ओवेसिंचा गळा
ओवेसी ह्यांची भाषणे मी पहिली आहेत आणि हि व्यक्ती अतिशय अभ्यासू आहे ह्यांत शंकाच नाही.
जेव्हा नक्षलवादी हल्ला करतांत तेंव्हा सगळे म्हणतात कि "we must encoruage naxalites to join mainstream and solve problem democratically ". माझ्या मते ओवेसी सारखा कट्टर मुसलमान संसदेत असणे हि चांगली गोष्ट असून त्याला योग्य तो मान इतरांनी दिला पाहिजे, मन व्यक्तीला असून त्याच्या विचारणा किमत देण्याची गरज नाही. जर संसदेत त्याला बोलायला दिले नाही किंवा जेल मध्ये डांबले तर त्याच्या सारख्या कट्टर लोकांपुढे कायद्याच्या बाहेर जावून आपल्या भावना लोकंवर लादणे हा एकाच पर्याय बाकी राहतो. माझ्या मते ओवेसी म्हणजे एक नक्सल type माणूस आहे ह्याने शस्त्र घेण्याच्या नादात न पडता लोकशाही मार्गाने आपले विचार आणि धोरण प्रकट करण्याचा मार्ग अवलंबला आहे. आणि तो स्तुत्य आहे.
कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती तेंव्हा संघा कडे दोन पर्याय होते, लोकशाही मार्गाने पार्टी उभी करून निवडणूक जिंकणे आणि किंवा कायद्याच्या बाहेरून काही तरी भानगडी करणे (उद रामसेना). जे लोक संघाला कट्टर वगैरे समजतात खरे तर त्यांनी संघाच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे कारण त्यांनी खडतर पण अ-हिंसक मार्ग स्वीकारला. संघाला खरे तर शांततेचा नोबेल मिळायला पाहिजे.
त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच.
माझ्या मते कट्टरपंथी लोकांनी निवडून येवून संसदेत, वर्तमान पत्रांत इत्यादी आपले कट्टर विचार प्रकट करणे हि चांगली गोष्ट असून त्यात वायीत काहीच नाही उलट संसंद हि त्याच साठी बनवली गेली आहे.
उद्धव ठाकरे ह्यांचे "गळा कापावा" वगैरे बोल केवळ अलंकारिक स्वरूपाचे असावेत असे मला वाटते.
💬 प्रतिसाद
(251)
ग
गामा पैलवान
Sun, 04/03/2016 - 22:35
नवीन
स्कॉचनाना,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं उशीराने मांडतोय त्याबद्दल क्षमस्व.
१.
>> काय बोलून गेला आहात ह्याची जाण असेल अशी अपेक्षा आहे!! :D :D
जरा स्पष्ट करून सांगतो. पाकिस्तानचे सत्ताधारी लोकं बलुचीस्थानातल्या मुस्लिम लोकांना ज्या भयंकर रीतीने वागवतात त्यास demonic हे विशेषण फारंच सपक ठरेल.
२.
>> मग नेमके कसे अन कुठे माजले आहेत क्रिस्चियन तालिबानी?? उगाच काहीतरी अर्धवट ऐकून मते ठोकुन द्यायची?
हे काय आहे मग ? : https://en.wikipedia.org/wiki/Christian_terrorism#India
३.
>> पण एक सांगा 1970 मधे कम्युनिस्ट शासन जेव्हा केरळ मधे आले तेव्हा ते "वर्ल्डस फर्स्ट डेमोक्रेटिकली
>> एलेक्टेड कम्युनिस्ट गवर्नमेंट" का म्हणवले गेले होते बुआ??
हे फक्त भारतातच घडू शकते. हिंदू सोशिक आहेत.
४.
>> आजही सर्वोत्तम जीवनमान, सरासरी आयुष्य, शिक्षण, वैद्यकीय सेवा, मानवी विकसन गुणांक (ह्यूमन डेवलपमेंट
>> इंडेक्स), फॉरेन रेमिटेंस, पोषण, अत्यंत कमी नागरी भ्रष्टाचार वगैरे मधे हे "कम्युनिस्ट राज्य" सगळ्यांच्या
>> नाकावर टिच्चून का नंबर वन वर आहे?? का हे सगळे पाहून लक्ष फ़क्त संघ कार्यकर्त्यांचे खून इतक्याकडेच ???
संघाच्या कार्यकर्त्यांचे खून पाडल्याची कबुली कम्युनिस्ट नेते जाहीर सभेत देतात. याला मोगलाई म्हणतात. कायदा आणि सुव्यवस्था हवी ना? नसेल तर मग इतकी आकडेप्रगती काय कामाची? शिवाय केरळची अर्थव्यवस्था बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आखाती पैशावर अवलंबून आहे, ज्यात कम्युनिस्टांचे काहीच योगदान नाही.
५.
>> ठ्ठोssssssssssss अहो फेसबुक पेज चे "दाखले" देताय!! किती हसे करून घेणार अजून स्वतःचे!!!!
तुम्ही जर तो लेख वाचला तर त्यात ठिकठिकाणी दिलेले संदर्भ सापडतील. अन्यथा ignorence is bliss.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6