तुम्ही न पाहिलेल्या मिपाकरांविषयी तुमच्या मनातली प्रतिमा
तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.
फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे. २)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार. ३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व . ४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व. ५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. ६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी. ७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे. ८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले. ९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव. १०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व. सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
💬 प्रतिसाद
(362)
ह
होबासराव
Wed, 02/17/2016 - 10:32
नवीन
"मराठी कवितेची सौंदर्य मिमांसा" ते "मोकाट कुत्र्यांच्या केकाटण्याचे जागतीक परिणाम " अशा कुठल्याही विषयावर व्याख्यान ठोकतील असे वाटतात.
माफ करा हा अधिकार आलरेडि आहे एका मिपा संता (कि सांता) कडे.
- Log in or register to post comments
स
सनईचौघडा
Wed, 02/17/2016 - 10:32
नवीन
दु दु पै तै.
पिरा समोर आली की मी लगेच तिच्या बाजूला जाणार आहे. >>> चालेल मी इकडची मस्तानी तिकडे फिरवीन मग पिरातै शांत होईल. नाहीतर मी संक्शी / विठा यांच्या बरोबर जातो मग तिचं लक्षच जाणार नाही गरिब बिचार्या माझ्याकडे.
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 02/17/2016 - 10:34
नवीन
हा तुझा भ्रम आहे. मग अगदी नक्कीच हातात सापडशील. त्या दोघाना दोन बाजूना उभे कर हां जय विजय म्हणून.
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Wed, 02/17/2016 - 10:33
नवीन
"अजया - पन्नाशीच्या जवळपास आलेली, लांब केस, सावळा वर्ण, गृहीणी, मुलीच्या लग्नाचे टेन्शन असलेली
--हहपुवा
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 02/17/2016 - 10:36
नवीन
ओह अशी दिसत नाही का अजया
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Wed, 02/17/2016 - 10:40
नवीन
=))
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 02/17/2016 - 11:33
नवीन
अगदी बरोब्रे.एखादा मुलगा असेल तर सुचव बाई .देशस्थच हवा.मुलीच्या लग्नाचं टेन्शन मुलीच्या आईलाच :'(
त्यात ती माझ्यावर आहे.लांब केस आणि सावळी =)))
- Log in or register to post comments
इ
इशा१२३
Wed, 02/17/2016 - 12:02
नवीन
अगबाइ हो का? टेन्शनच !
हुंडा देणारेस का?
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 12:06
नवीन
मुलगा आहे बै नजरेत एक... बाशिंग बाधुन तय्यार आहे!!
तुझ्या ओळखीतलाही आहे..
आता त्याला तुझी मुलगी आवडते की विनोद.. हे एकदा ठरलं की झालं!!!
=))
- Log in or register to post comments
इ
इशा१२३
Wed, 02/17/2016 - 12:13
नवीन
भावी सासुबाइना टॊमेटो भात करता येतो का?
- Log in or register to post comments
इ
इशा१२३
Wed, 02/17/2016 - 12:13
नवीन
भावी सासुबाइना टॊमेटो भात करता येतो का?
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 02/17/2016 - 12:18
नवीन
मुलीच्या ना? विचारू वरपरिक्षेच्या वेळी.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 02/17/2016 - 12:08
नवीन
मासे खाणारा चालेल की डोक खाणारा हवाय??
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 02/17/2016 - 12:12
नवीन
मासे नको. डोकं बाय डिफाॅल्ट मुलगी खाईलच.
पिरे,तू माझी अट नाही वाचलीस नीट.अभक्ष्यभक्षण अपेयपानवाला नक्को.देशस्थच हवा;)आणि गृकृद.
इशे,मुलींनी हुंडा घ्यायचे दिवस आता.किती घेऊ अॅडव्हाइस द्या हं.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 02/17/2016 - 12:15
नवीन
घोडनवरा चालेल??
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 12:17
नवीन
घोड नवरा चालत असेल तर ते अभक्ष्यभक्षण.... वगैरे अटी शिथील करा की जरा.. एक मुलगा फिट्ट बसतोय बघा अपेक्षांमध्ये.. हुंडाही मिळेल बघ!
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 02/17/2016 - 12:19
नवीन
बर मग अजया अभक्ष्यभक्षण करणारा घोडनवरा मुलगा चालेल??
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 02/17/2016 - 12:23
नवीन
नको गं बाई.मला विनोदी जावई नको.घोडनवरा तर अज्जिबात नको :-/
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 02/17/2016 - 12:33
नवीन
अरे सगळे असच म्हणाले तर कस होईल आमच्या मुलाच??
- Log in or register to post comments
प
पियुशा
Wed, 02/17/2016 - 12:12
नवीन
" ट " आद्याक्षर असलेला चालेल का ? ;)
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 12:16
नवीन
=))
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 02/17/2016 - 12:14
नवीन
आणि तिच्या लग्नाचं तुम्हाला का टेन्शन?
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 02/17/2016 - 12:17
नवीन
अरे ती माझी न झालेली मुलगी नाही का! तिच्या लग्नाचं टेन्शन ;)
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 02/17/2016 - 10:43
नवीन
सनईचौघडा, यावेळी भारतात दुपार आहे म्हणजे अमेरिका/कॅनडामध्ये रात्र. अजून रेवतीताई आणि स्रुजाताईंनी हा धागा बघितलेला दिसत नाही.त्या दोघी इथे येण्यासाठी अजून काही तास थांबा.आगे आगे देखो होता है क्या :)
- Log in or register to post comments
इ
इशा१२३
Wed, 02/17/2016 - 10:48
नवीन
मज्जा आली धागा वाचुन.
पिरा,स्रुजा,रेवाक्का ५० + काय.....
हहपुवा
स्रुजाताइ उठा.....या इकडे
- Log in or register to post comments
M
Maharani
Wed, 02/17/2016 - 12:53
नवीन
Ag atasha srujatainna gudhage dukhini laukar uthavat kahi....
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Wed, 02/17/2016 - 17:42
नवीन
अगो, किती जोरात ओरडतेस? किती वेळा सांगायचं गं तुम्हाला, पोरीच्या जातीला एवढा दंगा शोभत नाही हो. सकाळी पोथी असते माझी, तुझे आजोबा जातात फिरायला. तेवढ्या वेळात देवाचं नाव घेते मी , एवढं माहिती असून तेंव्हाच मेलं हाका मारायच्या जोर जोरात. तुझ्या आजोबांना ऐकु येत नाही पण माझे कान शाबुत आहेत, काय समजलीस?
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 02/18/2016 - 04:41
नवीन
तुझे आजोबा जातात फिरायला.
आईशप्पथ! त्याला आजोबा काय काका तरी म्हणेल का कोणी पुढील २० वर्षात?
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Sun, 02/21/2016 - 16:37
नवीन
बघ की गं.. पण वय कळत नसलं तरी आहे हो ;)
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 02/17/2016 - 10:49
नवीन
न पाहिलेल्या मिपाकरांविषयी प्रतिमा:
१) वल्ली/प्रचेतसः सडसडीत बांधा, चेहर्यावर प्राध्यापकी हावभाव, गीतगोविंदातल्या राधेचं सौंदर्य अनुभवण्यापेक्षा ते प्रक्षिप्त पात्र आहे सांगणारं व्यक्तीमत्व.
२) सतिश गावडे उर्फ धन्या: खुर्चीत पुरण भरल्यासारखी सुदृढ बालक स्पर्धेत पहिला नंबर आलेली शरीरयष्टी, मानसशास्त्राचा अभ्यास करणारा गूढ गंभीर चेहरा.
३) स्पा: हिरवे डोळे, मांजरासारखे डाफरणारे हावभाव, रात्री कायापालट होऊन हरणटोळ म्हणून फिरत असावा अशी शंका
४) किसन शिंदे: आनंद दिघे छाप दाढी, झब्बा आणि घाटावरची लोकं घालतात तसा ढगळ, अघळ-पघळ लेंगा, प्राथमिक शिक्षक असावे अशी देहबोली.
५) बॅटमॅनः बॅटमॅनसारखा लूक
६)टवाळ कार्टा: यत्ता दुशली ब मध्ये आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाला असल्यासारखा आदर्श स्वभाव, शांत, मितभाषी.
७) वपाडाव: तोंडात पानाची भक्कम पिंक, डोक्यावर प्रभाकर पणशीकर छाप टोपी, तोंडातून (नको तिथे देखील) गज़लांचा पाऊस पाडणारे व्यक्तीमत्व.
तूर्तास इतकेच!! या लोकांनी जर जीव घेतला नाही, तर उरलेल्यांबद्दल लिहू =))
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 02/17/2016 - 10:53
नवीन
अजून एक राहिले
सूड : वेस्ट इंडीज क्रिकेट टीममधला एखादा प्लेयर वाटावा अशी अष्ट बिस्कुटधारी कमावलेली शरीरयष्टी
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
गुरुवार, 02/18/2016 - 05:07
नवीन
=))
- Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ
Wed, 02/17/2016 - 10:49
नवीन
:) मस्त धागा :)
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Wed, 02/17/2016 - 10:50
नवीन
प्रतिसादावरूनः
पिरा (यांनी स्वतः वरती सांगितलंय तरी, माझा अंदाज): ३०-३५ पुणे-आयटी-लेकुरवाळी
प्रचेतसः सहा फूट, डॉ खरेंसारखा फिटनेस , कार्गो पँट, कदाचित चष्मा, ३५ वर्षे
खेडूतः वय ५०, साडेपाचच्या आतबाहेर उंची, किरकोळ बांधा, शर्ट-ब्यागी पँट, बारीक मिशी व चष्मा
बबन तांबे: सेम अॅज खेडूत (वय ३०)
डॉ सुहास म्हात्रे: राजकारणात येण्याआधीचे विनामिशी डॉ अमोल कोल्हे
संदीप डांगे:३०-३५, बारीक बांधा, ५'६"-५'८" उंची, टीशर्ट-पँट
अभ्या: गोरा वर्ण, ६ फूट, किरकोळ बांधा, चष्मा
- Log in or register to post comments
व
विशाखा राऊत
Wed, 02/17/2016 - 10:52
नवीन
पिरा आयटी... ये ग ये.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 10:59
नवीन
मी म्हणतेय ३० ला २ कमी तरी हे ३०-३५ लिहीतात... दुष्ट ग बै दुष्ट्ट मिपाकर...
विशु..
मला सुखात बघवत नाही का ग तुला?? आयटीत नेतेस ओढुन!!!
- Log in or register to post comments
व
विशाखा राऊत
Wed, 02/17/2016 - 11:03
नवीन
मी नाही ग.. हेच ओढत आहेत तुला आय्टीत... अजिबात येवु नकोस..
या जन्मी मस्त सुखी रहा आयटीत नाहीस हा विचार करुन ;)
बाकी तु २५ची आणि काय तुला आजी करत आहेत. बंदुक कहा है तुम्हारी...
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 02/17/2016 - 11:07
नवीन
आय टी सारखे सुख या भू तळावर नाही
वर्षातले ६ महिने बेंच, पाच दिवस काम (जेमतेम )
भरपूर ओनसाईट , कचकून दाबून पगार
घरपोच कुल क्याब.
तरी स्वताला हमाल म्हणवून घेण्यात काय सुख वाटते देवच जाणे
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 11:09
नवीन
अहो नको.. आधीच ठासुन इंधन भरलय धाग्यात.. आत्त्ताच गरज नै..
- Log in or register to post comments
व
विशाखा राऊत
Wed, 02/17/2016 - 11:22
नवीन
जागो जागो.
हे सुख कुठे असते म्हणे आयटिला. कायच्या काय अफवा पसरवतो का.
रिलिझसाठी दिवसरात्र मेहनत, क्लायंटच्या शिव्या, लो बजेट, मॅनेजरची मनमानी हे भी होता है बर का
हमाल नाही गधेमजुरी गधेमजुरी
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 02/17/2016 - 18:32
नवीन
"माझी पळते तर तुझी का जळते?" असे एका रिक्षाच्या मागे लिहिलेले होते. ती रिक्षा तुमची होती काय?
- Log in or register to post comments
व
विशाखा राऊत
Wed, 02/17/2016 - 21:08
नवीन
आयटीवाले कुल कॅब ने जातात असे स्पाने म्हटले आहे :)
उगा रिक्षा म्हणुन अवमान करु नये ;)
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Fri, 02/19/2016 - 17:24
नवीन
ख्खिक्क !!
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 11:08
नवीन
तोफ डागुन आले त्या मेल्या पम्यावर.. सोडते की काय!!
;)
षोडशाच म्हणायला पाहिजे खरं तर... नै का!!
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Wed, 02/17/2016 - 11:20
नवीन
ते वाचलं हो... ते वाचायच्या आधीचा अंदाज सांगितला. 'तीसलादोनकमी' वाली व्यक्ती मेगाबायटी प्रतिसादाला किलोबायटी उत्तर देते, असं वाटत नाही. म्हणून माझा अंदाज ३०-३५ होता. (खरंतर ४०, पण स्त्रीदाक्षिण्य म्हणून ३० म्हणालो ;)
असो. हघ्याहेवेसांनल.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 11:23
नवीन
इथुन पुढे मी फक्त वन लायनर आणि लाईट मुड मधलेच प्रतिसाद देणार बै...!
- Log in or register to post comments
प
पियुशा
Wed, 02/17/2016 - 11:23
नवीन
काय पण पैलवान तुमचा अंदाज सपशेल चुकलाय बर का ? धाग्या कर्त्याने अचुक बान्धलाय अंदाज ;)
( पिरा आइ भागो भागो ........)
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 11:27
नवीन
गप ग.. मी ६१ चं कसं बस ३० वर आणलय.. आणि आता थोड्याच वेळात १६ पण पटवीन... ;) तू बाकी काही आठवणी काढु नकोस..!!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 02/17/2016 - 12:44
नवीन
चष्मा...???? नाय वो अजून.
६ फूटाला २ इंच कमी फक्त.
किरकोळ बांधा....८२ किलोला किरकोळ म्हणतेत व्हय? जिमची बाडी हाय म्हाराजा.
गोरा...............इल्ले. मिडलक्लास कलर बघा.
आणि ते पेन पेन्शील खेळत नाही ब्वा कधी. कवातरी सही करायलालागतो तेव्हाच वापरतो. बाकी नाही.
एका जागी बसत नाहीहे मात्र खरे . ;)
कुणीतरी माझ्या ह्याण्डसमपणाचे कौतुक करा रे बघितलेल्यांनी. ;)
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 02/17/2016 - 12:46
नवीन
पण तुला चालणार नाही !!!!!!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- ›
- »