिसाद शेवटचा..!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 13:03 नवीन
जल्ला तुमाला वशाडी येऊ! (मोदक भाऊ क्लासिक ३५० क्या बोलती??)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 02/11/2016 - 13:18 नवीन
क्लासीक ३५० मस्त..! ११ हजार किमी झाले. आता या महिन्यात एक कोकणदौरा करायचा आहे. येताय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कपिलमुनी गुरुवार, 02/11/2016 - 11:40 नवीन
अर्धवट प्रसिद्ध झाला वाटत ! फक्त हिंदुत्ववाद म्हणजेच राष्त्रवाद असे लोका समजतात ते चुकीचा आहे. असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
च
चेक आणि मेट गुरुवार, 02/11/2016 - 13:59 नवीन
लेखकाने सेक्युलर म्हणजे देशद्रोही असे ठरवून लेख लिहिलेला दिसत आहे. शेवटचं वाक्य वाचा लेखामधील. ढों आणि गी म्हणजे ढोंगी असं मी म्हटलं आहे. लेखकाच्या लिहिण्याचा सूर मोदीवादी, भाजपेयी किंवा हिंदुत्ववादी फक्त देशभक्त किंवा जो जो देशाच्या बाजूने बोलतो तो मोदीभक्त असा आहे. हळहळू श्वास घ्या,हं आता सोडा,शांतपणे डोळे झाका,श्वासोच्छवासाची क्रिया चालू ठेवा,आता डोळे उघडा आणि थोडासाच लेख आहे तो परत वाचा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 11:56 नवीन
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का?? ह्या वाक्याचा नेमका अर्थ शोधतोय. "प्रतिसाद देताना सिलेक्टिव्ह रिडींग न करता , चुकीचे अर्थ न काढता, वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न न करता, दुसर्‍याचे म्हणणे नीट वाचुन, अर्थाचा अनर्थ न करता, अर्थ न समजता प्रतिसाद न देता, राईचा पर्वत न करता, आक्रस्ताळेपणा बाजुला ठेउन, कांगावखोर पणा न करता, प्रत्येक ठिकाणी मोदींना मध्ये न आणता, समंजसपणे प्रतिसाद देणारे" कुणी इथे असतील तर जरा मदत करा बॉ.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 12:29 नवीन
:D :D @मृत्युंजय भाऊ, माफ़ करा पण तुम्ही क्लियर कट डांगे साहेबांचा स्टीरियोटाइप केला आहात! ही अपेक्षा तुमच्याकडून तरी ख़ास नव्हती, अन हो तुम्हा दोघांनाही (आमचे डांगे ब्वा पण अन तुम्ही पण) मी अतिशय उत्तम मित्र मानतो माझे, त्याच हक्काने हा प्रतिसाद टंकतो आहे, कारण मैत्री फ़क्त गोड बोलणारी नसते प्रसंगी मित्रांनी मित्रांच्या नेमक्या जागी लाथ घालुन सावरायचे असते! (अधिक उणे असल्यास मलाही घाला लाथ) म्हणून अजुन एक गोष्ट सांगतो, तुम्ही जो प्रतिसाद लिहिला आहे त्यातली भाषा तुमच्या हातून शोभतं नाही अतिवैयक्तिक आहे ते , तुमचे मुद्दे रास्त आहेत का नाही हे पहायच्या आधी कोणालाही फर्स्ट रीडिंग मधे ते जाणवेल भाऊ! असो! बहुदा माझे मिपावरील दिवस भरत आले असतील असे वाटू लागले आहे हल्ली. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
च
चांदणे संदीप गुरुवार, 02/11/2016 - 13:04 नवीन
जुन्या जाणत्या आणि मिपावर प्रसिद्ध अशा आयडीकडून अशा अपेक्षा नव्हत्या!! असो.... पाॅपकाॅर्न बद्दल वर गमतीने बोललो होतो...ते दुर्दैवाने तसेच घडले! :) आणि पदार्पणात हे असले धागे काढत राहून टीआरपी मिळवणार्यांबद्दल मला अतोनात राग आहे! हे विधान कोणत्याही परिस्थितीत बदलले जाणार नाही! अरे, इन मीन तीन दिवसांचा सदस्यकाळ दिसतो आहे धागकर्त्याचा! मिपावर(नव्हे, कुठेही!) चांगले वाचावे...चांगले विचार मांडावे...चांगल्या ओळखी निर्माण कराव्या, त्या वाढवाव्या...ते राहिले बाजूला.... साहेब आले नि मांडला मुद्दा, देशप्रेम-देशद्रोह वगैरे... त्याआधी आपली जरा ओळख सांगता का धागाकर्ते?? कुठुन आलात? काय करता? देशासाठी आपले योगदान काय?? आणी विशेष महत्वाचे मणजे इथे मिपावरही अशा लोकांना एण्टरटेन करणारे लोक्स आहेत! हे सर्वात दुर्दैव! अनुल्लेखाने सहज मारता येत की हो अशा धाग्यांना आणि लोकांना! पण मेगाबायटि परतीसादाच फ्याड लय वाईट! हा आजचा माझा पहिला आणि बहुतेक शेवटचा! राहता राहील धागा आणि त्याच्या विषयाच्या गांभिर्याबद्दल..... डेव्हिड हेडली.....इशरत जहां.....गुजरात पोलिस आणि मोदी.....शहा....सेक्युलर....जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी वामपंथी....पाकिस्तान.... हाफिज सईद.... हे सगळ 'मिपा'च बघणार का यापुढे?? कायदा आणि सुव्यवस्था बघणार्या सर्व संस्था बंद करायच्या?? राज्यघटना बासनात गुंडाळून ठेवायची?? पीएमओ सल्लागार समिती आणि युनो वगैरेचे सदस्य हे मिपाकरच हवेत असे कायद्याने ठरवून घ्यायचे?? काय करायचं नेमक?? (मिपाच्या काथ्याकूटान्ना आणि फालतू चर्चांना विटलेला) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
उ
उगा काहितरीच गुरुवार, 02/11/2016 - 13:25 नवीन
संदिप भाऊ , जाऊद्या दुर्लक्ष करा.
इन मीन तीन दिवसांचा सदस्यकाळ दिसतो आहे धागकर्त्याचा!
हे नाही कळालं एखादा नवीन सदस्य असेल तरी तोही तितक्याच प्रौढपणे आपले मत मांडू शकतो की ! एखाद्या व्यक्तीचा सदस्य काळ पाहून त्याची कुवत ओळखणे कसं काय शक्य आहे ?
राहता राहील धागा आणि त्याच्या विषयाच्या गांभिर्याबद्दल..... डेव्हिड हेडली.....इशरत जहां.....गुजरात पोलिस आणि मोदी.....शहा....सेक्युलर....जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी वामपंथी....पाकिस्तान.... हाफिज सईद.... हे सगळ 'मिपा'च बघणार का यापुढे?? कायदा आणि सुव्यवस्था बघणार्या सर्व संस्था बंद करायच्या?? राज्यघटना बासनात गुंडाळून ठेवायची?? पीएमओ सल्लागार समिती आणि युनो वगैरेचे सदस्य हे मिपाकरच हवेत असे कायद्याने ठरवून घ्यायचे?? काय करायचं नेमक?? (मिपाच्या काथ्याकूटान्ना आणि फालतू चर्चांना विटलेला) Sandy
इथे पण असहमत , तुम्हाला चर्चा आवडत नाही तर नका ना वाचू ! शिर्षक वाचून लांब रहा झालं . मला तर वैयक्तिक आवडतात अशा चर्चा कारण यात पूर्णपणे वेगळे विचार करणारे लोक आपापले मुद्दे तितक्याच प्रभावीपणे मांडतात. त्यामुळे एकाच घटनेचे वेगवेगळे पैलू कळतात .
आणी विशेष महत्वाचे मणजे इथे मिपावरही अशा लोकांना एण्टरटेन करणारे लोक्स आहेत! हे सर्वात दुर्दैव! अनुल्लेखाने सहज मारता येत की हो अशा धाग्यांना आणि लोकांना! पण मेगाबायटि परतीसादाच फ्याड लय वाईट!
॑ का बुवा विरोध मेगाबायटी प्रतिसादांना ? ज्यांना वेळ ,इच्छा आहेत ते लिहीतात. ज्यांना वेळ, इच्छा आहे ते वाचतात. ज्यांची इच्छा नाही त्यांनी वाचू नये. आणी काय नवीन लेखक असला तर अनुल्लेखाने मारणार का प्रोत्साहन देणार ?
मिपावर(नव्हे, कुठेही!) चांगले वाचावे...चांगले विचार मांडावे...चांगल्या ओळखी निर्माण कराव्या, त्या वाढवाव्या.
याच्याशी सहमत! रच्याकने एवढे लिहून मी माझा किलोबायटी प्रतिसाद संपवतो. जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा