अफझल गुरू : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!
दहशतवादाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.
Afzal Guru’s last interview
यापूर्वी त्याचा आजतक वर डिसेंबर २००१ मध्ये घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
💬 प्रतिसाद
(339)
श
श्रीगुरुजी
Tue, 03/08/2016 - 18:29
नवीन
मी पडलो?
कमाल आहे. अहो, जे पडलेत तेच काहीही स्पष्टीकरण न देता निघून गेलेत कारण त्यांच्याकडे उत्तरच नाही. आधी विषय त्यांनी स्वत:हून उकरून काढला. खांग्रेस हा शब्द म्हणे तुच्छतापूर्वक आहे आणि असा शब्द वापरणे म्हणजे नाकात बोट घालण्यासारखं घाण आहे म्हणे. मी २-३ वेळा त्यांना विचारलं की या शब्दात नक्की काय तुच्छतापूर्ण आहे, तर त्यावर उत्तर नाही. उलट मलाच आत्मपरीक्षण करायचा सल्ला दिला. हेही विचारलं की इतर पक्षांचा असा तिरकस उल्लेख झाल्यावर तो का तुम्हाला नाकात बोट घातल्यासारखा वाटला नाही असा दुटप्पीपणा का? त्यावरही उत्तर न देता काढता पाय घेतला. त्यांचे खांग्रेसविषयीचे ममत्व आणि विशेषतः भाजप/मोदी/संघ इ. विषयीचा राग यातून असा दुटप्पीपणा येतो. चालायचंच.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 03/09/2016 - 05:34
नवीन
अहो गुर्जी ते तुच्छतादर्शक कसं नाही ते सांगा ना जरा, अता उद्या कोणी तुमच्या आयडीचं विडंबन 'शीगुरुजी' असं केलं तर तुम्हाला ते तुच्छतादर्शक वाटेल का आनंदाने मिरवून घ्यावेसे वाटेल?
(व्यक्तिगत घेऊ नका, मी केवळ उदाहरण म्हणून दिलंय)
दुसऱ्याने दगड मारला म्हणून तुम्हीही दगडच मारणार का त्यांनी दगड मारू नये म्हणून प्रयत्न करणार?
सांगा ना प्लीजच...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 03/09/2016 - 10:10
नवीन
कमाल आहे. खांग्रेस हा शब्द तुच्छतापूर्वक आहे असा जावईशोध घासकडवींनी लावला. तो कसा तुच्छतापूर्वक आहे ते सांगा असे २-३ वेळा विचारल्यावर त्यावर एक अक्षरही उत्तर न देता "आत्मपरीक्षण करा", "संघाच्या शिबिरात अशी भाषा चालत असेल" असे पूर्णपणे विषयांतर करून त्यांनी काढता पाय घेतला. आणि आता हा शब्द कसा तुच्छतापूर्वक आहे हे तसा जावईशोध लावणार्यांना न विचारता उलट तुम्ही मलाच विचारत आहात हा शब्द कसा तुच्छतादर्शक नाही हे सांगा. हा जावईशोध घासकडवींचा आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडेच या प्रश्नाचे उत्तर आहे.
मला काहीही वाटणार नाही.
ज्यांना कायम विनाकारण इतरांना दगड मारून पळून जायची सवय असते त्यांना शेवटी दगडानेच उत्तर द्यावे लागते.
- Log in or register to post comments
म
मोदक
Wed, 03/09/2016 - 10:22
नवीन
खांग्रेस हा शब्द तुच्छतापूर्वक नसेल तर तुम्ही सरळ सरळ काँग्रेस का लिहित नाही?
हे असे लिहिण्यामुळे मेन हिरो नाचत असताना बाजुचा एक्स्ट्रॉ भाव खाऊन गेल्यासारखे होते. तुमचा मुख्य मुद्दा कितीही योग्य असला तरी अशा उल्लेखामुळे तो बाजुला पडतो आहे. (उदा.) आता खांग्रेसची तुमच्या लेखी व्युत्पत्ती (पैसे) खाणारे ते खांग्रेस अशी असली तरी वरती हिंदू-मुसलमान वाद असल्यासारखी मोडतोड केली गेलीच ना?
आता तरी प्रचेतस सरांचा मुद्दा लक्षात येतो आहे का?
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 03/09/2016 - 14:12
नवीन
घासकडवी हे नाव सारखं सारखं येतं आहे म्हणून नाईलाजाने लेखनसीमा आवरती घ्यावी लागलेली आहे.
हे विधान म्हणजे सिलेक्टिव्ह रीडिंग की दाबून खोटेपणा करणं हे कळत नाही. त्यांना मी ताबडतोब उत्तर दिलं होतं.
या वाक्यात मी खांग्रेस किंवा खान्ग्रेस हा शब्द तुच्छेतेने कसा वापरला जातो हे दाखवलं होतं. आता हा वापर तुच्छतेचा नाहीच असंही कोणी म्हणेल. पण मला तो तुच्छतेचा कसा वाटतो हे मी लिहिलेलं होतं.
- Log in or register to post comments
र
रमेश भिडे
Wed, 03/09/2016 - 15:52
नवीन
काँग्रेस पक्ष विशिष्ट लोकांचे लांगूलचालन करतो हे वारंवार सिद्ध झालेले आहे. बाकी आपण निवडणूक आयोगाचे (काँग्रेस सरकारच्या राजवटीत नेमणूक झाल्याने पक्षनिष्ठ असे) निरीक्षक असावेत व मिपावर कोण काय बोलतंय याबाबत अहवाल तयार करणारे कारकून असावेत अशी शंका निर्माण होते आहे. आपल्याला वाटली तर वाटू दे की. खांग्रेस म्हणायला कुणाला बंदी आहे का?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 03/09/2016 - 19:02
नवीन
घासकडवी,
तुमची खरोखरच कमाल आहे. तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नाला अजूनही उत्तर दिलेले नाही. खांग्रेस हा शब्द का तुच्छतापूर्ण आहे हे तुम्हाला २-३ वेळा विचारले तेव्हा त्याचे कोणतेही सरळ व स्पष्ट उत्तर न देता "खान-्ग्रेस म्हणजे मुस्लिमांची दाढी कुरवाळणारा पक्ष' असा अर्थ तुम्हाला अपेक्षितच नव्हता असं तुम्ही म्हणू शकाल." असे स्वत:च ठरवून मोकळे झालात.
म्हणजे मला काय म्हणायचे हे मी अजिबात सांगितले नाही तरी ते तुम्हीच स्वतःच्या मनाने ठरविणार, हा अर्थ मी नाकारणार असेही तुम्ही स्वतःच गृहीत धरणार, विचारले नसतानाही शहाजोगपणे दुसर्यांना आत्मपरीक्षण करण्याचे सल्ले देणार, विषयाचा दुरूनही संबंध नसताना संघाला विषयात आणून मनातील मळमळ ओकून टाकणार आणि कोणी काही विचारण्याचा आतच लेखनसीमा म्हणून निघून जाणार. वा!
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 03/07/2016 - 18:48
नवीन
मिपावर असलेले भाषण्/लेखन स्वातंत्र्य हे मिपाचे एक वैशिष्ठ्य आहे. इथे राजकारण-समाजकारणाच्या बद्दलच्या चर्चेत भाजपा, काँग्रेस, संघ, समाजवाद, आणि अर्थातच कम्युनिस्ट या सर्वांच्या बाजूने लिहीणारे दिसतील.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 03/08/2016 - 04:25
नवीन
असहमत.. भाजपावाल्यांना भाजपाई म्हणणारे इथेच आहेत..
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
गुरुवार, 03/10/2016 - 08:32
नवीन
अतिवापरामुळे खांग्रेस शब्द युजर डिक्शनरीत साठवला गेला आणि ऑटोकरेक्ट झालं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही :-)
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 03/06/2016 - 20:09
नवीन
विवेक ठाकूर,
>> जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!).
तुम्हाला काय म्हणायचंय ते मला साधारणत: कळतंय. संसदेवर हल्ला केला म्हणून त्याला फाशी द्यायला तुमची हरकत नाही. मात्र त्याच्या विचारांचा मुकाबला विचारांनीच करावा असा तुमचा आग्रह आहे. बरोबर?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 03/07/2016 - 06:59
नवीन
इतकी लांबलचक न्यायीक प्रक्रीया झाली ति विचारांची फाईट नव्हती काय ? काश्मीरमधे निवडणुका, वेगवेगळ्या मंचावर चर्चा, मिडीयाबाजी, संयुक्त राष्ट्राच्या सभांमधले दाखले हे सर्व वैचारीक संघर्षच आहेत ना ?
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Mon, 03/07/2016 - 07:03
नवीन
तुम्हाला काय म्हणायचंय ते मला साधारणत: कळतंय. संसदेवर हल्ला केला म्हणून त्याला फाशी द्यायला तुमची हरकत नाही. मात्र त्याच्या विचारांचा मुकाबला विचारांनीच करावा असा तुमचा आग्रह आहे. बरोबर?
अफजलनं उघड देशद्रोह केला होता त्यामुळे त्याला झालेली सजा निर्विवादपणे योग्य आहे. तिथे विचारांचा मुकाबला विचारांनी करण्याचा प्रश्नच येत नाही.
माझा आक्षेप अफजल आणि कन्हैयाला एकाच लाईनीत बसवण्याला आहे. प्रिंट मिडीया आणि व्यक्तीची मुलाखत यात कमालीचा फरक आहे. मुलाखतीतून त्या व्यक्तीचं नेमकं म्हणणं सरळ तुमच्यासमोर येतं आणि तुम्ही तुमचं मत बनवू शकता. या हेतूनं मी कन्हैयाच्या मुलाखतीचा धागा दिला होता. कन्हैयानं राजद्रोह म्हणजे देशद्रोह नाही असं म्हटलंय आणि त्या अनुषंगानं सध्या जे सत्तेला विरोध म्हणजे देशद्रोह असं चित्रं रंगवलं जातंय त्या विरोधात आवाज उठवला आहे.
लेखकानं हा धागा काढून बिजेपीच्या मानसिकतेतचंच (सत्तेला विरोध म्हणजे देशद्रोह) उत्तम प्रदर्शन केलंय.
इतक्या उघड गोष्टीवर इथे स्वतःच्या पिताश्रींचं संकेतस्थळ असल्याप्रमाणे `चपला घाला' असा तद्दन निर्बुद्ध प्रतिसाद आलायं तो ही बिजेपीच्या `देश सोडा' इतक्याच लायकीचा आहे. पण हे कळायला किमान समज असण्याची गरज आहे.
तद्वत, आपल्याकडे काहीही मटेरियल नसलं की इथे `सायकॅट्रीस्ट' हा तितकाच निर्बुद्ध पण आवडीचा प्रतिसाद दिला जातो. त्यातून प्रतिसादक स्वतःची झालेली मानसिक कोंडी दर्शवतोयं आणि ते त्याच्या मनोरूग्णतेचं दर्शक आहे ही त्याच्या आकलनापलिकडची गोष्ट असते. बहुदा असे प्रतिसाद देणारे मनोरुग्ण स्वतःच्या अनुभवातून असा सल्ला देत असावेत. अर्थात, त्यांचे प्रतिसाद पाहिले की त्यांचा वकूब कळतो. अशा प्रतिसादांना उत्तर देण्यात अर्थ नसतो. तरीही असा प्रतिसाद कुणाला पुन्हा आला तर त्याला प्रतिसादकाच्या रूग्ण मानसिकतेची कल्पना यावी म्हणून हा प्रपंच!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 03/07/2016 - 08:21
नवीन
मुळात कन्हैय्याला भाजपला विरोध केला म्हणून अटक झालेली नाहीय्ये. जेएनयु मध्ये अफझल गुरूच्या फाशीच्या विरोधात जो कार्यक्रम केला व त्यात वेगवेगळ्या २९ भारतविरोधी घोषणा दिल्या म्हणून त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे सर्व माहिती असूनसुद्धा त्याने भाजपला विरोध केला म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला अशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न अखंड सुरू आहे.
सध्याच्या सत्तेला विरोध म्हणजे देशद्रोह असे कोणीही म्हणत नाही. विनाकारण खोटेनाटे उठवू नका.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
गुरुवार, 03/10/2016 - 15:01
नवीन
त्यानं देशद्रोह केला किंवा नाही हे न्यायप्रविष्ट आहे पण तो मोदीविरोधी बोलतो म्हणून तुम्ही असला भंपक धागा काढून त्याला अफजलशी इक्वेट केलायं . त्याच्या प्रतिमा हननाचा प्रयत्न आता अंगाशी आल्यावर तुम्ही विषय बेअर चार्जेसवर नेतायं .
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/10/2016 - 15:08
नवीन
परत तेच! मूळच्या प्रतिसादावर तब्बल ७८ तासानंतर प्रतिसाद! आणि तेच तुणतुणं परत.
त्याच्या प्रतिमा हननाचा प्रयत्न माझ्या अंगाशी आला? किती गोड गैरसमज आहे तुमचा!
जरा स्वतः काढलेला धागा आणि या धाग्यावरील स्वतःचे प्रतिसाद व त्यावर इतरांनी दिलेली सडेतोड उत्तरे नीट वाचा. कन्हैय्याच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न तुमच्याच अंगाशी आला आहे.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
गुरुवार, 03/10/2016 - 17:00
नवीन
तुम्ही किती प्राणपणानं सत्ताधाऱ्यांचा फसलेल्या गाडा एखाद्या नोकरदारानी मालकाची खिदमत करावी तसा रात्रंदिवस ओढतायं ते पाहा . त्यानं त्यांचं तर काही भलं होणार नाही पण तुम्ही एकांगी आहात हे नक्की झालंय त्यामुळे यापुढे तुमचे प्रतिसाद सुद्धा कोण आणि कितपत वाचेल याची शंका आहे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/11/2016 - 09:33
नवीन
एकांगी तर तुम्हीच आहात. प्रत्येक धाग्यावर (कन्हैय्याचा उदो उदो करणारा धागा, स्त्रियांच्या ऑर्गॅझमवर तुम्ही उधळलेली मुक्ताफळे आणि त्यावर अनेक स्त्री सभासदांनीच तुमचा घेतलेला सडेतोड समाचार, हा धागा, पूर्वीचे तुमचे केजरीवालांचा उदोउदो करणारे धागे इ.) तुमचा सर्वांनी मनसोक्त समाचार घेतलाय. तरीही तुमचा अट्टाहास कायम आहे. कन्हैय्याचे भूतकाळातील सर्व प्रताप आता सार्वजनिक होत आहेत व अशा विकृत व्यक्तीचे समर्थन करण्याबद्दल खंत वाटण्याऐवजी अजूनही हिरीरीने त्याचे समर्थन सुरूच आहे.
माझे प्रतिसाद वाचा असे मी तुम्हाला चांदीच्या वाटीत अक्षता घेऊन आमंत्रण दिलेले नाही. वाचायचे का नाहीत हे इतरांनी ठरवावे. त्यांच्या वतीने तुम्ही वकिली करून नका. तुम्हाला वाचायचे नसतील तर नका वाचू. हू केअर्स?
- Log in or register to post comments
आ
आरोह
Sun, 03/06/2016 - 20:19
नवीन
ते जर असे म्हणत असतील तर त्यांना असे विचारावेसे वाटते कि,कसे करणार ते विचारांचा मुकाबला विचाराने???
म्हणजे काही योजना आहे का त्यांच्याकडे ???
त्या योजना उपयोगात आणता येतील काय??
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Mon, 03/07/2016 - 04:34
नवीन
- Log in or register to post comments
म
मोदक
Mon, 03/07/2016 - 10:33
नवीन
अरे व्वा...
ही घ्या ब्रेकिंग न्युज
सनसनीखेज खुलासा..!!!
गुजरात २००२ हत्याकांडानंतर वाजपेयींनी मोदींना फटकारले. मोदींनी हात पकडून आणि मान झुकवून माफी मागितली.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 03/07/2016 - 07:04
नवीन
विठा..
तुम्हाला कन्हैया (पुर्वी केजरीवाल) प्रांजळ आणि अजुन काय न काय वाटतो तिथेवर ठिक आहे.
पण
इथे अफजल गुरु --> मोदींना विरोध
मोदीभक्तासाठी मोदींना विरोध --> देशद्रोह
म्हणुन मोदीभक्तासाठी अफजल गुरु --> देशद्रोही ??????
मी कितीदाही हे वाचलं तरी तुम्ही इतका डोक्यावर पडल्यासारखा युक्तिवाद कराल ह्यावर विश्वास बसत नाही. तुम्हीच म्हणताय की अफजल देशद्रोही होताच. काय होतंय काय नक्की तुम्हाला?
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Mon, 03/07/2016 - 07:41
नवीन
किंवा मग लेखकाचा चष्मा घालून वाचतायं.
अफजल आणि कन्हैया ही तुलना गैर आहे हे अनेकदा सांगून झालंय. आणि असली फडतूस विडबनं टाकून कन्हैयाला देशद्रोही ठरवणं चूक आहे इतकाच माझा मुद्दा आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 03/07/2016 - 08:24
नवीन
हो का? मग "कन्हैय्या कुमार: वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!" असले फालतू धागे काढून देशद्रोह्यांचा उदोउदो करणे बरोबर आहे का?
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Mon, 03/07/2016 - 08:31
नवीन
मग "कन्हैय्या कुमार: वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!" असले फालतू धागे काढून देशद्रोह्यांचा उदोउदो करणे बरोबर आहे का?
आता हा प्रतिसाद समस्त सदस्यांनी वाचा म्हणजे लेखकाचा धागा काढण्याचा उद्देश कळेल. आणि मी म्हणतोयं ते बरोबर आहे याची प्रचिती मनोरुग्ण आणि निर्बुद्ध चपलावाल्यांना येईल.
जो मोदी विरोधी तो देशद्रोही!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 03/07/2016 - 08:43
नवीन
धागा काढण्याचा उद्देश संबंधितांना बरोब्बर समजला आही. म्हणून तर असे बिथरल्यासारखे प्रतिसाद येत आहेत.
गोबेल्सच्या शिकवणु़कीला अनुसरून असत्याचा प्रोपागंडा सुरू आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 03/07/2016 - 18:05
नवीन
व्यक्तिगत टिकेने मुद्याचे समर्थन होते का या बद्दल साशंकता वाटते.
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
Mon, 03/07/2016 - 08:37
नवीन
अनुल्लेखाने मारणे /दुर्लक्ष करणे हा प्रकार माहित आहे काय तुम्हाला क्षीरसागर ?
तुमच्या दृष्टीने हे विडंबन फडतूस आहे ना ?
मग प्रतिवाद का करत बसला आहात ?
तुच्या दृष्टीने जे फडतूस बोलणे आहे,अशा बोलण्याचा प्रतिवाद करताना तुम्ही सुद्धा तसेच बोलता आहात हे ध्यानात येत नाही का तुमच्या ?
शांततेचे,मौनाचे महत्व कर्कश्य पणे ओरडून सांगण्याचा प्रकार वाटतो हा.
धाग्याच्या संदर्भात अवांतर होईल पण आध्यात्माच्या क्षेत्रात पहिली पायरी असते … let it go.
तुम्ही स्वतःला एक अध्यात्मिक अधिकारी व्यक्ती म्हणून दर्शविता आणि या क्षुल्लक गोष्टींवर वितंडवाद घालत बसता.
हा विरोधाभास तुमच्या लक्षात येत नाही का ?
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 03/10/2016 - 15:15
नवीन
तुम्ही स्वतःला एक अध्यात्मिक अधिकारी व्यक्ती म्हणून दर्शविता आणि या क्षुल्लक गोष्टींवर वितंडवाद घालत बसता.
हा विरोधाभास तुमच्या लक्षात येत नाही का ?
लगता है लखुभाई रिसबुड जी नये आये है.
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
Fri, 03/11/2016 - 19:07
नवीन
नक्की काय म्हणायचे आहे हे सविस्तरपणे सांगाल का ?
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Mon, 03/07/2016 - 08:39
नवीन
आम्ही राव गाढ़वच राहिलो. ठाकुर साहेब कधिपासून सांगून राहिले, या धाग्यावर, कान्हा देशद्रोही नाय नाय त्रिवार नाय. आम्ही लेकाचे ऐकतच नाय.
कोर्टाने जामिन देताना पण सांगितले की जामिन मिळाला म्हणजे निर्दोष सुटका न्हाय.
विवेक ठाकुर म्हणजे रामशास्त्री, त्यांनी निक्काल लावला म्हणजे लावला.
ते येडं अनुपम खेर काय बरळुण गेलं टीवीवर, सालं टचिंग होत पण आता काय फायदा, कन्हैया निर्दोष हाय ना.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 03/07/2016 - 08:47
नवीन
देशात नवीन कायदा झालाय का भंकसबाबा?
आजवर आम्ही समजत होतो की गुन्हा सिद्ध होईस्तोवर आरोपीस निर्दोष समजावे असं न्यायाचं तत्त्व आहे. अभी उल्टा हुई गवा का? ऐसा कैसा हुवा च्यामारी??

- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Mon, 03/07/2016 - 12:43
नवीन
@ तजो ,कन्हैयाला जेएनयू मधे काय चालले आहे याची पूर्ण कल्पना होती. जर हे अघटित घडणार होते तर मग त्याने तसा व्यवस्थापनाला रिपोर्ट करायचा होता. ते न करता तो त्याला माहीत असलेल्या देशद्रोह्याबरोबर उठत बसत होता. कायद्याने चोरीला मदत करणारा देखिल गुन्हेगारच!
साहेब तो विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे, जिथे जेएनयूच्या बाहेर बसलेल्या चनेवाल्याला खबर लागते तिथे हां काय चने खायला गेला होता?
माझी मुख्य चीड़ आहे ती जेएनयू मधे झालेल्या महिषासुर शहीद दिवसाची, हां फ़क्त भगवा रंग आहे म्हणुन त्याची कोणी टिनपाटाने टिंगल करावी काय? अशीच टिंगल निळ्या, पांढऱ्या वा हिरव्या रंगाची झाली असती तर या रंगाच्या समर्थकानी खपवून घेतली असती काय?
बाकी या धाग्याला इतके प्रतिसाद बघुन खरच गंमत वाटली. आमच्या विठाना अभिव्यक्तिस्वातंत्र कन्हैयासाठी अभिप्रेत आहे, पण विडंबन करण्याचा दुसर्याचा हक्क् ते त्यांच्या सोयींने डावलत आहेत.
आता त्या भटकल बन्धुचे, अबू जुन्दालचे, फोटो पण टाका मिपावर देसभक्त म्हणुन, अजुन आरोप कुठे सिद्ध झाले आहेत.
तजो हीच अककल जर नमोच्या तोंडाला रक्त लागले आहे ही भाषा बोलण्यार्याना शिकवलित तर भले होईल देशाचे!
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 03/07/2016 - 13:07
नवीन
कन्हैयाला जेएनयू मधे काय चालले आहे याची पूर्ण कल्पना होती. जर हे अघटित घडणार होते तर मग त्याने तसा व्यवस्थापनाला रिपोर्ट करायचा होता. ते न करता तो त्याला माहीत असलेल्या देशद्रोह्याबरोबर उठत बसत होता. कायद्याने चोरीला मदत करणारा देखिल गुन्हेगारच!
>> हौ डू यु नो दॅट?
साहेब तो विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे, जिथे जेएनयूच्या बाहेर बसलेल्या चनेवाल्याला खबर लागते तिथे हां काय चने खायला गेला होता?
>> तुम्ही तो रवीशकुमारच्या मुलाखतीत जे बोलला त्यावर विश्वास ठेवत नसाल तर तो तुमचा प्रश्न. तुम्ही विश्वास न ठेवल्याने सत्य बदलत नाही. अर्थात सत्य समोर येईलच असेही नाही. अगदी न्यायालयात सुद्धा.
माझी मुख्य चीड़ आहे ती जेएनयू मधे झालेल्या महिषासुर शहीद दिवसाची,
>> ह्याच्यासाठी त्याला उचलून आत टाकावे, वकिलांनी त्याल मनसोक्त धुवावे, त्याच्यावर देशद्रोह्याची केस चालावी हे तुम्हाला मान्य आहे तर.
आता त्या भटकल बन्धुचे, अबू जुन्दालचे, फोटो पण टाका मिपावर देसभक्त म्हणुन, अजुन आरोप कुठे सिद्ध झाले आहेत.
>> करिम टुंडा माहित आहे का? आज बाइज्जत बरी केलंय त्याला कोर्टाने. तुम्ही कोर्टाच्या निकालाचा याबाबतीत आदर कराल काय? करिम टूंडाला निकालाआधीच गुन्हेगार ठरवले गेल्याने ज्या मानहानीला आतापर्यंत सामोरे जावे लागले त्याची भरपाई कशी करु शकाल ते सांगाल काय? मुद्दा आरोप सिद्ध होइस्तोवर आरोपीस निष्पाप मानले पाहिजे ह्या न्यायाच्या तत्त्वाचा आहे. तुम्ही भटकल, अबु बद्दल म्हणताय मी तर साध्वी प्रज्ञा, पुरोहित, समीर गायकवाड ह्यांना न्यायालयाने निकाल देईपर्यंत निष्पापच मानेल. तुम्ही तुमच्या लॉजिकने त्यांना देशद्रोही मानणार का?
तजो हीच अककल जर नमोच्या तोंडाला रक्त लागले आहे ही भाषा बोलण्यार्याना शिकवलित तर भले होईल देशाचे!
>> नमोच्या तोंडाला रक्त लागले आहे असे बोलणारे मिपावर दिसले नाहीत अजूनतरी. दिसले तर शिकवेन हो. आधी ज्यांना गरज आहे त्यांना शिकवू कि नको? समतापूर्ण उपदेश असावा.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 03/07/2016 - 16:03
नवीन
त जो साहेब
दहशतवादी मग तो कोणत्याही रंगाचा असो तो देशद्रोहीच असतो. आज केवळ अब्दुल करीम टुंडा सुटला तो सज्जड पूर्व नाही म्हणून याचे कारण आपली न्यायालाये निष्पक्षपाती आहेत म्हणून. वातानुकुलीत खुर्चीत बसून दहशत वाद्यांबद्दल सहानुभूती दाखवणे सोपे आहे.प्रत्यक्ष एखाद्या दहशतवाद्याला गुन्हा करताना पहिले तरीही त्याच्या विरुद्ध प्रत्यक्ष साक्ष द्यायला कोणीही माणूस जीवाच्या भीतीने पुढे येत नाही. त्यामुळे उपलब्ध असलेला केवळ परिस्थितीजन्य पुरावा गोळा करण्यात तुमच्या पोलिसांची इतकी उर्जा खर्च होते.शिवाय या दहशतवाद्यांना खटला लढायला आपला शेजारी देश भरपूर पैसे पुरवायला तयार असतोच. त्यातून १९९०-२००० च्या दशकात नक्की माहिती असलेल्या दहशतवाद्याला ठार केले तरीही लष्करातील अधिकार्यांना आज खोट्या चकमकीत मारले म्हणून प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याची सर्व समान्य माणसाना कल्पना नसते. दहशतवाद्याला पकडले तरीही पूरावा नाही म्हणून तो लगेच जामिनावर सुटतो आणि ताबडतोब लष्करी सैनिकांचा बदला घेण्याचा प्रयत्न करतो. मारले तर खोट्या चकमकीची चौकशी
आणि आज आपण वातानुकुलीत खोलीत बसून अब्दुल करिम तुन्दाच्या निर्दोषीपणाची ग्वाही देत आहात. त्याचा इतिहास वाचा.
रवींद्र पाटील नावाचा एक पोलिस केवळ सत्याला चिकटून आपले विधान न बदलल्यामुळे कफल्लक आणि बेवारस अवस्थेत मेला याची आपल्याला जाण आहे का?
ती जर असेल तर मला अधिक काही सांगायची गरज नाही आणि ती नसेल तर बोलणेच खुंटले.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 03/07/2016 - 16:06
नवीन
न्यायालये अशी निष्पक्ष असली तरीही अफझल गुरूची फाशी हि न्यायालयीन हत्या आहे अशा घोषणा जनेवि मध्ये दिल्या जातात आणि त्याला व्यक्तीस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य अशी गोंडस नावे दिली जातात हे संतापजनक आहे.
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Mon, 03/07/2016 - 16:12
नवीन
अहो ह्यांची चित भी मेरी और पट भी मेरी अशी वृत्ती आहे,सोडलं नाही तर न्यायालयीन हत्या आणि सोडलं तर बघा आम्ही म्हणत नव्हतो कि निर्दोष आहोत।
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 03/07/2016 - 17:12
नवीन
ओ साहेब, उगा ताणू नका. मी कधी म्हटलं की अफझलगुरुची फाशी न्यायालयीन हत्या आहे?
चितभीमेरी पटभीमेरी चे पेटंट मिपावरचे एक सन्माननीय सदस्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. माझा त्याच्याशी संबंध नाही.
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Tue, 03/08/2016 - 02:23
नवीन
माझा प्रतिसाद हा कन्हैय्या नावाच्या बाहुलीला नाचवणाऱ्या लोकांना उद्देशून होता,म्हणजे खांग्रेसी कम्युनिस्ट वैगरे वैगरे,
पण तो तुम्ही अंगावर घेतला 'कन्हैय्या ला सपोर्ट करण्याच्या नादात तुम्ही आता एक से एक अतिरेक्यांच समर्थन करू ऱ्हायले ब्वा।
:अब्दुल करीम टूंडा हा तोच ना ज्याने आल्या आल्या दुखणं काढून सरकारी रुग्णालयातून पेस मेकर ची शस्त्रक्रिया केली होती तेही फुकटात.आता काही दिवसात दाऊद येईल त्यालाही इथेच मरायचं आहे तेव्हा तुम्ही त्याचंही असंच समर्थनं करणार का।
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 03/08/2016 - 02:59
नवीन
तुम्ही बंदूक ताणलेली आहे, डोळ्यात शिकारीची नशा आहे, हात ट्रीगर दाबायला शिवशिवतायत. अशावेळेस काहीही हललं तरी हरिण समजून मारायची तुमची तयारी आहे. शिकारीसाठी शुभेच्छा!
न्यायालयाचाचा निर्णय एका परिस्थितीत मान्य, दुसर्यात नाही असे करणारेही अफझलची फाशी जुडीशियल किलींग मानणार्यांच्या रांगेत बसतात. काहीही फरक नाही. निदान मी न्यायालयाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत अंतिम मानतो. जो असेल तो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 03/08/2016 - 05:19
नवीन
जोकर बुवा
मी कायद्याचे तत्वच सांगितले आहे आणी ते न्यायालयाला पूर्ण मान्य असतेच. तेंव्हा "तुम्ही ते न्यायालयाला का सांगत नाही" या म्हणण्याला काय अर्थ आहे? न्यायालयाने टूण्डाला सज्जड पुरावा नसल्याने संशयाचा फायदा देऊन सोडले आहे. आपल्याला टूण्डाचा एवढा पुळका आहे ("करिम टूंडाला निकालाआधीच गुन्हेगार ठरवले गेल्याने ज्या मानहानीला आतापर्यंत सामोरे जावे लागले त्याची भरपाई कशी करु शकाल ते सांगाल काय?") तर टूण्डाने एवढे बॉम्ब स्फोट केले त्यात दगावलेल्या माणसांच्या निष्पाप कुटुंबियांना वा आयुष्यभरासाठी जायबंदी झालेल्या निष्पाप माणसाना झालेल्या कष्टाची किंमत काहीच नाही? ते तर कुठल्याही संशयाच्या भोवर्यात नव्हते किंवा नाहीत. टूण्डा चार केसेस मध्ये "पुरेशा"पुराव्याभावी सुटला पण अजून अनेक केसेस बाकी आहेत. आपण फक्त कायद्याच्या तत्वांचा कीस पाडला आहे त्याला फारसे कष्ट लागत नाहित. हे मी लष्करात असताना तस्कर किंवा दहशतवादी यांच्या विरुद्ध खटला दाखल करण्यासाठी काय काय करावे लागते ते स्वतः पाहिलेले आहे म्हणून फक्त बोलत नाहीये तर त्यात हुतात्मा झालेल्यानच्या कुटुंबाची आणि बळी पडलेल्या निष्पाप माणसांची आणी त्यांच्या कुटुंबियांची काय वाताहत होते हे स्वतः पाहत आलो आहे.
आपले विधान म्हणजे सलमान खानला केवढी मानहानी आणी कष्ट भोगायला लागले असे आहे पण त्याच्या गाडीखाली मेलेल्या माणसानचे काय या बद्दल आपले काहीच म्हणणे नाही.
ARMCHAIR ACTIVIST म्हणजे मला हेच म्हणायचे आहे. सलमानला न्याय "मिळालाच" पाहिजे पण त्याच्या गाडीखाली आलेल्या लोकांचे काय किंवा रवींद्र पाटील यांन न्याय मिळण्याबाबत काय तर ते "सरकारचे काम" आहे.
असो आपण चष्मा लाव्लेलाच आहे तेंव्हा माझ्या कडून तुमच्या विचारसरणीमध्ये काही बदल होईल अशी अपेक्षा नाहीच.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 03/07/2016 - 17:22
नवीन
आणि आज आपण वातानुकुलीत खोलीत बसून अब्दुल करिम तुन्दाच्या निर्दोषीपणाची ग्वाही देत आहात. त्याचा इतिहास वाचा.
>> खरेसाहेब, निर्दोषपणाची ग्वाही मी नाही भारतीय न्यायालय देत आहे. मी न्यायालयाचा निर्णय इथे सांगितला, माझ्या मनचं नाही. आता बरोब्बर ह्याच खटल्यातला न्यायालयाचा निर्णय तुम्हाला मान्य नाही हेच ना? पण कन्हयाच्या जामिनावरचं न्यायालयाचं भाष्य उड्या मार मारुन इथं लोक टाकतायत ते कसं मान्य होतं? एक काहीतरी ठरवा की.
राहता राहिला वातानुकुलीत खोलीचा प्रश्न. तो असेल तर इथे बाकी कोणी काहीच मत देऊ नये असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? तुम्हीही वातानुकुलीत खोलीत बसूनच लो़कांना जाण आहे की नाही ह्याचे सर्टीफिकेट मागत आहात.
बाकी, माझी जाण वैगरे काढायची तुम्हाला गरज नाही हो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 03/07/2016 - 19:34
नवीन
अब्दुल टुंडा चा इतिहास एकदा वाचा अशी विनंती आहे.नैदान त्याला कन्हैयाच्या रांगेत बसवण्याच्या अगोदर
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 03/07/2016 - 19:38
नवीन
Absence of proof is not proof of absence याचा अर्थ ही जाणून घ्या
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 03/08/2016 - 03:06
नवीन
हेच न्यायालयाला सांगत का नाही खरे साहेब? एक भारतीय नागरिक म्हणून तुमची जबाबदारी नाही का? बिचार्या न्यायालयाला हे तत्त्व माहितच नाही बघा. वातानुकुलित खोलीत बसून हे जाणून घ्या ते जाणून घ्याचे उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा हे आवश्यक आहे, नै का?
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 03/08/2016 - 03:02
नवीन
टूंडाचा इतिहास जाऊ देत. मला न्यायालयाच्या निर्णयाशी असहमत व्हायचं नाही. कारण मला काय वाटतं ह्याने त्याला कोर्ट काय शिक्षा देईल हे ठरत नसतं.
न्यायालयाचाचा निर्णय एका परिस्थितीत मान्य, दुसर्यात नाही असे करणारेही अफझलची फाशी जुडीशियल किलींग मानणार्यांच्या रांगेत बसतात. काहीही फरक नाही. निदान मी न्यायालयाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत अंतिम मानतो. जो असेल तो.
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 03/07/2016 - 19:45
नवीन
मी न्यायालयाचा निर्णय इथे सांगितला, माझ्या मनचं नाही.
एकदाचं ठरवून टाका बरं, न्यायालयांचे निर्णय म्हणजे न्याय असतो का ज्युडीशिअल किलींग ते!
आणि हो, अब्दुल तुंदा वरील फक्त दिल्ली पोलीसांनी केलेली फिर्याद रद्द झाली आहे. अजून त्याच्यावरील हरीयाणा, गाझियाबाद, अजमेर आणि हैदराबाद मधे खटले चालूच असल्याने, त्याला सोडलेले नाही.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 03/08/2016 - 02:59
नवीन
न्यायालयाचाचा निर्णय एका परिस्थितीत मान्य, दुसर्यात नाही असे करणारेही अफझलची फाशी जुडीशियल किलींग मानणार्यांच्या रांगेत बसतात. काहीही फरक नाही. निदान मी न्यायालयाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत अंतिम मानतो. जो असेल तो.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 03/08/2016 - 04:36
नवीन
अब्दुल करीम टुंडा - स्त्त्रोत विकि -
He came under the police radar after the Mumbai serial bombings in 1993. He got the moniker Tunda – Hindi/ Bengali (Bangla) for without a hand or physically handicapped- after his left hand got severed in an accident while preparing a bomb in 1985 in Mumbai. His younger brother Abdul Malik, who still is a carpenter, is reportedly the only immediate family member alive in India. He also stayed in Pakistan where he is known to have imparted training on fabrication of IED and other explosives to mujahids who were sent to India from Pakistan for jehad.[6] During his stay in Pakistan, he had been in touch with organisations like ISI, LeT, Jaish-e-Mohammed, Indian Mujahideen and Babbar Khalsa and had been meeting people like Hafiz Saeed, Maulana Masood Azhar, Zaki-ur-Rehman Lakhvi, Dawood Ibrahim and several others wanted by India. He was using an elaborate network of human traffickers and fake currency suppliers active in Bangladesh. Tunda was also been associated with Rohingya operatives in the past. His association with LeT commanders Rehan alias Zafar and Azam Cheema alias Babajee is well known.[7][not in citation given]
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Mon, 03/07/2016 - 20:05
नवीन
महिषासुर शहीद दिवस साजरा करताना जी पत्रक छापुन वाटली होती त्यातील एक ईराणी बाईंनी संसदेत वाचून दाखवले होते. जी भाषा त्यात होती ती मी इथे लिहित नाही. तुम्हीच गुगलुन वाचा. मी 100% नास्तिक आहे पण जी भाषा त्या पत्रकात होती त्या भाषेला प्रत्युत्तर म्हणुन कन्हैयाचे चपलेने तोंड फोडले पाहिजे या मताचा मी आहे. याला बाळासाहेबच पाहिजे होते. जे डावे याला समर्थन करत आहेत त्यांनी कम्युनिस्ट असलेला सर्वात मोठा देश रशिया, इथे असे केले तर काय होईल याचा विचार करावा. कदाचित् कान्हा सायबेरियात बर्फ फोडत असता आणि पप्पू घमेंले भरत असता.
साला कुटुंबाचे मासिक उत्प्नन 3000 आहे सांगतो मग गाढ़वा अभ्यास कर ना, त्या गरीबीत रुतलेल्या आईबापाला बाहेर काढ ना. या लष्कराच्या भाकऱ्या कशाला भाजतो आहे? हे असले थेरं पप्पूने करावी , त्याच्या बापजाद्यानि तोंडाच्या तोफा चालवून बक्कळ पैसा कमवला आहे
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »