Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अफझल गुरू : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

श
श्रीगुरुजी
Sun, 03/06/2016 - 08:28
🗣 339 प्रतिसाद
दहशतवादाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. Afzal Guru’s last interview यापूर्वी त्याचा आजतक वर डिसेंबर २००१ मध्ये घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.

प्रतिक्रिया द्या
65789 वाचन

💬 प्रतिसाद (339)
त
तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 18:09 नवीन
मी या धाग्यावरची संपूर्ण चर्चा वाचलेली नाही, व्यक्तिगत टिकेतून आपल्या बाजूचे समर्थन होते का या बद्दल साशंकता वाटते. >> सिलेक्टीव प्रतिसाद वाचून मत देणे हेही व्यक्तिलक्ष तर्कदोषाचे लक्षण असावे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
श्रीगुरुजी Mon, 03/07/2016 - 15:51 नवीन
कमाल आहे. तुम्हाला आता नसलेलही दिसायला लागलंय.
जे मोदीविरोधी ते अफझल समर्थकच असं कुठेही म्हटलेलं नाहीये. लोकसभेतले विरोधी पक्षाचे खासदार, डावे, मोदींचे त्यांच्या स्वतःच्या पक्षात असलेले विरोधक हे सगळे मोदींचे विरोधक आहेत आणि त्यांना मोदींना आणि त्यांच्या धोरणांना विरोध करायचा पूर्ण अधिकार आहे. घटनेने दिलेला. त्यांना by default अफझल समर्थक कोणीही म्हटलेलं नाहीये. उगाचच वाट्टेल ते अर्थ इतरांवर लादू नका.
हा अर्थ मी धाग्यात कोठे काढलाय ते दाखवता का जरा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 17:26 नवीन
कन्हयाच्या धाग्याचे अफझलचा धागा काढून शब्दटूशब्द विडंबन करणे ह्याचा अर्थ तुम्ही सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बोका-ए-आझम Mon, 03/07/2016 - 19:50 नवीन
विडंबन. तेच तर मी आधी म्हणत होतो. जोकरला विडंबन समजू नये म्हणजे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 03/07/2016 - 08:43 नवीन
हा धागा म्हणजे "एखादा वराहासारखी घाण करतो" हे सांगण्यासाठी "स्वतः वराहासारखे ****त लोळून दाखवणे."
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/07/2016 - 08:47 नवीन
http://www.newindianexpress.com/thesundaystandard/Kanhaiya-was-Aware-of-Anti-India-Event-JNU-Registrar/2016/03/06/article3312100.ece
Kanhaiya was Aware of 'Anti-India' Event: JNU Registrar
University registrar Bupinder Zutshi, diposing before the high-power enquiry committee constituted by Vice-Chancellor Jagadesh Kumar, has said that Kumar was against the authorities’ decision to cancel the ‘anti-India’ programme. “At around 16:42 hours (on February 9), I got a call from the mobile number 9********7. The caller said, ‘Sir, I am Kanhaiya Kumar speaking, why did you withdraw the permission for the cultural event as the organisers are the same who have got requisite permission for organising the event?’” The registrar’s deposition, accessed by The Sunday Standard, indicates that the student union president was aware of the ‘anti-national event’ beforehand. Zutshi further stated that he told Kumar that he had not given any permission to organise any event. “It is the DSW who gives permission. So I handed the mobile to DSW and asked him to talk to students,” said Zutshi. Before the interrogators, Kumar had said that he was in his room till 5 pm and was not aware of any such ‘anti-national’ activities on the campus. The interrogation report of Kumar states that he only came to know about the event through some of his friends sitting outside the Brahmaputra Hostel at around 5 pm when he woke up and went outside to have snacks and tea. Contrary to it, Zutshi told the enquiry committee, “I had called a meeting of JNSU in my office at 3 pm on February 9 to discuss the route for the new bus acquired by JNU for disabled students. Mr Kumar and Mr Rama Naga reached first. Around 3 pm and we had a discussion on the bus route. After 10 minutes, Mr Saurav Sharma (ABVP member and JNSU joint secretary) also came.We all discussed the bus route for 10 minutes.” Zutshi said Sharma told him that he wanted to talk about some serious issues which were about to happen on the campus. Both Kumar and Naga were sitting there. “Sharma showed me a pamphlet regarding the ‘cultural event’ on ‘judicial killing of Afzal Guru’ and said some of the students are organising this event today (February 9, 2016) at 5 pm at Sabarmati Dhaba,” Zutshi told the committee.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Mon, 03/07/2016 - 23:48 नवीन
गुरुजी मी दीपक चौरीसिया च्या लाइव डिबेट ची लिंक दिली आहे त्यात तुम्ही वरती जे दिले आहे ते कनैह्या स्वतः काबुल केले आहे , त्याच्या मुलाखती मधून थोडक्यात आशय असा निघतो कि उमर चा एका प्रश्न लक्षात घेण्या जोगा आहे त्याने आपले पोस्टर विद्यापीठात लावले होते व प्रशासनाला हा कार्यक्रम काय आहे हे सांगितले होते तरीही प्रशासनाने आधी परवानगी दिली मग कार्यक्रमच्या आधी १ तास ती रद्द का केली मुळात रोहित च्या पार्श्वभूमीवर अश्या वादग्रस्त कार्याक्रमाल्ला परवानगी सुरवातीला देणे ही प्रशासनाची चूक ह्या कार्यक्रमाचे पोस्टर सोशल मिडिया वर होते अभाविप ने ह्याचा विरोध केला व ह्या कार्यक्रमाला आम्ही विरोध करणार हे प्रशासनाला सांगितले ह्यामुळे कायदा सुव्यवस्था थोडक्यात प्रकरणातील गंभीरता पाहून हा कार्यक्रम आयत्यावेळी रद्द झाला चेकाळलेले उमर व कनैह्या ह्यापैकी अध्यक्ष कनैह्या ने प्रशासनाला जाब विचारला समाधान कारक उत्तर कानैह्याला मिळाले न्हाई म्हणून प्रशासनाला फाट्यावर मारून कनैह्या उमर ह्यांनी संयुक्तीपणे कार्यक्रम सुरु केला. ह्यात कानैह्याने आपल्या पक्षाचे गीत म्हटले ,भारत विरोधी नारे दिले न्हाई मात्र उमर तेव्हा गप्पा बाजूला उभा होता पुढे जेव्हा उमर चा कार्यक्रम सुरु झाला भारत विरोधी घोषणा सुरु झाल्या तेव्हा अभाविप आली व प्रतुत्तर देण्यास सुरवात झाली तेव्हा कनैह्या चा समूह उमरचे कवच कुंडल बनून अभाविप ला थांबविण्याचे काम करत होता ,केंद्र सरकर ने अत्यंत हुशारीने सुरवातीचे काही दिवस काहीही न करता पुरावे गोळा करायला सुरवात केली जे कोर्टात येतीलच पण ह्या चार दिवसात कनैह्या व उमर हे बेफाम झाले , प्रत्येक टीव्ही चेनेल मध्ये येउन लाइव डिबेट मध्ये बडबड केली हीच बडबड कानैह्याला नडणार आहे उदा मी दिलेल्या लिंक मधून स्पष्ट अर्थ निघतो कि केवळ अभाविप मुळे हा कार्यक्रम थांबला म्हणून कनैह्या ने उमर ला मदत करायचे ठरवले माझ्यामते उमर चा कार्यक्रम सुरवातीला प्रशासनाने रद्द केला असता तर कनैह्या ने एवढे सक्रिय सहभाग घेतला नसता कदाचित कनैह्या चे अटक होण्याच्या पूर्वी अनार्ब , सरदाना ते दीपक चौरसिया ह्यांच्या कार्यक्रमात मुलाखतीत चीड आणणारी गोष्ट अशी कि माझ्या उमरच्या विचारांना पाठिंबा नाही मात्र त्यांना त्यान्ह्चे विचार मांड्यांची मोकळीक आहे ही त्यांची भूमिका आणि अभाविप चे गुंड मध्ये येउन हा कार्यक्रम कसा थांबतात हा सवाल , थोडक्यात उमर काय वाट्टेल ते बोलो मला काय त्यांचे सोयरसुतक नाही पण अभाविप विद्यापीठात सोकाळता कामा नये हा मुलगा जेल मधून बाहेर आला व भाषणबाजी केली करण थापर ने अनुपम फेम प्रसिद्ध जस्टीस गांगुली व इतर लोकांना बोलावून कनैह्या साठी कार्यक्रम केला. त्यात सुरवातीला कनैह्या च्या कार्यक्रमात काही लोक अध्यापक गिलानी साठी बोर्ड घेऊन होते ह्य्मुळे कानैह्याला काही त्रास होईल का अशी विचारणा केली त्यांनतर पध्धतशीर पणे कनैह्या साठी जस्टीस राणी ने कसा चुकीचा निर्णय अंतरीम जमीन देतांना दिला ह्यावर आख्यान सुरु झाले , ह्यात सगळ्यात दुर्दैवी गोष्ट जस्टीस गांगुली ह्यांना आपल्या सहकार्यांनी अफजल ला दिलेली फाशी चुकीची वाटली तिथे त्यांना कनिष्ठ न्यायाधीशांचा निर्णय कसा पटेल , त्यांनी जे करण दिले ते मला अंतर्मुख करून केले ह्या देशात देशद्रोहाची कायद्यात उल्लेख नाही व्याख्या नाही म्हंणून पूर्वी जे अश्या संधर्भात निर्णय देतांना कोर्टाने निरीक्षणे नोंदवली त्याचा दाखला त्यांनी दिला ह्यासाठी देशविरोधी नारे हा देशद्रोह नाही हा लाडका सिद्धांत देखील मांडला , अमेरिकन petrioat सारख्या कायद्याची भारताला किती नितांत गरज आहे ह्याची जाणीव झाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रदीप साळुंखे Tue, 03/08/2016 - 04:03 नवीन
अमेरिकन petrioat सारख्या कायद्याची भारताला किती नितांत गरज आहे ह्याची जाणीव झाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 04:07 नवीन
Petrioat म्हणजे??? तुम्हाला patriot असे म्हणायचे आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
श
श्री गावसेना प्रमुख Mon, 03/07/2016 - 13:28 नवीन
कन्हैय्या च्या प्रकरणात समर्थन करणाऱ्यांची संख्या जर बघितली तर मला मोदींची काळजी वाटायला लागते,पुढच्या इलेकशन ला मोदी पक्के हरणार आणि मूलनिवासी हे प्रचंड बहुमताने निवडणार आणिमोदींना जेल मध्ये टाकतील।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
V
viraj thale Mon, 03/07/2016 - 14:33 नवीन
सणसणीत
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट Mon, 03/07/2016 - 15:33 नवीन
देशामध्ये तीन-चार टक्के कम्युनिस्ट आहेत,तसेच मिपावरही एक-दोन आयडी कम्युनिस्ट असतील असे समजूया,आणि फाट्यावर मारूया. . . वंदे मातरम्।
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Mon, 03/07/2016 - 15:44 नवीन
माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे आताच्या सरकारने देशाच एवढ काय नुकसान केलय कि सगळे विचारवंत एवढे काळजीत पडलेत आणि एवढा विरोध करतायत मला तरी एक सामान्य माणूस म्हणून काय धोकादायक वाटत नाय(कदाचित मी सामान्य असल्यामुळे मला कळत नसेल)
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Mon, 03/07/2016 - 15:51 नवीन
दुकानदारी बंद पडल्याने बोखला गये है,बाकी जनतेला कुठलाच धोका नाही।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे
श
श्रीगुरुजी Mon, 03/07/2016 - 15:53 नवीन
हे जे विचारवंत, पुरोगामी इ. इ. समजले जात होते/आहेत, त्यांचा मोदी आल्यापासून रमणा बंद झाला आहे. त्यामुळे ही सगळी चिडचिड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे
न
निशांत_खाडे Mon, 03/07/2016 - 21:03 नवीन
चर्चा करायला मुद्दाच सापडत नाहीये न यांना.. त्यात हे कन्हैया प्रकरण सापडले आणि बस तुटूनच पडले सगळे.. रच्याकने, काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले होते कि बेंगलोरच्या एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारा अंतर्गत नरेंद्र मोदींवर होणाऱ्या शासकीय खर्चाची चौकशी केली. पंतप्रधान कार्यालयातून अशी माहिती देण्यात आली होती कि मोदींच्या कपड्यावर, जेवणावर व वयक्तिक मोबाईलच्या बिलावर शासनाकडून कुठलाही खर्च केला जात नाहीत, तो सर्व खर्च मोदी स्वतः करतात. त्यांच्या निवासस्थानी कार्यरत असलेल्या आचाऱ्याचा पगारही नरेंद्र मोदी स्वतःच देतात. एका व्यक्तीने तर मोदींच्या किचन मध्ये वापरल्या जाणाऱ्या मसाले व भाजीपाल्याची खरेदी पावती मागितली होती पण खर्च मोदींचा वयक्तिक स्वरूपाचा असल्याने ते जमले नाही. करत असल्याने ते देणे शक्य नव्हते. अश्याच एका दुसऱ्या उत्तरात असे सांगण्यात आले होते की मोदींनी कार्यभार स्विकारल्यापासून एकही रजा घेतलेली नाही व ते स्वतःच्या मानधनातील पंचेवीस हजार रुपये दरमहा 'पंतप्रधान आपत्कालीन मदत निधी' साठी दान करतात. लवकरच 'देशात लाखो लोक उपाशी असून सुद्धा मोदी दोन वेळा जेवण करतात हे निंदनीय आहे' असाही ऐकायला मिळायची शक्यता आहे.. दुवा: http://www.newindianexpress.com/thesundaystandard/Food-for-Thought-PM-Foots-His-Own-Kitchen-Bill/2015/12/27/article3197690.ece
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे
ग
गामा पैलवान Mon, 03/07/2016 - 15:57 नवीन
विवेक ठाकूर, आपला इथला प्रतिसाद वाचला. १. >> माझा आक्षेप अफजल आणि कन्हैयाला एकाच लाईनीत बसवण्याला आहे. असं बघा की जनेवित भारतद्रोही घोषणांचा जो प्रकार झाला तसाच अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीत तीनेक वर्षांपूर्वी झाला होता. तेव्हा अफझल गुरूला फासावर लटकवलं होतं. त्यावेळेस तर मोदीसरकारही नव्हतं. जर तेव्हाच अशा घटनांना चाप लावला असता तर आज जनेवित अशा भारतद्रोही घोषणा दिल्या गेल्या नसत्या. तर मग उद्या इतरत्र हाच प्रकार होऊ नये म्हणून आज कन्हैय्याला दमात घेतलं तर काय बिघडलं? २. >> .... सध्या जे सत्तेला विरोध म्हणजे देशद्रोह असं चित्रं रंगवलं जातंय त्या विरोधात आवाज उठवला आहे. काही अपेक्षा मनात ठेवून जनतेने मोदींना सत्तेत बसवलं आहे. त्या अपेक्षा अमुविच्या प्रसंगी पुऱ्या झाल्या नव्हत्या. अगदी अफझलला फासावर लटकावला तरीही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Tue, 03/08/2016 - 12:37 नवीन
आहो, एखाद्याला देशद्रोही ठरवणं म्हणजे त्याला बरबाद करणं आहे. काही अपेक्षा मनात ठेवून जनतेने मोदींना सत्तेत बसवलं आहे काय अपेक्षापूर्ती झालीये वाटतं तुम्हाला दोन वर्षात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 03/08/2016 - 16:28 नवीन
विठा, पुरी पाच वर्षं द्यायला हवीत ना? तरी माझ्या ज्या अपेक्षा पुऱ्या होताहेत असं वाटतंय त्या सांगतो. २६/११ सारखे घातपात तर बंद झाले ना? देशभर फटाक्यासारखे बॉम्बस्फोट व्हायचे ते बंद झाले ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
ट
ट्रेड मार्क Mon, 03/07/2016 - 21:30 नवीन
मोदी सरकारची तुलना हिटलर, मुसोलिनी ई ई बरोबर होत आहे तर RAW, CBI सरकारच्या हातातले बाहुले आहे असे म्हणले जाते. असे असेल तर ज्या प्रमाणे गेस्टापोने विरोधी लोकांचा कोणाला सुगावा लागू न देत काटा काढला तसं जरासुद्धा विरोधात बोलणाऱ्या या विद्यार्थ्यांना परस्पर वाटेला लावणे असे कितीसे अवघड असावे या फ़ासिस्ट सरकारला? एवढे सरळ सरळ देशविरोधी, धर्मविरोधी बोलणारे तर सगळेच गेले कित्येक महिने सुखेनैव बरळत आहेत. नाहीतर वद्रा परिवार (रोबर्ट सोडून) जसे सगळे ठराविक काळात यमसदनास गेले तसे या विद्यार्थ्यांना नाहीसे करणे अवघड नसावे. मग का सगळे एवढे बोंबलत आहेत? मे २०१४ पूर्वी आणि नंतर असा काय मोठा फरक झालाय तुमच्या आमच्या दैनंदिन जिवनात?
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 02:09 नवीन
मे २०१४ पूर्वी आणि नंतर असा काय मोठा फरक झालाय तुमच्या आमच्या दैनंदिन जिवनात? 1. मते थोड़ी वेगळी पडतात म्हणून मी राष्ट्रद्रोही असल्याचे इतकेवेळा (घाण घाण शिव्या देऊन) सांगितले गेले की आम्हाला फेसबुक प्रोफाइल डिलीट (डीएक्टिवेट नाही) करून सोशल मीडिया सन्यास घ्यावा लागला 2. काँग्रेस वाईट आहेच पण बीजेपी सुद्धा काही धुतल्या तांदळाची नाही अन वाईस वर्सा बोलल्याची जबर शिक्षा झाली 3. डाळ 200 ₹/किलो भावाने खावी लागते आहे 4. सर्विसटॅक्स वाढल्यामुळे बायको सोबत भांडणे अन स्वयंपाकघरातील भांड्यांना पोचे यायचे प्रमाण वाढले आहे!! तुर्तास इतके आठवले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
स
सुबोध खरे Tue, 03/08/2016 - 06:10 नवीन
नाना साहेब मूळ विषय काय ? आणी आपण तो कुठे नेताय? काहीही झाले कि "मोदी साहेबांवर आणी अच्छे दिन" वर टीका केल्याशिवाय तुमच्या घरात "डाळ" शिजत नाही का? डाळ महाग झाली म्हणून तुम्ही बोंब मारली कि कांदे स्वस्त झाले म्हणून इतर लोक तुम्हाला खिजवणार. विषय काय आणी आपण तो कुठे नेतो आहे? सर्विसटॅक्स वाढल्यामुळे बायको सोबत भांडणे अन स्वयंपाकघरातील भांड्यांना पोचे यायचे प्रमाण वाढले आहे!! बोंब मारायची ठरवलीच आहे म्हणून असे? अजून सेवा कर "वाढलेला" नाही. ०१ एप्रिल पासून वाढणार आहे. अगोदरच आपल्या भांड्यांना पोचे आले? आणी बायकोबरोबर भांडणे वाढली ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
त
तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 06:18 नवीन
तुम्ही अजूनही साडेबारा टक्के सेवाकर देताय का? शिंचे आमच्याच बिलात साडेचौदा टक्के का येतंय काय माहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 06:48 नवीन
आम्ही आदर करतो हो तुमचा, (आता तुम्ही तो मागत नाही आम्ही तो स्वतः उस्फुर्त देतो) कारण तुम्ही वय हुद्दा समज वगैरे ने वरिष्ठ अन ज्येष्ठ आहात, तुम्हीच जर काय बोलला पेक्षा कोण बोलला वर लक्ष द्यायला लागले तर आम्ही काय करु शकतो सरजी?? तुम्हाला माझा विरोध दिसला पण ट्रेडमार्क ह्यांनी विचारलेला प्रश्न नाही दिसला का? (मी हाईलाइट केलाय तरी तो). मला मुद्दा भरकटवायची हौस नाही साहेब, जो प्रश्न विचारला गेलाय त्याला प्रश्न प्रमाणिक राहून उत्तर दिले आहे, अन मुख्य म्हणजे मी स्वतःपुरते बोललो आहे, मला लाल पांढरे झेंडे खांद्यावर घेण्यात रस नाही तर लोकल सुटेल ह्या भीती ने फाटका टॉवल अन गंजीफ्रॉक खांद्यावर घेऊन बाथरूम कड़े धावण्यात रस आहे, मला एका प्रतिसादातून एक प्रश्न सापडला ज्याला मी "मॅटर ऑफ़ फॅक्ट" का काय म्हणतात तसा राहून माझ्या स्वल्प वैयक्तिक अनुभवानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय, तो तुम्हाला इतका खुपावा?? ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना खड़सावा की साहेब ज़रा ! का फ़क्त आम्हीच दिसतो! अन सेलेक्टिव खड़सावणे करायचे असेल तर सरळ सांगा की ते अन त्यांच्यासरखे तुमचे लाडके अन आम्ही तुमचे दोड़के ते!. आम्ही तरी तुम्हाला पुर्ण मिपाचा एसेट समजतो बुआ, अन आमचे वैयक्तिक श्रद्धास्थान, तसे नसता नेवी मधे जायचे म्हणाणाऱ्या धाकट्या भावाला तुमचे लेख पोथी सारखे पाठ करायला लावले नसते!. विद्यमान सरकारच्या काही गोष्टी पटतात काही नाही ज्या पटत नाहीत त्या मांडल्या तर आपण माझ्यावर शिक्के मारायची गरज नाही, मारू नयेत, अर्थात ही एक विनंती आहे! उणे अधिक माफ़ी असावी ____/\____ -नाना जाता जाता, दिल्लीत श्री श्री रविशंकर ह्यांच्या कार्यक्रमासाठी (खासगी संस्था खासगी कार्यक्रम) भारतीय भुदलाकडून पांटून ब्रिज बांधून घेत आहेत म्हणे? ह्यावर आपले मत एक अधिकारी म्हणून जाणून घ्यायला आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 03/08/2016 - 07:39 नवीन
1. मते थोड़ी वेगळी पडतात म्हणून मी राष्ट्रद्रोही असल्याचे इतकेवेळा (घाण घाण शिव्या देऊन) सांगितले गेले की आम्हाला फेसबुक प्रोफाइल डिलीट (डीएक्टिवेट नाही) करून सोशल मीडिया सन्यास घ्यावा लागला याबद्दल मला कोणतीही माहिती नाही. बाकी डाळी किंवा कांद्याच्या भावाबद्दल आरडा ओरड मूळ मुद्द्याच्या व्यस्त प्रमाणात झाली आहे त्याबद्दल वाईट वाटते. मुद्दा बरोबर कि चूक याबद्दल मी काहीही बोलत नाहीये. मुद्दा महागाई का झाली आहे आणि किती झाली आहे? याला मोदी सरकार किती जबाबदार आहे? अवर्षण किती आणि आन्तर राष्ट्रीय परिस्थिती किती जबादार आहे याचा नीट उहापोह न करता सवंग विधाने करणारे लोक. आन्तर राष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्या तरी आमच्या किमती कमी का होत नाहीत याबद्दल ओरडणार्या लोकांना समजावणे कठीण आहे. सवंग लोकप्रियते साठी (सीताराम येचुरी म्हणतात तसे) लोकांना स्वस्त पेट्रोल/ डीझेल देण्यापेक्षा दूरगामी आपला राखीव तेलसाठा निर्माण करण्यासाठी हा पैसा वापरला गेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न करून उपयोग होत नाही http://www.isprlindia.com/aboutus.asp http://www.isprlindia.com/aboutus-2.asp http://economictimes.indiatimes.com/industry/energy/oil-gas/sought-rs-15000-crore-in-budget-for-second-phase-of-strategic-oil-reserves-project-oil-minister-dharmendra-pradhan/articleshow/50848724.cms http://www.livemint.com/Politics/zLaLDxE5ZbpiKcQXcW20AP/UAEs-Adnoc-to-store-crude-in-Indias-strategic-facility.html हा पैसा तुम्हाला स्वस्तात पेट्रोल आणि डीझेल दिले तर सरकार कुठून आणेल? आणि डीझेल स्वस्त केले नाही तर महागाई होणार कारण दुष्काळ आणि जागतिक मंदी आहेच जी काही मोदी सरकारने केलेली नाही. इंग्रजीत म्हण आहे कि शांततेच्या काळात तुम्ही जितका घाम गाळाल तितके युद्धात तुम्हाला कमी रक्त सांडावे लागेल. एक गोष्ट नक्की आहे कि गेल्या पाच वर्षात कोणताही निर्णय न घेतल्याने जे नुकसान झाले आहे त्या प्रमाणात हे सरकार जसे देशा बद्दल निर्णय घेत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. बहुसंख्य पत्रकार आणि डावे लोक यांचा रमणा बंद झाला आहे म्हणून त्यांची कोल्हे कुई चालू आहे हीही वस्तुस्थिती आहे. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
त
तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 07:48 नवीन
बहुसंख्य पत्रकार आणि डावे लोक यांचा रमणा बंद झाला आहे म्हणून त्यांची कोल्हे कुई चालू आहे हीही वस्तुस्थिती >> बाकीचं नंतर, पण हे वाक्य फार वाचायला मिळतंय. ह्याबद्दल काही पुरावा आहे काय? म्हणजे आधी होता ह्याचा आणि आता बंद झालाय ह्याचाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 03/08/2016 - 07:57 नवीन
तुम्हाला पुरावा देण्यासाठी कष्ट घ्यावे असे मला अजिबात वाटत नाही. याचा तुम्हाला पाहिजे तो अर्थ तुम्ही काढू शकता. वरच्या विधानातील फक्त संदिग्ध वाक्य निवडून बाकी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं किंवा बळी गेलेल्या निरपराध लोकांवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे किंवा रवींद्र म्हात्रे यांचे कष्ट सोडून टूण्डाचे किंवा सलमान खानचेच कष्ट तुम्हाला दिसतात तेंव्हा आपल्याशी अधिक बोलण्याची माझी अजिबात इच्छा नाही. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 08:42 नवीन
मी काहीही दुर्लक्ष केले नाही. 'बाकीचे नंतर' बोललो. तुम्ही वस्तुस्थिती आहे असे म्हणून वाक्य लिहिता, विचारले तर संदिग्ध आहे म्हणता याचा काय अर्थ घ्यावा? बाकी बळी गेलेले, म्हात्रे, कष्ट इत्यादी असंबंधित मुद्दे इथे मांडून भावनिक संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. बरं जिथे टुंडाचा विषय मांडला तो न्यायालयाचा निकाल मान्य आहे की नाही हाच प्रश्न विचारण्यासाठी होता. माझे टूंडाबद्दल भारी प्रेम उतू चाललंय म्हणुन नाही. तुम्ही त्याला अजून उत्तर दिले नाही पण टुंडाचा इतिहास बघा चे उपदेश मला दिले. टुंडा, अफझल, कन्हया, साध्वी, संजय दत्त, भटकल, जुन्दाल, समीर यांबद्दल न्यायालय जो निर्णय दिला/देईल तो मला मान्य असेल असे मी म्हटले, तुम्ही तसे म्हटलेले नाही. हा दांभिकपणा आहे. मुद्दा टूंडा किंवा सलमान खानचा नाही हे शेंबड्या पोरालाही कळेल. जेव्हा नावडते आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटतात तेव्हा न्यायालयात न्याय होत नाही असे म्हणता, तेच नावडते निरपराध अडकले की न्यायालयाने कसे फटकारले ह्याचे गुणगान गाता. हा दुटप्पीपणा आहे. हा प्रश्न तुम्ही टाळत आहात. तुम्ही वस्तुस्थिती आहे असे म्हणुन बेधडक विधानं करता, त्याबद्दल विचारले तर उत्तर देता येत नाही म्हणून पलायन करता. तुमची बाजू सांभाळायला मग दुसरे सदस्य येतात. चर्चेत टिकत नाही बघून भावनिक कोलांट्या मारणे आपल्यासारख्या सदस्यांना मुळीच शोभत नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 07:55 नवीन
तेलाच्या भावा बद्दल मी काही तरी म्हणले आहे का? हे एक, तेलाच्या भावाबद्दल किंवा कच्चे तेल बाजाराबद्दल मला शुन्य माहीती आहे म्हणून मी त्यावर बोलतच नाहीये, शिवाय आधीच्या सरकार पेक्षा कमी भावात पेट्रोल मिळते आहे म्हणून मी आनंदी सुद्धा आहे, डाळी बद्दल मला झळ पोचते आहे म्हणून मी तितके मात्र बोलतोय बाकी डाळ उद्योगाबद्दल मिपावरचे दूसरे एक सदस्य श्री सोन्याबापु ह्यांनी विस्तृत माहीती देऊन डाळ तुटवडा हा नैसर्गिक नसुन मानवनिर्मित आहे अन त्याच्यामागे जमाखोर व्यापारी आहेत हे विवेचन "एका वर्षा नंतर" ह्या धाग्यात केल्याचे स्मरते, माफ़ करा पण मला खोदकामात गती नाही म्हणून लिंक देऊ शकत नाहीये मी, तरीही वरती उल्लेख केलेल्या धाग्यात ते सापडु शकेल असे सुचवतो. एक व्यनि सोन्याबापु ह्यांना टाकून जमल्यास ती माहीती तुमच्यासाठी मागवु शकतो, (जर त्यांना द्यावी वाटली तर) बहुत काय बोलणे, मी पत्रकार पण नाही अन सरकारी मलाई खाणारा डावा विचारवंत सुद्धा नाही त्यामुळे ते उल्लेख का केले आपण हे काही मला कळले नाही बघा साहेब. सरकार माझ्यासारख्याना जे रिलीफ देत आहे त्याचे कौतुक आहेच पण ज्याच्यात मला त्रास आहे ते मात्र मी मांडतो आहे अन मांडत राहीन इतके सांगतो अन आपली रजा घेतो आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 03/08/2016 - 08:06 नवीन
The government budgeted a contribution of Rs.20,000 crore for the fund in fiscal year 2015-16 while another Rs.20,000 crore is expected to be raised from sovereign wealth funds हे शेवटच्या दुव्यातील वाक्य आहे नाना साहेब २०,००० कोटी रुपये या वर्षात आणी तितकेच पुढच्या वर्षात सरकारला जनतेकडूनच घ्यावे लागतील ना? मग २० कोटी लोक जे कर भरतात/ भरू शकतात (उच्च आणी मध्यम वर्गीय) त्यांच्या कडून हा पैसा जर घ्यायचा तर माणशी १००० रुपये वर्षाला होतात. हि महागाई तुम्हाला आहे तशी मला हि आहे पण दूरदृष्टीचा विचार केल्यास हा पैसा देणे श्रेयस्कर आहे. वरील तिन्ही दुवे एकदा वाचून घ्या अशी तुम्हाला विनंती आहे. आणी हेही आपल्याला पटत नसेल तर सोडून द्या अधिक उणे काही अनवधानाने बोललो असेल क्षमा करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
त
तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 08:55 नवीन
२०,००० कोटी रुपये या वर्षात आणी तितकेच पुढच्या वर्षात सरकारला जनतेकडूनच घ्यावे लागतील ना? मग २० कोटी लोक जे कर भरतात/ भरू शकतात (उच्च आणी मध्यम वर्गीय) त्यांच्या कडून हा पैसा जर घ्यायचा तर माणशी १००० रुपये वर्षाला होतात. >> माणशी १५ लाख होतील एवढा काळापैसा आहे म्हणत आणि तो १०० दिवसात देशात परत आणू अन्यथा फाशी चढवा हे म्हणले. त्याबद्दल अजिबात विचारु नका आणि हे माणशी हजार रुपये म्हणजे कैच नै, देशासाठी एवढा त्याग करा असल्या बाता ऐकायला लागतायत. मोदींच्या सरकार चालवण्याच्या पद्धती, निर्णय ह्याबद्दल अजिबात चीड, राग, द्वेष नाही. पण भक्तांच्या असल्या तर्कांनी प्रचंड राग येतो. उद्या मोदी म्हणतील श्वास घेणे देशासाठी योग्य नाही तर हे भक्त काय करतील देव जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Tue, 03/08/2016 - 11:05 नवीन
माणशी १५ लाख होतील एवढा काळापैसा आहे म्हणत आणि तो १०० दिवसात देशात परत आणू अन्यथा फाशी चढवा हे म्हणले.
(१) माणशी १५ लाख होतील एवढा काळापैसा आहे असे नरेंद्र मोदी कोठे व केव्हा म्हणाले याचा संदर्भ देता का? (२) काळा पैसा १०० दिवसात परत न आणल्यास मला फासावर चढवा असे नरेंद्र मोदी कोठे व केव्हा म्हणाले याचा संदर्भ देता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
व
विवेक ठाकूर Tue, 03/08/2016 - 11:38 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विवेक ठाकूर Tue, 03/08/2016 - 15:32 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
श
श्रीगुरुजी Tue, 03/08/2016 - 16:18 नवीन
तुम्हाला फार घाई बुवा. मागे मिपावर एक उंदीरमामा होते. ते मिपावर दिवसरात्र पडीक असायचे. ते काहीतरी प्रतिसाद द्यायचे आणि त्याला १-२ मिनिटात उत्तर नाही आले तर लगेच "गुरूजी धाग्यावरून पळून गेले", "गुरूजींनी या धाग्यावरून काढता पाय घेतला" अशी स्वत:चीच सोयिस्कर समजूत करून घेऊन मनोमन खूष व्हायचे. तुमचंही तसंच दिसतंय. मी काही इथे २४ तास पडीक नसतो. दुपारी जेवणानंतर थोडा वेळ आणि संध्याकाळी थोडा वेळ मी इथे येतो. इतरवेळी पोटापाण्यासाठी उद्योग करावा लागतो. तुमचं बरं आहे. तुम्ही सदासर्वकाळ इथे राहू शकता. माझ्या अनुपस्थितीत वरील प्रतिसाद आल्यावर मी इथे नसल्याने त्यावर माझ्याकडून लगेच उत्तर आले नाही तर लगेच "गुरूजींची वाचा बसली" अशी तुम्ही सोयिस्कर समजूत करून घेऊन खूष झालेले दिसताय. काही हरकत नाही. माझ्या अनुपस्थितीमुळे एखादा आनंदी होत असेल तर चांगलंच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
श
श्रीगुरुजी Tue, 03/08/2016 - 16:11 नवीन
ही फीत सर्वत्र प्रसिद्ध आहेच. मीसुद्धा ती पूर्वी पाहिली आहे. परंतु काळा पैसा १०० दिवसात परत न आणल्यास मला फासावर चढवा असे नरेंद्र मोदी कोठे व केव्हा म्हणाले याचा संदर्भ देता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
ग
गामा पैलवान Tue, 03/08/2016 - 16:32 नवीन
काहीही हं विठा! मोदींनी विदेशी पैशाचा आकडा लक्षात यावा म्हणून फक्त उदाहरण दिलंय की प्रत्येक भारतीयास पंधरावीस लाख रुपये असेच मिळून जातील. याचा अर्थ अस नव्हे की मोदी तो पैसा आणून वाटणार आहेत. (तसा तो आणून वाटला तर चलनफुगवटा भयानक वाढेल त्याचं काय करायचं?) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
म
मोदक Tue, 03/08/2016 - 16:38 नवीन
असे कसे म्हणता गापै?? रघुराम राजन सही करून म्हणतात "मै धारक को अमुक अमुक रूपये अदा करने का वचन देता हूं" ते म्हणजे रघुराम राजन साहेब त्यांच्या खिशातून अदा करतात - तुमा झंटलमेन लोकांना इत्के शिंपल कळत नै का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
व
विवेक ठाकूर Tue, 03/08/2016 - 18:49 नवीन
गुरुजींचे दोन प्रश्न होते. पैकी पहिला प्रश्न हा होता : (१) माणशी १५ लाख होतील एवढा काळापैसा आहे असे नरेंद्र मोदी कोठे व केव्हा म्हणाले याचा संदर्भ देता का? आता विडिओ दिल्यावर त्यांनी दुसरा प्रश्न पुढे काढून, पहिला मागे सारला आहे .... ही फीत सर्वत्र प्रसिद्ध आहेच. मीसुद्धा ती पूर्वी पाहिली आहे. परंतु काळा पैसा १०० दिवसात परत न आणल्यास मला फासावर चढवा असे नरेंद्र मोदी कोठे व केव्हा म्हणाले याचा संदर्भ देता का? मोदींचं भाषण ही भोळ्या जनतेला फसवायची एक चाल होती (आणि भारतात अशा मतदारांची संख्या अमाप आहे)... कारण निवडून आल्यावर त्यांचे अमीत शहा निर्ल्लज्जपणे `वो तो चुनावी जुमला था' असं म्हणालेत. आणि म्हणून तर बिजेपीला भारतीय जुमला पार्टी म्हणतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Tue, 03/08/2016 - 18:59 नवीन
आता विडिओ दिल्यावर त्यांनी दुसरा प्रश्न पुढे काढून, पहिला मागे सारला आहे ....
मुळात त्यांनी दोन मुद्दे एकत्र केले होते (माणशी १५ लाख व काळा पैसा परत न आणल्यास मला फाशी द्या). मी ते मुद्दाम वेगळे करून विचारले. पहिल्या मुद्द्याची चित्रफीत दिल्याने त्या मुद्द्यावर वाद नाही. दुसरा मुद्दा पहिल्या मुद्द्याशीच संबंधित आहे व त्यात त्यांची तपशिलाची चूक झाली आहे. म्हणून तर मी त्यांना दुसर्‍या मुद्द्याचाही संदर्भ विचारला. तो अजून त्यांनी दिलेला नाही.
मोदींचं भाषण ही भोळ्या जनतेला फसवायची एक चाल होती (आणि भारतात अशा मतदारांची संख्या अमाप आहे)... कारण निवडून आल्यावर त्यांचे अमीत शहा निर्ल्लज्जपणे `वो तो चुनावी जुमला था' असं म्हणालेत. आणि म्हणून तर बिजेपीला भारतीय जुमला पार्टी म्हणतात!
असले सब्जेक्टिव्ह व स्वतःचा मनचे लिहू नका. याच न्यायाने केजरीवालांची आश्वासने ही दिल्लीतल्या भोळ्या जनतेला फस्विण्याची एक चाल होती कारण दिल्लीत अशा मतदारांची संख्या अमाप आहे किंवा नितीशकुमार/लालूची आश्वासने ही बिहारमधील भोळ्या जनतेला फस्विण्याची एक चाल होती कारण बिहारमध्ये अशा मतदारांची संख्या अमाप आहे असे म्हणता येईल. काळा पैसा परत न आणल्यास मला फाशी द्या असे मोदी कोठे व कधी म्हणाले त्याचा संदर्भ हवा आहे. तो असल्यास द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
त
तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 19:46 नवीन
सरळ प्रश्न विचारला की भक्त कसे उत्तरं देतात ह्याचा हा उत्तम नमुना. काळा पैशाचं काय झालं तो प्रश्न सोयिस्कर बाजूला टाकून हे फाशीचं कधी बोलले हेच राहून राहुन विचारताय. आश्वासनं देऊन जनतेला फसवलंय म्हटलं तर इतरांचे दाखले देतात. मग त्यांच्यात आणि तुमच्या काय तो डिफरंस? आधी काळ्या पैशाचं काय झालं ते सांगा जमलं तर. माणशी १५ लाख होतील एवढी रक्कम आहे म्हणे परदेशात. आमच्या अकाऊंट ला येणार नाही ते आम्हालाही माहित आहे. तेवढं अर्थशास्त्र कळतं. पण देशाच्या अकाउंटमधे तर येणार होते की नाही? त्यानेच विविध योजना, रस्ते, पाणी, वीज इत्यादींचे प्रश्न सुटणार होते. मग आता काळा पैशाच्या मुद्द्यावर टांग मारुन देशासाठी योगदान असे मोठेमोठे शब्द वापरुन प्रामाणिकपणे कर भरनार्‍यांच्याच खिशात हात घातला. वरुन हजार रुपये फार नाही हो देशकार्यासाठी असे भक्त निर्लज्जपणे म्हणायला. लक्षात घ्या काळा पैशाच्या मुद्द्याने भाजपाला निवडणुक जिंकण्यात सिंहाचा वाटा निभावलाय. त्याचे उत्तर द्यायचे सोडून फुटकळ डिटेल्समधे चर्चा फिरवू नका. भाजपने आपले प्रॉमिस निभावले काय हे सांगा मग फाशीचा संदर्भ सांगतो. भाजपाच्या राजकिय विरोधकांच्या नानाची टांग, हा प्रश्न तुम्हालाच मत देणारी जनता विचारते तेव्हा काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अर्धवटराव Tue, 03/08/2016 - 19:52 नवीन
या मुद्द्याशी असहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/10/2016 - 13:50 नवीन
असहमतीशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
व
विवेक ठाकूर Wed, 03/09/2016 - 02:31 नवीन
आमच्या अकाऊंट ला येणार नाही ते आम्हालाही माहित आहे. तेवढं अर्थशास्त्र कळतं. पण देशाच्या अकाउंटमधे तर येणार होते की नाही? त्यानेच विविध योजना, रस्ते, पाणी, वीज इत्यादींचे प्रश्न सुटणार होते. मग आता काळा पैशाच्या मुद्द्यावर टांग मारुन देशासाठी योगदान असे मोठेमोठे शब्द वापरुन प्रामाणिकपणे कर भरणार्‍यांच्याच खिशात हात घातला.
आधी स्वच्छ भारत अभियान आणि आता शेतकरी कल्याण ! हे भिकार सरकार फक्त नवे भावनिक शब्द काढून लोकांना लुटण्याचा धंदा करते आहे. अर्थात, मोदींचं कोणतंही भाषण पाहा निव्वळ भावनिक आव्हानं आणि पवारांचे गुरु शोभावे अशी निसरडी गुळगुळीत विधानं. त्यामुळे `काम काय झालं?' असा प्रश्न आला की कुठूनही आणि कशीही कोलांटी मारायला मोकळे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ब
बोका-ए-आझम Wed, 03/09/2016 - 16:31 नवीन
कचरा साफ होणार असल्यामुळे कच-याला ते खटकणं स्वाभाविकच म्हणावं लागेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
श
श्रीगुरुजी Wed, 03/09/2016 - 10:36 नवीन
सरळ प्रश्न विचारला की भक्त कसे उत्तरं देतात ह्याचा हा उत्तम नमुना. काळा पैशाचं काय झालं तो प्रश्न सोयिस्कर बाजूला टाकून हे फाशीचं कधी बोलले हेच राहून राहुन विचारताय. आश्वासनं देऊन जनतेला फसवलंय म्हटलं तर इतरांचे दाखले देतात. मग त्यांच्यात आणि तुमच्या काय तो डिफरंस?
तुमच्या मूळ प्रतिसादात (१) माणशी १५ लाख रूपये इतका काळा पैसा आणि (२) काळा पैसा १०० दिवसात परत न आणल्यास मला फाशी द्या असे मोदी म्हणाले , असे दोन मुद्दे एकत्र जोडले होते. पहिल्या मुद्द्याची चित्रफीत सर्वत्र प्रसिद्ध आहे त्यामुळे त्याबाबतीत खर्‍याखोट्याचा मुद्दाच नव्हता. दुसरा मुद्दा मात्र निखालस खोटा होता. हे मला माहित होते. म्हणूनच मी दोन्ही मुद्दे वेगळे करून त्याबाबतीतला पुरावा मागितला. पहिल्या मुद्द्याची चित्रफीत आहेच आणि ती तुम्ही विजयी आविर्भावात देणार याची खात्रीच होती. दुसरा मुद्दा निखालस खोटा होता आणि त्याबाबतीत तुम्ही मौन पाळणार हेही मला माहित होते. तुम्ही दोन मुद्दे पुढे आणले. एका मुद्द्याचे पुरावे आहेत आणि दुसरा खोटा आहे. म्हणूनच मी त्याबद्दल विचारतोय.
आधी काळ्या पैशाचं काय झालं ते सांगा जमलं तर.
http://www.ndtv.com/india-news/3-770-crore-surfaces-in-governments-black-money-drive-1225010 http://zeenews.india.com/business/news/finance/sebi-bars-22-brokers-for-tax-evasion-trades-of-rs-8100-crore_1856691.html http://zeenews.india.com/business/taxes/tax-news/black-money-modi-govt-collects-rs-2428-crore-tax-from-644-entities_1842325.html http://zeenews.india.com/business/news/economy/black-money-over-rs-16000-cr-undisclosed-income-detected-in-20-months_1837564.html सर्वोच्च न्यायालयाने काळा पैसा परत आणण्यासाठी एका एसआयटीची स्थापना केली असून त्याचे काम सुरू झाले आहे. http://zeenews.india.com/business/news/economy/black-money-sit-asks-dri-to-verify-if-505-billion-flown-out-of-india-from-2004-13_1855888.html स्विस बँकेतील काळा पैसा परत आणण्यासाठी भारत व स्वित्झर्लँड सरकारमध्ये बोलणी सुरू आहेत. http://zeenews.india.com/business/news/economy/black-money-significant-progress-in-tax-cooperation-with-india-says-swiss-govt_1850946.html अजून बर्‍याच गोष्टी सुरू आहेत. या विषयावरील प्रत्येक अपडेट्स सर्व माध्यमात येतातच असे नाही.
भाजपने आपले प्रॉमिस निभावले काय हे सांगा मग फाशीचा संदर्भ सांगतो.
कधी देताय संदर्भ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 03/09/2016 - 11:24 नवीन
अजून बर्‍याच गोष्टी सुरू आहेत. या विषयावरील प्रत्येक अपडेट्स सर्व माध्यमात येतातच असे नाही. >> बरोबर. ते फक्त झी न्यूज आणि तुमच्याकडेच येतात. कधी देताय संदर्भ? >> जेवढा काळा पैसा मोदींनी प्रॉमिस केलाय (१५ लाख पर पर्सन) तेवढा सगळा भारतात आल्यावर नक्की देऊ. अन्यथा मला फासावर चढवा. विश्वास आहे ना... मोदींवर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/10/2016 - 13:45 नवीन
अजून बर्‍याच गोष्टी सुरू आहेत. या विषयावरील प्रत्येक अपडेट्स सर्व माध्यमात येतातच असे नाही. >> बरोबर. ते फक्त झी न्यूज आणि तुमच्याकडेच येतात.
मी दिलेल्या लिंक्स वेगवेगळ्या माध्यमांच्या आहेत. या बातम्या पहिल्या पानावर फारश्या येत नाहीत. वाहिन्यांवर यावर चर्चा देखील होताना दिसत नाही. मराठी वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांवर तर याबाबतीत क्वचितच काही ऐकू येते. एनीवे, काळा पैसा परत आणण्याच्या संदर्भात जी पावले उचलली गेली आहेत त्याविषयी मी अनेक संदर्भ दिलेले आहेत. कधी देताय संदर्भ? >> जेवढा काळा पैसा मोदींनी प्रॉमिस केलाय (१५ लाख पर पर्सन) तेवढा सगळा भारतात आल्यावर नक्की देऊ. अन्यथा मला फासावर चढवा. विश्वास आहे ना... मोदींवर? अगदी अपेक्षित उत्तर. फाशीसंदर्भात तुम्ही एक पुडी सोडून दिली होती. ती बातमी खोटीच होती. त्यामुळे तुमच्याकडे त्याचे कोणतेच संदर्भ/पुरावे नाहीत. आपण केलेला खोटा दावा मागे घ्याल का? एनीवे, एका धाग्यात तुम्ही मला "बिनपुराव्यांची आगगाडी" असे म्हणाला होता त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/10/2016 - 14:04 नवीन
या बातम्या पहिल्या पानावर फारश्या येत नाहीत. वाहिन्यांवर यावर चर्चा देखील होताना दिसत नाही. मराठी वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांवर तर याबाबतीत क्वचितच काही ऐकू येते. >> महत्त्वाच्या असतील तेव्हाच बातम्या पहिल्या पानावर येतील ना, तेव्हाच चर्चा होईल ना. अशा धूळफेक बातम्यांनी तुमच्यासारख्या समर्थकांची छाती अभिमानाने भरुन येत असेल, पण देशाच्या अकाऊंट मधे पैसा येत नाही. एनीवे, काळा पैसा परत आणण्याच्या संदर्भात जी पावले उचलली गेली आहेत त्याविषयी मी अनेक संदर्भ दिलेले आहेत. >> पावले उचलण्याच्या बातम्यांना काहीही महत्त्व नाही. काम झाले तरच अर्थ आहे. फाशीसंदर्भात तुम्ही एक पुडी सोडून दिली होती. ती बातमी खोटीच होती. त्यामुळे तुमच्याकडे त्याचे कोणतेच संदर्भ/पुरावे नाहीत. आपण केलेला खोटा दावा मागे घ्याल का? >> काळापैशाबाबत भाजपाने, मोदींनी पुडी सोडून दिली होती. त्याबद्दल त्यांना जाब विचारला काय? जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ... माझ्यासारख्या सामान्य माणसाने एका संस्थळावर एक विधान केले तर ते खोटं आहे मान्य करा म्हणताय. मोदींनी तुम्हाला पावले उचलली आहेत नामक चॉकलेट दिलंय तर आनंदाने खाताय. कशाला किती महत्त्व द्यायचे ते आधी शिका गुरुजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/10/2016 - 14:52 नवीन
महत्त्वाच्या असतील तेव्हाच बातम्या पहिल्या पानावर येतील ना, तेव्हाच चर्चा होईल ना. अशा धूळफेक बातम्यांनी तुमच्यासारख्या समर्थकांची छाती अभिमानाने भरुन येत असेल, पण देशाच्या अकाऊंट मधे पैसा येत नाही.
धूळफेक! धन्य आहे. मी दिलेल्या लिंक्स उघडा आणि नीट वाचा.
पावले उचलण्याच्या बातम्यांना काहीही महत्त्व नाही. काम झाले तरच अर्थ आहे.
नुसती पावले नाहीत ती! प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हाच सुरु झाली आहे आणि देशाच्या खात्यात पैसे परत यायला सुरूवात झालेली आहे. मी दिलेल्या लिंक्स उघडा आणि नीट वाचा.
काळापैशाबाबत भाजपाने, मोदींनी पुडी सोडून दिली होती. त्याबद्दल त्यांना जाब विचारला काय? जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ...
पुडी? कमाल आहे. तुमची माहिती कमी आहे. मी दिलेल्या लिंक्स उघडा आणि नीट वाचा.
माझ्यासारख्या सामान्य माणसाने एका संस्थळावर एक विधान केले तर ते खोटं आहे मान्य करा म्हणताय. मोदींनी तुम्हाला पावले उचलली आहेत नामक चॉकलेट दिलंय तर आनंदाने खाताय. कशाला किती महत्त्व द्यायचे ते आधी शिका गुरुजी.
नुसती पावले नाहीत ती! प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हाच सुरु झाली आहे आणि देशाच्या खात्यात पैसे परत यायला सुरूवात झालेली आहे. मी दिलेल्या लिंक्स उघडा आणि नीट वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा