तुम्ही न पाहिलेल्या मिपाकरांविषयी तुमच्या मनातली प्रतिमा
तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.
फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे. २)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार. ३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व . ४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व. ५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. ६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी. ७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे. ८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले. ९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव. १०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व. सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
💬 प्रतिसाद
(362)
अ
अभ्या..
Wed, 02/17/2016 - 12:53
नवीन
चालेल चालेल. फक्त स्थळ आणू नका लगेच, आपला डाव फिक्स है. :)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 02/17/2016 - 12:55
नवीन
म्हणजे तुला णाखुन अंकल लगेच स्थळ आणतेत का असे म्हणायचे आहे काय?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 02/17/2016 - 13:07
नवीन
मग नाहीतर काय. त्यांची जलयुक्त शिवाराची योजना चालूच असते. कुठे दुष्काळ, कुठे बांध याचे अडाखे चुकत नाहीत त्यांचे कधी. खरं जग अनुभवलेला मानूस त्यो.
नमस्कार करतो हं नाखुकाका. ;)
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 02/17/2016 - 16:04
नवीन
आँ! कोणती व्हॅलेंटिना भेटली भौ?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/17/2016 - 12:55
नवीन
सोलापुराचा अजय देवगण =))
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 02/17/2016 - 13:09
नवीन
ध्नयवाद कम्म्या.
तू बी जरा फॅट कमी केला तर बुलेट शोभेल राव तुला. सध्या हार्लेडेव्हिडसन गेलाबाजार ट्रायम्फ घ्यावीस ही नम्र विनंती.
.
.
ए क्सलं भारी नं. तू मला अजून भारी म्हण मीपण अजून काय काय सांगीन हं.
.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 02/18/2016 - 04:43
नवीन
नका हो बिचारीला आयटीत ढकलू..............
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
गुरुवार, 02/18/2016 - 07:47
नवीन
"सेम अॅज खेडूत" लिहीलेत मग वय का २० ने वजा केले? ते नसते तर तुमचा अंदाज माझ्याबाबतीत अगदी अचूक आला असता. नुसते "सेम अॅज खेडूत" लिहीले असते तरी चालले असते. फक्त मिशी बारीक नाहीय. टिळक्/आगरकर छाप आहे :-)
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 02/18/2016 - 09:29
नवीन
..
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 02/18/2016 - 09:49
नवीन
नै ओ पैलवान..पन्नाशीला लै टाईम्ब हाय अजून.
आन त्यो चष्मा बी नाय लागला.
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
गुरुवार, 02/18/2016 - 10:09
नवीन
खेडूत (वय ३०) - चष्मा सोडून बाकी सेम अॅज बबन तांबे ?
- Log in or register to post comments
म
मीता
Wed, 02/17/2016 - 11:14
नवीन
हसून पुरेवाट झाली ..
- Log in or register to post comments
स
सनईचौघडा
Wed, 02/17/2016 - 11:21
नवीन
अजुन थोडे आठवलेले लोक्स
गणपा:- वय ४० च्या आसपास. चेहर्यावर नेहमी त्रासिक भाव मलाच का बरे फोटु दिसत नाहीत म्हणुन.
पेहराव चाळीतले लोक घालतात तसा नाडीवाला लाईनीचा लेंगा आणि वर पांढरा सदरा , डोक्यावर बावर्ची टोपी.
मिसळलेला काव्य प्रेमी:- ३० ते ३२ वय बारिक चौकड्यांचा शर्ट , हातात पेन आणि कागदाचा तुकडा, खूंट वाढलेली दाढी, चेहर्यावर कधी शांत तर कधी रोमँटीक भाव .
पालखीचा खंडोबा:- हातात पेन आणि कागदाचा तुकडा , वय ४० च्या आसपास चेहर्यावर नेहमी उदास किंवा दु:खद भाव.
पियुशा:- अल्लड अवखळ २५ ची तरुणी. गहु वर्णी, स्मार्ट , जिन्स टी शर्ट पेहरावातली.
चिगो:- जबाबदारीची जाणीव असलेला माणुस , मध्यम बांधा, व्यवस्थित कडक इस्त्रीतले कपडे, वय साधारण ३५ च्या पुढे.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 11:26
नवीन
अरे तो गणेशा.. गणपा नाही
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Wed, 02/17/2016 - 11:27
नवीन
ते गणेशा.
गणपा यकदम वेगळे हैत.
- Log in or register to post comments
च
चिगो
Wed, 02/17/2016 - 11:59
नवीन
चारातले तीन अंदाज चुकलेयत.. इस्त्रीतल्या कापडांबद्दल थोडंफार सहमत व्हावंं लागतंय, कारण की ऑफीसात भोकांचा टी-शर्ट घालून जाता येत नाही.. ;-)
असो.. धागा जबरा आहे तुमचा..
- Log in or register to post comments
प
पियुशा
Wed, 02/17/2016 - 11:25
नवीन
हे शाबास ! कुनाच काही का असेना माझ एकदम फर्फेच्त आहे ;) ;) ;)
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 02/17/2016 - 11:27
नवीन
मिपावरचा सर्वात जुना आणि पोप्युलर डू आयडी
- Log in or register to post comments
प
पियुशा
Wed, 02/17/2016 - 11:35
नवीन
हो का रे माजोर्या मार्जार प्रेमी हिरवट डोल्याच्या स्पावड्या :प
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 02/17/2016 - 13:15
नवीन
अरे आपन बायांचे नाव घेतलेल्या डूआयडीलाच पिवडी म्हणतो ते सांगू नकोस इतक्यात. ;)
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 02/17/2016 - 11:29
नवीन
पिवडे तु पाॅप्युलर हायस व्हय????
- Log in or register to post comments
र
रमेश भिडे
Wed, 02/17/2016 - 11:35
नवीन
काही मिपाकरांच्या ओळखी करुन दिल्याबद्दल सनईचौघडे वाजवून आभार मानावेसे वाटत आहेत.
-काही खरे काही खडे
आम्ही सगळेच रमेश भिडे
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Wed, 02/17/2016 - 13:13
नवीन
:D .. :D .. :D
- Log in or register to post comments
इ
इशा१२३
Wed, 02/17/2016 - 11:37
नवीन
अह पोप्युलर डु आयडि म्हण :)
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 02/17/2016 - 11:38
नवीन
९७
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 02/17/2016 - 11:39
नवीन
98
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 02/17/2016 - 11:41
नवीन
१००
- Log in or register to post comments
प
पियुशा
Wed, 02/17/2016 - 11:42
नवीन
हे घ्या १०० पैला माझा न्म्बर ;)
- Log in or register to post comments
प
पियुशा
Wed, 02/17/2016 - 11:42
नवीन
हे घ्या १०० पैला माझा न्म्बर ;)
- Log in or register to post comments
इ
इशा१२३
Wed, 02/17/2016 - 11:46
नवीन
झाले का शतक ? सत्कार करायला स्रुजाताइच हव्यात. बोलवा कुणीतरी....
- Log in or register to post comments
व
विशाखा राऊत
Wed, 02/17/2016 - 11:51
नवीन
कोणातरी जेष्ठ मिपाकरांना बोलवा बर सत्काराला. ;)
- Log in or register to post comments
स
सनईचौघडा
Wed, 02/17/2016 - 11:53
नवीन
तीन तासात शंभर झाले त्या बद्दल मिपाकरणींचे आभार. सर्व मिपाकरणीना पिरातै तर्फे पुढिल अनाहिता कट्यात एक एक आईस्क्रीम.
वेन्जॉय.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 02/17/2016 - 13:03
नवीन
मिपाचे बखरकार हेमंतभौ लाटकर यांनी निर्माण केलेला युगप्रवर्तक शब्द आहे तो. त्याबद्दल आम्ही सगळेच त्यांना थँक्स अ लाट म्हणतो! ;)
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 02/17/2016 - 13:05
नवीन
:))
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 02/17/2016 - 11:54
नवीन
शतका निमित्त
धागाकर्ता आणि हातभार सदस्याचाही पाचव्या कोनाड्यात अंकशास्त्रावरून भविष्य (तुमचा भाग्यांक काय सांगतो) ही पुस्तीका,एक हेल्मेट आणि बुवांकडून अत्मशांती साठी दणदणीत ३३% टक्के सवलतीचे कूपन देऊन करण्यात येत आहे.
हंगामी सचीव
जेपी संचालीत लगोलग सत्कार समिती.
अखिल मिपा सत्कार महा(न्)मंडळ अंकीत.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/17/2016 - 11:56
नवीन
यादीत माईसाहेब नाहीत !
अरेरे !
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 02/17/2016 - 12:25
नवीन
माईसाहेबः नऊवारी लुगडं, पण एका पायातून हळूच जीन्स डोकावते आहे. ;)
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 02/17/2016 - 13:09
नवीन
तोंडावर झाकलेल्या पदराआडून मिशी डोकावतेय. ते विसरलास काय रे!
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 02/17/2016 - 13:15
नवीन
तोंड झाकलेलं कधी असतं म्हणे? मिशी अगदी उघडपणे कळत असते. आता काय काय समानतावादी बायकांना असते थोडीशी मिशी म्हणून लोक दुर्लक्ष करतात इतकंच!! =))
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 02/17/2016 - 13:26
नवीन
समानतावादी बायकांचे तज्ञ इकडे आले तर आपल्याला पळता भुई थोडी होईल!
- Log in or register to post comments
प
पियुशा
Wed, 02/17/2016 - 11:58
नवीन
धाग्याच्या न स.चो. च्या फास्तेट शतक पुर्ती निमित्त स्रुजा काकी आनी रेवती आज्जी ह्यान्च्यातर्फे मी धाग्या कर्त्याचा एक
पुस्पगुछ देउन स्त्कार करत आहे हो ............
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 02/17/2016 - 12:16
नवीन
.
- Log in or register to post comments
प
पियुशा
Wed, 02/17/2016 - 12:35
नवीन
ओ बोका साहेब त्ये आमच सुद्द लेखन असच असत , पुर्वापार चालत आलेल हाय ;)
- Log in or register to post comments
व
विशाखा राऊत
Wed, 02/17/2016 - 12:24
नवीन
एकदा का अजयाताईच्या मुलीचे लग्न झाले की ती तीर्थक्षेत्री जायला मोकळी. ;)
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 12:27
नवीन
कालच मी आणि स्रुज चारधामचं बुकिंग करुन आलोय.. रेवाक्का आणि अजया आल्या की जाऊ चार म्हातार्या फिरायला आता..
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 02/17/2016 - 12:26
नवीन
तीर्थक्षेत्री _/\_
- Log in or register to post comments
त
त्रिवेणी
Wed, 02/17/2016 - 12:29
नवीन
अग बै पिरा तै न सृजा तै इतक्या मोठ्या आहेत.
इथे मला न पिवडीला सगळ्यांना तेच म्हणावे लागते.
- Log in or register to post comments
त
त्रिवेणी
Wed, 02/17/2016 - 12:32
नवीन
प्रियांका तै ना भेटले आहे पण विशाखा तै तुम्ही इकडे येवून पण आमच्यासाठी वेळ काढत नाही सो तुम्ही ४० वर्षांच्या असाल असा अंदाज करते.
- Log in or register to post comments
व
विशाखा राऊत
Wed, 02/17/2016 - 12:37
नवीन
त्री वेण्या ;) नक्की विशाखा कोण..
- Log in or register to post comments
प
पियुशा
Wed, 02/17/2016 - 12:39
नवीन
टूमीच ओ काकु टूमीच ;)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- ›
- »