Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुम्ही न पाहिलेल्या मिपाकरांविषयी तुमच्या मनातली प्रतिमा

स
सनईचौघडा
Wed, 02/17/2016 - 08:49
🗣 362 प्रतिसाद
तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.
फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे. २)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार. ३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व . ४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व. ५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. ६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी. ७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे. ८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले. ९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव. १०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व. सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.
तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
वर्गीकरण
अभिप्राय.

प्रतिक्रिया द्या
97858 वाचन

💬 प्रतिसाद (362)
श
शशिकांत ओक Tue, 01/26/2021 - 09:14 नवीन
काम झाले म्हणून... तुला आवडतील कि नाही माहित नाही! पण पुन्हा लोड करून पाहतो.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Tue, 01/26/2021 - 13:39 नवीन
काम झाले म्हणून... तुला आवडतील कि नाही माहित नाही रुबाबदार Image removed. भुक्कड Image removed.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 01/26/2021 - 19:05 नवीन
डॉक्टर खरे : डीटो सुबोध भावे , पण थोडेसे सडपातळ! राजेशभाऊ : प्रकाश आंबेडकर सारखेच दिसत असणार मुक्तविहारी: ओमप्रकाशसारखे प्रा बिरुटे : थोडेसे जीवनसारखे पण धष्टपुष्ट
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 01/27/2021 - 19:06 नवीन
राजेशभाऊ : प्रकाश आंबेडकर सारखेच दिसत असणार मुक्तविहारी: ओमप्रकाशसारखे
😂
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
R
Rajesh188 गुरुवार, 01/28/2021 - 07:31 नवीन
तेव्हा प्रकाश आंबेडकर सारखा दिसू शकेल मी. उंची थोडी कमी करावी लागेल,केसांची विराळता वाढवावी लागेल. डोळे थोडे बिघडवून चष्मा घातल्या शिवाय दिसणार च नाही असा बदल करावा लागेल. रंग थोडा बदलावा लागेल. खूप मेहनत घ्यावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा गुरुवार, 01/28/2021 - 12:38 नवीन
खूप मेहनत घ्यावी लागेल.
हा ... हा.... हा .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
भ
भंकस बाबा गुरुवार, 01/28/2021 - 19:25 नवीन
बाकी जाऊद्या, पण आततायीपणाच्या बाबतीत तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या वरचढ असाल! हलकेच घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
स
सुबोध खरे गुरुवार, 01/28/2021 - 15:39 नवीन
डॉक्टर खरे : डीटो सुबोध भावे , पण थोडेसे सडपातळ! थोडेसे नव्हे बऱ्यापैकी सडपातळ उंची ५' १०" वजन ७० किलो अजूनही ६व्या मजल्यावर धावत चढतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
श
शशिकांत ओक Fri, 01/29/2021 - 06:24 नवीन
शब्द चित्र सांगण्यापेक्षा फोटो सादर केलेत तर पाहून मजले चढता हे नक्की होईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
R
Rajesh188 Fri, 01/29/2021 - 13:47 नवीन
फिट तर असणारच.पण सहा माळे धावत का चढता. तुम्हाला अशी कोणती घाई असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
शशिकांत ओक Sun, 01/31/2021 - 10:33 नवीन
माजी सैनिक आहेत खरे साहेब
बाकी हे मात्र खरे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
च
चौथा कोनाडा Mon, 02/01/2021 - 11:58 नवीन
तुम्हाला सुबोध खरे साहेब खालील धाग्यावर बघायला मिळतील : चौदहवी कि रात
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा