अफझल गुरू : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!
दहशतवादाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.
Afzal Guru’s last interview
यापूर्वी त्याचा आजतक वर डिसेंबर २००१ मध्ये घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
माझ्यासारखा भाजपाचा कट्टर समर्थक तुमच्यासारख्या भक्तांमुळेच पक्षापासून दूर जातोय.ऑ..?? भक्तांमुळे थेट नेत्यावर आणि विचारधारेशी फाटाफुट?शेवटी म्हणायचे झाले तर एकच म्हणेल, एखादा मुद्दा मांडला अन कोणी तो शास्त्रोक्तरीत्या खोडला तर तो मान्य करायची दिलदारी हवी , हे गुरुजीच नाही तर समर्थक विरोधक , भक्त द्वेष्टे , तुम्ही मी सगळ्यांना लागु असेल असे ही नोंदवतो+१११ अशी सकारात्मकता यापूर्वीही अनेक आयडींकडून दिसली आहे आणि गुरूजींना या मुद्द्यावर सुधारणा करणे आवश्यक आहे हे ही खरेच!तुम्हाला अप्रत्यक्षपणे हिंदुद्वेष्टा म्हणण्याबद्दल.."मी फक्त माझे निरीक्षण नोंदवले, ते वास्तविकतेला धरून असेलच असे नाही आणि ते सर्वसाधारण निरीक्षणांवर अवलंबून आहे" या प्रकारचा हा प्रतिसाद होता आणि स्पष्ट शब्दात तो "उदाहरणार्थ आहे" असेही नोंदवले आहे. अगदी असाच प्रतिसाद तुम्ही इतरत्र दिला आहे. मग हा प्रतिसाद तुमच्या बाबतीत आल्यानंतरची तुमची प्रतिक्रिया अकारण आक्रस्ताळी आणि विनाकारण आकांडतांडव करणारी का आहे..? तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत काहीही अभ्यास न करता व्यक्त होणार आणि कैच्याकै निष्कर्ष काढणार, पण आणखी कोणीतरी त्याच प्रकारे व्यक्त होत एखादी शक्यता वर्तवली तर तुम्ही थेट दिलगिरीची अपेक्षा करणार हा सोयीस्कर दुटप्पीपणा आहे हे तुमच्या लक्षात येते आहे का? मी केवळ उदाहरण देण्यासाठी असे पहिल्यांदा केले तर तुमची इतकी टोकाची प्रतिक्रिया आली. मग इतरांच्या भावनांच्या बाबतीत तुम्ही तितकेच संवेदनशील असावे ही अपेक्षा अगदीच अवास्तव आहे का? ..आणि दिलगिरी संदर्भातच, "सध्याच्या भारत सरकारच्या कारकिर्दीत फॅसीस्ट सरकारच्या विविध लक्षणांपैकी अनेक लक्षणांची तीव्रता वाढली आहे" हा चुकीचा निष्कर्ष कोणताही अनुभव, अभ्यास आणि अधिकार नसताना सार्वजनिकरीत्या व्यक्त करून वाचकांची दिशाभूल करण्याबद्दल तुम्ही सर्व वाचकांची माफी का मागू नये? किंवा "एखाद्या चर्चेची पातळी खाली नेणारी तिरकस भाषा वापरणे ही संघस्वयंसेवकांची सर्वमान्य प्रवृत्ती आहे" या वाक्याबद्दल तुम्ही येथील संघस्वयंसेवकांची माफी का मागू नये? सव्वाशे लेख आहेत. अशी अनेक उदाहरणे सापडतील. तुम्हाला आणखी हवी असली तर आणखी शोधून देतो. तुमची चूक झाली असेल तर विनाशर्त दिलगिरी व्यक्त कराल अशी अपेक्षा आहे.इथेच थांबू.सहमत. :)