Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डेविड हेडलीची साक्ष,JNU, आणि ढोंगी फेक्युलर

च
चेक आणि मेट
गुरुवार, 02/11/2016 - 06:31
🗣 331 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, (पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.) तर मुद्दा असा कि, डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती. तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!! दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे?? आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे. तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो. तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का?? (सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)
वर्गीकरण
राष्ट्रीय राजकारण

प्रतिक्रिया द्या
59550 वाचन

💬 प्रतिसाद (331)
च
चेक आणि मेट गुरुवार, 02/11/2016 - 14:07 नवीन
धागा न वाचण्याचा आणि पाॅपकाॅर्नची प्रतिक्रिया न देण्याचा पर्याय होता तुमच्याकडे. मिपावर असा काथ्याकूट होणारच!! हे काय काव्य संमेलन नाही तुमच्या कविता ऐकायला. आणि मुद्यांची गांभीर्यता तुम्हाला कळते काय?? देशासाठी माझं योगदान विचारताय,तुम्ही काय कारगिल युद्ध खेळून आलात कि काय? काथ्याकूट मध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुद्दयांबद्दल काही लिहायचे नाही काय? अहो तुम्ही कोठून आलात?काय करता? चला हवा येवू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
उ
उगा काहितरीच गुरुवार, 02/11/2016 - 14:49 नवीन
थोडं थंड घ्या मालक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/11/2016 - 13:43 नवीन
तुमच्या विचारांचा आदरच आहे सोन्याबापू. पण दुर्दैवाने त्यावर सहमती दाखवु शकत नाही त्याबद्दल क्षमस्व. मी संदीप डांगेंचा ४ शब्दात स्टिरियोटाइप कसा केला ते नाही कळाले. मी एक खुप साधा प्रश्न विचारला होता. तिथुन धागा मोदी, माझा मोदीविरोधकफोबिया, डांग्यांचे देशप्रेम, माझे अपमानकारक लेखन, विवेकहीन विचार, माझे पुर्वग्रहदुषित विचार, माझे अधिकार यावर कसे पोचले हे मला अजुनदेखील कळालेले नाही. माझ्या पहिल्या प्रतिसादात एकही वैयक्तिक टीकेसदृश्य वाक्य नसूनही संदीप डांगे माझ्याबद्दल उपरोल्लेखित बेछूट वैयक्तिक विधाने करत सुटले हे कदाचित तुमच्या नजरेतुन सुटले आहे. " नक्की का ? नक्की ना?" केवळ या दोन प्रश्नातुन खालील वरील गोष्टी कश्या प्रतीत होतात? असो. तरीही तुमच्या मताचा आदरच आहे. खासकरुन तुम्ही आम्हाला तुमचे मित्र मानता तर तुमच्या प्रतिसादाचा मी नक्कीच विचार करेन. नुकत्याच घडलेल्या सियाचिन घटनेनंतर तर सैनिकांबद्दलचा आदर अजुन वाढलाच आहे. तुम्ही मला मित्र समजता या गोष्टीचा मला मनापासून आनंद आहे. मतमतांतरांचा विषय बाजूला सारुन आपली मैत्री अशीच वृद्धिंगत होत राहो हीच सदिच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
S
sagarpdy गुरुवार, 02/11/2016 - 12:40 नवीन
याचा अर्थ खालीलप्रमाणे झालेल्या अन्य घटनांसाठी जसे वेमुला केस मध्ये निषेध करणारे कार्यक्रम केले तसे का केले गेले नाहीत ? (आं जा वरून साभार) http://picsture.com/12-year-old-dalit-girl-raped-and-murdered-in-bareilly_3e6a7a708.html http://www.abplive.in/videos/12-year-old-dalit-girl-raped-and-murdered-in-bareilly-282839 http://www.uniindia.com/girl-raped-and-murdered-in-bareilly/states/news/362779.html http://timesofindia.indiatimes.com/city/patna/60-dalit-students-from-Bihar-threaten-suicide/articleshow/50816052.cms http://www.thehindu.com/news/national/other-states/60-dalit-students-in-bihar-threaten-suicide/article8184840.ece http://zeenews.india.com/news/maharashtra/my-son-was-murdered-because-he-was-a-hindu-sawan-rathods-father_1847791.html सगळे निषेध कार्यक्रम मोदी सरकार विरोधीच का असतात ? तथाकथित सेक्युलरांचा निवडक राजकीय विरोध हा मुद्दा आहे. (जुनाच आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 02/11/2016 - 13:09 नवीन
सागरजी प्रश्न रास्त आहे तुमचा. पण धागाकर्त्याचा रोख काय आहे नेमका? रोहित वेमुला वा इतर देशांतर्गत पक्षीय राजकारणी कुरघोड्या व जेएनयुतला कार्यक्रम ह्या दोहोंना एकाच पातळीवर घेऊ नये असे वाटते. कारण रोहित वेमुला निषेधप्रकरण हे स्पष्ट मोदीविरोधी-संघविरोधी-भाजपविरोधी कारस्थान होते. जेएनयुतला कार्यक्रम देशविरोधी कार्यक्रम आहे. त्याचा केंद्रात कोणत्या पक्षाचे, विचारांचे सरकार आहे ह्याच्याशी संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 02/11/2016 - 15:02 नवीन
पण त्ये वेमुला परकरण ज्येयेन्यू हूनच झालत न? सब फसाद की जड?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
च
चेक आणि मेट गुरुवार, 02/11/2016 - 14:14 नवीन
मोंदीना काय समजतात लोक ते देवच जाणे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते
काही दुमत? खरेच आहे हे. मोंदीना विरोध करायला जाऊन आपण नकळत देशविघातक कार्य करत आहोत. हे ढोंगी फेक्युलर लोकांना समजत नसते,म्हणजे त्यांचा त्या गोष्टीशी संबंधच नसतो म्हणा ना!त्यांना फक्त राजकारण करायचं असतं. आणि आपण इथे चकाट्या पिटत परत मोंदीवरच घसरतो काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 02/11/2016 - 12:56 नवीन
डेविड हेडलीची साक्ष २६/११ च्या हल्ल्यासंदर्भात घेतली जात आहे. इशरत प्रकरण हे त्या आधीचे आहे. हेडलीला साक्ष देताना तीचे नाव आठवत नव्हते, त्याने तीन महिलांच्या नावाचे ऑप्शन मागीतले,आपल्या वकिल साहेबांनी तीन महिलांची नावे सांगितली त्यात इशरतचेही नाव होते.ते नाव हेडलीला ओळखीचे वाटले व त्याने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्या तीन ऑप्शनमध्ये आपल्या वकिलानी इशरतचे नाव घेतले नसते तर? सगळंच संशयास्पद वाटतय. -
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 02/11/2016 - 13:33 नवीन
एवढे मोठे नेटवर्क. त्यात कुणा कुणाचे नाव लक्षात राहणार बिचार्‍याच्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 02/11/2016 - 13:07 नवीन
बातमीनुसार त्याला नूरजहाँ, इशरत आणि मुमताजमहल अशी तीन नावं ऐकवण्यात आली होती आणि त्याने इशरत जहाँ हे नाव घेतलेलं आहे. पण मग कोर्टात त्याच्या वकिलाने Suggestion या मुद्द्यावर objection घ्यायला हवं होतं, जे घेतलं गेलेलं नाही. कायद्यानुसार हेडली कोर्टात under oath साक्ष देत असल्यामुळे जोपर्यंत त्याची साक्ष निखालस खोटी ठरवणारा पुरावा कोर्टासमोर येत नाही तोपर्यंत कोर्ट हीच साक्ष ग्राह्य धरेल.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 02/11/2016 - 13:16 नवीन
पण मग कोर्टात त्याच्या वकिलाने Suggestion या मुद्द्यावर objection घ्यायला हवं होतं, जे घेतलं गेलेलं नाही
म्हणुनच संशयास्पद वाटतय.
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट गुरुवार, 02/11/2016 - 14:20 नवीन
इशरतचा एन्काउंटर झाल्यावर तीचा फोटो लष्कर-ए-तोयबा च्या वेबसाईटवर शहीद म्हणून झळकला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 02/11/2016 - 15:04 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
स
सुबोध खरे गुरुवार, 02/11/2016 - 16:04 नवीन
गोडसे अण्णा, दहशतवादी समोर हातात बंदूक घेऊन उभा असेल तेंव्हा त्याला संशयाचा फायदा देत येत नाही. इशरत जहान गुजरात मध्ये गरबा खेळायला गेली होती का? डेव्हिड कोलने अमेरिकन कोर्टात इशरत जहान दहशतवादी होती आणि ती श्री मोदींना मारण्यासाठी गुजरातला गेली होती हे कबुल केलेले आहे. तेथे दिलेला कबुली जबाब भारतीय कोर्टात चालत नाही म्हणून हि व्हिदिओ कॉन्फरन्स आहे. तिला मारल्याबद्दल या सुडोसेक्युलर माणसांनी मोदिजीना खूनी ठरवून टाकले होते. सर्वच्या सर्व न्यायालयात श्री. मोदी निर्दोष सुटले एवढेच नव्हे तर उपलब्ध असलेले सर्व पुरावे इशरत जहानच्या विरोधात आहेत. तरीही आपण त्यांना संशयाचा फायदा देऊ पाहत आहात? कोणत्या आणि किती विश्वासार्ह माहितीवर? आपण त्यांचे वकील आहात का आणि आपल्याला अशी खास माहिती आहे? जर असेल तर इथे मांडा. नसेल तर निदान हवेत बाण मारू नका. धन्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 02/11/2016 - 19:16 नवीन
सर्वच्या सर्व न्यायालयात श्री. मोदी निर्दोष सुटले एवढेच नव्हे तर उपलब्ध असलेले सर्व पुरावे इशरत जहानच्या विरोधात आहेत.
डॉ.साहेब आपला प्रचंड गैरसमज झालेला आहे. माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर १०० % विश्वास आहे.भारतीय न्यायालयाने निर्दोष ठरविलेल्या व्यक्तीचा मी द्वेषही करत नाही किंवा दोषी ठरवलेल्या इशरतला निर्दोषही मानत नाही. आपल्या सरकारी वकिलावर हेडलीच्या वकीलाचा केवढा तो विश्वास? समजा आपल्या वकीलाने हेडलीला जाळ्यात पकडले असते व त्यात हेडली अडकला असता आणी त्याने इशरतच्या ऐवजी दुसर्‍या कोणत्या महीलेचे नाव घेतले असते तर इशरत निर्दोष ठरली असती का? हेडली म्हणतो म्हणून ढोल बडवणारे आपल्या न्यायव्यवथेचा अपमान करत आहेत. दुसरा संशय हा Quid pro quo प्रकारचा आहे. योग्यवेळी त्यासंबंधी लिहीन,इथे नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गामा पैलवान Fri, 02/12/2016 - 14:49 नवीन
डॉक्टरसाहेब, तुमचा मुद्दा पटला. मात्र एक विधान दुरुस्त करायला हवंय.
>> सर्वच्या सर्व न्यायालयात श्री. मोदी निर्दोष सुटले ....
कुठल्याही न्यायालयाने मोदींना निर्दोष म्हणून जाहीर केलेले नाहीये. कारण की कुठल्याही न्यायालयात मोदींवर आरोपपत्र दाखल नाहीच्चे मुळी! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चेक आणि मेट गुरुवार, 02/11/2016 - 15:46 नवीन
1)डांगेसाहेबांचा पहिला प्रतिसाद →पाॅपकाॅर्न म्हणजे धागाकर्त्याचे लिखाण क्षूद्र आहे. बर चला लेखन मुद्देसूद नाही, धाग्याचा आशय काय आहे?मी कोणविरूद्ध आगपाखड केली आहे का? केली आहे तर ती ढोंगी लोकांवर मी ढोंगी सेक्युलर असाही शब्द वापरलाय. बरं यातून माझं लिखाण भाजपेयी आहे असं वाटत का? 2)डांगे साहेबांचा तिसरा प्रतिसाद मी स्टोरिओटाईप प्रतिसाद दिल्यावर खवळले, आणि प्रतिसाद आला तोही धमकीवजा सूचना असाच होता.म्हणजे चड्डीत रहा वगैरे,आणि पहिली आणि शेवटची सूचना.अशी सूचनावजा धमकी. मग मी मोठं मन करून माफी मागितली. 3)चौथा प्रतिसाद मी माफी मागितल्यावर लेखन कसे असावे हा उपदेश त्यांनी केला. 4)पाचवा प्रतिसाद त्यामध्ये ते असे म्हणतात, थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर मुद्देसूद,विचारनीय,तर्कशुद्ध लेखन करणारा माणूस अशी प्रतिक्रिया कशी देईल?हा प्रश्न मनात आला.आणि त्यामुळे त्यांनी असे उपहासात्मक म्हणलं असं न राहवून वाटलं. कदाचित मला डांगेफोबिया झाला असेल. त्यानंतर त्यांची आणि मृत्युंजयसाहेबांची जुगलबंदी चालू झाली. बरं मी धाग्यात दोनदा मोदींचा उल्लेख केला आहे 1)
तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!!
मुद्दा रास्त आहे. अल्पसंख्यांक तुष्टीकरण करण्यासाठी हे स्वयंघोषित ढोंगी सेक्युलर काहीवेळेस दहशतवाद्यांच्या विरूद्ध सुद्धा तोंड उघडायला घाबरतात. दहशतवाद्यांच्या नावापुढे 'श्री' लावतात. ते फक्त आणि फक्त राजकारण करतात. प्रश्न असा आणि तो फार महत्वाचा आहे,कि दहशतवाद हा राजकारण करण्याचा मुद्दा आहे का? दहशतवादाची झळ अजून आपल्यापर्यंत पोहचली नाही. 2)
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का??
इथेही मी मोदींचा उल्लेख केला आहे. आणि हाही मुद्दा रास्त आहे,अगदी 100% मी मोदीभक्त नाही,तरीही तटस्थपणे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मोदी आल्यापासून दांभिक सेक्युलरांचा सुळसुळाट वाढला आहे कि नाही?? उत्तर हो असं आहे,वाढला आहे. बरं आता चर्चा शांतपणे होणे गरजेचे होते,पण चर्चा निष्प्रभ ठरवण्याचा प्रयत्न झाला. chandnesandeep यांनी तर मला जिल्बिवालाच ठरवून टाकलं तुमचे देशासाठी योगदान काय म्हणे?कोण आहात?काय करता?वगैरे वगैरे. मिसळपाव हे फक्त आणि फक्त कविता सादर करायचे संस्थळ आहे का? चांगले वाचावे,चांगले विचार मांडावे असे ते म्हणतात, मी काय वाईट विचार मांडले हे कोणीतरी सांगा. आणि ही चर्चा तर एकदम सरळ आहे, मी देशद्रोही,धर्मविरोधी,भडकाऊ,असे काही लिहले आहे का? तसे असेल तर आमचे मिपावरील सक्रीय सभासद म्हणूनचा प्रवास संपवतो.आणि आम्ही वाचनमात्र म्हणूनच राहतो. चांदणेसाहेब,सोन्याबापू तुमची मिपाला गरज आहे,तेव्हा कृपया कायमचे गमन करू नका ही विनंती. तुम्ही छान लिहता. ...धन्यवाद
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 16:22 नवीन
पहिले म्हणजे ज़रा गार व्हा, दूसरे म्हणजे स्वतःचे मुद्दे मांडायमागे तुमची काय भूमिका होती ती मांडा. डांगे ह्यांना जर तुमचा रोख चुकीचा वाटला तर त्याचा प्रतिसाद करा, हे असे "आम्ही नाय जा" "आम्ही चाललो मिपा सोडुन" हाच का तो काथा कुटायचा बाणा? इतके मनावर घेऊ नये पब्लिक फोरम! बाकी आम्ही नवे होतो तेव्हा आमची ही हुर्यो उडाली आहे इथेच "ह्या धाग्यावर!" हे मिपा आहे देवा! ज्यांनी माझी आडमाप टंगड़ी ओढ़ली होती ती माणसे आज चांगले मित्र आहेत माझे , आले काय गेले काय असं नसतं,अन वाचन मात्र रहाणे वेगळे पड़ते स्वतः लिहिण्यापेक्षा! बघा विचार करा काय ते! शुभेच्छा
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 02/11/2016 - 17:29 नवीन
सोन्याबापू, तुम्ही सैन्यात असल्याने मिपावर माझ्यासकट सगळेच तुम्हांला थोडा अधिक आदर देतात. सैन्यातल्या व्यक्तीने तो आदर कमावलेलाही असतो, पण गेले काही दिवस आपले प्रतिसाद बघता थोडे आश्चर्य वाटते. इथे चेक आणि मेटना आपण योग्य सल्ला दिलेलाच आहे, पण http://www.misalpav.com/comment/802860#comment-802860 ह्या आणि अशाच अनेक प्रतिसादांवर आपला मित्रत्वाचा सला का दिसला नाही, ह्याचे मला खरेच मनापासून आश्चर्य वाटून राहिले आहे. सैनिक देशाचा हो, फक्त प्रांताचा नव्हे, खरे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 17:48 नवीन
काकांचा धागा आत्ता वाचला हो! बाकी कुठल्या धाग्यावर कुठे काय बोललो नाही ते बयाजवार सांगाल का जरा ताई ? माझी चुक (कळत केलेली नकळत झालेली) कुठलीही असो ती दुरुस्त करायला मला लाज नव्हती/नाही/नसेल अशी मी इथे लिखित ग्वाही देतो इथे, बाकी ते "एका प्रांताचा" वगैरे वाचुन मनःपूर्वक वाईट वाटले इतके नोंदवतो, इतका उथळ मी निश्चित नाही पण अर्थात तशी इमेज झाली असेल तर माझेच दुर्दैव म्हणावे लागेल. तुमच्या माहीती करता मी मुळचा सातार चा, आई सांगलीची,लहानाचा मोठा विदर्भात झालो अन नोकरी भारतभरात करतोय तस्मात् मी सगळीकडला अन सगळ्यांचाच आहे इतके सांगतो भरोसा ठेवणे न ठेवणे तुमची इच्छा उरला प्रश्न तुम्ही आदर देण्याचा अन मी तो कमवण्याचा तर तो कमवला आहे की नाही हे मला माहीती नाही मी , मला २ गोष्टी माहीती आहेत १ मिपा परिवाराने (तुम्ही सुद्धा) खुप भरभरुन आदर नक्कीच दिलाय मला २ तो आदर टिकवणे अन पचवणे हा खरोखर एक अग्निदिव्य असतो पब्लिकली तो आदर एक्सेप्ट करायचा असेल तर प्रसंगी एकट्यात आरश्यासमोर उभे राहून स्वताडन सुद्धा करावे लागते, कारण आदर म्हणजे भरोसा असतो तो लोकांचा तो जगणे कठीण असते पण तितकाच तो जॉब सैटिस्फैक्शन सुद्धा देतो बाकी आपण सुज्ञ आहात अन ज्येष्ठ सुद्धा, ताई म्हणतो मी तुम्हाला तेव्हा त्या हक्काने घड़ाघड़ा बोललो कमी अधिक लागले असेल तर माफ़ी मागतो (व्यथित) बाप्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
च
चेक आणि मेट गुरुवार, 02/11/2016 - 18:05 नवीन
बापूसाहेब व्यथित होऊ नका, दुसरा व्यनि केलाय रिप्लाय द्या कि राव. ताईंच्या बोलण्याचे व्यर्थ वाईट वाटून घेताय तुम्ही. बर तुम्ही डांगेसाहेबांना समजावून सांगितलय का? याबाबत सोयीस्कररित्या मौन बाळगले आहे तुम्ही. "हो मी त्यांना समजावून सांगितलं आहे"अशा आशयाचे शब्द ऐकण्यासाठी कान आतुरले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
य
यशोधरा गुरुवार, 02/11/2016 - 18:07 नवीन
बाकी सगळे ठीकच आहे, पण कुठेच तुम्हांला मी आत्ता उदाहरणादखल दिल्या सरखे प्रतिसाद दिसले नाहीत म्हणता, मग दाखवून तरी काय उपयोग नाही का? :) पण हरकत नाही, आता जे उदाहरण दिलेय त्याबद्दल काय मत नोंदवता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 18:17 नवीन
नाही तसे नाही, दाखवले तर बोलताही येईल, दाखवायला मी सुद्धा तसेच प्रतिसाद दाखवु शकेल पण ही टोटल एक्सरसाइज माझ्या चूका रेक्टिफाय करायची आहे इतर कोणाच्या हाईलाइट करून स्वतःच्या चुका रेशनलाइज करायची नाही म्हणून मी प्रतिवाद करणार नाही ! चुक सांगा मी करेक्ट करतो, बाकी काकांची पोस्ट पहाल, ती पोस्ट आली तेव्हा मी जेवत होतो हो! अन नंतर गुरुजींच्या धाग्यावर लिहित होतो, वाचल्याबरोबर तिकडे मत नोंदवले आहेच अर्थात हे तुम्हाला पटने न पटने तुमचा मुद्दा असेल पण तुम्ही सांगितले म्हणून मी उपचार म्हणून तिकडे बोललो असे नाही तर खरेच मला पटले नाही म्हणून बोललो ! बाकी काय सांगणार? _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 02/11/2016 - 18:24 नवीन
ठीके हो सोन्याबापू, तुम्ही सैन्यात आहात म्हणून तुम्हांला पेडेस्टलवर ठेवून आम्ही (निदान मी तरी) पहातो, तेव्हा असे कसे, असे वाटले म्हणून पोस्ट प्रपंच. नपे़क्षा आपको कुछ कहनेकी मेरी क्या जुर्रत. आपण व आपल्यासारखे सैनिक आहात म्हणून आम्ही सिविलियन्स आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/11/2016 - 18:27 नवीन
ताई तुमची परवानगी असल्यास व्यनि करू का एक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 02/11/2016 - 18:37 नवीन
करा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
व
विकास गुरुवार, 02/11/2016 - 19:41 नवीन
एन डी टि व्ही ची २०१३ ची बातमी Intelligence Bureau's letter to CBI: 'David Headley told FBI Ishrat Jahan was a suicide bomber' New Delhi: When officers of India's National Investigating Agency (NIA) were allowed to interrogate David Coleman Headley in a jail in Chicago in 2010, the Pakistani-American allegedly told them that Ishrat Jahan, a college student shot dead by the Gujarat Police in 2004, had terrorist links. .... NDTV has learnt that in March 2010, the FBI had independently warned India's Intelligence Bureau that in his questioning by US investigators, Mr Headley had said that Ishrat and her associates were planning terror strikes on Gujarat temples including the Akshardham temple in Gandhinagar. २०१३ म्हणजे युपिएच्या अच्छे दिनांचा काळ... त्यावेळेस हॅडली म्हणला तर एन डी टीव्ही ला काही ठसका लागला नव्हता... गंमत म्हणजे सरकारने माध्यमांना दिलेल्या कागदपत्रांमधे तो भाग गाळला होता तरी देखील... सरकारने तो भाग त्यावेळेस का गाळला असेल? अर्थातच निवडणुकांच्या आधीचा काळ होता त्यामुळे साहजीकच होते म्हणा... असो.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 02/12/2016 - 00:22 नवीन
काय हो.. चांगलं दळण-कांडण-पॉपकॉर्न सेवन चाललं असताना नेमका रसभंग करणं कसं सुचतं तुम्हाला ?? :प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 02/12/2016 - 13:30 नवीन
"आपणासी जे जे ठावे, ते ते दुसर्‍यांसी सांगावे, (शहाणे सगळेच आहेत म्हणून) इन्फॉर्म्ड करावे सकल जन" असा आमचा उदात्त हेतू आहे... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
च
चौकटराजा Fri, 02/12/2016 - 05:07 नवीन
राका, भाजपा, का, इ इ इ च्या प्रवक्त्याना वन्दन करून त्यांचे ठराविक वाक्य इथे वापरतो " सध्या प्रक्रण न्यायप्रविस्ट असल्याने त्याबाबत बोलने उचित नाही"
  • Log in or register to post comments
म
मोगा Fri, 02/12/2016 - 06:35 नवीन
नथुलाही तीन ऑप्शन द्यायला हवे होते. त्यांचा खून करायला कुणी सांगितले ? ऑप्शन्स.. काका तात्या नाना
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Fri, 02/12/2016 - 07:44 नवीन
काल टी.व्ही. सरकारी वकीलांवर "कौन बनेगा करोडपती" खेळल्याची कॉमेंट ऐकली आणि एका चर्चा सत्रात काँग्रेस प्रतीनिधीने गांधी हत्येच्या संदर्भात माफीच्या साक्षीदाराचा पण उल्लेख केलेला ऐकला. हेडलीला जर तीन नावे विचारली होती, तर तो यापैकी एकही नाही असे म्ह्णू शकला असता ना? की अ‍ॅड. निकमांनी , "नाही, तू नाव सांगीतलेच पाहीजेस" अशी जबरदस्ती केली होती ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
म
मोगा Fri, 02/12/2016 - 11:52 नवीन
हेडलीला नावच सांगायचे असते तर त्याने ते स्वतःच सांगितले असते. पर्याय द्यायची गरज काय होती ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ब
बबन ताम्बे Fri, 02/12/2016 - 12:07 नवीन
पण मग पर्याय दिल्यावर नेमके त्याने तेच नाव का निवडले. इतरही पर्याय होते. किंवा माहीत नाही हाही पर्याय होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
म
मोगा Fri, 02/12/2016 - 14:44 नवीन
३ पर्यायातला एक त्याने निवडला तरी त्याचे पुरावे लागतीलच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
भ
भंकस बाबा Fri, 02/12/2016 - 18:53 नवीन
जे बोलायचे ते स्पष्ट लिहा ना, तुम्ही मिपावर काय गाण्याच्या भेंडया खेळायला येता? ती कॉंग्रेसची आणि राष्ट्रवादीची येडं राजकीय फायदा मिळावा म्हणुन सेक्युलर बनतात,तुम्ही काय म्हणुन? पुढच्या वेळी निवडणुकीला उभे रहायचे आहे काय? उगाच्च गुळमुळीत बोलत राहु नका, सपष्ट बोला की इशरत जहां देशसेवक होती, ती गुजरातमधे अनाथ मुलांची सेवा करायला चालली होती,या चांगल्या कामासाठी तिने दोन अतिरेक्यांचे मनपरिवर्तन देखिल केले होते. र्च्यामारि तिच्याबरोबर सापडलेले अतिरेकी होते हे सिद्ध झाले म्हणुन हे सेक्युकर थोडे चेकाळले नाहीतर राजघाटावर तिची कब्र बांधा असे सांगायला पण यानी मागे पुढे पाहिले नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
क
काळा पहाड Fri, 02/12/2016 - 10:01 नवीन
लग्नाचं नक्की वय काय असतं? १. ६ वर्षे २. ९ वर्षे ३. ५३ वर्षे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
L
lakhu risbud Fri, 02/12/2016 - 17:09 नवीन
ओ ...तुम्ही आधी तुमची बायको सांभाळा काड्या मग लावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
च
चेक आणि मेट Fri, 02/12/2016 - 07:41 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Fri, 02/12/2016 - 07:49 नवीन
चर्चा मनोरंजक आहे…डेव्हिड हेडली सारख्या डबल एजंट वर विश्वास ठेवण कितपत योग्य ? आय पी एस राजेंद्रकुमार ने सुद्धा हेडली कडून हे वदवून घेतलय फार पूर्वीच आणि तेव्हाच NIA ने हेडली चा हा दावा फेटाळला होता. हा राजेंद्रकुमार स्वताच या इशरत च्या केस मध्ये अडकलेला
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Fri, 02/12/2016 - 08:03 नवीन
हेडली २६/११ ISI ने स्पाँन्सर केलं म्हणतोय. त्यात पाकिस्तानी अतिरेकी होते असही म्हणतोय. त्यावर पण अविश्वास ठेवायचा का? खोटं बोलून त्याला काय फायदा? तो एनीवे ३५ वर्ष तुरुंगात असणारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
न
नितीनचंद्र Fri, 02/12/2016 - 12:02 नवीन
जाऊ द्या हो इशारत दशहतवादी होती हे मोदी विरोधी लोकांनाही माहित होते आणि ती नकटी सेस्टा कायतरीवाड तीलाही माहित होते. मुस्लीम मते मिळवण्यासाठीचा चुनावी जुमला होता. शहासाहेब लई हुशार ! त्यांनी केंद्र सरकारचे नियंत्रण असलेला रॉ चा अधिकारी साक्षीला ठेऊन तीला अल्लासदनी पाठवले. कारण ती येणार आहे हा संदेश रॉ चाच होता. कॉग्रेसचे हात दगडाखाली सापडले. मग त्यांनी ती हाकामारी सेस्टा तिलसवाढ उभी केली.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 02/12/2016 - 15:04 नवीन
भाऊ तोरसेकरांच्या ब्लोग वरून साभार माफ़ीचा साक्षीदार होऊन डेव्हीड कोलमन हेडली काय सांगणार, त्याबददल कोणाला फ़ारशी उत्सुकता नव्हती. कारण जी माहिती आता बाहेर येत आहे, त्यात नवे असे काहीच नाही. प्रामुख्याने त्यात इशरत जहान या फ़िदायिन मुलीविषयीची माहिती नवी नाही. कारण जेव्हा हेडलीला अमेरिकेत अटक झाली व तिथेच त्याच्यावर खटला भरला गेला, तेव्हाच त्याची भारतीय अधिकार्‍यांनी जबानी घेतली होती. त्याविषयी तेव्हाही गवगवा झालेला होता. त्यात इशरत फ़िदायिन असल्याचे त्याने कबुल केल्याची माहिती उजेडात आलेली होती. मात्र त्याबद्दल इथलेच तात्कालीन युपीए सरकार गोपनीयता पाळत होते. इशरत पाकिस्तानची हस्तक असल्याची माहिती हाताशी असताना, तेव्हाचे मनमोहन सरकार व त्यातले गृहमंत्री लपवाछपवी कशाला करत होते, हा मुद्दा खरा चर्चेचा किंवा चिंताजनक आहे. कारण इशरत बिहारची बेटी म्हणून तेव्हा नितीशकुमार अश्रू ढाळत होते आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तिला मुलीसारखी ठरवून रडत होते. पवाराचेच दोन निकटवर्तिय इशरतच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आकाशपाताळ एक करत होते. त्यांनी इशरतच्या कुटुंबाला लाखांचे चेक देण्यात पुढाकार घेतला होता. पण त्यालाही स्थानिक राजकारणातला उतावळेपणा म्हणता येईल. त्याकडे दुर्लक्ष अरता येईल. पण इशरत लष्करे तोयबाची हस्तक असल्याची माहिती भारत सरकारचे गृहमंत्री कशाला लपवत होते, हा गहन प्रश्न आहे. कोणाला आठवत नसेल, तर तेव्हाच्या गाजलेल्या बातम्या काढून तपासायला हरकत नाही. इशरतला निरपराध ठरवण्यासाठी तिच्या चकमकीत गुंतलेल्या अधिकार्‍यांना गजाआड टाकण्यासाठी आटापिटा चालला होता. त्याच्याही पुढे जाऊन भारतीय गुप्तचर खात्याच्या वरीष्ठ अधिकार्‍याना खुनी ठरवण्यासाठी सीबीआयला कामाला जुंपलेले होते. अशा सर्वांच्या अब्रुची लक्तरेच आता हेडली वेशीवर टांगतो आहे. आज अनेकांना नेहरू विद्यापिठात उजळमाथ्याने घातपाती जिहादी अफ़जल गुरूच्या उदात्तीकरणाचे नवल वाटते, त्याची सुरूवात इशरत चकमकीतून झाली हे विसरता कामा नये. इशरत तोयबाची हस्तक होती आणि तरीही तिला निरपराध ठरवून अधिकार्‍यांनाच गजाआड ढकलण्यात धन्यता मानली गेली. त्यासाठी जीतेंद्र आव्हाड पत्रकार परिषदा घेत होते आणि तीस्ता सेटलवाड न्यायालयीन आघाडी संभाळत होती. पण ते भारत सरकारचा घटक नव्हते आणि इशरत फ़िदायिन असेल, तर तिला शिक्षा देणे वा गुन्हेगार ठरवणे ही सरकारची जबाबदारी होती. पण ती पार पाडण्यापेक्षा भारत सरकारच आपल्या हाती आलेली हेडलीची जबानी लपवून आपल्या अधिकार्‍यांना गुन्हेगार ठरवण्याचे उद्योग करीत होती. ही बाब अतिशय गंभीर आहे. सेक्युलर वा पुरोगामी असण्यासाठी पाकिस्तानी हस्तक वा घातपातींना पाठीशी घालण्यापर्यंत तात्कालीन सेक्युलर सरकारने किती भयंकर निर्णय घेतले, त्याचा पर्दाफ़ाश हेडलीच्या साक्षीने झाला आहे. त्यात नवे काही नाही. पण हे आधीच हेडलीने सांगितले असताना तेव्हाच्या भारत सरकार वा सत्ताधार्‍यांनी देशाच्या सुरक्षेसाठी काय केले, हा गंभीर प्रश्न आहे. तेव्हाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे किंवा पंतप्रधान मनमोहन सिंग या विषयात काय करत होते? हेडलीची कबुली हाताशी असताना त्यांनी विचारणा झाली तरी इशरत दोषी असल्याची माहिती कशाला लपवली होती? ती लपवून आपण देशाचा घात करतोय, एवढेही त्यांच्या लक्षात आले नसेल काय? इशरतचे उदात्तीकरण थांबवून तिला गुन्हेगार ठरवणे दूर राहिले. उलट इशरतचा निकाल लावणार्‍या अधिकार्‍यांनाच आरोपी बनवण्यात तेव्हा सीबीआय गर्क होती. एकामागून एक अर्धा डझन अधिकारी त्यात गोवले गेले होते आणि दिर्घकाळ खितपत पडलेले होते. त्याचे कारण नरेंद्र मोदी इतकेच होते. मोदी या व्यक्तीला गुजरातमधून सत्ताभ्रष्ट करणे आणि भारतीय राजकारणातून उखडून टाकणे, यासाठी जे सेक्युलर कारस्थान बारा वर्षे शिजवले गेले, त्याचाच लाभ इशरतच्या उदात्तीकरणाला झालेला होता. त्यासाठी मग आयबीचे अधिकारी राजेंद्रकुमार यांनाही इशरत चकमकीत गुंतवण्यापर्यंत गृहखात्याने मजल मारली. थोडक्यात पाकिस्तानी हेरखात्याला हव्या असलेल्या गोष्टी भारताचेच गृहखाते करीत होते. हेडलीने तेव्हाच दिलेली कबुली कुठून तरी बाहेर आलेली होती. पण त्यामुळे इशरत प्रकरणात मोदींना सुटका मिळेल म्हणून तितकीच जबानी लपवण्यात धन्यता मानली गेली. हेडलीच्या कबुलीविषयी जी माहिती देण्यात आली, त्यातला इशरतविषयीचा भाग खोडून पाठवण्यात आला. जेणे करून इशरत फ़िदायिन आहे, याला दुजोरा मिळू नये. याचा अर्थ असा, की भारताचे तेव्हाचे गृहखाते एका तोयबा फ़िदायिनला संरक्षण देण्यासाठी झटत होते. दुसरीकडे नेहरू विद्यापिठ किंवा तत्सम सेक्युलर अड्ड्यांवर अफ़जल गुरू किंवा इशरत यांच्या उदात्तीकरणाच्या जोरदार मोहिमा चालविल्या जात होत्या. त्यासाठी माध्यमातील हस्तकही जुंपले होते. यातल्या अनेकांना आपण पाकिस्तानला व तिथल्या जिहादी घातपात्यांना अपरोक्ष मदत करतोय याचेही भान नव्हते. इशरतची हत्या अमानुष असल्याचा दावा करून आक्रोश करणार्‍यांना आता सत्य समोर आल्यावर आपली चुक कबुल करण्याची हिंमत आहे काय? तेव्हाच्या युपीए सरकारने तर इशरतसाठी आपल्या ज्येष्ठ गुप्तचर खात्यालाच खुनाच्या गुन्ह्यात गुंतवण्याचे प्रयास चालविले होते. इशरतचा खुन मोदींच्या माथी मारण्यासाठी हा सगळा खटाटोप चालू होता. त्यासाठी सेक्युलर ‘दूर’बुद्धी किती आश्चर्यकारक शोध लावत होती, त्याचे नमूने तात्कालीन लेख व बातमीदारीतही सापडू शकतील. मुद्दा इतकाच होता, की मोदींना संपवायला युपीए वा कॉग्रेस थेट तोयबा वा पाक घातपात्यांनाही हाताशी धरायला तयार होती. अर्थात आजही त्यात बदल झालेला नाही. भारत-पाक मैत्रीसाठी सत्तेवरून मोदींना हटवावे लागेल, असे आवाहन आजही मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन करू शकतात. नेहरू विद्यापिठात अफ़जल गुरूचा उदो उदो चालतो. आणि सत्ता हातात असताना इशरतविषयी हेडलीने केलेला खुलासा लपवला जातो. हा सेक्युलर वा पुरोगामी राजकारणाचा खरा चेहरा आहे. देशाचे वा समाजाचे नुकसान वा हानी याच्याशी पुरोगामीत्वाला कशी फ़िकीर नाही, त्याची ग्वाही हेडली आपल्या साक्षीतून देतो आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या नावाने बोटे मोडण्याची गरज नाही. आपल्यातले गद्दार उघड्या डोळ्यांनी ओळखण्याची गरज आहे. आपल्या साक्षीतून भारतात पाकिस्तानचे हस्तक कुठल्या मोक्याच्या जागी जाऊन बसले आहेत आणि किती सहजगत्या भारतीयांची दिशाभूल शत्रू करू शकतात, त्याचे पुरावेच हेडली सादर करतो आहे. ज्यांना हिंदूत्ववादी किंवा प्रतिगामी ठरवले आहे, त्यांना नामशेष करायला वा पराभूत करायला इथले पुरोगामी पाक वा देशाच्या अन्य कुठल्याही शत्रूशी हातमिळवणी करू शकतात, इतकाच हेडलीच्या साक्षीचा अर्थ आहे. इशरत जहानविषयी त्याचे वक्तव्य याचा सज्जड पुरावा आहे. कारण त्यात नवे काही नसून त्याविषयी तात्कालीन गृहमंत्री, व सरकारांनी काय कारवाई केली होती, त्याची चौकशी आवश्यक आहे. इशरतच्या समर्थनार्थ पुढे सरसावलेल्यांचे हेतू व त्यांच्या अन्य हालचालींची कसून तपासणी व्हायला हवी आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या व त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान उधळणार्‍या नेहरू विद्यापिठातले विद्यार्थी राजरोस देशद्रोही अफ़जल गुरूचे उदात्तीकरण करतात. त्याचा अर्थ इतकाच होतो की पाकिस्तानला भारतविरोधी कारवाया करण्यासाठी बाहेरून हस्तक पाठवण्याची गरज नाही. पैसाही खर्चायची गरज नाही. सेक्युलर व पुरोगामी भुमिकेच्या नावाखाली भारतविरोधी कारवायांना भारत सरकारच अनुदान देवू शकते. कारण अशा केंद्रीय नेहरूवादी विद्यापिठांचा कब्जा प्राध्यापक वा बुद्धीमंत होऊन देशाच्या शत्रूंनी घेतलेला आहे. म्हणूनच हैद्राबाद विद्यापिठात याकुबच्या फ़ाशीचा निषेध करणार्‍या रोहितला हिरो बनवले जाते. संसदेवरील हल्ल्यातल्या अफ़जलला शहीद म्हणून पेश केले जाते. त्याला आक्षेप घेण्याला अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी म्हटले जाते. तोयबाच्या हस्तकाला चकमकीत मारणे गुन्हा ठरवला जातो आणि संसदेच्या सुरक्षेत असलेल्या सैनिकांचा बळी घेणार्‍या अफ़जलला शहीद बनवला जातो. ह्या गोष्टी आपल्या समोर येतात, तेव्हा एकाच प्रश्नाचे उत्तर आपण शोधणे भाग असते, अन्य कुठलाही विषय वा प्रश्न दुय्यम होऊन जातात. तुमचा देश महत्वाचा की तुमची विचारसरणी? आमचे उत्तर सोपे सरळ आहे, इशरत जहानचे अच्छा, हिंदूस्तान हमारा
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 02/12/2016 - 16:34 नवीन
वाचतेय. काही पडलेले प्रश्न- १) ह्या चकमकीत भाग घेतलेले गुजरात पोलिसचे डी.पी.वंजारा गेले ८ वर्षे जेलमध्ये होते. दुसर्या एका खोट्या चकमकीसाठी तुरुंगात होते. २)ईशरत एल.ई.टी.साठी काम करत होती, ह्याचा कोणता पुरावा गुजरात पोलिस वा आय.बी.ने सादर केला? ३)२००९ साली अहमदाबाद नगर न्यायालयाने ही चकमक खोटी होती असे सांगितले होते. ४)२०१३ मध्ये सी.बी.आय.नेही हेच सांगितले. ५) हे विकिपिडिया वरून- Tamang's report said the Crime Branch police kidnapped Ishrat and the others from Mumbai on 12 June 2004 and brought them to Ahmedabad. The four were killed on the night of 14 June in police custody, but the police claimed that an "encounter" took place the next morning on the outskirts of Ahmedabad. Rigor mortis had set in between 11 pm and midnight the previous night, indicating that the police had later shot bullets into Ishrat's body to substantiate the encounter theory ६)जिवंत पकडून पुरावे दिले असते तर पाकिस्तानला उघडे पाडता आले नसते का? (जसे २६-११ मध्ये कसाबला पकडले होते) ७)On 21 November 2011, the SIT told the Gujarat High Court that the Ishrat Jahan encounter was not genuine. एस.आय.टी चे सदस्य, न्यायाधीश तमंग व तत्कालीन सी.बी.आय.अधिकारी कॉन्ग्रेससाठी काम करत होते असा दावा असेल तर विषयच संपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
य
याॅर्कर Fri, 02/12/2016 - 17:06 नवीन
Breaking News:: प्रदीर्घ विश्रातीनंतर माईसाहेबांचं पुनरागमन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ग
गामा पैलवान Fri, 02/12/2016 - 20:56 नवीन
माईसाहेब, जर १२ तारखेला इशरतचं अपहरण झालं होतं, तर तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार का नोंदवली नाही? मी एके ठिकाणी वाचल्याप्रमाणे १३ तारखेला तिने घरी फोन लावला होता. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ब
बोका-ए-आझम Sat, 02/13/2016 - 04:52 नवीन
असा आरोप आता विरोधी पक्ष असलेले काँग्रेसचे लोक करत आहेत. काँग्रेस सरकारमध्ये असताना CBI निःपक्षपाती होती आणि भाजप सरकार आल्यावर पक्षपाती झाली असं आपलं म्हणणं आहे का? तमंग हे मॅजिस्ट्रेट आहेत. त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की इशरत गरीब घरातली होती आणि ट्यूशन्स घेऊन घरखर्चाला हातभार लावत होती आणि जावेद शेख (जो या एन्काउंटरमध्ये मारला गेला)त्याच्याकडे ₹३००० एवढ्या पगारावर काम करत होती आणि ती निर्दोष आहे. एवढा महत्वाचा निर्णय एवढ्या तुटपुंज्या पुराव्यावर? इशरत कमीतकमी collateral damage आणि जास्तीतजास्त एक सुईसाईड बाँबर असू शकते. ती त्या लोकांबरोबर काय करत होती याचं उत्तर तिच्या घरातले लोक अजूनही देत नाहीयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 02/13/2016 - 07:09 नवीन
ती कामानिमित्त गेली होती असे वाचले होते. एन्काऊंटर करणारे वंजारा खोट्या चकमकीसाठी तुरुंगात जाउन आले आहेत त्याबद्दल काय मत आहे?ज्यांनी मारले त्यांनी पुरावा नको का द्यायला ?२००८ मध्ये रॉ चे माजी बी.रामन ह्यांनी लेख लिहिला होता ह्यावर-त्यांनीही हाच संशय व्यक्त केला होता. गुजरात पोलिसांचे वर्तन कमालीचे संशयास्पद असल्याचे मत त्यांनीही व्यक्त केले होते. ती काय करत होती,तक्रार का नोंदवली नाही.. हे दुय्यम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्रीगुरुजी Sat, 02/13/2016 - 09:54 नवीन
नानासाहेब, वंजारांना जामीन न मिळाल्याने ते तुरूंगात होते, खोटी चकमक सिद्ध झाल्याने नव्हे. कॉंग्रेसचे लक्ष मोदी होते, वंजारा नव्हे. त्यामुळे इशरत जहाचे निमित्त करून वंजारा व इतर अनेक अधिकार्‍यांना या खोट्या प्रकरणात काँग्रेसने अडकवले. त्यांच्या माध्यमातून शेवटी मोदी व शहांच्या आदेशानुसार ही खोटी चकमक घडवून आणली हे वंजारा व इतरांकडून वदवून घ्यायचे होते व ते वदवून शेवटी मोदींना यात अडकविण्याची योजना होती. त्यासाठी गुप्तचर खात्याच्या काही अधिकार्‍यांनाही अडकविण्यात आले. काँग्रेसच्या दुर्दैवाने मोदी किंवा शहा यात अडकले नाहीत कारण तसे काही पुरावेच नव्हते. भारताच्या दुर्दैवाने अतिरेक्यांना मदत करणारे सरकार सलग १० वर्षे सत्तेत होते. सत्तेवर राहण्यासाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करणे, त्यासाठी अतिरेक्यांना समर्थन देणे व मोदींसारख्या विरोधकांना संपविण्यासाठी सरकारी तपास यंत्रणात भांडणे लावून देणे अशी नीच कृत्ये काँग्रेसने १० वर्षे केली.
ती काय करत होती,तक्रार का नोंदवली नाही.. हे दुय्यम आहे.
कसा काय दुय्यम? तोच तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. एक तरूण मुलगी आपल्या घरापासून इतक्या लांब दुसर्‍या राज्यात पहाटे ३ वाजता ३ तरूणांबरोबर (त्यातले २ पाकिस्तानी होते) कारमध्ये एकटी नक्की काय करत होती? नक्की कोणत्या कारणासाठी ती आपल्या घरापासून इतक्या दूर मध्यरात्री आली होती? तिच्याबरोबर असणारे ते दोन पाकिस्तानी नक्की कोण होते? हे सर्वजण गुजरातमध्ये नक्की काय करणार होते? ती बेपत्ता झाल्यावर अनेक दिवस तिच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार का नोंदविली नाही? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत व हेच सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत. २००४ मध्ये ती मारली गेल्यावर लष्कर-ए-तोयबाच्या संकेतस्थळावर ती आमचीच अतिरेकी होती अशी कबुली दिली गेली होती. त्यांच्याच नवाझ टाइम्स या मुखपत्रातून देखील हीच कबुली दिली होती. २०१० मध्ये हेडलीने एनआयए ने केलेल्या चौकशीत अगदी हेच सांगितले होते आणि त्याने २०१६ मध्ये देखील हेच सांगितले आहे. लष्कर-ए-तोयबा व हेडलीची भूमिका याबाबतीत कायम सातत्याची राहिली आहे. २००४ पासून ते सातत्याने हेच सांगत आहेत. भारताच्या दुर्दैवाने अशा अतिरेक्यांचा उमाळा येणारे पक्ष व नेते भारतात आहेत. बाटला हाऊस चकमकीत एक वरीष्ठ पोलिस अधिकारी व अलिगढ मुस्लिम विद्यापीठात वास्तव्य करणारे २ अतिरेकी मारले गेल्यावर त्या अतिरेक्यांच्या मृत्युच्या बातमीने सोनिया गांधींच्या डोळ्यात अश्रू तरळले असे दस्तुरखुद्द सलमान खुर्शिद यांनी ऑन रेकॉर्ड सांगितले आहे. इशरत जहाच्या कुटुंबियांना आधी वसंत डावखरे व नंतर जितेंद्र आव्हाडने १ लाखाची मदत दिली. तिच्या नावाने शहीद इशरत जहा नाव दिलेली अ‍ॅम्ब्युलन्स काढली. तिचा भाऊ जितेंद्र आव्हाडच्याच कार्यालयात नोकरी करतो. "इशरत जहा निष्पाप होती व अतिरेकी हल्ले केल्याबद्दल मुस्लिमांना दोष देता येणार नाही" असे दस्तुरखुद्द शरद पवारांनी जाहीर सभेत सांगितले होते. जेएनयू मध्ये ज्या देशद्रोही घोषणा दिल्या गेल्या व त्यामुळे तिथल्या विद्यार्थी नेत्याला अटक झाल्यावर राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताचं दुर्दैव असे नेते व पक्ष भारतात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
क
कपिलमुनी Sat, 02/13/2016 - 10:20 नवीन
रागांबद्दल सिलेक्टीव लिहीला आहे Rahul Gandhi added his voice to the debate saying that while 'anti-India sentiment is unacceptable, debate is part of a democracy. He said: "While Anti-India sentiment is unquestionably unacceptable, the right to dissent & debate is an essential ingredient of democracy. जेएनयू'तील घोषणाबाजी अस्वीकार्य- राहुल गांधी बाकी शेप्रमा मधे इंटरेस्ट नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा