Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुम्ही न पाहिलेल्या मिपाकरांविषयी तुमच्या मनातली प्रतिमा

स
सनईचौघडा
Wed, 02/17/2016 - 08:49
🗣 362 प्रतिसाद
तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.
फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे. २)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार. ३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व . ४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व. ५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. ६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी. ७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे. ८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले. ९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव. १०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व. सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.
तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
वर्गीकरण
अभिप्राय.

प्रतिक्रिया द्या
97858 वाचन

💬 प्रतिसाद (362)
प
पिलीयन रायडर Wed, 02/17/2016 - 10:00 नवीन
महत्वाचं राहिलं. सनईचौघडा - वय १७५!
  • Log in or register to post comments
स
सनईचौघडा Wed, 02/17/2016 - 10:06 नवीन
अगं पिरातै बरोबर ओळखलेस हो १७ . फक्त ते पुढचे ५ काढ की बहुतेक ती चुकुन टायपो मिस्टेक झाली कै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 02/17/2016 - 10:13 नवीन
हो का? १.७५ नको का? मानसिक वय म्हणून??!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा
स
सनईचौघडा Wed, 02/17/2016 - 10:28 नवीन
धावा धावा संपादक ओ संपादक धावा लवकर. इथे सुध्दा चुकुन टिंब नको तिथे पडलंय ते १७.५ पाहिजे हो की नै पिरातै. तेव्हा लवकर धावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/17/2016 - 10:18 नवीन
महायुद्धाची पहिली ठिणगी अजून कशी पडली नाही हा (यक्ष)प्रश्न पडला होताच ! आता कुठे जरा हुश्श्य वाटतेय :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ट
टवाळ कार्टा Wed, 02/17/2016 - 10:01 नवीन
महालोल धागा...घरी जौन टंकतो...
  • Log in or register to post comments
च
चिनार Wed, 02/17/2016 - 10:02 नवीन
स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान.
मी या तिघींना भेटलो नाहीये...पण वर्णन वाचल्यावर त्या तिघींच्या चेहऱ्यावरचे भाव काय असतील ह्याचा विचार करतोय. सनईचौघडा साहेब जीव मुठीत धरून सैरावैरा पळतायेत असं चित्र डोळ्यासमोर येतंय...
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 02/17/2016 - 10:04 नवीन
अजुन एक महत्वाचा तपशील ध्यानात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद!! मी दिवसभर इथे मेगाबायटी प्रतिसाद टंकत असते ह्यावरुनच तुम्हाला कळायला हवं की मला नोकरी आहे.. चांगलं दणदणीत स्पीडचं इंटरनेट असणारी!!!! गृहीणींना एवढा वेळ मिळत नसतो.. खापर खापर खापर पणजोबा... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
क
कविता१९७८ Wed, 02/17/2016 - 10:03 नवीन
१) अजया - पन्नाशीच्या जवळपास आलेली, लांब केस, सावळा वर्ण, गृहीणी, मुलीच्या लग्नाचे टेन्शन असलेली २) त्रिवेणी - दोन वेण्या घालणारी , चाळीशी ओलांडलेली गृहीणी, ३) मितान - पंजाबी ड्रेस, सावळा वर्ण, बारीक अंगकाठी, शांत स्वभाव ४) मनीमाउ - तिशी ओलांडलेली, घरात मांजर पाळणारी, पाळणाघर चालवणारी ५) पैसा - पन्नाशीच्या जवळपास आलेली, लांब केस, सावळा वर्ण, गृहीणी, अतिशय श्रीमंत घरातील , एकता कपुर सीरीयल स्टाईल माँ जी पियुशा - निरागस, स्टायलिश, पंचविशीतली , जीन्स - टॉप घालणारी , बारीक केस, मस्तमौला या सर्वांना कधी पाहीन कोण जाणे
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव Wed, 02/17/2016 - 10:07 नवीन
त्रिवेणी - दोन वेण्या घालणारी दोन ? ३ पाहिजेत ना? :):):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
क
कविता१९७८ Wed, 02/17/2016 - 10:14 नवीन
दोन वेण्या आणि एक फुलाची वेणी म्हणजे झाले की त्रिवेणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
प
पैसा Wed, 02/17/2016 - 10:09 नवीन
फिशपाँड्स चालू आहेत का काय! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
क
कविता१९७८ Wed, 02/17/2016 - 10:23 नवीन
केव्हा भेटतेस ग ताई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 02/17/2016 - 10:24 नवीन
शिक्रेट कट्टा करूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
क
कविता१९७८ Wed, 02/17/2016 - 10:25 नवीन
वोक्कै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
विशाखा राऊत Wed, 02/17/2016 - 10:50 नवीन
पैसा ताई एकता कपुर स्टाईल म्हण ना, नही .... नही.... नही.. मान पण झटक हा. ;) बाकी सगळ्या परफेक्ट ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
प
पैसा Wed, 02/17/2016 - 10:53 नवीन
माझे तीन अँगल्सने फोटो कोण काढणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा राऊत
स
स्पा Wed, 02/17/2016 - 10:55 नवीन
हम हे ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
विशाखा राऊत Wed, 02/17/2016 - 11:02 नवीन
बघ तु बस डायलॉग सुरु कर.. स्पा गोव्यात असेल तयार कॅमेरा घेवुन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
पियुशा Wed, 02/17/2016 - 11:11 नवीन
कवडे लोवे यु ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
ज
जेपी Wed, 02/17/2016 - 10:05 नवीन
प्राडॉ- 30-35,लांब बाह्याचा सदरा,पांढरा लेंगा,पायात चप्पल,आंडदांड व्यक्तीमत्व.. -- प्राडॉ-हलकेच घ्या..
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Wed, 02/17/2016 - 18:30 नवीन
जेप्या, हे कोणत्या पंच्यागात बघून सांगितलंस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ह
होबासराव Wed, 02/17/2016 - 10:06 नवीन
अ हो ना वा त च त र ति न वे ण्या आ हे त : )
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Wed, 02/17/2016 - 10:10 नवीन
दोन वेण्या आणि एक फुलाची वेणी म्हणजे झाले की त्रिवेणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ए
एस Wed, 02/17/2016 - 10:08 नवीन
मी मागेच खफवर सांगितल्याप्रमाणे माझे वय २१ ला फ्रीझ करून ठेवले आहे! ;-)
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 02/17/2016 - 10:09 नवीन
अजया - पन्नाशीच्या जवळपास आलेली, लांब केस, सावळा वर्ण, गृहीणी, मुलीच्या लग्नाचे टेन्शन असलेली मितान - पंजाबी ड्रेस, सावळा वर्ण, बारीक अंगकाठी, शांत स्वभाव
वारल्या गेले आहे
  • Log in or register to post comments
प
पियुशा Wed, 02/17/2016 - 11:13 नवीन
तुला "गेलो " म्हणायच का स्पावडी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Wed, 02/17/2016 - 11:23 नवीन
पिव्डे मराठी कधी शिकणार गो तू, "ते" वारणे असते. तो नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
स
सनईचौघडा Wed, 02/17/2016 - 10:14 नवीन
ह ह पु वा अरे काय हे माझ्या खव तर पिरातै नी तोफच डागली आहे. शांत गदाधारी भीम शांतच्या धर्तीवर
शांत तोफची मिपाकरीण शांत
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 02/17/2016 - 10:19 नवीन
पुढच्या वर्षभरात पुण्याला जौ नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा
स
सनईचौघडा गुरुवार, 02/18/2016 - 04:56 नवीन
पुढच्या वर्षभरात पुण्याला जौ नको.>>>> पुण्यात ? हॅट कोण जातंय? कोणते पुणे? काय पुणे ? च्यायला त्या पेशाव्यांनी पुणे राजधानी केली म्हणुन एवढी पुणेकरांची पोपटपंची नाही तर " ठाणे तिथे काय उणे" अशी म्हणच आहे. म्हणजे आमचे भाईच अस म्हणालेत ना. पेशव्यांनी खरे तर ठाण्याला रविवार वाडा बांधायला पाहिजे होता. मग खाडीतुन समुद्रमार्गे खुप व्यापार करुन बक्कळ पैसा कमावला असता तर भारताचे किमान महाराष्ट्राचे तरी चित्र काहीसे वेगळे बघायला मिळाले असते. ते राहले बाजूला गेले तिकडे अटके पार झेंडा रोवायला गेले. काय गरज होती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
य
यशोधरा गुरुवार, 02/18/2016 - 05:08 नवीन
पम्याभाऊ, पेशवे तुमच्याकडून सल्ला घ्यायला विसरलेच बघा, एक डाव माफी द्या ना प्लीज! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा
अ
अद्द्या Wed, 02/17/2016 - 10:21 नवीन
यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे आणि स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या >>>> मरेगा . भाई तू मरेगा . . =]]
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 02/17/2016 - 10:23 नवीन
बर्याच लोकांना पाहिलेलं आहे तसे प्रत्यक्ष आणि फेबु वर, बाकी काही ID ग्यानोबाचे पैजार : ६० च्या पुढचे, धोतर , कापली टिळा, पांढरी बंडी, शांत व्यक्तिमत्व पिरा : दामिनी मधल्या प्रतीक्षा लोणकर टाईप लुक एस ओर्फ स्व्याप : ३५ शी दरम्यान कचकून स्थूल , टिपिकल आयटी पर्सन संक्षी / विठा : ४५-५० च्या दरम्यान , उंच व्यक्तिमत्व, बर्यापैकी केस गेलेले , धारदार नाक, कदाचित चष्मा, घारे डोळे आनंद मोरे : ४० च्या आसपास , मध्यम उंची, स्थूल , गौर वर्णीय :) अजून आठवतील तसे लिहितो
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 02/17/2016 - 12:40 नवीन
मी साठीच्या पुढचा का रे? धोतर आणि कपाळाला टिळा? थांब भेटलास की बघतोच तुला स्पांडुरंग स्पांडुरंग पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
A
Anand More Wed, 02/17/2016 - 18:30 नवीन
"स्थूल" काय, "गीता पे हाथ रखकर कसम बिसम" खाऊन मगंच लिहा असा तुमचा आणि मिपाचा करार आहे की माझ्या राशोमोन सिरीजवरचा हा राग आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सनईचौघडा Wed, 02/17/2016 - 10:24 नवीन
जाता ना तुला बरोबर घेवुन जातो गं पै तै. नाही तरी मला मस्तानी आणि तुला च्या वसुल करायचाय की. आणि गुरुजींकडून आपण शांती करवुन घेवु है कि नै. अवखळ पम्या
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 02/17/2016 - 10:26 नवीन
मला चा मिळालाय. पुणेकरानी त्याचे फटु काढून ठेवलेत. तुझ्या मस्तानीचे काय ते तू बघ. आणि पिरा समोर आली की मी लगेच तिच्या बाजूला जाणार आहे. मला कै एवढ्यात मरायचं नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा
प
पिलीयन रायडर Wed, 02/17/2016 - 10:30 नवीन
मग काय तर.. एक तर मह्त्प्रयासाने आपला कंपु बनवायचं चाल्लय आपलं.. एका मस्तानी पाइ फुट पाडुन घेउ काय???? आणि स्रुजा लांब कॅनडात आहे असं समजु नकोस.. येतेच आहे ती.. ठार मारेल ठार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
इ
इशा१२३ Wed, 02/17/2016 - 10:58 नवीन
ठार हा शब्द मवाळ वाटत नाहिये का? अगदिच साधा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 02/17/2016 - 11:00 नवीन
नाऊ दॅट आय थिंक अबाऊट इट.... अगदीच सौम्य वाटतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इशा१२३
प
पिलीयन रायडर Wed, 02/17/2016 - 10:29 नवीन
अवखळ??????? मी पन्नशीची गृहीणी न तु अवखळ???? बाद्वे... पुण्यात आलास तर सांगुन ठेवते.. मला आईस्क्रीम फार आवडतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा
स
सनईचौघडा Wed, 02/17/2016 - 10:46 नवीन
मस्तानी चालेले कै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सनईचौघडा Wed, 02/17/2016 - 11:39 नवीन
जय देवी जय देवी जय पिरातै आईस्क्रीम खायची तुला इतकी का घाई जय देवी जय देवी || १|| मेगाबायटी प्रतिसादाने तु करिशी बोळवण विठा , संक्षी,डांगे रोज काढती आठवण जय देवी जय देवी... ||२|| वाढवले वय असता करिशी तणतण दंबुक , तोफ उडवुन दे दणादण जय देवी जय देवी....||३|| बाकीची पुरी करा रे कोणी तरी च्यायला तो अभ्या कुठे उलथला नेमका आत्ताच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 02/17/2016 - 12:00 नवीन
ये ये रे.. ये ये रे पम्या.. पुण्याला आणुन... दणके घालुन पुजा बांधिन रे सोन्या.... ये ये रे.. ये ये रे पम्या.. || ध्रू || मेगा बायटी नसते बोळवण मिपा ट्यार्पीची ठेव आठवण अभ्यास वाढव चम्या ये ये रे.. ये ये रे पम्या.. || १ || एज म्ह्णे असे जस्ट नंबर तुक्का मारला तरी कमीचा मार खुश होतील रे तर्ण्या! ये ये रे.. ये ये रे पम्या.. || २ || रेवाक्का तरी आहे प्रेमळ मी आणि स्रुजा भारी लाथाळ सांभाळुन अस रे डोम्या ये ये रे.. ये ये रे पम्या.. || ३ || (चाल :- जय देवी मंगळागौरी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा
स
सनईचौघडा Wed, 02/17/2016 - 12:06 नवीन
ऐकत नाही हा तै तु. लै भारी शिघ्र कवियात्री. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ब
बोका-ए-आझम Wed, 02/17/2016 - 15:54 नवीन
याला ये गो ये ये मैना पिंजरा बनाया सोनेका या अजरामर बालगीताची चाल पण बसू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
स्रुजा Wed, 02/17/2016 - 15:56 नवीन
वात्रट मेली. एवढी छान देवीची आरती आहे त्याचं पार भजं केलंन हिने.. कसे संसार होणार यांचे अशाने? आमची कधी हिंमत नव्हती हो असली थेरं करायची ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ब
बबन ताम्बे Wed, 02/17/2016 - 10:28 नवीन
हे गृहस्थ साधारण पंचेचाळीशीचे, गोरे, घारे, नाकावर बायफोकल चष्मा आणि डाव्या बाजूचे केस उजव्या बाजूकडे चापून चोपून वळवून टक्कल झाकायचा प्रयत्न केलेला, "मराठी कवितेची सौंदर्य मिमांसा" ते "मोकाट कुत्र्यांच्या केकाटण्याचे जागतीक परिणाम " अशा कुठल्याही विषयावर व्याख्यान ठोकतील असे वाटतात.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 02/21/2016 - 15:48 नवीन
बबन ताम्बेसाहेब, लै भारी इम्याजिनेशन ! आईशप्पत, मी येवडा भारी असेल हे बगुन मला गहिवरुन आले. Image removed. आता माझा हा फुटु मी आरश्यावर लावलाय अन त्यात भांग पाडल्या बिगर कामाला जात नाय. (आमची धाव म्हण्जे भिंतीतला कोनाडा ते फारतर ओसरी पर्यंत ! पण माझी रेंज "मराठी कवितेची सौंदर्य मिमांसा" ते "मोकाट कुत्र्यांच्या केकाटण्याचे जागतीक परिणाम " ही बघुन कुठल्यातरी विद्यापिठाची डॉक्कटरेट मिळाल्या सारखं वाटलं!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा