तुम्ही न पाहिलेल्या मिपाकरांविषयी तुमच्या मनातली प्रतिमा
तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.
फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे. २)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार. ३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व . ४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व. ५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. ६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी. ७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे. ८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले. ९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव. १०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व. सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
💬 प्रतिसाद
(362)
प
पगला गजोधर
Wed, 02/17/2016 - 09:12
नवीन
टीव्र णिशेढ ....
;)
ह घ्या
मी पयला....
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 02/17/2016 - 09:58
नवीन
तुम्ही ना ?
ढगळ पँट, इस्त्रीचा टीशर्ट, आणि चेहर्यावर खाली मुंडी पाताळ धुंडी भाव.
हाकानाका...
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 02/21/2016 - 07:13
नवीन
आमच्या आयडीचा या धागा लेखात नंबर पाहून डोळे प्वाणावले, ढिशक्लेमर जोडण्याची आणि पहिल्या पानावर यावा हे जरूरी वाटल्यामुळे प्रतिसाद येथे नोंदवत असून आमचा संक्षी. आणि वि. ठाकुर या आयडींशी कै पण संबंध नाही. संक्षी हा आयडी दिसला की आम्ही आंक्षीsss करून दूर जात असतो ;) (संक्षी ह. घ्या.)
* दुसरे, वय कमी करुन मिळण्यासाठी सनई किंवा चौघडा काय आणि कसे वाजवावे ? (आयडीचे तुकडे केल्या बद्दल क्षमा मागून)
* चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला म्हंजे काय र्हातय ? कसे दिसतात हे चेहरे काही फोटू सारखे उदाहरण द्यालका नाई काही.
* आम्ही बरीक अधिक स्थुल कसे व्हावे याची पुस्तके बाजारात नित्याने शोधत असतो, स्थुल होण्याचा आनंद मिळवून दिल्या बद्दल धागा लेखकाचे धन्यवाद आणि __/\__ :)
आता संक्षी/ठाकूर समजून कोन काय कामेंट दिलय का बघतो आणि तेथे पण ढिसक्लेमर चिटकवितो.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 02/21/2016 - 17:24
नवीन
मात्र संक्षी आणि विवेक ठाकूर या दोन आयडींचे जन्मोजन्मीचे संबंध किंवा ऋणानुबंध असावेत असे वाटते.
संक्षी सॉरी विवेक ठाकूर या प्रतिसादाकडे ढुंकूनही पाहणार नाहीत याची खात्री असल्यानेच मी हा प्रतिसाद देतोय. :)
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 02/17/2016 - 09:15
नवीन
यशो
एकदम भारी =))
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 02/17/2016 - 09:30
नवीन
भारी काय?? =)) इंदिरा गांधी तरी म्हणायचे मला! ओ सचौ, बदला ते. इंदिरा गांधी करा!:D
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 02/17/2016 - 09:34
नवीन
खान्ग्रेस पेक्षा सेना बरी ;)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 02/17/2016 - 09:35
नवीन
पण नीलमपेक्षा इंदिरा ब्येष्ट!
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
Wed, 02/17/2016 - 10:00
नवीन
अहं तुम्ही निलम गोऱ्हेच बरोबर इंदिरा गांधी म्हंटले की ती सोनीया धसका घ्यायची तिकडे.
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 02/17/2016 - 09:17
नवीन
पिरा स्रुजा हाणणार =)))
या गं लवकर
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Wed, 02/17/2016 - 09:23
नवीन
:))
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/17/2016 - 09:26
नवीन
हेच मनात आले... स्त्रियांच्या वयांचे अंदाज आणि तेही २५ पेक्षा (बरेच) जास्त म्हणजे महायुद्धाची घोषणाच. काहिही हाँ सचौ !!! =)) =)) =))
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 02/17/2016 - 09:39
नवीन
हहपुवा
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 09:52
नवीन
मी संतापाने धुमसत आहे... थांबा मला शांत होऊ द्या...
ज्या कोणी खापर पणज्याने हा धागा काढला आहे...
अजुन मी तीशी सुद्धा गाठलेली नाही.
५०????????
५०????????
प न्ना स??????????????????
तुम्हारी ये जुर्रत.... सर कलम कर दो इस नामाकुल का!!!!!!!!
(ह.घ्या हो... !! मी सिरीयसली ३० ला दोन कमी आहे हो.. जिथे तिथे लोक्स मला "जास्तच" आदर देऊ लागलेत..)
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 02/17/2016 - 12:43
नवीन
पिरा तु खुप मॅचुअर्ड आहेस असे त्यांचे म्हणणे असावे. यातुन एकच निष्पन्न होते की सनईचौघडा हा किमान टका, ब्ञामॅ आणि विठांचा डु आयडी नाही ;)
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 12:49
नवीन
बॅमॅ आणि विठा इज राईट... पण टका!!! कान्त से यु नो!
तुमच्या बद्दल अंदाज -
वय ३५-४० , अंदाजे ५'१०" - ६' उंची, मध्यम बांधा, रंग सावळा, चष्मा, गंभीर व्यक्तिमत्व
तुमच्याकडे खुप अवघड अवघड पुस्तकं असतील..
;)
- Log in or register to post comments
इ
इशा१२३
Wed, 02/17/2016 - 12:59
नवीन
खीक्क !
वय, रंग, चष्मा,व्यक्तीमत्व हे अंदाज वाचुन :)
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 02/17/2016 - 13:31
नवीन
पुस्तके बरीच आहेत. अवघड आहेत की नाही ते सांगता येत नाही. बाकी सगळॅ अंदाज चुकले ;) पण वयाच्या बाबतीत काठावर पास देता येइल. :)
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 02/17/2016 - 14:26
नवीन
रंग सावळा - लोल!
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 14:29
नवीन
आता काय करणार.. त्यांच नावंच तसं आहे..
मला सारखं ऊन.. सूर्य... म्हणुन टॅन असंच काहीतरी वाटतं!!
गोरेप्पान वगैरे आहेत का?!
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 02/17/2016 - 15:49
नवीन
माझ्या शेजारी उभे राहिले तर जास्तच गोरे दिसतील! ;)
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Wed, 02/17/2016 - 15:51
नवीन
काय गं पोरींनो कशाला लेकराला त्रास देताय?
पोरा , आज फार च हसले बघ. तुझे आजोबा पण विचारत होते आज स्वारी खुदुखुदु का हसते आहे एवढी? पन्नाशीची वाटते होय रे मी तुला? चहाटळ मेला.. उद्या झगा घाल म्हणशील तुझ्या या आजीला.
आणि या पोरीं अगदी वात्रट आहेत हो. किती ती कामं धामं सोडुन बडबड. त्या अजया ला लेकीला उजवायचं सोडून बाकी उद्द्योग सांगा. घोडनवरी झालीये हो ती ! उरका आता तिचे , मी डोळे मिटायला मोकळी मग.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 16:24
नवीन
गुडघे कसेत ग तुझे आता!
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Wed, 02/17/2016 - 16:30
नवीन
आता काय पोरी ? कधी दुखतात कधी बरे असतात. आता या वयात हे चालायचंच. गुडघे नीट असुन मला नाचायला का जायचंय या वयात ? आता बागडण्याचे दिवस तुमचे. मी मेली तुमच्या आजोबांबरोबर एका बाजुला बसुन डोळे भरुन बघणार हो ..
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 02/17/2016 - 17:22
नवीन
कुणाला?? आजोबाना का??
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Wed, 02/17/2016 - 17:24
नवीन
इश्श्य .. विचार तुझ्या आजोबांना... येतील ही काठी घेऊन नाचायला.
- Log in or register to post comments
स
सही रे सई
Fri, 06/17/2016 - 22:25
नवीन
हे काय स्रुजा ताई, परवाच म्हणत होतीस ना की सोसायटीच्या कार्यक्रमात आयटम साँग वर नाचलीस म्हणून.
बापरे मार खावा लागणार आता.. पळा..
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Sat, 06/18/2016 - 06:08
नवीन
तू मेल्या कशाला आला होतास सिनियर सिटिझन्स च्या स्नेहसंमेलनात? बरं आलाच आहेस तर फोटो काढ म्हणलंन तर पलिकडच्या झिपरीशी गुलुगुलु बोलत बसलास. पुन्हा ये कोथिंबीरीच्या वड्या हादडायला मग बघते.
आणि अरे तुझे आजोबा तसे रोमँटिक च आहेत. म्हणुन नाचले त्यांच्या बरोबर .. आणि आयटम साँग काय म्हणतोस शम्मी कपुर च्या गाण्याला ???
- Log in or register to post comments
स
सही रे सई
Mon, 06/20/2016 - 19:41
नवीन
फोटो काढायला गेले तर फोटोग्राफरची ही गर्दी तुझा एक लूक मिळावा म्हणून. मला मेलीला त्या गर्दीत धड उभपण राहायला मिळालं नाही. तरी घेतलेच तुझे फोटो, त्या झिपर्याला बाजूला करून आणि फोटो घेता घेता पडले, पाय मुरगळला माझा. त्याबद्दल कोथिंबीरीच्या वडी सोबत काहीतरी गोडधोड पण दे पुढच्या वेळी. तरचं फोटोची प्रत देईन तुला.
(पाय मुरगळलेली) सई
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Mon, 06/20/2016 - 20:19
नवीन
अग्गो बाय माझी ती. पण गुपचुप खा हां गोड, तुझ्या आजोबांना द्यायचं नाहीये फार गोड ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 06/21/2016 - 07:38
नवीन
"सही रे सई"...हा का हि??? नक्की म्याटर काय हाय???
- Log in or register to post comments
प
पियुशा
Wed, 02/17/2016 - 11:05
नवीन
तुम्हाला कुनी सान्गितली स्रुजा काकि ५० च्या पुढे असेल काहीही हा ती फक्त ४९ वर्शे न ११ महिने ;)
मरतेय आता मी न स.. चॉ तुम्ही तर मरणारच आज ;)
पळा.................
- Log in or register to post comments
ज
जुइ
Wed, 02/17/2016 - 17:38
नवीन
=))
- Log in or register to post comments
स
सुनील
Wed, 02/17/2016 - 09:34
नवीन
छान!!
असाच एक प्रयत्न जवळपास ८ वर्षांपूर्वी केला होता, कुणालाही प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी. पण जरा वेगळ्या पद्धतीने!!
पैकी बर्याचजणांच्या भेटी-गाठी नंतर झाल्यादेखिल!
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Wed, 02/17/2016 - 09:42
नवीन
भारी लिहिलेय!
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 02/17/2016 - 09:48
नवीन
निषेध निषेध!!
- Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद
Wed, 02/17/2016 - 09:51
नवीन
५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. >>>
या पुढचे वाचले नाही...खिक...
कुठे गेलात ग तिघी ?
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
Wed, 02/17/2016 - 14:12
नवीन
अगदी.अगदी.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 02/18/2016 - 04:29
नवीन
अगं, आधी धागा बघायला उशीर झाला. मग त्यातलं आमचं वय वाचून आधी काशीयात्रेचं बुकिंग केलं.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Wed, 02/17/2016 - 09:51
नवीन
असा धागा काढायचा विचार होता माझ्या मनात . पण ठिक आहे. प्रतिक्रिया वाचायला मजा येईल .
१) श्री सुबोध खरे :- वय ५०-५५ च्या आसपास तुळतुळीत दाढी केलेली. उंच, मध्यम बांधा, कॉलर असलेले फेंट टिशर्ट, आणी ब्लु जिन्स घातलेले अशी प्रतिमा आहे त्यांची माझ्या मनात.
२)प्रा डॉ :- वय ३५-४० , सावळा वर्ण, मध्यम उंची , एक कूल ॲटिट्युड असलेले व्यक्तीमत्व ! विद्यार्थ्यांना कधीच असाइनमेंट्स वगैरे साठी परेशान न करणारे प्राध्यापक .
३) विपु :- वय ३०-४० शर्टिंग न केलेले शर्ट आणी फॉर्मल पॕन्ट घातलेले. वेगवेगळ्या विषयावरचे वाचन करणारे. असे व्यक्तीमत्व .
४)श्रीरंग जोशी :- मध्यम उंची , मध्यम बांधा, चेहेर्यावर मिस्कील भाव,
५) माहीतगार साहेब:- वय ५०+ , चेहेर्यावर प्राध्यापकी प्रौढपणा, एक गौरवर्णी, शांत व्यक्तीमत्व .
बाकी वेळ मिळेल तसे टंकतो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 02/17/2016 - 13:57
नवीन
श्री सुबोध खरे :- वय ५०-५५ च्या आसपास तुळतुळीत दाढी केलेली. उंच, मध्यम बांधा, कॉलर असलेले फेंट टिशर्ट, आणी ब्लु जिन्स घातलेले
मध्यम बांधा-- एवढं बाकी चुकलं. आम्ही आयुष्यात सरासरी पेक्षा कमी वजन टिकवून आहोत.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Wed, 02/17/2016 - 17:13
नवीन
उंची सहा फुट, बांधा सडपातळ ते अॅथ्लेटिक यांच्या दरम्यानचा. मोठे कपाळ अन धारदार नाकामुळे सतत धुमसत राहणार्या कट्टर धर्माभिमानी तरुणासारखा दिसतो. तलवारींना धार करून ठेवलीच पाहिजे असे म्हणेल काय असे वाटत राहते ;-) .
उका - एकदम शिन्शेर, होतकरू मा.तं. मधला तरुण.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 09:59
नवीन
क्लिंटन - जास्तीतजास्त ३५, टिपीकल पुणेरी गोरा सडसडीत माणुस
संक्षी / विठा - क्लिंटन प्रमाणेच टिपीकल पुणेरी गोरा सडसडीत माणुस, फक्त वर साधारण ५०च्या आसपास, चेहर्यावर तुच्छ कटाक्ष!
नीलमोहर - - २५शीतली धडपडी मुलगी!
आनंदी गोपाळ - - ४५शीतले डॉकटर, स्थुल बांधा, फटकळ बोलणे ;)
जयंत कुलकर्णी - - ५०-६० चे काका, गौर वर्ण, हॅण्डसम असावेत असं उगाच आपलं वाटतं! ;)
खुप जणांना मी कट्ट्यांच्या फोटोत पाहिले आहे. त्यामुळे अंदाज बांधायला इतकेच आठवले. सापडले की सांगते अजुन!
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Wed, 02/17/2016 - 10:03
नवीन
चेहर्यावर तुच्छ कटाक्ष!... :)
किमान ५० मिपाकरांना कट्ट्याच्या फोटूत / चेपूवर/ जाल्निशीत पाहिलंय. न पाहिलेल्यांविषयी उत्सुकता आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 02/17/2016 - 10:38
नवीन
धन्यवाद पिराताई. मागे एकदा एका बसस्टॉपवर एका शाळकरी मुलीने "will this bus go to Bandra, UNCLE" असे विचारले होते तेव्हापासून मला बरोबर वयाचे कोणी समजेल ही आशाच सोडली होती :) फक्त १ वर्षाची चूक झाली आहे वयात :)
नाही ब्वॉ.इथे मात्र चूक केलीत. म्हणजे पुणेरी गोरा म्हणण्यामध्ये मध्ये हं सडसडीत म्हणण्यात नाही :)
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 11:02
नवीन
सडसडीत नसलात तरी स्थुल नसालच.. आणि आता मला सांगु नकात.. माझ्या डोक्यात फिट्ट आहे तुमची इमेज..
कट्टा करा आणि प्रुव्ह करा तुम्ही सडसडीत नाही म्हणुन!!!
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 02/17/2016 - 11:41
नवीन
चूक केलीत ते पुणेरी गोरा म्हणण्यामध्ये--सडसडीत म्हणण्यामध्ये नाही :) म्हणजे याचाच अर्थ मी सडसडीत आहे. हो मी जाडा आहे असे कोण मान्य करेल :)
तीच तर बोंब आहे.शेवटचा फुल-फ्लेज्ड कट्टा अटेंड केला होता त्याला चार वर्षे होतील आता.मधल्या काळात एकट्या टकाला तेवढे भेटलो होतो आणि ते सुध्दा ३१ डिसेंबरच्या शुभमुहुर्तावर :) बघू पुढचा कट्टा कधी अटेंड करायला मिळतो ते!!
- Log in or register to post comments
स
सनईचौघडा
गुरुवार, 02/18/2016 - 04:52
नवीन
सडसडीत नसलात तरी स्थुल नसालच.. आणि आता मला सांगु नकात.. माझ्या डोक्यात फिट्ट आहे तुमची इमेज..
कट्टा करा आणि प्रुव्ह करा तुम्ही सडसडीत नाही म्हणुन!!>>>>
अति अति अति सहमत. पण हा दुजाभाव का आधी तुम्ही तिघींनी अनाहिता कट्ट्याच्या छायाचित्राचे अनावरण करावे मग समजेल की तुम्ही षोडशा आहात की की ५०+ बायका आहात ते , मग गॅरी ट्रुमन कट्टा करतील काय समजलाव .
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 02/17/2016 - 11:24
नवीन
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 02/21/2016 - 07:14
नवीन
आमच्या आयडीचा या धागा लेखात नंबर पाहून डोळे प्वाणावले, ढिशक्लेमर जोडण्याची आणि पहिल्या पानावर यावा हे जरूरी वाटल्यामुळे प्रतिसाद येथे नोंदवत असून आमचा संक्षी. आणि वि. ठाकुर या आयडींशी कै पण संबंध नाही. संक्षी हा आयडी दिसला की आम्ही आंक्षीsss करून दूर जात असतो ;) (संक्षी ह. घ्या.)
* दुसरे, वय कमी करुन मिळण्यासाठी सनई किंवा चौघडा काय आणि कसे वाजवावे ? (आयडीचे तुकडे केल्या बद्दल क्षमा मागून)
* चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला म्हंजे काय र्हातय ? कसे दिसतात हे चेहरे काही फोटू सारखे उदाहरण द्यालका नाई काही.
* आम्ही बरीक अधिक स्थुल कसे व्हावे याची पुस्तके बाजारात नित्याने शोधत असतो, स्थुल होण्याचा आनंद मिळवून दिल्या बद्दल धागा लेखकाचे धन्यवाद आणि __/\__ :)
आता संक्षी/ठाकूर समजून कोन काय कामेंट दिलय का बघतो आणि तेथे पण ढिसक्लेमर चिटकवितो.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- ›
- »