Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अफझल गुरू : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

श
श्रीगुरुजी
Sun, 03/06/2016 - 08:28
🗣 339 प्रतिसाद
दहशतवादाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. Afzal Guru’s last interview यापूर्वी त्याचा आजतक वर डिसेंबर २००१ मध्ये घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.

प्रतिक्रिया द्या
65789 वाचन

💬 प्रतिसाद (339)
त
तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 03:45 नवीन
भंकसबाबा, अर्धवट माहिती पसरवल्याने जे घातक विष मनात तयार होते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. महिषासुर शहिद दिवस कन्हयाने साजरा केलेला नाही. कन्हया अध्यक्ष झाला तो २०१५ मधे. हा दिवस २०११ पासूनतरी जे एन यु त साजरा केला जात आहे, त्याबद्दल अभाविपने वेळोवेळी विरोधही केलेला आहे. त्यासंदर्भात एक बातमी http://www.thehindu.com/news/cities/Delhi/student-groups-come-to-blows-over-mahishasura-issue-at-jnu-once-again/article6491346.ece खरेतर जे एन यु त अनेक विद्यार्थी संघटना वेगवेगले कार्यक्रम करत असतात, त्या प्रत्येक कार्यक्रमाला जबाबदार विद्यापिठ प्रशासन असते, युनियन प्रेसिडेंट नाही. तसेच आता तो अध्यक्ष आहे म्हणून जे एन यु तल्या अठरापगड वेगवेगळ्या विद्यार्थी संघांनी केलेल्या २०१५च्याही आधीच्या सगळ्या कार्यक्रमांना तोच जबाबदार कसा? ह्या लॉजिक ने तर दुसरे महायुद्ध कन्हयानेच प्लान केले असेही म्हटले पाहिजे. साला कुटुंबाचे मासिक उत्प्नन 3000 आहे सांगतो मग गाढ़वा अभ्यास कर ना, त्या गरीबीत रुतलेल्या आईबापाला बाहेर काढ ना. >> गरिबांनी राजकारणात उतरू नये असे तुम्हाला म्हणायचे आहे बहुतेक. टिळकांचेही असेच काहीसे वाक्य आहे, अमका संसदेत जाऊन काय हे करणार का वैगेरे, नेमकं आठवत नाही पण भावार्थ तोच आहे. राजकारण हे पोटभरलेल्यांची मक्तेदारी असावी असं तुमचं मत आहे काय? असं असेल तर अभ्यास वाढवा आणि कोणाच्या गरिबीची खिल्ली उडवू नका. मीही गरिब होतो, विद्यार्थीदशेत मीही आंदोलनं केली आहेत, ती लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यासाठी नसतात ह्याची मला जाण आहे. स्वार्थी, आप्पलपोट्या, झापडबंद, आपण बरे आपला काम बरे टैप विद्यार्थ्यांना ती नसते. ह्या लष्कराच्या भाकर्‍या कुणीतरी भाजतो म्हणून हे अप्पलपोटे विद्यार्थी सुखनैव फायदे भोगू शकतात. असे फायदे भोगून पोट भरले की कुणालाही उपदेश करायला मोकळे. कन्हया स्वत:ची गरिबी सांगतोय ते त्याच साठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
श
श्री गावसेना प्रमुख Tue, 03/08/2016 - 03:54 नवीन
कोण म्हणे गरीब राजकारणात नाही,भुजबळांनी त्यांच्या पक्षाच्या एका झोपडीत राहणाऱ्या बाईला निवडून आणून नाशिक zp अध्यक्ष केले होते राव।सोता भुजबळ भाजी विकायचे आणि आता बघा समतेचा किती धूर निघू ऱ्हायला ।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 04:22 नवीन
बरोबर. असे धूर फक्त काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते, नेते काढतात. डॉन्टटेल्मी! गरिब कन्हयाला घर सांभाळण्याचा शानपणा शिकवणार्‍यांना गरिब चहावाला पंतप्रधान होतो तेव्हा काय प्रॉब्लेम नसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
न
नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 04:26 नवीन
गरिब कन्हयाला घर सांभाळण्याचा शानपणा शिकवणार्‍यांना गरिब चहावाला पंतप्रधान होतो तेव्हा काय प्रॉब्लेम नसतोय. लै वेळा सहमत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ब
बोका-ए-आझम Tue, 03/08/2016 - 04:32 नवीन
चहावाला पंतप्रधान होतो हे अजूनही सहन होत नाहीये हाच तर खरा प्राॅब्लेम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
न
नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 04:39 नवीन
मजाच आहे बुआ!! आमची सगळी श्रद्धास्थाने एक एक करत ढासळत आहेत!, काही बोललो असतो पण मग ते दूसरी धूणी इकडे धूणे झाले असते त्यापरी आम्ही आवरतो स्वतःला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
न
नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 04:42 नवीन
काय पेक्षा कोणी ला तुम्ही ही महत्व दिले शेवटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Tue, 03/08/2016 - 06:48 नवीन
उदाहरणार्थ एखादा माणूस खोटं बोलला, तुम्ही सोडून द्याल. देशाचा पंतप्रधान खोटं बोलला तर त्यावरून गदारोळ माजेल की नाही? कोणी याला नेहमीच महत्व होतं, आहे आणि राहील. जेव्हा जे बोललं जातंय ते अगदी त्रिकालाबाधित सत्य असेल - एखाद्या शास्त्रीय नियमासारखं - तेव्हाच कोण बोललंय हे गौण ठरेल आणि काय बोललेत त्याला महत्त्व मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
त
तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 04:45 नवीन
हा हा हा. फक्त गरजेपुरता तिरपागडा अर्थ काढून 'तुम्हाला हेच म्हणायचं आहे' ही आता टिपीकल भक्त शैली म्हणून प्रसिद्ध झाली आहे. इथे चहावाला पंतप्रधान झाला हे मला सहन होत नाही असा अर्थ काढलात, वा वा वा! अहो नमोभक्तीत इतके आंधळे होऊ नका की सरळ लिहिलं ते समजत नाहीये. नमोची गरिबी डोक्यावर घेऊन नाचायचं आणि कन्हयाला म्हणाय्चं घर सांभाळ. दांभिकपणा बघा आधी मग बघा कोणाला काय सहन होत नाहीये ते. तसेही गरिबीतून पुढे आलेले नमो एकमेव नेते नाहीत भारतातले. तरी मी चहावाल्याचा मुलगा, मी चहावाल्याचा मुलगा असे स्वतःची टिमकी वाजवत स्वतःच फिरत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
आ
आनन्दा Tue, 03/08/2016 - 05:04 नवीन
इथे चहावाला पंतप्रधान झाला हे मला सहन होत नाही असा अर्थ काढलात
हे वाक्य खरे तर तुम्हाला उद्देशून नव्हते.. ते एक सर्वसामान्य विधान होते. पण असो, तुम्ही ते तुमच्यावर ओढवून घेतलेत. मर्जी तुमची. आम्ही काय बोलणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 05:23 नवीन
प्रतिसाद तुम्हाला नव्हता, तरी मधेच टपकलात. मर्जी तुमची. आम्ही काय बोलणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Tue, 03/08/2016 - 10:40 नवीन
हो बरोबर आहे. दोन मोठी माणसे बोलत असताना लहानांनी तोंड बंद ठेवायचे असते.. चुकले बर का. स्वारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ब
बोका-ए-आझम Tue, 03/08/2016 - 18:04 नवीन
यालाच bias म्हणतात. आणि दुसरी गोष्ट - त्यांचं चहावाला किंवा त्याचा मुलगा असणं जेवढेवेळा मिडियाने काढलंय त्याच्या एक शतांशानेही त्यांनी स्वतः काढलं नसेल. भक्तही त्यात आलेच. आणि जशी टिपिकल भक्त शैली आहे तशी टिपिकल विरोधी शैलीही आहेच. तसं पाहिलं तर भक्तांच्या आणि विरोधकांच्या arguments मध्ये काहीही फरक नाही - कोक आणि पेप्सी जसे डोळ्यांवर पट्टी बांधून प्यायल्यावर सारखेच लागतात (हा त्यांच्यातल्या blindfold test चा निष्कर्ष आहे. गूगलून पाहू शकता.) तसंच आहे. त्यामुळे तुम्ही भक्तांकडे एक बोट केलंत तर तीन बोटं तुमच्याकडेही रोखलेली आहेत हे लक्षात ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 18:32 नवीन
कसं आहे बोकाशेठ, ज्या लेवलचं आर्गुमेंट असेल त्या लेवलवर यायला लागतं. बाकी कट्टर भाजपसमर्थकांची (लक्षात घ्या इथे भक्त नाही म्हटलंय) एक ठराविक मानसिक बैठक आहे. एक टिपिकल स्टाईल आहे. त्यांच्यासाठी स्वतःची मतं हीच सत्य असतात. कुठे अडचण आली की हळूच भावनिक मुद्दे घुसडतात. हे फक्त मिपावर नाही तर जालावर अनेक ठिकाणी चर्चांमधे बघितलंय. उदा: तुमचं वरील वाक्य. भक्तांकडे बोट दाखवणारेच तिप्पट भक्त आहेत असे तुम्ही खुबीने सांगत आहात. त्यामुळे आपसूकच भक्तांकडे असलेलं एक बोट फारसं महत्त्वाचं नाही हे सूचित होतं. यावर बोलण्यासारखं भरपूर आहे पण असो. आता ब्रेक घ्यावा म्हणतो. जमलं तर लिहिन भक्तांची लक्षणे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्री गावसेना प्रमुख Tue, 03/08/2016 - 04:33 नवीन
तुमीबी व्हा पंतप्रधान आमचा काय इरोध नाय।तुम्ही जलेबी वाले pm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
भ
भंकस बाबा Tue, 03/08/2016 - 05:12 नवीन
तुमच्यासारखा ज्ञानी माणूस मिपावर आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. जरा ज्ञानाच्या पुढे जाऊन बघा. कन्हैया विद्यार्थी आहे. त्याने जेएनयू मधे प्रवेश विद्यार्थी म्हणुन घेतला आहे, जर हे चुकीचे असेल तर मग त्याला राजकारण करायला डाव्यानीच पाठवले असा तर्क निघतो. घरची स्थिति हलाकीची असताना हां फ़क्त अभाविपला जेएनयू पासून लांब ठेवायचे म्हणुन राजकारण करत आहे. त्याने प्रथम आपली पीएचडी पूर्ण करावी ज्यासाठी तो भारत सरकारचे पैसे घेत आहे. एकदा डॉक्टरेट हातात आलि की मग पाहिजे तेवढे उकिरडे फुंक ना! काश्मीर हां नेहमीच ज्वलंत मुद्दा राहिला आहे. जिथे आपण हजारो जवान गमावले आहेत. काश्मिर फुटिरतावाद्याना समर्थन हे मी देशद्रोह समजतो, तुम्ही अभिव्यक्तिस्वातंत्र समजत असाल. अशा फुटिरतावाद्याच्या खांद्याला ख़ान्दा लावुन हां आजादीच्या गोष्टी करतो. मग या देशातल्या 70% बहुसंख्य हिंदुच्या श्रद्धेशि खेळणाऱ्या महिषासुर शहीद दिवसाचा तो एका शब्दाने विरोध करु शकत नाही. प्रश्न महिषासुर शहीद दिवस साजरा करण्याचा नाही, साजरा करायला तुम्ही कुंभकर्ण, दुर्योधन, शकुनि, मारीच हे सगळे दिवस साजरे करा पण जी भाषा पत्रकात दुर्गेविषयी वापरली आहे ती घाणेरडी आहे. हेच जर दुसऱ्या धर्माच्या आस्थेबरोबर हिन्दुनि केले असते तर असहीष्णुतेचा पुर वाहला असता. कन्हैयाचे तोंड आतापर्यन्त फुटले असते. तो भलेही 2015 साली आला असेल पण चुकीच्या गोष्टीचे उदात्तीकरण करण्यार्या पवृत्तिला तो खतपाणि पण घालत आहे. ढ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
न
नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 05:22 नवीन
या देशातल्या 70% बहुसंख्य हिंदुच्या श्रद्धेशि खेळणाऱ्या महिषासुर शहीद दिवसाचा तो एका शब्दाने विरोध करु शकत नाही. सत्तर फत्तर काही नाही!! त्या 70% हिंदुं मधले बहुतांशी भाकरी ,नोकरी ,लोकल च्या वेळा ,बॉस चा उद्धार वगैरे करत जगत असतात माफक प्रकारे धर्म फॉलो करत असतात (वर्षात एकदा कुलदेवतेला नारळ वगैरे), त्यांना उगाच तुमच्या दुखावलेल्या भावनाना वजन प्राप्त व्हावे म्हणून जोडून घेऊ नका अन गृहीत ही धरु नका, अन इतकेच ठाम असेल तर ते पुराव्याने शाबित करा की "70% हिंदूंच्या" भावना दुखावल्या आहेत, मिपावरची 4 भड़क टाळकी म्हणजे 70 % हिंदु नव्हेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
ब
बोका-ए-आझम Tue, 03/08/2016 - 18:21 नवीन
या देशातल्या 70% बहुसंख्य हिंदुच्या श्रद्धेशि खेळणाऱ्या महिषासुर शहीद दिवसाचा तो एका शब्दाने विरोध करु शकत नाही.
या वाक्याचा मला जाणवलेला अर्थ हा आहे - जी बहुसंख्य हिंदूंचं श्रद्धास्थान आहे -दुर्गा - त्यावर जो हेतुपुरस्सर हल्ला केला गेला (२०११ पासून साजरा केला जातोय महिषासुर शहीद दिवस आणि त्याच्याशी कन्हैयाचा संबंध नसेल किंवा तो त्यात सहभागीही नसेल) त्याचा तो विरोध करु शकला असता. तो त्याने केला नाही. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून तो आपला विरोध दाखवू शकला असता पण त्याने तसं केलं नाही. कदाचित त्यामुळे तो आपल्या बाजूचा आहे असा निष्कर्ष त्या महिषासुर शहीद दिवस साजरा करणाऱ्यांनी काढला असेल, पण त्याने त्यांचा गैरसमज दूर करण्याचाही प्रयत्न केला नाही. बाकी ७०% वगैरे राहू दे. जेवढं ते विधान अतिशयोक्त आहे तेवढंच तुमचं
त्या 70% हिंदुं मधले बहुतांशी भाकरी ,नोकरी ,लोकल च्या वेळा ,बॉस चा उद्धार वगैरे करत जगत असतात माफक प्रकारे धर्म फॉलो करत असतात (वर्षात एकदा कुलदेवतेला नारळ वगैरे),
हे विधान अतिशयोक्त आहे. अजिबात कर्मकांड न करणारा हिंदू हा कट्टर असू शकतो आणि दररोज दोन तास पूजा करणारा हिंदू हा liberal असू शकतो. किती टक्क्यांच्या भावना आणि कशा दुखावतात हे आपण निश्चितपणे कधीच सांगू शकत नाही. तस्मात राहू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Wed, 03/09/2016 - 01:32 नवीन
कमऑन, "बहुतांशी" मधे आपल्याला "Definitive Empirical" असे काय दिसले हो? का बस उगाच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
त
तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 05:22 नवीन
असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
S
sagarpdy Tue, 03/08/2016 - 08:18 नवीन
इकडे निर्दोष मुक्तता (जामिनावर नाही) तरी - "पुराव्या अभावी सुटका आहे हो! माणूसच हुशार तो कि त्याने पुरावा मागे सोडला नाही. पण हाच खरा सूत्रधार" असा प्रचार होतो. तुम्ही काय हे बंडल जामिनावर सुटलेल्या लोकांचे समर्थन करताय !? जोपर्यंत मिडिया (यात सोशल मिडीयापण आला) आणि विचारवंत या सर्वोच्च न्यायाधिकरणाने निर्दोष ठरवत नाहीत तोपर्यंत सगळे जण दोषीच! उल्टा बील्टा सब झूट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
प
पिलीयन रायडर Mon, 03/07/2016 - 09:00 नवीन
विडंबन टाकुन कन्हैया देशद्रोही नाही सिद्ध करत आहेत.. भरमसाठ मोठे मोठे प्रतिसाद आलेत ना त्याच्या "भारत" विरोधी नार्‍यांवर.. पुन्हा ती चर्चा कशाला? पण तुम्ही लिहीलेले वाक्य कन्हैया विषयी आहे का? नाही ना? अफजल गुरु विषयी आहे ना? तुम्ही एवढंच सांगा की मोदींना विरोध हे अफजल गुरुला देशद्रोही ठरवण्याचे कारण कसे होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
ब
बोका-ए-आझम Mon, 03/07/2016 - 11:37 नवीन
पिरातै, तुम्ही फारच अपेक्षा ठेवताय असं नाही वाटत? डोक्यावर पडायला मुळात डोकं असावं लागतं. आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त काही Amnesty Plan आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
न
नाखु Mon, 03/07/2016 - 07:31 नवीन
मधील (आगामी ) खणखणीत संवाद मिपाकर संपादक: ठाकुर ये विवेक मुझे दे !!! समीक्षक विचारवंत :नही, नही ,कभी नही (अगर होता तो देता ना!) शोले प्रेमी नाखुस सिनेमावाला.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 08:21 नवीन
मला मोदीभक्तांच कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी. जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!). >> ह्या वाक्याचा मला समजलेला अर्थ. जो त्यांच्या (मोदीभक्तांच्या) विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल) पार्ट वन अफझल = देशद्रोही. मोदीभक्त = देशभक्त (स्वयंघोषित) कन्हय्या = मोदीविरोधी कन्हय्या = अफजल समर्थक (संशयित) मोदीभक्तांसाठी >> कन्हया (अफझल समर्थक) = अफझल समकक्ष. म्हणजे कन्हया= अफझल. म्हणजे जो जो मोदीविरोधात आहे तो अफझल गुरुसारखाच कट्टर देशद्रोही ठरवला जातो. अफझल गुरु हे एक विशेषण म्हणून घेतलंय काय ठाकूर साहेब? क्या मै सही समझ रहा हुं?
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Mon, 03/07/2016 - 08:24 नवीन
मला काय अफजलची पडलीये ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 09:03 नवीन
मला समजले पण भक्तांना कोलित मिळालंय तुम्हाला छळायला. आता गावलात, स्वस्तात नाय सुटणार तुम्ही. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
म
मोदक Mon, 03/07/2016 - 09:22 नवीन
संक्षींना विरोध करणारे पण सरसकट सगळे मोदीभक्त का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 09:52 नवीन
सरसकट शब्द फार आवडीचा दिसतो तुमच्या? (अर्थात ह्या प्रश्नात सरसकटीकरण आहे हे मान्य. ;-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 03/07/2016 - 10:17 नवीन
हो आहे आवडीचा. आणि तुमच्याशी बोलताना वारंवार वापरावा लागतो. (हे सरसकटीकरण नाहीये हा!) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
आ
आनन्दा Mon, 03/07/2016 - 09:24 नवीन
अफझल समर्थक = मोदीविरोधी हे बाकी लाखात एक बोललात.. मुळात कन्हैयाने मोदींच्या विरुद्ध चकार शब्द देखील काढला नव्हता. तरी पण त्याला मोदीविरोधक म्हणून लेबल लावण्याचा तुमचा प्रयत्न तुमच्याबद्दल आमच्या मनात असलेला आदर हळूहळू कमी करत चालला आहे. विठा बोलता बोलता त्यांची लेखणी सरकली. आता त्या सरकलेल्या लेखणीबद्दल मोकळ्यामनाने माफी मागतील की नाही? पण त्याचे ते निलाजरेपणे समर्थन करत सुटलेत आणि तुम्ही पण त्या चिखलात पडून आपले तोंड बरबटवून घेताय? असो, मी काय लिहिणार? किमान तुम्ही ज्या वाक्याचे समर्थन करायला उतरला आहात त्याचा वाच्यार्थ तरी बघा. लेखणी सरकलीय वो.. लेखकाने प्रांजळपणे ती सरकलीय हे कबूल केले की झाले. पण काय करणार, गिरे तो भी टांग उपर. त्यांचा पूर्वजन्म पाहता हे साहजिकच आहे.. तुम्ही तरी बहकू नका म्हणजे झाले. बाकी तुमचा पण पूर्वजन्म तसाच असेल तर मग काय बोलणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 09:49 नवीन
अफझल समर्थक = मोदीविरोधी असे नाही ते. मोदिविरोधी ते अफझल समर्थकच असे भक्तांचे लॉजिक. समिकरणं कशीही मांडली तर बरोबरच येत नाहीत. कोणी लिहलंय ह्ह्यापेक्षा काय लिहलंय हे बघितलं तर जास्त बरं होईल. मी कोणाच्याही वाक्याचं समर्थ्न करत नाही. ठाकूरांनी लेखणी सरकली हे मान्य केलं तर मला काही समस्या नाही. पण ती सरकली नसावी व त्यातून सरळ जो अर्थ निघतोय तो तसा नसावा हे माझं मत. त्यांनी सरकल्याचं मान्य केलं तर माझं मत मागे घेईल. मुळात कन्हैयाने मोदींच्या विरुद्ध चकार शब्द देखील काढला नव्हता. तरी पण त्याला मोदीविरोधक म्हणून लेबल लावण्याचा तुमचा प्रयत्न.... >> कन्हयाने मोदींच्या विरोधात नाही? जामिनावर सुटल्यानंतरचे भाषण ऐकले नाही काय? मी कशाला कोणाला लेबल लावण्याचा प्रयत्न करु? बाकी कशाचे काय अर्थ काढायचे हे ज्याने त्याने ठरवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Mon, 03/07/2016 - 11:10 नवीन
ते सुटल्यानंतर.. त्याला तुरुंगात टाकण्याचे कारण त्याने मोदींचा विरोध केला हे नव्हते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 11:31 नवीन
कुणी टाइमलाईन ऑफ इवेन्ट्स बघत नसेल तर तो माझा दोष नाही. कन्हयाचे संघाच्या (संघ, भाजप, अभाविप, मोदी, इत्यादी) विरोधात असणे अफझलगुरु प्रकरणाच्या आधीपासून आहे. त्याचे प्रेसिडेन्शियल इलेक्शनसाठीचे भाषण ऐका. त्यानेच भारतविरोधी घोषणा दिल्यात हे अजून सिद्ध झालेले नाही हे लक्षात असू द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
श्रीगुरुजी Mon, 03/07/2016 - 15:56 नवीन
जर मोदींना विरोध केला म्हणून त्याला तुरूंगात टाकायचं असतं तर जेएनयु मधील निवडणुकीतील भाषणानंतरच लगेच त्याला आत टाकलं असतं. ती निवडणुक होऊन बरेच महिने लोटले. त्यात कोण निवडून आले, त्यांनी काय भाषणे केली इ. ची जवळपास कोणत्याच माध्यमातून चर्चा झाली नाही. ९ फेब्रुवारीला हुतात्मा अफझल गुरूच्या तिसर्‍या महानिर्वाणपर्वाच्या दिवशी जो कार्यक्रम जेएनयुत झाला, त्या कार्यक्रमामुळेच त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मोदींवर टीका केल्याने नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 17:24 नवीन
तुमची मते हेच अंतिम सत्य आहेत. तुम्ही जिंकले. अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
L
lakhu risbud Tue, 03/08/2016 - 07:17 नवीन
मोदी,भाजप यांना विरोध हा तुमचा एककलमी कार्यक्रम आहे हे मान्य,पण राबवताना त्यांच्या विरोधात जी व्यक्ती,संघटना कुठल्याही मुद्द्यावर विरोध का करेना. अश्या व्यक्ती,संघटना तुमच्या मित्र असल्यासारखे का वागतंय हे खरच कळत नाही ? दुश्मन का दुश्मन याने मेरा दोस्त हि वृत्ती का दाखवत आहात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 07:27 नवीन
तुम्ही कसं बघता यावर सगळं डिपेन्ड करतं. जे एन यु प्रकरण फक्त देशविरोधी घोषणांपुरतं मर्यादित नाही. बडी लंबी और मोटी कहानी है, बहुत सारे साइडट्रॅक्सभी है. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
L
lakhu risbud Tue, 03/08/2016 - 07:50 नवीन
अहो मग सांगा कि ! लेख लिहा एखादा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
भ
भंकस बाबा Tue, 03/08/2016 - 08:19 नवीन
तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असलेला तुमचा डायहार्ड फैन. जरा आम्हा निर्बुद्ध लोकांना पण कळू दे राजकारण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
श
श्रीगुरुजी Tue, 03/08/2016 - 10:24 नवीन
तुमची मते हेच अंतिम सत्य आहेत. तुम्ही जिंकले. अभिनंदन!
मी जे लिहिले आहे त्या घडलेल्या घटना आहेत. आणि इतक्या लगेच तलवार म्यान करू नका हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 10:32 नवीन
म्हटलं ना तुम्ही जिंकले, अजुन काय अपेक्षा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/08/2016 - 10:49 नवीन
माझी काहीच अपेक्षा नाही. इतक्या लवकर शस्त्रे म्यान केलीत म्हणून आश्चर्य वाटले. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ब
बोका-ए-आझम Mon, 03/07/2016 - 11:48 नवीन
जे मोदीविरोधी ते अफझल समर्थकच असं कुठेही म्हटलेलं नाहीये. लोकसभेतले विरोधी पक्षाचे खासदार, डावे, मोदींचे त्यांच्या स्वतःच्या पक्षात असलेले विरोधक हे सगळे मोदींचे विरोधक आहेत आणि त्यांना मोदींना आणि त्यांच्या धोरणांना विरोध करायचा पूर्ण अधिकार आहे. घटनेने दिलेला. त्यांना by default अफझल समर्थक कोणीही म्हटलेलं नाहीये. उगाचच वाट्टेल ते अर्थ इतरांवर लादू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 11:53 नवीन
साहेब, हा अर्थ मी नाही तर श्रीमान श्रीगुरुजींनी हा धागा टाकून काढलाय. अन्यथा कन्हयाच्या धाग्याचे अफझलचा धागा काढून शब्दटूशब्द विडंबन करणे ह्याचा अर्थ तुम्ही सांगा. तुम्ही सांगितलेला अर्थ योग्य असेल तर बिनशर्त माफी मागेन. प्रॉमिस. आणि हे माझे प्रॉमिस आहे, भाजपाच्या जुमला सर्कारचे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 03/07/2016 - 12:20 नवीन
तुम्हाला त्यातला उपरोध समजला नाही? कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 12:36 नवीन
उपरोध? समजवा प्लिज. यु आर मोस्ट वेलकम. हा उपरोध नाही खरंच विनंती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
विवेक ठाकूर Mon, 03/07/2016 - 15:28 नवीन
खुद्द लेखकानं त्याचा हेतू स्पष्ट केलायं : मग "कन्हैय्या कुमार: वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!" असले फालतू धागे काढून देशद्रोह्यांचा उदोउदो करणे बरोबर आहे का? पण हे स्वतःच्या पिताश्रींचं संकेतस्थळ असल्याच्या थाटात वावरणार्‍या भ्रमिष्टांना ते दिसण्याची सुद्धा शक्यता नाही. कळण्याची तर गोष्टच दूर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ब
बोका-ए-आझम Mon, 03/07/2016 - 15:35 नवीन
हे आमच्या पिताश्रींचं संकेतस्थळ नसूनपण जर आम्ही असे वावरतो, तर खरोखर आमच्या पिताश्रींनी संकेतस्थळ काढलं, तर तुमचं काय होईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
म
माहितगार Mon, 03/07/2016 - 17:53 नवीन
पण हे स्वतःच्या पिताश्रींचं संकेतस्थळ असल्याच्या थाटात वावरणार्‍या भ्रमिष्टांना ते दिसण्याची सुद्धा शक्यता नाही. कळण्याची तर गोष्टच दूर.
प्रथम दर्शनी या वाक्याचे स्वरुप व्यक्तिलक्ष तर्कदोषाचे आहे. मी या धाग्यावरची संपूर्ण चर्चा वाचलेली नाही, व्यक्तिगत टिकेतून आपल्या बाजूचे समर्थन होते का या बद्दल साशंकता वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा