ओवेसिंचा गळा
ओवेसी ह्यांची भाषणे मी पहिली आहेत आणि हि व्यक्ती अतिशय अभ्यासू आहे ह्यांत शंकाच नाही.
जेव्हा नक्षलवादी हल्ला करतांत तेंव्हा सगळे म्हणतात कि "we must encoruage naxalites to join mainstream and solve problem democratically ". माझ्या मते ओवेसी सारखा कट्टर मुसलमान संसदेत असणे हि चांगली गोष्ट असून त्याला योग्य तो मान इतरांनी दिला पाहिजे, मन व्यक्तीला असून त्याच्या विचारणा किमत देण्याची गरज नाही. जर संसदेत त्याला बोलायला दिले नाही किंवा जेल मध्ये डांबले तर त्याच्या सारख्या कट्टर लोकांपुढे कायद्याच्या बाहेर जावून आपल्या भावना लोकंवर लादणे हा एकाच पर्याय बाकी राहतो. माझ्या मते ओवेसी म्हणजे एक नक्सल type माणूस आहे ह्याने शस्त्र घेण्याच्या नादात न पडता लोकशाही मार्गाने आपले विचार आणि धोरण प्रकट करण्याचा मार्ग अवलंबला आहे. आणि तो स्तुत्य आहे.
कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती तेंव्हा संघा कडे दोन पर्याय होते, लोकशाही मार्गाने पार्टी उभी करून निवडणूक जिंकणे आणि किंवा कायद्याच्या बाहेरून काही तरी भानगडी करणे (उद रामसेना). जे लोक संघाला कट्टर वगैरे समजतात खरे तर त्यांनी संघाच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे कारण त्यांनी खडतर पण अ-हिंसक मार्ग स्वीकारला. संघाला खरे तर शांततेचा नोबेल मिळायला पाहिजे.
त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच.
माझ्या मते कट्टरपंथी लोकांनी निवडून येवून संसदेत, वर्तमान पत्रांत इत्यादी आपले कट्टर विचार प्रकट करणे हि चांगली गोष्ट असून त्यात वायीत काहीच नाही उलट संसंद हि त्याच साठी बनवली गेली आहे.
उद्धव ठाकरे ह्यांचे "गळा कापावा" वगैरे बोल केवळ अलंकारिक स्वरूपाचे असावेत असे मला वाटते.
💬 प्रतिसाद
(251)
D
DEADPOOL
गुरुवार, 03/17/2016 - 10:57
नवीन
कहना क्या चाहते हो भई ?
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 03/17/2016 - 11:03
नवीन
तुम्हीच लिहीला होता ना तो RTE वरचा लेख? एक लेख इतका मुद्देसुद.. आणि एक हा असा? एका वाक्याचा दुसर्याला अर्थ लागेना..
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 11:03
नवीन
कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती
>> ह्या विधानाला काही आधार आहे का?
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 03/17/2016 - 11:13
नवीन
विधानाला आधार !!!
काहीही हं तजो भाऊ !
मी तर लेखाला काही आधार आहे का हे शोधतोय ! मलाच आधाराची गरज वाटते आहे हा लेख वाचून...
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 11:15
नवीन
आधार मिले ना मिले, कार्ड मिलेगा जरुर... वो भी फ्री.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 03/17/2016 - 11:04
नवीन
मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करुन घेतले पाहिजे या मताशी अनेक सहमत होतील. फक्त कसे? हा वादाचा विषय आहे. या धर्मात कट्टरता गरीबी गुन्हेगारी बेरोजगारी असे घटक तळाशी मोठे आहेत. जे सुसंस्कृत सुजाण मुस्लिम आहेत त्यांना आपण भारताशी एकनिष्ठ आहोत हे पदोपदी सिद्ध करावे लागते.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 11:14
नवीन
हे जे २५ % आरक्षण गरिबांना द्या म्हणते ना सरकार, त्यापेक्षा ह्या १३ टक्क्यांच्या मुलांना इतर मुलांसोबत जबरदस्तीने शिकायला पाठवा. सर्व धर्माचे विद्यार्थी एकमेकांसोबत लहानपणापासून शिकतील तर धार्मिक तेढ राहणार नाही. संघ, एम आय एम, भाजपा, काँग्रेस सारख्यांची दुकाने बंद होतील हे वेगळे.
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 03/17/2016 - 11:24
नवीन
बाप्पा असं केलं तर मुस्लिम समाजाला जबरदस्तीने भगवाकरण केल्याचा आरोप होईन ना ..तुमचा विचार स्तुत्य आहे पण करायचं कसं ? इथं दहशतवाद्याला फाशी द्यायची चोरी अन तुम्ही राजेहो कैच्याकै बोलता...
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
गुरुवार, 03/17/2016 - 11:34
नवीन
मेमन च्या फाशी नंतर गर्दी करणारे मुसलमान आपल्याला अस्वस्थ करतात पण कसाब ला गाडायला एक इंच जमीन देणार नाही म्हणाणारे दिसत नाहीत , का आपल्याला ते दाखवले जात नाहियेत?? काय वाटते???
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 03/17/2016 - 12:07
नवीन
नाना स्कॉच भाऊ,
मी मुस्लिम विरोधी नाही.
सविस्तर उत्तर देण्याची तीव्र इच्छा आहे. पण जाउद्या..नको !
राम राम घ्यावा ..
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
गुरुवार, 03/17/2016 - 13:02
नवीन
अहो मी तुम्हाला वैयक्तिक म्हणालो नाहीये दादा "आपल्याला" म्हणालोय :)
असो ! राग नसावा
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 03/17/2016 - 11:27
नवीन
अल्पसंख्यांक असोत अथवा गरीब सर्वच मुलांना इतर मुलांसोबत एकत्र शिक्षण दिले गेले पाहीजे, -आपापले धार्मीक शिक्षण सुट्टीच्या दिवशी वेगळे क्लास लावून देता येऊ शकते-. विशेषतः किमान भाषांच्या स्तरावर संबंधित राज्याची भाषा संवादासाठी तीन वर्षात शिकणे तसेच स्थानिक भाषेतील लिपीत लिखीत संवाद साधता येणे गरजेचे असावे. संवाद नसेल तर अविश्वास वाढतात आणि लिपी साधर्म्य विश्वास निर्मितीस पोषक असते म्हणून उर्दू असो का तमिळ देवनागरी लिपीस प्राधान्य द्यावयास हवे असे वाटते.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 11:45
नवीन
दोन्ही धर्माच्या लोकांमधे साहचर्य, सहवास नसल्यामुळे निर्माण होणारी अढी काढण्यासाठी एकत्र शिक्षणपद्धती आवश्यक आहे.
भाषेचा मुद्दा योग्य असला तरी अप्रस्तुत वाटतो. नगर, पुणे, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या एखाद्या मोहल्ल्यात चार घरं मुस्लिम आणि पन्नास घरं हिंदु असतील तरी सर्वांची भाषा मराठीच असते. आता आपआपल्या मातृभाषेप्रमाणे घरात प्रत्येक जण वेगवेगळी भाषा बोलतो, पण समाजात वावरतांना मात्र तिथली लोकल भाषा सर्वांकडून वापरली जाते.
दोन्ही समाजातील विसंवादाचे कारण भाषेचा फरक नाही हे नमूद करावे वाटते.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 03/17/2016 - 12:17
नवीन
स्थानिक माती आणि भाषेशी जोडलेले असले की एपिजे अब्दुल कलाम मिळतात ना. त्याच वेळी फकस्त मराठी बोलून काय उपयोग, तुमच्या आमच्या सोबत मराठी संस्थळांवर सहभागाच्या अभावामागचे कारण मग ती आपली इंग्लिश मिडीयमची मुले असोत का उर्दू माध्यमातली लिपी हे कारण नाही का ? किती मराठी साहित्यिकांचे लेखन उर्दूत अनुवादीत करुन उर्दू वर्तमान पत्रातून दिले जाते ? खास करुन त्यांच्या मुल्ला मौलवींनासुद्धा इतर स्थानिक संत साहित्याची माहिती असते का ? साहित्य दिले तर वाचता येते का ? सर्वच मराठी संत मुर्ती पुजक नाहीत हे त्यांना मराठी संतसाहीत्याचा अभ्यास केल्या शिवाय, अथवा मुर्ती पुजकांचीही काही एक बाजू आहे हे खुल्या संवादा शिवाय कसे काय समजू शकेल, अविश्वास आणि वैचारीक दरीस भाषा एकमेव कारण नाही पण अनेक कारणांपैकी एक महत्वाचे कारण असावे किंवा कसे.
भारत माता म्हणजे केवळ देश एवढाही विचार करता येतो, भारत माता की जय म्हणणारा प्रत्येक जण मुर्ती पुजा करत नसतो. भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टी हिंदू करतात म्हणून आम्ही करणार नाही या मानसिकतेतील संकुचितता त्यांना कुणी दाखवून देणार आहे की नाही- हिंदू कराग्रेवसते लक्ष्मी म्हणतात तीन देवांची नावे घेऊन कराग्रेवसते केवळ हाताने मेहनत करण्याचा संदेश देतो हिंदू हाताची प्रार्थना करतात म्हणून हिंदूंशिवाय इतर लोक त्यांचे हात वापरणे थांबवणार आहेत का ? - जशी मेंदीचा मुर्ती पुजेशी संबंध नाही तसा रांगोळीचाही संबंध नाही. नुसता दिवा लावला म्हणजे मुर्ती पुजाच होते असेही नसावे. संस्कृती आणि धर्म यांची गल्लत हिंदूत्व वादी करतात म्हणून इतर धर्मीयांनी केलीच पाहीजे असे नसावे पण अशाच छोट्या छोट्या मुद्यांचे भांडवल वाढवत नेऊन सांस्कृतिक साम्या पेक्षा संस्कृती विलग कशा आहेत हे दाखवण्यावर भर दिला जातो आणि मग परस्पर अविश्वासाचा खेळ रंगवला जातो.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 12:39
नवीन
तुम्ही उद्विग्न झाल्यासारखे वाटत आहात.
- Log in or register to post comments
च
चेक आणि मेट
गुरुवार, 03/17/2016 - 13:00
नवीन
छान प्रतिसाद
मला तुम्ही उद्विग्न झाल्यासारखे वाटत नाही आहात.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Sun, 03/20/2016 - 18:41
नवीन
प्रचंड सहमती :)
- Log in or register to post comments
ड
डॉ. एस. पी. दोरुगडे
गुरुवार, 03/17/2016 - 11:44
नवीन
ओवेसी आणि RSS ला एकच न्याय?
- Log in or register to post comments
न
निशांत_खाडे
गुरुवार, 03/17/2016 - 13:43
नवीन
येउद्या याच्यावर पण एक खास कविता.. कृ.ह.घ्या.
- Log in or register to post comments
ड
डॉ. एस. पी. दोरुगडे
गुरुवार, 03/17/2016 - 15:35
नवीन
तुम्हाला नेहमीच हलक्यात घेतले जाते.
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
गुरुवार, 03/17/2016 - 11:46
नवीन
पहिल्या परीच्छेदात अत्यंत शुद्धलेखन आणि नंतरच्या बाकी संपूर्ण लेखात किती त्या चुका
पहिला परीच्छेद कुठून चोप्यपेस्त केला काय
वायीत -संसंद शब्दाच्या शोधात असलेला :)
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
गुरुवार, 03/17/2016 - 11:52
नवीन
हे ओवेसी बरे आहेत,कायदा-संविधान याचं नाॅलेज तरी आहे यांना.पण ते धाकटे बंधू नकोत रे बाबा!!!
- Log in or register to post comments
त
त्रिवेणी
गुरुवार, 03/17/2016 - 11:59
नवीन
- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
गुरुवार, 03/17/2016 - 12:08
नवीन
त्रिवेणीजी आ गई है
- Log in or register to post comments
त
त्रिवेणी
गुरुवार, 03/17/2016 - 13:17
नवीन
अरे काय हे?
बाकी लिहिलेले आलेच नाही.प्रकाशित करताना एरर दाखवत होते.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 03/17/2016 - 12:22
नवीन
बॅरिस्टर आहेत, त्यांना कायद्याचं ज्ञान आहे. त्यांच्या AIMIM या पक्षाला हैदराबाद मुक्ती संग्रामातल्या रझाकारांची परंपरा आहे, जे तेव्हा लोकांवरच्या अत्याचारांमध्ये सहभागी होते. मुंबईत AIMIM कडे विधानसभेची भायखळ्याची जागा आहे. काल सर्वपक्षीय एकमताने निलंबित करण्यात आलेले वारिस पठाण हे AIMIM चेच आहेत.
मला असं वाटतं की साहनाजींना असं म्हणायचंय - कट्टरवादी लोक जर मुख्यधारेच्या राजकारणात आले आणि हिंसाचाराऐवजी आपला काही अजेंडा घेऊन लोकांसमोर गेले तर ती चांगली गोष्ट आहे, कारण असं जर आपण होऊ दिलं नाही तर अशा माणसापुढे system शी चार हात करण्याशिवाय पर्याय राहात नाही आणि system त्याच्याशी लढण्यात गुंतते.
नक्कीच वेगळा विचार आहे.
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
गुरुवार, 03/17/2016 - 12:27
नवीन
मास्तर जवा भेट्सान तवा कोपरापासून दंडवत घालीन तुम्हाले
मूळ धागालेखकापेक्षा जास्त चांगल्या आणि थोडक्यात समजावलेला इषय
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 03/17/2016 - 12:30
नवीन
लेखापेक्षा सारांश उत्तम आणि नेमका !! __/\__
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 13:09
नवीन
संघ आणि ओवेसी यांच्या आयडॉलॉजी बघितल्या तर वाद कुठे आहे ते ध्यानात येईल. संघाचं म्हणणं आहे का ब्वा हा देश हिंदुंचा आहे, मुसलमान इथं उपरे आहेत, दिला ना त्यांना पाकिस्तान मग इथं का राहून घाण करतात. बरं राहयचं असलं तर आमची हरकत नाही पण दुय्यम नागरिक, आश्रित म्हणून राहा. आम्ही म्हणू ते करा. आम्ही म्हणू ते करणार नाही तर तुमचे देशावर प्रेम नाही.
ओवेसी आधी भारतीय मुस्लिम फार पेचात पडले होते. त्यांना कळत नव्हतं काय कराव. कारण इथले हिंदू असे बघतात म्हणून पाकिस्तान प्यारा म्हणावा तर ते पाकडे साले मुहाजिर का काय म्हणून हिणवतात. भंजाळलं होतं मुस्लिम पब्लिक, बाकी यांचे सर्व नेते या ना त्या पक्षाच्या दावणीला बांधलेले. मतपेट्यांपेक्षा जास्त किंमत नाही. त्यासाठी मुस्लिमांना सतत भीतीच्या सावटाखाली ठेवणे, त्यांचा विकास होऊ न देणे ही षडयंत्र काँग्रेसने खेळली, देशांतर्गत मुस्लिमांमधून देशविरोधी कारवाया करणारे सहज मिळून जातात त्याचे कारण हेच. ते खुश नाही त्यांना जसे वागवले जाते ते बघून. मग लगेच मुल्ला सांगतो तसे नाचतात. हे चक्र चालूच राहतं.
मुस्लिम हे देशाचे हिंदूंइतकेच स्वतंत्र, जबाबदार नागरिक व तेवढेच अधिकारी आहेत हे बहुतेक पहिल्यांदा ओवेसीनेच राज्यघटनेचा आधार घेउन पुढे येऊन स्पष्ट सांगितले असावे. हा देश हिंदूंसारखा आपलाही आहे हे त्याने मुस्लिमांच्या मनात बिंबवणे सुरु केले. आपण का मागे राहिलो ह्याची मुस्लिमांसमोर त्याने कारणे मांडायला सुरुवात केली. त्याला उगाच पाठिंबा मिळत नाही आहे. त्याला पाठिंबा मिळतोय यात मुस्लिमांचा दोष नाही तर काँग्रेस चा आहे.
ह्याचा लहान भाऊ येडा आहे. पण दोघांकडे मौलवी स्टाइलच्या ओरॅटरी स्किल्स जबरदस्त आहेत. असदची अभ्यासू वृत्ती आणि टु द प्वाइंट राहण्याचा स्वभाव बघता, मुस्लिम त्याच्या झेंड्याखाली एकवटतील त्यात नवल नाही.
ओवेसीकडे दुर्लक्ष करणे, त्यला गद्दार ठरवणे घातक ठरेल. त्याच्या माध्यमातून मुस्लिमांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. फालतू जिंगोइ़जम भडकवून दोन धर्मातली तेढ वाढते, बाकी काय होतं?
- आमची धाव हिथवरच. ह्याबद्दल दिग्गज लोक जास्त अभ्यासू माहीती सांगतील. बारमधे बसल्यावर जेवढं कानावर येतं तेवढं इथं लिहिलंय.
- Log in or register to post comments
S
sagarpdy
गुरुवार, 03/17/2016 - 13:33
नवीन
बाकी ओके
विदा ?
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 03/17/2016 - 14:38
नवीन
या बाबतीत विदा मागितला की अलविदाच मिळतो... :( ;)
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 15:06
नवीन
बडी जालिम है बेशहादत कत्ल करनेकी अदा
सुर्याला सुर्य न म्हणणाराला काय द्यावा विदा?
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 03/17/2016 - 15:14
नवीन
संघाला सुर्य म्हणत आहात का? ;)
बाकी असली शायरी ही बदनामी सिद्ध करताना चालत नाही. सिद्ध करा नाही तर संघाची बदनामी करत आहात असे म्हणा..
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 16:04
नवीन
बदनामी? हा हा हा. सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. शब्दांचे खेळ करण्यात संघ पटाईत आहे. प्रत्येक गोष्टीपुढे राष्ट्र जोडून दिले की झाले. सध्या मुद्दा ओवेसीचा आहे. संघाबद्दल नंतर कधीतरी.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 03/17/2016 - 16:09
नवीन
जो पर्यंत तुमच्या, "संघाचं म्हणणं आहे का ब्वा हा देश हिंदुंचा आहे, मुसलमान इथं उपरे आहेत, दिला ना त्यांना पाकिस्तान...." या वाक्याला संदर्भ देणारे तुम्ही काही पुरावे दाखवू शकत नाही तो पर्यंत तुम्ही बदनामीच करत आहात असे मी म्हणेन. आणि या पुढे सतत तसे लिहून आठवणही करून देईन. :)
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 16:25
नवीन
असे बोलणारे अनेक संघी मला भेटलेत, अशा अर्थाची अनेक संभाषणे-चर्चा ऐकल्या आहेत. स्पष्ट शब्द हेच नसले तरी आशय आणि आविर्भाव हाच असतो. तुम्ही अधिकृतच पाहिजे म्हणून अडून बसाल तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुमची मते बनतात पण तुम्ही बोट ठेवून पॉईंट आउट करु शकत नाही. संघांच्या अधिकृत वेबसाईटवर तर शब्दांचे खेळ आहेत.
बाकी गोळवलकरांची ही काही विधाने बोलकी आहेत. http://www.countercurrents.org/comm-guha281106.htm
तुम्ही निश्चितच हे मान्य करणार नाही. तेवढं स्वातंत्र्य तुम्हाला आहेच.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 03/17/2016 - 16:42
नवीन
जेंव्हा बदनामी केली जाते तेंव्हा त्याचे पुरावे दिलेले बरे.... संघाने नक्की कुठे "संघाचं म्हणणं आहे का ब्वा हा देश हिंदुंचा आहे, मुसलमान इथं उपरे आहेत,..." असे म्हणले आहे? कोण कुठले संघी काय बोलतात याला महत्व नाही तर संघाची अधिकृत भुमिका काय आहे याला महत्व आहे. म्हणून तुम्ही बदनामी करत आहात असे माझे म्हणणे आहे.
संघांच्या अधिकृत वेबसाईटवर तर शब्दांचे खेळ आहेत.
खेळ आहेत का प्रामाणिक विचार आहेत हे कसे ठरवले? कदाचीत रामचंद्र गुहांना माहीत असावे...
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 16:50
नवीन
गोळवलकरांच्या भूमिकेबद्दल काय मत आहे? का तीही रामचंद्र गुहांनी ठरवली आहे?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 03/17/2016 - 17:40
नवीन
त्यांची पुस्तकं अप्रतिम आहेत. भारतीय इतिहास संशोधनात ज्याला Subaltern Studies म्हणतात ती विद्याशाखा सुरु करण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. पण त्यांच्या डाव्या विचारांमुळे संघाबद्दलची त्यांची मतं मी ग्राह्य धरु शकत नाही. उद्या कम्युनिस्टांबद्दल तुमचं काय मत आहे हे मोहन भागवतांना विचारण्यात जसा काही अर्थ नाही किंवा भारतातल्या गरिबीबद्दल मुकेश अंबानींना किंवा अल्कोहोलिक अॅनाॅनिमसबद्दल विजय मल्ल्यांना विचारण्यात जसा अर्थ नाही तसंच संघाबद्दल रामचंद्र गुहांना विचारण्यात काहीही अर्थ नाही. ते पुरेसे नि:पक्षपाती नाहीत.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 03/17/2016 - 17:41
नवीन
असे वाचावे.
- Log in or register to post comments
स
साहना
गुरुवार, 03/17/2016 - 17:41
नवीन
तुम्ही गोळवल करांच्या पुस्तकाच्या बाबतीत म्हणत असाल तर ते पुस्तक त्यांनी विद्यार्थी असताना लिहिले असून संघ कार्यात सहभागी होण्या आधीच आपले विचार बदलले म्हणून मागे घेतले होते. आस ते पुस्तक मिळणे सुद्धा मुश्किल आहे. मी अलाहबाद मधील एक संशोधका कडून पुस्तकाची xerox मिळवली होती.
गुहा type लोक हे पुस्तक घेवून "हि संघाची अधिकृत भूमिका" असा दुष्प्रचार कधीपासून चालवत आहेत. सत्यापासून हे गृहीतक फार दूर असून आपली पोळी भजते म्हणून काहीही ह्या न्यायाने हे लोक अश्या खोट्या गोष्टीना पुढे पुढे नाचवत असतात.
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
गुरुवार, 03/17/2016 - 19:14
नवीन
गुहा ह्यांच्याबद्दल तुम्ही म्हणता तसे असेलही, बोका ह्यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांची मते ग्राह्य नसतीलही, गोळवलकरांचे पुस्तक (बंच ऑफ़ थॉट्स) हे त्यांनी विद्यार्थी दशेत लिहिले असेलही,
पण, ते पुस्तक दुर्मिळ अजिबात नाही, तर हे पुस्तक संघाचे आधिकारिक संस्थळ म्हणजेच आरएसएस डॉट ऑर्ग इथे ई-बुक स्वरुपात विनाशुल्क डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे, त्याचा इंग्रजी मधे केलेला अनुवाद ह्या स्वरुपात पीडीएफ फॉरमॅट मधे हे पुस्तक डाउनलोड केले जाऊ शकते, (इच्छुकांनी वरती उल्लेखलेल्या संस्थळावर "ई बुक्स" विभागात शोध घ्यावा ही विनंती)
काही प्रश्न उद्भवत आहेत ते खालील प्रमाणे
1. हे पुस्तक जर संघाच्या आधिकारिक संस्थळावर उपलब्ध आहे, तर ते संघाच्या आधिकारिक विचारांचा एक मोठा भाग का मानला जाऊ नये?
2. सदरहु पुस्तक संघाच्या आधिकारिक संस्थळावर उपलब्ध असण्यामागे तर गुहांचा टाइप लोकांचा हात नसेल न? का कसे?
3. तुमच्या म्हणण्याप्रमाणे , गुरुजींनी ते पुस्तक संघ कार्यात पडायच्या अगोदर विद्यार्थीदशेत लिहिले अन संघ कार्यात उडी घेताना ते त्यागले होते तर ते पुस्तक संघाच्या आधिकारिक संस्थळावर कसे काय उपलब्ध झाले? कोणी कुठले विचार त्यागले अन कोणी कुठले विचार आत्मसात केले असे समजायचे मग???
नोट :- माझे संघाशी काहीच वाकडे नाही, किंबहुना कुठल्याच विचाराशी माझे वाकडे नाही , फ़क्त एक पथ्य मी पाळतो ते म्हणजे उत्तम ते अन नेमके तितकेच घेणे, मला वाचन आवडते अन संघ साहित्य मला त्याज्य नाही, योगायोगाने पंधरवडा अगोदरच बंच ऑफ़ थॉट्स वाचायला घेतले आहे, त्यातुन जे चांगले मिळेल ते मी नमूद करेलच अन केलेच पाहिजे पण जे मला पटणार नाही किंवा जे चुक वाटते त्यावर मी टिका निश्चितच करेल , कारण आवडत्या विचारांचे कौतिक करणे जर माझे कर्तव्य असेल तर नावडत्याचा विरोध अन टिका करणे हा माझा हक्क आहेच. धन्यवाद
- Log in or register to post comments
स
साहना
Fri, 03/18/2016 - 03:10
नवीन
विचारधन नाही तर "We The Nationhood" ह्या पुस्तकाबद्दल मी बोलत आहे.
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
Fri, 03/18/2016 - 07:32
नवीन
तजो ह्यांनी दिलेल्या लिंक मधे (काउंटर करंट्स) तुम्ही उल्लेखलेल्या "we the nationhood" वर उहापोह कुठेच दिसुन आला नाही, त्यात रेपेटिटिवली "बंच ऑफ़ थॉट्स" चेच उल्लेख अन त्यातल्या विचारांची चर्चा आहे. मग मधेच "we the nationhood" चा विषय कुठून कसा अन का आला?? आपण लिंक वाचली नव्हती असे गृहीत धरावे काय?? इतकेच नाही तर आपण आपल्या मुद्द्यावरुन (बंच ऑफ़ थॉट्सच्या जागी वी द नेशनहुड) "गुहांसारखे" वगैरे एक ठोकळेबद्ध सरसकटीकरण सुद्धा केलेत , हे कसे काय???
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 03/17/2016 - 20:17
नवीन
तुम्ही गोळवल करांच्या पुस्तकाच्या बाबतीत म्हणत असाल तर ते पुस्तक त्यांनी विद्यार्थी असताना लिहिले असून संघ कार्यात सहभागी होण्या आधीच आपले विचार बदलले म्हणून मागे घेतले होते.
कदाचीत तुम्हाला, "We - Our Nationhood Defined" हे पुस्तक म्हणायचे असेल. ते त्यांनी विद्यार्थीदशेत नाही पण संघात येण्याआधी बाबाराव सावरकरांच्या पुस्तकाचा अनुवाद म्हणून केले होते. संघाने ते पुस्तक संघसाहीत्यात धरलेले नाही. तसेच त्याची शेवटची प्रत ही मला वाटते १९४७ साली निघाली. त्यानंतर म्हणजे गुरूजींच्या हयातीत देखील ते परत छापले नव्हते.
अर्थात पुढे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गुहांचे माहीत नाही पण अनेक डाव्यांनी (उदा राम पुनियानी) अपप्रचारासाठी वापरले आहे. पण भारतीय डाव्यांचा तो (दुर्)गुणच आहे! असो.
- Log in or register to post comments
S
sagarpdy
गुरुवार, 03/17/2016 - 18:48
नवीन
माझा गोळवलकर गुरुजींबद्दल काहीही अभ्यास नाही. गुहांबद्दल देखील नाही. सबब दिलेल्या विदा आणि खालील प्रतिसाद वाचून वरील आपले विधान मान्य करणे कठीण वाटते. परंतु आपण म्हणल्याप्रमाणे अनेक मुस्लिमद्वेष्टे संघी दिसतात हे सत्य. पण त्याचा अर्थ संघाची हि अधिकृत भूमिका आहे असा होत नाही.
याखेरीज माणसे आणि संस्था यांच्या भूमिका कालानुरूप बदलतात असं माझं मत / अनुभव आहे. उदा. सावरकरांची जन्मठेपेच्या आधी आणि नंतरची भूमिका. त्यामुळे एखादवेळ संघाची स्वातंत्र्या नजीकच्या कालची भूमिका आपण म्हणता तशी होती असे मानले तरी मागील १०-२० वर्षात तशीच आहे का ?
माझ्या मते "संघटन" यापलीकडे संघाची काहीच स्पष्ट भूमिका नाही.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 21:50
नवीन
मी कुठे हे म्हटलं की संघाची अमूक एक अधिकृत भुमिका अशी अशी आहे ते. मी बघितले ते संघी यांच्यात एक टिपिकल साम्य आहे. त्यांचे विचार छापखान्यातल्या खिळ्यांसारखे फिक्स आहेत. महाराष्ट्राच्या एका टोकापासून ते दुसर्या टोकापर्यंत अनेक संघी संपर्कात आले. अशा संघींच्या समावेशाने संघ बनतो की नाही? जे असे मुस्लिमद्वेष्टे संघी आहेत त्यांचा संघांशी संबंध नाही असे म्हणायला संघ नेहमीच तयार असतो. संघाच्या कुटुंबात अनेक हिंदुत्ववादी संघटना आहेत, त्यातल्या अनेक कट्टर मुस्लिमद्वेषी संघटनांच्या कृत्यांचा संघाने विरोध केलेला आढळला नाही. सबब मूक राहणे ही संघाची अधिकृत भूमिका असू शकते. त्याकडे बोट दाखवून विकासजींसारखे सदस्य म्हणू शकतात की संघाने तर काहीच म्हटले नाही. स्वयंसेवकांशिवाय संघ अशी काही कल्पना असेल किम्वा राष्ट्रीय आपत्तीत मदत कार्य करणारे तेच खरे संघी, संचलन कवायत करणारे तेच संघी, तीच संघाची अधिकृत भुमिका असे असेल तर असो बापडे. श्रीगुरुजींनी म्हटल्याप्रमाणे संघ वृक्ष आहे, अनेक संघटना त्याच्या फांद्या आहेत. गोड फळे आली ती संघाची असतात, कडु फळांचा वृक्षाशी संबंध नसतो. ती बाहेरच्या पक्षांनी कुठूनतरी आणून टाकलेली असतात.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 03/17/2016 - 22:04
नवीन
आपण असे म्हणले आहे: "संघाचं म्हणणं आहे का ब्वा हा देश हिंदुंचा आहे, मुसलमान इथं उपरे आहेत,..." अशी बदनामी दिसण्यासारखे संघाची कुठली भुमिका दिसली? तुम्हाला गुरूजींचे बंच ऑफ थॉट्स मधले म्हणणे खाली दाखवले आहे. त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे का अजूनही रामचंद्र गुहांचाच रामबाण वाटतो ते सांगितले तर बरे होईल. अर्थात जर बदनामीतच इंटरेस्ट असला तर इतर काही मान्य होणार नाही हे देखील लक्षात येईलच. असो.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 22:24
नवीन
प्रस्तुत प्रतिसाद माझ्या संघी लोकांच्या अनुभव व निरिक्षणांवर आधारित आहे हे आपणास मान्य करायचे नाही ह्यात माझा दोष नाही. तुम्हाला एका वाक्यात उत्तर अपेक्षित आहे. मला गेगाबायटीचा कंटाळा आलाय. तेव्हा असो.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 03/17/2016 - 22:45
नवीन
गोळवलकरांच्या भूमिकेबद्दल काय मत आहे? का तीही रामचंद्र गुहांनी ठरवली आहे?
असा प्रश्न विचारायचा आणि उत्तर मिळाले की दुर्लक्ष करायचे! चालायचच! कारण विद्वत्ता फक्त गुहांकडेच आहे - खोट कस बोलायच त्याची आणि पब्लीकला गंडवायची... अर्थात गंडवून घेयचेच असले तर ती तुमची आवड झाली!
प्रस्तुत प्रतिसाद माझ्या संघी लोकांच्या अनुभव व निरिक्षणांवर आधारित आहे हे आपणास मान्य करायचे नाही
संघी लोक म्हणजे कोण? त्यातले कोण नक्की संघाचे पदाधिकारी आहेत? नसले तर जे कोण गोमेसोमे असतील त्यांनी नक्की त्यांच्या "(दुष)कर्तुत्वाने" नक्की काय गुन्हे केले आहेत? हे सांगू शकाल का? कुठलाही पुरावा देयचा नाही आणि विश्वास ठेवायला सांगायचे म्हणजे अगदी ट्रंप सारखे झाले... तो नुसता सारखं पब्लीकला "believe me" इतकेच म्हणतो आणि पब्लीकला तितके चालते. पण आम्ही तसे नाही. तुम्ही एका संघटनेची बदनामीच करत आहात आणि ती देखील सार्वजनिक संस्थळावर आणि ती निषेधार्ह आहे.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »