डेविड हेडलीची साक्ष,JNU, आणि ढोंगी फेक्युलर
नमस्कार मंडळी,
(पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.)
तर मुद्दा असा कि,
डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती.
तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!!
दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या.
तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे??
आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे.
तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो.
तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का??
(सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)
💬 प्रतिसाद
(331)
त
तर्राट जोकर
Mon, 02/15/2016 - 10:30
नवीन
काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा आणि JNU या दोन प्रकरणांची तुलना योग्य नाही
>> ज्या घोषणा पीडीपी काश्मिरात करते त्याच काश्मिरी पोरांनी जेएनयुत येऊन केल्यात... सोच वोही, जगह नई.
त्यासाठी काश्मिरच्या मुद्द्याचा अभ्यास हवा.तो पूर्ण विषय संवेदनशील आहे.
>> दाखवा अभ्यास. चांगली संधी आहे.
नकाशामध्ये दाखवण्यापुरताच काश्मिर भारताचा अविभाज्य भाग आहे.
>> नवीन माहिती बद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
च
चेक आणि मेट
Mon, 02/15/2016 - 10:38
नवीन
फाट्यावर
बाकि देशविरोधी घोषणाबाजी याबद्दल अजूनही तुम्ही तुमचे मत मांडले नाही,यातच सगळे आले.
सोच वही आयडी दुसरा
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 02/15/2016 - 10:50
नवीन
फाट्यावर
>> चर्चेचा उत्कृष्ट दर्जा दाखवताय.
बाकि देशविरोधी घोषणाबाजी याबद्दल अजूनही तुम्ही तुमचे मत मांडले नाही,यातच सगळे आले.
>> देशभक्तीचे सर्टीफिकेट वाटायची जिम्मेदारी अंगावर घेऊ नये.
सोच वही आयडी दुसरा
>> तुमच्याबद्दलच्या नविन माहितीबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!
- Log in or register to post comments
च
चेक आणि मेट
Mon, 02/15/2016 - 10:54
नवीन
बाकि देशविरोधी घोषणाबाजी याबद्दल अजूनही तुम्ही तुमचे मत मांडले नाही
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 02/15/2016 - 11:00
नवीन
आमचे मत फार सरळ आहे हो. देशविरोधी, घटनाविरोधी कार्यवाह्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी. कुठलाही भेदभाव असु नये.
काडीसाठी तळमळताय? हे घ्या काड्या | | | | | | | | | | |
ह्याप्पी?
- Log in or register to post comments
च
चेक आणि मेट
Mon, 02/15/2016 - 11:05
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 02/15/2016 - 11:12
नवीन
काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा आणि JNU या दोन प्रकरणांची तुलना योग्य नाही
उत्तराची वाट बघतो. तुम्ही पलायन करणार नाही अशी आशा आहे.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Mon, 02/15/2016 - 11:23
नवीन
काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा :- तजो साहेब भारताचा जो पहिलेपासुन काश्मिर विषयि दृष्टिकोन आहे तो आपल्याला पटत नाहि का ?
जेएनउ:- भारत तेरे तुकडे होंगे...इन्शाअल्लाह्...इन्शाअल्लाह ह्या घोषणेबद्द्ल काय वाटत.
मला हे विचारावेसे वाटले. मि कुठल्याहि पक्षाचा बांधिल नाहि, पण मुद्दा नंबर १ ल्या ला मला भारत सरकार (शब्दशः)
चे जे धोरण आहे ते योग्य वाटतेय, स्वप्न तर हे हि बघतो गिलगिट , बाल्टिस्तान सुद्धा पुन्हा आपले व्हावे.
मुद्दा नंबर दोन ह्या घोषणा ज्यांनि दिल्या त्यांना योग्य ते शासन व्हावे.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 02/15/2016 - 11:33
नवीन
भारत सरकारचा दॄष्टिकोन योग्यच आहे. तो विषय नाही. भारताचे तुकडे करण्याच्या घोषणेबद्दल जेवढी चीड आहे तेवढीच त्या घोषणेला पाठिंबा देणार्या पीडीपीसोबत पाट लावणार्यांना समर्थन दिले जाते ह्याबद्दलही आहे.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Tue, 02/16/2016 - 13:07
नवीन
पीडीपीने अफझल गुरु सारखे दहशतवादी हल्ले करा, असे सांगितले का?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 02/16/2016 - 13:13
नवीन
तितके होइ पर्यंत वाट बघायची का?
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 02/16/2016 - 13:37
नवीन
स्वतंत्र काश्मीरची मागणी सर्वप्रथम करणारे शेख अब्दुल्ला हे नॅशनल कॉन्फरन्स चे संस्थापक. राजा हरिसिंग काश्मीर वाचवा म्हणुन दाती तृण धरुन आलेले असताना केवळ शेख अब्दुल्लांची भारताबरोबर विलीनकरणाची तयारी नाही म्हणुन नेहरुंनी काश्मीर च्या विलीनकरणावर निर्णय घ्यायला उशीर केला. शेवटी शेख अब्दुल्लह नी नेहरुंवर उपकार केल्यासारखे एका चिटोर्यावर सशर्त सहमती दर्शवल्यावरच विलीनकरण मान्य झाले आणि काश्मीरला सैन्य गेले. या प्रकारात एक तृतीयांश काश्मीर कायमचा हातुन गेला.
या नॅशनल कॉन्फरन्स बरोबर युती करावी का मग? दुसरी गोष्ट म्हणजे काश्मीर मध्ये पीडीपी किंवा एनसी यांना वगळुन सरकारच बनवता येत नसेल तर इतर सर्व पक्षांनी मूग गिळुन गप्प बसावे का ? भाजपा च कशाला, कॉम्ग्रेसने देखील त्यांना हाताशी धरलेले नाही का?
एक अपरिहार्यता म्हणुन दुर्दैवाने त्या दोन पक्षांना हाताशी धरावे लागत असेल तर तसे करण्यामुळे ते त्यांच्या विचारांना समर्थन देण्यासारखे होत नाही.
आज काश्मीरचे दुर्दैव असे की फुटीरतावाद्यांना चुचकारायला लागत आहे. हे लोण इतर देशामध्ये पोचण्याआधी आणि इतर सर्व देशात हीच परिस्थिती उद्भवण्याअधी इतरत्र असल्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जे करणे गरजेच आहे ते सर्व करावे. अन्यथा काश्मीरसारखे भारत विरोधी आणि पाकिस्तानसमर्थक झेंडे सगळ्या देशात दिसु लागतील. जे काश्मीरमध्ये करता येत नाही ते देशात इतरत्र पण करु नये असे म्हणण्यात काहिच हशील नाही (तुम्ही असे म्हणत आहात असे मी म्हणत नाही आहे)
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 02/16/2016 - 13:54
नवीन
काय बात है ?___/\___
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Tue, 02/16/2016 - 14:11
नवीन
एक अपरिहार्यता म्हणुन दुर्दैवाने त्या दोन पक्षांना हाताशी धरावे लागत असेल तर तसे करण्यामुळे ते त्यांच्या विचारांना समर्थन देण्यासारखे होत नाही.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 02/17/2016 - 21:05
नवीन
एक अपरिहार्यता म्हणुन दुर्दैवाने त्या दोन पक्षांना हाताशी धरावे लागत असेल तर तसे करण्यामुळे ते त्यांच्या विचारांना समर्थन देण्यासारखे होत नाही.
कोणती अपरिहार्यता?
जे देशात करु शकतो ते कश्मिरमधे का नाही हाच सवाल आहे. अब्दुल्ला, चाचा जाऊन जमाना झाला. कुठवर त्यांची मढी काढकाढून आपल्या नाकर्तेपणावर पांघरून घालणार आहोत आपण? कश्मिरी पंडितांना पळवले ना त्यांनी, मग त्यांना पळवा, जमिनित गाडा, भिरकावुन द्या आकाशात. करा संपुर्ण स्वच्छता अभियान. आधीच्यांच्या बोटचेपे धोरणाला कंटाळून आम्ही भाजपाला निवडुन आणलं, यांनीही तेच केलं तर मग पार्टी विथ डिफरंस व एक के बदले दस सर चं काय झालं?
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
गुरुवार, 02/18/2016 - 07:11
नवीन
अपरिहार्यता ती हीच की काश्मिरात विष खोलवर पसरले आहे. जर शरीरात विष पसरायची सुरुवात असेल तर एखादे बोट कापुन समजा काम होणार असेल तर काश्मीर मध्ये ते विष नसानसात भिनते आहे. किती जणांना आत टाकणार? तिकडे ही कारवाई करायची हे एवढे सरळ काम असले असते तर मोदी सरकारने एव्हाना केले असते.
दुसरी गोष्ट म्हणजे मला नाही वाटत की काश्मीर मध्ये केंद्र सरकार आणीबाणी लागू करु शकते. आणीबाणीसदृश्य परिस्थिती तर तिथे १९९० पासुन आहेच. अब्दुल्ला, चाचा जाऊन जमाना झाला खरे पण त्यांची पापे अजुनही फेडायला लागत आहेत. कलम ३७० रद्द करायची इच्छा भाजपाला नक्की आहे पण सध्याच्या सामाजिक परिस्थितीत एका सकाळी उठले आणि कलम ३७० रद्द केले इतकी सोप्पे गोष्ट नाही ती. हळु हळु करतीलच. ते केले जरी तरी लोकांच्या मनातील विष असे सहजासहजी नाही काढुन टाकता येणार.
कश्मिरी पंडितांना पळवले ना त्यांनी, मग त्यांना पळवा, जमिनित गाडा, भिरकावुन द्या आकाशात. करा संपुर्ण स्वच्छता अभियान.
याला थोडीशी जेनोसाइड ची झाक येते आहे का? कारण इतका घाऊक संहार केला तर त्याला वांशिक संहाराचे लेबल लावण्यात येइल. जितक्य्या शांतपणे हा घाऊक ब्रेन वॉश झाला आहे तितक्याच शांतपणे मतपरिवर्तन करावे लागेल. थोडाफार बडगा उगारता येइल पण अचानकपणे अशी घाऊक कारवाई करण्याची तिथली परिस्थिती नाही.
एक के बदले दस सर चं काय झालं?
हे धोरण तर ठेवावेच. पण एक के बदले दस सर करताना आपण चुकुन निरपराधांचा बळी घेत नाही ना हे देखील बघायला हवे. त्यामुळेच काश्मीरमध्ये हे सरसकट करता येत नाही. तसेही भारताची राज्यघटना नागरिकांचे शिरकाण करायाला परवानगी देत नाही. कायद्याची चौकट पाळावी लागते जशी ती जे एन यु च्या केस मध्ये देखील पाळावी कागेल, लागते आहे आणि पाळली जात आहे.
कोणती अपरिहार्यता?
सगळ्या पक्षांच्या खासदारांच्या संख्या बघा तिथे. कुठले पर्म्युटेशन काँबिनेशन चालु शकेल सांगा ब्रे. आता कं क्रवे ब्रे?
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
गुरुवार, 02/18/2016 - 07:22
नवीन
हीच खरी ज्ञानबाची मेख आहे आमच्या मते,
साधारण एक वर्ष अगोदर पर्यटनासाठी कश्मीर फिरणे झाले आहे तिथे आमची खेचरे वळणारा पोऱ्या हा चक्क सिम्बायोसिस मधुन व्यवस्थापन स्नातकोत्तर पदविका घेतलेला होता! त्याला खेचरे वळण्या संबंधी विचारता म्हणाला 'यहाँ स्पेशल रह सकते है जनाब कौन रॅट रेस में शामिल होगा'
सामान्य कश्मीरीची मानसिकता दर्शवणारे वाक्य आहे ते! लवकरात लवकर रद्द व्हावे अन ते पहायला आम्ही जिवंत असावे अशी एक आस आहे मनात
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 02/18/2016 - 08:42
नवीन
कायद्याची चौकट पाळावी लागते जशी ती जे एन यु च्या केस मध्ये देखील पाळावी कागेल, लागते आहे आणि पाळली जात आहे.
>> वकिलांच्या वेषातले भाजपचे गुंड कोर्टाच्या आवारात कायद्याची चौकट पाळतांना बघत आहोत.
सगळ्या पक्षांच्या खासदारांच्या संख्या बघा तिथे. कुठले पर्म्युटेशन काँबिनेशन चालु शकेल सांगा ब्रे.
>> गुड. मग इतरांच्या कोअलिशनला शय्यासोबत म्हणण्याचा अधिकार उरत नाही.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
गुरुवार, 02/18/2016 - 09:10
नवीन
वकिलांच्या वेषातले भाजपचे गुंड कोर्टाच्या आवारात कायद्याची चौकट पाळतांना बघत आहोत.
असा कुठलाही पुरावा समोर आलेला नसताना असे म्ह्णणणे म्हणजे निव्वळ खोटारडेपणा झाला. देशातले सगळे अतिरेकी डाव्यांनी पोसलेले गुंड आहेत किंवा सगळे मुसलमान अत्तिरेकी आहेत या वाक्यांना जितका अर्थ आहे त्याहुन कमी अर्थ आहे तुमच्या बोलण्याला. त्यामुळे त्याची फारतर गंमत वाटु शकते. त्याहुन या प्रतिसादाला फार किंमत नाही.
गुड. मग इतरांच्या कोअलिशनला शय्यासोबत म्हणण्याचा अधिकार उरत नाही.
डिपेंड्स. परिस्थितीवर अवलंबुन आहे ते. भाजपाच्या राष्ट्रवादीच्या संबंधांना आम्ही शय्यासोबतच म्हणतो. काय आहे ना आम्ही आंधळा द्वेष किंवा आंधळी भक्ती जोपासु शकत नाही. लालू - नितीश - रागा ही एक अशीच (त्याहुन घाणेरडी) शैय्यासोबत आहे.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 02/19/2016 - 08:54
नवीन
वकिलांच्या वेषातले भाजपचे गुंड कोर्टाच्या आवारात कायद्याची चौकट पाळतांना बघत आहोत.
असा कुठलाही पुरावा समोर आलेला नसताना असे म्ह्णणणे म्हणजे निव्वळ खोटारडेपणा झाला.
>> मृत्यूंजय सर. आपल्या विधानाचा अर्थ काय घ्यावा? शब्दफोड करुन सांगा. नेमक्या कुठल्या शब्दाबद्दल आपण खोटारडेपणाचा आरोप केला आहे? आपण बातम्या बघतच असाल.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Sat, 02/20/2016 - 08:08
नवीन
वकीलांनी हल्ला केला ही बातमी आणि ते भाजपाचे गुंड होते ही थापेबाजी. आता या थापेबाजीबद्दल कं क्रवे ब्रे?
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 02/22/2016 - 18:35
नवीन
अजूनही कळले नाही तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे.
खालील कुठले वाक्य तुम्हाला खोटारडेपणा वाटते.
१. वकिलांनी कन्हयाकुमारला कोर्टाच्या आवारात मारपीट केली.
२. मारपीट करणारे हे वकिल भाजपचे कार्यकर्ते आहेत.
३. कायदा हातात घेणार्यांना गुंड म्हटले जाते.
असो. त्याच वकिलांचा कबुलीजबाबही बघून घ्या. ते स्वतःचा थापा मारत आहेत असे म्हणू नका म्हणजे झाले. आपल्या आवडत्या पक्षाला कुठपर्यंत सांभाळाल, सर?
http://aajtak.intoday.in/story/sting-operation-patiala-house-accused-lawyers-exposed-how-they-planned-to-beat-kanhaiya-1-855926.html
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 02/24/2016 - 12:28
नवीन
मृत्युंजयसाहेब, कुठे गेलात?
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 02/24/2016 - 14:42
नवीन
वकीलांनी हल्ला केला ही बातमी आणि ते भाजपाचे गुंड होते ही थापेबाजी. आता या थापेबाजीबद्दल कं क्रवे ब्रे?
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 02/24/2016 - 14:49
नवीन
श्रीगुरुजी मोड? तुम्ही सगळे एकाच साच्यातून काढलेले असता काय?
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 02/24/2016 - 14:52
नवीन
तुम्ही सग्ळे म्हणजे कोण? साचा म्हणजे काय?
तुम्ही सगळे एकाच साच्यातून काढलेले असता काय" हा वैयक्तिक प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटत नाही काय? नाही कारण काही दिवसांपुर्वी "काही मतिमंद आयडी" असे जनरल विधान केलेले असताना (आणी ते कुणालाही स्पेसिफिक उद्देशुन लिहिलेले नसताना) ते तुम्हाला वैयक्तिक आणि सकलमिपाकरापमानकारक वाटले होते म्हणुन विचारतो.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 02/24/2016 - 15:17
नवीन
ज्या पद्धतीने उत्तर आलं आहे त्याला म्हणलो. मिपावर आपल्या आवडत्या पक्षाची खिंड लढवणारे सगळेच. तुम्ही नसाल तर ते विधान तुम्हाला लागू नाही. वैयक्तिक तर अजिबात नाही. तसे वाटत असल्यास गैरसमज करुन घेऊ नये.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 02/26/2016 - 06:24
नवीन
तुम्ही नसाल तर ते विधान तुम्हाला लागू नाही. वैयक्तिक तर अजिबात नाही. तसे वाटत असल्यास गैरसमज करुन घेऊ नये.
तुम्ही सग्ळे असेच काड्यासारु आणि बेजाबदार ट्रोल्स आहात काय?
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 02/26/2016 - 08:04
नवीन
हो, काही शंका?
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 02/26/2016 - 09:31
नवीन
असतील तरी आता मिटल्या. धन्यवाद :)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/25/2016 - 10:08
नवीन
आता हे काय नवीन? म्हणजे मला मूळव्याध झाली आहे, मला कावीळ झाली आहे असे आतापर्यंत इतरांना शोध लागले. पण माझ्या नावाचा एक मोड आहे हे आजच कळले.
- Log in or register to post comments
च
चेक आणि मेट
Mon, 02/15/2016 - 11:24
नवीन
काश्मिरात "पाकिस्तान झिंदाबाद"च्या घोषणा किंवा आयसिसचे झेंडे बघून/ऐकून सवय आहे.JNU दिल्लीत आहे,आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो,दिल्ली भारताची राजधानी आहे,ज्या संसदेवर अफजलने हल्ला केला होता तीच संसद दिल्लीत आहे.
आणि दिल्लीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा म्हणजे संपलं कि राव कि सगळं!!
म्हणून दिल्ली आणि काश्मिर ही तुलना योग्य नाही.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 02/15/2016 - 11:36
नवीन
एका भूतपुर्व पंतप्रधानांचे फेमस वाक्य आठवले. -तिथे तर गवताचे पातेही उगवत नाही-
असो.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Mon, 02/15/2016 - 15:39
नवीन
तुमच्या टकलावर देखिल एकहि केस नाही तर मग ते पण निरुपयोगी आहे काय.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 02/15/2016 - 15:51
नवीन
अगदी अगदी. म्हणूनच म्हटले काश्मिरात घोषणा ओके. दिल्लीत नॉट ओके. हा अॅप्रोच गलत आहे.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Mon, 02/15/2016 - 16:26
नवीन
काश्मिरिना मिळणाऱ्या सवलती प्रथम बंद केल्या पाहिजे.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 02/15/2016 - 16:29
नवीन
लाख टक्के सहमत.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Mon, 02/15/2016 - 16:30
नवीन
सौ टके कि बात कही हय
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 02/18/2016 - 14:55
नवीन
काश्मीरचे तीन भाग आहेत. जम्मू काश्मीर आणि लडाख.
यापैकी काश्मीर खोर्यातून हिंदू लोकांचे पद्धतशीर शिरकाण करून किंवा त्यांना धमकावून तेथून हाकलून दिले गेलेले आहे. यात सवतासुभा ठेवण्याच्या नादात काश्मिरी पंडितांनी पण आपले विशेष अधिकार सोडून देण्यास नकार दिला होता हे लक्षात घेतले पाहिजे. पण आता त्यांना काश्मीर खोर्यातून हाकलले गेल्यावर त्यांचे डोळे उघडले असले तरीही आपले विशेष अधिकार सोडून देण्यास ते आजही तयार नाहीत.
काश्मीर मध्ये "आपले"सरकार असणे का आवश्यक आहे हे मी विशद करतो आहे. आपले म्हणजे भारतीय "राष्ट्रवादी" पाकधार्जिणे नव्हे. मग ते कॉंग्रेस चे असो किंवा भाजप चे. पक्षीय दृष्टीकोनातून याचा विचार होऊ नये. (१९८४ ते १९८९ मध्ये श्री जगमोहन हे राज्यपाल कॉंग्रेस सरकारनेच नेमलेले होते ज्यांनी तेथे भरीव कार्य केले होते.)
पी डी पी किंवा नैशनल कॉन्फरन्सचि सरकारे हि दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती असलेली असतात हि गोष्ट लपून राहिलेली नाही. जर आपले सरकार( युती असली तरीही) असेल विशेषतः त्यात गृह खाते हातात असेल तर गुप्त बातम्या, दहशतवादी लोकांच्या कारवाया याबद्दलची बित्तंबातमी तुमच्या कडे असू शकते आणि मग त्यामाहितीचा उपयोग केंद्र सरकार बरोबर चर्चा करून दहशतवादी कारवायाना आळा घालण्यासाठी उपयोग होतो.
सरकार "त्यांचे" (पाक धार्जिणे) असेल तर पकडलेल्या दहशतवाद्याना न्यायालयात उभे करताना ढिसाळ चौकशी पुरावे देऊन ते सुटतील अशी "व्यवस्था करता येते/ केली जाते. काही वेळेस पोलिस किंवा इतर सरकारी खात्यातील लोक त्यांना धार्जिणे झाले तर त्यांची उचलबांगडी करावी लागते.आणि आपली "विश्वासू" माणसे अशा महत्त्वाच्या जागी असणे आवश्यक असते. म्हणून सरकार मध्ये सहभाग असेल तर त्याचा उपयोग होतो. यासाठी जरी तह करावा लागला तरीही हरकत नाही. साधनशुचिता आणि राष्ट्र कार्य यात काय महत्त्वाचे ते आपण ठरवणे आवश्यक असते.
विषय फार मोठा गहन आहे आणि माझी त्याबद्दलची समज फारच तोकडी आहे म्हणून येथे थांबतो
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 02/18/2016 - 14:58
नवीन
अॅटलिस्ट मला तरी असे नाहि वाटत. कारण आपण मुद्दे अगदि योग्य तर्हेने मांडलेयत.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/18/2016 - 15:55
नवीन
डॉ. खरे,
उत्तम प्रतिसाद!
परंतु खालील वाक्याविषयी पूर्ण सहमत नाही.
कॉंग्रेस तेथील सरकारमध्ये असेल तर तुम्ही ठेवता तशी अपेक्षा दहशतवाद्यांवरील कारवाईच्या बाबतीत ठेवता येत नाही. यापूर्वी २००२-२००८ या काळात काँग्रेस+पीडीपी या युतीचे सरकार होते व नंतर २००८-२०१४ या काळात काँग्रेसच्या पाठिंब्याने नॅकॉचे सरकार होते. या काळात दहशतवाद्यावरील कारवाईबाबत काँग्रेसचा प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता. २००५-२००८ या ३ वर्षात काँग्रेसचे गुलाम नबी आझाद मुख्यमंत्री असूनदेखील दहशतवाद्यांविषयी फारशी कठोर कारवाई नव्हती.
परंतु फेब्रुवारी २०१५ पासून भाजप+पीडीपी चे संयुक्त सरकार आहे. त्यात सभापतीपद व उपमुख्यमंत्रीपद भाजपकडे आहे. भाजपच्या सहभागामुळे पीडीपी पक्ष कसा नियंत्रणात राहिला याचे खालील लेखात वर्णन आले आहे. भाजपऐवजी कॉंग्रेस पक्ष सत्तेत असता तर पीडीपीवर कोणतेच नियंत्रण राहिले नसते व काँग्रेसने पीडीपीच्या कोणत्याच कृतींना विरोध केला नसता.
भाजप व पीडीपीचे संयुक्त सरकार स्थापन झाल्यावर सर्वांना प्रचंड धक्का बसला. दोन पूर्णपणे विरोधी विचारसरणी असलेले पक्ष केवळ स्वार्थासाठी एकत्र आले अशी टीका होऊ लागली. पीडीपी हा काहीसा पाकिस्तानकडे झुकलेला, भारतविरोधी, दहशतवाद्यांविषयी सहानुभूती असलेला पक्ष तर भाजपची भूमिका याच्या बरोबर उलटी. परंतु जम्मू-काश्मिर राज्यातील सरकारमध्ये भाजप असणे हे पीडीपीवर म्हणजे पर्यायाने विभाजक शक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचे भाजपच्या लक्षात आले होते. त्यामुळेच स्वतःच्या अटींवरच भाजप सरकारमध्ये सामील झाला.
या लेखातील काही परिच्छेद -
________________________________________________________________
This time, Mufti started on the same lines and ordered the release of separatist leader Masarat Alam. Within a month, not only was the government forced to rearrest Alam, there was a stricter watch on separatists with the Public Safety Act invoked against more and more separatists and even minor protesters.
_________________________________________________________________
The agenda of alliance said the partners would not rake up controversial issues — such as Article 370, and a separate state flag for Jammu and Kashmir. BJP leader Farooq Khan, in fact, challenged a J&K High Court decision that all constitutional authorities must respect and hoist the state flag. After the Mufti government issued a circular asking constitutional authorities to hoist the state flag on official cars and buildings, it had to retract within 24 hours.
__________________________________________________________________
After the Muftis formed the PDP in 1999, Mehbooba was key to the rise that took the party to power within three years of its inception. She used a clever mix of mainstream and separatist politics, turning up among mourners for slain militants wearing a green abbaya, voicing her concern on human rights violations and seeking a resolution to the Kashmir issue through dialogue. The party advocated self-rule.
Over the past nine months, Mehbooba was watching the results of 17 years of hard work slipping away.
____________________________________________________________________
जम्मू-काश्मिरमध्ये भाजप सत्तेत असणे का आवश्यक होते हे लेख वाचल्यावर लक्षात येइल.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/mehbooba-mufti-mufti-jk-bjp-pdp-bjp-pdp-mufti-mohammad-sayeed-to-bjp-or-not-to-bjp-the-ifs-and-buts/
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 02/19/2016 - 06:03
नवीन
श्रीगुरुजी
आपण जरी म्हणालात कि कॉंग्रेस चे धोरण नरमाईचे होते तरिहि तेथे असलेले सनदी नोकर हे त्या ( काश्मिरी) सरकारचीच नव्हे तर केंद्र सरकारची पण मदत करीत होते. यामुळे आतील बातम्या केंद्र सरकार आणि लष्करी मुख्यालयाकडे येत असत.
कितीही लष्कर एखाद्या भागात ठेवा आतील माहिती हि तेथील स्थानिक जनता आणि स्थानिक पोलिस / सरकारी नोकर/ शिक्षक यांना जास्त असते आणि आपत्कालीन स्थितीत हीच माहिती फार मोलाची ठरते.
दुर्दैवाने UPA २ च्या काळात निर्णयशून्यता आल्याने परिस्थिती थोडी बिघडली हे खरे आहे. यास्तव जर लोकशाही सरकार असले तर "आपले" लोक तेथे सरकार मध्ये किंवा सनदी सेवेत असणे आवश्यक असते.
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
Mon, 02/15/2016 - 10:02
नवीन
तुम्ही प्रत्येक माणूस आपल्या विरोधात असल्याच्या थाटातच प्रतिसाद देता का हो महाराज? आपण अधोरेखित केलेली माझीच वाक्यं परत एकदा वाचाल का श्रीमान. मला सरकार ला विरोध करायचा नाहीये तर त्यांचा पक्ष उचलून धरताना अंगी नैतिक बळ असावे म्हणून आलेली ही उस्फुर्त कळकळ आहे. काथ्या भांडणाच्या आवेशात नका कुटु मालक. अन समोरचा काय म्हणतो आहे ते एकदा नीट लक्षात घ्या, मी मला हव्या असलेल्या नैतिक बळाबद्दल बोलतोय राजे.
बाकी प्रश्नाला प्रतिप्रश्न वगैरे म्हणून ठीक आहे पण तीनशे सत्तर बद्दल विचारलेच आहेत म्हणून सांगतो की मला तीनशे सत्तर एक फुक्कट लाड वाटतो, तो लवकरात लवकर नल एंड वॉइड व्हावा असेही वाटते. पण सद्द्यस्थितीत त्या दिशेने काहीच दिसत नाहीये , काँग्रेस ते करणे अशक्यच होती कारण हरामखोरी अन काँग्रेसी असणे हा समानार्थी शब्द आहे फ़क्त बीजेपी ने त्या वाटेने जाऊ नये असे वाटते, नाहीतर सेना काय वाईट होती राव आमची! एकच बुलंद आवाज होता थोरल्या साहेबांचा!
असो!.
- Log in or register to post comments
च
चेक आणि मेट
Mon, 02/15/2016 - 10:12
नवीन
असं हाय होय.
मला प्रतिक्रिया समजली नाही त्याबद्दल क्षमस्व._/\_
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
Mon, 02/15/2016 - 11:21
नवीन
काश्मिरमध्ये पाय पसरण्याचा भाजपचा कूटनितीक डाव आहे.
असाच "पाय" काँग्रेस, आप किंवा अजून एखाद्या पक्षाने पसरण्यासाठी अफजल गुरू ज्यांना जवळचा वाटतो अश्या पक्षाबरोबर युती केली तर चालेल का?
उत्तर "नाही" असेल तर हे म्हणजे "हम करे तो प्यार, तुम करो तो बलात्कार" असं होइल.
- Log in or register to post comments
च
चेक आणि मेट
Mon, 02/15/2016 - 11:29
नवीन
हो चालेल.आणि यापुर्वी चालवूनही घेतले आहे.
सगळे एकाच माळेचे मणी आहेत.
फक्त बाकिच्यांनी JNU बाबत राजकारण करू नये हीच इच्छा आहे.
- Log in or register to post comments
व
विटेकर
Mon, 02/15/2016 - 09:56
नवीन
मोगा नावाच्या पाजी माणसाला तातडीने हाकलून द्यावे अशी मा संपादक मंडळला विनंती !
कुठे हुतात्मा आणि कुठे अतिरेकी .. अक्कल आहे का जागेवर ?
धागा तातडीने संपादित करुन अशलाघ्य प्रतिसाद संपादित करावेत.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Mon, 02/15/2016 - 10:42
नवीन
भाजपाने नैतिकतेचे ढोंग बंद करावे आणि बाकि विरोधि पक्षानीं सिक्-ल्युरिझमचे.
भारत तेरे तुकडे होंगे...इन्शाअल्लाह्...इन्शाअल्लाह
हि घोषणा तेहि दिल्लि मध्ये...काय समजायचे
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Mon, 02/15/2016 - 10:59
नवीन
तिकडे मोगा कधीच हद्दपार झालाय, नवा ना सिर (ना पैर) बनुन आलाय. इथे पण तेच होणार.
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 02/15/2016 - 11:06
नवीन
इथे त्यांनी कधीच "हद्द" पार केली आहे !!
एखादा अअॅण्टी व्हायरस प्रोग्राम मिळेल का अश्या आय्डींसाठी ?????
संगणक आज्ञावली वाल्यांसाठी आव्हान आणि आवाहनही !!!!!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »