Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अफझल गुरू : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

श
श्रीगुरुजी
Sun, 03/06/2016 - 08:28
🗣 339 प्रतिसाद
दहशतवादाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. Afzal Guru’s last interview यापूर्वी त्याचा आजतक वर डिसेंबर २००१ मध्ये घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.

प्रतिक्रिया द्या
65789 वाचन

💬 प्रतिसाद (339)
ब
बाळ सप्रे Wed, 03/09/2016 - 12:00 नवीन
पहिल्या मुद्द्याची चित्रफीत सर्वत्र प्रसिद्ध आहे त्यामुळे त्याबाबतीत खर्‍याखोट्याचा मुद्दाच नव्हता
म्हणजे काळा पैसा (१५लाख माणशी) १०० दिवसात आणण्याचे वचन ही मोदी/ भाजपची चूक होती. त्यातल्या काँप्लेक्सिटीचा अंदाज नव्हता/ केवळ निवडणूक जिंकायला केलेलं विधान. हे गुरुजींना मान्य का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/10/2016 - 13:47 नवीन
म्हणजे काळा पैसा (१५लाख माणशी) १०० दिवसात आणण्याचे वचन ही मोदी/ भाजपची चूक होती. त्यातल्या काँप्लेक्सिटीचा अंदाज नव्हता/ केवळ निवडणूक जिंकायला केलेलं विधान. हे गुरुजींना मान्य का?
काळा पैसा (त्यांच्या अंदाजानुसार १५ लाख माणशी) परत आणण्याबद्दल मोदी बोलले होते. १०० दिवसात आणीन, नाही आणला तर मला फासावर चढवा, परत आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करीन असे ते काहीही बोलले नव्हते. काळा पैसा परत आणण्या संदर्भात त्यांनी गेल्या २१ महिन्यात काय केले आहे त्याचे अनेक संदर्भ मी वर दिले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे गुरुवार, 03/10/2016 - 13:53 नवीन
माझ्या प्रश्नात फासावर चढवण्याचा उल्लेख नाही.. काय काय चालू आहे ते मी वाचलय पण १०० दिवसात प्रत्येकी १५ लाख झाले नाहीत तेव्हा ते विधान चुकल हे मान्य का? (पुन्हा एकदा प्रश्न स्पष्ट केलाय) दुसर्‍या प्रतिसादातील वाक्य इथे घुसवून गोलगोल करणे टाळा. एवढच बघायचय की मान्य होतेय का चूक ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/10/2016 - 14:47 नवीन
परत तेच! किती वेळा सांगायचं? काळा पैसा परत आणणार (जो मोदींच्या अंदाजानुसार प्रतिमाणशी १५ लाख रु. असावा) असे ते बोलले होते. हा काळा पैसा १०० दिवसात परत आणणार असे ते कोठेही बोलले नव्हते. तसे ते बोलले होते असे तुम्हाला वाटत असल्यास त्याची लिंक द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ह
होबासराव गुरुवार, 03/10/2016 - 14:52 नवीन
बातमि वाचलि का ? नव-युगपुरुषावर गाझियाबाद च्या एका तरुणाने हल्ला केलाय जेएनयु त, हल्ला करण्याचे कारण नव-युगपुरुषांचे आर्मि-काश्मिर वरिल मुक्ताफळे. दया कुछ तो गडबड है...कहि ये फिर से वोहि स्याहि फेक - तमाशा देख वालि स्ट्रॅटेजि तो नहि ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/10/2016 - 14:55 नवीन
त्यापेक्षा इथे जास्त महत्त्वाची बातमी आहे. http://www.thehindu.com/news/cities/Delhi/jnu-student-found-dead-in-delhi/article8336159.ece?homepage=true जेएनयुतील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची बातमी आहे. त्याची जात कोणती हे अजून बातमीत आले नाही. जातीने दलित असला तर राहुल, केजरीवाल इ. मंडळी तातडीने धावत जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव गुरुवार, 03/10/2016 - 15:00 नवीन
२५ वर्षाचा होता फक्त तो विद्यार्थि, अस काय ह्यांच्या मनात वादळ चाललियत / चालवलियत का हे पुढचा मागचा विचार न करता आत्महत्या करताहेत. वाईट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बाळ सप्रे Fri, 03/11/2016 - 08:02 नवीन
मोदी १५ लाख बोलले. राजनाथ १०० दिवसात आणण्याचं बोलले होते.. https://www.youtube.com/watch?v=UZ8FfN0E4lQ म्हणजे बीजेपीचे प्रॉमिस १५लाख माणशी १०० दिवसात असा माझा अंदाज..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मार्मिक गोडसे Wed, 03/09/2016 - 11:42 नवीन
लक्षात घ्या काळा पैशाच्या मुद्द्याने भाजपाला निवडणुक जिंकण्यात सिंहाचा वाटा निभावलाय.
मी स्वतः ह्या मुद्द्यावर सरकारच्या विजयाला हातभार लावला होता. आता शंभरावर किती शून्य वाढवतात ते फक्त बघत रहायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 03/09/2016 - 11:46 नवीन
ते शंभर तरी राहतात का ते पाहा ;-) इथे सरकार देशकार्यासाठी हजार रुपये मागतंय. तुमचं अकाउंट मायनस नउशे दाखवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ब
बाळ सप्रे Wed, 03/09/2016 - 11:51 नवीन
ते १०० दिवसांबद्दल बोलतायत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 03/09/2016 - 12:11 नवीन
अरे हां. सॉरी चुकलंच. पैशाबद्दलच विचार करतोय, दिवसांचं डोक्यात अजिबात नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
न
नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 07:18 नवीन
अन बायको सोबत भांडण होते हे सिंबॉलिक आहे, हे ही आता स्पष्ट करावे लागणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
ट्रेड मार्क Tue, 03/08/2016 - 21:32 नवीन
मते थोड़ी वेगळी पडतात म्हणून मी राष्ट्रद्रोही असल्याचे इतकेवेळा (घाण घाण शिव्या देऊन) सांगितले गेले की आम्हाला फेसबुक प्रोफाइल डिलीट (डीएक्टिवेट नाही) करून सोशल मीडिया सन्यास घ्यावा लागला
आपण आपल्याला साजेशी मते असलेल्या लोकांबरोबर चर्चा करावी. सोसल मेडियावर आपल्याला आणि इतरांना सोसंल तेवढच बोलावं. सोसल मेडिया वर कुठे कसं बोलावं आणि वागावं हे कळले म्हणजे तारतम्य बाळगले की हे असले virtual त्रास होत नाहीत. चेपुवर तुम्हाला लोकांनी शिव्या घातल्या म्हणून सरकार जबाबदार धरताय तुम्ही? कमाल आहे.
डाळ 200 ₹/किलो भावाने खावी लागते आहे सर्विसटॅक्स वाढल्यामुळे बायको सोबत भांडणे अन स्वयंपाकघरातील भांड्यांना पोचे यायचे प्रमाण वाढले आहे!!
नशीब आधी एकदा अंघोळ करायला लागायची आता २ वेळा करायला लागते वगैरे नाही सांगितलंत. या धाग्याच्या विषयाला अनुसरून दैनंदिन जीवनातला फरक म्हणजे सरकारने असं काय काय केलं की तुमचं जीवन त्रासाचं व्हावं उदा. तुमच्या चेपूवरील विचारांना गंभीरपणे घेऊन तुमच्यावर पाळत ठेवणे, विनाकारण कुठल्यातरी प्रकरणात अडकवणे असे कुठले त्रास सरकार किंवा कुठल्या सरकारी विभागाकडून झालेत का? तथाकथित कट्टर हिंदू तुमच्या घरी येऊन तुम्ही रोज पूजापाठ करता आहात की नाही हे बघतात का? किंवा तुम्ही हिंदू संस्कृतीप्रमाणे कसे वागावे हे जबरदस्तीने सांगितले जातेय? तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना रोज संघाच्या शाखेत जायची जबरदस्ती केली जाते आहे का? जर हे काही होत नसेल तर का एवढा आरडाओरडा होतोय? बाकी महागाई, एखाद्या वस्तूची दरवाढ हे सगळं चालूच असतं पण इथे विषय तो नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Wed, 03/09/2016 - 01:56 नवीन
बाकी महागाई, एखाद्या वस्तूची दरवाढ हे सगळं चालूच असतं पण इथे विषय तो नाहीये. चालूच असतं म्हणल्यावर विषयच कट ण भाऊ! मला "दैनंदिन आयुष्य" मधुन जे समजले उमगले मी त्याला अनुसरुन लिहिले, उरता उरला सरकार फासिस्ट असल्याचा प्रश्न तर तसे अजिबात नाहीये . त्याची कारणे माझ्यामते वेगळी आहेत पण ते नंतर विषयानुरूप बोलु (बघा सोसंल तितके (तुम्हाला अन आम्हाला) बोललो! :D जाता जाता, हा सोसंल वाला सल्ला फ़क्त आम्हालाच की पक्ष निरपेक्ष सगळ्यांना हो??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Wed, 03/09/2016 - 13:16 नवीन
सोसंल चाल सल्ला खरंतर माझ्यासकट जे जालावर आहेत/ असतात त्या सर्वांनाच. मिपावर जरी वेगळे आयडी घेवून वावरत असलो आपण सगळे तरी संदेशाचा उगम कुठून झालाय हे शोधणे सहज शक्य आहे. त्यामुळे एखाद्या फ़ासिस्टानॆ शोध घेऊन धडा शिकवायचा म्हणलं तर करू शकतो (ही धमकी नसून काळजी आहे). चेपू तर काय खुले पुस्तक आहे त्यामुळे तिथे तर अजूनच सांभाळून (निदान मी तरी).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
श
श्री गावसेना प्रमुख Tue, 03/08/2016 - 04:50 नवीन
ज्यांना महागाई वाढलेली दिसत आहे त्यांची एक तर कमाई कमी झालेली आहे नाहीतर चंगळवाद वाढलेला आहे असे गृहीत धरावे। शेतकऱ्यांचा फायदा व्हावा म्हणून सेन्ट्रल गव्हर्नमेंट ने साखरेची निर्यात 15%पर्यंत करण्याचे निर्देश दिलेत त्याने साखरेचे भाव वाढणार असे दिसले रे दिसले लगेच मीडिया वाल्यांनी एका सुरात कोकलने सुरु केले महगांई कि मार नागरिक बेजार,ह्यांचा काय प्रॉब्लेम असतो तेच कळत नाही,भाव नाही म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या कि सरकार ला दोष देऊन मोकळे होतात आणि भाव वाढवले कि तरी ओरडतात ,महागाई वाढली म्हणून ओरडणारे त्या सडवलेल्या दुधाचे पनीर 200 रुपये किलो आणि 10 20 रुपये निर्मिती मूल्य असलेला पिझा 200 ते 1000 रुपये पर्यंत खातात तेव्हा महागाई दिसत नाही ह्यांना।आता सरकारने डाळ आयात केल्याने डाळीचे भाव खाली येताहेत त्यामुळे विदर्भातल्या डाळ उत्पादक शेतकऱ्यांचे किती नुकसान होईल ते डाळ आयात करा म्हणून ओरडणारे भरून देतील काय।
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 04:56 नवीन
सरकारच्या धोरणांचे समर्थन करण्याच्या नादात तुम्ही सामान्यांच्या विरोधात तर बोलत नाही ना याची खात्री करुन घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
न
नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 05:11 नवीन
ज्यांना महागाई वाढलेली दिसत आहे त्यांची एक तर कमाई कमी झालेली आहे नाहीतर चंगळवाद वाढलेला आहे असे गृहीत धरावे। सरसकट गृहितकात बंदिस्त केलेत तुम्ही सगळ्या निम्न मध्यमवर्गाला. बरे नाही ते. डाळ 200 ?रोज किती डाळ खातात भाऊ महान राष्ट्रकार्य म्हणून तुम्ही सोडा डाळ आम्ही गरीब शाकाहारी माणसे आहोत 6 जणांची फॅमिली त्यात बालके वृद्ध अश्यात डाळ लागतेच आमच्या प्रथिनांच तोच एक स्त्रोत आहे भाव वाढणार असे दिसले रे दिसले लगेच मीडिया वाल्यांनी एका सुरात कोकलने सुरु केले महगांई कि मार नागरिक बेजार,ह्यांचा काय प्रॉब्लेम असतो तेच कळत नाही. हा संदर्भ कळला नाही, मी मीडिया ला जबाबदार नाही मी मीडिया कर्मी नाही मी फ़क्त मी जे बोलतो त्याला जबाबदार आहे (अगदी तुम्हाला काय अन कितपत समजते आहे त्याचा ही मी जबाबदार नाही), एक निम्न मध्यवर्गीय डिस्पैच क्लर्क म्हणून मला महागाई विषयी जे काही वाटले ते मी बोलतोय, ह्यात मीडिया मधे कुठे आला ते काही झेपले नाही , उगाच काहीही? आता सरकारने डाळ आयात केल्याने डाळीचे भाव खाली येताहेत त्यामुळे विदर्भातल्या डाळ उत्पादक शेतकऱ्यांचे किती नुकसान होईल ते डाळ आयात करा म्हणून ओरडणारे भरून देतील काय। किती तो निरागस भाव!! फायदा शेतकऱ्यांचा कधीच होत नव्हता/नाहीये, डाळ आयातीमुळे सुद्धा नुकसान शेतकऱ्यांचे नाही तर दामदुप्पट भाव झाले की मुनाफा कमाई होईल ह्या आशेने चढ्याभावाने वेयरहाउसेस घेऊन त्यात डाळी दाबून ठेवणाऱ्या जमाखोर हलकट व्यापाऱ्यांचे होईल, ह्याच्याकडे सोइस्कर दुर्लक्ष काय?? अवांतर :- जाऊ दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
ब
बोका-ए-आझम Tue, 03/08/2016 - 06:53 नवीन
अहो तुमचा मेनका नावाचा बार होता ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
ब
बोका-ए-आझम Tue, 03/08/2016 - 07:01 नवीन
http://www.misalpav.com/comment/763462#comment-763462
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 07:22 नवीन
खोदकाम कार्याबद्दल कौतुक अन शुभेच्छा, तरीही बोका ए आझम साहेब, स्वतःच्या आयडी ची केलेली चेष्टा होती ती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
भ
भंकस बाबा Tue, 03/08/2016 - 18:35 नवीन
ओ गरीब शाकाहारी माणूस ते नेटचे बिल भरायला पैसे आहेत आणि मांसाहारी प्रतिसाद टाकायला भरपूर वेळ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Wed, 03/09/2016 - 01:50 नवीन
पर्सनल होताय काय दादा?? बरे नाही ते! असो!.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
श
श्री गावसेना प्रमुख Wed, 03/09/2016 - 02:57 नवीन
भंकस बाबा त्यांच्या नेटचा विषय काढू नका हो,नेट हे महिन्यातून एकदा 500 रुपयाचं लागते आणि जीवनावश्यक वस्तू ह्या रोजच लागतात है कि नाही स्कॉच बाबा।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
म
मार्मिक गोडसे Tue, 03/08/2016 - 18:49 नवीन
शेतकऱ्यांचा फायदा व्हावा म्हणून सेन्ट्रल गव्हर्नमेंट ने साखरेची निर्यात 15%पर्यंत करण्याचे निर्देश दिलेत त्याने साखरेचे भाव वाढणार असे दिसले रे दिसले लगेच मीडिया वाल्यांनी एका सुरात कोकलने सुरु केले महगांई कि मार नागरिक बेजार,ह्यांचा काय प्रॉब्लेम असतो तेच कळत नाही
ओ गाववाले, साखरेची निर्यात 15% पर्यंत केल्याने शेतकर्‍यांचा कसा फायदा होईल ते जरा सांगाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
श
श्री गावसेना प्रमुख Wed, 03/09/2016 - 02:53 नवीन
निर्यात केल्या शिवाय साखरेला भाव कसा मिळणार,आता देशांतर्गत जो भाव आहे त्याने शेतकऱ्याला त्याच्या उसाचा 1600 1700 चा भाव मिळू शकतो ,म्हणून सरकार त्यांना ठरलेल्या कोट्याने साखर निर्यात करायला सांगताहेत आणि कारखानदारांनी शेतकरी हितासाठी साखर निर्यात करणे गरजेचे आहे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 03/09/2016 - 11:30 नवीन
म्हणून सरकार त्यांना ठरलेल्या कोट्याने साखर निर्यात करायला सांगताहेत आणि कारखानदारांनी शेतकरी हितासाठी साखर निर्यात करणे गरजेचे आहे।
१)आंतरराष्ट्रिय बाजारात सध्या असलेले साखरेचे भाव भारतातील साखर निर्यात करण्यास अनुकूल आहेत का? २)सरकारला साखर निर्यातीसाठी सबसीडी द्यावी लागली का? ३)प्रत्यक्षात किती टन साखर निर्यात झाली? नसेल झाली तर का नाही झाली? ४)२०१५ मध्ये साखरेचे मागील वर्षापेक्षा ३३% अधिक उत्पादन झाले. २०१६ मध्ये ते २८% ने कमी असेल म्हणजेच ते जवळजवळ २०१४ च्या उत्पादनाइतकेच असेल. देशात साखरेचा शिल्लक साठा असल्यामुळे यंदा साखरेची देशांतर्गत मागणी पुर्ण होऊ शकते. गेल्या ५-६ महीन्यात साखरेचे भाव जवळजवळ ४०% ने वाढले. मग हा नफा नक्की कोणाला झाला? ५)देशात उसाचे सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील शेतकर्‍याला साखर कारखान्यांकडून उसाचे पैसे FRP प्रमाणे मिळतात की साखरेच्या बाजारभावाने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 03/10/2016 - 15:46 नवीन
भारतात साखरेचं सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेशात होतं. महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 03/10/2016 - 15:57 नवीन
चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद बोका-ए-आझम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्री गावसेना प्रमुख Tue, 03/08/2016 - 05:44 नवीन
Bjp सरकार ने शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून त्याचा माल खुल्या मार्केट मध्ये विकता येईल (मार्केट कमिट्या बरखास्त करणे .ई(मचलेले राजकारणी ह्याला इरोध करतात हे येगळ त्यांचे दुकान बंद पडतील ना)ह्यासाठी पावले उचलली आहेत,ज्यांना फक्त टीका करायची आहे त्यांना ते दिसणार नाही, बाकी 2 रुपयाच्या लाह्या 75 रुपयात थिएटर मध्ये विकत घेणारे ह्यांनी शेतकऱ्यांबद्दल बोलावे हाच मोठा विनोद।
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 05:52 नवीन
Bjp सरकार ने शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून त्याचा माल खुल्या मार्केट मध्ये विकता येईल व राजकारणी ह्याला इरोध करतात >> ह्या दोन्हीसाठी लिन्क द्या ना! बाकी 2 रुपयाच्या लाह्या 75 रुपयात थिएटर मध्ये विकत घेणारे ह्यांनी शेतकऱ्यांबद्दल बोलावे हाच मोठा विनोद। >> मग कुणी बोलावे? २ रुपयाच्या लाह्या ७५ रुपयाला विकणार्‍या व्यापार्‍यांनी बोलावे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
श
श्री गावसेना प्रमुख Tue, 03/08/2016 - 06:57 नवीन
http://abpmajha.abplive.in/maharashtra/apmc-186928 सरकारची त्या दिशेने वाटचाल चालू आहे फक्त inc आणि ncp विरोध करताहेत।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 03/08/2016 - 07:17 नवीन
अहो गेले बारा वर्ष ही पावलंच उचलली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही हा कायदा बदलावा म्हणुन पावलं उचलली होती. पुढे काय घोडं अडलं ते माहित नाही. APMC Act review may abolish mandi tax Business Standard - 02 Nov 2004 Our Regional Bureau / Ahmedabad / Anand November 02, 2004 The Agricultural Produce Marketing Committee (APMC) Act may be amended by the end of the current year to abolish the ‘mandi’ tax and permit farmers to sell their produce outside ‘mandis’, said Sharad Pawar, Union minister of agriculture, consumers affairs, food and public distribution, on Sunday. “A solution would be found in the interest of the farmers, who will have the right to sell their commodities anywhere they want to. The mandi taxation system will be removed. The Centre may give incentives to states to amend their APMC Acts,” said Pawar. बाकी एनसीपी विरोध कशाला करत आहे तेही पुढे दिलं पाहिजे. http://www.asianage.com/mumbai/congress-ncp-oppose-change-apmc-act-437 Congress and NCP have opposed the proposed amendment to Maharashtra Agricultural Produce Marketing Committee Act, alleging that the BJP government is favouring the corporate sector and traders through the amendment. According to opposition leaders, the amendment is tantamount to a backdoor entry to APMC for BJP and RSS. So far, APMC has been controlled by Congress and NCP. Dhananjay Munde however said, “The state is not ready to speak about who will take guarantee to get money from the corporate sector if farmers sell their agricultural produce to them. In fact, the BJP government is trying to reduce the importance of APMC and push a policy favoured by traders through the proposed amendment. We will not allow it.” आता इथे श्रेय घेण्याच्या लढाईचं राजकारण होत असेल तर असो. रच्याकने, लैच अवांतर व्हायले ना भौ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
न
नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 07:24 नवीन
×××××2 रुपयाच्या लाह्या 75 रुपयात थिएटर मध्ये विकत घेणारे ह्यांनी शेतकऱ्यांबद्दल बोलावे हाच मोठा विनोद।×××× मी त्या वर्गातला नाहीये हे स्पष्ट करुनही जर आपणाला तीच टकळी सुरु ठेवायची असली तर आमचा निरुपाय आहे शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
V
viraj thale Tue, 03/08/2016 - 05:52 नवीन
अहो नाना वर्षभर ,गणपती उत्सव ,नवरात्र उत्सव ,इतर सण बहुसंख्य हिन्दू मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणी तुम्ही म्हणता हिंदूंच्या भावना दुखावल्या नाहीत .मागे एम .एफ .हूसेन च्या वेळी पण हिंदूंना असेच ग्रुहीत धरले गेले कारण ते शांत आहेत म्हणून .बहुतेक हिंदूंच्या मनात "त्या " प्रकरणा बद्द्ल चीड आहेच .
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 09:03 नवीन
उत्सवप्रियता (सार्वजनिक/वैयक्तिक) अन भावना दुखवणे ह्यात गल्लत होते आहे का आपली?? हिंदु उत्सवप्रिय आहेत अन काही हिंदूंच्या भावना दुखवणे (त्यात परत रियल लाइफ अन जालीय आयुष्य हा घटक आलाच पण तो तुर्तास बाजुला ठेवुयात) ह्यात काय समानता आपणाला दिसली??? 2011 पासुन महिषासुर शहादत दिवस जनेवि मधले खुळे साजरा करीत आहेत, ते हिंदु (कागदोपत्री ) नाहीत?? का कागदोपत्री अन भावनेने हिंदु असलेल्या उर्वरीत 79 कोटी + जनतेला खुप फरक पड़तोय असे तुम्ही म्हणता आहात? कृपया ज़रा स्पष्ट कराल काय?? एक क्षणभर जर हे मानले की 79 कोटी हिंदु हे भंकसबाबा म्हणाले तसे दुखावले आहेत, म्हणजे नेमके काय झाले आहे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: viraj thale
भ
भंकस बाबा Tue, 03/08/2016 - 18:50 नवीन
एकतर तुम्ही महिषासुर शहीद दिवसाला छापलेल्या पत्रिका वाचलेल्या नाहीत. त्या भारतातील बहुसंख्य जनतेने वाचल्या असण्याची शक्यता फार कमी वाटते. पण संसदेत स्मृति इराणी बाईनीं जे भाषण केले त्यावरून वरील मामला बराच स्फोटक होता हे जनतेच्या लक्षात आले. हिंदुचा सर्वात उत्तम गुण म्हणजे ते क्षमाशील असतात. असे स्फोटक् आरोप दुसऱ्या धर्माच्या देवांवर लागले असते तर देश पेटवण्याच्या भाषा बोलल्या गेल्या असत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
प
प्रदीप साळुंखे Tue, 03/08/2016 - 07:50 नवीन
अफजल वरून थेट तूरडाळ,महागाई वर चर्चा कोण भरकटवली?
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे Tue, 03/08/2016 - 08:04 नवीन
>मे २०१४ पूर्वी आणि नंतर असा काय मोठा फरक झालाय तुमच्या आमच्या दैनंदिन जिवनात? ट्रेड मार्क यांचा पूर्ण प्रतिसाद वाचता ते महागाईबद्दल बोलत नसावेत असे वाटते. त्यांचा रोख वेगळाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
न
नाना स्कॉच Tue, 03/08/2016 - 08:56 नवीन
दैनंदिन जीवनात अफज़ल लटकवला की नाही?, कन्हैया किती गरीब आहे, त्याची वैचारीक बैठक इत्यादी प्रश्न बसतील का तुरडाळीच्या/साखर तेल ह्यांच्या भावाचे अन महीना बजेट संबंधी प्रश्न बसतील? प्रदीप दादा परत एकदा तुमच्यासाठी सांगतो, मी प्रश्नाला शब्दनिष्ठ राहून उत्तरे देतो आहे, अन जर ट्रेडमार्क ह्यांचा रोख महागाई कड़े नसावा असे तुमचे म्हणणे आहे तर दैनंदिन जीवनात काय अपेक्षित आहे तुम्हाला हे सांगाल काय कृपया?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
प
प्रदीप साळुंखे Tue, 03/08/2016 - 09:19 नवीन
पूर्ण प्रतिसादाचा रोख वेगळा आहे आणि शेवटच्या ओळीत एकदमच विषयांतर केलं असेल ट्रेडमार्क यांनी.
मी प्रश्नाला शब्दनिष्ठ राहून उत्तरे देतो आहे, अन जर ट्रेडमार्क ह्यांचा रोख महागाई कड़े नसावा असे तुमचे म्हणणे आहे तर दैनंदिन जीवनात काय अपेक्षित आहे तुम्हाला हे सांगाल काय कृपया?
हे ट्रेडमार्कच सांगू शकतील,त्यांनी "दैनंदिन जीवन" हा शब्द कोणत्या आशयाने वापरला ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
ट
ट्रेड मार्क Tue, 03/08/2016 - 22:08 नवीन
सध्या जे संदर्भ सोडून एखादा शब्द किंवा वाक्य उचलण्याचे फॅड आहे त्याला नाना बळी पडलेले दिसत आहेत. माझ्या प्रतिसादाचा विषय होता की सरकार फ़ासिस्ट आहे का? तर पूर्वीचे सेक्युलर सरकार जाउन आता हे सरकार आल्यावर तुमच्या जीवनात काय फरक पडला. म्हणजेच गेस्टापो किंवा केजीबी च्या एजंट सारखे आता RAW चे लोक तुमच्यावर पाळत ठेवतात का? सरकार विरोधात उघडपणे किंवा खाजगीत बोलणारा तुमचा एखादा मित्र किंवा शेजारी अचानक एका रात्री गायब झाला आहे का? आणि तो कुठे गेला, कोणी नेलं, परत येणार का नाही याबद्दल कोणालाच माहिती नाही असा झालय का? तुमच्यावर हिंदू धर्मातील परंपरा, प्रथा ई पाळण्याची सक्ती केली जाते आहे का? न पाळल्यास चाबकांच्या फटक्यांची किंवा तत्सम शिक्षा दिली जाते का? रा. स्व. संघाच्या शाखेत तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने रोज जायला पाहिजे अशी सक्ती केली जाते आहे का? यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर हे सरकार फ़ासिस्ट आहे हे आपण मान्य करू. नसेल तर तुम्ही सांगा हे सरकार कसे फ़ासिस्ट आहे ते. बाकी चेपुवर तुम्हाला शिव्या पडल्या, डाळ महाग झाली, पाणी कमी जास्त दाबाने येतं, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी बॉसने झापलं, नोकरीत दुजाभाव होतो, तुम्हाला प्रमोशन/ पगारवाढ मिळाली नाही किंवा तुम्हाला तुमच्या मित्रापेक्षा जास्त मिळाली, लोकल मध्ये गर्दी वाढलीये, तुमचा शेजारी अचानक तुम्हाला त्रास द्यायला लागलाय, तुम्ही जाता त्या बस मध्ये आजकाल रोज भक्तीसंगीत लावलेलं असतं या असल्या गोष्टीं तर आपल्या आयुष्यात चालूच असतात. पण तो विषय इथे चर्चेला नाहीये. तुम्ही वेगळा धागा काढा यासाठी, मग आपण तिथे चर्चा करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
म
मार्मिक गोडसे Wed, 03/09/2016 - 11:49 नवीन
तुमच्यावर हिंदू धर्मातील परंपरा, प्रथा ई पाळण्याची सक्ती केली जाते आहे का?
एखाद्याला बीफ खावेसे वाटले तर त्याची ईच्छा पुर्ण केली जाईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
भ
भंकस बाबा Wed, 03/09/2016 - 12:09 नवीन
बीफ म्हणजे गोमांस असे कोणी सांगितले तुम्हाला? आमच्या भेंडिबाजारात या, पोटाला तडस येईपर्यन्त घालतो खायला तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 03/09/2016 - 12:18 नवीन
आमच्या भेंडिबाजारात या, पोटाला तडस येईपर्यन्त घालतो खायला तुम्हाला.
गोमांस का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
ट
ट्रेड मार्क Wed, 03/09/2016 - 13:23 नवीन
बीफ वर कायद्याने बंदी आहे जो कायदा काँग्रेसने पास केला. तो जर रद्द केला तर मग कायद्याने तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. प्रयोग म्हणून भेंडीबाजारात जाऊन प्रयत्न करू शकता. तसेच डुक्कर खाण्यावर कायद्याने बंदी नाहीये, ते पण भेंडीबाजारात खाउन बघू शकता, अर्थात डुक्कर तुम्हाला घेवून जायला लागेल. नंतरचे परिणाम सुद्धा तुम्हालाच भोगायला लागतील. तळटीप: एकदा दिलेल्या सल्ल्याची जबाबदारी आमचेवर नाही. सल्ला मानायचा की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे, आमचा आग्रह नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 03/09/2016 - 14:19 नवीन
बीफ म्हणजे गोमांस असे कोणी सांगितले तुम्हाला?
बीफ वर कायद्याने बंदी आहे जो कायदा काँग्रेसने पास केला.
वराह्पालन करायचे म्हणतोय, सुरुवातीला आपली 'मदत' लागेल, याल ना? परिणाम (पिल्लावळ) भोगायची जबाबदारी आमची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Wed, 03/09/2016 - 15:40 नवीन
वराह्पालन करायचे म्हणतोय, सुरुवातीला आपली 'मदत' लागेल, याल ना? परिणाम (पिल्लावळ) भोगायची जबाबदारी आमची.
यात मला वराह ठरवण्याचा प्रयत्न असावा असं वाटतंय. दुसरी काही प्रतिक्रिया सुचली नाही बहुतेक. असो. वराह हा आम्हा हिंदूंमध्ये विष्णूचा एक अवतार मानतात. त्यामुळे आम्ही पाळतही नाही आणि खातही नाही. बाकी 'परिणाम' चांगला होण्यासाठी 'भोगायची' जबाबदारी घेतल्याबद्दल अनेक शुभेच्छा. मला तुमच्या कार्यक्षमतेबद्दल खात्री आहे, तुम्ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडाल आणि परिणामही चांगला होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
भ
भंकस बाबा Wed, 03/09/2016 - 19:22 नवीन
हिन्दू वराह खातात. ते हिंदुना निषिद्ध नाही वा वराह पूज्य देखिल नाही. फ़क्त यात असलेले गावठी डुक्कर आपले हिन्दू लोक खात नाही कारण तो घाण खाऊन गुजराण करतो. बाकी जंगली डुक्कर कोकण भागात आवडिने खाल्ले जाते. शिकारीला गेलेली माणसे डुक्कराचा मांडीचा भाग आपल्याकडे यावा म्हणुन भांडतात. आता कृपया हे सांगू नका की शिकार बंदी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा